India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

विवा ला फ्रान्स

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
October 01, 2026
October 01, 2026

Quick Summary

मावळतीच्या वेळी पॅरिसला भेट द्या, कारण शहर सोनेरी रंगात न्हाऊन खास आपल्यासाठी पोझ देतं असं वाटतं.

14 जुलै बॅस्टिल डेच्या दिवशी फ्रेंच वाईन, कल्चर आणि इतिहासासह राष्ट्रगीते आणि ‘विवा ला फ्रान्स’ घोषणा अनुभवायला मिळतात.

बोर्डोमध्ये प्रथम वाइनची चव चाखा आणि गंध व ग्लास फिरवण्याची लकब मनापासून शिका.

शॅमोनीमध्ये पहिल्यांदा स्कीइंग करून बर्फात धडपडत हसा, कारण शेवटी जमवल्याचा आनंद अविस्मरणीय होतो.

लुवा व्हॅलीमध्ये शातो द शांबोर आणि विलांड्रीच्या गार्डन्स पाहा आणि छोटेखानी राजवाड्यात रात्रीचा मुक्काम घ्या.

तुलूझला ‘ला विला रोझ’ म्हणतात ते शहरात गेल्यावरच कळतं, कारण संपूर्ण शहर टेराकोटाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघतं.

Published in Losatta Lokrang 4th October 2026

मावळतीच्या वेळी संपूर्ण पॅरिस सोनेरी रंगात न्हाऊन निघालेलं असतं. तिथे उभं राहून पॅरिसकडे पाहताना असं वाटतं की अख्खं शहर खास आपल्यासाठीच पोझ देऊन उभं आहे.

‌‘‌‘मीपूर्वी दिल्लीत राहिलोय, मला ते शहर आवडलं... पर मुंबई मेरी जान है!” हे उद्गार आहेत फ्रान्सचे मुंबईतील कॉन्सल जनरल जीन मार्क सेरे-शार्लेट यांचे. तेही अस्खलित हिंदीतले. त्यांचं हे वाक्य संपल्याबरोबर ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या त्या प्रशस्त सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. निमित्त होतं 14 जुलै, बॅस्टिल डे, म्हणजेच फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवसाचं. त्या हॉलमधील वातावरण फ्रान्समय झालं होतं. फ्रेंच वाईन, कल्चर, इतिहास यांचा माझ्या सभोवताली सर्वत्र उत्सव सुरू होता. दोन्ही देशांची राष्ट्रगीते गायली गेली. कार्यक्रम संपताना सगळ्यांनी एकासुरात ‌‘विवा ला फ्रान्स‌’ अर्थात, ‌‘फ्रान्स चिरायू होवो!‌’ अशा घोषणा दिल्या. फ्रान्स ‌‘क्रांतीचा देश‌’ म्हणून ओळखला जात असला तरी रोमान्स, सुसंस्कृतपणा, आनंदाने जगण्याची वृत्ती ही देखील या देशाची वैशिष्ट्ये आहेत. आनंदी राहण्याच्या बाबतीत फ्रेंचांची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मी या देशाच्या प्रेमात आहे. पॅरिसपासून प्रोव्हान्सपर्यंत, तुलूझपासून शॅमोनीपर्यंत मी फिरले आहे. इथल्या प्रत्येक भेटीने मला आयुष्यभर जपण्यासारख्या आठवणी दिल्या आहेत.

माझ्या आयुष्यातील अनेक ‌‘पहिल्या‌’ आणि काही ‌‘शेवटच्या‌’ गोष्टींचा देश

माझ्या आयुष्यातील काही सर्वात खास ‌‘पहिल्या‌’ गोष्टी फ्रान्समध्ये घडल्या. बोर्डोमध्ये मी प्रथम वाइनची चव चाखली. त्या शहराने मला वाइनच्या निरनिराळ्या तऱ्हा, त्याचा गंध, ग्लास फिरवण्याची लकब हे सारं शिकवलं. शॅमोनीमध्ये मी पहिल्यांदा स्कीइंग केलं. बर्फात पडले, धडपडले, हसले आणि पण फायनली जमवलंच!

