Published in Sakal Saptarang 25th October 2026
सॉन्गक्रान फेस्टिव्हल
थायलंडमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात थाई नववर्षाच्या स्वागतासाठी सॉन्गक्रान फेस्टिव्हल साजरा केला जातो. या जगप्रसिद्ध फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण म्हणजे रस्त्यांवर रंगणारी पाण्याची धम्माल! हातात वॉटर गन, बादल्या घेऊन लोकलाइट्स आणि ट्रॅव्हलर्स एकमेकांना मनसोक्त भिजवतात. जुन्या वर्षातील नकारात्मक गोष्टी आणि बॅडलक धुवून टाकून न्यू इयरचं स्वागत करण्याची ही एक मजेशीर परंपरा आहे. थायलंडची ओल्ड कॅपिटल असलेल्या अयुथायामध्ये या फेस्टिव्हलला एक वेगळीच रंगत येते, कारण इथे या पाण्याच्या खेळात चक्क हत्तीसुद्धा सहभागी होतात!
या खास प्रसंगासाठी हत्तींना सुंदर सजवलं जातं. मग हे हत्ती आपल्या सोंडेतून वाटसरूंवर पाणी उडवत, त्यांना भिजवत या उत्सवात सहभागी होतात. आधीच आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या या फेस्टिव्हलमध्ये हत्तींच्या सहभागामुळे अनपेक्षित आणि मजेशीर रंग भरला जातो. मग सॉन्गक्रानच्या काळात अयुथायाच्या हिस्टॉरिक स्ट्रीट्सवरून फिरताना तुमच्यावर पाणी उडवणारं कोणीतरी, म्हणजे वॉटर गन घेऊन उभी असलेली एखादी व्यक्तीच असते असं नाही, कधी एखादा हत्तीही त्याच्या सोंडेने तुमच्यावर पाण्याचा वर्षाव करतो आणि विशेष म्हणजे, हा हत्तीसुद्धा या खेळाचा तितकाच आनंद घेताना दिसतो.
या फेस्टिव्हलचं ठिकाणही त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून देतं. अयुथाया हे काही साधंसुधं शहर नाही. चार शतकांहून अधिक काळ ते सियाम साम्राज्याची राजधानी होतं. आजही इथल्या रस्त्यांच्या आजूबाजूला शेकडो वर्षं जुन्या मंदिरांचे अवशेष आणि ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. अशा ऐतिहासिक वातावरणात साजरा होणारा हा पाण्याचा उत्सव, त्यात सहभागी होणारे हत्ती आणि सगळीकडे पसरलेला आनंद यामुळे इतिहास आणि धम्माल यांचा एक अनोखा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो.
याच काळात बँकॉक किंवा फुकेतमध्येही मोठ्या प्रमाणावर पाण्याचे खेळ रंगलेले असतात, पण अयुथायामधील सॉन्गक्रानचा अनुभव त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. या फेस्टिव्हलमध्ये एक सौम्य, पारंपरिक रंग जाणवतो. जुन्या काळात सॉन्गक्रान कसा साजरा केला जात असेल, याची जणू झलकच इथे पाहायला मिळते आणि या सगळ्यात सहभागी झालेला एक भलामोठा हत्ती हा अनुभव आणखी खास बनवतो.
विचार करा, पाण्यात खेळल्या जाणाऱ्या एखाद्या खेळात तुमच्यासोबत एक भलामोठा हत्तीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाला तर? किती मजा येईल ना? आपल्याला हा अनुभव रोज मिळत नाही, पण थायलंडमधल्या अयुथायामध्ये दरवर्षी एप्रिलमध्ये काही दिवसांसाठी हे अगदी सहज शक्य होतं. इथे नववर्षाचं स्वागत होतं ते इतिहासाच्या साक्षीने, पाण्याच्या वर्षावात आणि हत्तींच्या अनपेक्षित सहभागाने!
परंपरा, निसर्ग आणि अनुभवांची दुनिया!
थायलंड म्हणजे समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरं, चविष्ट खाद्यपदार्थ, कलरफुल मार्केट्स, फेस्टिव्हल्स, निसर्ग, संस्कृती आणि इतिहास यांचा सुंदर संगम. चला जाणून घेऊया या देशाची काही खास वैशिष्ट्यं!
