India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

जी हुजूर!

10 mins. read
Veena Patil
Veena Patil
10 Mins Read
August 23, 2024
August 23, 2024

Quick Summary

ऑफिस आणि घरात भूमिका मिसळल्याने गोंधळ होतो, त्यामुळे स्पष्ट सीमा ठेवा.

टूर मॅनेजर्सच्या मिटिंग्जमध्ये चांगलं काम कौतुक करा आणि चुका मान्य करून पुढे सुधारणा करा.

टीममध्ये दादागिरी आणि वरचढपणाची संस्कृती निपटून काढा, कारण ती निश्चिंतीपेक्षा गुलामगिरीकडे नेऊ शकते.

वय, अनुभव, पद किंवा सिनियर ज्युनियरच्या भावनेवरून भेदभाव न करता प्रत्येक सदस्याचं समान महत्त्व मान्य करा.

लीडर्सने पुढाकार घेतल्याशिवाय हुजरेगिरी आणि पदसोपानातील सूक्ष्म भेदभाव थांबत नाही.

शाळांपासूनच एकता आणि एकसंधता शिकवा, जेणेकरून उजवा मोठा वरचढ दाखवण्याची सवय कमी होईल.

Published in the Saturday Lokasatta on 24 August 2024

...ॲक्च्युअली आपण घर आणि ऑफिस, पर्सनल आणि प्रोफेशनल, फॅमिली आणि टीम ह्यामध्ये गल्लत करतो. घरातल्यासारखे ऑफिसमध्ये वागतो किंवा ऑफिसमधल्यासारखे घरी, आणि तिथेच घोळ होतो...

