India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

सो सिंपल... हाऊ कम?...

18 mins. read
Veena Patil
Veena Patil
18 Mins Read
April 11, 2025
April 11, 2025

Quick Summary

प्राईड फर्निशिंगच्या फुल्ली रीफर्बिश्ड शोरूमला भेट देऊन नवीन बेडसेट आणि गिफ्ट सेट्स पाहण्याचा प्लॅन करा.

बेडस्प्रेड सेट निवडताना कव्हर्ससोबत फिलर्सही लगेच भरून घ्यायला सांगा, जेणेकरून गिफ्ट पटकन वापरता येईल.

पिलो कव्हरमध्ये चेन आडव्या बाजूला असल्याने फिलर घालणे खूप सोपे होते, आणि “इतकं सोपं आधी कसं सुचलं नाही” असा अनुभव येतो.

कव्हर्स घालण्याचा जुना त्रास आठवा, कारण पूर्वी कव्हर्स उशीपेक्षा थोड्या मोठ्या नसल्याने परफेक्ट फिटसाठी खूप मेहनत लागायची.

हा छोटा उपाय तुमच्या घरातील दैनंदिन सेटअप जलद करतो आणि मीटिंगमध्ये सांगण्यासारखा मजेशीर टेक अवे ठरतो.

आयडिया सुचल्यावर लगेच इम्प्लिमेंट करून सातत्य ठेवणारेच यशस्वी होतात, असा संदेश या अनुभवातून मिळतो.

