We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

पुन्हा पुन्हा युरोप!

13 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
13 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

युरोपची जादू बॉलिवूडसारख्या माध्यमांतून मनात रुजते आणि प्रत्यक्ष प्रवासात ती भावना अनुभवायला मिळते.

निळेशार लेक्स, माऊंटन्स, कॅसल्स, कॅथेड्रल्स, चित्रमय गावं आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती यांचा आनंद घ्या.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हा प्रवासातील संस्मरणीय भाग ठरतो, कारण रस्त्याने आणि रेल्वेने निसर्ग सतत बदलतो.

प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा युरोपमधील रेल्वे प्रवास अनुभवायलाच हवा, हाय स्पीड ट्रेन असो किंवा सिनिक रूट्स.

तुमच्या आवडीनुसार कस्टमाईज्ड हॉलिडे प्लॅन निवडा आणि शक्य असेल तेव्हा रेल्वेचा अनुभव त्यात आवर्जून समाविष्ट करा.

स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, इटली, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड अशा देशांमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडतं.

Published in Sakal Saptarang 19th July 2026

काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंड टूरिझमच्या भारतातील मॅनेजरसोबत माझ्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी भारतातील त्यांच्या पहिल्या भेटीचा एक सुंदर किस्सा सांगितला. विमानतळावरून हॉटेलकडे जाताना त्यांनी टॅक्सीचालकाशी सहज संवाद सुरू केला. ते स्वित्झर्लंडमधून आले आहेत हे कळताच त्या टॅक्सीचालकाचा चेहराच खुलून गेला. तो उत्साहाने म्हणाला, "वा! स्वित्झर्लंड... किती सुंदर देश! बर्फाच्छादित पर्वत, अप्रतिम निसर्ग...!" आणि विशेष म्हणजे, तो कधीच स्वित्झर्लंडला गेला नव्हता. तरीही त्या देशाबद्दल त्याच्या मनात एक जिव्हाळा आणि आपलेपणा निर्माण झाला होता.

हीच तर युरोपची जादू आहे. भारतीयांच्या अनेक पिढ्यांना युरोपची पहिली ओळख बॉलिवूडमधून झाली. रुपेरी पडद्यावरून आपण स्वित्झर्लंडच्या फुलांनी नटलेल्या दऱ्यांमध्ये फिरलो, लंडनच्या ऐतिहासिक वास्तू पाहिल्या, पॅरिसच्या रस्त्यांवर प्रेमकथा अनुभवल्या आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या साक्षीने नायक-नायिकांसोबत नृत्य करण्याची स्वप्नं पाहिली. त्यामुळे युरोप हा केवळ एक पर्यटनस्थळ राहिला नाही, तर तो आपल्या मनातली एक भावना बनला आणि आयुष्यात किमान एकदा तरी पूर्ण करावंसं वाटणारं स्वप्न. मात्र काळ बदलला तशी प्रवासाची व्याख्या बदलली. पूर्वी लोक म्हणायचे, "एकदा युरोपला जायचंय", आज पर्यटकांची युरोपसाठीची स्वतंत्र बकेट लिस्ट असते. युरोपमधील विविध देश आपल्यासमोर एक वेगळं विश्व उलगडतात. युरोपची खरी ताकद म्हणजे तो प्रत्येक प्रवाशासाठी आणि प्रत्येक ऋतूसाठी काही ना काही खास जपून ठेवतो. तुम्ही जे शोधाल ते इथे सापडेल. निळेशार लेक्स, माऊंटन्स, कॅसल्स, कॅथेड्रल्स, वैविध्यपूर्ण संस्कृती, चित्रमय गावं, नेत्रदीपक निसर्ग आणि जगभरात प्रसिद्ध असलेली खाद्यसंस्कृती...

युरोपमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हाही प्रवासातील एक संस्मरणीय भाग असतो. रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक वळणागणिक बदलणारा निसर्ग मन मोहून टाकतो, तर रेल्वेचा प्रवास एक वेगळीच अनुभूती देतो. माझ्या मते, प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी युरोपमधील रेल्वे प्रवास अनुभवायलाच हवा. दोन महानगरांना काही तासांत जोडणारी अत्याधुनिक हाय-स्पीड ट्रेन असो किंवा नयनरम्य पर्वतरांगांमधून, विनयार्डस्‌‍मधून, लेक्सच्या काठाने आणि छोट्या गावांतून धावणाऱ्या सिनिक रेल्वेज्‌‍. हा प्रवास स्वतः गंतव्यस्थानाइतकाच सुंदर बनतो. वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ डिव्हिजन प्रत्येक प्रवाशाच्या आवडीनुसार युरोपच्या खास सहली आखते. आणि शक्य असेल तेव्हा रेल्वे प्रवासाचा अनुभव त्यात आवर्जून समाविष्ट करते. आमच्या एस्कॉर्टेड ग्रुप टूर्समध्ये युरोपच्या उत्कृष्ट रोड नेटवर्कवरून आरामदायी कोच प्रवासासोबत काही संस्मरणीय रेल्वे प्रवासांचाही समावेश असतो. त्यात युरोस्टार या जगप्रसिद्ध हाय-स्पीड ट्रेनचाही समावेश आहे. एक मात्र नक्की की युरोपची एकच टूर पुरेशी ठरत नाही. पहिली असो, दुसरी, तिसरी किंवा दहावी, प्रत्येक वेळी युरोप तुमच्यासमोर काहीतरी नवीन उलगडतो. एखादा अजून न पाहिलेला प्रदेश, एखादी नव्याने चाखलेली चव किंवा तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवं होतं, पण ज्याची कल्पनाही नव्हती असा एखादा अनुभव. असा हा युरोप तुम्हाला फक्त आमंत्रण देत नाही, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची कारणं देत राहतो.

वेस्टर्न युरोप

जिथे प्रत्येक देश वेगळी गोष्ट सांगतो.

स्वित्झर्लंड - आल्प्स, युंगफ्राऊ, गोल्डन पास ट्रेन, माऊंट टिटलिस

फ्रान्स - आयफेल टॉवर, पॅरिस, वर्साय पॅलेस

जर्मनी - ब्लॅक फॉरेस्ट, कुकू क्लॉक, ऱ्हाईन व्हॅली

ऑस्ट्रिया - व्हिएन्ना, साल्झबर्ग, हालस्टाट, मोझार्ट

नेदरलँड्स - ॲमस्टरडॅमचे कॅनल्स, विंडमिल्स, ट्युलिप्स

लक्झेम्बर्ग - ऐतिहासिक किल्ले, युनेस्को वारसा शहर, ट्राम टूर

इटली - रोम, व्हेनिस गोफ्लडोला राईड, पिसा, फ्लोरेन्स

लायचेनस्टाइन - द रेड हाऊस, वडूज कॅथेड्रल, टाऊन हॉल

इंग्लंड - लंडन, बकिंगहॅम पॅलेस, बिग बेन

स्कॉटलंड - एडिनबर्ग, हायलँड्स, लॉक नेस

वेल्स - स्नोडोनिया नॅशनल पार्क, मध्ययुगीन फोर्टस्‌‍, निसर्गरम्य व्हॅलीज्‌‍

नॉर्दर्न आयर्लंड - जायंट्स कॉजवे, बेलफास्ट, टायटॅनिकचा वारसा

अरेच्चा!हे मला माहीतच नव्हतं!

  • स्वित्झर्लंडमध्ये सैन्यातील प्रत्येक नागरिकाला आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षण दिलं जातं.
  • आयफेल टॉवर उन्हाळ्यात सुमारे 15 सेंटीमीटरने उंच होतो, कारण उष्णतेमुळे लोखंड प्रसरण पावते.
  • इटलीमध्ये यूनेस्को जागतिक वारसास्थळांची संख्या सर्वाधिक आहे.
  • व्हेनिसमध्ये रस्त्यांपेक्षा कॅनल्स जास्त आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी बोट हे वाहतुकीचं मुख्य साधन आहे.
  • नेदरलँड्सचा जवळपास एक-तृतीयांश भूभाग समुद्रसपाटीखाली आहे, तरीही अत्याधुनिक जलव्यवस्थापनामुळे तो सुरक्षित आहे.
  • क्यूकेनहॉफ गार्डनमध्ये दरवर्षी सुमारे 70 लाख ट्युलिपची फुलं फुलतात.
  • लक्झेम्बर्ग हा जगातील एकमेव ‌‘ग्रँड डची' आहे, जिथे आजही ग्रँड ड्यूक हे राष्ट्रप्रमुख आहेत.
  • लायचेनस्टाइनमध्ये स्वतःचं विमानतळ नाही, तरीही तो युरोपमधील सर्वात समृद्ध देशांपैकी एक आहे.
  • लंडनमध्ये 170 हून अधिक म्युझियम्स आहेत, त्यापैकी अनेकांमध्ये प्रवेश विनामूल्य आहे.
  • स्कॉटलंडमध्ये जगप्रसिद्ध गोल्फ खेळाचा उगम झाला असं मानलं जातं.
  • वेल्समध्ये इंग्रजीइतकीच वेल्श भाषेलाही अधिकृत मान्यता आहे आणि अनेक गावांची नावं वेल्शमध्येच आहेत.
  • नॉर्दर्न आयर्लंडमधील जायंट्स कॉजवे हे सुमारे 40,000 षटकोनी बेसॉल्ट खडकांनी तयार झालेलं नैसर्गिक आश्चर्य आहे.

