Published in Sakal Saptrang 27th September 2026
ऑटम फॉलिएज
नुकतीच मला न्यू साऊथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियातील काही मिनिस्टर्सची, भारतातील काही प्रमुख टूर कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत असलेली एक मीटिंग अटेंड करण्याची संधी मिळाली. पर्यटनाविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “आज भारतीय पर्यटकांमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाबद्दल विलक्षण उत्सुकता आणि आकर्षण पाहायला मिळतंय?” त्यावर मीटिंगमधल्या सगळ्यांचं उत्तर एकच होतं, जपान! आणि खरं सांगायचं तर भारतीय पर्यटकांना जपान आवडणं हे अगदी स्वाभाविक आहे असं मला वाटतं. कारण हे असं पर्यटनस्थळ आहे, जे प्रत्येक वयोगटातील पर्यटकांना आपलंसं करतं. इथलं खाद्यविश्व, पॉप कल्चर, शतकानुशतकांच्या परंपरा, आधुनिक तंत्रज्ञानातील अफाट प्रगती, निसर्गसौंदर्य आणि जपानी जीवनशैलीचं वेगळेपण... या सगळ्या गोष्टी मनाला भुरळ घालतात. पण जपानच्या माझ्या कायमच्या लक्षात राहिलेल्या आठवणी आहेत त्या तिथल्या माणसांच्या! कारण प्रवास तिथल्या माणसांशी आपलं एक वेगळंच नातं जोडतो. एखादं पुस्तक, चित्रपट किंवा इन्स्टाग्राम रील आपल्याला त्या ठिकाणाबद्दल जेवढं सांगू शकत नाही, तेवढी एखाद्या व्यक्तीशी झालेली छोटीशी भेट आपल्याला सांगून जाते. जपानमधला एक अनुभव सांगायचा तर एकदा मी रस्ता विचारण्यासाठी तिथल्या एका महिलेला थांबवलं. तेव्हा तिने केवळ रस्ता दाखवण्याऐवजी माझ्यासोबत चालायला सुरुवात केली. मी योग्य दिशेने जात आहे, याची तिला खात्री पटेपर्यंत ती माझ्यासोबत चालत राहिली. तिच्यासाठी कदाचित ही एक छोटीशी गोष्ट असेल, पण माझ्या मनात मात्र तो प्रसंग कायमचा कोरला गेला.
जपानला मी याआधी हिवाळ्यात गेले होते. अनेक वर्षं आपण भारतीय जपानला, खासकरून वसंतऋतूत फुलणाऱ्या प्रसिद्ध चेरी ब्लॉसम्सशी जोडत आलो आहोत. मात्र आज जपान हे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करणारं डेस्टिनेशन बनलं आहे आणि त्यातही ऑटम हा जपान अनुभवण्यासाठीचा सर्वात देखणा सीझन मानला जाऊ लागलाय. सप्टेंबरच्या अखेरीस जपानमध्ये ऑटमची चाहूल लागायला सुरुवात होते. उत्तरेकडील थंड प्रदेशांपासून सुरू झालेला हा रंगांचा प्रवास हळूहळू दक्षिणेकडे सरकत जातो. तापमान कमी झाल्यावर झाडांच्या पानांमधील क्लोरोफिलचं प्रमाण कमी होतं आणि पानांत दडलेले इतर रंग हळूहळू खुलू लागतात. हिरव्यागार पानांचं रूपांतर पिवळ्या, केशरी, गडद लाल आणि तांबूस तपकिरी रंगांच्या मनमोहक छटांमध्ये होतं. निसर्ग जणू आपल्या कुंचल्यातून रंगांची मुक्त उधळण करू लागतो. जपानी भाषेत ऑटम सीझनमधील रंग बदलणाऱ्या पानांना ‘कोयो’ म्हणतात, तर ‘मोमिजीगारी’ म्हणजे ऑटम सीझनमधील रंगीबेरंगी पानांचा शोध घेत निसर्गात भटकंती करणं. हा अनुभव फक्त सुंदर झाडांचे फोटो काढण्यापुरता मर्यादित नाही. क्षणभर थांबून, निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेल्या सौंदर्याचा मनःपूर्वक आस्वाद घेणं, यात एक वेगळीच जपानी संवेदनशीलता आहे. क्षणभंगुर सौंदर्य अनुभवण्याची ही वृत्ती त्यांच्या जीवनदृष्टीशीही जोडलेली आहे.