Published in the Sunday Sakal on 13 April 2025

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. बांद्य्राच्या प्राईड फर्निशिंगचा मेसेज आला, ‌‘आता शोरूम एकदम मस्त केलीय. फुल्ली रीफर्बिश्ड, नवीन नवीन गोष्टी आहेत, एकदा येऊन जा.‌’ एखाद्या शोरूमला जायची संधी कोण सोडणार, आणि तसंही मला एक कम्प्लिट बेडस्प्रेड कुशन्स पिलोज असा सेट गिफ्ट देण्यासाठी हवाच होता. नील हेता जवळच होते, त्यांना म्हटलं, `मी प्राईडला चाललेय, बेडसेटची एक गिफ्ट घ्यायचीय‌’. हेता म्हणाली, ‌‘मला पण बेडस्प्रेडचा सेट गिफ्ट करायचाय, चला मी पण येते‌’. अरे वाह! सासूबाई सूनबाई ग्रेट पीपल थिंक अलाइक. मग आमची तिघांची स्वारी पोहोचली प्राईडला. हे घेऊया ते घेऊया करीत आम्ही दोन सेट्स सिलेक्ट केले. सेटमध्ये होतं बेडस्प्रेड, दोन मोठ्या पिलोज, दोन मोठ्या मऊ मऊ कुशन्स, दोन छोट्या कुशन्स आणि एक थ्रो कुशन. ह्या सेटमध्ये सगळी कव्हर्स असतात त्यात पुन्हा फिलर्स कधी आणायला जाणार म्हणून मी म्हटलं, ‌‘त्यात फिलर्स पण भरून द्या नं. एकदाच काय तो खर्च.‌’ ज्याला गिफ्ट देणार त्याला पटकन वापरता आलं पाहिजे, नाही का? नाहीतर मग वस्तू अशाच पडून राहतात. त्याने फिलर्स भरायला सुरुवात केली आणि आम्ही तिघांनी युरेका म्हणत एकमेकांकडे पाहिलं. त्यातलं जे पिलो कव्हर होतं रेक्टँग्युलर म्हणजे आपल्या रोजच्या उशीच्या कव्हर सारखंच, थोडं मोठ्ठं, त्या कव्हरची जी चेन होती ती उशीच्या आडव्या बाजूला होती. म्हणजे उशीच्या कव्हरचं ओपनिंग आपण नेहमी छोट्या उभ्या बाजूला पाहिलंय. हे आडवं असल्याने त्यात फिलर घालून पुन्हा चेन लावणं इतकं इझी होतं की त्याक्षणी असं झालं की `इट्स सो सिंपल, आधी कुणालाच कसं सुचलं नाही.‌’ मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले. उशांना कव्हर्स घालणं हा एक कार्यक्रम असायचा. एवढी ती लांबलचक उशी, त्या कव्हरच्या छोट्याशा ओपनिंगमधून आत घालायची, त्याची चारही टोकं बरोबर त्या कव्हरच्या चारही साईडला परफेक्टली फिट करायची, कव्हरच्या आतला फोल्ड बरोबर बाहेर आणून कव्हरमधनं दिसणारी उशी झाकून टाकायची आणि उशीमधला कापूस एका ठिकाणी एकवटला नाहीये नं याची खात्री करायची. उशीला कव्हर घालणं हा आमच्या घरी तरी वर्कशॉप असायचा. परफेक्ट कव्हर न घातल्यामुळे धपाटेही खाल्लेत, त्यामुळे हा कव्हर्स घालण्याचा कार्यक्रम नको वाटायचा. त्यावेळी असा प्रश्न का बरं पडला नाही की, ‌‘ही कव्हर्स उशीपेक्षा थोडीशी मोठी का नाहीयेत?‌’ म्हणजे त्याला झिप वा चेन असावी हा विचार खूपच पुढचा होता कारण झिपच्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी येत होत्या. स्टीलच्या चेन्स सोबत प्लॅस्टिक फायबरच्या स्मूथ चेन्स यायला सुरुवात झाली होती त्यामुळे तो प्रश्न नव्हता, पण उशीचं कव्हर थोडं मोठं का नसायचं? आत्ताच्या स्टार्टअप जनरेशनला ही गोष्ट समजणार नाही. कारण त्यांना आज कोणत्याही साइजची उशी आणि कोणत्याही साइजची कव्हर्स बसल्याजागी ऑर्डर करता येतात. पण तो जमाना होता एकाच साइजची उशी आणि एकाच साइजची कव्हर्स मार्केटमध्ये उपलब्ध असण्याचा. बॉलिवूड भाषेत म्हणावसं वाटतं की, ‌‘जिस पर बितती है उसेही वह पिलो कव्हर्स डालने का दर्द पता है‌’. म्हणजे परफेक्शनसाठी आई बाबांचे धपाटे सोडले तर मजापण असायची. एकमेकांना उशीने मारणं, उशा एक-दुसऱ्यावर फेकणं वगैरे. नॉस्टॅल्जिक मोमेंट्स. प्राईड फर्निशिंगमधली ती पिलो कव्हर मोमेंट त्या दिवसातली ‌‘टेक अवे‌’ गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी मी कोणत्या तरी एका मीटिंगमध्ये हा किस्सा सांगितला तर समोरच्यांचे डोळे चमकले. ‌‘अरे खरंच की!‌’ या भावनेने. आमची सिनियर एच आर मॅनेजर ॲनी अल्मेडा म्हणाली, ‌‘अरे उस टाइमही नहीं, आज भी हम पिलो कव्हर्स डालने के लिए झगडते ही हैं। क्यूँ ऐसी चीजे ध्यान में नहीं आती? इट्स सो सिंपल, हाऊ कम नो बडी डिड इट बिफोर?‌’