 

पहिला युरोप प्रवास वीणा वर्ल्ड सोबत

युरोप पाहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न सहज, आरामदायी आणि संस्मरणीय करणं ही वीणा वर्ल्डची खासियत आहे. वेस्टर्न युरोपमधील जगप्रसिद्ध शहरं, नयनरम्य आल्प्स माऊंटन रेंजेस, ऐतिहासिक वारसा, कलासंपदा, रोमँटिक वातावरण आणि आधुनिक जीवनशैली यांचा परिपूर्ण अनुभव देणाऱ्या वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह टूर्स या प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांसाठी आखलेल्या आहेत. विमान प्रवासापासून निवडक हॉटेल्स, भारतीय जेवण, व्हिसा मार्गदर्शन आणि अनुभवी टूर मॅनेजर अशा सर्व गोष्टींचा समावेश असल्याने प्रवाशांना फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे 'चलो, बॅग भरो, निकल पडो!'

ग्रुप टूर्स: वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह वेस्टर्न युरोप ग्रुप टूर्समध्ये प्रत्येक प्रवाशाच्या आवडीनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्विस पॅरिस ऑस्ट्रिया जर्मनी, स्विस पॅरिस जर्मनी ॲमस्टरडॅम, बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड, युरोपियन पॅनोरमा, स्विस पॅरिस, लंडन पॅरिस स्विस इटली, इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड वेल्स लंडन, स्विस पॅरिस ऑस्ट्रिया इटली, युरोपियन स्प्लेंडर्स अशा एकसे एक लोकप्रिय टूर्समुळे एका प्रवासात एक देश अधिक सखोलपणे पाहता येतो किंवा अनेक देश आणि त्यातील जगप्रसिद्ध आकर्षणांचा अनुभव घेता येतो.

आयफेल टॉवर, सीन रिव्हर क्रूझ, माऊंट टिटलिस किंवा युंगफ्राऊ, रोटेअर केबल कार, ऱ्हाईन फॉल्स, स्वारोव्हस्की क्रिस्टल वर्ल्ड, व्हेनिस गोंडोला, रोमचा ऐतिहासिक वारसा, ॲमस्टरडॅम अशा अनेक अनुभवांची मेजवानी या सहलींमध्ये घेता येते. विमानप्रवास, व्हिसा मार्गदर्शन, निवडक हॉटेल्स, भारतीय जेवण, अनुभवी टूर मॅनेजर आणि नियोजनबद्ध पर्यटन यामुळे युरोप टूर निश्चिंत आणि संस्मरणीय होते.

स्पेशालिटी टूर्स: वुमन्स स्पेशल आणि सिनियर्स स्पेशल या वीणा वर्ल्डच्या विशेष सहली वेस्टर्न युरोपचा अनुभव अधिक आरामदायी पद्धतीने देतात. सुरक्षित वातावरण, विचारपूर्वक आखलेला कार्यक्रम, अनुभवी टूर मॅनेजर्स आणि समान आवड असलेल्या सहप्रवाशांमुळे प्रवास अधिक आनंददायी होतो. पॅरिस, स्वित्झर्लंड, आणि ऑस्ट्रियासारख्या देशांतील प्रमुख आकर्षणांसोबत स्थानिक संस्कृती, निसर्ग आणि युरोपियन जीवनशैली जवळून अनुभवण्याची संधी या विशेष टूरमध्ये मिळते.

कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍: युरोपचा प्रवास आपल्या आवडीनुसार आखायचा असेल, तर वीणा वर्ल्डचे कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ हा उत्तम पर्याय आहे. स्वित्झर्लंडमध्ये अधिक दिवस मुक्काम, पॅरिसमधील रोमँटिक सुट्टी, युनायटेड किंग्डमचा रोमांचक प्रवास, ख्रिसमस मार्केट्स, लक्झरी रेल्वे, क्रूझ या सर्व अनुभवांमुळे हनिमून, फॅमिली टूर किंवा लक्झरी हॉलिडे यातला प्रत्येक प्रवास तुमच्या वेळ, बजेट आणि आवडीनुसार साकारता येतो. यात फ्लाइट्स, हॉटेल्स, व्हिसा, ट्रान्सफर्स आणि अनुभव यांचं संपूर्ण नियोजन वीणा वर्ल्डकडून केलं जातं.

कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE): जागतिक दर्जाची कन्व्हेन्शन सेंटर्स, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, आधुनिक सुविधा आणि अविस्मरणीय पर्यटन अनुभव यामुळे वेस्टर्न युरोप हा मीटिंग्ज, इन्सेन्टिव्हज्‌‍, कॉन्फरन्सेस अँड इव्हेंट्स (MICE) साठी सर्वाधिक पसंतीचा प्रदेश आहे. कंपनी कॉन्फरन्सेस, इन्सेंटिव्ह ट्रिप्स, टीम-बिल्डिंग, प्रॉडक्ट लॉन्च किंवा बिझनेस मीटिंग्स यांसोबत स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली किंवा ऑस्ट्रियातील जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांचाही आनंद घेता येतो. वीणा वर्ल्ड प्रत्येक कॉर्पोरेट ट्रॅव्हलचे प्लॅनिंग तुमच्या गरजेनुसार व्यावसायिक पद्धतीने करते.

इतिहास बदलणारी भूमी

वेस्टर्न युरोपचा प्रवास म्हणजे केवळ सुंदर निसर्ग, भव्य वास्तू किंवा प्रसिद्ध पर्यटनस्थळं पाहणं नव्हे, तर आधुनिक जग घडवणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा अनुभव आहे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात सुरू झालेल्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनने हातमागापासून यंत्रनिर्मितीकडे जगाला नेलं. जेम्स वॉटच्या वाफेच्या इंजिनाने उत्पादन, वाहतूक आणि व्यापारात क्रांती घडवून आणली. रेल्वेचं जाळं विस्तारलं आणि औद्योगिकीकरणाची लाट युरोपपासून जगभर पसरली. फ्रान्समधील 1789 मधील फ्रेंच रिव्हॉल्युशनने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचारांना जन्म दिला. राजेशाहीविरोधात उभ्या राहिलेल्या या क्रांतीने आधुनिक लोकशाही, नागरिकांचे हक्क आणि संविधानिक व्यवस्थेचा पाया मजबूत केला. युरोपच्या इतिहासात रोमन साम्राज्य, पुनर्जागरण (रेनेसाँ), रिफॉर्मेशन, नेपोलियनचा उदय, तसेच पहिलं आणि दुसरं महायुद्ध या घटनांनी संपूर्ण जगाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाला कलाटणी दिली. जर्मनीने केवळ अभियांत्रिकी आणि उद्योगातच नव्हे, तर विज्ञान, तत्त्वज्ञान आणि प्रिंट रिव्हॉल्युशनमध्ये अमूल्य योगदान दिलं. योहान्स गुटेनबर्गने विकसित केलेल्या मूव्हेबल टाइप प्रिंटिंग प्रेसमुळे ज्ञानाचा प्रसार अभूतपूर्व वेगाने झाला. अल्बर्ट आईनस्टाइनच्या वैज्ञानिक विचारांनी आधुनिक भौतिकशास्त्राला नवी दिशा दिली. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना आणि साल्झबर्ग इथल्या मोझार्ट, योहान स्ट्रॉस यांसारख्या दिग्गज संगीतकारांमुळे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचं सुवर्णयुग घडलं. व्हिएन्नातील कॉन्सर्ट हॉल्स आजही त्या परंपरेचं जतन करीत आहेत. नेदरलँड्सने सागरी व्यापार, कॅनल प्लॅनिंग, आणि समुद्राशी दोन हात करीत विकसित केलेल्या जलव्यवस्थापनाच्या अद्भुत तंत्रामुळे जगाला नवी दिशा मिळाली. इतिहासप्रेमींसाठी यातलं प्रत्येक शहर म्हणजे एक खुलं संग्रहालय आहे. लंडनचा टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, पॅरिसमधील पॅलेस ऑफ व्हर्साय, बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट, व्हिएन्नातील शॉनब्रुन पॅलेस, ॲमस्टरडॅमचे युनेस्को मान्यताप्राप्त कॅनल्स आणि लक्सेम्बर्ग फोर्टस्‌‍ आजही साम्राज्यांचा उदयास्त, क्रांती, युद्धं आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या कथा सांगतात. त्यामुळे वेस्टर्न युरोपमध्ये फिरताना तुम्ही केवळ देश फिरत नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास, कला, विज्ञान आणि मानवी प्रगतीचा प्रवास अनुभवता. हा प्रवास तुम्हाला भूतकाळाशी जोडतो आणि वर्तमान अधिक समृद्धपणे समजून घेण्याची संधी देतो.

