India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

वर्ल्ड ऑन व्हील्स

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
April 12, 2019
April 12, 2019

Quick Summary

ट्रेनच्या सायलंट कंपार्टमेंटमध्ये चुकून शिरलात तर जोरात बोलणे आणि फोन वापरणे टाळा.

जपानमध्ये पाच मिनिटांचा उशीरही गंभीर मानला जातो, त्यामुळे वेळेचे पालन करा आणि गरज पडल्यास माफीची अपेक्षा ठेवा.

शिंकानसेनमध्ये सीटची दिशा बदलता येते, त्यामुळे ग्रुपसोबत गप्पा मारण्यासाठी दोन सीट्सची दिशा बदलून बघा.

शांघाय मागलेवसारख्या मॅग्नेटिक ट्रेनने टॅक्सी टाळून शहरात जलद पोहोचता येते, त्यामुळे ट्रॅफिकचा ताण कमी होतो.

ट्रेन प्रवासाची खरी मजा खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांमध्ये आहे, म्हणून स्विस सीनिक ट्रेनसारखा निसर्ग-केंद्रित रूट निवडा.

स्विस आल्प्समध्ये वयाची मर्यादा नसते, त्यामुळे बाळांपासून सीनियर्सपर्यंत पॅनोरॅमिक अनुभवासाठी ट्रेन निवडा.

ट्रेनमध्ये स्मोकिंगवर बंदी आहे हे माहिती होते पण बोलण्यावरसुद्धा, हे ऐकून मी चकित झाले. न बोलता प्रवास करणे तर मला झेपणारच नव्हते. तेवढ्यात तिने त्या ट्रेन कंपार्टमेंटवरची खूण दाखवली. मी चुकून सायलंट कंपार्टमेंटमध्ये शिरले होते. इथे जोरात बोलण्यास व फोन वापरण्यास बंदी होती. तरीच हे कंपार्टमेंट एवढे रिकामे आहे ह्यामागचं गमक मला उलगडलं. तिथली शांतता असहाय्य झाली अनं मी माझा गाशा गुंडाळत दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये गेले आणि परत काम सुरू केले.

जर ट्रेनचा विचार करताच आपल्या मनात उशीर होणारच अशी भावना येत असेल तर त्यात काहीच वावगे नाही. कारण ट्रेन ह्या शब्दाचा अर्थच मुळी टू डीले आहे. लॅटिन व फ्रेंच भाषेतून इंग्रजीत एकरूप झालेल्या ट्रेन या शब्दाचा अर्थ आहे खेचणे किंवा ड्रॅग करणे अर्थात ओढणे. सुरुवातीच्या काळात एखाद्या पायभर लांब असलेल्या रॉयल ड्रेसिंग गाऊनच्या मागच्या भागाला ट्रेन म्हणायचे, ज्यावरुन काळाच्या ओघात एखाद्याला खेचून नेणार्‍या वाहनाचे नाव ट्रेन पडले. ट्रेन या शब्दाचे मूळच जेव्हा खेचणे, ड्रॅग करणे किंवा डीले होणे असेल तर एखादी ट्रेन थोडी उशिरा आली तरी काय बिघडते, नाही का!  जगभरात आज बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या स्पीडने अनेक प्रकारच्या ट्रेन्स धावत आहेत. ह्याच ट्रेन्स काही ठिकाणी मुख्यतः शहरांमध्ये लोकांना आपल्या रोजी-रोटीसाठी वाहतूकीचे साधन ठरतात तर निसर्गसौंदर्यांनी भरलेल्या डोंगरदर्‍यातून निसर्गचित्र दाखवत जाताना त्याच ट्रेन्स अविस्मरणीय हॉलिडेज्ही घडवून देतात.

