We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

जगाच्या सुगंधी पाऊलवाटा

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

फ्रेचांनी वारंवार अंघोळ टाळण्यासाठी परफ्यूमचा पर्याय स्वीकारला, तर रोमन साम्राज्यात स्नानाला विशेष महत्त्व होतं.

लखनौतील अत्तराच्या दुकानात मृद्गंधाचे काही थेंब लावल्यावर पहिल्या पावसाचा सुगंध आठवणी जागृत करतो.

सुगंधांना ‘टाईम कॅप्सूल’ मानून परफ्यूम किंवा पारंपरिक अत्तर निवडा, कारण ते संस्कृती आणि परंपरा जपतात.

ग्रास आणि पॅरिसमध्ये फ्रॅगोनार्ड, मोलिनार्ड आणि गॅलिमार्डसारख्या ब्रँडच्या फॅक्टरीज आणि वर्कशॉप्स पाहा.

फ्लॉरेन्समधील सांता मारिया नोव्हेला फार्मसीमध्ये शतकानुशतके चालत आलेल्या तंत्रांनी बनणारे सुगंध अनुभवायला मिळतात.

माराकेश, दुबई आणि कन्नौजमध्ये अंबर, कस्तुरी, ऊद आणि फुलांच्या मिश्रणांमधून अस्सल अत्तर खरेदी करा.

Published in Lokstta Lokrang. Date 28th June, 2026

...वारंवार अंघोळ करावी लागू नये म्हणून फ्रेचांनी परफ्यूमचा पर्याय आपलासा केला, पण रोमन साम्राज्यात मात्र स्नानाला विशेष महत्त्व होतं. त्यामुळेच युरोपात प्रवास करताना...

माझ्या दोन मैत्रिणींनी मला परफ्यूम्स भेट दिले. त्यापैकी एक ख्यातनाम ब्रँडचा होता, तर दुसरा खास माझ्यासाठी तयार केलेला, माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा, जाणकारांनी घडवलेला होता. मला अर्थातच दोन्हीही आवडले. आपला विचार करून कोणी काही भेटवस्तू दिली, तर ती न आवडण्याचा प्रश्नच येत नाही, नाही का?

माझ्या काही महिन्यांपूर्वीच्या लखनौ भेटीत मी पायी भटकंती करीत असताना एका अत्तराच्या दुकानापाशी आले. उत्सुकतेने दुकानात शिरले तर तर तिथे तऱ्हेतऱ्हेच्या सुगंधांशी माझी गाठ पडली. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते मृद्गंधाने. त्याचे काही थेंब हातावर लावले आणि... पहिला पाऊस पडताच, उन्हाच्या काहिलीने तप्त झालेली माती त्या पावसाचे जे काही सुगंधी कौतुक करून आसमंत दरवळून टाकते, त्या क्षणांची आठवण झाली.

भावना जागृत करण्याची ताकद सुगंधांच्या ठायी असते. हलकासा सुगंधाचा शिडकावाही काळाच्या पडद्याआड खोल लपलेल्या स्मृतींना उजाळा देऊ शकतो. परफ्यूम काय किंवा पारंपरिक अत्तर काय... ते एक प्रकारचं ‌‘टाईम कॅप्सूल‌’ असतं. त्यात संस्कृती, समृद्धी आणि परंपरा यांचा इतिहास जणू काही बंद करून ठेवलेला असतो.

जग आता फ्रान्सला परफ्यूमची राजधानी मानत असलं तरी अत्तर बनवण्याची कला हजारो वर्षं जुनी आहे. ‌‘परफ्यूम‌’ हा शब्द लॅटिन ‌‘पर फ्यूमम‌’ पासून आला. धार्मिक विधींमधील सुगंधी द्रव्ये, मसाले जाळताना निघणाऱ्या धूराचा त्याला संदर्भ आहे. इजिप्त, मेसोपोटेमिया आणि रोमन लोकांनी सुगंधी तेलं, क्रीम्स यांच्यावर अनंत प्रयोग केले. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, इजिप्तची सम्राज्ञी क्लिओपात्रा हिच्या जहाजांच्या शिडांनाही गुलाबाचा सुगंध लावला जात असे. तिच्या आगमनाची वर्दी सेनापती मार्क अँटोनी याला या सुगंधामुळे आधीच मिळावी अशी त्यामागची कल्पना होती. भारत आणि अरबी द्वीपकल्पातही आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनात सुगंधाला पूर्वापार महत्त्वाचे स्थान आहे.

