India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

इट्स टाईम फॉर आफ्रिका

12 mins. read
Veena Patil
Veena Patil
12 Mins Read
April 27, 2026
April 27, 2026

Quick Summary

आफ्रिकेत मायग्रेशन सीझनमध्ये लाखो प्राण्यांची चालती दुनिया पाहून तुम्हाला त्या प्रवाहाचा भाग असल्यासारखं वाटेल.

आफ्रिकेतील सफारीसाठी केनिया आणि टांझानियामधील मसाई मारा आणि सेरेंगेटी ग्रेट मायग्रेशनसाठी अवश्य निवडा.

ओल पेजेटा कन्झर्व्हन्सीमध्ये गेंड्यांच्या संवर्धनाचा अनुभव घ्या आणि अंबोसेलीत किलिमांजारोच्या पार्श्वभूमीवर हत्ती पाहा.

दक्षिण आफ्रिकेत क्रुगर आणि त्सित्सिकाम्मा नॅशनल पार्कला भेट द्या, तर टांझानियात न्गोरोन्गोरो आणि लेक मन्यारा एक्सप्लोर करा.

युगांडा आणि रवांडामध्ये गोरिला ट्रेकिंग करा आणि ब्विंडी इम्पेनेट्रेबल फॉरेस्टमध्ये अनोखे वन्यजीव अनुभव मिळवा.

आफ्रिका फक्त स्वस्त टुरिझम नाही, तर प्रीमियम लॉजेस आणि उच्च दर्जाच्या सफारी कॅम्प्समुळे क्लास अपार्ट अनुभव आहे.

Published in the Sunday Sakal Saptarang on 26 April 2026

आफ्रिका...एक माईलस्टोन

आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं ते अद्वितीय, विलोभनीय आणि अक्षरशः अफलातून वाईल्डलाईफ. जगात कुठेही पाहायला न मिळणारं ॲनिमल किंग्डम आपल्यासमोर इथे जिवंत होतं. विशाल सवाना, मोकळं आकाश आणि त्या सगळ्यात मुक्तपणे वावरणारे प्राणी हा अनुभव शब्दांमध्ये मावणारा नाही. मायग्रेशन सीझनमध्ये लाखो प्राण्यांची चालती दुनिया पाहताना, आपल्याला आपणही त्या प्रवाहाचा एक भाग असल्यासारखं वाटतं. हे दृश्य आपण केवळ पाहत नाही, तर तो अनुभव मनात कायमचा जपून ठेवतो.

पण खरं सांगायचं तर आफ्रिका म्हणजे फक्त वाईल्डलाईफ नाही. आफ्रिकेचा निसर्गच नाही, तर कथा आणि इतिहासही आपल्याला प्रेरणा देऊन जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पहिली कर्मभूमीही साऊथ आफ्रिका होती. वर्णभेदाचा बळी ठरवत जेव्हा त्यांना रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून बाहेर ढकललं गेलं, तेव्हा या अपमानाने त्यांच्या जीवनाला वळण दिलं आणि त्यांनी इथेच सर्वप्रथम सत्याग्रहाची सुरुवात केली. ‌‘लायन किंग‌’ सारख्या चित्रपटांनी या खंडाची भव्यता जगभर पोहोचवली, तर नेल्सन मंडेला यांचा संघर्ष संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरला. असा हा आफ्रिका म्हणजे केवळ लँडस्केप्स नाहीत, तर जिद्द, सन्मान आणि आशा यांचं जिवंत उदाहरण आहे. इथल्या प्रत्येक भूमीत कथा दडलेल्या आहेत, प्रत्येक क्षण नवीन शिकवण देतो आणि प्रत्येक अनुभव मनाला अधिक समृद्ध करीत पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