आपले सर्वांचे आवडते डिरेक्टर प्रोड्यूसर ॲक्टर स्क्रीन प्ले रायटर रवी जाधव ह्यांनी पूर्वी आमचा मार्केटिंग मास्टरक्लास घेतला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, `आयडिया कुणालाही सुचू शकते. सुचल्यावर वाटतं, ‌‘अरेच्चा, हे किती सोप्पं होतं, आपल्याला कसं सुचलं नाही? पण आयडियेवर विश्वास ठेवून ती सर्वप्रथम इम्प्लिमेंट करणारा आणि त्यात सातत्य राखणारा यशस्वी होतो.‌’ खरंच किती खरं आहे ना हे? हल्लीच्या स्टार्टअपच्या जमान्यात अशी उदाहरणं पदोपदी सापडतात. मग पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयडियाज का सुचायच्या नाहीत? हा प्रश्न पडतो. शाळेत निबंध लिहायला यायचा, ‌‘मी शास्त्रज्ञ झाले तर?‌’ आणि मला वाटायचं, ‌‘एकतर मी शास्त्रज्ञ होणं ही एवढी दुरापास्त गोष्ट आहे की त्याचा विचार करण्यात तरी वेळ का घालवायचा?‌’ दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यांनी आपापलं काम इतकं मस्त केलंय की, सगळे शोध तर लावून झालेत आता मी काय दिवे लावणार तिथे?‌’ पण तेव्हा आयडियाज कमी सुचायच्या त्याचं कारण मला वाटतं ते म्हणजे आपल्यावर सोशिकतेचा प्रचंड मोठा संस्कार झालाय. ‌‘जे आहे त्यात भागव,‌’ ‌‘अंथरूण पाहून पाय पसर‌’, त्यामुळे आपल्यातला भला मोठा वर्ग सतत सहनच करीत आला. ‌‘एखादी गोष्ट अशी आहे‌’ ठीक आहे पण ‌‘ही गोष्ट अशी का नाही?‌’ हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही. ‌‘अरे‌’ ला ‌‘कारे‌’ करायचं नाही नं. त्यातही ज्यांनी वेगळी वाट धरली, ज्यांनी त्यांना सुचलेल्या आयडियाज्‌‍चा पाठपुरावा केला त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी घडल्या आणि त्यामुळेच आज जे काही सुसह्य जीवन आपण जगतोय तो अशा अनेकांच्या जिद्दीचा आणि ध्येयपूर्तीचा रिझल्ट आहे आणि त्यासाठी आपण त्यांचे ऋणी असायला पाहिजे. गेल्या दोन-तीन दशकात मात्र तरूणाईची मानसिकता चांगल्या तऱ्हेने बदलली. ‌‘पदरी पडले पवित्र झाले‌’ हे इतिहासजमा झालं. ‌‘व्हाय? का? कशासाठी?‌’ हे प्रश्न खुलेआम पडायला लागले. ते विचारणं आता गुन्हा नाही वाटत. एक जमाना होता किंवा अजूनही काही घरात ते असू शकतं (ज्यांनी बदलायला हवं), की ‌‘जेवढं सांगितलय नं तेवढं कर. उगाच चोंबडेपणा नको‌’, ‌‘प्रश्न विचारायचे नाहीत‌’. इतकी जरब किंवा भीतीचा दरारा असायचा की नव्याने विचार करायची सोय नव्हती. आजच्या पिढीला सहजपणे जे प्रश्न पडतात, त्याची उत्तरं शोधायचा ते प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना खुलं आकाश मिळतं जे आधी तेवढ्या प्रमाणात मिळायचं नाही. अर्थात शिस्तही महत्वाची होती. त्यामुळे ‌‘मी जर आयुष्यात काही करू शकले नसेन आणि त्याचं खापर मी माझ्या आईवडिलांवर किंवा मागच्या पिढीवर फोडलं तर ती पळवाट होईल.‌’ पण ही थोडीशी बंदिस्त कुटुंबसंस्था थोडं नुकसान करून गेलीच. म्हणजे आत्ताच्या खुल्या कुटुंबसंस्थेत सगळंच आलबेल आहे असं नाही पण ‌‘आयडिया‌’ हा माझा आजचा जो विषय आहे त्यासाठी खुली कुटुंबसंस्था, नव्या विचारांना चालना देणारी घरातल्यांची मानसिकता, ‌‘आयडियाज्‌‍‌’ उचलून धरणारं सामाजिक- राजकीय-आर्थिक पोषक वातावरण या गोष्टी नवीन पिढीसाठी खूप चांगल्या तऱ्हेने लाभदायक ठरल्या आहेत. त्याचा पुरेपूर फायदा ही पिढी घेत आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं जग एकदम सोप्पं बनून गेलंय. अनेक गोष्टींसाठी लागणारा आपला प्रचंड वेळ वाचलाय, अर्थात आपण ह्या वाचलेल्या वेळाचं काय करतो याकडे लक्ष द्यायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. जर वाचलेला वेळ सोशल मीडियावर जात असेल तर तो अन्याय आहे ज्यांनी ही सिंपल सोल्युशन्स निर्माण केली त्यांच्यावर, कारण त्यांचा हेतू हाच आहे की एखाद्या गोष्टीवर उगाचच खर्च होणारा वेळ वाचावा आणि आपल्या वाचलेल्या वेळात आपण स्वत:साठी, कुटुंबासाठी, आपल्या करियरसाठी, समाजासाठी वा देशासाठी फूल ना फूलाची पाकळी काहीतरी सकारात्मक योगदान द्यावं. सो, जस्ट बी केअरफुल.

