India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

आयुष्याच्या सुवर्णकाळाचा उत्सव!

11 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
11 Mins Read
May 11, 2026
May 11, 2026

Quick Summary

78 वर्षांच्या आईने अंटार्क्टिकाच्या बर्फाळ पाण्यात पोलर प्लंज करून वयाची व्याख्याच बदलली.

वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल टूर्समध्ये अनुभवी टूर मॅनेजर आणि काळजीवाहू साथ मिळते, त्यामुळे प्रवास सुरक्षित वाटतो.

ज्येष्ठांसाठी विचारपूर्वक आखलेलं साईटसीईंग, आरामदायी स्टेज आणि सहज अनुभव हे या सहलींचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

काश्मीर, केरळ, राजस्थान, नेपाळ, भूतान, मॉरिशस आणि युरोपसह अनेक ठिकाणांसाठी सिनियर्स स्पेशल टूर्स उपलब्ध आहेत.

समान आवडीनिवडी असलेले सहप्रवासी मिळाल्याने अनोळखी लोकही मित्र होतात आणि आयुष्यभराच्या आठवणी तयार होतात.

सिंगल ट्रॅव्हलर्ससाठी गॅरंटीड पार्टनर्ससारखे पर्याय असल्याने एकट्यानेही आत्मविश्वासाने प्रवास करता येतो.

Published in Sakal Saptarang on 10th May, 2026

आता नाही तर मग कधी?

आपण नेमके कधी 'सिनियर' होतो? लहानपणी सात-आठ वर्षांचे असताना सोळा वर्षं म्हणजे मोठं असं वाटायचं. सोळाव्या वर्षी तीस वर्षाचे झालो म्हणजे खूप मोठे होऊ असं वाटायचं आणि तिसाव्या वर्षी पन्नास वय गाठलं की सगळं संथ होईल असं वाटायचं. पण आज पन्नाशी ओलांडल्यानंतर मला उलट जास्त ऊर्जा जाणवत्ये. जास्त कुतूहल, जास्त उत्साह आणि जग पाहण्याची अजून तीव्र इच्छा होत्ये. पण वय ही कोणत्याही गोष्टीसाठी मर्यादा नसते, अडथळा नसतो हा विचार मी करायला लागले तो माझ्या 78 वर्षांच्या आईमुळे. ती काही महिन्यांपूर्वी अंटार्क्टिकाला जाऊन आली. प्रवासापूर्वी तिच्या मनात अनेक प्रश्न होते. इतक्या थंडीत निभावेल का? समुद्रात तब्येत बिघडली तर? हिअरिंग एड सांभाळता येईल का? ... तिच्या सगळ्या शंका अगदी स्वाभाविक होत्या. पण त्या सगळ्यापलीकडे एक शांत, सुंदर उत्सुकताही होती. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे या प्रवासात ती एकटी नव्हती. सहप्रवासी आणि प्रत्येक गोष्ट नीट सांभाळणाऱ्या अनुभवी टूर मॅनेजरच्या सोबतीने, वीणा वर्ल्डच्या सोबतीने ती निघाली होती.

अंटार्क्टिकाला जायला निघणं ही तर केवळ सुरुवात होती, पण पुढे जे घडलं, ते माझ्यासाठी सुद्धा प्रेरणादायी होतं. तिने केवळ प्रवास केला नाही, तर प्रत्येक क्षण मनापासून जगला. नवीन लोकांशी मैत्री केली, गप्पाटप्पा, खेळ, आणि टूर मॅनेजरने बनवलेल्या मजेदार ट्रॅव्हल रील्समध्ये ती आनंदाने सहभागी झाली. पण त्या सगळ्यातला सर्वात खास क्षण कोणता होता माहितीये? वयाच्या 78 व्या वर्षी तिने अंटार्क्टिकाच्या बर्फाळ पाण्यात उडी घेतली! पोलर प्लंज... तो क्षण पाहताना माझ्या मनात अभिमान दाटून आला आणि ‌‘वय‌’ या संकल्पनेची व्याख्याच बदलून गेली. आजही ती तितक्याच उत्साहाने जगते. आठवड्यातून तीन वेळा ट्रेनरसोबत वर्कआऊट करते. तिच्या मते, वय वाढणं म्हणजे थांबणं नाही, तर कसं जगायचं हे स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे.

