India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
September 04, 2026
September 04, 2026

Quick Summary

डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हलला जा, जिथे अनेक प्रमुख नागा ट्राईब्ज एकत्र येतात.

हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या मैदानात प्रत्येक ट्राईबसाठी वेगळा सेक्शन असल्याने काही तासांतच वेगवेगळ्या गावांची अनुभूती मिळते.

पारंपरिक डान्स, रंगीबेरंगी ट्रायबल अटायर, लोकगीतं आणि हँडिक्राफ्ट्स जवळून पाहण्यासाठी वेळ काढा.

नागालँडचं फूड चुकवू नका, भूत जोलोकिया, स्मोक्ड मीट आणि फर्मेंटेड पदार्थ चाखा.

हॉर्नबिल फेस्टिव्हलचे दहा दिवस नागालँडच्या विविध संस्कृतींचा जिवंत आर्काइव्ह अनुभवण्याची उत्तम संधी आहे.

नॉर्थ ईस्टमध्ये निसर्गासोबतच संस्कृतीही मोठी आहे, त्यामुळे तिथल्या फेस्टिव्हल्स आणि खाद्ययात्रेचा प्लॅन आधीच करा.

Published in Sakal Saptrang 6th September 2026

फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स!

दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या प्रमुख नागा ट्राईब्ज एकाच छताखाली, एकाच ठिकाणी एकत्र येतात. म्हणूनच त्याला म्हटलं जातं, ‌‘फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स!‌’

हॉर्नबिल हा एक सुंदर पक्षी आहे. नागा लोकांच्या लोककथांमध्ये, संस्कृतीत आणि पारंपरिक पोशाखांमध्ये या पक्ष्याला विशेष महत्त्व आहे. आणि त्याच्या नावाने ओळखला जाणारा हा फेस्टिव्हल म्हणजे केवळ नाच-गाणी आणि एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नाही. नागालँडच्या वेगवेगळ्या ट्राईब्जच्या ट्रॅडिशन्स, कला आणि संस्कृती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा फेस्टिव्हल सुरू करण्यात आला.

हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या मैदानात प्रत्येक ट्राईबचा आपला एक वेगळा सेक्शन असतो. त्यामुळे काही तासांतच तुम्हाला नागालँडच्या एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यासारखं वाटतं! वेगवेगळ्या ट्राईब्जचे पारंपरिक डान्स, रंगीबेरंगी आणि आकर्षक ट्रायबल अटायर, पिढ्यानपिढ्या जपलेली लोकगीतं आणि प्रत्येक समुदायाची खास अशी हँडिक्राफ्ट्स हे  सगळं अगदी जवळून पाहता येतं.

आणि अर्थातच, नागालँडचं फूड कल्चर अनुभवायचं असेल, तर हॉर्नबिल फेस्टिव्हल म्हणजे पर्वणीच! नागालँडच्या जेवणात ‌‘भूत जोलोकिया‌’ या जगातील सर्वात तिखट मिरच्यांपैकी एका मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यासोबत पारंपरिक स्मोक्ड मीट आणि फर्मेंटेड पदार्थही इथे चाखायला मिळतात. हे पदार्थ, नागालँडच्या बाहेर फारसे कुठे पाहायलाही मिळत नाहीत!

पण हॉर्नबिल फेस्टिव्हलची खरी गंमत त्याच्या भव्यतेत नाही, तर त्याच्या डायव्हर्सिटीमध्ये आहे. नागालँडमध्ये अनेक ट्राईब्ज आहेत. प्रत्येकाची स्वतःची भाषा, स्वतःचा पोशाख, स्वतःच्या परंपरा आणि स्वतःची जीवनशैली आहे. ही सगळी विविधता अनुभवायची म्हटलं, तर कदाचित अनेक गावं फिरावी लागतील. पण डिसेंबरमधले हे दहा दिवस, त्या सगळ्या संस्कृती तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, आणि म्हणूनच ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल‌’ म्हणजे फक्त एक फेस्टिव्हल नाही, तर तो आहे नागालँडच्या असंख्य संस्कृतींचं जिवंत आर्काइव्ह. वेगवेगळ्या डोंगरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये विखुरलेल्या या ट्रॅडिशन्स, एकत्र आणणारं एक ठिकाण. म्हणून जेव्हा तुम्ही त्या दहा दिवसांत हॉर्नबिल फेस्टिव्हलला जाता, तेव्हा तुम्ही फक्त नागालँडला जात नाही, तर  एकाच प्रवासात नागालँडची विविध रूपं अनुभवायला जाता!