पूर्वी जगभर फिरताना वेळ असला की मी ‌‘आयकिया‌’ मध्ये जायची त्या त्या देशातल्या किंवा शहरातल्या. त्यांच्या त्या सिंपल छान छान आयडियाज्‌‍ आणि सोल्युशन्स बघायला मजा यायची. काही गोष्टी बघून असं व्हायचं की, `अरेच्चा, इट्स सो सिंपल आणि आपण किती झगडतो तिथे ही गोष्ट बनवून घ्यायला किंवा आपला कितीतरी वेळ वाया जातो याच्याशिवाय.‌’ बाहेरच्या देशात जनरली मला संध्याकाळी कार्यक्रम असायचा किंवा गेस्टस्‌‍ना भेटणं असायचं. सकाळी जर कुणा असोसिएटची मीटिंग नसेल तर तिथलं आयकिया हे माझं ठरलेलं साइटसीइंग. आता ॲमेझॉनवर हे सगळं उपलब्ध आहे पण तिथे लॉग इन करायलाच भीती वाटते. नको त्या गोष्टी उगाचच घ्यायचा मोह होतो. आयकिया सारखी दुसरी आवडती जागा म्हणजे ‌‘मुजी‌’. काय ती छोटी छोटी सिंपल सस्टेनेबल सोल्युशन्स! ही नवनवीन सोल्युशन स्टोअर्स बघणं किंवा विंडो शॉपिंग करणं हा माझा आवडता छंद आहे. इतक्या छान जगात आहोत नं आपण! ही सोल्युशन्स नव्हती तेव्हाचं जग आपण पाहिलंय, त्यामुळेच आपण जास्त कृतज्ञ आहोत ह्या सगळ्या तरूणाईप्रति, त्यांनी निर्माण केलेल्या सिंपल सोल्युशन्सबद्दल आणि आपलं आयुष्य सुसह्य बनविल्याबद्दल. भले आपल्याला अशा सोल्युशन्सची गरज असेल वा नसेल, कधीतरी शहरातल्या एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जायचं, चौकस बनायचं, काय काय नवनवीन निर्माण झालंय ते बघायचं, त्या क्रिएटिव्हिटीला सलाम करायचा, खुल्या दिलानं म्हणायचं, `ओह, इट्स सो सिंपल, हाऊ कम, मला हे का सुचलं नाही!‌’

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.


देखो अपना देश

दिल से! प्यार से! सम्मान से!

भारताच्या नॉर्थला असलेल्या सेव्हन सिस्टर्स पैकी एक राज्य म्हणजे आसाम. अतुलनीय सौंदर्य आणि समृद्ध वारशाने नटलेले हे राज्य आहे. आसामला प्राचीन काळापासून समृद्ध इतिहास आहे. हिरव्यागार चहाच्या बागा, शांतपणे संथ वाहणाऱ्या नद्या आणि व्हायब्रंट कल्चरसाठी प्रसिद्ध असणारे आसाम हे राज्य आपल्यापैकी प्रत्येकाला या जादुई दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतं. याच्या हृदयातून वाहणारी प्रचंड ब्रह्मपुत्रा नदी ही या राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीला एक वेगळाच आयाम मिळवून देते. आसामची भूमी ही डोंगर, पठारे आणि जंगलांचं अनोखं मिश्रण आहे. आसाममध्ये प्रसिद्ध असे काझीरंगा नॅशनल पार्क आहे. हे नॅशनल पार्क एकशिंगी गेंडे आणि इतर अनेक वन्यजीवांचे घर आहे. या राज्यातील चहाचे उत्पादन जगप्रसिद्ध आहे. इथल्या टी इस्टेट मध्ये आपल्याला चहा बनविण्याच्या प्राचीन काळातल्या पाककृतीची झलक पहायला मिळते.