याच भावनेतून वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल टूर्स आखल्या जातात. समान आवडीनिवडी असलेले सहप्रवासी आणि प्रत्येक क्षणी सोबत असणारा काळजीवाहू टूर मॅनेजर यांच्यामुळे प्रवास सहज, सुरक्षित आणि आनंददायी होतो. या टूर्स म्हणजे दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर येऊन, स्वतःसाठी काही क्षण जगण्याची एक सुंदर जागा असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सेकंड इनिंग हा टप्पा सर्वात खास असतो. कारण आता आपल्याला वेळ असतो स्वतःसाठी, जिथे जावंसं वाटतं तिथे जाण्यासाठी आणि जे पाहावंसं वाटतं ते पाहण्यासाठी. या टप्प्यावर नवीन माणसं भेटतात आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी निर्माण होतात. तेव्हा प्रश्न एकच आहे, 'आता नाही तर मग कधी?' आणि हो, तुमच्या प्रवासस्वप्नांना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी, विश्वासू साथ आहेच की आणि त्या सोबतीचं नाव आहे 'वीणा वर्ल्ड'.

वीणा वर्ल्ड आणि सिनियर्स स्पेशल

वीणा वर्ल्डची सिनियर्स स्पेशल टूर म्हणजे ज्येष्ठांची श्रेष्ठ सहल. या सहली म्हणजे आनंददायी, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास अनुभव. आज या सहलींच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ मंडळी निर्धास्तपणे जगभरात पर्यटन करताहेत. या टूर्सचं वैशिष्ट्य म्हणजे विचारपूर्वक आखलेलं साईटसीईंग, आरामदायी स्टेज्‌‍ आणि प्रत्येक क्षणी सोबत करणारे अनुभवी टूर मॅनेजर्स. भारतापासून जगापर्यंत वीणा वर्ल्डकडे ज्येष्ठांसाठी खास तयार केलेले विविध पर्याय आहेत. काश्मीरची निसर्गरम्यता, केरळची शांतता, राजस्थानची राजेशाही शान, ईशान्य भारताची हिरवाईने नटलेली सृष्टी, नेपाळची भव्य ओळख, भूतानचं साधेपणातील सौंदर्य, मॉरिशसची निळीशार किनारपट्टी आणि युरोपचं देखणं वैविध्य यांचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर अशा विविध ठिकाणांसाठी आपल्याकडे सिनियर्स स्पेशल टूर्स उपलब्ध आहेत आणि त्यातलं प्रत्येक ठिकाण आपल्याला नव्या आठवणी देण्यासाठी सज्ज आहे. शिवाय या टूर्सची खासियत म्हणजे सहप्रवाशांची सुंदर साथ. अनेकदा या प्रवासात अनोळखी लोकही मित्र होतात, आणि सहल संपेपर्यंत तुमच्या कुटुंबापलीकडचं एक नवीन कुटुंब तयार होतं. सिंगल ट्रॅव्हलर्ससाठी गॅरंटीड पार्टनर्ससारखे पर्यायही उपलब्ध असल्याने एकट्यानेही आत्मविश्वासाने प्रवास करता येतो. आणि हो, हा प्रवास फक्त फिरण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक दिवस सणासारखा साजरा होतो. म्युझिकवर थिरकणं, धमाल गेम्स खेळणं, मजेशीर फॅशन शोमध्ये सहभागी होणं, कधी ट्विनिंग करून एकसारखे कपडे घालणं, तर कधी मिसमॅच करून हटके स्टाईल दाखवणं... या टूरवरच्या गोष्टी म्हणजे तरुणांसारखं मनमुराद जगण्याची संधी! आणि मग हा प्रवास फक्त डेस्टिनेशन्सपुरता मर्यादित राहत नाही. या प्रवासात आपल्याला आनंदाची लागण होते, उत्साहाचं भरतं येतं आणि जीवन जगण्याची नवी उर्मी मिळते. वीणा वर्ल्डकडे सिनियर्स स्पेशल टूर्सचे 6 दिवसांच्या टूर्सपासून 17 दिवसांच्या टूर्सपर्यंतचे 19 ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत. त्यातून तुम्हाला हवी असलेली टूर निवडा आणि आजच बुक करा. ही टूर बुक करणंही अतिशय सोपं आहे. तुम्ही जवळच्या वीणा वर्ल्ड ऑफिसला भेट देऊन ऑफलाइन बुकिंग करा किंवा घरबसल्या वीणा वर्ल्डच्या अधिकृत वेबसाईटवरून आपल्या आवडत्या टूरची निवड करून काही क्लिकमध्ये ऑनलाईन बुकिंग करा. तुमच्या सोयीप्रमाणे पर्याय निवडा आणि तुमच्या प्रवासाची सुरुवात करा.

तुम्ही किती यंग आहात?

