India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

फेस्टिवल ऑफ फ्लॉवर्स

8 mins. read
Veena Patil
Veena Patil
8 Mins Read
November 29, 2019
November 29, 2019

Quick Summary

ट्युलिप मॅनिया इतिहासात किमतींचा फुगा फुटल्याची आठवण करून देतो, पण आज पर्यटनासाठी तो प्रेरणादायी ठरतो.

क्युकेनहॉफ फ्लॉवर गार्डन्स मार्चच्या अखेरीस उघडतात आणि मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत बहर पाहता येतो.

2020 साठी भेटीच्या तारखा 21 मार्च ते 10 मे आहेत, आणि त्यानंतर ट्युलिप्स कापल्या जातात.

क्युकेनहॉफमध्ये 80 एकर्समध्ये 70 लाख फुलं आणि 800 पेक्षा जास्त ट्युलिप जाती पाहायला मिळतात.

दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक 100 पेक्षा जास्त देशांतून येतात, त्यामुळे आधी प्लॅनिंग आणि बुकिंग फायदेशीर ठरते.

अ‍ॅमस्टरडॅममध्ये ट्युलिप गार्डन्ससोबत कॅनल क्रूझ, सायकलिंग, विंडमिल्स, नाईटलाइफ आणि सीफूडचा अनुभव घ्या.