लुवा व्हॅलीमध्ये माझा एका आलिशान किल्ल्यात मुक्काम होता. एखाद्या राजवाड्यात राहण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्या रात्रीकरता मी जणू राजघराण्यातील व्यक्ती बनले होते. आणि हो, माझी मुलगी सारा, तिच्यासोबत मॅकरॉन बनवण्याचा पहिल्यांदा (आणि बहुधा अखेरचा) घाट घातला होता तो पॅरिसमधील ‌‘ल कॉर्डन ब्लू‌’ या आदरातिथ्य आणि पाककला यांचं शिक्षण देणाऱ्या संस्थेत.

फ्रान्स हा आपल्या पंचेंद्रियांना तृप्त करणारा देश आहे. मी गेल्या 25 वर्षात या देशाचे सर्व ऋतूंमधले विभ्रम अनुभवले आहेत. वसंत ऋतूतला बहर, उन्हाळ्यातला उबदारपणा, शरद ऋतूतील पानगळ आणि हिवाळ्यातील बर्फवृष्टी...सारं काही! बर्फवृष्टी होत असताना गरमागरम चॉकलेट पीत त्या वातावरणाचा आनंद घेणं काही औरच असतं.

तुलूझ: भारताच्या गुलाबी शहराची फ्रेंच सखी

वीणा वर्ल्डने पर्यटकांना फ्रान्स दाखवण्यासाठी तयार केलेल्या कल्पक आयटिनरींची दखल फ्रान्सनेही घेतली आणि त्या आखणीबद्दल मला फ्रेंच राजदूतांकडून नॅशनल अवॉर्ड मिळालं. या पुरस्काराच्या निमित्ताने मला फ्रान्समधील फारशा माहिती नसलेल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्याची सुरुवात तुलूझपासून झाली. माझ्यासोबत सारा होती. शहरात पोहोचल्याबरोबर मी तिला म्हणाले, हे तर आपल्या जयपूरसारखंच शहर आहे. संपूर्ण शहर टेराकोटाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालं होतं. तुलूझला ‌‘ला विला रोझ‌’ (गुलाबी शहर) का म्हणतात, ते त्या शहरात गेल्यावरच समजतं.

तिथे आमचं स्वागत टुरिझम डायरेक्टर निकोल यांनी केलं. त्या म्हणाल्या, “मोकळ्या मनाने या आणि आनंद घ्या!” एअरबस फॅक्टरीपासून ते विनयार्डमधील खास भेटीपर्यंत सगळीकडे अत्यंत आपुलकीने आमचं स्वागत झालं. सारा लहान होती. तिला वाइन देण्याबदद्ल माझ्या मनात संकोच होता. ते लक्षात येताच वाइन-मेकर हसले आणि म्हणाले, “तुम्ही फ्रान्समध्ये आहात! थोड्याशा वाइनने काही होणार नाही. इथली रीत आहे ती!” फ्रान्समध्ये वाईनचा आस्वाद घेणं ही कला आहे. ते घाईगडबडीत करायचं काम नाही.

लुवा व्हॅलीचा राजेशाही थाट

पॅरिसपासून काही तासांच्या अंतरावरील लुवा व्हॅली, हे परिकथेतील ठिकाण वाटतं. इथल्या किल्ल्यांच्या भटकंतीमध्ये आम्ही ‌‘शातो द शांबोर‌’ आणि विलांड्रीची अप्रतिम गार्डन्स पाहिली. पण या भेटीतील सगळ्यात आकर्षक भाग म्हणजे इथल्या छोटेखानी राजवाड्यात केलेला रात्रीचा मुक्काम. तिथे आमची राजेशाही बडदास्त ठेवली होती. त्या किल्ल्याच्या दालनांमध्ये शतकानुशतकांचा इतिहास दडलेला होता. तर राजवाड्यातून डोक्यावर दिसणारं तारांगण जणू आपल्यासाठीच सजलं आहे असं आम्हाला वाटत होतं.

