India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

द रेनबो नेशन

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
September 04, 2026
September 04, 2026

Quick Summary

केपटाऊनला तुमच्या आफ्रिका यादीत अव्वल ठेवा कारण इथे माऊंटन्स, ओशन आणि व्हायब्रंट कल्चर एकत्र अनुभवायला मिळतं.

टेबल माऊंटन, रॉबेन आयलंड आणि बो-कापची रंगीबेरंगी घरं ही केपटाऊनमधली अविस्मरणीय must visit ठिकाणं आहेत.

विंटेज मोटरसायकलच्या साइडकारमधून केपटाऊनची सफर करा आणि ग्लॅमरसोबत भरपूर साहस अनुभवा.

केपटाऊनच्या चमचमत्या पाण्यावर सनसेट यॉट राइड हा तुमचा हायपॉइंट ठरवा आणि शॅम्पेनसह रोमँटिक क्षण जगा.

स्टेलेनबॉश आणि फ्रान्शहोकमध्ये वाईन टेस्टिंगसाठी वेळ काढा आणि शेनिन ब्लांक, सॉव्हिन्यॉन ब्लांक, पिनोटाज व एमसीसी जरूर ट्राय करा.

गार्डन रूटवर मॉसेल बे ते स्टॉर्म्स रिव्हरपर्यंत ड्राईव्ह करा आणि हिरवीगार जंगलं, लपलेली लेक्स, विहंगम दृश्यं व छोटेखानी शहरं अनुभवत जा.

Published in Loksatta Lokrang 6th September 2026

...गोल्फ कोर्सेस आणि डोंगरांच्या मनोहारी पार्श्वभूमीने सजलेल्या या शहराने मला साऊथ आफ्रिकेच्या अधिक शांत, निवांत आणि चिंतनशील बाजूचा परिचय करून दिला...

साऊथ आफ्रिकेला रेनबो नेशन म्हणजेच ‌‘इंद्रधनुषी राष्ट्र‌’ म्हणतात. हे रंग तिथल्या लोकांचे, त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे तर आहेतच, शिवाय त्यात भूप्रदेश, वेगवेगळे स्वाद यांचे रंगही मिसळलेले आहेत. जगभरातील माझ्या आवडत्या शहरांची नावं कोणी विचारली, तर त्यात केपटाऊन हे शहर सगळ्यात वर असेल. आफ्रिका खंडाच्या अगदी टोकावर वसलेलं हे शहर म्हणजे माऊंटन्स, ओशन आणि व्हायब्रंट कल्चर यांचा अनोखा संगम आहे. काही शतकांपूर्वी जेव्हा खलाशांनी तोवर धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‌‘केप ऑफ गुड होप‌’ला वळसा घातला, तेव्हा त्यांना तिथल्या एका नैसर्गिक उपसागराचा शोध लागला. त्याला ‌‘टॅव्हर्न ऑफ द सीज्‌‍‌’ अर्थात ‌‘समुद्रातील उपाहारगृह‌’ असं म्हटलं जाऊ लागलं. पुढे केपटाऊन हे व्यापारी मार्गावरील महत्त्वाचं विश्रांतीस्थळ आणि रसद भरण्याचं ठिकाण बनलं.

पण आजही केपटाऊन अविस्मरणीय आहे ते केवळ या शहराच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर इथल्या विविधतेमुळेही! शहरावर एखाद्या संरक्षकाप्रमाणे उभा असलेला टेबल माऊंटन, नेल्सन मंडेला यांनी अनेक वर्षं कारावास भोगलेलं रॉबेन आयलंड, इतिहास आणि मसाल्यांचा दरवळ एकत्र अनुभवायला देणारी बो-कापची रंगीबेरंगी घरं अशा अनेक गोष्टी इथे आहेत. शहराच्या एका बाजूला अटलांटिक तर दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर आहे. इथली पर्वतांची शिखरं, म्युझियम्स तर संस्मरणीय आहेतच, पण या शहरातील माझ्या मनावर कोरली गेलेली आठवण आहे एका विंटेज मोटरसायकलच्या साइडकारमधली! जरा कल्पना करा, वाऱ्यावर मुक्तपणे उडणारे केस, हवेत दरवळणारा समुद्राचा खारट गंध, आजूबाजूला उलगडत जाणारं केपटाऊनचं सुंदर शहर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला टेबल माऊंटन! साईडकारमधून केपटाऊनची सफर म्हणजे थोडं ग्लॅमर आणि भरपूर साहस!