आफ्रिकेबद्दल आपल्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. इथले अनेक देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने आपल्याला वाटतं की आफ्रिका हा पर्यटनाचा स्वस्त पर्याय असेल. पण वास्तव अगदी उलट आहे. आफ्रिका हा टुरिझमच्या दृष्टीने अत्यंत प्रीमियम आणि महागडा खंड आहे. कारण तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, लॉजेस, सफारी कॅम्प्स हे सगळं अत्यंत उच्च दर्जाचं असतं. त्या दुर्गम ठिकाणीही जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी जे प्रयत्न होतात, त्याची किंमत असतेच. त्यामुळे आफ्रिका म्हणजे ‌‘चीप टूर‌’ नसून एक ‌‘क्लास अपार्ट‌’ असा अनुभव आहे. प्रत्येक प्रवाशाच्या मनात जगातील सातही खंड पाहण्याचं स्वप्न असतं. सुरुवात होते आशियापासून. मग युरोप, अमेरिका आणि पुढे हा प्रवास आपल्याला ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका अशा खंडांकडे घेऊन जातो. त्यातील आफ्रिका हा खंड म्हणजे फक्त यादीतील एक नाव नाही, तर एक माईलस्टोन आहे, जो पूर्ण केल्यावर आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं.

वीणा वर्ल्डसोबत आफ्रिकेचा अनुभव घेण्याचे ग्रुप टूर्स, कस्टमाईझ्ड हॉलिडेज्‌‍, माईस किंवा प्रायव्हेट स्ाफारीज्‌‍ यांसारखे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने आफ्रिका अनुभवू इच्छिता, त्या पद्धतीने आम्ही तो तुमच्यासाठी साकार करतो. कारण आमच्यासाठी प्रत्येक प्रवास म्हणजे फक्त टूर नसते, तर तो स्वतःला नव्याने भेटण्याचा एक अनुभव असतो. अशा या प्रवासाच्या आठवणी मनात आयुष्यभरासाठी कोरल्या जातात आणि त्या आपल्याला सतत नवी ऊर्जा देत राहतात.

एक खंड, असंख्य अनुभव, वीणा वर्ल्ड सोबत!

वन्यजीवांचा थरार आणि सफारीज्‌‍: अफ्रिकेतील वन्यजीवन अनुभवायचं असेल तर केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा आणि रवांडा हे देश सर्वोत्तम आहेत. केनियामध्ये मसाई मारा तर टांझानियामध्ये सेरेंगेटी ‌‘ग्रेट मायग्रेशन‌’साठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो विल्डबीस्ट्स, झेब्रा व एलांड्सचे कळप केनिया-टांझानिया दरम्यान स्थलांतर करतात. ‌‘ग्रेट मायग्रेशन‌’ हा भव्य सोहळा मानला जातो. तर ‌‘ओल पेजेटा कन्झर्व्हन्सी‌’ गेंड्यांच्या संवर्धनासाठी ओळखली जाते. अंबोसेली नॅशनल पार्कमध्ये किलिमांजारोच्या पार्श्वभूमीवर हत्ती पाहणं खास अनुभव असतो. साऊथ आफ्रिकेमध्ये क्रुगर नॅशनल पार्क आणि त्सित्सिकाम्मा नॅशनल पार्क प्रसिद्ध आहेत. टांझानियामध्ये सेरेंगेटी नॅशनल पार्क, न्गोरोन्गोरो क्रेटर आणि लेक मन्यारा नॅशनल पार्कमध्ये विविध प्रजातींचं सहअस्तित्व दिसतं. गोरिला ट्रेकिंगसाठी युगांडा व रवांडा विशेष ओळखले जातात. ब्विंडी इम्पेनेट्रेबल फॉरेस्ट आणि क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्कच्या इशाशा सेक्टरमध्ये झाडांवर चढणारे सिंह दिसतात. मादागास्कर मधील अंदासिबे नॅशनल पार्क हे लॅमूरसाठी प्रसिद्ध आहे.