शॉन्टीयीतील भारतीय चवींची मेजवानी

फ्रान्समध्ये मी सर्वप्रथम आले तेव्हा व्हर्सायचा आलिशान राजप्रासाद पाहिला. त्याची भव्यता पाहून डोळे दिपून गेले. सोन्याची नक्षीदार प्रवेशद्वारे, हॉल ऑफ मिरर्स, आणि दूरवर पसरलेली विशाल गार्डन्स आपल्याला थेट चौदाव्या लुईच्या काळात नेतात. त्यानंतर एका कॉर्पोरेट ग्रुपबरोबर मी ‌‘शातो द शॉन्टीयी‌’ पाहायला गेले. तिथल्या शेफने भारतीय खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करून थ्री कोर्स इंडो-फ्रेंच फ्यूजन तयार केलं होतं. त्या मेन्यूतील सगळ्यात आकर्षक गोष्ट होती ती ताज्या शॉन्टीयी क्रीमपासून बनवलेलं लज्जतदार डेझर्ट. दोन संस्कृतींना चवींच्या माध्यमातून जोडण्याची कल्पना मनाला भावून गेली.

फ्रान्समध्ये डेझर्ट म्हणजे जणू धर्मच!

फ्रेंचांनी मिठाईचा शोध लावला नसला तरी डेझर्टला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. ‌‘डेझर्ट‌’ हा शब्द ‌‘देसर्व्हिर‌’ या शब्दावरून आला. त्याचा अर्थ जेवणाचं टेबल आवरणं. फ्रेंच लोकांच्या मते, डेझर्ट म्हणजे सुग्रास जेवणाची दिमाखदार सांगता. ‌‘ल कॉर्डन ब्लू‌’ मध्ये, मी आणि सारा मॅकरॉन तयार करण्याच्या क्लासमध्ये सहभागी झालो. त्यासाठीचं मिश्रण फेटून आमचे हात भरून आले. पण ज्या क्षणी आम्ही स्वत: तयार केलेल्या त्या सुंदर पेस्टल रंगांच्या पदार्थाचा आस्वाद घेतला, तेव्हा आम्हाला भलतंच समाधान मिळालं. त्यानंतर साराचा उजळलेला चेहरा आजही माझ्या लक्षात आहे.

पॅरिस: आयफेल टॉवर आणि खूप काही...

पॅरिस म्हटलं की आयफेल टॉवर, सीन नदीतली क्रुझ आणि नॉत्र-दाम कॅथेड्रल या गोष्टी आठवतात, पण पॅरिसची खरी मजा अनुभवायची असेल, तर शहराच्या वेगवेगळ्या ‌‘आरोंदिसेमें‌’ मध्ये, म्हणजेच इथल्या विविध परिसरांमध्ये मनसोक्त भटकायला हवं. दगडी फरसबंदीच्या वाटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‌‘ल मारे‌’ येथे ज्यू बेकरीज आहेत, तर माँमार्त्रेच्या रस्त्यांवर चित्रकार फूटपाथवरच चित्र रंगवताना दिसतात. शिवाय सेंट-जर्मेन-द-प्रे या परिसरातील कॅफेज्‌‍मध्ये एके काळी साहित्य विश्वातील दिग्गज मंडळींचा राबता असायचा. पॅरिसपासून फार दूर नसलेल्या रेम्स शहरातलं शॅम्पेन हे आणखी एक खास आकर्षण आहे. इथल्या हिस्टॉरिकल शॅम्पेनच्या तळघरांनाही आपल्याला भेट देता येते.

