We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

इथूनच का होतो जगप्रवासाचा श्रीगणेशा?

10 mins. read
Veena Patil
Veena Patil
10 Mins Read
April 27, 2026
April 27, 2026

Quick Summary

पहिला परदेश प्रवास थायलंड, सिंगापूर, मलेशिया किंवा बालीसारख्या जवळच्या ठिकाणांपासून सुरू करा.

दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवासात एअरपोर्ट प्रक्रिया, करन्सी एक्स्चेंज आणि लोकल ट्रान्सपोर्ट सहज जमतात.

साऊथ ईस्ट एशिया ही फक्त डेस्टिनेशन्स नसून ग्लोबल ट्रॅव्हलर होण्यासाठीची ट्रेनिंग ग्राऊंड आहे.

पहिला प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि पूर्ण एन्जॉय करता येईल असा प्लॅन करा.

वीणा वर्ल्डसोबत 60 पेक्षा जास्त साऊथ ईस्ट एशिया टूर पर्याय उपलब्ध आहेत.

थायलंड, बाली, अंगकोर वाट, क्वालालंपूर आणि सिंगापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळे खास अनुभव मिळतात.

Published in the Sunday Lokmat Saransh on 26 April 2026

‘परदेश प्रवास‌’ करायचं म्हटलं किंवा भारताच्या बाहेर पाऊल टाकायचं ठरवलं की मनात एक वेगळीच हलचल सुरू होते. थोडी उत्सुकता, थोडी धाकधूक, थोडी स्वप्नं आणि एक प्रश्न “मी करू शकेन का?” कारण देशाबाहेर जाणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची ती पहिली पायरी असते. पहिल्यांदाच विमानात बसणं, इमिग्रेशन पार करणं, वेगळ्या देशात जाऊन सगळं मॅनेज करणं, त्यांची भाषा भोजन भूगोल समजून घेणं... हे सगळं जितकं एक्सायटिंग वाटतं, तितकंच थोडं इंटिमिडेटिंग सुद्धा असतं आणि म्हणूनच, जगप्रवासाची सुरुवात कुठून करायची, कशी करायची हे खूप महत्त्वाचं ठरतं.

माझ्यासाठी ही सुरुवात थायलंड पासून झाली. त्या पहिल्या प्रवासाने मला एक आत्मविश्वास दिला. आज हजारो भारतीय पर्यटकांच्या पासपोर्टवर पहिला स्टॅम्प थायलंड, सिंगापूर, मलेशिया किंवा बालीचाच असतो कारण हे देश आपल्याला जवळचे-आपलेसे वाटतात. साऊथ ईस्ट एशिया मधल्या या सगळ्या देशांमध्ये एक समान धागा आहे. ही केवळ डेस्टिनेशन्स नाहीत, तर आपल्याला कॉन्फिडन्स देणारी ठिकाणं आहेत. पहिल्या परदेश प्रवासात आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन असते, पण दुसऱ्या तिसऱ्या प्रवासात तीच गोष्ट आपल्याला फॅमिलिअर वाटायला लागते. इथे एअरपोर्ट प्रोसिजर, करन्सी एक्स्चेंज, लोकल ट्रान्सपोर्ट हे सगळं आपल्याला सहज जमतं आणि एकदा हा कॉन्फिडन्स आला की मग जग खूप मोठं वाटत नाही, उलट अप्रोचेबल वाटायला लागतं. म्हणूनच साऊथ ईस्ट एशिया म्हणजे केवळ ‌‘टुरिस्ट डेस्टिनेशन्स‌’ नाहीत, ती ट्रेनिंग ग्राऊंड्‌‍स आहेत ग्लोबल ट्रॅव्हलर होण्याची. या देशांपासून प्रवासाची सुरुवात केलीत की हळूहळू प्रवास सवयीचा होऊन जातो. थायलंड, सिंगापूर, बालीच्या टूर्स करता करता कधी आपण युरोप किंवा अमेरिकेबद्दल विचार करू लागतो ते कळतही नाही. या देशांमध्ये एकदा गेलं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. इथे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडतं, कारण ही डेस्टिनेशन्स सतत इव्हॉल्व्ह होत राहतात. म्हणूनच जगप्रवास म्हणजे एकदम मोठी उडी घेण्याचा प्रवास नाही, तर तो योग्य ठिकाणाहून सुरुवात करण्याचा प्रवास आहे. आणि त्याचा श्रीगणेशा जर साऊथ ईस्ट एशिया सारख्या जवळच्या, वेलकमिंग आणि इनस्पायरिंग देशांपासून झाला, तर पुढचा प्रवास फक्त सोपाच नाही, तर अधिक समृद्ध होईल हे नक्की!