कधी कधी एखाद्या गोष्टीचं वेड जनमानसात इतकं वाढीस लागतं की त्यामुळे त्याचे संबंधित बाजारभाव प्रचंड वाढायला लागतात. चढ्या किमतींचा फुगा एवढा फुगतो की तो फुटणं आणि त्यामुळे मार्केट कोसळणं ही पुढची पायरी असते. इ.स.१६३०च्या दरम्यान असंच काहीसं घडलं, हॉलंड म्हणजे आताच्या नेदरलँडमध्ये ट्युलिप्स ह्या फुलांच्या बाबतीत. ट्युलिप्सच्या विशिष्ट प्रकारच्या फुलाचे-त्याच्या रोपट्यांचे भाव इतके वाढले की आपल्या अंगणात ट्युलिप असणं म्हणजे जणू आत्ता आपल्या गॅरेजमध्ये फेरारी गाडी असल्यावर आपलं स्टेटस कसं वाढेल तसं काहीसं झालं. अर्थातच ह्या अनैसर्गिक चढ्या किमतींचा फुगा फुटला, मार्केट कोसळलं, अनेक जण देशोधडीला लागले आणि ही गोष्ट एक केस स्टडी म्हणून ट्युलिप मॅनिया नावाने इतिहासात नोंदली गेली.
आमच्या पर्यटन क्षेत्रातही ट्युलिप मॅनिया आहे बरं का! पण तो थोडा वेगळ्या अर्थाने. एखाद्या ठिकाणचं पर्यटन वाढवायचं असेल तर आजकाल बॉलीवूड किंवा हॉलीवूड मूव्हिज तसेच नेट सीरिजचा आधार घेतला जातो. जिंदगी ना मिलेगी दोबाराने स्पेनची ओळख भारतीयांना झाली. युरोप जवळ आला तो राजकपूर यांच्या संगमने, दिलवाले दुल्हनिया ले जायेंग ने प्रेम आणि स्वित्झर्लंड ह्यांचं नातं घट्ट बनवून टाकलं, कहो ना प्यार है ने न्यूझीलंड भारतीयांना जवळचं झालं, गेम आॅफ थ्रोन्सने इस्टर्न युरोप, क्रोएशिया आयर्लंडचं टूरिझम वाढवलं, हॅरी पॉटर ने इंग्लंड स्कॉटलंडच्या वेगळ्या सहली करायला भाग पाडलं. आता पूर्णपणे ठरवून जगभरचे टूरिझम बोर्ड्स त्यांची-त्यांची पर्यटनस्थळं जगासमोर आणण्यासाठी फिल्म मेकर्सना रेड कार्पेट वेलकम देतात, अक्षरश: पायघड्या घालतात. यश चोप्रांनी ह्या सगळ्यात इतकं मोठं काम केलंय की स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू उभारलाय आणि हॉटेलच्या एका स्वीटला त्यांचं नाव दिलंय. ह्याच यशजींनी एक्याऐंशीमध्ये सिलसिला नावाचा ब्लॉकबस्टर आणला. अमिताभ, रेखा, जया, संजीव कुमार, शशी कपूर ह्या पाच जणांना घेऊन बनवलेला त्यावेळचा रीअ‍ॅलिटी सिनेमा असल्याने तो धो-धो चालला, गाणीही तेवढीच लोकप्रिय झाली. त्यातील देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए हे गाणं नेदरलँड्सच्या क्युकेनहॉफ फ्लॉवर गार्डन्समध्येे चित्रित केलं गेलंय. आज चाळीस वर्ष व्हायला आली तरी त्या गाण्यातली दृश्य नजरेसमोरून हटत नाहीत. पर्यटक आजही येऊन विचारतात, आम्हाला ट्युलिप गार्डन्स बघायच्यात ज्या सिलसिला सिनेमात दाखवल्यात नं त्या, त्यासाठी कधी जावं लागेल? त्यानंतर ट्युलिप गार्डन्स अनेक बॉलीवूड- हॉलीवूड-टॉलीवूड सिनेमात दाखवल्या गेल्या पण सिलसिलातल्या त्या मैलोनमैल पसरलेल्या गार्डन्सनी आपल्या मन:पटलावर जे एक अप्रतिम चित्र कोरलंय ते कशानेही पुसू शकत नाही एवढं ते स्ट्राँग आहे. ह्या सिनेमाने भारतीयांमध्ये अ‍ॅमस्टरडॅम एक मस्ट व्हिझिट डेस्टिनेशन बनवून टाकलं, नेदरलँड्सच्या टूरिझममध्ये भर टाकली आणि त्याचबरोबर आमच्याही बिझनेसमध्ये-युरोपला जाणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ केली. त्यामुळे आम्ही पर्यटनक्षेत्रातली सर्वच व्यावसायिक मंडळी यश चोप्रांचे आणि असे चित्रपट काढणार्‍या अनेक हॉलीवूड बॉलीवूडच्या फिल्म प्रोड्युसर्सचे आभारी आहोत.
ट्युलिप गार्डन्स किंवा आपल्या युरोप टूर्समध्ये ज्या क्युकेनहॉफ फ्लॉवर गार्डन्स दाखविल्या जातात त्या साधारणपणे दरवर्षी मार्चच्या अखेरीस पर्यटकांसाठी खुल्या केल्या जातात आणि त्याचा बहर मे च्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यापर्यंत ठेवला जातो. नंतर ह्या बागांमधील ट्युलिप्स चक्क कापले जातात. येत्या वर्षी 2020मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या तारखा आहेत एकवीस मार्च ते दहा मे. दरवर्षी एक थीम घेतली जाते त्याप्रमाणे येत्या वर्षीची थीम आहे अ वर्ल्ड ऑफ कलर्स. जवळजवळ ऐंशी