Published in Sakal Saptrang. 17th May, 2026
काही प्रवास हे केवळ सुट्ट्या नसतात, तर खऱ्या अर्थाने एक एक्सपेडिशन असतात. दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका एकत्र अनुभवणं म्हणजे विरोधाभासांनी भरलेला, भव्य आणि आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास. दक्षिण अमेरिका प्रत्येक टप्प्यावर नवा चेहरा दाखवतो. एका दिवशी तुम्ही ब्युनोस आयर्सच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, युरोपियन वास्तू, मोहक कॅफे आणि टँगोच्या तालात हरवलेले असता. काही दिवसांतच इग्वाझू फॉल्ससमोर उभं राहिल्यावर कोट्यवधी लिटर पाण्याचा प्रचंड आवाज शब्द हरवून टाकतो. पेरूमध्ये इतिहास जिवंत होतो. अँडीज पर्वतरांगांमध्ये वसलेलं माचू पिचू आणि प्राचीन इंका संस्कृतीचं अप्रतिम अभियांत्रिकी कौशल्य मनावर कायमची छाप सोडतं. आणखी दक्षिणेकडे पाटागोनियामधील विशाल ग्लेशियर्स, नाट्यमय लँडस्केप्स आणि अंतहीन मोकळी भूमी निसर्गाचं रांगडं आणि थक्क करणारं रूप दाखवतात. आणि मग सुरू होतो या प्रवासाचा सर्वात विलक्षण अध्याय - अंटार्क्टिका. अर्जेंटिनाच्या दक्षिण टोकापासून सुरू होणारी एक्सपेडिशन प्रसिद्ध ड्रेक पॅसेजमधून जाते. समुद्र शांत असो वा खवळलेला, हा प्रवास स्वतःमध्येच एक साहस असतो आणि तुम्हाला हळूहळू जगाच्या टोकाकडे घेऊन जातो. अंटार्क्टिकात पोहोचल्यावर प्रचंड हिमनग, अंतहीन ग्लेशियर्स आणि अविस्मरणीय शांतता तुम्हाला स्तब्ध करून टाकतात. किनाऱ्यावर फिरणारे पेंग्विन्स, बर्फावर विसावलेले सील्स आणि जहाजाजवळ दिसणाऱ्या व्हेल्स या अनुभवाला अधिक जिवंत बनवतात. काही क्षण असे असतात, जेव्हा सभोवतालची शांतता आणि निसर्गाची भव्यता शब्दांच्या पलीकडे जाऊन मनाला स्पर्श करते. आणि पोलर प्लंज? गोठवून टाकणाऱ्या पाण्यातील ती उडी म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा थरार! त्या क्षणी जाणवतं की आपण खरोखरच पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि अद्भुत ठिकाणी उभे आहोत. हा प्रवास आपल्याला निसर्गाच्या अफाट शक्तीची आणि पृथ्वीच्या अप्रतिम विविधतेची नव्याने जाणीव करून देतो. दक्षिण अमेरिका ते अंटार्क्टिका हा प्रवास म्हणजे एका सफरीत दोन पूर्णपणे वेगवेगळ्या जगांचा अनुभव. एका बाजूला लॅटिन अमेरिकेची रंगत, संस्कृती आणि ऊर्जा, तर दुसऱ्या बाजूला व्हाईट कॉन्टिनेंटचं शुद्ध, अस्पर्शित आणि थक्क करणारं सौंदर्य. असा प्रवास केवळ पाहायचा नसतो, तर मनापासून अनुभवायचा आणि आयुष्यभर जपून ठेवायचा असतो.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- अंटार्क्टिकामध्ये पृथ्वीवरील जवळपास 70% फ्रेश वॉटर बर्फाच्या स्वरूपात साठलेलं आहे!
- ॲमेझॉन रेनफॉरेस्ट इतकं विशाल आहे की ते 9 देशांमध्ये पसरलेलं आहे.