पुराणकथा आणि रामायण: रामायणातील सुवर्णभूमीच्या कल्पनेपासून ते बौद्ध संस्कृतीच्या प्रभावापर्यंत, थायलंडच्या सांस्कृतिक विश्वात अनेक रंजक धागे गुंफलेले आहेत. थाई रामाकियन महाकाव्यात रामायणाची कथा पाहायला मिळते. राम, सीता आणि रावण यांच्या कथेशी साधर्म्य असलेल्या या महाकाव्याचा थाई कला, नृत्य आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. शिवाय भव्य बुद्धमंदिरं आणि प्राचीन राजवाडे देशाच्या इतिहासाची साक्ष देतात.
समृद्ध इतिहास: ‘सियाम’ या जुन्या नावाने ओळखलं जाणारं थायलंड हा युरोपीय सत्तेची कॉलनी न बनलेला आग्नेय आशियातील एकमेव देश आहे. अयुथायाचे प्राचीन अवशेष आणि बँकॉकमधील भव्य राजवाडे त्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात.
वैविध्यपूर्ण भूगोल: उत्तरेकडील डोंगररांगा, मध्यभागी असलेला सुपीक मैदानी प्रदेश, दक्षिणेकडील निळाशार समुद्र आणि उष्णकटिबंधीय आयलंड्स मिळून थायलंड बनतो. चाओ फ्राया रिव्हर देशाच्या जीवनात आणि इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावते. बँकॉकसारखी आधुनिक महानगरं, अयुथायासारखी ऐतिहासिक शहरं, फुकेतचे सुंदर समुद्रकिनारे, क्राबीचे लाईमस्टोन्स, चियांग माईचा डोंगराळ निसर्ग आणि चियांग रायमधील अनोखी मंदिरं यांनी थायलंडचं सौंदर्य आणखीनच खुलतं.
संस्कृती आणि परंपरा: हात जोडून केलं जाणारं ‘वाई’ अभिवादन, पारंपरिक नृत्य, रेशमी वस्त्रं, हस्तकला आणि ‘मुए थाई’ ही मार्शल आर्ट, अशी थाई संस्कृतीची वैशिष्ट्यं आहेत. बौद्ध मंदिरं आणि स्थानिक बाजारपेठांमधून इथल्या जीवनशैलीची खरी ओळख होते.
व्यापार आणि समुद्री बंदरं: थायलंड हा आग्नेय आशियातील महत्त्वाचा व्यापारी देश आहे. ला एम चाबांग यांसारखी मोठी बंदरं आंतरराष्ट्रीयआयात- निर्यातीला चालना देतात आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. फुकेत आणि क्राबीमध्ये निळ्याशार समुद्रात बोटिंग, स्नॉर्केलिंग आणि आयलंड्सची सैर करता येते. चियांग माई आणि चियांग रायमध्ये डोंगररांगा, सुंदर मंदिरं आणि स्थानिक संस्कृती अनुभवता येते. बँकॉकमध्ये शॉपिंग, स्ट्रीट फूड आणि नाईटलाईफचीमजा आहे. शिवाय थाई मसाज, आलिशानरिसॉर्टस् आणि वेलनेस टुरिझम यांमुळे थायलंड पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे.
खाण्यापिण्याची आणि शॉपिंगची मजा: पॅड थाई, टॉम यम सूप, थाई करी आणि मँगो स्टिकी राइस यांसारखे चविष्ट पदार्थ इथल्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतात. बँकॉकच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये कपडे, आकर्षक ॲक्सेसरीज, हँडिक्राफ्टच्या वस्तू आणि गिफ्टिंग आयटम्सची रेलचेल असते. शाटुशाक वीकेंड मार्केटमध्ये तर खरेदी करताना वेळ कसा जातो, हे कळतही नाही! थाई सिल्क, लोकल हँडिक्राफ्ट आणि मसाले खरेदी करून तुम्ही थायलंडच्या गोड आठवणी घरी घेऊन येऊ शकता.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- थायलंडला ‘लँड ऑफ स्माइल्स’ म्हणून ओळखलं जातं.
- ‘घोस्ट फेस्टिव्हल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इथल्या ‘फि टा खोन’ फेस्टिव्हलमध्ये लोक रंगीबेरंगी, भयानक मुखवटे घालतात.
- थायलंडची पारंपरिक थाई मसाज मेथड युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत आहे.
