Published in Sakal Saptarang 11th October 2026
रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम
छोटा देश, मोठी शिकवण!
काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडतात. व्हिएतनाम माझ्यासाठी दुसऱ्या प्रकारात मोडणारा देश आहे. व्हिएतनाम म्हटलं की आपल्या पिढीला सर्वप्रथम आठवतं ते अमेरिका व्हिएतनाम युद्ध, त्याचे फोटो, बॉम्बहल्ले, संघर्ष आणि लहानपणापासून ऐकलेला एक अस्वस्थ इतिहास. त्यामुळे पहिल्यांदा व्हिएतनामला जाताना मनात त्या इतिहासाचीच प्रतिमा असते. पण तिथे गेल्यावर एक वेगळाच व्हिएतनाम भेटतो. तरुण. उत्साही. मेहनती. पुढे जाण्याची प्रचंड इच्छा असलेला...
मला प्रवासात त्या देशात काय आहे हे पाहण्याबरोबरच तो देश कसा विचार करतो हे समजून घ्यायलाही आवडतं. व्हिएतनाममध्ये फिरताना, एवढं सगळं होऊनही हा देश आपल्या जखमा कुरवाळत बसलेला नाही, तर तो धावत पुढे चाललाय हे आपल्याला सतत जाणवत राहतं. हा असा आशियाई देश आहे, ज्याच्याकडे अमर्याद साधनसंपत्ती नव्हती, ज्याचा इतिहासही सोपा नव्हता, पण त्याने आपल्या परिस्थितीला शरण न जाता प्रगतीची दिशा निवडली. रस्त्यावरची स्कूटर्सची प्रचंड गर्दी बघा, छोट्या छोट्या कॅफेजमध्ये बसलेली तरुणाई बघा, मार्केट्स बघा, नवीन बिल्डिंग्ज बघा, टुरिझममध्ये होणारी वाढ बघा... सगळीकडे एक प्रकारची एनर्जी जाणवते. काहीतरी करायचंय, घडवायचंय, पुढे जायचंय! आणि कदाचित म्हणूनच आजचा व्हिएतनाम मला विशेष आवडतो. एकीकडे हनोईची जुनी दुनिया, तर दुसरीकडे हो चि मिन्ह सिटीचा वेग. एका बाजूला गावं, शेती, लोकल लाईफ, तर दुसरीकडे जगाशी स्पर्धा करणारी आधुनिक शहरं. जुनं टाकून न देता नवं कसं स्वीकारायचं, हे या देशाने छान साधलंय. म्हणूनच व्हिएतनामचा प्रवास हा प्रेरणादायीही आहे.
अनेकदा युरोप, अमेरिका, स्वित्झर्लंड, जपान अशा देशांना आपण आपल्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये प्राधान्य देतो. पण भारतीय प्रवाशांनी आशियाकडेही नव्या नजरेने पाहायला हवं असं मला वाटतं. कारण प्रवास म्हणजे फक्त सुंदर फोटोज् नाहीत, प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो. आपल्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीतून गेलेली माणसं कशी जगतात, देश पुन्हा स्वतःच्या पायावर कसा उभा राहतो, हे दाखवतो. संस्कृती बदलत्या जगात स्वतःची ओळख कशी टिकवते, हे पाहायला शिकवतो.
आणि म्हणून व्हिएतनामला जा. कॉफी प्या. रस्त्यांवरून फिरा. स्थानिक पदार्थांची चव घ्या. लोकांशी बोला. त्यांचा इतिहास समजून घ्या. त्यांची धडपड बघा. आणि शक्य असेल तिथे फक्त कॅमेराच नाही, तर थोडं कुतूहलही घेऊन जा. म्हणजे परतताना तुमच्यासोबत फोटोग्राफ्स तर असतीलच, पण त्याचबरोबर ‘भूतकाळ कितीही कठीण असला, तरी भविष्य घडवणं आपल्या हातात असतं’ हा विचारही असेल. हे शिकवायला व्हिएतनामसारखा देश क्वचितच मिळतो. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो, यावेळी व्हिएतनामला!