या मजेशीर क्विझमधून तुमचा ‌‘गोल्डन एज पर्सनॅलिटी टाईप‌’ जाणून घ्या!

  1. सकाळी उठल्यावर तुमचा पहिला विचार काय असतो?
  2. आज कुठे फिरायला जाऊ? B. माझा चहा आणि माझा पेपर कुठेय?
  3. मोबाईलमध्ये फॅमिली फोटोज्‌‍ पाहूया D. अजून 10 मिनिटं झोपूया
  4. तुमच्यासाठी परफेक्ट सुट्टी म्हणजे?
  5. युरोप टूर / क्रुझ B. निसर्गाच्या सान्निध्यातील शांत रिसॉर्ट
  6. नातवंडांसोबत फन व्हेकेशन D. तीर्थयात्रा आणि निवांत वेळ
  7. मोबाईल वापरताना तुम्ही...
  8. गूगल मॅप्स, रील्स, बुकिंग्ज हे सगळं करता. B. व्हॉटस्‌‍ॲप आणि कॉल्सपुरता तो वापरता.
  9. फोटो काढता, व्हॉटसॲप वापरता, पण बाकी मुलांना विचारता. D. अजून शिकताय!
  10. तुमच्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न?
  11. हॉट एअर बलून राईडB. काश्मीर किंवा स्वित्झर्लंड ट्रिप
  12. स्वतःचा छंद नव्याने जोपासणं.D. फॅमिली मेंबर्ससोबत री-युनियन
  13. अचानक एखादा वीकेंड मोकळा मिळतो तेव्हा?
  14. बॅग भरून बाहेर पडतो. B. लाँग ड्राइव्हला जातो.
  15. सगळ्यांना घरी बोलवतो. D. आराम + चित्रपट.
  16. लोक तुमचं वर्णन कसं करतात?
  17. फुल्ल एनर्जेटिक B. शांत पण क्लासी.
  18. सगळ्यांना जोडून ठेवणारी व्यक्ती. D. मजेशीर आणि पॉझिटिव्ह
  19. तुम्हाला कोणती नवीन गोष्ट शिकायचीय?
  20. झुम्बा डान्स B. फोटोग्राफी C. कुकिंग बेकिंग D. योगा - मेडिटेशन
  21. तुमचा फेव्हरिट कोट कोणता?
  22. एज इज जस्ट अ नंबर B. स्लो अँड ब्युटिफुल लाईफ C. फॅमिली फर्स्ट  D. पिक्चर अभी बाकी है!

A B C D मध्ये काय जास्त आलंय त्यावरून तुमची पर्सनॅलिटी:

  1. ॲडव्हेंचर आयकॉन - तुमच्यातला एक्सप्लोरर अजूनही जिवंत आहे. ट्रॅव्हल, थ्रिल, ॲडव्हेंचर तुमच्यासाठीच आहे.
  2. रॉयल रिलॅक्सर - तुम्हाला क्वालिटी लाईफ आवडतं. तुमच्यासाठी फिरणं म्हणजे सुंदर ठिकाणं, निवांत मोमेंट्स आणि एलिगन्स.
  3. फॅमिली रॉकस्टार - तुमचं खरं सुख म्हणजे आपली माणसं. तुम्ही घराचा केंद्रबिंदू आहात.
  4. फॉरेव्हर यंग - तुमच्यात अजूनही तरुणाईचा स्पार्क आहे. मजा, हास्य आणि पॉझिटिव्हिटी ही तुमची ताकद आहे.

 

जिंदगी 2.O

इतकी वर्षं कशी गेली कळलंच नाही. नोकरी, संसार, मुलांचं भविष्य, इतर जबाबदाऱ्याहे सारं पाहताना ‌‘आम्ही‌’ थोडेसे मागेच राहिलो. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ

आलीये. दुसरी इनिंग चालू झालीये. आता कसली घाई नाही, पण म्हणून थांबायचं

सुद्धा नाहीये. प्रत्येक दिवस मनमुरादपणे जगायचाय. स्वतःसाठी वेळ काढायचाय.

कधी प्रवास करायचाय, कधी एखादा नवीन छंद जोपासायचाय, कधी जोडीदारासोबत निवांत जगायचंय, तर कधी नातवंडांसोबत धमाल करायचीय.

रोज नवीन स्वप्नं पाहायचीयेत आणि ती पूर्ण सुद्धा करायचीयेत.

आयुष्य नव्याने जगायचंय. स्वतःला नव्याने शोधयचंय.

आणि या प्रवासातील माझा सोबती आहे

वीणा वर्ल्ड!