 

आठवणी घडवणारा तुमचा सहप्रवासी - वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

युरोपमध्ये प्रत्येक दिवस नवीन देश, नवीन भाषा आणि नवीन अनुभव घेऊन उगवतो. अशा प्रवासात मी तुमचा केवळ मार्गदर्शक नसतो, तर तुमचा विश्वासू सहप्रवासी असतो. युंगफ्राऊवर पहिला बर्फ पाहताना तुमच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आयफेल टॉवरसमोरचा तुमचा संस्मरणीय फोटो, व्हेनिसमधील गोंडोला राईड, स्विस पर्वतांमधील रेल्वेप्रवास किंवा ॲमस्टरडॅमवरील संध्याकाळ... या प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत असतो. लोकल गाईडन्स, वेळेचं व्यवस्थापन, भाषेची मदत आणि प्रवासातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी घेत मी तुमचा प्रवास अधिक सुकर बनवतो. तुम्हाला प्रत्येक अनुभव मनापासून जगता यावा याची काळजी घेणं हीच माझी खरी जबाबदारी असते. यामुळे वीणा वर्ल्डसोबतचा वेस्टर्न युरोप हा फक्त अनेक देश पाहण्याचा प्रवास राहत नाही, तर तो आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणींचा संग्रह बनतो. मग तुम्ही कधी येताय माझ्यासोबत?

लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल

भारतीयांच्या मनात युरोपचं स्वप्न रंगवण्यात बॉलिवूडचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील स्वित्झर्लंडच्या हिरव्यागार व्हॅलीज्‌‍, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि नयनरम्य रेल्वेप्रवास, बेफिक्रेमधून दिसलेला आयफेल टॉवर, सीन नदीचा किनारा आणि पॅरिसचं रोमँटिक वातावरण, क्वीनमधील पॅरिसचे रस्ते, कॅफेज्‌‍ आणि ॲमस्टरडॅमचे कॅनल्स, नमस्ते लंडन आणि कभी खुशी कभी गममधील बकिंगहॅम पॅलेस, टॉवर ब्रिज आणि लंडनचं राजेशाही रूप, तमाशामधील कोर्सिका बेटाचं निळंशार सौंदर्य, ए दिल है मुश्किलमधील व्हिएन्ना आणि पॅरिसची देखणी वास्तुकला, तर रॉकस्टारमधील प्रागचे ऐतिहासिक स्क्वेअर्स, ब्रिजेस आणि जुन्या शहराचं सौंदर्य... या सगळ्या दृश्यांनी भारतीय प्रेक्षकांना युरोपच्या अक्षरशः प्रेमात पाडलं. अनेक दशकांपासून या चित्रपटांनी युरोपची एक स्वप्नवत प्रतिमा भारतीयांच्या मनात निर्माण केली आहे. म्हणूनच आजही अनेक जण आयफेल टॉवरसमोर उभं राहण्याचं, स्विस आल्प्समध्ये फेरफटका मारण्याचं, ॲमस्टरडॅमच्या कॅनल्समध्ये बोटीतून फिरण्याचं किंवा लंडनच्या रस्त्यांवर चालण्याचं स्वप्न पाहतात. पडद्यावर पाहिलेली ही ठिकाणं प्रत्यक्ष अनुभवताना, "अरे, हे तर त्या सिनेमातलं!" ही भावना प्रत्येक क्षणी मनात येते. म्हणूनच युरोपमध्ये फिरणं म्हणजे केवळ पर्यटन नसतं, तो रुपेरी पडद्यावर पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात जगण्याचा आणि आयुष्यभर सोबत राहतील अशा आठवणी निर्माण करण्याचा प्रवास असतो.