ड्रॅगन, लँटर्न, कॉफी...
दंतकथा आणि संस्कृती - व्हिएतनामी संस्कृतीत ड्रॅगनला समृद्धी, शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मंदिरं, वास्तू आणि लोककथांमध्ये त्याचं स्थान आजही कायम आहे. दा नांगमधील प्रसिद्ध ड्रॅगन ब्रिज ही या परंपरेची आधुनिक झलक आहे. होई आनमध्ये दर महिन्याला होणारा लँटर्न फेस्टिव्हलही व्हिएतनामच्या श्रद्धा आणि परंपरेचं सुंदर दर्शन घडवतो. इथल्या रस्त्यांवर, स्क्वेअर्समध्ये आणि मार्केट्समध्येही स्थानिक संस्कृतीची झलक दिसते.
निसर्गाची विविध रूपं - उत्तर ते दक्षिण पसरलेल्या व्हिएतनाममध्ये पर्वतरांगा, हिरवीगार भातशेती, नद्या, समुद्रकिनारे आणि गजबजलेली शहरं अशी भौगोलिक विविधता पाहायला मिळते. हॅलाँग बेच्या लाईमस्टोन आयलंड्सपासून दा नांगच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणि फु क्वॉक आयलंडपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं स्वतःचं वेगळं आकर्षण आहे. या भौगोलिक विविधतेमुळेच प्रत्येक भागात वेगळी खाद्यपरंपरा, जीवनशैली आणि पर्यटनाचा अनुभव घेता येतो.
युद्धभूमी ते पर्यटन नकाशा - विसाव्या शतकात व्हिएतनामने दीर्घकाळ युद्ध, राजकीय अस्थिरता आणि प्रचंड मानवी हानी अनुभवली. या युद्धाने देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि भौतिक संरचनेवर खोल परिणाम केला. आज
‘हो चि मिन्ह’ सिटीमध्ये फिरताना किंवा वॉर रेम्नंट्स म्युझियमला भेट देताना त्या काळाच्या खुणा आणि त्यातून मिळालेले धडे समजून घेता येतात. कू ची टनेल्स युद्धकाळातील स्थानिकांची कल्पकता, चिकाटी आणि संघर्षाची साक्ष देतात. आज शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यटनातील प्रगतीमुळे हो चि मिन्ह सिटीसारखी शहरं आधुनिक व्हिएतनामचं प्रतीक बनली आहेत.
खाद्यसंस्कृती - व्हिएतनामची खाद्यसंस्कृती म्हणजे ताजेपणा, संतुलित चवी आणि स्थानिक परंपरांचा सुंदर मिलाफ. व्हिएतनामचा सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे ‘फो’. हनोईमध्ये ‘बुन चा’ हा आणखी एक लोकप्रिय पदार्थ आहे. ग्रिल्ड पोर्क, नूडल्स आणि ताज्या हर्ब्सने युक्त हा पदार्थ अतिशय चविष्ट असतो. याशिवाय फ्रेंच-व्हिएतनामी संस्कृतीचा मिलाफ असलेला ‘बान्ह मी’, होई आनचा ‘काओ लाऊ’ हे नूडल्सचं खास रूप, ‘स्प्रिंग रोल्स’ आणि कुरकुरीत ‘बान्ह झेओ’ हे पदार्थ आवर्जून चाखावेत. ताज्या भाज्या, हर्ब्स आणि हलक्या चवींबरोबरच किनारी भागातील मासे, कोळंबी आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ हे स्थानिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. ‘एग कॉफी’ आणि ‘व्हिएतनामी आयस्ड कॉफी’ या दोन्ही पेयांनी जगभरातील खाद्यप्रेमींना आकर्षित केलं आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या कॅफेमध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेणं हा एक सांस्कृतिक अनुभव असतो.