प्रवासाचा हायपॉइंट ठरली ती केपटाऊनच्या चमचमत्या पाण्यावर घेतलेली सनसेट यॉट राइड! पुन्हा एकदा बॅकग्राऊंडवर होता टेबल माऊंटन, हातात शॅम्पेनचा ग्लास आणि क्षितिजाच्या दिशेने चालू असणारा प्रवास... त्या क्षणी केपटाऊनचं एक रोमँटिक रूप माझ्यासमोर उलगडत होतं. समुद्राच्या निळाईत विरघळत जाणारं ते तेजस्वी आकाश म्हणजे निव्वळ जादुई अनुभव होता.

अर्थातच, वाईनशिवाय केपटाऊनची सफर पूर्णच होत नाही. शहरापासून थोड्याच अंतरावर जगातील दोन सर्वात प्रसिद्ध वाईन झोन्स आहेत. स्टेलेनबॉश आणि फ्रान्शहोक. ओक वृक्षांनी नटलेल्या रस्त्यांनी वेढलेलं स्टेलेनबॉश हे विद्यापीठाचं शहर आहे. इथल्या वाईन इस्टेट्समध्ये 17व्या शतकापासून उत्तम दर्जाची वाइननिर्मिती होते. तर फ्रान्शहोक म्हणजे आफ्रिकेच्या दाट उन्हात अनुभवता येणारी फ्रेंच अभिजातता! काहीशे वर्षांपूर्वी इथे स्थायिक झालेल्या ह्यूगेनॉट समुदायाने आपली वाईननिर्मितीची परंपरा या भूमीत आणली आणि त्यातूनच या वाईन प्रदेशाची ओळख निर्माण झाली. स्टेलेनबॉशमध्ये शेनिन ब्लांकच्या ताज्या प्रसन्न ग्लासने सुरू झालेली ती वाईन टेस्टिंगची दुपार आजही आठवते. एका विनयार्डमधून दुसऱ्या विनयार्डमध्ये आम्ही फेरफटका मारत होतो. सॉव्हिन्यॉन ब्लांक, पिनोटाज (साऊथ आफ्रिकेतील खास वाईन) आणि एमसीसी (मेथड कॅप क्लासिक) अशा विविध वाईनचा आम्ही आस्वाद घेतला. सहज म्हणून सुरू झालेल्या वाईन टेस्टिंगच्या भटकंतीचं रूपांतर द्राक्षवेलींनी आच्छादलेल्या मंडपाखालच्या निवांत जेवणात कधी झालं, ते कळलंच नाही. वाईनसोबत आमच्या हास्याची मैफलही रंगत गेली. आणि भानावर आलो तेव्हा सूर्य क्षितिजाकडे झुकू लागलेला होता. हीच तर साऊथ आफ्रिकेची जादू आहे. इथला प्रत्येक दिवस त्याच्या पोतडीतून नवनवीन आश्चर्यं काढून तुम्हाला थक्क करतो.

गार्डन रूट ड्रायव्हिंग -  गार्डन रूटच्या प्रवासाला निघाले आणि या मार्गाला इतकं रोमँटिक नाव का दिलं असेल, याची प्रचिती आली. दक्षिण किनारपट्टीवरच्या ‌‘मॉसेल बे‌’ पासून स्टॉर्म्स रिव्हरपर्यंत पसरलेला हा मार्ग म्हणजे जणू एखाद्या लाईव्ह पोस्टकार्डमधून प्रवास करण्याचा अनुभव होता. हिरवीगार जंगलं, त्यात लपलेले लेक्स, कड्यांवरून दिसणारी विहंगम दृश्यं आणि बड्या असामींच्या घरांचा समावेश असलेली छोटेखानी शहरं... असा भरपूर ऐवज या प्रवासात सापडतो.

इथेही भारताप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहनं चालतात आणि गाड्या राइट हँड ड्राईव्ह असल्यामुळे ड्राईव्ह करणं माझ्यासाठी सोपं होतं.  माझा पहिला हॉल्ट होता ‌‘मॉसेल बे‌’. या भागाला इतिहास आणि समुद्रकिनाऱ्याचं मोहक सौंदर्य असा दुहेरी साज आहे. सन 1488 मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी बार्तोलोम्यू डायस याने साऊथ आफ्रिकेच्या भूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं, त्यामुळे युरोपियन आणि साऊथ आफ्रिकेतील सुरुवातीच्या संपर्काच्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ‌‘मॉसेल बे‌’ हे एक होतं.

त्यानंतर आली नायस्ना. ‌‘द हेड्स‌’ या सँडस्टोनच्या कड्यांनी वेढलेलं सुंदर लगून. ‌‘जॉर्ज‌’ हेही तसंच एक सुंदर ठिकाण. गोल्फ कोर्सेस आणि डोंगरांच्या मनोहारी पार्श्वभूमीने सजलेल्या या शहराने मला साऊथ आफ्रिकेच्या अधिक शांत, निवांत आणि चिंतनशील बाजूचा परिचय करून दिला.