- थायलंडमधील एमराल्ड बुद्धमूर्ती प्रत्यक्षात पाचूची नसून हिरव्या जेड दगडाची आहे.
- बँकॉकचं ऑफिशियल नाव जगातील सर्वांत लांब शहरांच्या नावांपैकी एक आहे.
- बँकॉकमध्ये तब्बल 5 टन वजनाची शुद्ध सोन्याची बुद्धमूर्ती आहे.
- ‘रेड लोटस लेक’ फुलांच्या हंगामात गुलाबी कमळांनी बहरून जातो.
- थायलंडमध्ये एकेकाळी पोस्टाच्या तिकिटांपासून ते नोटांपर्यंत अनेक वस्तूंवर हत्तीचं चित्र दिसायचं.
- थायलंडमध्ये उगम पावलेली ‘मुए थाई’ या ट्रॅडिशनल मार्शल आर्टमध्ये दोन्ही मुठी, दोन्ही कोपरं, दोन्ही गुडघे आणि दोन्ही शिन्सचा वापर होतो.
- थायलंडमध्ये बोट्समधून फळं, खाद्यपदार्थ आणि वस्तू विकणारी फ्लोटिंग मार्केट्स आहेत.
- फुकेतमध्ये दरवर्षी ‘फुकेत व्हेजिटेरियन फेस्टिव्हल’ साजरा होतो, यालाच ‘नाईन एम्परर गॉड्स फेस्टिव्हल’ म्हणतात ज्यात भाविक नऊ दिवस मांसाहार टाळतात.
- थायलंडमध्ये रिसायकल केलेल्या काचेच्या बाटल्यांपासून मंदिर उभारलं आहे.
- लॉय क्राथॉन्ग फेस्टिव्हलमध्ये फुलांनी सजवलेले तराफे पाण्यावर सोडले जातात.
- मॅकलाँग रेल्वे मार्केटमधून दिवसभरात साधारणपणे 8 वेळा थेट ट्रेन जाते आणि त्यावेळी विक्रेते क्षणार्धात आपला माल बाजूला घेतात!
- थायलंडमध्ये पांढरा हत्ती हा राजवैभव आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो.
- लोबपुरी शहरात नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी ‘मंकी बुफे फेस्टिव्हल’ असतो. यात माकडांसाठी खास मेजवानी आयोजित केली जाते.
लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल
थायलंडच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपासून ते बँकॉकच्या झगमगत्या स्कायलाइनपर्यंत अनेक ठिकाणांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना भुरळ घातली आहे! हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांच्या ‘कहो ना... प्यार है’ मधील सुंदर समुद्रकिनाऱ्यांची दृश्य फुकेत-क्राबी इथे चित्रित करण्यात आली. सलमान खानच्या स्पाय थ्रिलर ‘एक था टायगर’मधील ॲक्शन असो किंवा ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील रंगतदार दृश्यं, यात थायलंडमधली बँकॉक, खाओ याई यांसारखी लोकेशन्स खुलून दिसली. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटासाठी बँकॉकमध्ये कराचीतील ल्यारी परिसरासारखा भव्य सेट उभारण्यात आला होता. याशिवाय हॉलिवूडच्या दुनियेतही थायलंडचा मोठा ठसा आहे. लिओनार्डो डिकॅप्रिओच्या ‘द बीच’ या चित्रपटामुळे फि फि आयलंडवरील ‘माया बे’ जगप्रसिद्ध झाली, तर जेम्स बॉण्डच्या ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ चित्रपटामुळे फांग न्गा क्रीकमधील ‘जेम्स बॉण्ड आयलंड’ पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं. ‘द हँगओव्हर पार्ट 2’ मधून बँकॉकमधील लेबुआ स्टेट टॉवर जगाने पाहिला. आता तुम्हीही तुमच्या थायलंड भेटीत, तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटांच्या लोकेशन्सना भेट देऊन स्वतःच्या प्रवासात थोडासा सिनेमॅटिक रंग भरा.
आयुष्यात एकदा तरी...
- फि फि आयलंड्सच्या समुद्रात बोटिंग करीत निसर्गसौंदर्य अनुभवायचंय.
- बँकॉकच्या फ्लोटिंग मार्केट्समधून बोटीतून खरेदी करीत थाई खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचाय.