इतिहास जिवंत करणारं नॉर्मंडी

नॉर्मंडी बीचवर उभं राहिल्यावर कसं वाटतं हा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो. ओमाहा, जूनो, गोल्ड ही इतिहासात अजरामर झालेली नावं आपल्याला आठवतात. नॉर्मंडी अमेरिकन सिमेट्रीत मात्र माझा कंठ दाटून आला. हिरव्यागार मैदानांवर दूरवर पसरलेल्या रांगेत असंख्य क्रॉस दिसत होते. त्याजवळ असलेल्या अर्रोमांश आणि डी-डे म्युझियममुळे नॉर्मंडीच्या लढाईच्या स्मृतींना उजाळा मिळाला. हा अनुभव अंतर्मुख करणारा होता.

समुद्रातील कॅसल - मॉन्ट-सेंट-मिशेल

मॉन्ट-सेंट-मिशेल हे फ्रान्समधील नॉर्मंडी किनारपट्टीवर वसलेलं एक अद्भुत, ऐतिहासिक, खडकाळ आयलंड असून ते युनेस्को जागतिक वारसास्थळ आहे. हे आयलंड समुद्रातून वर आलंय. भरतीच्या वेळी या वास्तूची गंमत कळते. हे अप्रतिम स्थापत्यकलेचं उदाहरण आहे. हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवं.

फ्रेंच अंदाजात शॉपिंग!

शॉपिंगप्रेमी व्यक्तींसाठी फ्रान्स म्हणजे जणू स्वर्गच! पॅरिस जवळ असलेल्या ‌‘ला व्हॅली व्हिलाज‌’मध्ये जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. शिवाय, वीणा वर्ल्डसोबत असाल तर तुम्हाला व्हीआयपी लाउंज ॲक्सेस आणि हँड्स-फ्री शॉपिंगचाही अनुभव घेता येतो. पॅरिसच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‌‘गॅलरीज लफायत‌’मध्ये मी कायम थांबते. तिथे फॅशनची तर न्यारी दुनिया आहेच, पण त्यापेक्षा मला आवडतो तो तिथला रूफटॉप व्ह्यू. मावळतीच्या वेळी संपूर्ण पॅरिस सोनेरी रंगात न्हाऊन निघालेलं असतं. तिथे उभं राहून पॅरिसकडे पाहताना असं वाटतं की अख्खं शहर खास आपल्यासाठीच पोझ देऊन उभं आहे.

प्रोव्हॉन्स आणि कोत दझुर

फ्रान्समधील माझा सगळ्यात आवडता प्रदेश म्हणजे प्रोव्हॉन्स-अल्प्स-कोत दझुर. फ्रान्सच्या दक्षिणेकडील हा प्रदेश म्हणजे जणू एखाद्या चित्रकाराच्या रंगपेटीतल्या रंगांचं जिवंत रूप. ‌‘कोत दझुर‌’ अर्थात ‌‘फ्रेंच रिव्हिएरा‌’ यांचं सौंदर्यवर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या नीस या आकर्षक समुद्रकिनाऱ्यावरील  शहरात मुक्काम करून आपण एझ, मोनॅको आणि लॅव्हेंडरच्या सुवासाने दरवळणाऱ्या ग्रामीण भागाची सफर करू शकतो. एझमध्ये मी परफ्यूम बनवायला शिकले. माझा स्वतःचा खास परफ्यूमही मी तयार केला. मोनॅकोमध्ये मी समुद्रकिनारी ब्रंचचा आनंद घेत पाण्यावर चमचमणाऱ्या आलिशान यॉट्सही पाहिल्या आणि लुबेरॉनमध्ये जूनच्या अखेरीपासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत फुलणाऱ्या लॅव्हेंडरच्या फुलांनी संपूर्ण जांभळा झालेला प्रदेशही पाहिला.

