Published in Sakal Saptrang 30th August 2026
लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड!
काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश्न खूप कमी ऐकू येतो. त्याऐवजी आता विचारतात, “नॉर्दर्न लाइट्स कधी बघायला जायचं?” “जपानचा ऑटम जास्त सुंदर की साकुरा?”, “स्काय डायव्हिंग खरंच करता येईल ना मला?”, “अंटार्क्टिकाला जायला किती दिवस लागतात?” आणि कधीतरी अगदी सहज कुणीतरी म्हणतं, “मला ना, शंभर देश पाहायचेत!”
हा बदल मला खूप आवडतो. कारण प्रवासाच्या बाबतीत महिलांच्या इच्छा आता फक्त ‘कुठेतरी फिरायला जायचंय’ एवढ्यापुरत्या राहिलेल्या नाहीत. प्रत्येकीची स्वतःची एक लिस्ट आहे. कुणाला बर्फातून चालायचंय, कुणाला जंगल सफारी करायचीय, कुणाला समुद्रात डुबकी मारायचीय, कुणाला जगातली सुंदर शहरं पाहायची आहेत, तर कुणाला फक्त वर्षातून एकदा बॅग भरून आपल्या रोजच्या जगापासून थोडं दूर जायचंय. आणि मला वाटतं, ही लिस्ट असणं फार महत्त्वाचं आहे. कारण ती फक्त ठिकाणांची लिस्ट नसते. त्यात आपल्या इच्छा असतात, कुतूहल असतं, थोडंसं धाडस असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी पाहिलेली काही स्वप्नं असतात.
खरं तर आयुष्यात एखादं स्वप्न असणं हे सुद्धा जगण्याचं एक कारण असतं. काहीतरी करायचंय, कुठेतरी जायचंय, काहीतरी नवीन अनुभवायचंय ही ‘पुढे काहीतरी सुंदर आपली वाट पाहतंय’ ही भावनाच आपल्याला पुढे घेऊन जाते. प्रत्येक स्वप्न लगेच पूर्ण व्हायलाच हवं असं नाही. पण ते मनात असणं, त्याची वाट पाहणं, त्यासाठी थोडीथोडी तयारी करणं, पैसे साठवणं, त्याबद्दल वाचणं, फोटो बघणं यातही एक वेगळी मजा आहे. पण अनेकदा या स्वप्नांच्या आधी आपल्या मनात शंका उभ्या राहतात. “मी कधी विमानात बसलेच नाही”, “मी आयुष्यभर साडीच नेसलेय, तिथे मी कशी दिसेन?”, “मी एकटी कधी कुठे गेलेच नाही.” “बाकी सगळ्या माझ्यापेक्षा स्मार्ट असतील.” अशा कितीतरी छोट्या-मोठ्या न्यूनगंडांनी आपणच आपल्याला थांबवलेलं असतं.
वुमन्स स्पेशलमध्ये वर्षानुवर्षं मी एक गंमत पाहिली आहे. विमानात पहिल्यांदाच बसणारी ती महिला, काही दिवसांनी आत्मविश्वासाने एअरपोर्टवर फिरत असते. इंग्रजीची भीती बाळगणारी हसत-खेळत आपलं काम करून घेते. आयुष्यभर साडी नेसलेली पहिल्यांदा जीन्स घालून फोटो काढते आणि काही तर साडीमध्येच जग फिरतात! शेवटी लक्षात येतं, जग बघण्यासाठी कोणत्याही भाषेची, कपड्यांची किंवा पूर्वानुभवाची परीक्षा द्यावी लागत नाही. फक्त मनात इच्छा हवी.
वुमन्स स्पेशलची कल्पना जेव्हा माझ्या मनात आली, तेव्हा त्यामागे खरं तर एक अगदी साधा विचार होता, ‘प्रवासाची इच्छा आहे, पण सोबत कुणी नाही म्हणून ती इच्छा मागे पडायला नको.’ आम्ही भारतात वुमन्स स्पेशल टूर्स सुरू केल्यानंतर हजारो महिलांनी प्रवासासाठी कुणाची तरी वाट पाहणं सोडलं. मैत्रीण आली तर छान, बहीण आली तर छान, आई आणि मुलगी एकत्र आल्या तर आणखी छान... पण कुणीच आलं नाही तरी, मी आहे ना! मी जाणार.
आणि कदाचित वुमन्स स्पेशलने हजारो महिलांसाठी हेच केलं. जग बघण्याआधी त्यांना स्वतःबद्दलच्या काही चुकीच्या समजुती मागे सोडायला शिकवलं.
गेल्या काही वर्षांत मला आणखी एक सुंदर बदल जाणवतोय. पूर्वी स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की मनात कुठेतरी प्रश्न असायचा मी हे करावं का? आत्ता करावं का? माझ्यासाठी एवढा खर्च करावा का? घरात सगळं व्यवस्थित होईल ना? आज हे प्रश्नही हळूहळू मागे पडताहेत. कारण स्वतःची एखादी इच्छा पूर्ण करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही आणि स्वतःसाठी थोडा वेळ, थोडे पैसे आणि थोडंसं आयुष्य राखून ठेवणं यासाठी प्रत्येक वेळी कारण द्यायलाच हवं असंही नाही.