व्हिएतनामी फ्लेवर - व्हिएतनाममध्ये मिळणाऱ्या अनेक वस्तू या व्हिएतनामच्या संस्कृतीशी आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. इथली सर्वात लोकप्रिय खरेदी म्हणजे व्हिएतनामी कॉफी. रोबस्टा कॉफी, एग कॉफी मिक्स, कोकोनट कॉफी, पारंपरिक फिन फिल्टर, काजू, लोटस सीड स्नॅक्स, कोकोनट कँडी, व्हिएतनामी पेपर, स्टार अनिस, सिनॅमन आणि टी ब्लेंड्स आवर्जून खरेदी करा. होई आन हे शहर टेलर-मेड कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे केवळ 24 ते 48 तासांत आपल्या मापाचे सूट, ब्लेझर, ड्रेस
किंवा पारंपरिक आओ दाई तयार करून घेता येतात. ‘नॉन ला’ हॅट्स, सिल्क लँटर्न्स, एम्ब्रॉयडर्ड बॅग्ज, बांबू-रॅटन क्राफ्ट्स, लॅकरवेअर आणि फु क्वॉकचा प्रसिद्ध फिश सॉस हेही लोकप्रिय सोव्हेनिअर्स आहेत. हनोई ओल्ड क्वार्टर, हो ची मिन्ह सिटीमधील बेन थान मार्केट, होई आन नाईट मार्केट आणि दा नांगमधील हान मार्केट ही शॉपिंगसाठी लोकप्रिय ठिकाणं आहेत. इथे सोव्हेनिअर्स, लोकल हँडीक्राफ्ट्स, फॅशन ॲक्सेसरीज आणि लोकल प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे इथून परतताना आपण व्हिएतनामच्या चवी, रंग आणि आठवणींची छोटीशी दुनिया सोबत घेऊन येतो.
प्रवासातील नवा ट्रेंड-पर्यटनस्थळांपलीकडचा व्हिएतनाम - आज व्हिएतनाममध्ये फक्त प्रसिद्ध लँडमार्क्स पाहण्यापेक्षा एक्सपिरियन्स-लीड ट्रॅव्हल अधिक लोकप्रिय होत आहे. लोकल मार्केट्समध्ये फिरणं, स्ट्रीट फूड चाखणं, छोट्या कॅफेमध्ये कॉफी घेणं, लॅंटर्नच्या प्रकाशात होई आन अनुभवणं आणि लोकल लाईफस्टाईलशी जोडलं जाणं हा प्रवासाचा वेगळा अनुभव आहे. म्हणूनच आज व्हिएतनाम हे केवळ साईटसीइंग डेस्टिनेशन न राहता हँडिक्राफ्ट्स, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक अनुभव यांचा संगम बनत आहे.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- व्हिएतनाममध्ये मोटारसायकलींची संख्या इतकी आहे की काही शहरांमध्ये त्या लोकसंख्येलाही टक्कर देतात!
- जगातील सर्वात मोठ्या नॅचरल केव्ह्ज्पैकी एक, सॉन डूँग केव्ह, व्हिएतनाममध्ये आहे.
- हॅलाँग बे मधील हजारो लाईमस्टोन आयलंड्स लाखो वर्षांच्या जिओलॉजिकल प्रोसेसेस मधून तयार झाली आहेत.
- हनोईच्या ट्रेन स्ट्रीटमधून ट्रेन अक्षरशः घरांच्या दारातून जात असल्याचा भास होतो.
- होई आन हे शहर लँटर्न फेस्टिव्हलच्या रात्री हजारो रंगीबेरंगी कंदिलांच्या प्रकाशात उजळून निघते.
- दा नांगमधील ड्रॅगन ब्रिज आठवड्याच्या शेवटी प्रत्यक्ष आग आणि पाण्याचे फवारे सोडतो.
- दा नांगजवळील गोल्डन ब्रिज दोन प्रचंड दगडी हातांनी हवेत धरल्यासारखा दिसतो.
- फु क्वॉक हे व्हिएतनाममधील सर्वात मोठं आयलंड असून इथे जगातील सर्वात लांब समुद्रावरील केबल कारपैकी एक अनुभवता येते.
- कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे रिलीजिअस मॉन्युमेन्ट मानले जाते.
- अंगकोर वाट हे कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावर स्थान मिळवणाऱ्या मोजक्या स्मारकांपैकी एक आहे.
- व्हिएतनामची पारंपरिक शंकूच्या आकाराची ‘नॉन ला हॅट’ ही आजही या देशाची ओळख मानली जाते.
- कंबोडियातील ‘टोनले सॅप’ लेकचा प्रवाह वर्षातील काही काळ उलट दिशेने वाहतो. हा जगातील दुर्मिळ नैसर्गिक चमत्कारांपैकी एक आहे.
एक देश, तीन अनुभव
- नॉर्थ व्हिएतनाम - इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा संगम
हा भाग इतिहास, परंपरा आणि निसर्ग यांचं परिपूर्ण मिश्रण आहे. राजधानी हनोई, आपल्याला देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देते. हॅलाँग बे मधील समुद्रातून उभ्या राहिलेल्या लाईमस्टोन आयलंड्सचं अद्भुत सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं, तर सापाच्या हिरव्यागार पॅडी फील्डमध्ये ग्रामीण व्हिएतनामचं निसर्गरम्य रूप पाहायला मिळतं.
- सेंट्रल व्हिएतनाम - संस्कृती, वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांची मोहिनी
सेंट्रल व्हिएतनाम हा देशातील सर्वात रंगीबेरंगी आणि वैविध्यपूर्ण प्रदेश मानला जातो. दा नांगचे सुंदर बीचेस आणि मॉडर्न ॲट्रॅक्शन्स, होई आनचे कंदिलांनी सजलेले हेरिटेज वास्तूंचे रस्ते आणि हुए शहराचा राजेशाही इतिहास या भागाला एक वेगळीच ओळख देतात. जुनं आणि नवं, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ आपल्याला इथे अनुभवायला मिळतो.
- साऊथ व्हिएतनाम - आधुनिकतेची ऊर्जा आणि नदीकाठचं जीवन
साऊथ व्हिएतनाम म्हणजे वेगवान आणि आधुनिक व्हिएतनाम. ‘हो चि मिन्ह सिटी’ हे देशाचं आर्थिक केंद्र असून इथल्या गजबजलेल्या रस्त्यांवर आधुनिक व्हिएतनामची हार्टबीट जाणवते. त्याचवेळी मेकाँग डेल्टामधील बोटींवरचं जीवन, फ्लोटिंग मार्केट्स आणि नदीशी जोडलेली संस्कृती या प्रदेशाचा वेगळाच अनुभव देतात.
व्हिएतनामचं वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही प्रदेशांचा पूर्णपणे वेगळा स्वभाव. त्यामुळे एका देशाच्या प्रवासात तीन वेगवेगळ्या देशांचा अनुभव घेतल्यासारखं वाटतं.
वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
आनंदाचा नवा रंग उत्साहाचं नवं निमित्त!
प्रवास म्हणजे स्वतःसाठी काही दिवस जगण्याची संधी. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल म्हणजे मैत्रिणींसोबत गप्पा, विविध देशांची सफर आणि आठवणींची एक सुंदर बॅग! वीणा वर्ल्डकडे व्हिएतनामसाठी 5 आणि 8 दिवसांच्या वुमन्स स्पेशल टूर्स आहेत, तसंच 11 दिवसांची व्हिएतनाम-कंबोडिया ही कॉम्बिनेशन टूरही आहे. व्हिएतनाममध्ये हनोईतील वन पिलर पॅगोडा, टेम्पल ऑफ लिटरेचर आणि म्युझिकल वॉटर पपेट शोपासून हॅलाँग बे क्रूझ, सन वर्ल्ड बा ना हिल्स, गोल्डन ब्रिज, मार्बल माउंटन्स आणि होई आनची लॅन्टर्न बोट राइडपर्यंत विविध अनुभव घ्या, तर कंबोडियात अंगकोर वाट, बांतेय स्रेई, अप्सरा डान्स शो आणि ट्रेडिशनल कंबोडियन मसाजचा आनंद घ्या. मनसोक्त फोटो आणि ‘ही ट्रिप फक्त माझ्यासाठी!’ म्हणण्याची संधी म्हणजे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल. आणि हो, एकट्या प्रवास करत असाल तरीही वीणा वर्ल्ड देतं हमखास रूम पार्टनरची गॅरंटी. मग वाट कसली बघताय?