असं असलं तरीही गार्डन रूट म्हणजे केवळ सुंदर निसर्गदृश्य नाहीत, तर ही जगाची ॲडव्हेंचर कॅपिटल सुद्धा आहे. ‌‘नायस्ना‌’ आणि ‌‘त्सित्सिकामा‌’च्या दरम्यान ‌‘ब्लुक्रॅन्स ब्रिज‌’ लागतो. आम्ही तिथे पोहोचल्यावर माझ्यातील साहसी वृत्ती एकदम उचंबळून वर आली आणि मी ब्लुक्रॅन्स ब्रिजवरून जगातील सर्वात उंच व्यावसायिक बंजी जंपिंगचा अनुभव घेतला. हृदयाची धडधड वाढली, पण त्या क्षणी जाणवलेला ॲड्रेनालिनचा थरार म्हणजे निव्वळ आनंद होता. त्यानंतर किनाऱ्यावर व्हेल वॉचिंग केलं. समुद्राच्या अथांग निळाईतून या महाकाय जीवांना अगदी सहजतेने वर येताना पाहणं म्हणजे जवळजवळ एखाद्या आध्यात्मिक अनुभूतीसारखंच वाटलं. प्रवासात आऊडशूर्न इथल्या ऑस्ट्रिच फार्मलाही भेट दिली. या उंचच उंच पक्ष्यांसमोर उभं राहून त्यांना जवळून पाहताना त्यांच्या काही भन्नाट गोष्टी समजल्या. ऑस्ट्रिच ताशी तब्बल 70 किलोमीटर वेगाने धावू शकतो आणि त्याच्या एका मोठ्या अंड्यातून जवळपास 10 जणांसाठी ऑम्लेट बनू शकतं! हातात ते अवाढव्य अंड धरल्यावर निसर्गाच्या अफलातून रचनेचं अक्षरशः आश्चर्य वाटलं.

आणि मग येतात इथले प्राणी. दक्षिण आफ्रिकेला जणू प्रत्येक गोष्टीला ‌‘फाईव्ह‌’ जोडण्याचीच सवय आहे! बिग फाईव्ह म्हणजे सिंह, बिबट्या, हत्ती, म्हैस आणि गेंडा हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण इथे मरीन फाईव्ह म्हणजे व्हेल, शार्क, डॉल्फिन, सील आणि पेंग्विन भेटतात आणि लिटल फाईव्ह म्हणजे एलिफंट श्रू, बफेलो विव्हर, लेपर्ड टॉर्टॉइज, अँट लायन आणि रायनो बीटलसुद्धा दिसतात. या सुंदर देशाच्या निसर्गात रममाण होताना या सगळ्या प्राण्यांची एखादी झलक टिपणं, हाच या प्रवासातला खरा आनंद आहे.

वाइल्डलाईफच्या दुनियेत - क्रुगर आणि पिलानेसबर्ग -  साऊथ आफ्रिकेचा प्रवास सफारींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. क्रुगर नॅशनल पार्क म्हणजे जंगलप्रेमींसाठी एक दंतकथाच! मैलोनमैल पसरलेल्या या जंगलात आपल्याला दिवसभर उन्हात निवांत पहुडलेले सिंह, शांत आणि डौलदारपणे चालणारे हत्ती, रमतगमत चरणारे गेंडे सर्वत्र भेटतात. दुसरीकडे, पिलानेसबर्ग नॅशनल पार्क आकाराने लहान असलं तरी वन्यजीवांनी गजबजलेलं आहे. इथली सफारी मला विशेष आवडली. साहसी प्रवासानुभवाच्या शोधात असलेल्या कुटुंबांसाठी किंवा कॉर्पोरेट समूहांसाठीही हे उद्यान एकदम योग्य डेस्टिनेशन आहे. खरं तर साऊथ आफ्रिका हे केवळ हनिमूनसाठीचं रोमँटिक आणि ॲडव्हेंचरने भरलेलं डेस्टिनेशन नाही, तर इन्सेंटिव्ह टूर्स, मीटिंग्ज आणि ग्रुप ट्रॅव्हलसाठीही हे एक उत्तम ठिकाण आहे. आलिशान रिट्रीट असो, साहसी सुट्टी असो किंवा वीणा वर्ल्डसारख्या ग्रुप टूरचा अनुभव असो, इथे प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे.

