We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

नॉर्दर्न लाइट्स

10 mins. read
Marketing .
Marketing .
10 Mins Read
August 07, 2026
August 07, 2026

Quick Summary

नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी पोलर रिजनमध्ये डिसेंबर जानेवारीतील 24 तासांच्या रात्रेचा काळ निवडा.

थंडी, बर्फ आणि लांबचा विमानप्रवास यासाठी आधीच तयार राहा, कारण हा अनुभवच मुख्य उद्देश आहे.

हिरवे, जांभळे आणि गुलाबी रंगांचे प्रकाशाचे पडदे आकाशभर नाचताना शांतपणे काही क्षण स्तब्ध होऊन पाहा.

आर्क्टिकमध्ये फियोर्डस्‌ क्रूझ, रेनडिअर सफारी आणि काचेच्या इग्लूमधील मुक्काम यांसारखे अनुभव नक्की जोडा.

नॉर्वेमध्ये ट्रॉम्सो आणि लोफोटन आयलंड्ससोबत सामी कल्चर आणि रेनडिअर स्लेडिंगचा अनुभव घ्या.

फिनलंडमध्ये आर्क्टिक सर्कल, सांताक्लॉज व्हिलेज, फिनिश सॉना आणि स्नो हॉटेल्ससह ग्लास इग्लूमध्ये थांबा.

Published in Sakal Saptarang 9th August 2026

प्रकाशाच्या शोधात

जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या इतिहासासाठी, तर काही खाद्यसंस्कृतीसाठी करतो. पण क्वचितच काही प्रवास  असतात, ज्या प्रवासाचं डेस्टिनेशन एखादं शहर नसतं, एखादा फोर्ट नसतो, एखादा कॅसल नसतो, तर खुलं आकाश असतं. या आकाशात विविध रंगाचा सोहळा पाहण्याचा अनुभव म्हणजे नॉर्दर्न लाइट्स.

पोलर रिजनमध्ये थंडीच्या दिवसांत, त्यातही डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते 24 तासांची रात्र. सतत अंधार असणाऱ्या या थंडीच्या दिवसांत आपल्याला ‌‘ऑरोरा बोरेआलिस‌’ अर्थात ‌‘नॉर्दन लाइट्स‌’चा चमत्कार पहायला मिळतो. ‌‘ऑरोरा‌’ म्हणजे रोमन भाषेत ‌‘सूर्यदेवता‌’ तर ‌‘बोरेआलिस‌’ हा ‌‘उत्तरी वारे‌’ या अर्थाने वापरला जाणारा ग्रीक शब्द. हे नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. थंडी, बर्फ, लांबचा विमानप्रवास, वेळेचा फरक हे सगळं स्वीकारतात. कारण त्यांना फक्त एक गोष्ट अनुभवायची असते आणि ती म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार.

मला नेहमी वाटतं, आपण पर्यटनासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण फक्त ठिकाणं पाहत नाही, आपण स्वतःलाही नव्याने भेटतो. रोजच्या धावपळीत, कामात, जबाबदाऱ्यांमध्ये हरवलेलं आपलं मन पुन्हा एकदा शांत होतं. बर्फाच्छादित परिसरात उभं राहिल्यावर जेव्हा हिरवे, जांभळे, गुलाबी अशा रंगांचे प्रकाशाचे पडदे आकाशभर नाचताना दिसू  लागतात, तेव्हा काही क्षण आपण स्तब्ध होतो. बोलायलाही शब्द सापडत नाहीत. फक्त हे अप्रतिम, अनोखं दृश्य डोळे भरून पाहात राहावंसं वाटतं.

पर्यटनाची खरी ताकद हीच असते. ते आपल्याला निसर्गाची भव्यता दाखवतं आणि त्याच वेळी आपल्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं. जग किती मोठं आहे आणि आपण त्यातलं अजून किती कमी पाहिलंय, याची जाणीव करून देतं. नॉर्दर्न लाइट्स म्हणजे फक्त एक पर्यटनस्थळ नाही, तर तो एक अनुभव आहे. संयमाचा अनुभव, शांततेचा अनुभव आणि आश्चर्याचा अनुभव. कारण हा आपल्याला त्याची वाट पाहायला शिकवतो आणि म्हणूनच आयुष्यभर लक्षात राहतो.