- चियांग माईमध्ये आकाशात हजारो कंदील सोडण्याचा अनुभव घ्यायचाय.
- पारंपरिक थाई मसाज करून प्रवासाचा शीण घालवायचाय.
- थायलंडच्या पॅड थाई मँगो स्टिकी राइसची चव घ्यायचीये.
- सॉन्गक्रान फेस्टिव्हलमध्ये मनसोक्तपणे रंगीबेरंगी पाण्याचा खेळ खेळायचाय.
- क्राबीच्या बीचवर बायोल्युमिनेसंट प्लँक्टनमुळे चमकणारं पाणी पाहायचंय.
- बँकॉकच्या स्काय बारमधून रात्री झगमगत्या शहराचं विहंगम दृश्य पाहायचंय.
- फुकेतच्या समुद्रात स्कूबा डायव्हिंग करून रंगीबेरंगी कोरल रीफ्स पाहायचेत.
- थायलंडच्या लेकमध्ये किंवा प्रायव्हेट पूलमध्ये फ्लोटिंग ब्रेकफास्ट करायचाय.
- पारंपरिक थाई कूकिंग क्लासमध्ये पॅड थाई व ग्रीन करी बनवायला शिकायचंय.
- अयुथाया या प्राचीन राजधानीत सायकलवरून जुन्या मंदिरांचे अवशेष पाहायचेत.
- थायलंडच्या जंगलातील ट्री हाऊस किंवा फ्लोटिंग व्हिलामध्ये स्टे करून निसर्गाच्या सान्निध्यात रात्र घालवायचीय.
- ‘फांग न्गा बे’ टूर करून प्रसिद्ध जेम्स बॉण्ड आयलंडला बोटीने भेट द्यायचीय.
- चियांग रायमधील शुभ्र पांढऱ्या ‘वाट रोंग खून’ मंदिराचं स्थापत्य पाहायचंय.
वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
आनंदाचा नवा रंग, उत्साहाचं नवं निमित्त!
वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल टूर्स म्हणजे मैत्रिणींसोबत धम्माल, मनसोक्त शॉपिंग आणि अविस्मरणीय अनुभवांची पर्वणी! तुम्ही आई-मुलगी, बहिणी, मैत्रिणी किंवा सोलो ट्रॅव्हलर्स असा, तुमच्यासोबत असतो वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर आणि रूम-शेअरिंग पार्टनरची गॅरंटी सुद्धा!
वुमन्स स्पेशल थायलंड टूरचे 4 किंवा 6 दिवसांचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. शिवाय वुमन्स स्पेशल विथ किड्स थायलंड ही 6 दिवसांची, बँकॉक पट्टाया फुकेत-क्राबी ही 8 दिवसांची आणि वुमन्स स्पेशल सिंगापूर-थायलंड-मलेशिया ही कॉम्बिनेशन टूरही उपलब्ध आहे.
आणि हो, यंदा 2 आणि 29 नोव्हेंबरला मुंबईहून निघणाऱ्या 6 दिवसांच्या वुमन्स स्पेशल थायलंड टूर्स आहेत, विमान प्रवासासह फक्त ₹69,000 मध्ये! बँकॉक-पट्टायाची सफर, 4-स्टार हॉटेल्स आणि उत्तम आयटिनरी. मग आणखी काय हवं?
आतापर्यंत 50,000 हून अधिक महिलांनी वीणा वर्ल्डसोबत जग अनुभवलंय. आता तुमची वेळ आहे. चलो, बॅग भरो, निकल पडो!
वीणा वर्ल्डसोबत, चला थायलंडला!
कस्टमाईज्ड हॉलिडेज्: थायलंडला जायचं प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं! कुणाला बँकॉकची भव्य मंदिरं आणि गजबजलेले नाइट मार्केट्स पाहायचे असतात, तर कुणाला क्राबीच्या उंचच उंच लाईमस्टोन्सच्या क्लिफ्स, कोणाला लॉन्गटेल बोटीतून फि फि आयलंडची सफर करायची असते तर काहींना गर्दीपासून दूर रेलाय बीचवर निवांत वेळ घालवायचा असतो. वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज् टूरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडीनिवडींनुसार 5 दिवसांची आयकॉनिक थायलंड सहल किंवा 7 दिवसांची फुकेत-क्राबी-बँकॉक टूर, यांसारख्या वेगवेगळ्या पद्धतीने थायलंड एक्सप्लोअर करू शकता.