पंधरा दिवसांपुर्वी आमच्या टूर मॅनेजर्स मीट सुरू होत्या. जे चांगलं काम केलं किंवा आपल्याकडून झालं त्याबद्दल आपली पाठ थोपटवूया. ज्या चुका झाल्या त्याचं प्रायश्चित्त घेऊया आणि भविष्यात त्या पुन्हा होणार नाहीत ह्याची खबरदारी घेऊया. आता सर्वांनी मिळून पुढे काय करायचं त्याची रुपरेषा आखूया आणि कामाला लागूया. त्यामुळे माझ्या लेखांवर त्या मिटिंग्जचा प्रभाव थोडा राहिल आणि तुम्हाला ते सहन करावं लागेल. हा हा हा... प्लीज बेअर विथ मी. ह्या वर्षीच्या ह्या मिटिंग्जमध्ये आम्ही सगळ्यात जास्त आग्रह कसला धरला असेल तर तो होता ‌‘दादागिरी‌‘ निपटून काढण्याचा. ‌‘दादा‌‘ ला नामशेष करण्याचा. ‌‘दादा‌‘ ह्या शब्दाचं उच्चाटन करण्याचा. आता हे काय प्रकरण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण ‌‘दादा म्हणजे मोठा भाऊ, दादा म्हणजे सपोर्ट, दादा म्हणजे एक निश्चिंती‌‘, ही आपल्या घराघरातली शिकवण. कुणीतरी आपल्याला दादा म्हणतंय ही भावनाच त्या ‌‘दादा‌‘ ला एवढी सुखवणारी असते की ‌‘दादा‌’ इज वाँटेड एव्हरीव्हेअर. जो आपल्यापेक्षा मोठा असतो तो दादा, ज्याच्यावर आपण विसंबून राहू शकतो तो दादा, जो आपल्याला शिकवतो तो दादा, ज्याच्या पावलावर आपण पाऊल ठेवतो तो दादा. आणि त्यामुळेच आमच्या जवळजवळ चारशे टूर मॅनेजर्समध्ये ‌‘दादा‌‘ कल्चर दृढ झालं. आणि ‌‘दादांचे‌‘ थर निर्माण झाले. वीणा वर्ल्डच्या सुरुवातीपासून म्हणजे 2013 पासून जे होते ते सगळ्यात मोठ्ठे दादा, त्यानंतर प्रत्येक वर्षीचे वेगवगेळे दादा. दरवर्षी पन्नासएक जण नव्याने ह्या टूर मॅनेजर्स टीममध्ये जॉईन होत असतात. ते आल्याआल्या ‌‘दादा‌‘ ह्या नकळत रूजलेल्या कल्चरशी हातमिळवणी करतात आणि पुढच्यावर्षीच्या नवीन बॅचकडे आशेने बघतात, कारण येणारी नवीन बॅच त्यांना ‌‘दादा‌‘ म्हणणार असते. कॉलेजमधल्या सिनियर्स, ज्युनियर्स सारखंच थोडंसं. म्हणजे इथे रॅगिंग नाही पण तो ‌‘सिनियर‌‘ आहे ह्याची एक सुप्त वरचढ जाणीव निश्चित आहे. आणि इथेच आम्हाला घाला घालायचा होता. आपण व्यवसाय करतोय. आपलं हे एक छोटुसं कॉर्पोरेट आहे. सर्वजण खुल्या दिलाने, एकमेकांच्या साथीने, स्वत:ची आणि संस्थेची प्रगती करताहेत. प्रत्येकाकडे काहीतरी एक सकारात्मक वेगळेपण आहे म्हणूनच तो वा ती ह्या मिशनमध्ये आहेत. काहीजणांकडे अनुभव असतो तर काही जणांकडे नव्या जगाच्या नव्या स्किल्स. प्रत्येकाकडे काहीतरी आहे म्हणूनच तो इथे आहे. मग त्यामध्ये हा मोठा तो छोटा, हा सिनियर ती ज्युनिअर, हे वरचे ते खालचे असं कसं? अगदी आमच्यापासून विचार केला तर आम्हीसुद्धा आमच्या टीममधल्या कुणापेक्षातरी मोठे कसे? हं, म्हणजे वयाने किंवा अनुभवाने असू पण त्यामुळे वचरढ नाही नं होऊ शकत. आम्ही एकटे संस्था चालवू शकणार आहोत का? संस्थेसाठी अगदी काल जॉइन झालेल्या व्यक्तीचंही तेवढंच महत्व आहे जेवढं आमचं आहे किंवा ऑर्गनायझेशन मधल्या आधीच्या प्रत्येक व्यक्तीचं. मग ज्यामध्ये वरचढपणाची सूक्ष्म भावना आहे ते दादा-ताई, सर-मॅम, ही हुजरेगिरी कशाला? ब्रिटिशांनी भारत सोडला त्यावेळीच सर-मॅम हे त्यांच्याबरोबर गेलं किंवा गेलं पाहिजे होतं पण तसं झालं नाही ही वस्तुस्थिती. आपल्या भारतातली संस्थानं खाली झाली आणि त्याबरोबर ‌‘जी हुजूर‌‘ वाली हुजरेगिरी बंद व्हायला हवी होती पण तीही नाही झाली. आजही राजस्थानमध्ये गेल्यावर ‌‘जी हुजूर‌‘ ची ‌‘सॉर्ट ऑफ गुलामगिरी‌‘ नजरेस पडते आणि अंगावर शहारा येतो. खरंतर ज्यांना ‌‘जी हुजूर‌‘ म्हटलं जातं त्या व्यक्तींनी, लीडर्सनी, बॉसेसनी पुढाकार घेऊन ही गुलामगिरी संपवायला पाहिजे. सलाम ठोकणं, गाडीचं दार उघडून उभं राहणं ह्यासारख्या ‌‘छोटं मोठं‌‘ चा भेदभाव दाखवणाऱ्या गोष्टी आपल्या रोमारोमात एवढ्या भिनल्या आहेत की त्या गोष्टी घडल्या नाहीत तर माणसं अस्वस्थ होतात. आकांड तांडव करतात. हे कधीनाकधी आपण निश्चितपणे अनुभवलं असेल. शाळांमध्ये ही गोष्ट शिकवली पाहिजे. जिथे एकजण दुसऱ्यापेक्षा, शेजाऱ्यापेक्षा, मित्रमंडळींपेक्षा उजवा, मोठा, वरचढ दाखविण्याचा प्रयत्न करतोय तिथे एकता आणि एकसंधता कशी निर्माण होणार? कामाच्या स्वरूपासाठी `पद‌’ वा डेझिग्नेशन्स वेगवेगळी असतील पण व्यक्तींमध्ये भेदभाव कसा असू शकतो? त्या पदावर पोहोचण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात मग लगेच `साहेबी थाट‌’ कसा अपेक्षिला जातो? बेसिक प्रश्न हाच आहे आणि जोपर्यंत लीडर्स लीड घेत नाहीत तोपर्यंत ही `हिडन हुजेरगिरी‌’ सुरूच राहणार. ह्या बाबतीत मजेशीर गोष्टी आपल्याला बिलबोर्डवर किंवा होर्डिंग्जवर बघायला मिळतात. तिथे तर ‌‘साहेब‌’ लोकांचं पीक आलंय. आज होर्डिंगवर पक्षप्रमुखांना साहेब म्हटलेलं असतं, दुसऱ्या दिवशी तिथे त्याच पक्षाचा कुणीतरी ‌‘साहेब‌’ असतो. तिसऱ्या दिवशी त्याच पक्षातलं एखाद्या गल्लीतलं कुणीतरी `साहेब‌’ म्हणून झळकत असतं. साहेबांची ही मांदियाळी म्हणायची की त्यांच्यातली स्पर्धा. येणारी जनरेशन हेच बघते आणि तीही मग, ‌‘मी कधीतरी एक दिवस असं साहेब बनून हुजरे मुजरे स्विकारीन‌’ ची स्वप्न बघायला सुरुवात करते. हे ‌‘साहेबी‌’ वातावरण ज्यांना रुचत नाही ते अमेरिकेची वाट पकडतात. तिथे बरं सगळे एका लेव्हलला. मध्ये कधीतरी ही पोस्टर्स बंद करण्याची बातमी आली होती पण ते काही पूर्णत्वाला गेलेलं दिसलं नाही. उलट त्यांच्या संख्येत वाढ झालीय आणि शहर तेवढंच खराब दिसायला लागलंय. पण ह्या कोणत्याही गोष्टी आपल्या सर्वसामान्यांच्या हातात नसतात म्हणून मग आपण थोड्याशा निराशेने आत्मकेंद्री विचार करतो. आम्हीही तेच केलं. जग सुधारणं, देश सुधारणं, समाज सुधारणं हे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे ह्याची जाणीव होऊन, किमान आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तरी नकळत रुजलेलं हे भेदभावी वातावरण निपटून काढूया ह्याची झोड उठवली. आपल्या आईवडिलांनी आपल्याला एक सुंदर नाव दिलंय. ते नाव जेवढं वापरलं जाईल तेवढं आपलं स्वत:चं ब्रँडिंग वाढेल. लेट्स जस्ट लव्ह अवर नेम, विदाऊट एनी ॲडजेक्टिव्हज्‌‍ लाइक सर मॅम दादा ताई. गरजच काय त्याची? ॲक्च्युअली आपण घर आणि ऑफिस, पर्सनल आणि प्रोफेशनल, फॅमिली आणि टीम ह्यामध्ये गल्लत करतो. घरातल्यासारखे ऑफिसमध्ये वागतो किंवा ऑफिसमधल्यासारखे घरी, आणि तिथेच घोळ होतो सगळा. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये काय फरक आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याच मिटिंगमध्ये एका टूर मॅनेजरला विचारलं, ‌‘तू आधीच्यांना दादा का म्हणतोस?‌‘ तर म्हणाला, ‌‘मी त्यांना मोठे म्हणून मान देतो. आपल्याला तसंच शिकवलं गेलंय नं?‌‘ हाच तो फरक. घरातल्या गोष्टी, आपले देव धर्म, आपली परंपरा हे सगळं आपला अभिमान आहे आणि त्याची कदर आपण केलीच पाहिजे, नो डाऊट अबाऊट इट, पण एकदा का आपलं पाऊल आपल्या कार्यक्षेत्रात पडलं की तिथे समानतेची, एकतेची आणि एकमेकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत झाली पाहिजे. सगळे एका लेव्हलवर. सगळ्यांना कोणत्याही विशेषणांशिवाय नावाने हाक मारायची. मान द्यायचाच असेल तर ‌‘तुम्ही‌‘ असं म्हणा ‌‘तू‌‘ ऐवजी. मराठीत ती सोय आहे. इंग्लिशमध्ये ती सोय नाही. भाषेनेच सगळ्यांना एका लेव्हलवर आणलंय. ही सोय भाषेने शब्दांमध्ये केलेली असो वा नसो, मान देणं किंवा आदर करणं हे शब्दांपेक्षा टोनवरून, आपल्या देहबोलीवरून जास्त दिसतं. कधी कधी आपल्याला जाणवतं नं एखादी व्यक्ती शब्द फार मधाळ वापरते, अगदी टोन पण छान असतो पण मनात मात्र त्या शब्दांचा भावही नसतो. मतितार्थ, आदर हा आधी मनात असतो आणि मग तो बाहेर दिसतो. त्याला दादा, ताई, सर, मॅडमची गरज नाही. आमच्या को-फाऊंडर नील ला सर्वजण ‌‘नील‌‘च म्हणतात. दादा सर म्हटलं तर तोच त्यांना करेक्ट करायला लावतो. प्रश्न पडला तो आमच्या बाबतीत. आम्हाला कुणी हाकच मारेना. मग आम्ही त्या नियमाची सुधारित आवृत्ती आणली. वयाची अठ्ठावन्न वर्ष म्हणजे रीटायरमेंटचं एज पार केल्यावर किंवा ज्यांनी केलंय त्यांना सर, मॅम, ताई, जिजाजी ओके. थोडक्यात आम्हाला कुणीतरी हाक मारून कॉन्व्हर्सेशन करावं ह्यासाठी शोधलेली ही एक क्लुप्ती. आता हे दादा, ताई, सर, मॅम चं इरॅडिकेशन करणं वेळ खाऊ असणार आहे पण आम्ही डिटरमाइंड आहोत. आमच्यात पेशन्स आहेत. बदल घडायला वेळ लागतो पण जे करायचंय त्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर गोष्टी घडतातच आणि त्या घडवायच्या असतात.