 

खाद्यभ्रमंती

युरोपमध्ये प्रत्येक सीमा ओलांडली की फक्त भाषा, निसर्ग किंवा वास्तुकलाच बदलत नाही, तर बदलते ती तिथली चव. वेस्टर्न युरोपमध्ये प्रवास करताना प्रत्येक शहर, प्रत्येक कॅफे आणि प्रत्येक स्थानिक बाजारपेठ तुम्हाला त्या देशाच्या खाद्यसंस्कृतीशी ओळख करून देते. स्वित्झर्लंडमध्ये थंड वातावरणात गरमागरम स्विस चीज फॉन्ड्यू किंवा रॅक्लेटचा आस्वाद घेताना पर्वतरांगांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. पॅरिसमधील एखाद्या रस्त्याकडच्या कॅफेमध्ये सकाळची सुरुवात ताज्या फ्रेंच क्रोसाँसोबत करणं किंवा रंगीबेरंगी मॅकरॉन्सची चव चाखत शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फेरफटका मारणं, हा स्वतःमध्ये एक अनुभव असतो.

इटलीमध्ये प्रत्येक स्क्वेअरमध्ये अस्सल इटालियन पिझ्झा, ताज्या घटकांपासून बनवलेला फ्रेश पास्ता आणि हातात जेलाटो घेऊन निवांत फिरणारे पर्यटक हे तिथलं नेहमीचं चित्र आहे. व्हिएन्नामधील पारंपरिक कॅफेमध्ये कॉफीसोबत ऑस्ट्रियन साखरटोर्टचा आस्वाद घेताना त्या शहराची ऐतिहासिक कॅफे संस्कृती अनुभवायला मिळते. नेदरलँड्समधील स्थानिक बाजारात गरमागरम डच स्ट्रूपवॉफलचा सुगंध मन मोहून टाकतो, तर बेल्जियमच्या चॉकलेट बुटिक्समध्ये बेल्जियन चॉकलेटची चव घेतल्याशिवाय प्रवास पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही.

ब्रिटनमध्ये समुद्रकिनारी फिश अँड चिप्सचा आस्वाद घेणं ही एक परंपराच आहे, तर दुपारी आफ्टरनून टीसोबत स्कॉन्स, सँडविचेस आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेणं हा ब्रिटिश जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. अशा प्रत्येक खाद्य अनुभवातून त्या देशाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली अधिक जवळून अनुभवता येते. म्हणूनच वेस्टर्न युरोपचा प्रवास हा केवळ डोळ्यांना सुखावणारा नसतो तर जिभेचेही चोचले पुरवणारा असतो.

 

 

आयुष्यात एकदा तरी... हे करायचंय!

  • युंगफ्राऊच्या बर्फाच्छादित शिखरांवर उभं राहून आल्प्सचं विहंगम दृश्य पाहायचंय.
  • माऊंट टिटलिसवर फिरणाऱ्या रोटेअर केबल कारमधून हिमाच्छादित                पर्वतरांगांचा अनुभव घ्यायचाय.
  • आयफेल टॉवरच्या शिखरावरून पॅरिसच्या दिव्यांचं सौंदर्य न्याहाळायचंय.
  • सीन नदीवर क्रूझ करीत पॅरिस वेगळ्या नजरेतून अनुभवायचंय.
  • व्हेनिसच्या कॅनल्समधून गोंडोला राईड घ्यायचीय.
  • रोममधील कोलोझियमसमोर उभं राहून रोमन साम्राज्याचा इतिहास जाणून घ्यायचाय.
  • पीसाच्या झुकत्या मनोऱ्यासोबत तोल सांभाळणारा मजेशीर फोटो काढायचाय.
  • व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स बॅसिलिकाचं वैभव डोळ्यांत साठवायचंय.
  • ॲमस्टरडॅमच्या कॅनल्समध्ये बोटीतून शहर अनुभवायचंय.
  • क्यूकेनहॉफमध्ये लाखो ट्युलिप्सच्या रंगोत्सवात हरवून जायचंय.
  • मॉन्टे कार्लोमध्ये आलिशान यॉट्स आणि कॅसिनोंची झलक पाहायचीय.
  • एडिनबरो कॅसलच्या तटबंदीवरून स्कॉटलंडचं सौंदर्य न्याहाळायचंय.
  • जायंट्स कॉजवेच्या नैसर्गिक खडकांवरून चालत निसर्गाची किमया             पाहायचीये.
  • स्विस चॉकलेट आणि फ्रेंच क्रोसाँचा आस्वाद त्यांच्या जन्मभूमीत घ्यायचाय.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
13 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
13 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
13 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!