हनिमून टूर्स: थायलंडमध्ये रोमँटिक क्षण अनुभवण्यासाठी खास काही वेगळं करावं लागत नाही! बँकॉकच्या रोषणाईने उजळलेल्या स्कायलाईनच्या साक्षीने तुम्ही चाओ फ्राया रिव्हर डिनर क्रूझचा आनंद घेऊ शकता किंवा कोरल आयलंडच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या सहवासात निवांत वेळ घालवू शकता. 6 दिवसांची हनिमून स्पेशल थायलंड टूर बँकॉक आणि पट्टाया दाखवते, तर 8 दिवसांची हनिमून इन थायलंड टूर क्राबी आणि फुकेतचाही अनुभव देते. थायलंडच्या या टूर्स म्हणजे आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा सुंदर आठवणींची सुरुवात!
MICE आणि कॉर्पोरेट टूर्स: थायलंड कॉर्पोरेट टूर म्हणजे बँकॉकमधील वर्ल्ड क्लास ठिकाणची लीडरशिप समिट. चाओ फ्राया रिव्हर डिनर क्रूझ टीमच्या कायम लक्षात राहते. या शिवाय उत्तम कामगिरी करणाऱ्या टीमला तुम्ही फुकेतची खास इन्सेंटिव्ह टूर गिफ्ट करू शकता! उत्तम प्लॅनिंग व व्यवस्था आणि जपता येतील अशा आठवणी हीच कॉर्पोरेट सहलींची खरी कमाई!
ग्रुप टूर्स: अनेक भारतीयांसाठी परदेशवारीची सुरुवात थायलंडपासून होते. 4 दिवसांची ‘हायलाइट्स ऑफ थायलंड’ म्हणजे पहिल्या परदेशवारीसाठी उत्तम पर्याय. 6 दिवसांची ‘बेस्ट ऑफ थायलंड’ टूर थायलंडची अजून चांगली ओळख करून देते. 8 दिवसांच्या ‘बँकॉक-पट्टाया-फुकेत-क्राबी’ सहलीत चार लोकप्रिय ठिकाणं पाहता येतात, तर 10 दिवसांची ‘सिंगापूर-थायलंड-मलेशिया’ टूर तीन देशांची सफर घडवते. ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज, इंडियन मील आणि पहिल्या दिवसापासून सोबत असणारा टूर मॅनेजर यामुळे प्लॅनिंगची काळजी न करता सहलीचा मनोसक्तपणे आनंद घेता येतो.
सिनियर्स स्पेशल: 6 दिवसांची ही थायलंड टूर ज्येष्ठांना निवांतपणे थायलंड अनुभवण्याची संधी देते. नॉन्ग नूच व्हिलेज टूर, अल्काझार शो, कोरल आयलंड, चाओ फ्राया नदीतील डिनर क्रूझ तसंच सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क असे अनुभव या टूरमध्ये घेता येतात. आरामदायी हॉटेल्स, भारतीय जेवण आणि प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेणारा टूर मॅनेजर यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो.
निवडा तुमच्यासाठी यातली बेस्ट थायलंड टूर आणि चला वीणा वर्ल्डसोबत!
आठवणी घडवणारा तुमचा सहप्रवासी - वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर
थायलंडची सफर म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, भव्य मंदिरं, कलरफुल मार्केट्स आणि नवनवीन अनुभवांची मेजवानी! आणि या सगळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मी म्हणजेच वीणा वर्ल्डचा विश्वासू टूर मॅनेजर तुमच्यासोबत असतो. एअरपोर्टवरील फॉर्मलिटीज्, हॉटेल चेक-इन, टूर प्लॅनिंग, टाईम मॅनेजमेंट आणि लोकल इन्फॉर्मेशन या प्रत्येक टप्प्यावर मी तुमची काळजी घेतो. भाषेचा प्रॉब्लेम असो किंवा अचानक उद्भवलेली अडचण, मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या मदतीला तत्पर असतो. त्यामुळे प्लॅनिंगची चिंता बाजूला ठेवून तुम्ही थायलंडमधील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता. मग वाट कसली बघताय? चला निर्धास्तपणे!



































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.