India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

ग्रेट वॉल ते ग्रेट झेप चायना ऐकण्यापेक्षा पाहण्याची गोष्ट!

11 mins. read
Veena Patil
Veena Patil
11 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

चीनने पर्यटनाला विकास धोरणाचा भाग बनवून जगभरातील पर्यटकांना टप्प्याटप्प्याने आकर्षित केलं आहे.

बीजिंग, शियान आणि शांघायसारखी शहरं इतिहास, भूगोल, संस्कृती आणि आधुनिक चीनचं उत्तम मिश्रण देतात.

भारतीय जेवणाची व्यवस्था, मुंबई ते मुंबई एक्स्पर्ट टूर मॅनेजर आणि दुभाषी लोकल गाईडमुळे प्रवासातील अडचणी कमी होतात.

चीनमध्ये जगातील सर्वात मोठं हाय स्पीड रेल्वे नेटवर्क आहे आणि अनेक बुलेट ट्रेन 350 किमी प्रतितास वेगाने धावतात.

मोबाईल पेमेंट खूप लोकप्रिय असल्याने अनेक ठिकाणी कॅशची गरज कमी पडते.

ग्रेट वॉल, फॉरबिडन सिटी, जायंट पांडा कॉन्झर्वेशन सेंटर आणि झुझियाजियाओ वॉटर टाऊनसारखी ठिकाणं चुकवू नका.

Published in Sakal Saptarang 5th July 2026

लाखमोलाचा ड्रॅगन

चायनाविषयी आम्हाला पर्यटक नेहमी विचारतात, “चायनामध्ये काय वाट्टेल ते खातात, मग आमचं कसं होणार? आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत.” तर काही जणांच्या मनात भाषेची अडचण असते. पण आर्थिकदृष्ट्या जगावर वर्चस्व प्रस्थापित करणारा हा देश पर्यटनाकडे दुर्लक्ष करेल का? उलट, गेल्या काही दशकांत चायनाने पर्यटनालाही आपल्या विकासाच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग बनवलं आहे. म्हणूनच आज जगभरातील पर्यटक मोठ्या उत्सुकतेने चायनाला भेट देत आहेत. चायना हा विविधतेने नटलेला, अवाढव्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरदृष्ट्या अत्यंत सक्षम देश आहे. मात्र परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन सुरू झालं ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात. त्याआधी चायनाने स्वतःला जगापासून बऱ्याच प्रमाणात बंदिस्त ठेवलं होतं. पण जगाबरोबर चालल्याशिवाय जगाच्या पुढे जाता येत नाही, हे त्यांनी वेळेत ओळखलं. मात्र दारं खुली करताना त्यांनी संपूर्ण देश एकाच वेळी पर्यटकांसाठी खुला केला नाही. जिथे इतिहास, भूगोल, संस्कृती आणि आधुनिक चायनाचं चित्र सर्वाधिक प्रभावीपणे दिसेल अशी बीजिंग, शियान आणि शांघायसारखी शहरं त्यांनी जागतिक दर्जाची विकसित केली. आजही ते टप्प्याटप्प्याने नवीन प्रदेश पर्यटनासाठी विकसित करीत आहेत. ही स्टेप-बाय-स्टेप रणनीती त्यांच्या यशाचं एक मोठं कारण ठरली आहे. चायनाला मी पहिल्यांदा गेले तेव्हा माझेही डोळे विस्फारले होते. अद्भुत वास्तुकला, ऐतिहासिक वारसा, अल्ट्रामॉडर्न शहरं, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरा यांचा इतका सुंदर संगम पाहायला मिळाला की वाटलं यांच्याकडून अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. पर्यटनाच्या बाबतीत चायनाची दूरदृष्टी अभ्यासण्यासारखी आहे. जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, स्वच्छता, वेगवान वाहतूक व्यवस्था, ऐतिहासिक वारशाचं जतन आणि पर्यटकांचा अनुभव समृद्ध करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिलाय. त्यामुळेच आज जगभरातून कोट्यवधी पर्यटक चायनाला भेट देतात. पर्यटन हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा व रोजगारनिर्मितीचाही महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.

जगभर फिरणारे चिनी पर्यटकही जागतिक पर्यटन उद्योगासाठी महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर स्वतःचा देशही जगासाठी आकर्षक बनवण्याचं काम चायनाने तितक्याच नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे. त्यामुळेच चायनाची पर्यटननीती आमच्यासाठीही अभ्यासाचा विषय राहिली आहे.