आयलंड्स आणि बीचेस: मॉरिशस, झांझिबार आणि सेशल्स ही आयलंड्स स्वच्छ निळं पाणी आणि पांढऱ्या वाळूच्या बीचेससाठी जगप्रसिद्ध आहेत. मॉरिशसमध्ये लक्झरी रिसॉर्टस्‌‍, वॉटर स्पोर्टस्‌‍ आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा संगम पाहायला मिळतो. ब्लॅक रिव्हर गॉर्जेस नॅशनल पार्क, लॅगून्स आणि कोरल रीफ्समुळे इथे साहस आणि विश्रांतीचा अनुभव घेता येतो. झांझिबार इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध आहे. इथे ‌‘स्टोन टाऊन‌’ हे युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ आहे. मसाल्यांच्या बागांमुळे झांझिबार ‌‘स्पाइस आयलंड‌’ म्हणून ओळखलं जातं. सेशेल्समध्ये ग्रॅनाइट खडकांनी सजलेले समुद्रकिनारे आणि नितळ निळं पाणी आहे. इथले 'आन्स सोर्स द आर्जेंट' सारखे बीचेस जगातील सर्वात सुंदर किनाऱ्यांमध्ये गणले जातात. इथे समृद्ध सागरी जीवन असून स्नॉर्केलिंग व डायव्हिंगसाठी हे उत्तम आहेत. ही तिन्ही ठिकाणं हनिमून, रिलॅक्सेशन आणि प्रीमियम बीच हॉलिडेसाठी आदर्श आहेत.

संस्कृती आणि वारसा: कैरो हे प्राचीन इजिप्तचे सांस्कृतिक केंद्र असून गिझाच्या पिरॅमिड्स आणि स्फिंक्स या मानवजातीच्या इतिहासातील अद्वितीय रचना आहेत. नाईल नदीच्या काठावर विकसित झालेली ही संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. मादागास्कर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय लोक गुजरात आणि सिंधमधून पूर्व व ईशान्य आफ्रिकेत शतकानुशतके व्यापारासाठी जात होते. त्यांनी मसाले, कथा आणि संस्कृती वाहून नेल्या. भारतामधील सिद्दी समाज आजही त्या आफ्रिकन मुळांची साक्ष देतो. हा बंटू वंशातील समाज प्रामुख्याने गुजरातमध्ये गिर नॅशनल पार्क परिसरात राहतो. आफ्रिका-भारत यांच्यातील सांस्कृतिक दुवा अशी त्यांची ओळख आहे. आज ते स्थानिक समाजात एकरूप झाले असले तरी त्यांच्या परंपरा, संगीत व नृत्यात आफ्रिकन मूळे जिवंत आहेत. त्यांचं ‌‘सिद्दी धमाल‌’ हे नृत्य, ताल व लयीसाठी ओळखलं जातं. गिर परिसरात सिद्दी समाजातील अनेक लोक, गाईड्स म्हणून तसंच सुरक्षा क्षेत्रात कार्यरत आहेत.

निसर्गाची अद्भुत किमया: आफ्रिकेतील नैसर्गिक चमत्कारांमध्ये व्हिक्टोरिया फॉल्स हा सर्वात भव्य वॉटरफॉल मानला जातो. झांबेजी नदीवरील हा वॉटरफॉल ‌‘स्मोक दॅट थंडर्स‌’ म्हणून ओळखला जातो आणि त्याची पाण्याच्या धुक्याची भिंत दूरवरूनही स्पष्ट दिसते. साऊथ आफ्रिकेतील केप टाऊन परिसर, गार्डन रूट आणि टेबल माऊंटन ही निसर्गवैविध्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. टेबल माऊंटन केबल कारमधून शहर आणि समुद्राचा विहंगम नजारा अनुभवता येतो. स्टेलनबॉश वाईनरीज उत्कृष्ट वाईन आणि विनयार्डस्‌‍साठी प्रसिद्ध आहेत, तर किनाऱ्यावर व्हेल वॉचिंग बोट टूर, आफ्रिकन पेंग्विन्स आणि सील आयलंड यांसारखे अनुभवही विशेष ठरतात. कांगो केव्हज्‌‍ या प्राचीन केव्हज्‌‍ त्यांच्या अद्भुत लाईमस्टोनच्या रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. साहसी प्रवाशांसाठी झिप लाईन, बंजी जंपिंगसारखे ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससुद्धा उपलब्ध आहेत. सन सिटी रिसॉर्ट हे निसर्ग आणि लक्झरीचा सुंदर संगम दाखवणारं ठिकाण आहे. हा संपूर्ण प्रदेश ‌‘पोस्टकार्ड परफेक्ट‌’ दृश्यांसाठी ओळखला जातो.

वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

आफ्रिकेसारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या खंडात प्रवास करणं म्हणजे केवळ साईटसीइंग नाही, तर तो एक अनुभूतींचा प्रवास आहे. सेरेंगेटीचं सवाना असो, मसाई मारा मधील वन्यजीवांचा थरार असो किंवा केप टाऊनच्या किनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य... प्रत्येक ठिकाणी मी, म्हणजेच वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर तुमचा अनुभव अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवितो. मी केवळ आयटिनरी सांभाळत नाही, तर त्या भूमीचं सौंदर्य तुम्हाला जाणवून देतो. टाईम मॅनेजमेंट आणि अनपेक्षित परिस्थितींमध्ये योग्य निर्णय घेण्याची माझी क्षमता यामुळे तुमचा प्रवास निर्धास्तपणे पार पडतो. मी सफारीदरम्यान तुम्हाला योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोहोचवतो, किंवा एखाद्या अनोख्या अनुभवाची संधी ओळखतो. आणि म्हणूनच वीणा वर्ल्डच्या आफ्रिका टूरमध्ये तुम्ही केवळ प्रेक्षक नसता, तर त्या अनुभवाचा एक भाग असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आफ्रिका फक्त फिरत नाही, तर तुम्ही तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने जगता. मग तुम्ही कधी येताय माझ्यासोबत आफ्रिका पाहायला?

आफ्रिका आणि  गैरसमज

आफ्रिका म्हणजे एकच देश आहे.

प्रत्यक्षात आफ्रिका ५० हून जास्त देशांचा खंड आहे.

आफ्रिका म्हणजे फक्त सफारी.

वन्यजीवांच्या पलीकडे इथे निळेशार समुद्र, दाट रेनफॉरेस्ट्स, रम्य आयलंड्स आहेत.

आफ्रिका म्हणजे फक्त वाळवंट.

इथे हिरव्यागार अरण्यांपासून ते विशाल नद्यांपर्यंत, बर्फाच्छादित पर्वतशिखरांपासून सुपीक मैदानांपर्यंत निसर्गाची विविधता पाहायला मिळते.

इथे आधुनिक शहरे नाहीत.

इथेही गजबजलेली, वेगाने प्रगती करणारी शहरं आहेत, जिथे आधुनिक पायाभूत सुविधा, कला, खाद्यसंस्कृती आणि नवकल्पनांचा उत्साह अनुभवायला मिळतो.

अरेच्चा, हे मला माहीतच नव्हतं!

  • आफ्रिकन खंड हळूहळू टेक्टॉनिक मूव्हमेंटमुळे तुटून वेगळा होत आहे.
  • सहारा वाळवंट इतकं विशाल आहे की त्यात पूर्ण अमेरिका मावेल!
  • नाईल नदी तब्बल ११ देशांमधून वाहते.
  • ग्रेट मायग्रेशन इतकं विशाल आहे की ते स्पेसमधूनही दिसतं.
  • आफ्रिकेत २००० पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात.
  • माऊंट किलिमांजारो विषुववृत्ताजवळ असूनही बर्फाच्छादित आहे.
  • मादागास्कर मधील ९०% वाईल्डलाईफ जगात इतरत्र सापडत नाही.
  • लेक व्हिक्टोरिया इतका विशाल आहे की तो समुद्रासारखा वाटतो.
  • व्हिक्टोरिया फॉल्सच्या पाण्याचा आवाज ४० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येतो.
  • आज पृथ्वीवर अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक मानवाचा मूळ वंश आफ्रिकेत सापडतो.
  • ‌‘नामिब डेजर्ट‌’ हे जगातील सर्वात जुनं वाळवंट असून ते हिमालयापेक्षाही जुनं मानलं जातं.
  • सहारा वाळवंट हे एकेकाळी हिरवंगार होतं. त्याकाळी तिथे नद्या, सरोवरं आणि हिप्पोही होते.
  • सेरेंगेटी नॅशनल पार्क ते मसाई मारा इथे दरवर्षी १५ लाखांहून अधिक प्राणी स्थलांतरित होतात.