 

इट्स डिफरंट!

भारताच्या नकाशाकडे पाहताना ईशान्येकडचा एक भूभाग दिसतो, पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर जाणवतं की हा ‌‘छोटासा‌’ प्रदेश म्हणजे निसर्ग, इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचं किती मोठं विश्व आहे! ‌‘सेव्हन सिस्टर्स‌’ म्हणून ओळखली जाणारी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा ही सात राज्यं आणि त्यांच्यासोबतच सिक्कीम, म्हणजे हिमालयापासून ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यापर्यंत पसरलेला भारताचा विलक्षण पट.

या भूमीची कथा पुराणांपासून सुरू होते. आसामचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये ‌‘प्राग्ज्योतिष‌’ आणि ‌‘कामरूप‌’ या नावांनी आढळतो. महाभारतातील नरकासुर आणि भगदत्ताच्या कथांशीही या प्रदेशाचा संबंध जोडला जातो. गुवाहाटीचं कामाख्या मंदिर आजही शक्ती उपासनेचं प्रमुख केंद्र आहे. पुढे अहोम राजवटीने आसाममध्ये जवळपास सहाशे वर्षं राज्य केलं आणि या प्रदेशाच्या इतिहासावर अमीट छाप सोडली.

भौगोलिकदृष्ट्या नॉर्थ ईस्ट म्हणजे वैविध्याचा अद्भुत नमुना. हिमालयाच्या उंच पर्वतरांगा, घनदाट जंगलं, टी इस्टेट्स, व्हॅलीज्‌‍ आणि ब्रह्मपुत्रेसारख्या महाकाय नद्या इथे एकत्र दिसतात. अरुणाचल प्रदेशातील तवांग, सिक्कीममधील गंगटोक, मेघालयातील शिलाँग आणि आसाममधील काझीरंगा... यातलं प्रत्येक ठिकाण निसर्गाचा वेगळा चेहरा दाखवतं. काझीरंगातील एकशिंगी गेंडा, मेघालयातील लिव्हिंग रूट्स ब्रिज आणि मणिपूरचा फ्लोटिंग लोकटक लेक ही या प्रदेशातील जैवविविधतेची उदाहरणं आहेत.

पण नॉर्थ ईस्टची खरी ओळख म्हणजे तिथली माणसं. विविध आदिवासी समुदाय, असंख्य भाषा, पारंपरिक पोशाख, विणकाम, लोकनृत्य आणि संगीत यामुळे प्रत्येक राज्याची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे. नागालँडचा हॉर्नबिल फेस्टिव्हल, आसामचा बिहू, मणिपूरचा संगाई फेस्टिव्हल, मिझोरामचा चापचार कुट आणि मेघालयातील वांगला, हे फेस्टिव्हल्स म्हणजे केवळ कल्चरल प्रोग्राम्स नाहीत, तर त्या-त्या समाजाच्या जीवनपद्धतीची जिवंत ओळख आहेत.

आणि मग येते नॉर्थ ईस्टची खाद्ययात्रा! अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळची सुरुवात अनेकदा डोंगरांमध्ये मिळणाऱ्या गरम बटर टीने होते. तवांगसारख्या भागांमध्ये मोमोज, थुक्पा आणि लोकल ट्रायबल डिशेस खाण्याचा अनुभव हा त्या प्रदेशाइतकाच उबदार वाटतो. आसाममधील माजुली किंवा गुवाहाटीमध्ये ट्रॅडिशनल आसामीज थाळी चाखताना केळीच्या पानावर वाढलेलं जेवण मनात घर करतं. ‌‘आसाम टी‌’ ही इथली खास ओळख आहे. मेघालयमध्ये पावसासोबत कॅफे कल्चर जगतं. नॉर्थ ईस्टमधल्या पदार्थांमध्ये स्थानिक मसाले, मासे आणि बांबूचे फ्लेव्हर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. सिक्कीमचे मोमोज आणि थुक्पा प्रसिद्ध आहेत. नागालँडमध्ये फूड कल्चर बोल्ड आणि युनिक आहे. स्मोक्ड मीट, बांबू शूट फ्लेवर्स आणि ट्रायबल कुकिंग स्टाइल्स इथल्या जेवणाला वेगळी ओळख देतात. इथलं प्रत्येक जेवण त्या प्रदेशाच्या हवामानाशी आणि संस्कृतीशी जोडलेलं आहे.