एकर्समध्ये पसरलेली ही गार्डन जगातली सर्वात मोठी फ्लॉवर गार्डन आहे. सत्तर लाख फुलांची ही बाग आठशेहून अधिक प्रकारच्या ट्युलिप फ्लॉवर्सच्या जातींनी सज्ज असते. दरवर्षी दहा ते पंधरा लाख टूरिस्ट जगातल्या शंभरहून अधिक देशांमधून ह्या ट्युलिप गार्डन्सना भेट द्यायला येत असतात. प्रत्येक भारतीयालाही आयुष्यात एकदातरी अ‍ॅमस्टरडॅमला ट्युलिप गार्डन्सना भेट द्यायची असते. त्यामुळेच आम्हीही ह्या कालावधीत सहा दिवसांपासून तेवीस दिवसांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वीस सहलींचा चॉइस आमच्या वीणा वर्ल्ड पर्यटकांसाठी आणलाय. ट्युलिप गार्डन्स, मदुरोडॅम, कॅनल क्रुझ, कॅनलच्या काठावरची छोटी छोटी घरं, विंडमिल्स, सायक्लिंग, वूडन शूज, शुद्ध हवा, नाईट लाईफ, सी फूड, चीझ, जिन, हेरिंग सिल्व्हर फिश ह्या सगळ्यामुळे अ‍ॅमस्टरडॅम हे एक बेस्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन ऑफ 2020 म्हणून लोनली प्लॅनेटह्या ट्रॅव्हल मॅगझिनने जाहीर केलंय. ऑलरेडी डीमांडमध्ये असलेल्या अ‍ॅमस्टरडॅम नेदरलँड्सची आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे डिव्हिजननेही स्पेशल पॅकेजेस् तयार केली आहेत.
ट्युलिप गार्डन्समुळे महत्त्वाचं डेस्टिनेशन ठरलेलं अ‍ॅमस्टरडॅम फुलांच्या जागतिक बाजारपेठेत सतत अव्वल नंबरवर आहे. ग्लोबल फ्लॉवर मार्केटमध्ये नेदरलँड्सने अठ्ठेेचाळीस टक्के बाजारपेठ काबीज केलीय तर दुसर्‍या नंबरवर असलेला कोलंबिया सोळा टक्क्यांवर आहे. तिसरा इक्केदोर दहा टक्क्यांवर तर आपल्या शेजारील चायना आणि थायलंड अनुक्रमे दीड व एक टक्क्यांवर आहेत. फुलं म्हणजे जगभरातली एक हवीहवीशी अनोखी भेट. जन्म-मृत्यू, यश-अपयश, सण-उत्सव, आजार-नुकसान... सुखदु:खात सतत साथ देतात, वातावरण हलकं करतात, नकारात्मकता घालवायला मदत करतात ती फूलं. असं म्हणतात की छान ताजी फुलं आजुबाजूला असली तर पुरुषांना जास्त आयडियाज सुचतात आणि महिला जास्त क्रीएटिव्ह बनतात. कार्यालयात प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी मदत करतात फुलं. वा! फुलांचा महिमा अगाध आहे हे निश्‍चित. जगातल्या फुलांचे राजे नेदरलँड्स असलं तरी ट्युलिप मुळतः हिमालयात उगम पावलं. ऑटोमन साम्राज्यात टर्कीश लोकांनी ते टर्कीला आणलं आणि तिथून ते नेदरलँड्सला पोहोचलं. हंगेरी, नेदरलँड, टर्की, अफगाणिस्तान आणि इराण ह्या देशांनी त्यांचं राष्ट्रीय फूल म्हणून ट्युलिपला मान्यता दिलीय. ट्युलिप म्हणजे खरोखर ब्राइट बोल्ड कलर्सचं वर्ल्ड. लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी, जांभळ्या अशा अनेक रंगाची उधळण करतात ही ट्युलिपची सहा पाकळ्यांवाली दिमाखदार आकाराची फुलं. ह्या फुलांनी आणि त्या रंगांनी बहरलेल्या बागा नेदरलँड्सची डच कंट्रीसाईड अप्रतिम अविस्मरणीय बनवून टाकतात. लाल रंगाची ट्युलिपची फुलं खर्‍या पवित्र प्रेमाची साक्षीदार समजली जातात, तर जांभळ्ी फुलं राजेशाही थाट दाखवतात. आय अ‍ॅम सॉरी! म्हणताना पांढर्‍या ट्युलिप्सच्या फुलांचा वापर केला जातो. पिवळा रंग आनंदाचा आणि सूर्यप्रकाशाचा द्योतक समजला जातो. आणि हो ट्युलिपची फुलं एडिबल आहेत बरं का, आपण खाऊ शकतो. काही पाककृतींमध्ये कांद्याऐवजी ट्युलिप्स वापरतात. ट्युलिप, कांदा, लसूण, लिली, अ‍ॅस्पारॅगस हे सगळे एकाच जातीतले आहेत, जगातलं सगळ्यात आवडतं फूल कोणतं ह्याचा सर्व्हे केला गेला तेव्हा अर्थातच गुलाबाने पहिल्या नंबरची जागा पटकवली आणि ऑर्किड्स व ट्युलिप्स अनुक्रमे दुसर्‍या तिसर्‍या स्थानावर आत-बाहेर करीत राहिले. ट्युलिप्सच्या एकशे पन्नास जाती आहेत आणि तीन हजारांहून अधिक प्रकारची फुलं आहेत. तरीही दरवर्षी वेगळ्या जाती निर्माण केल्या जातात. ट्युलिपच्या फुलांमध्ये बहुतेक सर्व प्रकारचे रंग असतात निळा रंग सोडून. निळी फुलं नसतात. अर्थात फोटोमध्ये निळा कलर आपण आणू शकतो. एक जात निर्माण करायला म्हणजे सुरुवातीपासून ट्युलिप्सची फुलं फुलवाल्यांकडे पोहोचायला वीस वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजे जगभरातल्या ट्युलिप गार्डन्स ही अनेक वर्षांची खरीखुरी मेहनत आहे. ब्यूटिफुल थिंग्ज डोन्ट कम इझी! एकूणच ट्युलिप्सची फुलं आणि ट्युलिप गार्डन्स आपल्याला मोहवून टाकतात. नेदरलँड्सच्या टयुलिप गार्डन्सच्या बहरात आम्ही दरवर्षी पाच हजारांहून अधिक पर्यटक अ‍ॅमस्टरडॅमला घेऊन जात असतो त्यामुळे आमच्यासाठीही ट्युलिप्स हे महत्त्वाचं फूल आहे.