अरेच्चा, हे मला माहीतच नव्हतं!

  • व्हिएतनामच्या हॅलाँग बे मधील अनेक बेटांना अजूनही अधिकृत नाव नाही. स्थानिक लोक त्यांना त्यांच्या आकारानुसार ओळखतात.
  • बालीमध्ये प्रत्येक घरात मंदिर असणं जवळपास अनिवार्य मानलं जातं. म्हणूनच तिथे ‌‘घरापेक्षा मंदिरे जास्त‌’ आहेत.
  • कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठं मंदिर अवकाशातूनही दिसतं.
  • मलेशियातील क्वालालंपूर मध्ये जगातील सर्वात मोठं ‌‘मुक्त पक्षी उद्यान‌’ आहे.
  • थायलंडमध्ये ‌‘रेड बुल‌’ या एनर्जी ड्रिंकचा जन्म झाला.
  • इंडोनेशियामध्ये ७०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. ‌‘बहासा इंडोनेशिया‌’ ही कॉमन भाषा आहे.
  • हाँगकाँगच्या काही इमारतींमध्ये ‌‘ड्रॅगन होल‌’ म्हणजेच वाऱ्याच्या प्रवाहासाठी आणि फेंगशुईसाठी मुद्दाम ठेवलेली मोठमोठी छिद्र असतात.
  • व्हिएतनाममध्ये जगातील सर्वात मोठ्या केव्हज्‌‍पैकी एक ‌‘सन डुंग केव्ह‌’ आहे.
  • सिंगापूरमध्ये रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे यासाठी फक्त दंडच नाही, तर काही वेळा त्यासाठी ‌‘पब्लिक क्लिनिंग पनिशमेंट‌’ सुद्धा दिली जाते!
  • थायलंडमध्ये राजा आणि राजघराण्याबद्दल आदर दाखवणं कायद्याने बंधनकारक आहे. त्याचा अनादर केल्यास शिक्षा होऊ शकते.
  • मलेशियातील गेंटिंग हायलँड्स हे जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे उंच डोंगरावर पूर्ण एंटरटेनमेंट सिटी तयार केली आहे.
  • फिलिपाईन्समध्ये ७००० पेक्षा जास्त आयलंड्स आहेत. त्यातील अनेक आयलंड्स अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नाहीत.
  • बालीमध्ये ‌‘न्येपि डे‌’ (मौन दिवस) ला पूर्ण आयलंड बंद राहतं. इथला एअरपोर्ट सुद्धा बंद असतो.
  • हाँगकाँगमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका एफिशियंट आहे की अनेक लोकांकडे स्वतःची कारच नसते.
  • लाओसवर व्हिएतनाम युद्धात एवढे बॉम्ब टाकले गेले की तो 'मोस्ट बॉम्ब्ड कंट्री पर कॅपिटा' ठरला आहे.

फर्स्ट फॉरिन टूर, वीणा वर्ल्डसोबत!

पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा विचार आला की मनात उत्सुकता निर्माण होते. हृदयाची धडधड वाढते आणि मनात स्वप्नांची गर्दी व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच पहिला परदेश प्रवास असावा सुरक्षित, आरामदायी आणि पूर्णपणे एन्जॉय करता येईल असा. त्यासाठी साऊथ ईस्ट एशिया हा एक परफेक्ट पर्याय आहे आणि वीणा वर्ल्डसोबत तर साऊथ ईस्ट एशियाचा तुमचा अनुभव अजूनच खास बनतो. कारण वीणा वर्ल्ड तुम्हाला देतं टूर्सचे 60 पेक्षा जास्त पर्याय.