लोकल मार्केट्समध्ये फेरफटका मारताना वूलन स्कार्फ्स, बुद्धिस्ट प्रेयर फ्लॅग्स आणि हँडक्राफ्टेड वस्तूंमध्ये हिमालयीन संस्कृती दिसते. ‌‘मुगा सिल्क‌’ ही आसामची खास ओळख आहे. शिलाँगमधील लाईव्ह म्युझिक आणि बांबू क्राफ्ट्स मेघालयला वेगळी व्हाईब देतात. आगरतळामधील बाजारांमध्ये बांबू डेकॉर, हँडलूम आणि ट्रायबल ज्वेलरी खरेदी करताना इथल्या स्थानिक कलेची समृद्धी जाणवते. हॉर्नबिल फेस्टिव्हल दरम्यान लोकल मार्केट्स हँडिक्राफ्ट्सने भरून जातात. मणिपूरमध्ये ट्रॅडिशनल फ्लेवर्स आणि ग्रेसफुल कल्चर यांचा सुंदर मिलाफ दिसतो. इम्फाळमधील प्रसिद्ध ‌‘इमा मार्केट‌’ म्हणजे पूर्णपणे महिलांनी चालवलेली बाजारपेठ आहे. इथले हँडवोव्हन टेक्स्टाइल्स आणि ब्लॅक पॉटरी विशेष प्रसिद्ध आहेत. मिझोराममध्ये साधेपणातला एलिगन्स जाणवतो. आयझॉलमधील शांत बाजारांमध्ये हँडमेड बॅग्ज, फॅब्रिक्स आणि बांबू प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर दिसतात.

आजच्या प्रवासविश्वात नॉर्थ ईस्टचा ट्रेंडही झपाट्याने बदलतोय. नेहमीच्या पर्यटनस्थळांपलीकडे जाणारे प्रवासी आता रोड ट्रिप्स, हिमालयीन ट्रेक्स, होमस्टे, वन्यजीव आणि स्थानिक खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी इथे येत आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग-सेला पास-बुम-ला रोड ट्रिप असो किंवा सिक्कीममधील गंगटोक-लाचुंग-युमथांगचा हिमालयीन प्रवास, मेघालयातील शिलाँग-चेरापुंजी-डॉकी सर्किट असो किंवा नागालँडमधील कोहिमा-खोनोमाचा सांस्कृतिक अनुभव... यातल्या प्रत्येक प्रवासाची स्वतःची कहाणी आहे. काझीरंगा आणि मानसमध्ये वन्यजीव सफारी, माजुलीमध्ये आसामी संस्कृती आणि सत्रिया नृत्यपरंपरा यातून आसामच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलं जाण्याचा अनुभव मिळतो, तर झिरो व्हॅलीमध्ये स्थानिक जीवनशैली अनुभवणारे होमस्टे पर्यटकांना आकर्षित करतात.

अशा या नॉर्थ ईस्टला भेट देऊन परतल्यावर नकाशावरचा नॉर्थ ईस्ट मनाच्या नकाशावर कायमचा उमटलेला असतो.

 

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!

  • मौलिननाँगमध्ये रस्त्यावर कचरा शोधूनही सापडत नाही. जगातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक असलेलं हे गाव आजही प्लास्टिकमुक्त जीवन जगतं.
  • डॉकीमध्ये उमंगोट नदी इतकी स्वच्छ दिसते की बोट पाण्यावर नाही, तर हवेतच तरंगतेय असं वाटतं!
  • चेरापुंजी आणि मौसिनराममध्ये इतका पाऊस पडतो की इथले वॉटरफॉल्स अक्षरशः कधीच थांबत नाहीत.
  • तवांग मॉनेस्ट्री ही भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध मॉनेस्ट्रीजपैकी एक आहे.
  • लोकटक लेकवर चक्क तरंगणारी आयलंड्स आहेत आणि त्यावर लोकं राहतातही!
  • झिरो व्हॅलीमध्ये हजारो वर्षांपासून सस्टेनेबल ॲग्रिकल्चरची परंपरा आहे.
  • काझीरंगामध्ये जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंडे आढळतात.
  • शिलाँगला भारताची ‌‘रॉक म्युझिक कॅपिटल‌’ म्हटलं जातं. इथे कॅफेज्‌‍पेक्षा जास्त लाईव्ह म्युझिक ऐकू येतंं!
  • माजुली हे नदीच्या मधोमध वसलेलं इतकं मोठं आयलंड आहे की तिथे गावं, संस्कृती आणि परंपरांचं स्वतंत्र जगच आहे.
  • अरुणाचल प्रदेश हा ऑर्किड्सचा स्वर्ग मानला जातो. नॉर्थ ईस्टमध्ये भारतातील सर्वाधिक ऑर्किड प्रजाती आढळतात.
  • नथुला पास प्राचीन सिल्क रूटचा भाग होता, जिथून भारत-तिबेट व्यापार चाले.
  • आयझॉल भारतातील सर्वात शांत आणि शिस्तबद्ध शहरांपैकी एक मानलं जातं.
  • मेघालयात मातृसत्ताक परंपरा आजही जिवंत आहे. इथे अनेक घरांमध्ये संपत्ती मुलींच्या नावावर केली जाते.
  • डोंग व्हॅलीमध्ये भारतातली पहिली सूर्यकिरणं पडतात. इथून सूर्योदय पाहणं म्हणजे आयुष्यभराची आठवण!