... विथ कंबोडिया
तुम्हाला जर एकाच टूरमध्ये 2 देश फिरायचे असतील तर व्हिएतनाम-कंबोडिया हा ऑप्शन बेस्ट आहे. शेकडो एकरांमध्ये पसरलेला मंदिरांच्या समूहाचा वारसा जपणारा देश म्हणजे कंबोडिया. या टूरमध्ये तुम्ही कंबोडियामधील सिएम रीपला भेट देत जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मंदिर संकुलाला म्हणजेच अंगकोर वाटला भेट देऊन वारसा अनुभवता. मुळात भगवान विष्णूला समर्पित हिंदू मंदिर म्हणून उभारलेल्या अंगकोर वाटची भव्य वास्तुरचना आणि दगडी शिल्पं पाहताना इतिहास अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहतो. अंगकोर वाटचा खमेर भाषेत अर्थ सांगायचा तर अंगकोर म्हणजे नोकोर म्हणजेच नगर आणि वाट म्हणजे मंदिर. यावरून टेम्पल सिटी हे नाव प्रचलित झाले. या टूरमध्ये तुम्ही नाजूक दगडी कोरीवकामासाठी प्रसिद्ध बांतेय स्रेई मंदिराची सफर करता, ट्रॅडिशनल कंबोडियन मसाजचा निवांत अनुभव घेता आणि कंबोडियाच्या पारंपरिक अप्सरा डान्स शोची रंगत अनुभवता. एवढंच नाही, तर कंबोडिया सर्कसमधून स्थानिक कलाकारांची भन्नाट कलाकारी, ॲक्रोबॅटिक्स आणि कंबोडियन कथा अनुभवायला मिळतात. प्राचीन मंदिरं, संस्कृती, कला आणि मनोरंजन यांचा सुंदर मेळ घालणारा कंबोडियाचा हा अनुभव व्हिएतनाम-कंबोडिया टूरला खऱ्या अर्थाने परिपूर्ण करतो.
वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर
व्हिएतनामसारख्या देशात प्रवास करताना मी म्हणजे वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर तुमच्या प्रवासाचा खरा आधार बनतो. हनोईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून हॅलाँग बे च्या निसर्गरम्य क्रूझपर्यंत, दा नांगच्या आकर्षणांपासून हो चि मिन्ह सिटीच्या इतिहासापर्यंत, प्रत्येक ठिकाणाचा अनुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी मी सतत तुमच्यासोबत असतो. आमचं वेळेचं अचूक नियोजन आणि प्रवाशांची काळजी यामुळे संपूर्ण प्रवास तुम्हाला अधिक निर्धास्तपणे करता येतो. व्हिएतनाममधली सुंदर ठिकाणं आणखी खास बनतात, ती त्या प्रवासातल्या आपुलकीच्या क्षणांमुळे, खास अनुभवांमुळे आणि प्रवासात भेटलेल्या माणसांमुळे. तुमची प्रत्येक आठवण खास बनवण्याची जबाबदारी वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर म्हणून माझी असते आणि तोच माझ्या कामतला खरा आनंद असतो.
चला वीणा वर्ल्डसोबत!
व्हिएतनाम म्हटलं की डोळ्यांसमोर येतं हॅलाँग बे, होई आन, गोल्डन ब्रिज आणि फु क्वॉक. पण व्हिएतनामची खरी मजा तेव्हा येते जेव्हा प्रत्येक शहरामागची कथा, प्रत्येक अनुभवामागची संस्कृती आणि प्रत्येक प्रवासामागचं नियोजन कोणीतरी सांभाळत असतं. म्हणूनच व्हिएतनाम वीणा वर्ल्डसोबत अनुभवणं ठरतं आणखी खास!