क्योटोमधील प्राचीन मंदिरांच्या पार्श्वभूमीवर लालभडक मेपलची झाडं, सोनेरी पानांनी आच्छादलेले डोंगरातले रस्ते, दुपारच्या कोवळ्या उन्हात उजळून निघालेली ट्रॅडिशनल गार्डन्स आणि पायी भटकंतीसाठी अगदी अनुकूल असलेले आल्हाददायक दिवस... हे आपली अधिक शांत, समृद्ध, रंगांनी नटलेल्या आणि मनाला खोलवर स्पर्शून जाणाऱ्या अशा जपानच्या एका वेगळ्याच रूपाशी ओळख करून देतात. तेव्हा यावेळी तुम्हीही चला, ऑटम सीझनमधला रंगीबेरंगी जपान पाहायला!
अ रिअल मेकओव्हर!
जपानमध्ये ऑटमची चाहूल लागली की निसर्ग जणू हळूहळू आपला रंगमंच सजवायला सुरुवात करतो. हिरवीगार पानं आधी पिवळी होतात. मग केशरी, लाल आणि तांबूस छटांनी झाडं उजळून निघतात. डोंगर, रस्ते, उद्यानं, मंदिरांचे परिसर आणि सरोवरांच्या काठावर सर्वत्र रंगांची अशी उधळण सुरू होते की काही क्षण आपण नुसते पाहतच राहतो. क्योटोमध्ये या रंगांची जादू आणखी खुलते. जुन्या मंदिरांच्या पारंपरिक वास्तू, दगडी पायवाटा आणि त्यांच्या आसपासची लाल-केशरी झाडं यांचं चित्र इतकं सुंदर दिसतं की, आपण एखाद्या जुन्या जपानी चित्रात चालत आहोत असंच वाटतं. कियोमिझू-देरा किंवा तोफुकु-जी यांसारख्या मंदिरांमध्ये ऑटमच्या दिवसांत निसर्ग आणि वास्तुकला यांचं अद्भुत नातं अनुभवायला मिळतं. अराशियामाच्या परिसरात हिरव्यागार बांबू वनातून पुढे जाताना अचानक दिसणारी रंगांची ही उधळण पाहणं म्हणजे तर डोळ्यांसाठी मेजवानीच असते.
जपानी संस्कृतीत ऋतूबदलाला विशेष महत्त्व आहे. ‘मोनो नो अवेअर’ ही जपानी संकल्पना सौंदर्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देते. एखादी सुंदर गोष्ट कायम राहत नाही, म्हणूनच तिचा प्रत्येक क्षण अधिक मनापासून अनुभवावा, असं ही फिलॉसॉफी सांगते. म्हणूनच जपानी लोक पानांच्या रंगबदलाकडे इतक्या बारकाईने आणि उत्सुकतेने पाहतात.
या ऋतूचा परिणाम जपानच्या खाद्य संस्कृतीतही जाणवतो. शकरकंद, चेस्टनट, सीझनल स्वीट्स, माचाचे पदार्थ आणि गरमागरम रामेन यांची चव गार हवेत आणखी खुलते. ऑटम हा जपानमध्ये फक्त पाहण्याचा ऋतू नाही, तर तो खाण्यात, फिरण्यात आणि जगण्यातही अनुभवता येतो. म्हणूनच जपानचा ऑटम पाहताना फार काही करण्याची गरज नसते. एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवर काही क्षण शांत बसणं, ट्रेनच्या खिडकीतून वेगाने मागे सरकणारा रंगीबेरंगी निसर्ग पाहणं, हातात गरम चहाचा कप घेऊन फॉल अनुभवणं किंवा एखाद्या निवांत रस्त्यावरून चालत राहणं... असे छोटे क्षणच प्रवासाच्या मोठ्या आठवणी बनतात. जपानचा ऑटम सीझन म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक असं चित्र, जे प्रत्येक क्षणी बदलत राहतं. आणि म्हणूनच ते एकदा पाहून मन भरत नाही, तर पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं.