अशा या लाखमोलाच्या ड्रॅगनला तुम्हालाही भेट द्यायची असेल तर चला. चायनामध्ये जेवणाचे, भाषेचे प्रॉब्लेम्स असतील असं तुम्ही ऐकलं असेल, तरी काळजी करू नका. बहुतेक सर्वच ठिकाणी आम्ही भारतीय भोजनाची व्यवस्था केली आहे. सोबतीला मुंबई ते मुंबई एक्स्पर्ट टूर मॅनेजर आणि तिथला दुभाषी लोकल गाईडही असेल. सो नॉट टू वरी!

 

अरेच्चा!हे मला माहीतच नव्हतं!

  • चायनामध्ये जगातील सर्वात मोठे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क असून अनेक बुलेट ट्रेन्स 350 किमी प्रतितास वेगाने धावतात.
  • चायनामधील अनेक शहरांमध्ये मोबाईल पेमेंट इतके लोकप्रिय आहे की अनेकजण कॅश वापरतच नाहीत.
  • चायनामध्ये 50+ UNESCO हेरिटेज साइट्स आहेत.
  • काही चायनीज शहरांची लोकसंख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
  • चाँगचिंगच्या डोंगराळ भूभागामुळे इथल्या इमारतींचे वेगवेगळे मजले वेगवेगळ्या रस्त्यांवर उघडतात, त्यामुळे एखाद्या इमारतीतला ‌‘8वा मजला‌’ एखाद्या रस्त्यावर तळमजलाही असू शकतो!
  • फॉरबिडन सिटीमध्ये जवळपास 9000 खोल्या आहेत.
  • जगातील सर्वात मोठे जायंट पांडा कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर चेंगडूमध्ये आहे.
  • लिजियांगचं प्राचीन शहर कॅनल्स आणि दगडी रस्त्यांच्या जाळ्यामुळे ‌‘पूर्वेचं व्हेनिस‌’ म्हणूनही ओळखलं जातं.
  • वर्षभर आल्हाददायक हवामानामुळे कुनमिंगला ‌‘सिटी ऑफ इटर्नल स्प्रिंग‌’ म्हटलं जातं.
  • जगप्रसिद्ध ‌‘बबल टी‌’ चा जन्म तैवानमध्ये झाला.
  • कोरियामध्ये वय मोजण्याच्या पारंपरिक पद्धतीत जन्मतःच बाळाचं वय एक वर्ष मानलं जायचं.
  • साऊथ कोरिया जगातील सर्वात फास्ट इंटरनेट फॅसिलिटीजसाठी ओळखला जातो.

 

 

चायना पाहा वीणा वर्ल्डसोबत!

चायना म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ग्रेट वॉल, बुलेट ट्रेन आणि गगनचुंबी शहरं. पण चायनाची खरी मजा तेव्हा येते जेव्हा भाषा, प्रवास, व्हिसा आणि नियोजनाच्या चिंता बाजूला ठेवून तुम्ही फक्त अनुभव गोळा करता. म्हणूनच चायना वीणा वर्ल्डसोबत अनुभवणं ठरतं आणखी खास!

ग्रुप टूर्स: वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह चायना टूर्समध्ये या देशाची विविध रूपं अनुभवता येतात. ‌‘हायलाइट्स ऑफ चायना‌’ मध्ये शांघायमधील मॅगलेव्ह ट्रेन राईड, शांघाय टॉवर ऑब्झर्व्हेटरी, द बंड, झुझियाजियाओ वॉटर टाऊन, जेड बुद्ध टेम्पल आणि शांघाय सर्कस शोचा अनुभव घेता येतो. ‌‘बीजिंग‌’मध्ये टेम्पल ऑफ हेवन, तियानानमेन स्क्वेअर, फॉरबिडन सिटी, ग्रेट वॉल ऑफ चायना, समर पॅलेस आणि बीजिंग नॅशनल स्टेडियम पाहायला मिळतं. बेस्ट ऑफ चायना आणि सिनियर्स स्पेशल चायनामध्ये शांघाय, शियान आणि बीजिंग या तीन महत्त्वाच्या शहरांमधून चायनाचा इतिहास आणि आधुनिकता अनुभवता येते. शियानमधील टेराकोटा वॉरियर्स म्युझियम, बेल अँड ड्रम टॉवर्स आणि टँग डायनेस्टी शो चायनाच्या प्राचीन वारशाची ओळख करून देतात. बीजिंग बुलेट ट्रेनचा प्रवास ही या सहलीतील एक खास आठवण ठरते.