ट्रेन या शब्दाचा अर्थ जरी डीले असला तरी काही देशांमध्ये ट्रेन एका मिनिटानी जरी उशिरा पोहोचली तर ती गंभीर चूक समजली जाते. जपानमधील रेल्वेज् ह्या जगातल्या सर्वात पंक्चुअल रेल्वेज् समजल्या जातात. इथे ट्रेनला जर चुकूनही पाच मिनिटांचा उशीर झाला तर तिकीट चेकर जाहीर माफी मागतो. आणि रेल्वे कंपनी लोकांना एक डीले सर्टीफिकेट सुद्धा प्रदान करते. कधी ट्रेनला एक तासभर जास्त उशिर झाला तर चक्क वृत्तपत्रात ही बातमी छापून येते. जपानी रेल्वेज् आणि त्यांच्या सुपर-फास्ट बुलेट ट्रेन किंवा शिंकानसेन ह्या स्वतःतच स्थलदर्शनाचे आकर्षण ठरतात व जपानला जाऊन एकदा तरी शिंकानसेन मधनं प्रवास करणे हे कुठल्याही हॉलिडेचा अविभाज्य भाग बनते. १९४० मध्ये जेव्हा ह्या ट्रेन्स बनत होत्या तेव्हा त्या प्रोजेक्टचे जपानी नाव होते डंगन रेशा ज्याचा इंग्रजीत अनुवाद होतो बुलेट ट्रेन. एखाद्या बुलेटच्या वेगाने धावणार्‍या या  शिंकानसेनला जगभर आज बुलेट ट्रेन म्हणूनच ओळखले जाते. ३२० कि.मी ताशी वेगाने धावणार्‍या या ट्रेनला दुसरे कुठलेच नाव शोभणार नाही, हे तेव्हढंच खरं. जपानी शिंकानसेनने प्रवास केला तेव्हा त्या ट्रेनच्या वेगाने तर मी प्रभावित झालेच पण मला सर्वात जास्त भावून गेले ते म्हणजे या ट्रेनमधल्या सीटची दिशा आपण सवडीप्रमाणे बदलू शकतो ती गोष्ट. ट्रेनचा प्रवास सुरू होण्याआधी ह्या सर्व सीट्स ट्रेनच्या प्रवासाच्या दिशेने लावलेल्या होत्या. पण आम्ही एका ग्रुपमध्ये चौघे असल्याने एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी दोन सीट्सची दिशा बदलून एकमेकांशी बोलत मस्त प्रवास केला. लोकांच्या सोयीसाठी केलेला हा विचार मला फारच आवडला. त्या ट्रेन्स जगातल्या फास्टेस्ट ट्रेनपैकी एक असल्या तरी जगातल्या सर्वात वेगाने धावणार्‍या ट्रेनचे श्रेय जाते ते चीनच्या शांघाय मागलेव या ट्रेनला. पुडॉग इंटरनॅशनल पासून शहराच्या मधोमध लाँगयाँग रोड स्टेशनकडे ३० किमीचे अंतर ४३०किमी ताशी वेगाने केवळ आठ मिनिटात आपण पार करू शकतो, ते या ट्रेनच्या मॅगनेटिक प्लेट्स रूळांना न टेकता चालणार्‍या टेक्नॉलॉजीमुळे. चला तर पुढच्या चायना ट्रिपला शांघायला उतरून टॅक्सी न घेता ट्रेननेच प्रवास करूया म्हणजे ट्रॅफिकची काळजीच नको.