इथली माजुली बेटं ही जगातली सर्वात मोठी नदीतली बेटे आहेत. माजुली इथे राहणारी लोकं त्यांच्या अनोख्या संस्कृती आणि पारंपारिक आसामी कलाप्रकारांसाठी ओळखली जातात. माजुली बेट हे विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे सुद्धा घर आहे. त्यामुळे पक्षीनिरीक्षकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पण आसाम हे राज्य म्हणजे फक्त निसर्ग नाही तर हे राज्य खोलवर रुजलेल्या परंपरा, सण आणि विविध उत्सवांचे सुद्धा ठिकाण आहे. आसाम हे संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण असलेले ठिकाण आहे. या राज्यातील अनेक सण आणि कलाप्रकार प्रसिद्ध आहेत. या राज्यात साजऱ्या होणाऱ्या काही प्रसिद्ध सणांमध्ये वर्षातून तीनदा साजरा होणारा बिहू आणि इथली दुर्गा पूजा हे सण आहेत. इथल्या मॉनेस्ट्रीज आपल्याला वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतात. या राज्यात कामाख्या मंदिरासह अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. आसामच्या प्रत्येक कोपऱ्यात एक सांगण्यासारखी आणि ऐकण्यासारखी गोष्ट दडलेली आहे. तुम्हाला इथलं निसर्गसौंदर्य, संस्कृती किंवा आणखी कोणती गोष्ट भुरळ घालते आहे हे पाहण्यासाठी तुम्ही कधी आसामला जाताय ?


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

गार्डन रूट हे दक्षिण आफ्रिकेतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या आश्चर्यकारक समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्यासाठी, इथल्या वैविध्यपूर्ण वाईल्ड लाईफसाठी आणि चार्मिंग टाऊन म्हणून ओळखले जाते. हे वेस्टर्न केपमध्ये मोसेल बे आणि स्टॉर्म्स नदी दरम्यान 124 मैल पसरलेले आहे. हे शहर आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर वसलेले आहे. हे केप अगुल्हास नावाने ओळखले जाते. बहुतेक लोक आफ्रिकेच्या सर्वात दक्षिणेकडच्या बिंदूला केप पॉइंट मानतात, परंतु प्रत्यक्षात केप अगुल्हास जे गार्डन रूट प्रदेशाच्या लगतच बाहेरच्या बाजूला स्थित आहे हा इथला सदर्नमोस्ट पॉईंट आहे. या ठिकाणी इंडियन ओशन आणि अटलांटिक ओशन परस्परांना मिळतात. हे ठिकाण इथल्या पॉप्युलर केप पॉईंटपेक्षा कमी गर्दीचे आहे, त्यामुळे इथे आपल्याला शांतता अनुभवता येते. इथे असलेले न्यस्ना हेड्स हे एक भौगोलिक रहस्य आहे. न्यस्ना हेड्स हे दोन महाकाय असे प्रचंड मोठे वाळूचे खडक आहेत जे न्यस्ना लगूनच्या प्रवेशद्वाराचे संरक्षण करतात.

हे लगून अद्वितीय आहे, कारण ते जगातील काही मोजक्या टायडल लगून्सपैकी एक आहे, परंतु त्याची निर्मिती नेमकी कशी झाली याबद्दल जिओलॉजिस्ट्स मध्ये अजूनही एकमत नाही. गार्डन रूटचा भाग असलेले त्सित्सिकाम्मा नॅशनल पार्क हे इथल्या घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. इथे या देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात लांब झुलत्या पुलांपैकी एक पूल आहे आणि तो आजही कार्यरत आहे. इथला स्टॉर्म्स रिव्हर माऊथ ब्रिज हा 50 वर्षांहून अधिक काळापासून इथे उभा आहे. या ब्रिजवरून आपल्याला खडकाळ किनारपट्टी आणि स्टोर्मी रिव्हर माऊथचे आश्चर्यकारक दृश्य पहायला मिळते. गार्डन रूट हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच शिवाय त्याला समृद्ध सांस्कृतिक इतिहास देखील आहे. या भागात एकेकाळी खोई आणि सॅन लोकांची वस्ती होती. अलीकडच्या काळात, या प्रदेशात युरोपियन आणि आफ्रिकन दोन्ही संस्कृतींचा प्रभाव असलेल्या व्हायब्रन्ट कम्युनिटीजचा विकास झाला आहे.

