Published in Sakal Saptarang 18th October 2026
मध्यप्रदेशची ओळख सांगणारी शहरं
इंदौर - फूड सिटी
भोपाळ - लेक सिटी
उज्जैन - स्पिरिच्युअल सिटी
ग्वाल्हेर - फोर्ट सिटी
महेश्वर - घाट सिटी
खजुराहो - टेम्पल सिटी
ओरछा - हेरिटेज सिटी
जबलपूर - मार्बल सिटी
मांडू - रोमँटिक सिटी
पचमढी - हिल सिटी
देखो दिल से!
“बुंदेले हरबोलों के मुँह, हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी, वह तो झाँसी वाली रानी थी।”
या अजरामर ओळी जेव्हा जेव्हा कानावर पडतात, तेव्हा तेव्हा त्या जणू, राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याचा प्रतिध्वनी आजही जिथे घुमतो आहे अशा भूमीला भेट देण्याचं आमंत्रण देतात. राणी लक्ष्मीबाईंची अंतिम लढाई ग्वाल्हेरमध्ये लढली गेली, पण त्यांचा आत्मा आजही मध्यप्रदेशच्या कानाकोपऱ्यात संचार करीत असल्यासारखं वाटतं. इथले भव्य किल्ले आणि राजवाडे, घनदाट जंगलं, पवित्र नद्या आणि शतकानुशतकांचा इतिहास जपणारी शहरं, या सगळ्यांतून तोच पराक्रम आणि तीच जिद्द जाणवत राहते.
मध्यप्रदेश हे फक्त एक राज्य नाही, तर जणू एक स्वतंत्र देशच वाटतो. इथे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली तीन स्थळं आहेत-सांची, खजुराहो आणि भीमबेटका. भारतातील सर्वांत प्राचीन काळापासून टिकून असलेल्या बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांपैकी एक म्हणजे सांची! दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून शांततेचा संदेश देणारा सांचीचा स्तूप आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. भीमबेटकातील शैलचित्रं मानवाचं निसर्गाशी असलेलं प्राचीन नातं आपल्यासमोर मांडतात. खजुराहोच्या मंदिरांवरील अप्रतिम, बारकाईने कोरलेली शिल्पं पाहून आपण थक्क होतो. महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर ही ज्योतिर्लिंगं, नर्मदेचा उगमस्थान असलेलं पवित्र अमरकंटक... असे श्रद्धेचे विलक्षण पदर इथे उलगडताना दिसतात. शिवाय इतिहासाचाही एवढा व्यापक पट इतरत्र क्वचितच पाहायला मिळतो.
या राज्यात तब्बल नऊ व्याघ्र प्रकल्पही आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशची ‘टायगर स्टेट’ ही ओळख अगदी सार्थ वाटते. इथल्या सागवानाच्या घनदाट जंगलांत वाघ मुक्तपणे संचार करतात, भेडाघाटच्या आकाशाला भिडणाऱ्या संगमरवरी कड्यांमधून नर्मदा संथपणे वाहते आणि ओरछामधील छत्र्या सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघतात.
माझ्या मागच्या भेटीत मला खजुराहोच्या मंदिरांवरील अप्रतिम शिल्पं पाहता आली. पन्नामध्ये वाघाचं दर्शन घेण्याचा रोमांचक अनुभवही मिळाला. एका क्षणी स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, तर दुसऱ्याच क्षणी जंगलातील वनराजाचं दर्शन! मध्यप्रदेशची खरी जादू याच अनुभवांच्या विविधतेत सामावलेली आहे.
आणि मग येतं इंदौर! रात्रीच्या वेळी सराफा बाजाराचं रूपांतर एका प्रसिद्ध खाऊगल्लीत होतं. इथला पोहा, भुट्टे का कीस, गराडू आणि जांभळाचे शॉट्स अजिबात चुकवू नका! हे सगळं खाऊनही पोटात थोडी जागा उरली असेल, तर छप्पन दुकान तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेच.