फर्स्ट टाईम व्हिजिटर? हे लक्षात ठेवा!

  • हवामान उष्ण असल्याने सनस्क्रीन, टोपी आणि हलके सुती कपडे घेऊन जा.
  • प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
  • बाटलीबंद पाणी वापरा.
  • स्थानिक संस्कृतीचा आदर राखा.
  • फोटो काढण्यापूर्वी परवानगी घ्या.
  • चलन आणि कार्ड दोन्ही जवळ ठेवा.
  • सफारीदरम्यान गाईडच्या सूचनांचे काटेकोर पालन करा.

आफ्रिका हा मोठा खंड आहे, पण तयारी करून गेलात, तर तो सहज आपलासा वाटतो.

लोकल मार्केट आणि फूड कल्चर

आफ्रिकन मार्केट म्हणजे रंगांची उधळण. मासाई बीड ज्वेलरी, लाकडी मुखवटे, हाताने कोरलेली शिल्पं, घानाचं ‌‘कंते‌’ कापड यातल्या प्रत्येक वस्तूमागे एक कथा आहे. घानाचं ‌‘कंते‌’ हे राजेशाही कापड, अभिमानाचं प्रतीक आहे. मोरोक्कोच्या बाजारात मसाल्यांचा सुगंध असा दरवळतो की नकळत आपण एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आहोत असं वाटतं. आफ्रिकेची खाद्यसंस्कृती देखील समृद्ध आणि जिवंत आहे. इथलं अन्न साधं, पौष्टिक आणि परंपरेशी घट्ट जोडलेलं असतं. पूर्व आफ्रिकेत ‌‘इंजेरा‌’सारखी आंबूस, मऊ भाकरी ही डाळी, भाज्या आणि मटणाच्या स्ट्यूसोबत खाल्ली जाते. उत्तर आफ्रिकेत ‌‘टॅजिन‌’सारखे हळूहळू शिजवलेले पदार्थ, मसाल्यांच्या सुगंधाने मन मोहून टाकतात. पश्चिम आफ्रिकेतील ‌‘जॉलॉफ राईस‌’ हा टोमॅटो, मिरची आणि मसाल्यांनी परिपूर्ण भाताचा प्रकार असून त्याच्या चवीवरून देशांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धाही रंगते. ‌‘फुफू‌’सारखे पदार्थ कसावा किंवा केळीपासून बनवून सूपसोबत खाल्ले जातात. याशिवाय स्ट्रीट फूडही आफ्रिकन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ग्रिल्ड मांस, मसालेदार पदार्थ आणि स्थानिक चवींचा संगम यात दिसतो. परंतु आफ्रिकन खाद्यसंस्कृतीचं खरं सौंदर्य आहे ते एकाच ताटातून सगळ्यांनी मिळून, हाताने जेवण्यात, गप्पा मारण्यात आणि हसण्यात. ही केवळ चव नाही, तर एक अनुभव आहे जो लोकांना एकमेकांशी आणि त्यांच्या मुळांशी जोडतो.

आयुष्यात एकदा तरी...

  • मसाई मारा हॉट एअर बलून सफारी करायचीय.
  • सूर्योदयाच्या वेळी आकाशातून सवाना पाहण्याचा थरार अनुभवायचाय आणि त्यानंतर जंगलात शॅम्पेनसह बुश ब्रेकफास्ट करायचाय.
  • युगांडा - रवांडा मध्ये गोरिला ट्रेकिंग करून माऊंटन गोरिलांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये जवळून पाहायचंय.
  • सफारीनंतर क्रुगर नॅशनल पार्कमध्ये खुल्या आकाशाखाली बुश ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी सनडाऊनर्सचा खास अनुभव घ्यायचाय.
  • गान्सबाई इथे ‌‘शार्क केज डायव्हिंग‌’ करीत ग्रेट व्हाईट शार्कच्या समोरासमोर येण्याचा थरारक अनुभव घ्यायचाय.
  • न्गोरोन्गोरो इथे नाट्यमय लँडस्केपच्या सान्निध्यात, क्रेटरकडे पाहत गॉरमेट डायनिंगचा अनुभव घ्यायचाय.
  • साबी नदीवरील ‌‘क्रुगर शालाती - द ट्रेन ऑन द ब्रिज‌’ या लक्झरी ट्रेनमध्ये राहून वन्यजीवन अगदी जवळून पाहायचंय.
  • ‌‘जिराफ मनोर‌’ मध्ये राहून जिराफांसोबत अविस्मरणीय असा नाश्ता करायचाय.