बरेच पर्यटक या प्रदेशातल्या बीचेसना भेट देतात, गार्डन रूटमध्ये आपल्याला हिडन केव्हज आणि वॉटरफॉल्स सुद्धा पहायला मिळतात. आऊडशूर्नजवळ प्रसिद्ध कांगो केव्हज आहेत, ज्या जगातील सर्वात मोठ्या केव्ह सिस्टीमपैकी एक आहेत. या घनदाट जंगलात अनेक सेक्ल्यूडेड प्रदेश लपलेले आहेत. या डेन्स फॉरेस्टमधला मॅप ऑफ आफ्रिका वॉटरफॉल इन वाईल्डरनेस फार कमी लोकांना माहिती आहे. गार्डन रुटवरून साऊथ आफ्रिकेची नैसर्गिक आऊटलाईन पाहण्याचा आगळावेगळा अनुभव ही जागा तुम्हाला देते. तेव्हा तुम्हालाही जर निसर्गसौंदर्याने भरलेल्या या अद्भुत प्रदेशाला भेट द्यायची असेल तर आमच्यासोबत साऊथ आफ्रिकेला चला.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

100 Country Club

प्रगल्भ करणारा प्रवास

वासंती चौगुले, गोरेगाव, मुंबई

मी वासंती चौगुले. वीणा वर्ल्डच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासोबत फिरायला जाते आहे. मी भारतातल्या साधारण सात आठ टूर्स केल्या आहेत. मी आधी कांदिवली किंवा बोरिवली ऑफिसमधून माझं बुकिंग करायचे. पण आता आमच्या जवळच्या गोरेगावच्या ऑफिसमधून बुकिंग करते. आजवर मी सिक्कीम दार्जिलिंग, लेह लडाख, राजस्थान, केरळ यांसारख्या टूर्स केल्या आहेत. माझी भारताबाहेरची आजवरची एकमेव टूर म्हणजे युरोप टूर. 2018 साली मी वुमन्स स्पेशल युरोप टूरवर गेले. 9 दिवसांची टूर होती. मी शक्यतो वुमन्स स्पेशल टूर्सच करते कारण वुमन्स स्पेशल ही कॅटेगरी आवडते. या टूर्स तुम्हाला इंडिपेंडेंस शिकवतात. आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आम्ही पूर्णपणे एन्जॉय करतो. पुरुष नसतात म्हणून जरा जास्तच बिनधास्तपणे वावरतो. या टूरमध्ये आम्हाला फुलपाखरसारखं बागडता येतं. वय हा क्रायटेरिया नसतो. पंचवीस वर्षांची मुलगीही नाचते आणि तिच्यासोबत अगदी 70 वर्षांची बाई पण. मी सुद्धा 67 वर्षांची आहे. पण इथे तुम्ही एकटे पडतच नाही. पंधरावीस जणींचा ग्रुप होतो मस्त. यांच्या टूर मॅनेजर्सचं मला विशेष कौतुक वाटतं. ते को ऑपरेटिव्ह असतात. येणाऱ्या प्रत्येकीचा स्वभाव वेगळा असतो, पण ते कोणाला एकटं पडू देत नाहीत. वीणा वर्ल्डसोबत जायला आम्हाला जास्त सुरक्षित वाटतं. शिवाय शॉपिंग करायला मिळतं. आयुष्य भरभरून जगता येतं.

मला आवडलेल्या टूर्सबद्दल बोलायचं झालं तर केरळ बॅकवॉटर पहायला आम्ही गेलो होतो. तिथलं लोकेशन खूप छान होतं. आमचा ग्रुप खूप छान झाला होता. त्यामुळे ती टूर लक्षात राहिली. तसंच आम्ही 2019 साली लडाखला गेलो होतो. त्यावर्षी लडाखमध्ये पहिल्यांदाच झेंडावंदन करण्यात आलं होतं. त्यांचे पारंपरिक नृत्यप्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम पाहता आले. त्याच दिवशी रक्षाबंधनही होतं. आम्ही सगळ्या जणींनी लडाखमध्ये जवानांना राख्या बांधल्या. त्यांना द्यायला आम्हाला वीणा वर्ल्डकडून छोटं गिफ्ट देण्यात आलं होतं. ते त्यांना दिलं. अगदी हृद्य असा क्षण होता आम्हा सगळ्या जणींसाठी. आजही दरवर्षी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या दिवशी त्या प्रसंगाची हटकून आठवण येतेच.

