Published in Sakal Saptarang 29th November 2026
आखिर साल में, एक हॉलिडे तो बनता ही है!
जगभरातला झगमगाट!
ख्रिसमस हा कोण्या एका देशापुरता मर्यादित असलेला फेस्टिव्हल नाही. डिसेंबरमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी प्रत्येक देशाची ख्रिसमस साजरा करण्याची एक वेगळीच पद्धत असते. या काळात प्रवास करताना आपल्याला जगभरातल्या या आनंदोत्सवाचा भाग होण्याची संधी मिळते. हा झगमगाट आपण भारतातल्या काही राज्यांपासून जगभरातल्या विविध देशांपर्यंत अनुभवू शकतो.
केरळ: घराबाहेर लावलेले रंगीबेरंगी पेपर स्टार्स, बेकरीमध्ये रचून ठेवलेले प्लम केक आणि ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रोषणाईने उजळलेली चर्चेस... केरळमध्ये ख्रिसमसचा उत्साह अगदीच वेगळा असतो. फोर्ट कोचीमध्ये तर कोचीन कार्निव्हलची धूम असते. या उत्सवाची सांगता होते ती न्यू इयरच्या मध्यरात्री पप्पान्जीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आणि नववर्षाचं स्वागत करून!
मेघालय: शिलाँगमध्ये ख्रिसमसचं स्वागत होतं ते कॅरल्स आणि चर्चमधील सुरेल गायनाने. शिवाय आसाम आणि मेघालयातील हिरवीगार निसर्गसंपदा, धुक्याची दुलई आणि आल्हाददायक थंडी यामुळे हिवाळ्यातली सुट्टी आणखी खास होते.
कोलकाता: कोलकात्यातील ख्रिसमस म्हणजे उत्सवांची रंगत! पार्क स्ट्रीटवरील भव्य रोषणाई, लाईव्ह म्युझिक, ख्रिसमस कार्निव्हल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहर ख्रिसमसच्या आनंदात न्हाऊन निघते.
काश्मीर, शिमला, मनाली: व्हाईट ख्रिसमस अनुभवण्यासाठी प्रत्येक वेळी युरोपलाच जायला हवं असं नाही. हिमालयाच्या कुशीतही बर्फाच्छादित ख्रिसमस अनुभवता येतो. डोक्यावर लोकरीच्या टोप्या, हातात वाफाळता चहा आणि बर्फात खेळताना घरात परत यायलाच तयार नसलेली मुलं यापेक्षा सुंदर ख्रिसमसची सुट्टी ती कोणती?
युरोप: युरोपमधला ख्रिसमस म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती ख्रिसमस मार्केट्स! जुन्या शहरांच्या चौकांमध्ये सजलेले लाकडी स्टॉल्स, रोषणाई, गरमागरम पेयांचा सुगंध आणि चर्चच्या मनोऱ्यांवरून ऐकू येणारी कॅरल्स... स्वित्झर्लंड, पॅरिस, जर्मनी आणि ॲमस्टरडॅममध्ये या उत्सवाची एक वेगळीच मोहिनी असते.
ग्रीस: ग्रीसमध्ये ख्रिसमस म्हणजे प्राचीन संस्कृती आणि आधुनिक उत्सवांचा सुंदर मिलाफ असतो. डिसेंबरमध्ये अथेन्समधील सिंटॅग्मा स्क्वेअर हा भव्य ख्रिसमस ट्री, झगमगती रोषणाई, ख्रिसमस मार्केट्स, संगीताचे कार्यक्रम आणि नववर्षाच्या आतशबाजीने उजळून निघतो. समुद्राशी घट्ट नातं असलेल्या ग्रीसमध्ये काही ठिकाणी ख्रिसमस ट्री ऐवजी बोटींना रोषणाई करण्याची पारंपरिक पद्धत आहे. सॅन्टोरिनी आणि ऱ्होड्ससारखी ठिकाणं हिवाळ्यातल्या सौम्य सूर्यप्रकाशात आणखी सुंदर दिसतात.
सिंगापूर आणि हाँगकाँग: सिंगापूरमध्ये ‘गार्डन्स बाय द बे’ येथील ख्रिसमस वंडरलँडची जादुई रोषणाई, 20 मीटर उंच एल्फ ट्री हाऊस, धमाल कार्निव्हल आणि हिमवर्षावाचा अनोखा अनुभव घेता येतो, तर हाँगकाँगमध्ये व्हिक्टोरिया हार्बरच्या किनाऱ्यावरील झगमगती सजावट, आकर्षक ख्रिसमस मार्केट्स, 22 मीटर उंच ख्रिसमस ट्री, संगीताचे कार्यक्रम आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी नेत्रदीपक आतषबाजी अनुभवत वर्षाचा शेवट संस्मरणीय करायची संधी मिळते.