वीणा वर्ल्डमध्ये आम्ही म्हणतो की पर्यटन म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर आयुष्यभरासाठीच्या आठवणी गोळा करणं. काही आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त होतात, तर काही मनाच्या कप्प्यात कायमच्या जपल्या जातात. नॉर्दर्न लाइट्स हा तसाच एक अनुभव आहे. तो फक्त पाहायचा नसतो... तर जगायचा असतो. हा असा अनुभव आहे जो आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने घ्यायलाच हवा. कारण काही गोष्टी फक्त ऐकण्यापेक्षा स्वतः अनुभवल्यावरच मनापर्यंत पोहोचतात. म्हणूनच जर तुमच्याही स्वप्नांच्या यादीतील नॉर्दर्न लाइट्स अजून बाकी असतील तर हीच योग्य वेळ आहे, त्या स्वप्नाला योग्य नियोजनाची, विश्वासाची आणि अनुभवी साथीची जोड देण्याची. आम्ही ती जबाबदारी आनंदाने स्वीकारू. चला, यावेळी फक्त प्रवासाचं प्लॅनिंग करू नका, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी एक आठवण निर्माण करा. मग येत्या हिवाळ्यात, त्या रंगांनी उजळलेल्या आकाशाखाली उभं राहून तुम्हीही मनातल्या मनात म्हणत असाल..."धिस इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स ऑफ माय लाईफ."

 

रंगांची जादुई रात्र नॉर्दर्न लाइट्स

निसर्गाचा सर्वात मोहक रंगमंच!

काही ठिकाणं सुंदर असतात. काही अनुभव आयुष्यभर मनात राहतात. पण आर्क्टिक हे दोन्हीही आहे. हा प्रदेश तुम्हाला थोडं संथ व्हायला शिकवतो. शांतता ऐकायला शिकवतो. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकवतो. आणि जेव्हा आकाश रंगांच्या लहरींनी उजळून निघतं, तेव्हा त्या क्षणात हरवून जायला शिकवतो. नॉर्दर्न लाइट्स या निसर्गाच्या चमत्काराचा प्रत्येक देशातला अनुभव वेगळा असतो.

आर्क्टिक म्हणजे केवळ जगाचं उत्तरेकडचं टोक नाही; ती एक वेगळीच जीवनशैली आहे. इथे हिवाळा हा ऋतू नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हजारो वर्षांपासून निसर्गाशी सुसंवाद साधत जगणारा सामी समुदाय, त्यांच्या लोककथा, संगीत आणि परंपरा या प्रवासाला वेगळी सांस्कृतिक श्रीमंती देतात.

नॉर्दर्न लाइट्सच्या पलीकडेही आर्क्टिकमध्ये अनुभवांची एक वेगळीच दुनिया आहे. भव्य फियोर्डस्‌‍मधील क्रूझ, रेनडिअर सफारी, काचेच्या इग्लूमधील मुक्काम, व्हॉल्कॅनो आणि ग्लेशियर्सनी सजलेले निसर्गरम्य प्रदेश, आणि इतकी गहिरी शांतता की बर्फावर पडणाऱ्या तुमच्या पावलांचाही आवाज ऐकू येतो. आणि मग... रात्र गडद होत जाते, आकाश उजळायला लागतं, निसर्गाचा सर्वात मोहक रंगमंच सजतो... आणि मनात कायमचं घर करून राहतात ते नॉर्दर्न लाइट्स!

 

नॉर्वे: फियोर्डस्‌‍  ट्रॉम्सो  लोफोटन आयलंड्स  सामी कल्चर  रेनडिअर स्लेडिंग  आर्क्टिक क्रूझ

फिनलंड: आर्क्टिक सर्कल  सांताक्लॉज व्हिलेज  सारिसेल्का, लेवीमधील ग्लास इग्लू  फिनिश सॉना  स्नो हॉटेल्स  हस्की स्लेडिंग  स्नो मोबाईल राईड्स

आइसलँड: व्होल्कॅनो  ग्लेशियर्स  गोल्डन सर्कल रूट  ब्लू लगून  ब्लॅक सँड बीचेस  जिओथर्मल हॉट स्प्रिंग्स  वॉटरफॉल्स

स्वीडन: आईस हॉटेल  ऑरोरा स्काय स्टेशन  अबिस्को  फ्रोजन लेक्स  सामी कल्चर

रशिया: मुरमन्स्क  आईसब्रेकर क्रूझ  हस्की स्लेडिंग  सेंट पीटर्सबर्ग   मॉस्को

कॅनडा अलास्का: युकॉन  चर्चिल  फ्रोजन लेक्स  ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज  स्नो कव्हर्ड फॉरेस्टस्‌‍  डॉग स्लेज राईडस  विल्डरनेस ट्रेल्स  अनटच्ड नेचर

 

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!