पण ट्रेनच्या प्रवासाची खरी मजा घ्यायला फास्टेस्ट नव्हे तर जगातली स्लोएस्ट एक्सप्रेस ट्रेन आपल्याला कदाचित जास्त आवडेल. ट्रेनने प्रवास करायचा आणि खिडकीतून येणारे- जाणारे दृश्य दिसलेच नाही तर ट्रेन प्रवासाची मजा ती काय! आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंडच्या सीनिक ट्रेन्स. स्विस लोकांचे जणू एकच ध्येय आहे,ते म्हणजे निसर्गसौंदर्याने भारलेल्या स्वीस पर्वततरांगा पर्यटकांपर्यंत पोहचवणे. आल्पस पर्वतरांगांमध्ये प्रवास करताना तिथली  पर्वतशिखरं  व ग्लेशियर्स केवळ हाईकर्स व माऊंटन क्लाईंबर्सपर्यंत मर्यादित नाहीत तर स्वित्झर्लंडला भेट देणार्‍या प्रत्येक पर्यटकाला त्याचा आनंद अनुभवता येतो. तिथे पोहोचायला वयाचेही कुठलेच बंधन नसून अगदी तान्ह्या बाळापासून ते सीनियर्सपर्यंत प्रत्येकाला अगदी सहज प्रवास करता येतो. आपण आपल्या ट्रेनच्या सीटवर बसून पॅनोरॅमिक खिडक्यांमधून स्विस आल्पस् शिखरांवर चकाकणारे तलाव, फुलांनी सजलेले मीडोज, ऐतिहासिक किल्ले, ग्लेशियर्स, द्राक्षांचे मळे, खळखळणार्‍या नद्या, सुबक घरांनी सजलेली गावं असं सारे काही बघण्याचे सुख घेऊ शकतो. स्वित्झर्लंडमध्ये फिरताना ट्रेन, ट्राम आणि फुनिक्युलरच्या अनोख्या नेटवर्कने आपण युरोपच्या सर्वोच्च शिखरांमध्ये अगदी आरामात पोहोचतो. ग्लेशियर एक्सप्रेस, बर्निना एक्सप्रेस, गोल्डन पास लाईन सारख्या अनेक अनोख्या सीनिक ट्रेन्सने स्वित्झर्लंडची ग्रँड टूर घडू शकते. स्विस ट्रॅव्हल पास हाताशी असला की अगदी आरामात आपण प्रवास करू शकतो. केवळ सीनिकच नव्हे तर स्वित्झर्लंड आणि इतर युरोपीयन शहरांमध्ये प्रवास करताना सुद्धा ट्रेन ट्रॅव्हल सर्वात उत्तम पर्याय ठरतो. एका शहराच्या केंद्रापासून दुसर्‍या शहराच्या मधोमध ह्या युरोपीयन ट्रेन्स अगदी आरामात आपल्याला पोहचवतात. व्यवस्थित प्लॅनिंग केल्यास आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. पण कितीही प्लॅनिंग केले तरी काही वेळा आपण सर्वच गोष्टींसाठी तयार नसतो हे मला प्रत्यक्षात जाणवले, झ्युरिक ते ल्युसर्न ट्रेन प्रवास करताना. एका बिझनेस ट्रिपवर घाईघाईत झ्युरिकवरून ट्रेन घेऊन आम्ही ल्युसर्नकडे निघालो आणि लॅपटॉप उघडून बिझनेस डिस्कशन सुरू झाले. तेवढ्यात माझ्या खांद्यावर एका स्विस आजीने प्रेमाने हात ठेवला आणि तोंडावर बोट ठेवत, शू... इथे तू बोलू शकत नाहीस असे मला खुणावले.  तिथली शांतता असहाय्य झाली अनं मी माझा गाशा गुंडाळत दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये गेले आणि परत काम सुरू केले. ट्रेनमध्ये स्मोकिंगवर बंदी आहे हे माहिती होते पण बोलण्यावरसुद्दा, हे ऐकून मी चकित झाले. न बोलता प्रवास करणे तर मला झेपणारच नव्हते. तेवढ्यात तिने त्या ट्रेन कंपार्टमेंटवरची खूण दाखवली. मी चुकून सायलंट कंपार्टमेंटमध्ये शिरले होते. इथे जोरात बोलण्यास व फोन वापरण्यास बंदी होती. तरीच हे कंपार्टमेंट एवढे रिकामे आहे ह्यामागचं गमक मला उलगडलं. त्या कंपार्टमेंटमध्ये बसलेले लोक हेडफोनवर म्युझिक ऐकत होते, काही झोपले होते तर काही निर्विकार भावाने समाधी अवस्थेत बसल्यासारखे शांत वाटले. तो ट्रेन प्रवास कितीही आरामदायी असला तरी तिथली शांतता असहाय्य झाली अनं मी माझा गाशा गुंडाळत दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये गेले आणि परत काम सुरू केले.

ट्रेन प्रवास म्हटला की चहा-नाश्ता व्हायलाच हवा नाही का! भारतात फिरताना अनेक स्टेशनवरचे वडे, चहा, कॉफी इ. घेण्याची व वेळेच्या आत परत गाडी पकडून आपला प्रवास करण्याची सवय आहेच. हल्ली आपण बहुधा विमानाने प्रवास करीत असल्याने ट्रेनमध्ये जेवण्याची गम्मतसुद्धा हरवून बसलो आहोत. मात्र मागच्या वर्षीच मला भारतात परत एकदा ट्रेनने प्रवास करण्याचा योग आला आणि ट्रेनमध्ये जेवण्याचासुद्धा, पण हे जेवण मात्र काहीसे वेगळेच होते. त्या ट्रेनला पॅन्ट्री कारच नव्हे तर डायनिंग रूमही होती. एखाद्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये बसावे तसे आम्ही सगळ्यांनी त्या ट्रेनच्या रेस्टॉरंटमध्ये बसून डिनरचा आनंद घेतला. त्या ट्रेनवर चहा-कॉफी शोधत पॅन्ट्रीपर्यंत जाण्याची गरज नव्हती, तर फोन उचलून आपल्या ट्रेन कंपार्टमेंटमध्येच बटलर चहा-कॉॅफी घेऊन हजर व्हायचा. ही लक्झरी सर्व्हिस दुसरीकडे नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातच अनुभवता आली ती डेक्कन ओडीसी या लक्झरी ट्रेनवर. डेक्कन ओडीसीमध्ये आपण शानदार कोचेसमध्ये राहून लाऊंज, डायनिंग कार, हेल्थ-स्पामध्ये मसाज ट्रीटमेन्ट आणि कॉन्फरन्सेस्सुद्धा घडवू शकतो. परदेशातून भारताला भेट देणार्‍या पर्यटकांमध्ये हा अद्वितीय संस्मरणीय अनुभव फारच लोकप्रिय आहे.