‌‘ऑल ऑफ चायना‌’ या विस्तृत सहलीत बीजिंग, शियान, चेंगडू, चाँगचिंग, झांगजियाजे, यीचांग आणि शांघाय अशा सात शहरांमधून चायनाचं संपूर्ण वैभव अनुभवता येतं. चेंगडूमधील पांडा बेस, चाँगचिंगमधील हाँगया केव्ह, झांगजियाजी नॅशनल फॉरेस्ट पार्क, तियानमेन माऊंटन, ग्लास स्कायवॉक, यांगत्से रिव्हर एरिया आणि शांघायची आधुनिक स्कायलाइन या प्रवासाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.

‌‘चायना एक्सप्लोरर‌’ टूरवर तुम्ही चायनातील नऊ शहरांना भेट देता. ‌‘3 गॉर्ज डॅम‌’ आणि ‌‘यांग त्झे रिव्हर क्रुझ‌’ यांसारखे अफलातून अनुभव तुम्ही या टूरवर घेऊ शकता. याशिवाय ‌‘चायना डिलाइट्स‌’ ही टूर तुम्हाला कुनमिंग, दाली,लिजियांग, शांग्री-ला या शहरांना भेट द्यायची संधी देते. टूर मॅनेजरसोबतच्या या सफरींमध्ये तुम्ही चायनाचे विविध पैलू अनुभवू शकता.

स्पेशालिटी टूर्स: प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी खास असावं, म्हणून वीणा वर्ल्डकडे चायनाच्या सुद्धा विविध स्पेशालिटी टूर्स उपलब्ध आहेत. वुमन्स स्पेशल चायनामध्ये शांघायमधील ओरिएंटल पर्ल टॉवर, शॉपिंग एक्सपिरियन्स, टँग डायनेस्टी शो, ग्रेट वॉल आणि ऐतिहासिक स्थळांचा आनंद घेता येतो. सिनियर्स स्पेशल चायनामध्ये थोडा शांतपणे चायना अनुभवण्याची संधी मिळते. अनुभवी टूर मॅनेजरची साथ आणि नीट नियोजित कार्यक्रमामुळे प्रवास अधिक सहज आणि आनंददायी बनतो.

कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍: तुम्हाला चायना तुमच्या पद्धतीने अनुभवायचा असेल, तर कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ हा उत्तम पर्याय आहे. शांघायमधील लक्झरी स्टे, बीजिंगमधील ऐतिहासिक परिसर, शियानमधील कल्चरल एक्सपिरियन्स, झांगजियाजीचे माऊंटन्स, चेंगडूमधील पांडा कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटरचा अनुभव किंवा यांगत्से नदी परिसरातील निवांत मुक्काम तुमच्या आवडीनुसार डिझाईन करून घेता येतो. कुटुंबासोबतचा प्रवास, मित्रांसोबतची सहल किंवा डीप कल्चरल एक्सपिरियन्स अशा पद्धतीने घेतलेला चायनाचा प्रत्येक अनुभव वेगळा असू शकतो.

कॉर्पोरेट ट्रॅव्हल MICE: तुमच्या ऑफिस टीमसाठी काहीतरी वेगळं प्लॅन करताय? शांघायची आधुनिक स्कायलाइन, बीजिंगची भव्यता, बुलेट ट्रेनचा अनुभव, सांस्कृतिक कार्यक्रम, नदीकाठावरील डिनर्स आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांमुळे चीन कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी एक वेगळा पर्याय ठरतो. व्यवसाय, आधुनिकता आणि हजारो वर्षांची संस्कृती यांचा अनोखा संगम म्हणजे चायनामधील MICE हॉलिडेज्‌‍.

तुम्हीही यातला तुमच्या मनासारखा पर्याय निवडा आणि चला चायनाला!

 

चायनीज टी, नूडल्स...

चायनामध्ये एकाच देशात अनेक खाद्यसंस्कृती नांदतात. सिचुआनची तिखट चव, कॅन्टोनीज पाककलेची नजाकत, बीजिंगची राजेशाही परंपरा आणि शांघायची आधुनिक खाद्यसंस्कृती प्रत्येक प्रवासाला वेगळी चव देते. त्यामुळे चायनाची सफर ही जितकी डोळ्यांना सुख देते तितकीच ती चवीनेही आपल्याला तृप्त करते. इथे गेल्यावर तुम्ही काय खाल?

डिमसम - बांबूच्या टोपल्यांमध्ये वाफवून तयार केले जाणारे छोटे पदार्थ. भाज्या, चीज, चिकन किंवा इतर सारणांनी भरलेले हे पदार्थ हलके, स्वादिष्ट असतात आणि चीनच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक मानले जातात.

हॉटपॉट - टेबलावर ठेवलेल्या उकळत्या सूपमध्ये भाज्या, नूडल्स आणि इतर पदार्थ शिजवत सर्वांनी एकत्र जेवण्याची ही अनोखी पद्धत आहे.