नॉर्दर्न लाइट्सना वैज्ञानिक भाषेत ‌‘ऑरोरा बोरेआलिस‌’ म्हणतात.

पृथ्वीवरच नाही, तर गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवरही ऑरोरा दिसतात. विशेष म्हणजे गुरू ग्रहावरील ऑरोरा पृथ्वीवरील ऑरोरापेक्षा शेकडो पटींनी अधिक शक्तिशाली असतात.

नॉर्वेमधील ट्रोम्सोला ‌‘ऑरोरा कॅपिटल‌’ म्हणून ओळखले जाते.

हिरवा हा ऑरोराचा सर्वाधिक दिसणारा रंग आहे.

वायकिंग्स मानायचे की नॉर्दर्न लाइट्सचा प्रकाश हा स्वर्गीय योद्ध्यांच्या चिलखताचं प्रतिबिंब आहे, तर सामी समुदायासाठी ते एक शक्तिशाली आत्म्याचं प्रतीक होतं.

जवळपास 3,000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन चिनी लिखाणामध्ये रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या ‌‘पाच रंगांच्या प्रकाशाचा‌’ उल्लेख आढळतो. ऑरोराबद्दलच्या सर्वात जुन्या नोंदींपैकी ही एक मानली जाते.

फिनलंडमध्ये काही हॉटेल्स विशेषतः नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठीच बांधण्यात आली आहेत.

मोबाईल किंवा कॅमेऱ्यातून नॉर्दर्न लाइट्स अनेकदा अधिक तेजस्वी आणि रंगीत दिसतात. कारण कॅमेऱ्याचे सेन्सर्स मानवी डोळ्यांपेक्षा प्रकाश वेगळ्या पद्धतीने टिपतात.

जगभरातील हजारो छायाचित्रकार दरवर्षी केवळ नॉर्दर्न लाइट्सचे छायाचित्रण करण्यासाठी आर्क्टिक प्रदेशात प्रवास करतात.

 

 

वीणा वर्ल्ड ऑरोरा हॉलिडेज्‌‍

 ग्रुप टूर्स  कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

 कॉर्पोरेट अँड इन्सेंटिव्ह टूर्स

काही स्वप्नं गाठण्यासाठी अनेक मार्ग असतात. नॉर्दर्न लाइट्स हा केवळ एक पर्यटनस्थळाचा अनुभव नाही; तो योग्य ऋतू, योग्य ठिकाण आणि योग्य नियोजन यांचा मिलाफ आहे. म्हणूनच वीणा वर्ल्डच्या नॉर्दर्न लाइट्सच्या प्रत्येक टूरची आखणी ऑरोरा बोरेआलिसच्या अनुभवाभोवती करण्यात आली आहे. स्कॅन्डिनेव्हिया नॉर्दर्न लाइट्स विथ आईसब्रेकर क्रुझ, आईसलँड नॉर्दर्न लाइट्स आणि रशिया नॉर्दर्न लाइट्स यांसारख्या वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्स तुम्हाला नॉर्दर्न लाइट्स पाहण्याच्या तुमच्या स्वप्नाच्या अधिक जवळ घेऊन जातात.

कोणाला आमच्या ग्रुप टूर्स आवडतात, तर काही जण स्वतःच्या गतीने फिरण्यासाठी कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ निवडतात. याशिवाय कॉर्पोरेट अँड इन्सेंटिव्ह टूर्सचेही विविध पर्याय वीणा वर्ल्डकडे उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्हीही यातला तुमचा आवडता पर्याय निवडा आणि चला!