आज वुमन्स स्पेशलकडे पाहताना मला वाटतं, हीच त्याची खरी कमाई आहे. “मी जाऊ शकते का?” इथपासून सुरू झालेला प्रवास आज “आता यानंतर कुठे जायचं?” इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि आता तर तिच्यासमोर अख्खं जग आहे.
काही स्वप्नं छोटी असतील, काही मोठी. काही सहज पूर्ण होतील, काहींसाठी पैसे साठवावे लागतील. काहींसाठी धाडस करावं लागेल, काहींसाठी वेळ काढावा लागेल. पण लिस्ट कमी कशाला करायची? एक पूर्ण झालं की पुढचं लिहायचं. कारण वय कितीही असो, अजून एक देश बघायचाय. अजून एक अनुभव घ्यायचाय, अजून एक स्वप्न पूर्ण करायचंय, आणि खरं सांगायचं तर अजून खूप काही करायचंय! लेट्स कीप गोइंग... हॅपीली.
सो, चला, बॅग भरूया आणि निघूया, जगाला गवसणी घालायला!
मी मजा करतेय आणि घरच्यांचं काय?
हा विचार आपल्यापैकी कितीजणींच्या मनात येतो, नाही?
मी इथे मजा करतेय... मुलं तिथे... घरचं सगळं नीट असेल ना?
सगळे नीट जेवले असतील ना? हे विचार पाठ सोडत नाहीत.
पण ऐका ना, आपण आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेतोच. मग काही दिवस स्वतःसाठी काढले तर त्याने घरच्यांवरचं प्रेम कमी होत नाही.
उलट आपण भरपूर गप्पा, आठवणी, फोटो घेऊन एकदम फ्रेश होऊनघरी परततो. घर आपलंच आहे. घरातली माणसंही आपलीच आहेत.
आणि हे काही दिवस? ते सुद्धा आपलेच आहेत की!
मी ठरवलं. मी निघाले.
त्याला सुट्टी आहे का? मुलांना जमेल का?
मैत्रिणी येणार आहेत का? बाकीच्यांचं काय?
कितीतरी ट्रिप्स या प्रश्नांमध्येच राहून गेल्या.
पण मग मी स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारला, की ‘मला कुठे जायचंय?’
आणि मी ठरवलं. मी बुकिंग केलं. मी निघाले. बस्स!
कधी कधी डेस्टिनेशनपेक्षाही मोठी अचिव्हमेंट असते ती म्हणजे स्वतःसाठी स्वतः निर्णय घेणं... आणि तो मी घेतला.
मी कोणत्या प्रकारची ट्रॅव्हलर आहे?
- माउंटन गर्ल -डोंगर दिसले की मी खुश!
- वॉटर बेबी - समुद्र म्हणजे प्रेम!
- फोटो क्वीन - आधी फोटो!
- शॉपिंग गर्ल - थोडी शॉपिंग तर हवीच!
- फूड एक्सप्लोरर - नवी जागा, नवी चव!
- ॲडव्हेंचर गर्ल - थ्रिल? आय ॲम इन!
- कंट्री कलेक्टर - आणखी एक पासपोर्ट स्टॅम्प!
- गर्ल-गँग ट्रॅव्हलर - गप्पा, मैत्रिणी, धमाल!
- लक्झरी लव्हर - थोडं काहीतरी खास हवंच!
एकापेक्षा जास्त उत्तरं आहेत? ऑफ कोर्स!
कारण आपण एकाच प्रकारच्या थोडीच आहोत?
मला जमेल का? जमेल की!
पहिल्यांदा एकटी निघत असशील तर मनात प्रश्न येणारच. मी कधी विमानात बसलेच नाही... मला इंग्लिश नीट बोलता येत नाही...
एअरपोर्टवर काय करायचं? इमिग्रेशन? व्हिसा? फॉरेन करन्सी?
मला हे सगळं जमेल का?
आपल्यापैकी कितीतरी जणींच्या मनात कधी ना कधी हे प्रश्न आलेत.
पण गंमत अशी आहे की एकदा निघालं की पहिलं एअरपोर्ट पार होतं. पहिलं इमिग्रेशन होतं. नव्या देशात आपण स्वतःहून काहीतरी करतो आणि अचानक मनात येतं, “अरेच्चा! मला तर जमतंय की!”म्हणूनच प्रवासात आपण फक्त नवं जग पाहत नाही. आपल्यातल्या नव्या ‘मी’ ला सुद्धा भेटतो.
एकटी आले...एकटी राहिलेच नाही!