मध्यप्रदेश पर्यटन विभागाची ती अविस्मरणीय साद आठवतेय ना, “हिंदुस्तान का दिल देखो!” तर मग, तीच तुमच्यासाठी आमंत्रण समजा. या भूमीच्या कथा ऐकण्यासाठी, तिचा समृद्ध वारसा अनुभवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात काही अविस्मरणीय आठवणींची भर घालण्यासाठी यापेक्षा उत्तम वेळ कोणती असेल? चला भारताचं हृदय पाहायला, वीणा वर्ल्डसोबत!
प्रत्येक वळणावर नवी गोष्ट
एका बाजूला हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी शिल्पं, तर दुसरीकडे जंगलातील वाघाच्या पावलांचा थरार; एका बाजूला महाकालची भस्म आरती, तर दुसरीकडे इंदौरच्या खाऊगल्ल्यांची रात्रीपर्यंत सुरू असलेली लगबग... असं हे भारताच्या हृदयस्थानी वसलेलं मध्यप्रदेश राज्य! प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक किल्ले, घनदाट जंगलं, नद्या आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती यांमुळे मध्यप्रदेशची सफर विविध पैलूंनी समृद्ध होते.
पौराणिक कथा आणि ऐतिहासिक वारसा: मध्यप्रदेशातील उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. ओंकारेश्वर हे आणखी एक ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या परिसरात वसलेलं आहे. इतिहासाच्या दृष्टीने सांचीचा बौद्ध स्तूप, भीमबेटकाची प्रागैतिहासिक शैलचित्रं, खजुराहोची मंदिरं आणि ग्वाल्हेरचा किल्ला ही महत्त्वाची ठिकाणं आहेत.
भूगोल आणि निसर्गवैविध्य: विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा, नर्मदा नदीचं खोरं, चंबळसारख्या नद्या, जंगलं आणि पठारी प्रदेश यांमुळे मध्यप्रदेशच्या भौगोलिक रचनेत विविधता दिसते. जबलपूरजवळील भेडाघाटमध्ये नर्मदा नदीच्या प्रवाहाने तयार केलेले संगमरवरी कडे आणि धुवांधार वॉटरफॉल ही प्रमुख आकर्षणं आहेत. पचमढीच्या डोंगररांगा निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. वन्यजीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर कान्हा, बांधवगड आणि पेंच राष्ट्रीय उद्यानांमध्ये जंगल सफारी करता येते. वाघांसह विविध वन्यप्राणी आणि पक्ष्यांचं निरीक्षण हा या प्रवासाचा महत्त्वाचा भाग ठरतो.
संस्कृती आणि कला: गोंड आणि भिल्ल या आदिवासी समुदायांच्या कला, नृत्यं, लोकसंगीत, हँडिक्राफ्ट्स आणि लोकल फेस्टिव्हल्स मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक वैविध्याची ओळख करून देतात. ग्वाल्हेरची संगीत परंपरा, बाघ प्रिंट, गोंड चित्रकला आणि पारंपरिक वस्त्रोद्योग हे इथल्या कलावैशिष्ट्यांचे नमुने आहेत. ग्वाल्हेरची शास्त्रीय संगीत परंपराही उल्लेखनीय आहे.
खाद्यपरंपरा: मध्यप्रदेशच्या खाद्य प्रवासाची सुरुवात होते ती इंदौरपासून. भारताची ‘स्ट्रीट फूड कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सकाळची सुरुवात पोहे-जलेबीने होते. त्यावर शेव डाळिंब आणि लिंबाचा रस घालून तयार होणारे इंदौरी पोहे ही एक वेगळीच चव आहे. त्यानंतर सराफा बाजार आणि छप्पन दुकान परिसरात गराडू, खोपरा पॅटीस, दहीबडा आणि असंख्य चटकदार पदार्थांची मेजवानी मिळते. माळवा प्रदेशातील दाल बाफला हा मध्यप्रदेशचा प्रतिष्ठित पदार्थ मानला जातो. तुपात मुरलेले बाफले आणि मसालेदार डाळ यांचा संगम हा स्थानिक आदरातिथ्याचं प्रतीक आहे. याच प्रदेशातील चक्की की शाक आणि भुट्टे का कीस हे पदार्थही खास आहेत. भोपाळमध्ये मुघलाई प्रभाव असलेले कबाब, कोरमा, बिर्याणी आणि इतर मुघलाई पदार्थ प्रसिद्ध आहेत. गोड पदार्थांत मावा बाटी, मालपुआ आणि पारंपरिक मिठाया लोकप्रिय आहेत. उपवासाचा पदार्थ म्हणून साबुदाणा खिचडी ही मध्यप्रदेशात रोजच्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनली आहे.