मला प्रवास आवडतो कारण मला लोकांच्यात मिसळायला आवडतं, प्रवासमुळे आपण प्रगल्भ होतो, आपली ग्रोथ होते. आपल्याला मॅच्युरिटी येते. वेगवेगळ्या देशात गेलं की तिथली स्वच्छता, शिस्त, क्लायमेट वेगळाच अनुभव देतं. तिथलं लोकल फूड खाता येतं. आताही मे महिन्यात मी माझ्या एका टूरवरच झालेल्या एका मैत्रिणीसोबत व्हिएतनामला जाते आहे. आम्ही कुठली पुढची टूर करणार आहोत ते आम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकतो. ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल आणि त्यावेळी शक्य असेल ते जॉइन होतात. डिसेंबर जानेवारीच्या सुमारास मला दुबईची टूर करायची आहे आणि शक्य होईल तेव्हा जपानला चेरी ब्लॉसम सीझन अनुभवायचा आहे. वीणा वर्ल्ड ने मला आणि माझ्यासारख्या अनेकींना एकटीने फिरायला शिकवलं, जगायला शिकवलं. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍
समर हॉलिडेज इन स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हे वर्षभर फिरण्याचं ठिकाण आहे, कारण प्रत्येक सीझनमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज्‌‍चा अनुभव घेता येतो. समरमध्ये स्वित्झर्लंड म्हणजे जणू स्वर्गच! नेचर, आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज्‌‍ आणि रिट्रीटस्‌‍चं एक अनोखं मिश्रण स्वित्झर्लंड आपल्याला हॉलिडे वर प्रदान करतो.
माउंटन व्हिझिट्‌‍स अँड ॲक्टिव्हिटीज्‌‍:
युरोपमधील सर्वात उंच रेल्वे स्टेशन असलेल्या युंगफ़्राउहोक ला ट्रेनने भेट द्या.
ग्लेशियर 3000 येथे जगातील हायस्ट रेल टोबोगन राईड व अल्पाइन कोस्टरचा अनुभव घ्या.
गोर्नरग्राट ट्रेनने मॅटरहॉर्नचे बेस्ट व्ह्यूज्‌‍ पहा.
माउंट टिटलिस वर रोटेटिंग केबल कारचा अनुभव घ्या आणि युरोपमधील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिजवर चालण्याचा थरार अनुभवा
जगातील स्टीपेस्ट कोगव्हील ट्रेनने माउंट पिलॅटसला पोहोचा आणि तिथून पॅनोरॅमिक व्ह्यूजचा आनंद घ्या.
तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल, तर  इंटरलाकेन मध्ये स्कायडायविंग किंवा पॅराग्लायडिंग करून ग्लेशियल लेक्स आणि बर्फाच्छादित शिखरांचं सौंदर्य पाहा.
फुटबॉल प्रेमींनी झ्युरिकमधल्या फिफा म्युझियमला भेट द्यायलाच हवी.
लेक जिनिव्हामध्ये बोट क्रूझचा आनंद घ्या आणि मध्ययुगातील 'शटू दे शियाँ' ह्या कॅसल ला भेट द्या.
लेक थुन आणि लेक ब्राएन्झ मध्ये कयाकिंग वा पॅडल बोटिंग करा. युरोपमधील सर्वात मोठ्या वॉटरफॉल, 'राईन फॉल्स' ला बोटीने भेट द्या.
लॉयकरबाड आणि बाड रागाझ सारख्या आलिशान थर्मल बाथ्सचा अनुभव घ्या.
स्टे अँड फूड:
वलाय रीजनमध्ये 1,400 मीटर उंचीवर 360 ग्लास इग्लूमध्ये रहा ज्यातून रॉन व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते.
लेक ल्युसर्न जवळील व्हिला हॉनेगमध्ये रहा.  इथल्या हीटेड इन्फिनिटी पूलमधून माउंटन आणि लेकचे अप्रतिम दृश्य दिसते.
द शेदी आंडरमॅट, बड्रुट्स पॅलेस, आणि व्हिक्टोरिया युंगफ़्राउ ग्रँड हॉटेल मध्ये लक्झरी स्टेचा अनुभव घ्या.
शिलथॉर्न वरील पिझ ग्लोरिया या 3600 रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घ्या. हे ठिकाण जेम्स बॉण्ड चित्रपटातही झळकले आहे.
मेसाँ कायर आणि लिंड्ट होम ऑफ चॉकलेट या स्विस चॉकलेट फॅक्ट्रीज्‌‍ना भेट द्या आणि स्वतःचे चॉकलेट तयार करा.
ग्रुईएर किंवा एंगेलबर्ग येथील पारंपरिक स्विस चीज डेअरी ला भेट द्या.
शाले दे ग्रुईएर येथे पारंपरिक स्विस फाँद्यू चा स्वाद घ्या.
युनेस्को हेरिटेज साईट लावो विनयार्डमध्ये फेरफटका मारा आणि वाईन टेस्टिंग करा.
ट्रेन आणि स्विस पास:
स्विस ट्रॅव्हल पास सह रेल्वे, बस, आणि बोट ह्या सर्वांमधनं अनलिमिटेड प्रवास करा.
ग्लेशियर एक्सप्रेस, बर्निना एक्सप्रेस आणि गोल्डन पास लाईन सारख्या सुंदर ट्रेन प्रवासांचा मोफत अनुभव घ्या.
400+ अधिक म्युझियम्समध्ये फ्री एन्ट्री, आणि बऱ्याच माउंटन ट्रेन/केबल कार्सवर 50% हून अधिक सवलत मिळवा.
स्विस फॅमिली पास सह 16 वर्षांखालील 2 मुलांचा प्रवास फ्री मिळवा.
चला, आपल्या प्रायव्हेट स्वित्झर्लंड हॉलिडेवर ह्यावेळी बीट द समर हीट लाईक नेव्हर बिफोर!