 

युअर कम्फर्ट. युअर चॉइस

अर्थात वीणा वर्ल्ड सिनियर्स कस्टमाईज्ड हॉलिडेज.

प्रवासाची ओढ आहे, पण तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या सोयीच्या वेगाने प्रवास करायचाय? तर मग वीणा वर्ल्डकडे आहेत खास सिनियर्स कस्टमाईज्ड हॉलिडेज. इथे ठरलेलं शेड्यूल नाही, ग्रुप टूरची ठरावीक आयटिनरी नाही. तुम्हीच ठरवा डेस्टिनेशन्स, किती दिवस राहायचं, कोणत्या हॉटेलमध्ये थांबायचं, काय पाहायचं आणि किती निवांतपणे फिरायचं. बाकी संपूर्ण नियोजन आमचं. वीणा वर्ल्डकडे तुमच्यासाठी सिटी सेंटर किंवा 3 स्टार हॉटेल्सपासून ते पॅलेसेसपर्यंतचे अकोमोडेशनचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हवा असेल तर टूर मॅनेजर सुद्धा असेल तुमच्या दिमतीला. अदरवाइज आमची कस्टमाईज्ड हॉलिडेजची टीम 24 x 7 व्हर्च्युअली तुम्हाला उपलब्ध असतेच. तुम्हाला शांत निसर्गात काही दिवस विसावायचं असो, धार्मिक स्थळांना भेट द्यायची असो, कुटुंबासोबत खास फॅमिली हॉलिडेवर जायचं असो किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या ड्रीम डेस्टिनेशनला भेट द्यायची असो. वीणा वर्ल्ड सोबतचा प्रायव्हेट हॉलिडे हा तुमच्या कम्फर्ट आणि चॉइसनुसार आखला जातो. शिवाय तुम्ही तुमचा साठावा वाढदिवस, लग्नाचा 50 वा वाढदिवस यांसारखे तुमच्या आयुष्यातले खास क्षणसुद्धा वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडेजसोबत सेलिब्रेट करू शकता. आमच्या प्रायव्हेट हॉलिडेजमध्ये तुम्ही तुमची प्रायव्हसी जपत शोफर्ड ड्रिव्हन कारने प्रवास करता. व्हीलचेअर असिस्टन्स, आरामदायी हॉटेल्स, कमी चालावं लागेल अशा रीतीने थॉटफुली प्लॅन केलेलं साईटसीइंग, सोयीस्कर फ्लाईट्स, मील प्रेफरन्सेस आणि प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात जाऊन मनापासून घेतलेली काळजी... यामुळे तुमचा प्रवास होतो पूर्णपणे निर्धास्त. कपल असाल, फॅमिलीसोबत जाणार असाल किंवा जिवलग मित्रांसोबत चालला असाल... तरीही ही सुट्टी ठरेल तुमच्या स्टाईलने प्लॅन केलेला, तुमच्या आनंदाचा एक गेटअवे.

तेव्हा आजच बुक करा ‌‘वीणा वर्ल्ड सिनियर्स कस्टमाईज्डहॉलिडेज‌’ आणि एका सुंदर प्रवासाचे

साक्षीदार व्हा.

गोल्डन बॉन्डस्‌‍ दोन पिढ्या, एक गोड नातं, असंख्य आनंदी आठवणी...

आजच्या धावपळीच्या जगात आजी-आजोबा आणि नातवंडं बऱ्याचदा कोसो दूर राहत असतात. त्यांचे व्हिडियो कॉल्स होतातही, पण त्या खास क्षणांची कमतरता जाणवतेच. आजीच्या गोष्टी, आजोबांचे जोक्स किंवा फक्त एक घट्ट मिठी.. हे सगळं मिस करतो आपण. म्हणूनच ह्या दोन पिढ्यांना एकत्र आणणारा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स म्हणजे ‌‘गोल्डन बॉन्डस्‌‍‌’. इथे 'नो एन्ट्री टू पेरेंट्स.‌’ फक्त प्रेमळ आजी आजोबा आणि त्यांची लाडकी नातवंडं भेटतील एका छानशा ठिकाणी वीणा वर्ल्डच्या ‌‘गोल्डन बॉन्डस्‌‍ टूर‌’वर- जिथे असेल या गोड नात्याचं, आनंदी आठवणी निर्माण करणारं एक धम्माल सेलिब्रेशन. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना जग दिलंत, आता त्यांना अजून एक गोष्ट द्या, ती म्हणजे तुमच्या आईवडिलांचं निर्व्याज प्रेम. कारण गॅजेट्स त्यांना ऑनलाईन जोडतीलही, पण ही टूर त्यांना आयुष्यभरासाठी जोडेल.