शॉपिंग आणि स्थानिक बाजारपेठा: मध्यप्रदेशातली खरेदी म्हणजे पारंपरिक कला, स्थानिक संस्कृती आणि अस्सल कारागिरीचा खजिनाच! महेश्वरच्या तलम महेश्वरी साड्या आणि चंदेरीच्या नाजूक विणकामाच्या साड्या हे महिलांसाठी खास आकर्षण आहे. बाघ प्रिंटचे रंगीत कापड, गोंड कलेतील सुंदर चित्रं आणि हँडिक्राफ्टच्या वस्तू आपल्या खरेदीत वेगळीच रंगत आणतात. इथे गेल्यावर प्रसिद्ध इंदौरी नमकीन, कुरकुरीत सेव आणि इतर चटपटीत पदार्थ घरी घेऊन जाण्याचा मोह आवरणं कठीणच! इथे शॉपिंग करताना स्वतःसाठी तर काहीतरी खास निवडाच आणि शिवाय यासुंदर सहलीच्या आठवणींसोबत मध्यप्रदेशच्या संस्कृतीचा एक छोटासा ठेवाघरी घेऊन या!
सण-उत्सवांच्या निमित्ताने मध्यप्रदेश: आज स्थानिक संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या सहलींना महत्त्व मिळत आहे. मध्यप्रदेशमध्ये खजुराहो नृत्य महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन संगीत समारोह आणि भोपाळचा लोकरंग महोत्सव अशा सांस्कृतिक आयोजनांच्या निमित्ताने प्रवास आखता येतो. भगोरिया उत्सवातून आदिवासी परंपरा आणि स्थानिक बाजारांचं दर्शन घडतं. या उत्सवांच्या तारखा तपासून प्रवासाचं नियोजन केल्यास पर्यटनासोबत सांस्कृतिक अनुभवही घेता येतो. असा हा मध्यप्रदेश एका प्रवासात अध्यात्म, इतिहास, निसर्ग, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक परंपरा यांचा अनुभव देतो. मग तुम्ही कधी जाताय?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- मध्यप्रदेश हे ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखलं जातं.
- कान्हा राष्ट्रीय उद्यानाने रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’ ला प्रेरणा दिली.
- कान्हा राष्ट्रीय उद्यान हे दुर्मिळ हार्ड-ग्राउंड बाराशिंग्याच्या संवर्धनासाठीप्रसिद्ध आहे!
- भीमबेटका येथील केव्ह पेंटिंग्ज मानवाच्या प्राचीन कलाकृतींपैकी मानली जातात.
- धुवांधार वॉटरफॉलमधून प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचा फवारा हवेत धुरासारखा दिसतो, म्हणून त्याला ‘धुवांधार’ म्हणतात.
- पचमढी हे मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन आहे.
- ग्वाल्हेरच्या किल्ल्याला ब्रिटिशांनी ‘भारताचा जिब्राल्टर’ असं नाव दिलं होतं.
- ओंकारेश्वर बेटाचा आकार ‘ॐ’ या चिन्हासारखा दिसतो.
- महेश्वरच्या घाटांवर आजही अहिल्याबाई होळकरांचा वारसा जिवंत आहे.
- मांडूची बाज बहादूर आणि राणी रूपमतीची प्रेमकथा आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करते.
- चंदेरी आणि महेश्वरी साड्या भारतातील प्रतिष्ठित हातमाग परंपरांपैकी आहेत.