पेकिंग डक - ही बीजिंगची जगप्रसिद्ध डिश असून यात खुसखुशीत भाजलेले बदक, पातळ पॅनकेक्स, भाज्या असतात आणि हे खास सॉसबरोबर खाल्ले जाते.

टी कल्चर - ग्रीन टी, ऊलोंग टी आणि जास्मिन टी यांसारखे चहाचे विविध प्रकार चायनामध्ये आदरातिथ्याचा भाग मानले जातात. ट्रॅडिशनल टी हाऊसमध्ये विविध प्रकारच्या चिनी चहांचा सुगंध घेणे आणि तिथे चहा पिणे हा एक अनोखा अनुभव असतो.

स्ट्रीट फूड मार्केट्स - गजबजलेल्या नाईट मार्केट्समध्ये स्थानिक स्नॅक्स, डंपलिंग्स, ग्रिल्ड पदार्थ आणि स्वीट्स चाखत त्या शहराची खरी चव अनुभवता येते.

हाताने बनवलेले नूडल्स - अनेक ठिकाणी शेफ आपल्यासमोरच पीठापासून नूडल्स तयार करतात. हा प्रकार पाहणं आणि त्याचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच अनुभव असतो.

चायनातल्या प्रत्येक पदार्थामागे एक प्रदेश आहे, प्रत्येक चवीमागे एक परंपरा आहे आणि प्रत्येक जेवणामागे एक वेगळी कथा दडलेली आहे. मग तुम्ही कधी जाताय या कथा ऐकायला?

 

वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

चायनाच्या प्रत्येक टूरच्या सुरुवातीला काही जणांच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते तर काहींच्या मनात प्रश्न असतात. तेव्हा मला जाणवतं की मी फक्त टूर मॅनेजर नाही, तर या नव्या देशाशी तुमची ओळख करून देणारा तुमचा साथीदार आहे. पहिल्यांदा ग्रेट वॉलसमोर उभं राहिलेल्या प्रवाशांपैकी काही जण भारावून जातात तर काही जण फक्त त्या भव्यतेकडे पाहत शांत उभे राहतात. त्या क्षणी मी तुमच्याकडे पाहत असतो. कारण काही अनुभव शब्दांत मांडता येत नाहीत. चायनामध्ये भाषा अनेकदा अडथळा बनते. रेस्टॉरंटमधील मेन्यू असो, रेल्वे स्टेशन किंवा स्थानिकांशी संवाद, अशा प्रत्येक वेळी मी तुमच्यासोबत असतो. मला इथे सर्वात जास्त आश्चर्य वाटतं ते शिस्तीचं आणि वेगाचं. बुलेट ट्रेन, गजबजलेली शहरं आणि अचूक नियोजन पाहून अनेक प्रवासी भारावून जातात. प्रवासाच्या शेवटी जेव्हा एखादा प्रवासी म्हणतो, “चायनाबद्दलचे सगळे गैरसमज इथे आल्यावर दूर झाले”, तेव्हा मला वाटतं की मी तुम्हाला फक्त एक देश दाखवला नाही, तर एका नव्या जगाशी तुमची ओळख करून दिली.

 

साऊथ कोरिया परंपरा आणि पॉप संस्कृतीचा संगम

साऊथ कोरिया हा परंपरा आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुंदर मिलाफ आहे. सोल हे साऊथ कोरियाचं राजकीय, सांस्कृतिक आणि आधुनिक चेहरा असलेलं शहर आहे. या शहरात प्राचीन राजवाडे, आधुनिक रस्ते, कॅफे संस्कृती आणि के-पॉपचा प्रभाव एकाच वेळी अनुभवायला मिळतो. ‌‘सोल टॉवर ऑब्झर्व्हेटरी‌’ शहराचं विहंगम दृश्य दाखवते. ग्योंगबोकगुंग पॅलेस आणि नॅशनल फोकलोर म्युझियम कोरियाचा सांस्कृतिक वारसा सांगतात, तर म्योंगडोंग मार्केट हे कोरियन फॅशन, सौंदर्यप्रसाधने, स्ट्रीट फूड आणि स्थानिक संस्कृती अनुभवण्याचं लोकप्रिय ठिकाण आहे. नामी आयलंड आणि गार्डन ऑफ मॉर्निंग कॅल्म निसर्गप्रेमींना शांततेचा अनुभव देतात. कोरियन डीएमझेड आणि पीस गोंडोला राईडमधून नॉर्थ आणि साऊथ कोरियाच्या इतिहासाची आणि भू-राजकीय वास्तवाची झलक पाहायला मिळते. कोरिया हा फक्त के-ड्रामा किंवा के-पॉपचा देश नाही, तो परंपरा, शिस्त, निसर्ग आणि आधुनिक जीवनशैली यांचा समतोल साधणारा देश आहे. इथे प्रत्येक दिवस नवीन अनुभव, नवीन संस्कृती आणि नव्या आठवणी घेऊन येतो.