 

आयुष्यात एकदा तरी...

  • लाचुंगमध्ये बर्फात हरवून जायचंय!
  • मौसिनराममध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक पावसाचं ठिकाण पाहायचंय!
  • नुरानांग वॉटरफॉलसमोर उभं राहायचंय!
  • ‌‘लिव्हिंग रूट ब्रिज‌’वरून चालत निसर्गाचं इंजिनीअरिंग मार्व्हल अनुभवायचंय!
  • पेलिंगमधून कांचनजंगाचं सूर्योदयाचं दृश्य पाहायचं!
  • ‌‘बुम ला पास‌’ पर्यंतची ॲडव्हेंचरस रोड ट्रिप करायचीय!
  • ‌‘माधुरी लेक‌’च्या आरशासारख्या पाण्यात पर्वतांचं प्रतिबिंब पाहायचंय!
  • ‌‘उज्जयंता पॅलेस‌’ मधून नॉर्थ इस्टचा राजेशाही इतिहास जाणून घ्यायचाय!
  • ‌‘केइबुल लामजाओ नॅशनल पार्क‌’ या जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल       पार्कला भेट द्यायचीय!
  • दिमापूर, इम्फाळमधील लोकल मार्केटमध्ये युनिक हँडिक्राफ्ट्स खरेदी करायचेत.

 

वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल ज्येष्ठांची श्रेष्ठ भ्रमंती

आयुष्यभर कुटुंब, मुलं आणि जबाबदाऱ्यांच्या पाठी धावताना, स्वतःसाठी प्लॅन केलेली कितीतरी प्रवासस्वप्नं मनातच राहतात. पण रिटायरमेंट झाल्यावर मात्र ती पुन्हा हाक देतात. कारण प्रवासाला वय नसतं, असते ती फक्त नव्या जगाची उत्सुकता. वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल टूर्समधून नॉर्थ ईस्टमधली ठिकाणं निवांतपणे अनुभवण्याची संधी मिळते. आसाम-मेघालय आणि आसाम-अरुणाचल-मेघालयसारख्या टूर्समध्ये तुमच्या वयाच्या सहप्रवाशांची सोबत आणि निश्चिंत प्रवासाची खात्री असते!

तेव्हा आयुष्याच्या या सुंदर टप्प्यावर ‌‘आता कशाला प्रवास?‌’ हा प्रश्न नको, आता मन जिथे घेऊन जाईल तिथे निघायची वेळ आहे! कारण वय हा फक्त आकडा आहे. नव्या वाटा शोधण्याची, नवी क्षितिजं पाहण्याची आणि मनसोक्त फिरण्याची हौस कायम तरुणच असते.

 

सिनेमॅटिक प्रवास!

नॉर्थ ईस्टचा निसर्ग इतका सिनेमॅटिक आहे की बॉलिवूडनेही त्याला वारंवार आपलंसं केलं आहे! शाहरुख खानच्या कोयलामधील ‌‘तनहाई तनहाई‌’ गाण्यात दिसणारे अरुणाचल प्रदेशातील नुरानांग फॉल्स आणि शुंगेत्सेर लेक, ‌‘रंगून‌’ आणि ‌‘भेडिया‌’मधील अरुणाचलची दृश्यं, तर ‌‘रॉक ऑन 2‌’ मधून जगासमोर आलेलं शिलाँगचं रॉक कल्चर हे आपल्याला मोहवून टाकतं. ‌‘रॉक ऑन‌’ चित्रपटाचं शूटिंग मेघालयात झालं. ‌‘अनेक‌’ या चित्रपटात तर ईशान्य भारत हा केवळ पार्श्वभूमी नव्हता, तर कथानकाचा महत्त्वाचा भाग होता. देवानंदच्या गाजलेल्या ‌‘ज्वेल थीफ‌’मध्ये सिक्कीम पाहायला मिळालं, तर ‌‘पाताल लोक‌’सारख्या अलीकडच्या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये, कोहिमा आणि दिमापूर कथानकाचा महत्त्वाचा भाग बनले. असं हे नॉर्थ ईस्ट रुपेरी पडद्यावर सातत्याने दिसत आलं आहे. त्यामुळे इथे फिरताना एखादा ओळखीचा स्पॉट अचानक डोळ्यांसमोर आला, तर आश्चर्य वाटायला नको!

