India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

इब्न बतूताच्या देशात!

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
July 31, 2026
July 31, 2026

Quick Summary

इब्न बतूताच्या प्रवासाची प्रेरणा घेऊन मोरोक्कोला आरामदायी पण उत्साही मनाने भेट द्या.

माराकेशमध्ये लालसर मातीच्या भिंती आणि मदिना परिसरातील वातावरण अनुभवायला विसरू नका.

जेमा अल-फना स्क्वेअरच्या पहिल्या संध्याकाळी ढोल, गारुडी, मेहंदी आणि मसाल्यांचा थरार अनुभवून घ्या.

माराकेशमध्ये ज्यूसला कधीही नाही म्हणू नका, कारण ताजे आंबट-गोड ऑरेंज ज्यूस कमाल असतो.

रियादमध्ये हॉटेलऐवजी राहा, कारण आतल्या मोझॅईक टाइल्स, अंगणातील कारंजं आणि उबदार खोल्या मन जिंकतात.

रियादमध्ये हमखास मिंट टी आणि खोब्ज ब्रेड, म्सेमेन पॅनकेक्सचा नाश्ता घ्या, आणि चहाची धार ओतण्याची खास पद्धत पाहा.

Published on Loksatta Lokrang Date 02nd August 2026.

...ते झाकण उचलताच सुगंधाची एक उबदार लाट हवेत पसरली. 

लोणच्यातील लिंबूऑलिव्ह्ज आणि केशर यांच्या साथीने मंद आचेवर 

शिजवलेलं चिकन इतकं मऊरसाळ आणि चवदार होतं की...  

‌‘इब्न बतूता, बगल मैं जूता‌’ हे गाणं ऐकत असतानामी जगातल्यामला माहीत असलेल्या सर्वाधिक साहसी पर्यटकाच्या प्रवासाचा विचार करीत होते. सन 1304 मध्ये टँजियर येथे जन्मलेला इब्न बतूता वयाच्या 21व्या वर्षी जगप्रवासाला निघाला होता. तो मोरोक्कोचा रहिवासी होता. त्याला प्रवासाची असीम इच्छा होती आणि हे जग आपली काळजी घेईलयावर त्याची श्रद्धा होती. त्याच्या या शब्दांमध्ये प्रवासातील सगळ्या कडूगोड आठवणींचा गंध सामावलेला आहे. तो म्हणतो, “मी एकटाच प्रवासाला निघालो. माझ्यासोबत समरस होईल असा कोणी सहप्रवासी नव्हता. तसंचमी कोणत्या काफिल्याचाही भाग नव्हतो. पण माझ्या मनात दीर्घकाळ जपून ठेवलेली पर्यटनाची अमर्याद इच्छा होती. वैभवशाली स्थळांना भेटी देण्याची अनिवार ओढ ही माझी प्रेरणा होती. म्हणून मी माझ्या प्रियजनांना सोडण्याचा निर्धार केला आणि पक्षी ज्याप्रमाणे त्यांच्या घरट्याचा त्याग करताततसाच मी घरादाराचा त्याग करून निघालो...” 

त्यानंतरआज कित्येक शतकांनी मोरोक्कोकडे जाणाऱ्या विमानात चढताना माझ्याही मनात संमिश्र भावना होत्या. माझा प्रवास त्या मानाने साधा - सरळ आणि आरामदायी होता. पण अज्ञात प्रदेशात जात असल्याची हुरहूर तीच होती. इब्न बतूताच्या या भूमीत मी मोकळ्या मनाने आणि उत्साही अंत:करणाने पाऊल टाकलं. ही भूमी मला मंत्रमुग्ध तर करेलचपण प्रसंगी भांबावूनही टाकेल याची खात्री होती! 

माराकेश - कायम जागणारं लालेलाल शहर 

मोरोक्कोत पहिलं शहर पाहिलं ते माराकेश. मदिना परिसरात गाडी शिरत असतानाच या शहराला लाल शहर का म्हणतातयाची प्रचिती आली. लालसर मातीच्या भिंतींनी या शहराला ही ओळख दिली आहे. मला चटकन जयपूरचीआपल्या ‌‘गुलाबी शहराची‌’ आठवण आली. या दोन्ही शहरांना वाळवंटातील वाळू आणि जुने दगड यांची देखणी साथ लाभलेली आहे. 

भुरळ पाडणारे जेमा अल-फना  

या शहरातील पहिल्याच संध्याकाळी मी सुप्रसिद्ध जेमा अल-फना या स्क्वेअरमध्ये आले. तिथे मी जे पाहिलं त्याची मी अजिबात कल्पना केली नव्हती. तो स्क्वेअर म्हणजे जबरदस्त रंगमंच होता. सर्व कलांचा मेळाच जणू. ढोलवादक त्यांच्या तालात होतेगारुडी नाग डोलवत होतेमेहंदीवाले मी मेहंदी काढून घ्यावी म्हणून आग्रह करीत होते... या कलाकारांचा गोतावळा आपापली कला पेश करीत असतानाच मसाल्यांचा घमघमाट पोटातली भूक चाळवत होता. तिथे मला जिंकून घेतलं ते ज्यूसवाल्यांनी. कंदिलांच्या प्रकाशात उजळलेले त्यांचे स्टॉल्ससंत्र्यांच्या आणि द्राक्षांच्या पिरॅमिडसारख्या रचलेल्या चळती दूरूनही आकर्षक दिसत होत्या. मी त्या स्टॉल्सशेजारून जात असताना त्यांचं बोलावणं आलं... “काजोल! शाहरुख! बॉलीवूड!” मला हसू आवरलं नाही. तेवढ्यात एका ज्यूसवाल्याने डोळे मिचकावतथंडगार ऑरेंज ज्यूसचा ग्लास माझ्या हातात दिला. ताजाआंबट-गोड ज्यूस कमाल होता. शिवाय भलताच स्वस्तही होता. त्या रात्री मोरोक्कोच्या प्रवासातील पहिला नियम मी शिकलेमाराकेशमध्ये ज्यूसला कधीही नाही म्हणायचं नाही.  