होक्काइडो: जपानमधील सर्वात उत्तरेकडील आयलंड असलेले होक्काइडो देशात ऑटम सीझनचे आगमन सर्वप्रथम अनुभवणारे ठिकाण आहे. सप्टेंबरच्या मध्यापासूनच इथले माऊंटन्स, व्होल्कॅनिक कॉम्प्लेक्सेस आणि नॅशनल पार्क्समध्ये झाडांची पाने लाल, केशरी आणि सोनेरी रंगछटांनी नटू लागतात. दायसेत्सुझान नॅशनल पार्कला ‘जपानचा ऑटम गेटवे’ म्हणून ओळखलं जातं, कारण देशातील सर्वात पहिली ऑटमची रंगछटा इथेच दिसते. स्वच्छ हवा, थंडगार हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे होक्काइडो हा ‘कोयो’ अर्थात ‘ऑटम फॉलिएज’ अनुभवण्यासाठी जगभरातील प्रवाशांचा आवडता प्रदेश बनतो.
क्योटो: नोव्हेंबर महिन्यात क्योटोमधील ऑटम सीझन सौंदर्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. 1,600 हून अधिक बौद्ध मंदिरे, झेन गार्डन्स, आणि शेकडो शिंतो श्राइन्सच्या परिसरातले मेपल आणि गिंग्को वृक्ष लाल, केशरी व सोनेरी रंगांनी उजळून निघतात. अराशियामाच्या निसर्गरम्य व्हॅलीज्ा, कियोमिझू -देरा, एइकांडोचे उद्यान आणि तोफुकुजी टेम्पल्स मधील ‘मोमिजी’ दृश्ये म्हणजेच नाईट इल्युमिनेशन्स हा या ऋतूतील खास अनुभव मानला जातो. लाल मेपल वृक्षांच्या छायेतून जाणारे रस्ते, पारंपरिक ब्रिजेस आणि ऐतिहासिक मंदिरं यामुळे क्योटो हे ऑटम फोटोग्राफीसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण मानलं जातं.
माउंट फुजी: माउंट फुजी जपानमधील सर्वोच्च पर्वत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ‘फुजी फाइव्ह लेक्स’ परिसरात ऑटम सीझनच्या रंगछटा खुलू लागतात. कावागुचिको लेकच्या किनाऱ्यावर असलेला प्रसिद्ध मोमिजी कॉरिडॉर लाल, केशरी आणि सोनेरी मेपल वृक्षांनी सजतो, तर मागे दिसणारा बर्फाच्छादित फुजी अप्रतिम दृश्य निर्माण करतो. तलावांमध्ये उमटणारं फुजीचं प्रतिबिंब, रोपवेवरून दिसणारे विहंगम नजारे आणि ऑनसेनचा निवांत अनुभव यामुळे हा प्रदेश ऑटम सीझनमध्ये निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि प्रवाशांसाठी जपानमधील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक ठरतो.
टोकियो: ऑटम सीझनमध्ये टोकियो शहर एका वेगळ्याच रंगात रंगून जाते. नोव्हेंबरच्या मध्यापासून शहरातील जिन्को आणि मेपल वृक्ष सोनेरी, लाल आणि केशरी रंगांनी नटतात. मेइजी जिंगू गाएनमधील दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या सुमारे 300 जिन्को वृक्षांची भव्य रांग टोकियोतील सर्वात प्रसिद्ध ऑटम फोटो लोकेशन्सपैकी एक आहे. तसेच उएनो पार्क, रिकुगिएन गार्डन, कोइशिकावा कोराकुएन आणि शोवा मेमोरियल पार्कमध्ये रंगांची अप्रतिम उधळण पाहायला मिळते. आधुनिक शहरजीवन आणि या काळातील नैसर्गिक रंगांचा अनोखा मिलाफ आपला टोकियोचा ऑटम एक्सपिरियन्स खास बनवतं.