वुमन्स स्पेशलवर एकटीने येणं आणि एकटं असणं या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या दिवशी आपण कोणालाच ओळखत नसतो. इथे आपल्याला आपल्यासारखीच प्रवासाची आवड असलेल्या, नवीन ठिकाणं पाहण्याची इच्छा असलेल्या मुली भेटतात. कुणी पहिल्यांदाच आलेली असते, कुणी पुन्हा पुन्हा येणारी असते, पण पहिल्या दोन तीन दिवसांतच ओळखी होतात, गप्पा रंगतात आणि छान मैत्रीही होते. मग कुणीतरी म्हणतं, “चहा घेणार?” कुणीतरी फोटो काढतं. कुणासोबत आपण सीट शेअर करतो. आणि बघता बघता आपली गँग तयार होते. वीणा वर्ल्डची रूम पार्टनर गॅरंटी तर आहेच. पण त्याहून सुंदर काय आहे, माहितीये? येताना मी एकटी आले होते. आणि परतताना मैत्रिणी घेऊन चाललेय हे फीलिंग!
आता माझं मन मला कुठे घेऊन जातंय?
- माझ्यातल्या ड्रीमरला - जपान, स्कॅन्डिनेव्हिया, युरोप
- माझ्यातल्या ॲडव्हेंचररला - न्यूझीलंड, आफ्रिका, अंदमान
- माझ्यातल्या माउंटन गर्लला - काश्मीर, लडाख, स्वित्झर्लंड
- माझ्यातल्या एक्सप्लोररला - व्हिएतनाम, इजिप्त, भूतान
- माझ्यातल्या रोमँटिक मुलीला - ग्रीस, मालदीव, बाली
- माझ्यातल्या इंडिया लव्हरला - केरळ, राजस्थान, नॉर्थ ईस्ट
जग एकच आहे. पण ते अनुभवण्याच्या आपल्या वाटा किती वेगवेगळ्या आहेत नं!
मीच माझी राणी!
आपल्यातल्या प्रत्येक जणीत एक क्वीन असतेच. तिला कुणी क्राउन देण्याची गरज नसते. ती तिच्या मनाची, तिच्या आयुष्याची, तिच्या जगाची राणी असते. आणि वुमन्स स्पेशलवर एक संध्याकाळ असते, ती हाच ‘मी’ अगदी मनसोक्त सेलिब्रेट करण्याची! मनासारखं सजायचं. रॅम्पवर चालायचं. मनसोक्त मिरवायचं. आणि आपला मोमेंट अगदी आपल्याच स्टाइलमध्ये जगायचा! वय, आकार, रंग, कोण काय म्हणेल याची काळजी करायची नाही. कारण मीच माझी राणी! आणि या सगळ्या क्वीन्स मधून आपण निवडतो त्या टूरची एक खास वीणा वर्ल्ड क्वीन. सो, ड्रेस अप. वॉक द रॅम्प. ओन युअर मोमेंट.
माझी ड्रीम लिस्ट
- सातही खंड फिरायचेत.
- नॉर्दर्न लाइट्स पाहायचेत.
- आफ्रिकन बिग फाइव्ह पाहायचेत.
- हॉट एअर बलूनमधून सूर्योदय पाहायचाय.
- जगातील एखादा प्रसिद्ध सिनिक ट्रेन जर्नी अनुभवायचाय.
- जगातली एक भन्नाट रोड ट्रिप करायचीये.
- एखादा मोठा वर्ल्ड फेस्टिव्हल तिथल्या स्थानिकांसोबत साजरा करायचाय.
- 25 देश फिरायचेत.
- त्यानंतर 50 देश पाहायचेत.
- आणि कधीतरी 100 देशांचा टप्पाही गाठायचाय!
सगळं आजच होईल असं नाही. काही यावर्षी. काही पुढच्या वर्षी. काही कधीतरी. पण माझ्या लिस्टमध्ये आहे म्हणजे एक दिवस होईलच!
माझी ट्रॅव्हल गँग कोणती?
तुमची पुढची ट्रिप तुम्ही कोणासोबत करणार?
- शाळेतल्या मैत्रिणी
- कॉलेज गँग
- बहिणी / कझिन्स
- ऑफिसच्या मैत्रिणी
- आई आणि मी
- माझी बेस्ट फ्रेंड
- फॅमिली लेडीज
- अजून भेटलेल्या नाहीत, अशा नव्या मैत्रिणी फक्त मी!
गँग ठरली? आता डेस्टिनेशन ठरवायचं!
माय नेक्स्ट फर्स्ट!
कितीही फिरलो तरी प्रवासात एक मजा कायम राहते
अजूनही काहीतरी ‘पहिल्यांदा’ करायचं बाकी असतं!
असं तुमचं काय राहिलंय?
- पहिला स्नो फॉल
- पहिली क्रूझ
- पहिलं स्कुबा डायव्हिंग
- पहिली सफारी
- पहिलं स्कायडायव्हिंग
- पहिला ग्लेशियर वॉक
- पहिली इंटरनॅशनल ट्रिप
- पहिला गर्ल्स-ओन्ली हॉलिडे
- पहिला नवा कॉन्टिनेन्ट पाहणं
मग सांगा, व्हॉट’स युअर नेक्स्ट फर्स्ट ? ________________________
अजून खूपकाही बघायचंय...अनुभवायचंय.
माझी लिस्ट वाढतराहणार आहे आणिमाझा प्रवासही...






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.