 

चला वीणा वर्ल्डसोबत!

नॉर्थ ईस्टमध्ये प्रत्येक राज्याचं निसर्गवैभव आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. वीणा वर्ल्डच्या टूर पॅकेजेसमध्ये आवश्यक परमिट्सच्या व्यवस्थेसह प्रवासाचं नियोजन केलं जातं. टूर मॅनेजरपासून वाहतूक, हॉटेल्स, मील्स, साइटसीइंग आणि ग्रुप कोऑर्डिनेशनपर्यंत प्रवासाची अनेक अंग वीणा वर्ल्ड सांभाळतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक अनुभव मनापासून जगू शकता.

ग्रुप टूर्स: वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह ग्रुप टूर्समध्ये नॉर्थ ईस्ट अनुभवण्याचे अनेक पर्याय आहेत. एका राज्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रवासापासून अनेक राज्यांना जोडणाऱ्या विस्तृत प्रवासापर्यंत!

‌‘आसाम मेघालय‌’ टूरमध्ये काझीरंगा नॅशनल पार्कमधील जीप सफारी, ऑर्किड पार्क, बिहू नृत्य, उमियम लेक, मौलिननाँग व्हिलेज, बॅलन्सिंग रॉक, लिव्हिंग रूट ब्रिज, एलिफंट फॉल्स, नोहकलिकाई फॉल्स, ब्रह्मपुत्रेवरील रोपवे आणि रिव्हर क्रूझ तसेच कामाख्या मंदिर असे अनुभव घेता येतात. तर ‌‘बेस्ट ऑफ अरुणाचल‌’ म्हणजे हिमालयाच्या कुशीतला अनुभव. बोमडिला मॉनेस्ट्री, सेला पास आणि सेला लेक, जसवंतगड इंडो-चायना वॉर मेमोरियल, बुम ला पास, पी. टी. त्सो लेक, माधुरी लेक, तवांग वॉर मेमोरियल, तवांग मोनॅस्टरी, आनी गोम्पा आणि नुरानांग फॉल्स अशा ठिकाणांमधून अरुणाचलचं निसर्गरम्य आणि ऐतिहासिक रूप अनुभवता येतं. त्यात झिरो व्हॅली आणि आपातानी गावांची भर पडते. कोहिमा-माजुली-झिरो ही टूर आपल्याला नॉर्थ ईस्टच्या संस्कृतीशी जवळून जोडणारी आहे. झिरो व्हॅली, टागो न्यिशी व्हिलेज, आपातानी व्हिलेजेस, माजुली आयलंड,  कोहिमा वॉर सिमेट्री, नागालँड स्टेट म्युझियम, कोहिमा कॅथेड्रल, खोनोमा व्हिलेज, किसामा व्हिलेज आणि शिवसागर यांसारखे अनुभव घेता येतात.

याशिवाय ऑल ऑफ मेघालय, आसाम अरुणाचल मेघालय हे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ‌‘नॉर्थ ईस्ट एक्सप्लोरर‌’ या 21 दिवसांच्या टूरमध्ये तुम्ही 6 राज्यातल्या 16 शहरांना भेट देता.अशा विविध ऑप्शन्समुळे निसर्गप्रेमी, वन्यजीवनप्रेमी, इतिहास-संस्कृतीचा शोध घेणाऱ्या किंवा हिमालय अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक वेगळा नॉर्थ ईस्ट प्रवास निवडता येतो.

वुमन्स स्पेशल: नॉर्थ ईस्टचा अनुभव महिलांना खास मैत्रिणींच्या ग्रुपसोबत घ्यायचा असेल, तर वुमन्स स्पेशल हा एक सुंदर पर्याय आहे. महिला एकट्या प्रवास करत असतील तरी वुमन्स स्पेशलमध्ये समान आवडीच्या महिलांसोबत प्रवास, अनुभवी टूर मॅनेजरची साथ आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी गॅरंटीड पार्टनरसारख्या सुविधांमुळे हा अनुभव आनंददायी होतो.

कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍: तुम्हाला नॉर्थ ईस्ट तुमच्या पद्धतीने अनुभवायचं असेल, तर कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ हा उत्तम पर्याय आहे. शिलाँग - चेरापुंजी - मौलिननाँगचा निसर्गप्रवास, काझीरंगा सफारी, तवांग -सेला पासचा हिमालयीन प्रवास, झिरो व्हॅलीमधील आपातानी संस्कृती, कोहिमा - खोनोमाचा सांस्कृतिक अनुभव किंवा मिझोराम - त्रिपुराचा वेगळा प्रवास तुमच्या आवडीनुसार आखता येतो. कुटुंबासोबतचा निसर्गप्रवास, मित्रांसोबतची रोड ट्रिप, फोटोग्राफी हॉलिडे, वन्यजीवनाचा अनुभव अशा टूर्समधून नॉर्थ ईस्ट प्रत्येकाला वेगळा अनुभव देतो.

रोड ट्रिप्स: नॉर्थ ईस्टमध्ये रस्त्याने पोहोचण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर वीणा वर्ल्डची ‌‘गुजरात टू गुवाहाटी रोड ट्रिप‌’ ही अगदी वेगळी संकल्पना आहे. तब्बल 30 दिवस आणि 27 शहरांची ही ऑल-इन्क्लुसिव्ह रोड ट्रिप अहमदाबादपासून सुरू होऊन मध्य भारत, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातून गुवाहाटीपर्यंत जाते. नॉर्थ ईस्टमध्ये प्रवेश केल्यावर इथलं मानस नॅशनल पार्क, ब्रह्मपुत्रा रिव्हर क्रूझ, कामाख्या मंदिर आणि ब्रह्मपुत्रेवरील रिव्हर रोप वे ही ठिकाणं तुम्ही पाहता. दर काही तासांनी बदलणारा निसर्ग, भाषा, खाद्यसंस्कृती, वास्तुकला आणि लोकजीवन अनुभवत भारताच्या पश्चिम टोकापासून ईशान्य टोकापर्यंत पोहोचण्याचा हा अनुभव तुम्हाला खऱ्या अर्थाने ‌‘भारत दर्शन‌’ घडवतो. मग तुम्ही कोणता ऑप्शन निवडताय?

 

आठवणी घडवणारा तुमचा सहप्रवासी - वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

ईशान्य भारतासारख्या दुर्गम तरीही निसर्गसंपन्न व सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रदेशात प्रवासाचा निश्चिंतपणे आनंद घेण्यासाठी गरज असते एका विश्वासार्ह साथीदाराची. तिथेच मी, वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर तुमच्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनतो. तसंच इथल्या अनेक भागांमध्ये इनर लाइन परमिटची आवश्यकता असते, काही राज्यांसाठी वेगवेगळ्या परवानग्या लागू होतात, त्या सुद्धा मी मिळवतो. काझीरंगाच्या वन्यजीवनापासून मेघालयच्या वॉटरफॉल्सपर्यंत, अरुणाचलच्या शांत पर्वतरांगांपासून आसामच्या हिरव्यागार चहाबागांपर्यंत प्रत्येक ठिकाणाशी तुमचं नातं जोडण्याचं काम मी सहजपणे करतो.आणि मग वीणा वर्ल्डसोबतची नॉर्थ ईस्ट टूर म्हणजे केवळ प्रवास उरत नाही, तर तो आपुलकी, सुरक्षितता आणि सुंदर आठवणींचा एक सुरेल अनुभव बनतो.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.  वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
12 mins, read

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

Published in Maharashtra Times 6th September 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश

वास्तव आणि अपेक्षा
12 mins, read

वास्तव आणि अपेक्षा

Published in Maharashtra Times 6th September 2026 ...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‌‘करायचंच‌’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो... जेव

द रेनबो नेशन
12 mins, read

द रेनबो नेशन

Published in Loksatta Lokrang 6th September 2026 ...गोल्फ कोर्सेस आणि डोंगरांच्या मनोहारी पार्श्वभूमीने सजलेल्या या शहराने मला साऊथ आफ्रिकेच्या अधिक शांत, निवांत आणि चिंतनशील बाजूचा परिचय करून दिला

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!