- अंटार्क्टिकामध्ये एकही परमनंट सिटी नाही तिथे फक्त सायंटिस्टस् आणि रिसर्चर्स तात्पुरते राहतात.
- पेरूमधील माचू पिचू इतक्या अचूक पद्धतीने बांधलं गेलं आहे की त्याच्या दगडांमध्ये ब्लेडसुद्धा घालायला जागा नाही!
- इग्वासू फॉल्समध्ये एक-दोन नाही तर जवळपास 275 वॉटरफॉल्स आहेत.
- अंटार्क्टिका हा टेक्निकली पृथ्वीवरील सर्वात मोठा डेझर्ट मानला जातो, कारण तिथे खूप कमी पाऊस पडतो.
- बोलिव्हियामधील ‘सालार दे उयुनी’ हे सॉल्ट फ्लॅट पावसाळ्यात जगातील सर्वात मोठा नैसर्गिक आरसा बनतो.
- अंटार्क्टिकामध्ये काही आईसबर्गस् हे एखाद्या इमारतीपेक्षा मोठे असतात!
- रिओ दि जानेरो मधील तिजुका फॉरेस्ट हे जगातील सर्वात मोठ्या अर्बन रेनफॉरेस्टस् पैकी एक आहे.
- ॲमेझॉन नदीत इतकं पाणी वाहतं की तिचा प्रभाव अटलांटिक ओशनमध्ये अनेक किलोमीटरपर्यंत जाणवतो.
- अंटार्क्टिकामध्ये काही काळ असा असतो जेव्हा सूर्य जवळपास 24 तास मावळतच नाही!
- पातागोनियामधील पेरितो मोरेनो ग्लेशियर हा जगातील मोजक्या ॲडव्हान्सिंग ग्लेशियर्सपैकी एक आहे.
- साऊथ अमेरिकामध्ये जगातील सर्वात उंच कॅपिटल सिटी ला पाझ (बोलिव्हिया) ही सुमारे 3650 मीटर उंचीवर आहे.
- अंटार्क्टिकामध्ये पेंग्विंन्स माणसांना फारसं घाबरत नाहीत, कारण तिथे त्यांचे नैसर्गिक लँड प्रीडेटर्स नाहीत.
- ब्राझीलमध्ये ॲमेझॉन रेनफॉरेस्ट आणि वर्ल्ड फेमस बीचेस एकाच देशात अनुभवता येतात.
- अंटार्क्टिकामध्ये ग्लेशियर क्रॅकिंगचे आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू जाऊ शकतात.
- साऊथ अमेरिका हा असा कॉन्टिनेन्ट आहे जिथे रेनफॉरेस्ट, ग्लेशियर्स, डेझर्ट, माऊंटन्स आणि प्राचीन संस्कृती हे सगळं एका प्रवासात अनुभवता येतं!
- पातागोनियामध्ये काही ठिकाणी वारे इतके वेगाने वाहतात की तिथे झाडं कायमची एका दिशेला वाकलेली दिसतात.
चला ‘जगाच्या टोकावर’, वीणा वर्ल्ड सोबत!
जगाच्या टोकावर प्रवास करण्याचा विचार आला की मनात एकाच वेळी उत्सुकता, कुतूहल आणि थोडीशी धडधड सुरू होते. कारण साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ही फक्त डेस्टिनेशन्स नाहीत, तर आयुष्यात एकदा तरी अनुभवावेत असे एक्स्ट्रा-ऑर्डिनरी प्रवास आहेत. रिओचा उत्साह, माचू पिचूचं गूढ, ॲमेझॉन रेनफॉरेस्टची हिरवाई, पातागोनियामधील ग्लेशियर्स आणि अंटार्क्टिकाची एंडलेस व्हाईट ब्युटी... हा प्रवास म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि ॲडव्हेंचर यांचं अविस्मरणीय मिश्रण. आणि म्हणूनच अशा वन्स-इन-अ-लाईफटाइम जर्नीजसाठी सोबत हवी ती विश्वासाची, अर्थात वीणा वर्ल्डची!