आपल्याला कायमचा लक्षात राहिल असा न भूतो न भविष्यति ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर अशा ट्रेनवर प्रवास करा, जी २९७९ किमी अंतराचा प्रवास करीत तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण टोकाकडून थेट उत्तरेकडे घेऊन जाते. दक्षिणेकडच्या एडलेड शहरापासून उत्तरेकडच्या डार्विन शहरापर्यंत ४८ तासांत या नव्वद वर्षांच्या वारसा लाभलेल्या द घान या ट्रेनवर आपल्याला ऑस्ट्रेलियाचा रीमोट इंटीरियर्स एक्सप्लोर करता येतो. आपण ऑस्ट्रेलियाच्या मधोमध असलेल्या स्पेक्टॅक्युलर उलुरु किंवा एयर्स रॉकला भेट देऊ शकता. दोन रात्री-तीन दिवसांचा हा पूर्ण प्रवास असला तरी डार्विन किंवा एडलेडपासून एलिस स्प्रिंगस् या छोट्या शहराकडे आपण ही जर्नी ब्रेक करून एक रात्र-दोन दिवसांत सुद्धा हाच अनुभव घेऊ शकतो. या हिस्टॉरिक ट्रेनची कथा सुरू झाली ती १८३० च्या शतकात जेव्हा अफगाणिस्तानच्या उंट चालविणार्‍या व्यापार्‍यांनी इथल्या व्यापाराचे मार्ग शोधत वाहतूक मार्गाचासुद्धा पाया रोवला. याच व्यापार्‍यांमुळे या ट्रेनचे नाव पडले, द अफगान एक्सप्रेसआणि आता द घान या नावाने ही ट्रेन एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या रेड सेंटरचे रहस्य जगापुढे उलगडते.

लक्झरी ट्रेन्समध्ये गणना होते ती साउथ आफ्रिकेच्या ट्रेन्सची ब्लू ट्रेन आणि  रोवॉस रेल. जगातल्या सर्वात सुंदर लक्झरी हॉटेल आणि ट्रेनचे संगम म्हणजे द ब्लू ट्रेन. फाईन डायनिंग आणि लक्झरी रूम्ससाठी प्रसिद्द ब्लू ट्रेन जगातली एक उत्कृष्ट हॉटेल ट्रेन म्हणून ओळखली जाते. प्रीटोरिया ते केपटाऊन दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या भव्य लॅन्डस्केप्स्ची झलक देत ही गाडी १६०० किमीचे अंतर ३१ तासांचा प्रवास करीत पूर्ण करते. साउथ आफ्रिकेची दुसरी लक्झरी ट्रेन रोवॉस रेल जगातली सर्वात लक्झुरियस ट्रेन म्हणून ओळखली जाते. केपटाऊन ते दार-ए-सलाम केपटाऊन ते प्रिटोरिया,प्रिटोरिया ते व्हिक्टोरिया फॉल्स अशा अनेक वेगळ्या प्रोगरॅन्सवर आपण विविध अनुभवांसोबतच गेम ड्राईव्हचा आनंदही घेऊ शकतो. रोवॉस रेलच्या काही रूट्सवर विंटेज स्टीम इंजिन असल्याने त्या प्रवासाचा थाटच वेगळा ठरतो.

जगभरात वेगवेगळ्या डेस्टिनेशन्समध्ये अनोख्या ट्रेन जर्नीस् उपलब्ध आहेत. न्यूझीलंडची ट्रान्स अल्पाईन ट्रेन, कॅनडाची रॉकी माऊन्टेनीयर, नॉर्वेची फ्लॅम, अमेरिकेतील अ‍ॅमट्रॅक, युरोपमधील युरेलचे नेटवर्क आपल्याला त्या देशाची खरी ओळख करून देते. केवळ तिथले लॅन्डस्केप्स् व निसर्गसौंदर्यच नव्हे तर तिथल्या लोकांशीही जवळून ओळख टे्रन जर्नीतच होते.  तिथल्याच का, अहो अगदी आपल्या कुटुंबाबरोबर ट्रेन जर्नीचा अनुभव घेतला की एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवता येतो हे नक्की. दोन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये टीजीव्ही ट्रेनने मी आणि माझी मुलगी सारा फिरत होतो तेव्हा, ती कंटाळेल का? फोनवरच गेम्स खेळेल का? हे प्रश्‍न मला पडले. मात्र तिने तिच्या बॅकपॅकमधला पत्त्यांचा कॅट बाहेर काढत मलाच सांगितले, आता तुझे लक्ष दुसरीकडे जाणार नाही, ऑफिसचे काम सोडून तू माझ्याबरोबर पत्ते खेळू शकतेस, त्याक्षणीचा तिच्या डोळ्यातला आनंद मी कधीच विसरू शकत नाही. काहीवेळा प्रवासाची मजा ही विमानाच्या फास्ट प्रवासापेक्षा ट्रेनच्या स्लो ट्रॅव्हलमध्ये सापडते, ती अशी!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
9 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
9 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
9 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!