आल्प्समधले थरारक अनुभव आणि तलावाकाठची स्वप्ननगरी

फ्रान्सच्या आणखी आत गेलो की आपली गाठ पडते फ्रेंच आल्प्सशी. मी शामोनीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा स्कीइंग केलं. अंगावर इतके कपडे चढवले होते की मी जणू बर्फाचा गोळाच बनले होते! कधी घसरत, कधी धडपडत, तर कधी बर्फावरून लडबडत पुढे जात होते, पण या सगळ्यातही चेहऱ्यावरचं हसू मात्र कायम होतं. इथली ‌‘आग्विल दु मिदी‌’ केबल कार आपल्याला माँ ब्लाँच्या विहंगम दर्शनासाठी उंचावर घेऊन जाते. तिथून निसर्गाचं विराट रूप दिसतं. जवळच ‌‘आल्प्समधील व्हेनिस‌’ म्हणून ओळखलं जाणारं ‌‘अेनेसी‌’ शहर आहे. इथले कॅनल्स, फिकट रंगांची घरं आणि भव्य अेनेसी लेक यामुळे हे ठिकाण पोस्टकार्डसारखंच दिसतं. आम्ही एक स्पीडबोट भाड्याने घेतली आणि सरोवराच्या निळ्याशार पाण्यावरून सुसाट सफर केली. वाऱ्यावर उडणारे केस, चेहऱ्यावर झेपावणारा गार वारा आणि मनात उसळणारा आनंद... तो अनुभव खरंच अविस्मरणीय होता!

अेनेसी हे एकेकाळी इटली आणि फ्रान्सच्या काही भागावर राज्य करणाऱ्या सवॉय राजघराण्याचं सत्ताकेंद्र होतं. आजही इथल्या वास्तुकलेत आणि शहराच्या शांत, देखण्या रूपात त्या राजेशाही वारशाच्या खुणा अनुभवायला मिळतात.

पुन्हा पुन्हा फ्रान्स

माझ्यासाठी फ्रान्स हा केवळ पर्यटनस्थळांची यादी पूर्ण करण्याचा देश कधीच नव्हता. उलट, प्रत्येक भेटीत एक नवी चव, एखादं अनोळखी गाव किंवा मनाला स्पर्शून जाणारी एखादी भावना अनुभवायला लावणारा हा देश आहे. मग सांगा बरं, तुम्हाला फ्रान्सच्या प्रेमात पडण्यापासून कोणती गोष्ट रोखतेय? चला तर, ‌‘बोंजूर‌’ (शुभ सकाळ) आणि ‌‘मेर्सी बोकू‌’ (मनःपूर्वक धन्यवाद) म्हणण्याचा सराव करूया आणि फ्रेंच माणसांसारखं आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांचा उत्सव साजरा करीत, आपली स्वतःची ‌‘ज्वा द विव्ह्र‌’ (जगण्याचा आनंद) शोधायला फ्रान्सच्या टूरवर निघूया!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!
9 mins, read

सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!

Published in Sakal Saptrang 4th October 2026 भन्नाट सफर गुजरात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या वाटेवर मध्ये लागणारं एक ठिकाण असं आपण समजतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण गु

तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता?
9 mins, read

तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता?

Published in Maharashtra Times 4th October 2026   ...तुम्हाला एअरपोर्टवरचं वातावरण आवडतं का तुम्हाला एअरपोर्ट थकवणारा वाटतो? वेळ वाचवण्यासाठी लहानसहान धोके पत्करायला तुम्ही तयार असता की काहीतरी

जशी बॅग, तसा स्वभाव!
9 mins, read

जशी बॅग, तसा स्वभाव!

Published in Maharashtra Times 27th September 2026 ...तिथे अशा विसरलेल्या वस्तूंमुळे एअरपोर्टवर किंवा प्रवासात किंवा एका वेगळ्या देशात अपरात्री मोठा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून बारकाईने पाहिलंत, त

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!