 

वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

नॉर्दर्न लाइट्सच्या प्रवासात आपण सगळे ‌‘त्या‌’ एका क्षणाची वाट पाहत असतो. कारण नॉर्दर्न लाइट्स कधी दिसतील, किती वेळ दिसतील, हे पूर्णपणे निसर्ग ठरवतो. तुम्ही मला विचारता, "आज दिसतील का?" आणि मी हसून म्हणतो, "आपण प्रयत्न करायचे... बाकी निसर्गाची मर्जी!"

मग जेव्हा आकाशात पहिली हिरवी लहर उमटते, तेव्हा माझी नजर आधी आकाशाकडे नाही, तर तुमच्या चेहऱ्याकडे जाते. तुमच्या डोळ्यांतील आश्चर्य, आनंद आणि काही क्षणांची निःशब्द शांतता... सारं काही सांगून जाते. म्हणूनच मला तुम्हाला या प्रवासावर घेऊन यायला आवडतं. अनेकदा मी सांगतो... "काही क्षण कॅमेरा बाजूला ठेवा... आणि फक्त आकाशाकडे पाहा." कारण फोटो आठवणी जपतात... पण त्या क्षणाचा आनंद मनात कायमचा साठवून ठेवतात ते तुमचे डोळे. त्या स्वप्नपूर्तीच्या क्षणी तुमच्यासोबत उभं राहणं... यापेक्षा मोठं समाधान माझ्यासाठी दुसरं नाही.

 

जिथे आकाश रंगांनी नृत्य करतं...

रात्रीचं आकाश म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर चंद्र, तारे किंवा एखादा उल्कावर्षाव येतो. पण कल्पना करा, की एखाद्या काळोख्या, बर्फाच्छादित रात्री अचानक संपूर्ण आकाश हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या लहरींनी उजळून निघालं तर? त्या रंगांच्या पडद्यांनी आपल्या डोक्यावर आकाशात नृत्य सुरू केलं तर? हा अनुभव म्हणजेच नॉर्दर्न लाइट्स किंवा ऑरोरा बोरेआलिस. पृथ्वीवरील सर्वात अद्भुत नैसर्गिक चमत्कारांपैकी एक.

नॉर्दर्न लाइट्स म्हणजे नेमकं काय? तर सूर्यापासून सतत बाहेर पडणारे ऊर्जायुक्त कण पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डशी आणि वातावरणातील ऑक्सिजन व नायट्रोजनशी टक्कर घेतात. या प्रक्रियेमुळे आकाशात रंगीत प्रकाश निर्माण होतो. त्यातून निर्माण होतो रंगांचा हा मोहक खेळ. ऑक्सिजनमुळे हिरवा आणि लाल, तर नायट्रोजनमुळे निळा, गुलाबी आणि जांभळा असे रंग दिसतात. म्हणूनच प्रत्येक रात्रीचा ऑरोरा वेगळा असतो. कधी आकाश हलक्या हिरव्या धुक्यासारखं दिसतं, तर कधी रंगीबेरंगी पडद्यासारखं. नॉर्दर्न लाइट्सचा अनुभव घ्यायचा असेल, तर नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, आइसलँड, रशिया, अलास्का किंवा कॅनडाच्या आर्क्टिक प्रदेशात प्रवास करावा लागतो. हिवाळ्यातील दीर्घ रात्रींमध्ये हा विलक्षण सोहळा अनुभवता येतो. झिरो डिग्रीच्या खाली तापमान, सभोवती पांढराशुभ्र बर्फ, गोठवणारी थंडी आणि वर रंगांनी सजलेलं आकाश... हा अनुभव आपल्याला जणू दुसऱ्याच जगात घेऊन जातो. तर उन्हाळ्यात काही काळ इथे सूर्य मावळतच नाही. हा अनुभव म्हणजे मिडनाइट सन.

आर्क्टिक म्हणजे फक्त नॉर्दर्न लाइट्स नव्हेत. आर्क्टिक सर्कल ओलांडणं, रोव्हानिएमीमध्ये सांताक्लॉजला भेटणं, नॉर्वेच्या फियोर्डस्‌‍मधील क्रूझ, काचेच्या इग्लूमधील मुक्काम, तसेच व्होल्कॅनो, ग्लेशियर्स आणि वॉटरफॉल्सनी सजलेल्या निसर्गाचा अनुभव हा प्रवास अधिक समृद्ध करतो.