ग्रुप टूर्स - साऊथ अमेरिका: वीणा वर्ल्डच्या साऊथ अमेरिकेच्या नियोजित प्रवासात ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, चिली आणि अर्जेंटिना या 5 देशांमधील आयकॉनिक एक्स्पिरियन्सेस तुम्हाला अनुभवता येतात. 21 दिवसांच्या या टूरवर क्राइस्ट दि रिडीमर, ब्राझील आणि अर्जेंटिनामधून दिसणारा इग्वासू फॉल्स, ॲमेझॉन रिव्हर क्रूझ, माचू पिचू, अटाकामा डेझर्ट आणि पेरिटो मोरेनो ग्लेशियर यांसारखी जगप्रसिद्ध ठिकाणं तुम्हाला अनुभवता येतात. याशिवाय, कमी दिवसांच्या सहलींसाठी बेस्ट ऑफ ब्राझील, ब्राझीलपेरू आणि पेरूबोलिव्हियाचिली अशा 8 ते 14 दिवसांच्या जॉइनिंग-लीव्हिंग टूर्सही उपलब्ध आहेत. अनुभवी टूर मॅनेजर, इंटर्नल फ्लाइट्स, व्हिसाज्, क्रूझ कोऑर्डिनेशन आणि डिटेल्ड प्लॅनिंग यामुळे इतक्या विशाल कॉन्टिनेंटमधला प्रवास आरामदायी आणि निश्चिंत बनतो.
अंटार्क्टिका एक्स्पेडिशन: अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीच्या शेवटच्या टोकावरचा एक ब्रेथटेकिंग एक्सपिडिशन अनुभव. ब्युनोस आयरेसपासून उशुआया आणि तिथून लेजेंडरी ड्रेक पॅसेज पार करत अंटार्क्टिक पेनिन्सुलापर्यंतचा क्रूझ प्रवास हा स्वतःतच एक ॲडव्हेंचर असतो. झोडियाक राइड्स, पेंग्विन कॉलनीज्, फ्लोटिंग आइसबर्गज् आणि एक्स्पर्ट-गाईडेड लँडिंग्स यामुळे हा प्रवास फक्त टूर राहत नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारं एक्स्पिडिशन बनतो.
कस्टमाईज्ड हॉलिडेज: जर तुम्हाला तुमच्या स्टाईलने साऊथ अमेरिका अनुभवायचा असेल, तर पातागोनियामधील लक्झरी स्टेज, ब्युनोस आयरेसमधील टँगो इव्हिनिंग्स, ॲमेझॉन रेनफॉरेस्ट लॉजेस असे क्युरेटेड एक्स्पिरियन्सेसदेखील वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडेज् डिव्हिजन करून देते. ॲडव्हेंचर, कम्फर्ट आणि प्रीमियम एक्स्पिरियन्सेस यांचं परफेक्ट बॅलन्स या प्रवासात तुम्हाला अनुभवता येतं.
कॉर्पोरेट टूर्स (MICE): इन्सेन्टिव्ह ग्रुप्स आणि लीडरशिप रिट्रीट्ससाठी साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ही अत्यंत युनिक डेस्टिनेशन्स आहेत. वीणा वर्ल्डकडे यासाठी थॉटफुली प्लॅन्ड एक्स्पिरियन्सेस उपलब्ध आहेत. ब्युनोस आयरेसमधील खास टँगो इव्हनिंग, इग्वासू फॉल्स येथे हेलिकॉप्टर राईड आणि अंटार्क्टिकातील एक्स्पेडिशन क्रूझ अशा अनुभवांसह प्रत्येक कार्यक्रम खास डिझाइन केला जातो. कारण हे प्रदेश फक्त पाहायचे नाहीत, तर अनुभवायचे असतात. आणि हा अनुभव वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट ट्रॅव्हलसोबत खऱ्या अर्थाने अनफर्गेटेबल ठरतो.