ला टोमाटिना - स्पेन

स्पेनमधील 'बुन्योल' येथे दरवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या बुधवारी आयोजित होणारा 'ला टोमाटिना फेस्टिव्हल' हा जगातील सर्वात मोठी फूड फाईट म्हणून प्रसिद्ध आहे. 'ला टोमाटिना' त्याच्या भव्य स्वरूपासाठी, फ्रेंडली टोमॅटो फाईटसाठी ओळखला जातो. स्पेनमधील बुन्योल शहराच्या रस्त्यांवर 100 टनांहून अधिक पिकलेले टोमॅटो एकमेकांवर फेकण्यासाठी जगभरातून हजारो लोक एकत्र येतात. डोक्यापासून पायापर्यंत टोमॅटोच्या रसाने माखलेली असंख्य लोकं इथे आपल्याला पहायला मिळतात. या फेस्टिव्हलचा एक मोठा इतिहास आहे. 1945 साली तरुणांच्या एका गटाने स्थानिक परेड दरम्यान ही फूड फाईट सुरू केली. तेव्हापासूनच, या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली. बुन्योलमध्ये स्थानिक कार्यक्रम म्हणून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला कालांतराने आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचं स्वरूप प्राप्त झालं. सध्या दरवर्षी जगभरातून 20,000 हून जास्त लोक 'ला टोमाटिना' मध्ये सहभागी होण्यासाठी  येतात. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटात झालेल्या याच्या चित्रीकरणानंतर 2000 नंतर भारतीयांनी सुद्धा स्पेनमधील ला टोमाटिनाला हजेरी लावण्यास सुरुवात केली. तुम्हालाही या प्रसंगाच्या आठवणी आपल्या मनावर कायमस्वरूपी कोरायच्या असतील तर आमच्यासोबत ऑगस्टमध्ये स्पेनला चला.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
18 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
18 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
18 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top