निक्को आणि नारा: जपानमधील निक्को आणि नारा ही ऑटम सीझनसाठी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. निक्कोमध्ये ऑक्टोबरमध्ये चुझेनजी लेक आणि 97 मीटर उंच असलेला केगॉन वॉटरफॉल लाल, केशरी पिवळ्या रंगांनी उजळून निघतात. इथे युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेलं तोशोगू श्राइन आहे. दुसरीकडे जपानची प्राचीन राजधानी नारा,नोव्हेंबरमध्ये रंगीबेरंगी वृक्षांनी सजते. 1,000 हून अधिक मुक्तपणे फिरणाऱ्या हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं नारा पार्क ऑटममध्ये आकर्षक दिसतं. जगातील सर्वात मोठ्या कांस्य बुद्धमूर्तींपैकी एक असलेलं तोदाईजी टेम्पल आणि प्राचीन कासुगा तैशा श्राइन रंगीत वृक्षांच्या सान्निध्यात जास्त सुंदर भासतात.
हाकोने - ऑनसेन: टोकियोपासून जवळ असलेलं हाकोने हे जपानमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ऑक्टोबरच्या अखेरीपासून नोव्हेंबरपर्यंत इथल्या पर्वतरांगा लाल, केशरी व सोनेरी रंगांनी बहरून जातात. लेक आशीवरील क्रूझमधून दिसणारी माउंट फुजीची झलक हा या प्रदेशाचा खास आकर्षणबिंदू आहे. हाकोने रोपवेवरून ‘सल्फर व्हॅली’ आणि रंगीबेरंगी वृक्षांचं विहंगम दृश्य दिसतं. पण हाकोनेची खरी ओळख म्हणजे येथील प्रसिद्ध ऑनसेन. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये विसावताना समोर दिसणाऱ्या ऑटम सीझनच्या रंगछटा हा जपानी जीवनशैलीचा अविस्मरणीय अनुभव ठरतो.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- जपानमध्ये ऑटम लीव्ह्ज पाहण्याची परंपरा ‘मोमिजीगारी’ म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ आहे ‘रंगीबेरंगी पानांचा शोध’.
- चेरी ब्लॉसमप्रमाणेच ऑटम कलर्सचाही राष्ट्रीय स्तरावर फोरकास्ट प्रसिद्ध केला जातो.
- जपानमध्ये हजारो मेपल वृक्षांच्या विविध जाती आढळतात आणि त्यांच्यामुळेच देशभर वेगवेगळ्या रंगछटा निर्माण होतात.
- जपानमध्ये 26,000 पेक्षा जास्त मेपल वृक्षांच्या प्रजाती आढळतात.
- क्योटोमध्ये 1,600 हून अधिक बौद्ध मंदिरे आणि 400 पेक्षा जास्त शिंतो श्राइन्स आहेत.
- जिन्को वृक्षांची सोनेरी पानं जपानी ऑटम सीझनची खास ओळख मानली जातात.
- निक्को हे जपानमधील सर्वात लोकप्रिय ऑटम डेस्टिनेशन्सपैकी एक असून येथे माऊंटन्स, वॉटरफॉल्स आणि मंदिरांचा सुंदर संगम दिसतो.
- माउंट फुजीच्या परिसरातील ‘फाइव्ह लेक्स’ प्रदेश हा फोटोग्राफर्सचा आवडता ऑटम स्पॉट मानला जातो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इथे अप्रतिम ऑटम सीन्स पाहायला मिळतात.
- होक्काइडोमध्ये जपानचा पहिला ऑटम सीझन अनुभवता येतो.