मागच्या आठवड्यात मान सन्मानाची संधी नील ला मिळाली. एका प्रेस्टिजियस ॲवॉर्ड फंक्शनमध्ये `फ्युचर फेस ऑफ ट्रॅव्हल‌’ ह्या अतिशय जबाबदारीपूर्ण टायटलने त्याला सन्मानित केलं गेलं. त्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांचं आणि प्रयत्नांचं ते फळ होतं. आणि त्याचं सायटेशन करताना त्यांनी म्हटलं, ‌‘कॅरिंग फॉरवर्ड द लेगसी, ॲट द सेम टाइम क्रिएटिंग हिज ओन निश‌’. ऑर्गनायझेशनसाठी ही फार महत्वाची गोष्ट असते. `जुनं ते सोनं आणि नवं ते हवं‌’ ह्या दोन्हीचा मेळ घालता आला तर ऑर्गनायझेशन्स पुढे जातील, येणाऱ्या जागतिकीकरणात तग धरून राहू शकतील. वाढू शकतील. नील ला म्हटलं, ‌‘ऑर्गनायझेशच्या वतीने तुझं अभिनंदन. ग्रेट गोइंग. कीप इट अप. वर्ल्ड इज वॉचिंग युवर एफर्ट्स. आता एक आई म्हणून थोडासा उपदेश, आदत से मजबूर. हा तुझा पहिला मोठा पुरस्कार, तू कालपर्यंत केलेल्या कामाचं फलित, रेकग्निशन महत्वाचं असतं. ती तुझ्या कालपर्यंतच्या कामाची शाबासकी आहे. खुश हो जाओ! आनंद साजरा कर. पण आजच. काय तुझं ते इंस्टा, एफबी आजच काय ते उरकून घे. उद्या हा पुरस्कार विसरून जायचा. पूर्णपणे. त्यात अजिबात अडकून पडायचं नाही. उद्या तुझी प्रयत्नांची अखंड लढाई पुन्हा सुरू. ॲवॉर्ड ज्या दिवशी मिळतं त्या दिवशी ते संपवायचं असतं. आणि हो पुढचं आणखी मोठं ॲवॉर्ड मिळण्यासाठी काम करू नकोस. कर्मण्येवाधिकारस्ते!‌‘. नील कदाचित मनात म्हणाला असेल, `अरे यार! ही मला ॲवॉर्ड सेलिब्रेशनचा आनंदही मिळवू देत नाहीये‌’. पण इट्स ओके, पुरस्कार हा भूतकाळ आहे. भविष्यात मिळणारी ॲवॉर्डस्‌‍ हे स्वप्नरंजन आहे. आणि मुख्य म्हणजे पुरस्कार एका प्रकारचं उच-नीच दर्शवणारं परिमाण पण आहे. तुम्हाला आठवत असेल तर पुर्वी दहावी बारावी परीक्षेत बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित व्हायची आणि ह्याच कारणात्सव ती यादी छापणं सरकारने बंद केलं. ते एक खूप छान पाऊल होतं. दहावी बारावीची परीक्षा म्हणजेच सर्व काही ह्या समीकरणाला त्यांनी शह दिला आणि त्यामुळे इतर मुलांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांना त्यांनी रोखलं.