फ्रेंचानी सुगंधांचे कलाप्रकारात रुपांतर केले. प्रथम त्याचा वापर शरीराला येणारी दुर्गंधी लपवण्यासाठी केला जाई. साधारण मध्ययुगात फ्रान्समध्ये पाण्यामुळे रोग होतात, असा गैरसमज रूढ होता. त्यामुळे अंघोळ अपवादानेच केली जाई. त्यातून शरीराला येणारी दुर्गंधी लपवण्यासाठी सुगंधांची गरज भासू लागली. आज चमेली, गुलाब आणि लॅव्हेंडर अशा सुगंधी फुलझाडांसाठी अतिशय अनुकूल हवामान असल्यामुळे फ्रान्सच्या दक्षिणेकडील ग्रास हे छोटेखानी शहर जगाची परफ्यूमची राजधानी बनलं आहे. फ्रेंच रिव्हिएरासाठी आलेल्या पर्यटकांना ग्रास किंवा एझ येथील परफ्यूमचे कारखाने आवर्जून दाखविण्यात येतात. तर या निमित्ताने तुमचा पुढचा प्रवास सुगंधी करतील अशा काही ठिकाणांची ही झलक -

फ्रान्समधील ग्रास आणि पॅरिस - परफ्युमचा नाद असणाऱ्यांसाठी ग्रास तीर्थस्थळ आहे. फ्रॅगोनार्ड, मोलिनार्ड आणि गॅलिमार्ड हे इथले जानेमाने ब्रँड आहेत. त्यांच्या फॅक्टरीज पर्यटकांना पाहता येतात.

पॅरिसमध्ये गॅर्लेन, मेसन फ्रान्सिस कुर्कडजियां आणि शानेल हे प्रतिष्ठित आणि महागडे परफ्यूम ब्रँड्स आहेत. या ठिकाणांना सुगंधनिर्मितीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथे परफ्यूम तयार करण्याचे प्रशिक्षण देणारी वर्कशॉप्सही होतात.

फ्लॉरेन्स, इटली - डोमिनिकी फ्रायर्सनी 1221 मध्ये स्थापन केलेली ‌‘ऑफिसिना प्रोफ्युमो - फार्मास्युटिका दि सांता मारिया नोव्हेला‌’ ही जगातील सर्वात जुनी फार्मसी आहे. शतकानुशतके प्रचलित तंत्रांचा वापर करून श्रीमंती सुगंधी द्रव्ये या फार्मसीत तयार होतात.

माराकेश, मोरोक्को - या ऐतिहासिक शहरातील जुन्या बाजारपेठांमध्ये अंबर, कस्तुरी आणि ऊद याचं दुर्मिळ तेल मिळतं. त्यांचा वापर मध्य पूर्वेतील अत्तर उद्योगात केला जातो. अगारो किंवा ‌‘एल केला म‌’गौना‌’ ही अत्तराची दुकाने हँडमेड सुगंधांच्या विविध मिश्रणांसाठी प्रसिद्ध आहेत.

दुबई, युएई - दुबईतही ऊद, अंबर आणि फुलांच्या सुगंधांच्या मिलाफातून एकापेक्षा एक सुगंध तयार केले जातात. अस्सल अमिराती सुगंध अनुभवण्यासाठी स्विस अरेबियन किंवा अजमल परफ्यूम्स यांना भेट द्यावी.

कन्नौज, भारत - ‌‘पूर्वेकडील ग्रास‌’ अशी कन्नौजची जागतिक ओळख आहे. उत्तर प्रदेशातील हे शहर भारतीय अत्तर उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र आहे.इथे पारंपरिक पद्धतीने अत्तरं बनवली जातात.‌‘मिट्टी इत्तर‌’ ज्याचा मगाशी उल्लेख केला तो मृद्गंध इथलाच.

अशी सुगंधांशी निगडित आणखीही बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी तुमचं एखादं विशेष आवडणारं ठिकाण असेल तर मला नक्की कळवा!