रेग्युलर ग्रुप टूर्स: ४ ते १२ दिवसांच्या ऑल-इन्क्लुसिव्ह ग्रुप टूर्समध्ये तुम्हाला सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया (बाली), फिलिपाईन्स आणि हाँगकाँग मकाव अशा डेस्टिनेशन्सची परफेक्ट कॉम्बिनेशन्स अनुभवता येतात. थीम पार्क्स, आयलंड्स, सिटी लाईफ आणि शॉपिंग हे सगळंच एका प्रवासात करण्याची संधी मिळते. शिवाय अनुभवी टूर मॅनेजरसोबत तुम्ही प्रत्येक क्षण निश्चिंंतपणे एन्जॉय करू शकता.

स्पेशल प्रवाशांसाठी स्पेशालिटी टूर्स: वीणा वर्ल्ड च्या टूर्स प्रत्येक प्रवाशासाठी खास असतात. वुमन्स स्पेशल, सिनिअर्स स्पेशल, हनिमून स्पेशल आणि स्टुडंट्‌‍स टूर्स अशा विविध ग्रुप टूर्स, प्रवाशांच्या सुरक्षितता, रूम पार्टनरची गॅरंटी आणि व्यवस्थित नियोजन यांसारख्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करीत असल्याने परिपूर्ण असतात.

तुम्हाला हवा तसा कस्टमाईज्ड हॉलिडे: जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे प्रवास करायचा असेल, तर साऊथ ईस्ट एशिया तुम्हाला भरपूर पर्याय देतं. बिंतान आयलंडचे शांत बीचेस, सापा आणि लुआंग प्रबांगची निवांत सकाळ, फुक्वॉकचे नितळ किनारे, सेबूमधील आयलंड-हॉपिंग किंवा बालीमधील प्रायव्हेट व्हिला स्टे... यातला प्रत्येक अनुभव वेगळा, खास आणि तुमच्यासाठीच डिझाईन केलेला असतो.

लक्झरी हॉलिडेज्‌‍: ओव्हरवॉटर व्हिलाज्‌‍, प्रायव्हेट ट्रान्सफर्स, क्युरेटेड एक्सपीरियन्सेस आणि प्रीमियम स्टेज यामुळे तुमच्या स्वप्नातील लक्झरी ट्रिप वीणा वर्ल्डसोबत तुम्हाला अगदी सहज साकारता येते.

कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE): टीम-बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज्‌‍, बीच डिनर्स, क्रूझ पार्टीज्‌‍ आणि इंटरनॅशनल शहरांमधील एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्‌‍स यासाठी साऊथ ईस्ट एशियाची निवड करणं हा तुमच्या टीमसाठी एक परफेक्ट रिवॉर्डिंग अनुभव असतो. भारताच्या बाहेरचा पण तरीही फॅमिलिअर असा!

थायलंड - ‘लँड ऑफ स्माईल्स‌’

‌‘अतिथी देवो भव‌’ ही भावना भारतातच नाही, तर थायलंडमध्येही मनापासून जगली जाते. ‌‘लँड ऑफ स्माईल्स‌’ म्हणून ओळखलं जाणारं थायलंड भारतीयांमध्ये पहिल्या परदेश प्रवासासाठी लोकप्रिय आहे. फुकेत-क्राबीचे बीचेस, बँकॉकचं शॉपिंग, पट्टायाचं एंटरटेनमेंट आणि नाईटलाइफ हे सगळं एका ट्रिपमध्ये कव्हर करता येतं. ‌‘सवादिका‌’ म्हणत केलेलं स्वागत, उत्तम सेवा आणि सहज संवाद यामुळे इथला प्रवास सोपा वाटतो.

मलेशिया - ट्रुली एशिया

‌‘मलेशिया ट्रुली एशिया‌’ या टॅगलाईनप्रमाणे हा देश आपल्याला विविध अनुभव देतो. क्वालालंपूरची स्कायलाईन, गेंटिंग हायलँड्स, लंगकावीचे बीचेस आणि पेनांगचं हेरिटेज या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळा अनुभव मिळतो. भारतीय फूड, कनेक्टिव्हिटी आणि सांस्कृतिक जवळीक यामुळे भारतीयांना हा देश जवळचा वाटतो. तुम्हाला जर एका ट्रिपमध्ये सिटी, नेचर आणि रिलॅक्सेशनचा अनुभव घ्यायचा असेल तर हा बॅलन्स्ड ऑप्शन आहे.