ब्राझील
ब्राझील म्हणजे साऊथ अमेरिकेचं धडधडणारं हृदय. फुटबॉल, सांबा, कार्निवल आणि सुंदर बीचेससाठी प्रसिद्ध असलेला हा देश निसर्ग, संस्कृती आणि उत्साह यांचं रंगीबेरंगी मिश्रण आहे. रिओ दि जानेरोतील क्राइस्ट द रिडीमर, शुगरलोफ माऊंटन, तिजुका फॉरेस्ट आणि ॲमेझॉन रेनफॉरेस्ट ब्राझीलचं भव्य रूप दाखवतात. संगीत, नृत्य आणि उत्सव इथे जीवनशैलीचा भाग आहेत. ब्राझील म्हणजे खऱ्या अर्थाने ‘लाईफ इन फुल कलर’ अनुभवण्याची आणि प्रत्येक क्षण मनसोक्त साजरा करण्याची संधी.
पेरू
पेरूमध्ये इतिहास प्रत्येक दगडातून बोलताना जाणवतो. अँडीज पर्वतरांगांमध्ये वसलेलं माचू पिचू हे जगातील सर्वात अद्भुत पुरातत्त्वीय चमत्कारांपैकी एक आहे. कुस्कोमध्ये इंका आणि स्पॅनिश संस्कृतीचं सुंदर मिश्रण दिसतं, तर लेक टिटिकाका आणि सेक्रेड व्हॅली पेरूच्या विविधतेची झलक दाखवतात. प्राचीन संस्कृती, आध्यात्मिक ऊर्जा, रंगीबेरंगी परंपरा आणि नाट्यमय लँडस्केप्समुळे पेरू प्रत्येक प्रवाशासाठी प्रेरणादायी, गूढ आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरतो, जो इतिहास, निसर्ग आणि मानवी कल्पकतेचं अप्रतिम संगम एकाच प्रवासात अनुभवण्याची संधी देतो.
बोलिव्हिया
बोलिव्हिया हा साऊथ अमेरिकेतील सर्वात अंडररेटेड पण विलक्षण देशांपैकी एक आहे. सालार दे उयुनी हे जगातील सर्वात मोठं सॉल्ट फ्लॅट जणू दुसऱ्या ग्रहावर आल्याचा अनुभव देतं. ला पाझ ही जगातील सर्वात उंच राजधानींपैकी एक असून केबल कारमधून तिचं अनोखं रूप दिसतं. लगून्स, फ्लेमिंगोज्, ज्वालामुखीय दृश्यं आणि रंगीबेरंगी बाजारांमुळे बोलिव्हिया फोटोग्राफी आणि ॲडव्हेंचर प्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभवांचं खजिनाच ठरतो. इथे प्रत्येक दृश्य आश्चर्यचकित करतं आणि प्रत्येक क्षण एखाद्या पोस्टकार्डसारखा वाटतो.
चिली
हजारो किलोमीटर उभा पसरलेला चिली हा विरोधाभासांचा देश आहे. उत्तरेला ॲटाकामा डेझर्ट, दक्षिणेला पातागोनियाचे ग्लेशियर्स आणि फ्योर्ड्स, तर मधोमध आधुनिक सँटियागो आणि जागतिक दर्जाच्या वाईन व्हॅलीज आहेत. एका देशात डेझर्ट, पर्वत, समुद्रकिनारे, हिमनद्या आणि तारकांनी भरलेलं स्वच्छ आकाश अनुभवायचं असेल तर चिले हा साऊथ अमेरिकेतील सर्वात वैविध्यपूर्ण आणि थक्क करणारं डेस्टिनेशन ठरतं. इथे प्रत्येक प्रदेश तुम्हाला निसर्गाचं वेगळंच, भव्य आणि अविस्मरणीय रूप दाखवतो आणि प्रत्येक वळणावर नवा चमत्कार अनुभवायला मिळतो.