माझी प्रवासस्वप्नं

स्वप्नांना वय नसतं आणि म्हणूनच ती पूर्ण करण्याची वेळही कधीच संपत नाही. मी ठरवलंय की पुढच्या 5 वर्षांत 10 नवीन ठिकाणं पाहायची आणि 10 वर्षांत 25 नवीन देश पाहायचे. कधी रिव्हर क्रुझवर एखादी निवांत संध्याकाळ घालवायची, तर कधी सोलो ट्रिप करून स्वतःलाच नव्यानं भेटायचं. कधी आफ्रिकन सफारीला जाऊन वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची, तर कधी पॅराग्लायडिंग किंवा झिपलाईन सारखं ॲडव्हेंचर करून पाहायचं. कधी चेरी ब्लॉसम किंवा ट्युलिप सीझन पाहायला जायचं, तर कधी नॉर्दर्न लाईट्स प्रत्यक्ष पाहायचे. असं वाटतंय, आत्ता तर कुठे आयुष्य सुरू झालंय आणि मला ते रसरसून जगायचंय.

उंची पर्वतांची... धडधड मनाची!

वय वाढलं म्हणून जगण्यातलं थ्रिल कमी व्हायला हवं, असं कुठे लिहिलंय? आजचे सिनियर ट्रॅव्हलर्स सिद्ध करताहेत की ॲडव्हेंचरला एज लिमिट नसतं. उत्साह असेल, तर प्रत्येक प्रवासात ‌‘वाह!‌’ म्हणायला लावणारे क्षण दडलेले असतात. लडाखमध्ये आकाशाला भिडणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करताना ढग जणू हाताशी येतात. काश्मीरमध्ये गुलमर्गची गंडोला राईड घेताना बर्फाच्छादित शिखरं डोळ्यांसमोर येतात. युरोपमध्ये माऊंट टिटलीसच्या उंचीवर पोहोचून बर्फाचा रोमांच अनुभवता येतो, तर लंडन आय मधून संपूर्ण साहेबी शहर पाहता येतं. स्पेनमध्ये फ्लेमेंकोचा जोश अनुभवता येतो, ग्रीसमध्ये निळ्याशार समुद्राची पार्श्वभूमी असलेल्या क्लीफ टॉप व्हिलेजेसमध्ये जाता येतं. स्वित्झर्लंडमधील सिनिक ट्रेन जर्नी मन हरखून टाकते. हॉट एअर बलून मधून आकाशात तरंगण्याचा जादुई अनुभव घेता येतो. दुबईमध्ये डेझर्ट सफारीचं थ्रिल, सिंगापूर फ्लायरमधून शहराचा विहंगम नजारा, नॉर्वे क्रुझमध्ये फ्योर्ड्सचं अद्भुत सौंदर्य, इजिप्तमध्ये इतिहासाच्या साक्षीने केलेला थरारक प्रवास... हे आणि असे असंख्य रोमांचक अनुभव आजचे सिनियर्स घेऊ शकतात. आणि यातला प्रत्येक थरारक क्षण सुरक्षित, आरामदायी, निर्धास्त आणि अविस्मरणीय बनतो वीणा वर्ल्ड सोबत! मग वाट कसली बघताय?

वीणा वर्ल्ड गिफ्ट कार्ड - एक खास भेट!

कल्पना करा... तुमचे आई-बाबा, स्वित्झर्लंडला बर्फात दे धम्माल करताहेत... केरळला चहाच्या मळ्यात रील शूट करताहेत... अमेरिकेत नायगारा फॉल्स डोळ्यात सामावून घेताहेत... जपानला बुलेट ट्रेनमध्ये वेगाशी दोन हात करताहेत... दुबईच्या डेझर्टमध्ये फोर व्हील ड्राईव्ह घेताहेत... ऑस्ट्रेलियाला ऑपेरा हाऊससमोर सेल्फी काढताहेत... राजस्थानला पिचोला लेक मध्ये बोटिंग करताहेत... स्कँडिनेव्हियाचं नैसर्गिक सौंदर्य डोळ्यांत सामावून घेताहेत... आफ्रिकेत केप टाऊनला हेलिकॉप्टर राईड घेत आयुष्याकडे नव्या नजरेने पाहताहेत... आयुष्यभर ज्यांनी तुम्हाला खूप काही दिलं त्यांना आता द्या आनंद आणि अनोख्या आठवणींची भेट. पाठवा त्यांना बिनधास्त, वीणा वर्ल्डसोबत!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
11 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
11 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
11 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!