बाली - भारताबाहेरील भारत

इंडोनेशियातील बाली ‌‘भारताबाहेरील प्राचीन भारत‌’ म्हणून ओळखला जातो. उबुदचे राईस टेरेसेस, तनाह लोट आणि उलुवातू मंदिरे, किंतामनीहून दिसणारा माउंट बाटूर ही ठिकाणं बालीची वेगळी ओळख तयार करतात. आयुंग रिव्हर राफ्टिंग, बीच क्लब्स आणि प्रायव्हेट व्हिला स्टे तुमच्या ट्रिपला वेगळाच टच देतात. म्हणूनच अनुभवांनी परिपूर्ण असलेलं हे ठिकाण हनिमून आणि रिलॅक्सेशनसाठी प्रसिद्ध आहे.

सिंगापूर - लिटिल वंडर

सिंगापूर हा छोटासा देश असूनही त्याचं आज जगात वेगळं स्थान आहे. एकेकाळी फिशिंग व्हिलेज असलेलं सिंगापूर आज आधुनिकता आणि कल्पकतेचं प्रतीक आहे.  सेंटोसा आयलंड, युनिव्हर्सल स्टुडिओज्‌‍, गार्डन्स बाय द बे आणि मरीना बे सँड्स स्कायलाईन हे इथले प्रमुख हायलाइट्‌‍स. सिंगापूर आज एक स्वच्छ आणि फॅमिली-फ्रेंडली डेस्टिनेशन म्हूणन जगप्रसिद्ध आहे.

हाँगकाँग - सर्वात जवळचं डिस्नीलँड

हाँगकाँगमध्ये आपल्याला डिस्नीलँड अनुभवता येतं. मिकी माऊस, ‌‘फ्रोजन‌’ वर्ल्ड, मार्व्हल राईड्स आणि फायरवर्क शोज्‌‍ तुम्हाला जादुई दुनियेत घेऊन जातात. सोबत ओशन पार्क, व्हिक्टोरिया पीक आणि शॉपिंग, म्हणजे पहिला परदेश प्रवास मॅजिकल करण्याचा बेस्ट प्लॅन! जवळच आहे ‌‘एशियाचं लास वेगास‌’ म्हणून ओळखलं जाणारं मकाव. पोर्तुगीज संस्कृती, युरोपियन आर्किटेक्चर आणि कसिनोज्‌‍ अनुभवण्यासाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन!

लाओस - हिडन जेम

लाओस हा स्लो ट्रॅव्हल आणि ऑफबीट अनुभवासाठी योग्य असा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देश आहे. हा साऊथ ईस्ट एशियामधील एक हिडन जेम आहे. लुआंग प्रबांगमधील कुंग सी वॉटरफॉल्स, मिकाँग रिव्हर सनसेट क्रूझ आणि पाटूक्साय मॉन्युमेंट्‌‍स ही इथली खास आकर्षणे आहेत. बौद्ध मॉनेस्ट्रीज्‌‍, आल्म्स सेरेमनी,फ्रेंच कोलोनियल आर्किटेक्चर, कॉफी प्लांटेशन्स आणि निसर्गरम्य वॉटर फॉल्स लाओसला एक वेगळाच चार्म देतात.

व्हिएतनाम - इट्स ट्रेंडिंग

काही डेस्टिनेशन्स आपण ठरवून निवडतो आणि काही ठिकाणं हळूहळू मनात घर करतात, व्हिएतनाम तसाच एक अनुभव.हे व्हॅल्यू फॉर मनी असलेलं इंटरनॅशनल डेस्टिनेशन आहे. हॅलाँग बे क्रूझ, दा नांगचा गोल्डन ब्रिज, होई आनच्या लँटर्न लेन्स आणि हो चि मिन्ह सिटीची एनर्जी यातला प्रत्येक अनुभव वेगळा आणि तरीही खास आहे. एका छोट्या देशाची प्रेरणादायी जिद्द इथे पाहायला मिळते आणि हा प्रवास संस्मरणीय होतो.

वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

साऊथ ईस्ट एशियासारख्या गजबजलेल्या, विविध संस्कृतींनी नटलेल्या आणि फास्ट पेस्ड देशांमध्ये प्रवास करणं म्हणजे फक्त साईटसीइंग नाही तर तो एक स्मार्ट आणि सुनियोजित अनुभव असतो. तुमच्यापैकी अनेकांचा हा पहिला परदेशप्रवास असल्याने भाषा, लोकल ट्रान्सपोर्ट, वेळेचं नियोजन, एंट्री तिकिट्‌‍स, फूड प्रेफरन्सेस असं बरंच काही एकाच वेळी सांभाळावं लागतं, पण मी, वीणा वर्ल्डचा विश्वासार्ह टूर मॅनेजर प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हाला या सगळ्याची अजिबात चिंता करावी लागत नाही. सिंगापूरच्या शिस्तबद्ध शहरांपासून थायलंडच्या रंगीबेरंगी मार्केट्‌‍सपर्यंत, मलेशियाच्या मॉडर्न स्कायलाईनपासून बालीच्या निवांत बीचेसपर्यंतच्या प्रत्येक ठिकाणी मी तुमचा केवळ मार्गदर्शक नसतो, तर एक विश्वासार्ह साथीदार असतो. आणि माझ्यामागे असतं मुंबईतील वीणा वर्ल्डचं कॉर्पोरेट ऑफिस आणि 24x7 कार्यरत असलेली 1100 हून अधिक जणांची टीम. तुमचा प्रत्येक प्रवास सुरळीत व्हावा यासाठी आम्ही सज्ज असतो. मग वाट कसली बघताय? चला साऊथ ईस्ट एशिया एक्सप्लोअर करायला वीणा वर्ल्ड सोबत!

आयुष्यात एकदा तरी...

  • बालीमध्ये पारंपरिक नृत्य पाहायचंय आणि मंदिरातल्या शांततेसोबत अध्यात्माचा अनुभव घ्यायचाय.
  • व्हिएतनामच्या हॅलाँग बे मध्ये धुक्यात हरवलेली लाईमस्टोन आयलंड्‌‍स पाहायचीयेत.
  • लंगकावीच्या स्काय ब्रिजवर चालत त्याची उंची आणि थरार अनुभवायचाय.
  • कंबोडियातील अंगकोर वाट येथे सूर्योदयाचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचाय.
  • मलेशियातील पेट्रॉनस ट्विन टॉवर्स वरून झगमगणारं शहर पाहायचंय.
  • सिंगापूरमधील ‌‘गार्डन्स बाय द बे‌’ मध्ये फ्युचरिस्टिक जग बघायचंय.
  • व्हिएतनाम-हो चि मिन्ह च्या सुप्रसिद्ध मिकाँग डेल्टामध्ये बोटिंग करायचंय.
  • व्हिएतनाममध्ये ‌‘लॅन्टर्न लिट होई आन‌’ चं जादुई वातावरण अनुभवायचंय.
  • फिलिपाईन्समधील ‌‘बोराके बीच‌’ वर वॉटर स्पोर्ट्‌सची मजा अनुभवायचीये.
  • लाओसमधील ‌‘कुआंग सी फॉल्स‌’ इथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचाय.
  • थायलंडमध्ये फ्लोटिंग मार्केटमध्ये जायचंय.
  • हाँगकाँग डिस्नीलँडमध्ये परीकथा जिवंत होताना पाहायच्या आहेत.
  • इंडोनेशियातील ‌‘कोमोडो आयलंड‌’ वर कोमोडो ड्रॅगन पाहायचेत.
  • म्यानमारमधील ‌‘बागान‌’ इथे हॉट एअर बलून राईड घ्यायचीय.
  • थायलंडमध्ये सायंटिफिक थाई मसाज घेऊन रिज्युव्हिनेट व्हायचंय.
  • सिंगापूरच्या ‌‘मरिना बे स्कायलाईन‌’चा रात्रीचा भव्य नजारा पाहायचाय.
  • कंबोडियाच्या प्राचीन मंदिरांमध्ये दडलेला इतिहास जाणून घ्यायचाय.
  • मलेशियाच्या गेंटिंग हायलँड्समध्ये ढगात लपलेलं शहर पाहायचंय.
  • बालीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त अनुभवायचाय.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
10 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
10 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
10 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!