पिलानेसबर्ग नॅशनल पार्कवरून सूर्योदयाच्या वेळी हॉट एअर बलूनमधून भरारी घेऊन आकाशातून निसर्गाची जादू अनुभवता येते. पहाटेच्या आणि संध्याकाळच्या वेळी बिग फाइव्हसह अनेक वन्यजीव सक्रिय असतात. त्यामुळे मंद वाऱ्याच्या प्रवाहावर अलगद तरंगत असताना खाली दिसणारे अप्रतिम वन्यजीवदर्शन हा अविस्मरणीय अनुभव ठरतो. लँडिंगनंतर बबली किंवा ऑरेंज ज्यूसचा ग्लास, एका प्रायव्हेट लॉजमधील भरपेट नाश्ता आणि फ्लाईट सर्टिफिकेट या सगळ्यामुळे हा अनुभव आणखी खास होतो.

डर्बनमधली भारतीय चव -  साऊथ आफ्रिकन टुरिझमच्या इंडाबा कॉन्फरन्ससाठी मी डर्बनमध्ये होते तेव्हा कॉन्फरन्सच्या सेशन्सच्या ब्रेकमध्ये मी पहिल्यांदाच बनी चाऊ चाखलं. ब्रेडचा मधला भाग काढून तयार केलेल्या पोकळ पावात चिकन, मटण किंवा बीन्सची तिखट मसालेदार करी भरलेली! विसाव्या शतकाच्या सुरुवातीला डर्बनमधील भारतीय समुदायातून बनी चाऊचा जन्म झाला. उसाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना आपलं जेवण सहजपणे सोबत नेता यावं, यासाठी हा पदार्थ तयार केला गेला. पुढे अनेक दशकं त्याने साऊथ आफ्रिकेच्या स्ट्रीट फूड संस्कृतीत मानाचं स्थान मिळवलं. डर्बनमध्ये, बनी चाऊचा आस्वाद घेताना, दूर परदेशातही आपल्या घराचा, आपल्या मातीचा एक छोटासा तुकडा सापडल्यासारखं वाटलं.

संघर्ष आणि स्वातंत्र्याच्या कहाण्या -  साऊथ आफ्रिकेत आल्यापासून नेल्सन मंडेला यांची आठवण आली नाही, असा दिवसच गेला नाही. 27 वर्षे तुरुंगवास भोगूनही, क्षमाशीलता आणि एकतेचा संदेश देत त्यांनी संपूर्ण राष्ट्राचा इतिहासच बदलून टाकला. मंडेलांना ज्या रॉबेन आयलंडवर कैदेत ठेवण्यात आलं होतं, तिथे उभं राहिल्यावर माणसाची जिद्द आणि संघर्ष, इतिहासाची दिशा कशी बदलू शकतो, याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यापाठोपाठ आठवण झाली ती महात्मा गांधींच्या साऊथ आफ्रिकेशी असलेल्या अतूट संबंधाची. डर्बन आणि जोहान्सबर्गमध्येच गांधीजींनी भोगलेल्या वांशिक भेदभावातून अहिंसक प्रतिकाराचं तत्त्वज्ञान आकाराला आलं. साऊथ आफ्रिका ही अशी भूमी होती जिथे गांधीजी आणि मंडेला या दोघांनीही आपल्या विचारांना आणि संघर्षाला आकार दिला आणि पुढे त्यांच्या या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरणा दिली.

साऊथ आफ्रिका मनात घर करून का राहतो?

साऊथ आफ्रिकेला इतकं आकर्षक बनवते ती एकाच वेळी अनेक रूपं जगण्याची त्याची ताकद! इथे साहसही आहे आणि शांतताही, निसर्गही आहे आणि सुखसोयीही, समृद्ध इतिहासही आहे आणि आधुनिकतेची झलकही. सकाळी उत्तम वाईनचा आस्वाद घ्या, दुपारपर्यंत ब्रिजवरून बंजी जंपिंग करा, दुपारनंतर मसालेदार बनी चाऊची चव चाखा, सूर्यास्ताच्या वेळी समुद्रात व्हेल्सचा शोध घ्या आणि रात्री असंख्य चांदण्यांनी सजलेल्या आकाशाखाली दिवसाची सांगता करा! असा हा साऊथ आफ्रिका म्हणजे माझ्यासाठी विरोधाभासांचा अनुभव देणारा प्रवास आहे. म्हणूनच पुढच्या ॲडव्हेंचर, हनिमून किंवा आयुष्यात एकदाच करायच्या ग्रुप ट्रिपसाठी कुठे जायचं, असं तुम्ही मला विचाराल, तर माझं उत्तर असेल, साऊथ आफ्रिका! कारण या एका देशात तुम्हाला अख्खं जग अनुभवायला मिळतं.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!
9 mins, read

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

Published in Sakal Saptrang 6th September 2026 फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स! दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.  वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
9 mins, read

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

Published in Maharashtra Times 6th September 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश

वास्तव आणि अपेक्षा
9 mins, read

वास्तव आणि अपेक्षा

Published in Maharashtra Times 6th September 2026 ...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‌‘करायचंच‌’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो... जेव

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!