लायन किंग‌’च्या जगात, चला वीणा वर्ल्ड सोबत!

आफ्रिका हा विशाल आणि विविध अनुभवांनी भरलेला खंड आहे. अनेक देश, वेगवेगळे नियम, बदलणारे भूभाग आणि अनोखी संस्कृती तुम्हाला इथे अनुभवायला मिळते आणि वीणा वर्ल्डसोबत प्रवास करताना ही सगळी गुंतागुंत तुमच्यासाठी सोपी आणि आनंददायी बनते. कारण इथे प्रत्येक टूर म्हणजे फक्त प्लॅन नसते, तर ती एक विचारपूर्वक आखलेली अनुभवयात्रा असते.

ग्रुप टूर्स: आफ्रिकेचा पहिला आणि सर्वात सहज अनुभव घ्यायचा असेल तर वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्ससोबत चला. उत्तम नियोजन, अनुभवी टूर मॅनेजर्स, आरामदायी निवास आणि योग्य वेळी केलेल्या सफारीज्‌‍ यांमुळे तुम्ही फक्त अनुभव घ्यायचा, बाकी सगळं आम्ही सांभाळतो. साऊथ आफ्रिकेची गार्डन रूट टूर असो, केनिया टांझानियामधील वाईल्डलाईफ सफारीज्‌‍, किंवा व्हिक्टोरिया फॉल्स आणि केप टाऊनसारखी आयकॉनिक ठिकाणं,     वीणा वर्ल्ड मध्ये प्रत्येक टूरची आयटिनरी बारकाईने आखलेली असते, जेणेकरून तुम्हाला आफ्रिकेचा कंप्लिट एक्सपिरियन्स मिळेल.

कस्टमाईझ्ड हॉलिडेज्‌‍: आफ्रिका तुम्हाला हवा तसा अनुभवायचा असेल तर मग वीणा वर्ल्डचे कस्टमाईझ्ड हॉलिडेज्‌‍ हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अल्ट्रा लक्झरी सफारी लॉजेस, सेरेंगेटीमधील हॉट एअर बलून राईड्स, व्हिक्टोरिया फॉल्सवर हेलिकॉप्टर राईडचा अनुभव, गार्डन रूटवरील सेल्फ ड्राइव्ह जर्नी... असे अनेक क्षण आम्ही खास तुमच्यासाठी डिझाईन केले आहेत. वॉकिंग सफारीज्‌‍, स्थानिक संस्कृतीचा जवळून अनुभव आणि इतरही अनेक एक्सक्लुसिव्ह एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतील आणि तेही तुमच्या पसंतीनुसार, तर कस्टमाईझ्ड हॉलिडेज्‌‍ हा ऑप्शन बेस्ट आहे.

कॉर्पोरेट टूर्स (MICE): कॉर्पोरेट प्रवासासाठी आफ्रिका म्हणजे एक अनोखी संधी. प्रायव्हेट बिग 5 सफारीज्‌‍, आफ्रिकन स्काईजखाली बुश डिनर्स, केप वाईनलँडमधील विनयार्ड मीटिंग्स, लक्झरी ट्रेन जर्नीज्‌‍ आणि एक्सक्लुसिव्ह आयलंड इन्सेंटिव्हज्‌‍... यातला प्रत्येक अनुभव बिझनेस आणि लिझर यांचा परफेक्ट संगम घडवतो. टीम बाँडिंग, स्ट्रॅटजी मीट्स आणि अविस्मरणीय अनुभव याचं टोटल पॅकेज म्हणजे वीणा वर्ल्डच्या MICE टूर्स.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
12 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
12 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
12 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top