थायलंड, बाली आणि श्रीलंका: ख्रिसमस साजरा करायला बर्फच हवा असं थोडंच आहे? थायलंडमध्ये बँकॉक, पट्टाया आणि फुकेतमधील भव्य ख्रिसमस ट्री, झगमगती रोषणाई, आकर्षक सजावट, ख्रिसमस मार्केट्स आणि बीचवरील खास सेलिब्रेशन्स अनुभवता येतात. बालीमध्ये कुटा येथील बीच रिसॉर्टस्मध्ये ख्रिसमस डिनर्स, लाईव्ह म्युझिक आणि समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाची मजा घेता येते, तर श्रीलंकेत कोलंबोमधील भव्य ख्रिसमस ट्री, चर्चमधील मध्यरात्रीच्या प्रार्थना, पारंपरिक ख्रिसमस केक आणि फेस्टिव्ह डेकोरेशनचा अनुभव घेता येतो.
व्हिएतनाम: फु क्वॉक आणि दा नांगमध्ये पांढरीशुभ्र वाळू, चविष्ट स्ट्रीट फूड आणि उबदार वातावरणात वर्षाचा शेवट अगदी मस्त करता येतो.
दुबई: दुबईची स्कायलाइन वर्षभर आकर्षकच असते, पण न्यू इयरच्या रात्री तिचं रूप आणखी खुलतं. बुर्ज खलिफावर होणारी आतशबाजी म्हणजे जगभरातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक भव्य सोहळाच!
नेपाळ, भूतान आणि अल्माटी: काठमांडूच्या थमेल परिसरातील रंगीबेरंगी रोषणाई, पारो आणि थिम्पूच्या शांत, निसर्गरम्य वातावरणातील ख्रिसमसची खास सजावट, अल्माटीमध्ये बर्फाच्छादित शहर, भव्य ख्रिसमससारखी दिसणारी न्यू इयर ट्री ची सजावट, झगमगत्या रोषणाईने सजलेले स्क्वेअर्स आणि आपुलकीने स्वागत करणारी माणसं... रोजच्या धावपळीपासून दूर, शांत आणि निवांत सुट्टी अनुभवण्यासाठी ही ठिकाणं अगदी परफेक्ट!
आणि मग येते ती न्यू इयरची रात्र! संपूर्ण जगाला एका क्षणात एकत्र आणणारी रात्र. तुम्ही एखाद्या हिल स्टेशनवर असा, समुद्रकिनाऱ्यावर असा, गजबजलेल्या शहरात असा किंवा एखाद्या राजवाड्याच्या अंगणात, मध्यरात्री सगळीकडे एकच आवाज घुमतो, हॅप्पी न्यू इयर!
सिनेमॅटिक विंटर...
सिनेमाने नेहमीच डिसेंबरला एक जादुई रूप दिलं आहे. ‘होम अलोन’ मध्ये संपूर्ण कुटुंब ख्रिसमससाठी पॅरिसला निघतं आणि घरात एका चिमुरड्याला विसरतं! ‘द हॉलिडे’ मध्ये इंग्लंड आणि लॉस एंजेलिसमधील दोन महिला सणासुदीच्या काळात आपापली घरं बदलतात आणि या प्रवासात त्यांना अपेक्षेपेक्षा खूप काही गवसतं. तर ‘लव्ह ॲक्च्युली’मध्ये संपूर्ण लंडनच जणू ख्रिसमसच्या पोस्टकार्डसारखं सजलेलं दिसतं.
आपल्या बॉलीवूडचंही विंटरवर तितकंच प्रेम आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील स्वित्झर्लंडमधले बर्फाच्छादित निसर्गरम्य प्रदेश आपल्या मनात घर करून गेले, तर ‘जब वी मेट’ फिल्मने मनाली आणि शिमल्याला प्रत्येक भारतीयाच्या विंटर व्हेकेशनच्या विशलिस्टमध्ये आणून ठेवलं. त्या बर्फाळ वाटा, उबदार रोषणाई आणि छानशा डिनरच्या दृश्यांनी कित्येकांना अशाच एखाद्या हॉलिडेची स्वप्नं दाखवली.
हे सगळं सोफ्यावर बसून पाहण्यातही मजा आहेच; पण आपल्या कुटुंबासोबत प्रत्यक्ष त्या दुनियेत पोहोचण्याचा आनंद काही औरच!