हजारो वर्षांपासून इथला स्थानिक सामी समुदाय निसर्गाशी सुसंवाद साधत जगत आला आहे. रेनडिअरच्या स्थलांतराबरोबर त्यांचं आयुष्य पुढे सरकतं. आजही त्यांनी आपल्या समृद्ध परंपरा जपून ठेवल्या आहेत.त्यांचं संगीत, हस्तकला आणि लोककथा या आर्क्टिकच्या संस्कृतीची वेगळीच ओळख करून देतात. इथली खाद्यसंस्कृतीही या भूमीइतकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ताजं सी फूड, स्मोक्ड सॅल्मन, आर्क्टिकमधील बेरीज्‌‍आणि स्थानिक हवामानाला साजेसे पारंपरिक पदार्थ हे तुम्हाला या प्रदेशाशी अधिक जोडतात.

नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी संयमाची गरज असते. अनेकदा तासनतास प्रतीक्षा करावी लागते. पण जेव्हा आकाशात पहिली हिरवी लहर उमटते, तेव्हा त्या क्षणाचं वर्णन शब्दांत करणं कठीण होतं. हिरव्या रंगांमध्ये अचानक गुलाबी छटा मिसळतात, जांभळ्या लहरी क्षितिजावर पसरतात आणि काही मिनिटांत संपूर्ण आकाश बदलून जातं. आकाशातील या रंगांच्या नृत्याकडे पाहताना वेळ थांबल्यासारखा वाटतो. प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि म्हणूनच कोणत्याही दोन ऑरोरा रात्री कधीच सारख्या नसतात. आज जगभरातील प्रवाशांच्या बकेट लिस्टमध्ये नॉर्दर्न लाइट्स अग्रस्थानी आहेत. कारण हा केवळ पर्यटनाचा अनुभव नाही, तो निसर्गाच्या अफाट सौंदर्याची, शक्तीची आणि शांततेची नव्याने ओळख करून देणारा प्रवास आहे.

 

नॉर्दर्न लाइट्स प्रवासासाठी टिप्स

  • संयम ठेवा: ऑरोरा बोरेआलिस ही नैसर्गिक घटना असल्याने काही वेळा तासनतास प्रतीक्षा करावी लागू शकते.
  • लेयर्ड उबदार कपडे घाला: तापमान अनेकदा शून्याखाली जात असल्याने थर्मल वेअर, हातमोजे आणि टोपी आवश्यक आहे.
  • हवामान आणि ऑरोरा फोरकास्ट: ऑरोरा फोरकास्ट आणि ढगांची स्थिती आधी पाहा.
  • ट्रायपॉडसह कॅमेरा वापरा: लाँग एक्स्पोजरमुळे ऑरोराचे रंग अधिक सुंदर टिपता येतात.
  • मोबाईलचा नाईट मोड वापरा: आधुनिक स्मार्टफोन अनेकदा डोळ्यांना न दिसणारे रंगही टिपू शकतात.
  • चंद्रप्रकाश कमी असलेल्या रात्री निवडा: अंधाऱ्या आकाशात ऑरोरा अधिक स्पष्ट दिसतो.
  • ॲडिशनल बॅटरी ठेवा: अतिथंड हवामानात मोबाईल आणि कॅमेऱ्यांच्या बॅटरीज लवकर संपतात.
  • योग्य शूज वापरा: बर्फावर चालण्यासाठी स्नो बूट्स किंवा अँटी-स्लिप शूज उपयोगी पडतात.
  • वेळेआधी पोहोचा: उत्तम ठिकाणे निवडण्यासाठी आणि अंधाराशी जुळवून घेण्यासाठी वेळेआधी पोहोचा.
  • निसर्गाचा आदर करा: बर्फाळ परिसरात शांतता आणि स्वच्छता राखा.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
वर्षातील एकमेव संधी
10 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
10 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

राजस्थान
10 mins, read

राजस्थान

Published in Sakal Saptarang 2nd August 2026 द कॅमल फेअर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या सुमारास राजस्थानातील शांत, निवांत पुष्कर हे छोटंसं वाळवंटी शहर एका आठवड्यासाठी अक्षरशः बदलून जातं. भारतातील

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!