अर्जेंटिना
अर्जेंटिना म्हणजे भावना, संगीत आणि निसर्ग यांचं जिवंत रूप. ब्युनोस आयर्समध्ये युरोपियन वास्तू, कॅफे कल्चर आणि टँगोची जादू अनुभवायला मिळते. उत्तर भागात इग्वासू फॉल्स, मध्यभागी मेंडोझाची वाईन रिजन आणि दक्षिणेला पातागोनियाचे ग्लेशियर्स अर्जेंटिनाचं अप्रतिम वैविध्य दाखवतात. फुटबॉल, स्वादिष्ट खाद्यसंस्कृती आणि लोकांची उत्कटता यामुळे हा देश प्रत्येक क्षणी जिवंत, भावनांनी भरलेला आणि ऊर्जा देणारा वाटतो. इथे प्रत्येक अनुभव हृदयाला स्पर्श करून कायमचा लक्षात राहतो आणि पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटतं.
अंटार्क्टिका
अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवरील सर्वात शांत, दुर्गम आणि अस्पर्शित खंड. कायमस्वरूपी लोकवस्ती नसल्याने इथला प्रवास हा व्हेकेशनपेक्षा एक्सपेडिशनच वाटतो. हिमनग, ग्लेशियर्स, पेंग्विन्स, सील्स आणि व्हेल्स यांच्यातील प्रत्येक क्षण सिनेमॅटिक वाटतो. या व्हाईट कॉन्टिनेंटचं भव्य, नितळ आणि थक्क करणारं सौंदर्य अनुभवताना आपण स्वतःकडे आणि निसर्गाकडेही नव्या नजरेने पाहू लागतो. हा असा अनुभव आहे, जो शब्दांच्या पलीकडे जाऊन मनात कायमचा कोरला जातो आणि आयुष्यभर विसरता येत नाही, पुन्हा पुन्हा आठवत राहतो.
वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर: साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिकासारख्या जगाच्या दुसऱ्या टोकावरील डेस्टिनेशन्सना भेट देणं हा एक कॉम्प्लेक्स पण अत्यंत समृद्ध अनुभव असतो. अनेक देश, परकीय भाषा, बदलणारं हवामान, लाँग-हॉल फ्लाइट्स, क्रुझेस, अल्टिट्यूड चेंजेस आणि इमिग्रेशन फॉरमॅलिटीजमुळे हा प्रवास तितकाच रोमांचक आणि संवेदनशीलही ठरतो. उदाहरणार्थ, वीणा वर्ल्डच्या 21 दिवसांच्या ‘बेस्ट ऑफ साऊथ अमेरिका’ टूरमध्ये अनेक इंटर्नल फ्लाइट्स, सीमापार प्रवास आणि विविध हवामानपट्ट्यांचा अनुभव असतो. अशा वेळी मी, तुमचा वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर, प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असतो. माचू पिचूमधील अक्लमटायझेशन असो, पातागोनियातील अचानक बदलणारं हवामान असो, ॲमेझॉनमधील वेगळे लॉजिस्टिक्स असोत किंवा अंटार्क्टिका एक्सपेडिशनमधील हवामानानुसार बदलणारे प्लॅन्स असोत, मी सर्व तपशील सांभाळतो. एअरपोर्ट चेक-इन्स, इमिग्रेशन, इंटर्नल फ्लाइट्स, क्रुझ बोर्डिंग आणि वेळेचं नियोजन यामुळे तुम्ही निर्धास्तपणे प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता. अनेक गेस्ट्स सांगतात, “तुम्ही असल्यामुळे आम्ही इतक्या दूर आत्मविश्वासाने येऊ शकलो.” त्यामुळे अशा वन्स-इन-अ-लाईफटाइम जर्नीमध्ये तुम्ही कधीच एकटे नसता; संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम प्रत्येक क्षणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते आणि तुमचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि संस्मरणीय बनवते. आणि अशा प्रवासात यापेक्षा मोठा विश्वास दुसरा नाही.
लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल
साऊथ अमेरिका हा फक्त एक कॉन्टिनेंट नाही, तर तो जगभरातील फिल्ममेकर्ससाठी एक सिनेमॅटिक प्लेग्राउंड मानला जातो. इथली लँडस्केप्स इतकी ड्रॅमॅटिक आणि व्हिज्युअली पॉवरफुल आहेत की अनेक आयकॉनिक चित्रपटांनी साऊथ अमेरिकेला जगाच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टवर आणून ठेवलं. ‘द मोटरसायकल डायरीज’ या चित्रपटाने अर्जेंटिना, चिली आणि पेरूमधील प्रवासातून साऊथ अमेरिकेची रॉ ब्युटी आणि कल्चरल डायव्हर्सिटी जगासमोर आणली. ‘द मिशन’ मुळे इग्वासू फॉल्सची भव्यता अनेकांनी पहिल्यांदा पाहिली, तर ‘रिओ’ ने रिओ दि जानेरोचा कार्निव्हल, बीचेस आणि ब्राझिलियन एनर्जी घराघरात पोहोचवली. बॉलिवूडमधील ‘धूम 2’ मुळेही ब्राझील आणि रिओ दि जानेरोची रंगत भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. पातागोनियाच्या ड्रॅमॅटिक लँडस्केप्समुळे ‘द सीक्रेट लाइफ ऑफ वॉल्टर मिट्टी’ ट्रॅव्हलर्समध्ये विशेष लोकप्रिय ठरला. पेरूमधील माचू पिचू, चिलीमधील अटाकामा डेझर्ट आणि ॲमेझॉन रेनफॉरेस्ट हे आज डॉक्युमेंटरीज्, ॲडव्हेंचर फिल्म्स आणि ट्रॅव्हल सिनेमासाठी सर्वात आयकॉनिक लोकेशन्सपैकी मानले जातात. विशेष म्हणजे, सुपरस्टार रजनीकांत यांच्या “रोबोट” चित्रपटातील काही दृश्यांमुळे माचू पिचूलाही भारतीय सिनेरसिकांमध्ये वेगळी लोकप्रियता मिळाली. अनेक ट्रॅव्हलर्स सांगतात की साऊथ अमेरिकेला भेट देण्याची प्रेरणा त्यांना एखाद्या चित्रपटातूनच मिळाली. पण खरं सांगायचं तर इथली प्रत्येक जागा स्क्रीनवर जितकी सुंदर दिसते, त्याहून ती प्रत्यक्षात अधिक भव्य आणि जिवंत वाटते.
आयुष्यात एकदा तरी...
- साऊथ अमेरिकेमधील लोकल फूड कल्चरमधील सेविचे, चुर्रास्को, एम्पानादाज् हे पदार्थ खायचेत
- ॲमेझॉन रिव्हरमध्ये क्रुझवरून प्रवास करीत रेनफॉरेस्टची रॉ ब्युटी आणि बायो-डायव्हर्सिटी अनुभवायचीये.
- अंटार्क्टिकामधल्या पेंग्विंन कॉलनीज् प्रत्यक्ष पाहायच्यात.
- इग्वासू फॉल्सच्या बोट राईडमध्ये पूर्ण भिजायचंय.
- ड्रेक पॅसेज पार करीत पृथ्वीच्या शेवटच्या टोकाकडे प्रवास करायचाय.
- पातागोनियामधील पेरितो मोरेनो ग्लेशियर क्रॅकिंगचा आवाज ऐकायचाय.
- रिओ दि जानेरो मधील ख्राइस्ट द रिडीमर समोर उभं राहायचंय.
- ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये रात्री जंगलाचे आवाज ऐकायचेत.
- अंटार्क्टिकामध्ये फ्लोटिंग आईसबर्गस् अगदी जवळून पाहायचेत.
- माचू पिचूच्या पर्वतरांगांमध्ये सूर्योदय अनुभवायचाय.
- अंटार्क्टिकामधील एंडलेस व्हाईट सायलेन्स प्रत्यक्ष अनुभवायचाय.
- ब्युनोस आयरेस मध्ये टँगो परफॉर्मन्स पहायचाय.






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.