नवीन वर्ष सुरु होण्याआधी...
- हॉटेलच्या खिडकीतून बाहेर बर्फाच्छादित निसर्ग पाहत दिवसाची सुरुवात करायचीये.
- भल्यामोठ्या ख्रिसमस ट्री सोबत संपूर्ण कुटुंबाचा एक सुंदर फोटो काढायचाय.
- ख्रिसमस मार्केटमध्ये फिरताना गरमागरम पेयाचा आस्वाद घेत उत्सवी वातावरणाचा आनंद घ्यायचाय.
- केरळमध्ये अस्सल प्लम केकचा आस्वाद घ्यायचाय.
- मध्यरात्री संपूर्ण कुटुंबासोबत शहराच्या आकाशात रंगणारी आतशबाजी पाहायचीये.
- परदेशात नववर्षाचे काऊंटडाउन करीत नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे.
- नववर्षाची पहिली सकाळ एखाद्या शांत सुंदर समुद्रकिनाऱ्यावर घालवायचीये.
- राजस्थानमधील एखादा भव्य किल्ला सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात उजळताना पाहायचाय.
- ज्याने कधीच बर्फ पाहिला नाही अशा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत स्नोमॅन तयार करायचाय.
- आईला बर्फवृष्टी पाहण्याचा अनुभव देऊन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून ठेवायचाय.
ख्रिसमस-नववर्षाचा जल्लोष
वीणा वर्ल्ड सोबत
डिसेंबर येतोय! हॉटेल्स फुल्ल होताहेत, विमानांची तिकिटं महाग झाली आहेत, आणि या काळात हॉलिडे प्लॅनिंग म्हणजे एक मोठं कोडंच आहे! पण तुम्ही कशाला काळजी करताय? वीणा वर्ल्डचे अनुभवी तज्ज्ञ आहेत ना सगळं व्यवस्थित सांभाळायला!तुम्ही फक्त बॅग भरा आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तयार व्हा!
प्रायव्हेट हॉलिडेज्: तुमच्या सोयीच्या तारखा आणि प्रवासाचा वेग आणि सोबत तुमची खास माणसं! ख्रिसमस कायम लक्षात राहावा असा अनुभव देणारे प्रायव्हेट लक्झरी हॉलिडेज् निवडा किंवा त्याच स्वातंत्र्याचा आनंद बजेटमध्ये देणारे अफोर्डेबल प्रायव्हेट हॉलिडेज्!
ग्रुप टूर्स: मुंबई ते मुंबई फिक्स्ड डिपार्चर्स, सोबत विश्वासू टूर मॅनेजर, इंडियन मील्स आणि टूरच्या दुसऱ्याच दिवसापासून जुळणारी नवी मैत्री! काश्मीर, शिमला-मनाली, सिंगापूर-मलेशिया, व्हिएतनाम, दुबई-अबूधाबी, बाली आणि ग्रीस अशा विविध ठिकाणांसाठी ख्रिसमस आणि न्यू इयरच्या खास टूर्स वीणा वर्ल्डकडे उपलब्ध आहेत.
वुमन्स स्पेशल: काही गिफ्ट्स अशी असतात, जी गिफ्ट रॅपमध्ये देता येत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे आपल्या मैत्रिणींसोबत घालवलेला निवांत वेळ! या हॉलिडे सीझनमध्ये वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल टूर्ससोबत चला, तुमच्यासारखीच फिरण्याची आवड असलेल्या मैत्रिणींसोबत, बर्फाळ प्रदेशांपासून ते उन्हाने उजळलेल्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणि झगमगत्या शहरांपर्यंत! नवीन मैत्रिणींसोबत ख्रिसमस मार्केट्समध्ये फिरा, मध्यरात्री नववर्षाच्या स्वागतासाठी ग्लास उंचावून चीअर्स करा, मनसोक्त शॉपिंग करा आणि हसूनहसून गालही दुखू द्या! तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यासाठी अनुभवी टूर मॅनेजर सोबत असणारच आहे. शिवाय एकट्या प्रवास करीत असाल तर ही रूम शेअरिंग पार्टनरची गॅरंटी आहेच!
न्यू इयर ऑन टूर: वीणा वर्ल्डसोबत करा नववर्षाचं काऊंटडाउन आणि स्वागत... एका नव्या ठिकाणी, एका नव्या अंदाजात! चलो, बॅग भरो, निकल पडो!