दुसर्‍या महायुद्धात डच रॉयल फॅमिली आणि त्यांच्या लोकांना स्वतंत्र करण्यात मदत केलेल्या कॅनडाला दरवर्षी ऋणनिर्देश म्हणून डच रॉयल फॅमिली दहा हजार ट्युलिप बल्ब भेट म्हणून ओटावाला पाठवीत असते. एकोणीसशे पंचेचाळीसला सुरू झालेली ही प्रथा दरवर्षी मे महिन्यात केनेडियन ट्युलिप फेस्टिव्हल ह्या जगातल्या एका मोठ्या ट्युलिप फेस्टिव्हलमध्ये परावर्तीत झालीय. ऑस्ट्रेलियामध्येही टेसेलार ट्युलिप फेस्टिव्हल भरवली जाते मेलबर्न जवळील सिल्व्हन शहरात. ही देणगी सुद्धा एका डच कपलने ऑस्ट्रेलियाला स्थलांतरीत होताना दिली आणि आज त्याचं एका मोठ्या पंचावन्न एकरमध्ये पसरलेल्या बागेत आणि फेस्टिव्हलमध्ये रुपांतर झालंय. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातलं टूरिझम वाढायला त्याने निश्‍चित मदत झालीय. जगाची सैर करताना आपल्या भारताला कसं विसरून चालेल? आपल्या भारतातही अप्रतिम ट्युलिप गार्डन्स फुलतात त्या श्रीनगर काश्मीरमध्ये. पंचाहत्तर एकरांवर पसरलेल्या, झाबरवान पर्वतराजीच्या पायथ्याशी सात टेरेसेसमध्ये विस्तारलेल्या, दल लेकचा व्ह्यू लाभलेल्या ह्या अप्रतिम ट्युलिप गार्डन्स आपल्याला बघायला मिळतात साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. तेरा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद ह्यांनी टूरिझमच्या वृद्धीसाठी जगभरातील टूरिस्टना काश्मीरमध्ये आकर्षित करण्यासाठी ही निर्मिती केली आणि आज ह्या ट्युलिप गार्डन्स काश्मीरचीच नव्हे तर देशाची शान बनल्या आहेत. आम्हीही ह्या वेळी काश्मीरच्या सहली आयोजित करतो.
ट्युलिप गार्डन्स किंवा ट्युलिप फेस्टिव्हलप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फेस्टिवल्स ऑफ फ्लॉवर्स आयोजित केले जातात. त्यात महत्त्वाचा म्हणजे चेरी ब्लॉसम. जणू काही पश्‍चिमेला पूर्व चिडवत असते, तुमच्याकडे ट्युलिप गार्डन्स आहेत तर आमच्याकडे आहे चेरी ब्लॉसम. ह्यावर्षी जपान चायना कोरिया तैवान सोबतच आम्ही चेरी ब्लॉसमच्या सहली स्पेन, वॉशिंग्टन, जर्मनी आदि ठिकाणी आयोजित केल्या आहेत आणि पर्यटकांनी बुकिंगही जोरदार सुरू केले आहे. ब्रुसेल्सच्या मेन चौकातली फ्लॉवर कार्पेट फेस्टिव्हल, कॅलिफोर्नियातील पसादेनाची रोझ परेड, थायलंड-चांगमाईची फ्लॉवर फेस्टिव्हल, कोलंबियाची मेडेलिन फ्लॉवर फेस्टिव्हल & फ्लॉवर लवर्सना भरपूर चॉईस आहे. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!
8 mins, read

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

Published in Sakal Saptrang 6th September 2026 फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स! दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.  वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
8 mins, read

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

Published in Maharashtra Times 6th September 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश

अपेक्षपलीकडचं वास्तव
8 mins, read

अपेक्षपलीकडचं वास्तव

Published in Maharashtra Times 6th September 2026 ...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‌‘करायचंच‌’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो... जेव

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!