वारंवार अंघोळ करावी लागू नये म्हणून फ्रेचांनी परफ्यूमचा पर्याय आपलासा केला, पण रोमन साम्राज्यात मात्र स्नानाला विशेष महत्त्व होतं. त्यामुळेच युरोपात प्रवास करताना जागोजागी रोमन शैलीची स्नानगृहे आढळतात. दैनंदिन जीवनातील शारीरिक स्वच्छता, विश्रांती यांच्यासह समाजकारण आणि प्रसंगी राजकारण यांच्यासाठी ही स्नानगृहे महत्त्वाची केंद्रे बनली. आता जसे स्पा, जिम अशी एकत्र वावरण्याची खूपशी ब्रॅण्डेड ठिकाणं दिसतात, तसंच या स्नानगृहांचं स्थान होतं. रोमन साम्राज्यात दगडी जलवाहिन्यांचं मोठं जाळं होतं. शिवाय त्यांनी पाणी गरम करण्याची यंत्रणाही उभारलेली होती. त्यामुळे त्यांना मोठाली स्नानगृहे बांधता आली. रोममधील ‌‘बाथ्स ऑफ कॅराकल्ला‌’ आणि इंग्लंडमधील ‌‘रोमन बाथ‌’ या भव्य स्नानसंकुलांची उभारणी त्यामुळेच शक्य झाली. ही स्नानगृहं म्हणजे रोमन संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा प्रसार ब्रिटनपासून थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत झालाय. त्यातली काही स्नानगृहं, मंदिरं आणि उपचार केंद्र यांच्याशी जोडलेली होती. त्यामुळे त्यांना एकप्रकारे आध्यात्मिक आणि औषधी उपयोगाचे स्थानही मिळाले. सम्राट, सैनिक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्या दृष्टीने ही स्नानगृहे म्हणजे ऐषोआराम, गरज आणि प्रतिष्ठा यांचे प्रतीक होती. याच परंपरेचा प्रभाव आजच्या स्पा संस्कृतीवर पडलेला जाणवतो. आपण आजही हॉट वॉटर स्प्रिंग्जनी समृद्ध अशा आरोग्यदायी विश्रांतीचा आनंद घेऊ शकतो. त्यापैकी प्रख्यात स्नानगृहांची ही झलक.

बाथ, इंग्लंड - अगदी नावाप्रमाणेच बाथ शहरात असलेले हे प्राचीन रोमन स्नानगृह हेे रोमन अभियांत्रिकीच्या उत्तम स्थितीत जतन करण्यात आलेल्या अवशेषांपैकी एक आहे. हॉट वॉटर स्प्रिंग्जमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे हे स्नानगृह पर्यटकांच्या विशेष आवडीचे आहे.

बाडेन-बाडेन, जर्मनी - जर्मनीतील हे शहर स्पाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात रोमन-आयरिश स्नानगृहे आणि आलिशान वेलनेस रिट्रीट्सही आहेत. तिथे पर्यटकांना थर्मल पूलमध्ये डुंबण्याची तसेच अरोमा थेरपी घेण्याची सुविधा आहे.

पामुकले, तुर्की - खडकाळ डोंगरावरील हॉट वॉटर स्प्रिंग्ज हे पामुकलेचे वैशिष्ट्य आहे. या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेट अनेक शतकांपासून खडकांवर साचत गेल्याने पांढरे थर तयार झाले. थरांमध्ये पायऱ्यांच्या आकाराचे गरम पाण्याचे नैसर्गिक तलाव आहेत. त्याचा वापर एकेकाळी ग्रीक आणि रोमन लोकांनी उपचार आणि विश्रांती यांच्यासाठी केला होता.

बुडापेस्ट, हंगेरी - बुडापेस्टला स्पाची जागतिक राजधानी मानले जाते. तिथे 100हून जास्त हॉट वॉटर स्प्रिंग्ज आहेत. आकर्षक पिवळा दर्शनी भाग, नैसर्गिक पाण्याचे झरे यांच्यामुळे स्जेक्हेनी बाथ हे विश्रांतीचे ठिकाण आहे.

जपानची ऑनसेन संस्कृती - ऑनसेन म्हणजे हॉट वॉटर स्प्रिंग्ज. त्यांचा जपानी संस्कृतीशी खोलवरचा संबंध आहे. हाकोने, बेप्पू आणि कुसात्सु आदि शहरे खनिजांनी समृद्ध आहेत. त्यामुळे इथे गरम पाण्याचे स्नान लोकप्रिय आहे.

रेक्याविक, आइसलँड - जमिनीच्या पोटातील औष्णिक क्रिया आणि ज्वालामुखी यांच्यामुळे ज्वाळा आणि बर्फ यांचा देश अशी याची ओळख आहे. आइसलँडमध्ये अनेक हॉट वॉटर स्प्रिंग्ज आहेत. सुंदर निळ्याशार सरोवरात डुबकी मारण्यासोबतच मिनरल्सयुक्त पाण्याचा आरोग्यदायी अनुभव एकदम सुखद असतो. यातल्या बहुतेक ठिकाणी सार्वजनिक स्नानगृहांशिवाय जास्तीचे शुल्क भरून वरच्या श्रेणीच्या खासगी स्नानगृहांचाही पर्याय उपलब्ध असतो.