- मध्यप्रदेशातील बाघ गाव नैसर्गिक रंगांचा वापर करून केल्या जाणाऱ्या पारंपरिक ब्लॉक प्रिंटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल
मध्यप्रदेश हा चित्रपटसृष्टीचा आवडता कॅनव्हास आहे. इतिहास, निसर्ग, जंगलं, प्राचीन वास्तू आणि नयनरम्य लोकेशन्स यांचा अनोखा संगम असल्यामुळे मध्यप्रदेशने अनेक चित्रपट, वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरीजना आकर्षित केलं आहे. खजुराहोच्या जागतिक वारसास्थळ मंदिरांनी अनेक चित्रपटकर्त्यांना भुरळ घातली आहे. मांडूच्या प्रेमकथा, ओरछाचे राजवाडे, महेश्वरचे घाट आणि भेडाघाटच्या संगमरवरी व्हॅलीज पडद्यावर अनेकदा झळकल्या आहेत. भेडाघाटच्या नर्मदाकाठचं सौंदर्य ‘अशोका’सारख्या चित्रपटांमध्ये दिसलं, तर चंदेरी सिटीला ‘स्त्री’ आणि ‘स्त्री 2’मुळे नवी ओळख मिळाली. सिहोर जिल्ह्यातील महोडिया गावाने लोकप्रिय ‘पंचायत’ वेब सिरीजमधील फुलेरा गावाला वास्तव रूप दिलं आणि भोपाळने ‘राजनीती’मध्ये राजकीय रंग भरले. पेंच आणि कान्हाच्या जंगलांमध्ये फिरताना मोगलीच्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटतं. रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’ मागची प्रेरणा मानल्या जाणाऱ्या या जंगलांमध्ये निसर्ग आणि साहसाचा अनोखा अनुभव मिळतो. तुम्हालाही भारताच्या हृदयात दडलेल्या या भव्य ओपन-एअर फिल्म सेटचा अनुभव घ्यायचा असेल तर चला मध्यप्रदेशला!
वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल
ज्येष्ठांची श्रेष्ठ भ्रमंती
आयुष्यभराच्या धावपळीनंतर आता वेळ झाली आहे मनसोक्त फिरण्याची आणि नव्या आनंदी आठवणी गोळा करण्याची! वीणा वर्ल्डची सिनियर्स स्पेशल इंदौर, उज्जैन, मांडू ही टूर म्हणजे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा सुंदर अनुभव. इथल्या विविध ऐतिहासिक वास्तूंची सफर करताना तुम्हाला सोबत असेल ती अनुभवी टूर मॅनेजरची. नियोजनबद्ध प्रवास आणि सहप्रवाशांची छान सोबत यामुळे ही टूर तुम्हाला कायम लक्षात राहील. शिवाय एकटे आलात तरी नो प्रॉब्लेम. कारण वीणा वर्ल्ड देतं रूम शेअरिंग पार्टनरची गॅरंटी. तेव्हा चला मनसोक्त भटकायला, कारण फिरायला वयाचं बंधन नसतं, असते ती फक्त इच्छा!
आयुष्यात एकदा तरी... हे करायचंय!
- पहाटेच्या जंगल सफारीत कान्हा किंवा बांधवगडमध्ये वाघाच्याशोधात निघायचंय.
- भेडाघाटच्या संगमरवरी व्हॅलीज्मधून चांदण्याच्या प्रकाशात नर्मदेत बोट राईड करायचीय.
- धुवांधार वॉटरफॉल्सचा प्रचंड गडगडाट जवळून ऐकायचाय.
- उज्जैनमध्ये पहाटेची महाकाल भस्म आरती अनुभवायचीय.
- महेश्वरच्या घाटांवर सूर्यास्त पाहत नर्मदेच्या शांत प्रवाहात हरवून जायचंय.
- पचमढीच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये सूर्योदय पाहायचाय.
- इंदौरच्या सराफा बाजारात मध्यरात्री स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायचाय.
चला वीणा वर्ल्डसोबत!
भारताच्या हृदयात वसलेलं मध्यप्रदेश म्हणजे इतिहास, निसर्ग, वन्यजीवन, संस्कृती आणि खाद्यविश्व यांचा अनोखा संगम. हे राज्य वीणा वर्ल्डसोबत अनुभवणं म्हणजे तर पर्वणीच!