विंबल्डनच्या टेनिस मॅचेस आपण सगळेच बघतो. शिस्तबद्धपणे खेळल्या जाणाऱ्या एका बहारदार खेळाचा तो एक अफलातून अनुभव असतो. त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट असते ती म्हणजे खेळ संपल्यावर रॉजर फेडरर असो वा नोव्हाक जोकोविच, रफायेल नदाल असो वा कार्लोस आल्काराझ, जगज्जेते प्लेअर्स आपली बॅग स्वत: भरतात, सगळ्या गोष्टी शांतपणे त्या बॅगेत नीट ठेवतात आणि पॅव्हेलियनमध्ये निघून जातात. आता हे त्या खेळाचं कल्चरंच आहे किंवा शिस्त किंवा स्वयंपूर्णता हे मान्य. म्हणजे तिथे असलेले बॉल किड्स वा ऑफिशियल मंडळी अगदी प्रेमाने त्या गोष्टी ह्या देवतुल्य खेळाडूंसाठी करतील पण नाही, ‌‘ट्रेडिशन जपणं‌‘ हे खेळाडूंना त्या लाड प्यार वा सॉर्ट ऑफ हुजरेगिरीपेक्षा जास्त महत्वाचं वाटतं.

जगात किंवा आपल्या लिव्हिंग रूममधल्या स्क्रीनवर अशा अनंत छान छान गोष्टी आपल्याला दिसत असतात त्यापासून इन्स्पिरेशन घेत पुढे जाऊया. द वर्ल्ड इज ब्युटिफुल. लेट्स रीस्पेक्ट इच अदर.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
10 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
10 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
10 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top