जिथे हॉट वॉटर स्प्रिंग्ज नाहीत अशा उर्वरित जगाने त्यावरचा पर्याय शोधून काढला. आबालवृद्ध पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंग पूल्स बांधून काढण्याची कलाही त्या त्या ठिकाणच्या लोकांनी आत्मसात केली. मोहेंजोदडोमध्ये जगातील सगळ्यात जुना, सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा, ग्रेट बाथ हा पहिला ज्ञात जलतरण तलाव म्हणजेच स्विमिंग पूल आहे. सिंधू संस्कृतीचा भाग असलेलं हे बांधकाम इसवीसनपूर्व सुमारे 3000 मध्ये झाले. भाजक्या विटा, डांबर यांचा वापर केलेला हा 12 मीटर लांब, 07 मीटर रुंद आणि 2.4 मीटर खोल सुनियोजित तलाव होता. धार्मिक कार्यासाठी त्याचा वापर केला जात असावा, असे इतिहासकारांचे मत आहे. आपण सगळेच मोहेंजोदडोला जाऊ शकत नाही. पण पुढच्या सुट्टीत जगातल्या विविध भागातील सर्वोत्तम जलतरण तलावांचा आनंद लुटू शकतो. त्यापैकी उत्तम जलतरण तलाव असलेल्या हॉटेल्सची, पूल व्हिलांची ही एक झलक -

मरीना बे सँड्स, सिंगापूर - इमारतीच्या छतावरील जगातला सगळ्यात मोठा इन्फिनिटी पूल. सिंगापूरच्या क्षितिजाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेत 57 व्या मजल्यावरच्या पूलमध्ये पोहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

सिक्स सेन्स निन्ह व्हॅन बे, व्हिएतनाम - निर्जन समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा प्रायव्हेट पूल व्हिला आहे. प्रत्येक व्हिलामध्ये स्वतंत्र इन्फिनिटी पूल आहे. तिथे पोहत दक्षिण चिनी सागराचा मनमोहक नजारा पाहता येतो.

हँगिंग गार्डन्स, बाली, इंडोनेशिया - हा जंगलातला इन्फिनिटी पूल आहे. सभोवती घनदाट रेन्ाफॉरेस्ट्स, त्यातील हे निळ्याशार पाण्याचे जणू काही तरंगणारे पूल्स आहेत.

कॅम्ब्रियन, स्वित्झर्लंड - आल्प्समधील गरम पाण्याचा आऊटडोअर इन्फिनिटी पूल. इथे बर्फाच्छादित पर्वतांचा नजारा पाहत, वाफाळत्या पाण्यात पोहता येतं.

सोनेवा जानी, मालदीव - या व्हिलामध्ये इन्फिनिटी पूल आणि स्लाईड्स आहेत. अथांग निळ्या क्षितिजासमोर डोळे उघडायचे... स्विमिंग पूलमध्ये पोहायचं. शिवाय थेट समुद्रात जाण्यासाठी स्लाईड वापरायची.

अमानगिरी, अमेरिका (युटा) - हे म्हणजे खडकांमध्ये कोरलेलं एक नैसर्गिक वाळवंटी तळं. युटा वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या या नंदनवनात निसर्गासोबत एकरूप होण्याचा अनुभव मिळतो.

सॅन अल्फोन्सो डेल मार, चिली - जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल इथे आहे. त्याची लांबी एक किलोमीटर भरते. त्यात पोहताना लाटाविरहित समुद्राचाच अनुभव मिळतो!

अत्तरनिर्मितीची नाजूक कलाकुसर असो, हॉट वॉटर स्प्रिंग्जमध्ये मिळणारी सुखद ऊब किंवा अथांग सागराचं दर्शन घेत इन्फिनिटी पूलमध्ये पोहणं... अशाच अनुभवांमध्ये आपल्या मनाला तृप्ती देणारे खास क्षण सापडतात. इतिहासात खोलवर रुजलेल्या या परंपरा आजही आपल्याला तेवढ्याच भावतात. आणि मग प्रवास म्हणजे निव्वळ भटकंती न राहता सर्वांगसुंदर अनुभव असल्याची प्रचिती येते. तुम्हाला यापैकी कोणत्या भन्नाट प्रवासाला जायला आवडेल?

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
9 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
9 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
9 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!