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
- डेकोरेटेड ख्रिसमस ट्री ची परंपरा सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू झाली असं मानलं जातं.
- आर्मेनियामध्ये 6 जानेवारीला, तर जॉर्जियामध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.
- 1883 मध्ये थालास्सेरी येथील मंबल्ली बेकरीमध्ये भारतातील पहिला ख्रिसमस केक बनवला गेला, असं मानलं जातं.
- मेघालय हे भारतातील ख्रिश्चन बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळेच शिलाँगमधला ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होतो.
- फोर्ट कोचीमध्ये नववर्षाच्या मध्यरात्री भल्यामोठ्या पाप्पान्जीच्या पुतळ्याचं दहन करून नववर्षाचं स्वागत केलं जातं.
- कोलकात्यात ख्रिसमसला प्रेमाने ‘बोर दिन’ म्हणजेच मोठा दिवस म्हटलं जातं.
- फिनलंडमधील रोवानिमी हे सांताक्लॉजचं ऑफिशियल होमटाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. इथलं सांताक्लॉज व्हिलेज हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे.
- जगातील सर्वांत उंच इमारत असलेल्या 828 मीटर उंच बुर्ज खलिफावर नववर्षाच्या रात्री भव्य आतशबाजी केली जाते.
- थायलंडमधील चाओ फ्राया रिव्हरच्या किनाऱ्यावर ख्रिसमसची भव्य सजावट आणि आकर्षक लाईट डिस्प्ले पाहायला मिळतात.
ज्येष्ठांची श्रेष्ठ भ्रमंती
जग इतकं मोठं आहे आणि त्यात पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं इतकं काही आहे की संपूर्ण आयुष्यही त्यासाठी अपुरं पडेल! मग सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना सुंदर प्रवासांचे संकल्प का करू नयेत? तुमच्या आयुष्यातील ही गोल्डन इयर्स म्हणजे स्वप्नातली ठिकाणं पाहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची, समविचारी माणसांना भेटण्याची आणि मनमुराद जगण्याची योग्य वेळ! वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल टूर्ससोबत प्रवास करताना तुम्ही केवळ सुंदर ठिकाणंच पाहत नाही, तर उत्साही सहप्रवाशांना भेटता. कधी अनोळखी चेहरे तुमचे जिवलग मित्र बनतात, तर कधी एका एक्सटेंडेड फॅमिलीचा भाग! आरामदायी प्रवास, अनुभवी टूर मॅनेजर्सची साथ आणि वैयक्तिक काळजी यामुळे प्रत्येक सहल होते अविस्मरणीय! तेव्हा हा ख्रिसमस साजरा करूया एखाद्या नवीन ठिकाणी आणि नववर्षाचं स्वागत करूया नवीन प्रवासाने!
व्हाईट वंडरलँड
हिवाळ्यात थंडीला घाबरून आपण युरोपला भेट देण्याचा विचार करत नाही. पण गरम कपड्यांनी थंडीचा बंदोबस्त केला की युरोपचं एका विंटर वंडरलॅन्डमधे रूपांतर झालेलं पाहता येतं. इथल्या शहरांमध्ये ऑक्टोबरपासूनच ख्रिसमसची तयारी सुरू होते. रस्त्यांवर ख्रिसमस लाईटस्, दुकानांमधे स्पेशल ख्रिसमस शॉपिंग आणि सेल्स, ख्रिसमस मार्केट्स, सांताक्लॉजला भेटायची संधी अशा अनेक आकर्षणांनी युरोपातील शहरं रंगून जातात. लंडनमधे साऊथ केंसिंग्टन भागात हॅरोड्स आणि ऑक्सफर्ड स्ट्रीटवरच्या प्रसिद्ध दुकानांमधल्या अप्रतिम विंडो ड्रेसिंगकडे बघत विंडो शॉपिंग करणं हे हिवाळ्यातलं एक ‘मस्ट-डू’ ॲट्रॅक्शन ठरलंय. लंडनप्रमाणेच युरोपमधल्या पॅरिस, रोम, व्हिएन्ना तसंच स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातले ख्रिसमस लाईट्स प्रसिद्ध आहेत. युरोपमधली छोटी छोटी ख्रिसमस मार्केट्सही फेमस आहेत. मोझार्टचे बर्थप्लेस आणि साऊंड ऑफ म्युझिक या चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या साल्झबर्ग शहरातले ख्रिसमस मार्केट पंधराव्या शतकापासून होहेन साल्झबर्ग फोर्ट्रेसच्या पायऱ्यांखाली साल्झबर्ग कॅथेड्रलजवळ मांडण्यात येते. इथे ख्रिसमस ट्री, त्याचं डेकोरेशन करण्याचं सामान, जिझसच्या जन्माची कथा सांगणाऱ्या नेटिविटीची टॉईझ याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागलेले दिसतात. कुठे गरमागरम ॲपल्स बेक करुन विकायला असतात, तर कुठे शेकलेले बदाम, चेस्टनट, जिंजरब्रेड, पंच किंवा गरम वाईनचे स्टॉल्स लागलेले असतात.