- जपानमध्ये शरद ऋतू हा ‘भूक वाढवणारा ऋतू’ म्हणूनही ओळखला जातो, कारण या काळात हंगामी खाद्यपदार्थांची रेलचेल असते.
सिनेमॅटिक जपान!
जपानचं सौंदर्य जगभरातील चित्रपट निर्मात्यांना कायम आकर्षित करीत आलं आहे. आणि जपानच्या या सौंदर्यात ऑटम सीझनला एक वेगळाच चार्म आहे. लाल-केशरी मेपलची पानं, सोनेरी जिन्को वृक्ष, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा, शांत मंदिरं आणि रंगीबेरंगी पायवाटा यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा जपान अनेक चित्रपटांसाठी एखाद्या रेडीमेड सेटसारखा वाटतो. जपानच्या ऑटमचं हे मोहक रूप विविध चित्रपटांमध्येही पाहायला मिळतं.
‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ या चित्रपटात टोकियो शहराच्या निऑन लाईट्स आणि गजबजलेल्या रस्त्यांबरोबरच टोकियोच्या ऋतूंचं बदलतं सौंदर्यही पाहायला मिळतं. ते कथेला एक वेगळी व्हिज्युअल डेप्थ देतं. ‘मेमॉइर्स ऑफ अ गीशा’ मध्ये क्योटोच्या गिऑन परिसराची पारंपरिक वास्तुकला, टी हाऊसेस, अरुंद पायवाटा आणि निसर्ग यामुळे या चित्रपटाला एक खास जपानी ॲस्थेटिक मिळतो. ऑटमच्या लाल-केशरी रंगांमध्ये ही पारंपरिक दुनिया आणखी मोहक भासते. जपानच्या ऑटमचं आणखी एक सुंदर सिनेमॅटिक रूप दिसतं ते ‘स्वीट बीन’ सारख्या जपानी चित्रपटांमध्ये. टोकियोच्या छोट्याशा दुकानाभोवती घडणारी ही शांत, हळुवार कथा निसर्गातील छोट्या बदलांकडे पाहायला शिकवते. झाडांवर उमलणारी फुलं, फॉल सीझनमध्ये गळणारी पानं आणि ऋतूंच्या बदलासोबत बदलणारं आयुष्य पाहताना आपण हरखून जातो.
जपानी स्टोरीटेलिंगमध्ये निसर्ग हा केवळ बॅकग्राउंड नसतो, तर तो कथेतलंच एक कॅरेक्टर असतो. आणि म्हणूनच जपानचा ऑटम पाहताना अनेकदा एखाद्या सिनेमाच्या सेटवर असल्यासारखं वाटतं. या सीझनमध्ये प्रत्येक दिवसाची स्वतःची एक गोष्ट असते. असा हा सिनेमॅटिक जपान तुम्हालाही अनुभवायचा असेल तर चला जपानला!
वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
आनंदाचा नवा रंग उत्साहाचं नवं निमित्त!
जपान म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो चेरी ब्लॉसमचा सीझन, पण ऑटममध्ये जपानचं सौंदर्य काही वेगळंच असतं! शरद ऋतूच्या आगमनासोबत हिरवीगार झाडं ही लाल, केशरी, पिवळ्या आणि सोनेरी रंगांच्या छटांनी सजतात. या सुंदर ऑटम कलर्सचा मनमुराद आनंद घेत, वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल जपान टूरमध्ये टोकियोची झगमगती दुनिया, माउंट फुजीचं विहंगम सौंदर्य, क्योटोची ऐतिहासिक मंदिरं, अराशियामाची बांबूची वनराई आणि जपानची वेगवान बुलेट ट्रेन अनुभवूया. रंगांची ही उधळण पाहताना मैत्रिणींसोबत फोटो, खरेदी, गप्पा आणि नवीन अनुभव घेता येतील. शिवाय प्रवासात तुमच्या सोयीची काळजी घेणारा टूर मॅनेजर आहेच, त्यामुळे जपानच्या प्रत्येक रंगाचा तुम्हाला मनापासून आनंद घेता येईल. मग वाट कसली बघताय? ऑटमच्या रंगात रंगलेलं जपान मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्याची हीच तर खास वेळ आहे. चलो, बॅग भरो, निकल पडो!
वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर
जपानचा ऑटम सीझन म्हणजे दररोज बदलणाऱ्या रंगांची एक जादुई कहाणी. पण या रंगोत्सवामागच्या कथा, परंपरा आणि संस्कृती समजून घेतली, तर हा प्रवास आणखी अर्थपूर्ण बनतो. टोकियोच्या आधुनिक जीवनशैलीपासून क्योटोच्या प्राचीन मंदिरांपर्यंत, माउंट फुजीच्या नयनरम्य दृश्यांपासून नारा आणि निक्कोच्या शांत परिसरापर्यंत, प्रत्येक ठिकाणाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी मी तुमच्यासोबत असतो. सर्वोत्तम व्ह्यू पॉइंट्स, एखाद्या ठिकाणी भेट द्यायची योग्य वेळ, आकर्षक फोटो स्टॉप्स, स्थानिक खाद्यसंस्कृती, जपानी परंपरा आणि प्रवासाचं अचूक नियोजन यामुळे तुमची सफर आरामदायी आणि संस्मरणीय बनते. त्या अनुभवातील प्रत्येक रंग, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक आठवण मी खास बनवतो. तुम्हीही या जपानचा हा रंगोत्सव पाहायला, माझ्यासोबत, वीणा वर्ल्डसोबत!
इकिगाईच्या देशात... वीणा वर्ल्डसोबत!
जपानची सफर प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. म्हणूनच वीणा वर्ल्डकडे तुमच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन कस्टमाईज्ड हॉलिडेज, कॉर्पोरेट व माइस टूर्स, ग्रुप टूर्स आणि सिनियर्स स्पेशल असे टूर ऑप्शन्स आहेत.
कस्टमाईज्ड टूर्स - प्रत्येक प्रवाशाची जपान पाहण्याची इच्छा वेगळी असते. कुणाला टोकियोच्या गजबजलेल्या रस्त्यांवर शॉपिंग करायचं असतं, कुणाला क्योटोच्या मंदिरांमध्ये जपानी संस्कृती अनुभवायची असते, तर कुणाला माउंट फुजीच्या निसर्गरम्य परिसरात निवांत वेळ घालवायचा असतो. अशा वेळीवीणा वर्ल्डचे कस्टमाईज्ड हॉलिडेज् हा पर्याय योग्य ठरतो. वीणा वर्ल्डच्या ‘बेस्ट ऑफ जपान’ या कस्टमाईज्ड हॉलिडेमध्ये 9 दिवसांत 4 शहरं अनुभवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या प्रवासाच्या आवडीनुसार ठिकाणं, मुक्कामाचा कालावधी आणि अनुभव यांचं प्लॅनिंग करता येतं. त्यामुळे ग्रुपच्या ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडींना प्राधान्य देत जपानचा अनुभव घेता येतो.
माइस टूर्स - व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जायचं आणि त्याच वेळी त्या देशाची संस्कृती, आधुनिकता आणि खास वैशिष्ट्यं अनुभवायची असतील, तर माइस टूर्स हा एक वेगळा पर्याय ठरतो. कॉर्पोरेट मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स यांसाठी वीणा वर्ल्डच्या माइस टीमच्या मदतीने तुम्ही प्रवासाचं प्लॅनिंग करू शकता. जपानसारख्या तंत्रज्ञान समृद्ध देशात कॉर्पोरेट प्रवासासोबत टोकियोची आधुनिकता, ओसाकाची खाद्यसंस्कृती किंवा क्योटोचा पारंपरिक वारसा अनुभवण्याची जोड देता येऊ शकते. कामाच्या निमित्ताने सुरू झालेल्या प्रवासातून तुम्ही जपानच्या आठवणी सोबत घेऊन परतू शकता.