कस्टमाईज्ड हॉलिडेज्: तुम्हाला मध्यप्रदेश तुमच्या पद्धतीने अनुभवायचा असेल, तर कस्टमाईज्ड हॉलिडेज् हा उत्तम पर्याय आहे. महेश्वरमधील नर्मदाकाठचा मुक्काम, मांडूच्या ऐतिहासिक वास्तूंमधील भटकंती, खजुराहोचा सांस्कृतिक वारसा, ग्वालियर फोर्ट, ओर्छा फोर्ट अँड टेम्पल, उज्जैन -ओंकारेश्वरची अध्यात्मिक सफर, अशा विविध अनुभवांभोवती तुम्ही तुमची सुट्टी प्लॅन करू शकता.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE): ऑफिस टीमसाठी काहीतरी वेगळं प्लॅन करायचं असेल तर मध्यप्रदेशमधील हेरिटेज प्रॉपर्टीज, जंगल रिसॉर्टस्, नर्मदाकाठचे रिट्रीट्स, कल्चरल इव्हिनिंग्ज आणि टीम-बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज तुमच्या ग्रुपला एक अविस्मरणीय अनुभव देऊ शकतात. बिझनेस, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे मध्यप्रदेशातील MICE हॉलिडेज्.
ग्रुप टूर्स: वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह मध्यप्रदेश ग्रुप टूर्समध्ये राज्याची विविध रूपं अनुभवता येतात. इंदौरच्या राजवाडा पॅलेसपासून आणि प्रसिद्ध छप्पन दुकान व सराफा बाजारातील खाद्यभ्रमंतीपासून प्रवासाची सुरुवात होते. उज्जैनमध्ये महाकालेश्वर, कालभैरव आणि हरसिद्धी माता मंदिराचे दर्शन घेता येते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, नर्मदेवरील बोट राईड आणि महेश्वरच्या घाटांवरील निवांत क्षण हा प्रवास अधिक संस्मरणीय बनवतात. मांडूमधील जहाज महाल, बाज बहादूर पॅलेस आणि राणी रूपमती पॅव्हिलियन मध्यप्रदेशच्या वैभवशाली इतिहासाची ओळख करून देतात, तर मध्यप्रदेशच्या मोठ्या टूर्समध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारी, भेडाघाटच्या संगमरवरी व्हॅलीज, धुवांधार वॉटरफॉल्स, खजुराहोची वर्ल्ड हेरिटेज असलेली मंदिरं, सांची स्तूप आणि भीमबेटका लेणी यांचाही समावेश आहे.
वुमन्स स्पेशल टूर्स: वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल इंदौर उज्जैन मांडू टूरमध्ये इंदौरच्या राजवाड्यांचा रुबाब आणि छप्पन दुकानची खाद्य भटकंती, उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील भक्तिमय वातावरण, महाकाल लोक कॉरिडॉरचं भव्य रूप, मांडूमधील जहाज महाल, राणी रूपमती पॅव्हेलियन आणि बाज बहादूरच्या महालातून उलगडणारा इतिहास पाहता येतो. ओंकारेश्वर, महेश्वर, आणि राजेशाही अहिल्यादेवी फोर्टची सफर या प्रवासाला खास बनवते. तुम्हीही यातला तुम्हाला हवा तो पर्याय निवडाआणि चला भारताच्या हृदयाचा ठाव घ्यायला, मध्यप्रदेशला!
वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर
वीणा वर्ल्डची मध्यप्रदेश टूर म्हणजे इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि वन्यजीवनाचा एक सुंदर अनुभव आहे. इथला प्रवास म्हणजे भारताच्या हृदयात दडलेल्या असंख्य कथा अनुभवणं आहे. आणि या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी, अर्थात, वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर, संपूर्ण प्रवासात तुमच्यासोबत असतो. सांचीच्या स्तूपामागचा इतिहास असो, खजुराहोच्या शिल्पकलेतील आशय असो, महेश्वरच्या घाटांची परंपरा असो किंवा कान्हाच्या जंगलातील वन्यजीवन... तुमचा प्रत्येक अनुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. भेडाघाटच्या संगमरवरी व्हॅलीज्पासून उज्जैनच्या आध्यात्मिक वातावरणापर्यंत, पचमढीच्या निसर्गसौंदर्यापासून बांधवगडच्या जंगलांपर्यंत, मध्यप्रदेशचा प्रत्येक रंग तुम्ही मनापासून अनुभवावा हीच माझी इच्छा असते. मग तुम्ही कधी येताय माझ्यासोबत? चलो, बॅग भरो, निकल पडो, वीणा वर्ल्डसोबत!






















































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.