आजही लहानमोठ्या सगळ्यांनाच सांताक्लॉजचं आकर्षण वाटतं. युरोपमधल्या शॉपिंग मॉल किंवा ख्रिसमस मार्केटमधल्या सांताक्लॉजला भेटून जर तुमचं समाधान होणार नसेल तर फिनलंडच्या रोवानिमी या शहरातल्या सांताक्लॉजच्या ऑफिशियल होमटाऊनला नक्की भेट द्या. इथल्या सांताक्लॉज व्हिलेजमध्ये आपण रेनडियर स्ले-राईडची मजा घेऊ शकतो, रेनडियर फार्मला भेट देऊन रेनडियर्सबद्दल माहिती घेऊ शकतो. सांताक्लॉज व्हिलेजमधे खऱ्याखुऱ्या सांताला भेटून त्याच्याबरोबर फोटोसुद्धा काढू शकतो. इथल्या पोस्ट ऑफिसमधून तुम्ही तुमच्या प्रियजनांना सांताकडून पोस्टकार्ड पाठवू शकता. रोवानिमीसारख्या ठिकाणी तुम्ही हस्की डॉग्जची राईडसुध्दा घेऊ शकता. इथे डिसेंबरमध्ये स्नोमॅन वर्ल्ड ओपन होतं, जिथे स्नो ट्यूबिंग म्हणजे ट्यूब्जवर बसून बर्फाच्या घसरगुंडीवर खेळणे, इग्लू हॉटेलमध्येे स्लिपींग बॅग्जमध्ये झोपणे किंवा आईस रेस्टॉरंटमध्ये बर्फाच्या ग्लासमधून एखादं ड्रिंक घेत भोजनाचा आनंद घेणे अशी सगळी विंटर ॲट्रॅक्शन्स् आपण पाहू शकतो. तुम्ही रोवानिमीला भेट दिलीत, तर आर्क्टिक सर्कल लिहिलेल्या लाईनवर उभे राहून तुमचा फोटो काढून फेसबुकवर नक्की अपलोड करा. आर्क्टिक सर्कलच्या वरचा, आर्क्टिक रीजन हा भाग राहण्यासाठी खडतर असल्याने इथे अगदी कमी वस्ती आढळते. याला अपवाद ठरते ती आईसलँडची राजधानी रेक्याविक. ती आर्क्टिक सर्कलच्या केवळ दोन डिग्री साऊथला असल्याने या भागातले नैसर्गिक चमत्कार आपण रेक्याविकमधून अगदी आरामात पाहू शकतो.
युरोपचे हिवाळ्यातले मुख्य आकर्षण म्हणजे बर्फ आणि आपण जर कधी स्नोफॉल अनुभवला असेल तर त्याची आठवण आपल्याबरोबर आयुष्यभर राहते. पावडरसारखा मुलायम स्नोफॉल होताना त्या स्नोफ्लेक्सना आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर न तुटता पकडणे हा लहान मुलांचा आवडता उद्योग ठरतो. बर्फाने आच्छादलेल्या डोंगरावर स्कीईंग करणे ही युरोपची सर्वात पॉप्युलर विंटर ॲक्टिव्हिटी आहे. बर्फाच्छादित डोंगरांच्या गराड्यात असलेल्या ‘मॅजिक कार्पेट’ म्हणजेच बिगिनर्ससाठी असलेल्या सर्वात जेंटल स्की स्लोपवर जेव्हा आपण पहिल्या वेळी स्वतःहून स्लाईड करीत जातो, तेव्हा आपल्याला जणू एव्हरेस्ट चढल्याचा आनंद होतो. स्वित्झर्लंडच्या सेंट मॉरिट्झमध्ये हिवाळ्यात सनटॅन होण्याची गॅरंटी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश पर्यटकांना दिली गेली आणि स्वित्झर्लंडमधे विंटर टूरिझमची सुरूवात झाली. चला तर, आपणही थर्मल्स आणि सनस्क्रीन्स घेऊन विंटर वंडरलँडचा अनुभव घेऊया.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.