ग्रुप टूर्स - पहिल्यांदाच जपानला जाणार असाल, तर तिथली भाषा, ट्रेनची व्यवस्था आणि वेगळी संस्कृती यांची उत्सुकता वाटणं स्वाभाविक आहे. अशा वेळी वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्समुळे प्रवासाचं प्लॅनिंग, प्लॅन्ड आयटिनरी आणि अनुभवी टूर मॅनेजरची साथ मिळते. त्यामुळे जपानमधील नवनवीन अनुभव घेण्यावर अधिक लक्ष देता येतं. वीणा वर्ल्डकडे ‘बेस्ट ऑफ जपान विथ नागोया’ ही 7 दिवसांची, ‘बेस्ट ऑफ जपान’ ही 8 दिवसांची, ‘वंडर्स ऑफ जपान’ ही 9 दिवसांची, तर ‘मार्व्हल्स ऑफ जपान’ आणि ‘जपान एक्स्पलोरर’ या 10 दिवसांच्या टूर्स आहेत. शिवाय आणखी सविस्तरपणे जपान अनुभवण्यासाठी ‘इसेन्स ऑफ जपान’ हा 13 दिवसांचा पर्यायही उपलब्ध आहे. या टूर्समध्ये टोकियोतील शिबुया क्रॉसिंग, असाकुसा आणि टोकियो स्काय ट्रीपासून माउंट फुजी परिसरातील ओशिनो हक्काई व लेक आशीपर्यंत अनेक आकर्षणं अनुभवता येतात. शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा अनुभव हा या प्रवासातील आणखी एक लक्षवेधी भाग ठरतो.
सिनियर्स स्पेशल - अनेक ज्येष्ठ प्रवाशांचंही जपान पाहण्याचं स्वप्न असतं आणि प्रवासात वयापेक्षा महत्त्वाची असते ती नव्या गोष्टी पाहण्याची आणि अनुभवण्याची उमेद! वीणा वर्ल्डची सिनियर्स स्पेशल जपान ही 7 दिवसांची टूर ज्येष्ठ प्रवाशांना ग्रुपसोबत जपान अनुभवण्याची संधी देते. टूरचं उत्तम प्लॅनिंग आणि टूर मॅनेजरची साथ यामुळे ज्येष्ठ प्रवाशांना जपानच्या संस्कृतीचा मनःपूर्वक आनंद घेता येतो.
मग तुम्हीही यातला तुमच्यासाठी योग्य असा ऑप्शन निवडा आणि जपानच्या आठवणींच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.
आयुष्यात एकदा तरी... हे करायचंय!
- नारामधील हरणांसोबत मेपल वृक्षांच्या सान्निध्यात ऑटम सीझनचा आनंद घ्यायचाय.
- लेकमध्ये उमटलेली मेपल वृक्षांची प्रतिबिंबं कॅमेऱ्यात बंदिस्त करायचीयत.
- जपानी ऑनसेनमध्ये निवांत बसून बाहेरचं रंगीबेरंगी दृश्य पाहायचंय.
- क्योटोमधील लाल मेपल वृक्षांच्या छायेतून शांत फेरफटका मारायचाय.
- अराशियामाच्या बांबूवनातून चालत निसर्गाची शांतता अनुभवायचीय.
- शिंकान्सेन बुलेट ट्रेनमधून रंगीबेरंगी जपानी ग्रामीण भाग पाहायचाय.
- ऑटम सीझनमध्ये खास जपानी खाद्यसंस्कृतीची चव चाखायचीये.
- निक्कोच्या पर्वतरांगांमधील रंग बदलणारी फॉरेस्टस् पाहायचीयेत.
- माउंट फुजी आणि ऑटम कलर्स एकाच फ्रेममध्ये टिपायचेत.
- क्योटोच्या मंदिरांमधील नाईट इल्युमिनेशन पाहायचंय.
- पारंपरिक जपानी टी सेरेमनीचा भाग व्हायचंय.












































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.