 

तैवान निसर्ग, संस्कृती आणि शहरांची रंगत

तैवान हा आकाराने लहान असला तरी अनुभवांनी समृद्ध देश आहे. तैपेईची आधुनिक ओळख, जुन्या गावांचं आकर्षण, तलावांचं सौंदर्य आणि गजबजलेली नाईट मार्केट्स यामुळे तैवानचा प्रवास अत्यंत वैविध्यपूर्ण ठरतो. तैपेई 101 ऑब्झर्व्हेटरीवरून दिसणारं शहर, च्यांग काई शेक मेमोरियल आणि नॅशनल पॅलेस म्युझियम तैवानच्या इतिहास आणि आधुनिकतेची ओळख करून देतात. सन मून लेक क्रूझ, रोपवे राईड आणि वेन वू मंदिर तैवानच्या नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून देतात. जिऊफेन व्हिलेजच्या जुन्या गल्ल््या, येहलिऊ जिओपार्कची अनोखी भूशिल्पं आणि शिफेन वॉटरफॉल या ठिकाणी निसर्ग आणि संस्कृतीची सुंदर सांगड घातलेली दिसते. ताइचुंगचे प्रसिद्ध आकर्षण असलेले, हुआंग युंग-फू नावाच्या निवृत्त सैनिकाने तयार केलेले, रेनबो व्हिलेज हे रंगीबेरंगी भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे तर फेंगजिया नाईट मार्केट, स्थानिक संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा अनुभव देते. नाईट मार्केट्स, स्थानिक खाद्यसंस्कृती, पर्वतरांगा, पारंपरिक गावं आणि आधुनिक शहरं या साऱ्यांमुळे तैवान हा या प्रवासातील सर्वात बहुरंगी अनुभव ठरतो.

 

आयुष्यात एकदा तरी... हे करायचंय!

  • ग्रेट वॉलवर उभं राहून क्षितिजापर्यंत पसरलेली भिंत पाहायचीय.
  • शांघायच्या स्कायलाइनकडे रात्रीच्या प्रकाशात पाहत 'द बंड'वर फेरफटका मारायचाय.
  • चायनाच्या बुलेट ट्रेनचा वेग स्वतः अनुभवायचाय.
  • फॉरबिडन सिटीच्या राजवाड्यांमधून इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायच्या आहेत.
  • तैवानच्या नाईट मार्केटमध्ये स्थानिक चवींचा आस्वाद घ्यायचाय.
  • तैपेई 101 ऑब्झर्व्हेटरीवरून संपूर्ण शहर पाहायचंय.
  • लाल कंदिलांनी सजलेल्या जुन्या तैवानी गल्लीबोळांमध्ये भटकायचंय.
  • कोरियातील राजवाड्यांमध्ये पारंपरिक हॅनबोक परिधान करून फोटो काढायचेत.
  • सोलच्या रस्त्यांवर रात्रीची चैतन्यपूर्ण संस्कृती अनुभवायची आहे.
  • कोरियामध्ये चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचंय.
  • ‌‘रूफ ऑफ द वर्ल्ड‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ल्हासा शहराला भेट द्यायचीय.
  • यांग त्से रिव्हर क्रूझमधून थ्री गॉर्जेसचं सौंदर्य अनुभवायचंय.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल - आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.
11 mins, read

वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल - आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.

Published in Sakal Saptrang 30th August 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश्न खू

माझा पहिला तास
11 mins, read

माझा पहिला तास

Published in Maharashtra Times 30th August 2026 ...लेहसारख्या ठिकाणाचं निसर्गदृश्य इतकं भव्य आणि प्रभावी असतं की सुरुवातीपासून तुमच्या अवतीभवती असलेले ते उत्तुंग पहाडच तुमच्या टूरचा सूर सेट करतात.

प्रवास सुवर्णमार्गाचा
11 mins, read

प्रवास सुवर्णमार्गाचा

Published in Loksatta Lokrang 30th August 2026 ...एका सुंदर पहाटे मी त्या कमळाच्या आकाराच्या भव्य शिल्पासमोर उभी होते. त्या भव्यतेसमोर मी इवलीशी दिसत होते...   रोज रात्री झोपताना पुस्

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!