कस्टमाईज्ड हॉलिडेज् - तुम्हाला व्हिएतनाम तुमच्या पद्धतीने अनुभवायचं असेल, तर कस्टमाईज्ड हॉलिडेज् हा उत्तम पर्याय आहे. प्रायव्हेट शोफर-ड्रिव्हन व्हेईकलमधून प्रवास, निन्ह बिन्हच्या राईस फिल्ड्समधून बांबू राफ्टिंग, होई आनमध्ये स्वतःचा व्हिएतनामी लॅन्टर्न बनवण्याचा अनुभव आणि हेरिटेज स्टे, हॅलाँग बे मधील लक्झरी क्रूझ, दा नांगमधील बीच रिसॉर्ट, फु क्वॉकमधील आयलंड रिट्रीट, हो चि मिन्ह सिटीमध्ये स्कूटरवरून नाईट स्ट्रीट-फूड टूर, फु क्वॉकमध्ये बीचफ्रंट पूल व्हिलामध्ये स्टे किंवा सापामधील अप्रतिम राईस टेरेसेसमधून ट्रेक असा विविध अनुभवांनी नटलेला प्रवास तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आखून घेता येतो. कुटुंबासोबतची सुट्टी, मित्रांसोबतचा प्रवास, हनिमून किंवा लक्झरी हॉलिडे, यामध्ये व्हिएतनाम प्रत्येक वेळी वेगळा भासतो.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE) - टीमसाठी काहीतरी वेगळं प्लॅन करताय? समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टस्, हॅलोंग बे क्रूझवरील खास कार्यक्रम, फु क्वॉकमधील बीच इव्हेंट्स, दा नांगमधील मॉडर्न कन्व्हेन्शन फॅसिलिटीज, कल्चरल इव्हिनिंग्ज आणि टीम-बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज यामुळे व्हिएतनाम कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठीही लोकप्रिय ठरत आहे.
ग्रुप टूर्स - वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह व्हिएतनाम ग्रुप टूर्समध्ये देशाची विविध रूपं अनुभवता येतात. हायलाइट्स ऑफ व्हिएतनाम आणि बेस्ट ऑफ व्हिएतनामसारख्या टूर्समध्ये हनोईमधील हो चि मिन्ह कॉम्प्लेक्स, वन पिलर पॅगोडा आणि प्रसिद्ध वॉटर पपेट शोचा अनुभव घेता येतो. हॅलाँग बे क्रूझमधून युनेस्को वारसास्थळाचं निसर्गसौंदर्य अनुभवता येतं. दा नांगमधील सन वर्ल्डबा ना हिल्स, गोल्डन ब्रिज, मार्बल माऊंटन्स, मंकी माऊंटन्स, कॅम थान कोकोनट व्हिलेजमधील बास्केट बोट राईड आणि होई आनमधील लँटर्न बोट राईड या सफरीला रंगत आणतात, तर साऊथ व्हिएतनाममधील कू ची टनेल्स, वॉर क्राईम म्युझियम आणि मेकाँग डेल्टा देशाच्या इतिहासाची आणि जीवनशैलीची ओळख करून देतात.
सिनियर्स स्पेशल व्हिएतनाम - व्हिएतनाम म्हणजे इतिहास, निसर्ग आणि आधुनिकतेचा बहुरंगी प्रवास!या टूरचं वैशिष्ट्य म्हणजे सिनियर प्रवासांची योग्य काळजी घेऊन केलेलं टूरचं प्लॅनिंग आणि गॅरंटीड टूर पार्टनरची सुविधा. आणि हा प्रवास अधिक निश्चिंत, अधिक समृद्ध आणि अधिक संस्मरणीय बनवतो तो वीणा वर्ल्डचा अनुभव. मग तुम्ही कोणती टूर निवडताय?



































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.