रियादमधील मुक्काम 

मोरोक्कोमध्ये हॉटेलऐवजी तिथल्या रियादमध्ये राहण्याची संधी मिळाली. इथे राहताना मला राजस्थानमधल्या हवेल्यांची आठवण झाली. बाहेरून बघितलं  तर साधी मातकट रंगाची एक भिंत होती. पण त्या दारातून आत पाऊल टाकताच जणू एका गुप्त विश्वात प्रवेश केल्यासारखं वाटलं. समोरच होतं सुंदर मोझॅईक टाइल्सच्या नक्षीने सजलेलं प्रशस्त अंगणमध्यभागी अखंड खळाळणारं कारंजं आणि त्या अंगणाभोवतीच्या उबदारदेखण्या आणि आरामदायी खोल्यांकडे घेऊन जाणारे जिने. रियादमधील प्रत्येक भिंतप्रत्येक खांब आणि कोपरा मोरोक्कोमधील पारंपरिक झेलीज टाइलवर्कने नटलेला होता. निळ्याहिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या रंगीबेरंगी छोट्या टाइल्स वापरून तयार केलेली वेगवेगळी डिझाईन्स अंतहीन भासत होती. 

सकाळी जाग यायची ती नाश्त्यासाठी केलेल्या पदार्थांच्या मोहक सुगंधाने. नाश्त्याला गरमागरम खोब्ज ब्रेडमधाने ओथंबलेले म्सेमेन पॅनकेक्सऑलिव्ह आणि त्यासोबत हमखास मिळणारा मिंट टी असा बेत असायचा. हा सर्व्ह करण्याची पद्धतही औरच होती. ती मोठ्या कौशल्याने उंचावरून चहाची धार ओतायची. ती धार पुदिन्याच्या ताज्या पानांनी काठोकाठ भरलेल्या लहानशा ग्लासांमध्ये विसावायची. चहा एकदम कडकवाफाळता आणि भलताच गोड असायचा. पहिल्यांदा घेतला तेव्हा त्याचा पहिला घोट मला जरा जास्तच गोड वाटला. पण दुसऱ्या घोटापासून त्याची चव मनात रेंगाळायला लागली. आणि मग तिसरा ग्लास संपेपर्यंत मी या चहाच्या प्रेमातच पडले. दिवसाचा कोणताही प्रहर असोमोरोक्कोतील कोणेतंही शहर असो... मिंट टी माझा सोबती बनला. ते फक्त पेय नव्हतंती एक परंपरा होतीती कविता होती.  

तजिनची अनोखी चव 

प्रवासातील एका रात्री माझी मोरोक्कोच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीशी म्हणजे तजिनशी ओळख झाली. त्या हॉटेलचे मालक तो वाढण्यासाठी टेबलपाशी आले तेव्हा पहिल्याप्रथम नजरेत भरलं ते याचं शंकूच्या आकाराचं झाकण असलेलं पारंपरिक मातीचं मडकं. मोरोक्कोमध्ये तजिन हा शब्द या वैशिष्ट्यपूर्ण भांड्यासाठी आणि त्यात मंद आचेवर शिजवल्या जाणाऱ्या पदार्थासाठीही वापरतात. 

शंकूच्या आकाराचं ते झाकण उचलताच सुगंधाची एक उबदार लाट हवेत पसरली. लोणच्यातील लिंबूऑलिव्ह्ज आणि केशर यांच्या साथीने मंद आचेवर शिजवलेलं चिकन इतकं मऊरसाळ आणि चवदार होतं की प्रत्येक घास साधा असूनही त्याची चव सुखावणारी होती.

मातीच्या त्या भांड्यात इतिहासपरंपरा आणि आदरातिथ्य यांचा अस्सलपणा साठलेला होता. मोरोक्कोहून परतताना भेट देण्यासाठी ताजिन हे उत्तम सोव्हेनियर सुद्धा आहे. 

हमाम - काळा साबण आणि वाफ 

मोरोक्कोला जाऊन हमामचा अनुभव घेतला नाहीतर मोरोक्कोचा प्रवास अपूर्ण राहीलअसं मला अनेकांनी सांगितलं होतं. त्यामुळे मनात उत्सुकता आणि थोडीशी धाकधूक ठेवूनच मी त्या वाफांनी भरलेल्या पारंपरिक स्नानगृहातम्हणजे हमाममध्ये पाऊल ठेवलं. स्थानिक महिला तिथे निवांत गप्पा मारीत होत्यास्नान करीत होत्याबादलीने गरम पाणी अंगावर घेत होत्या. मग माझ्याही हातात ‌‘सॅव्हॉन न्वार‌’(Savon Noir) या काळ्या रंगाच्या साबणाची एक बाटली देण्यात आली. ऑलिव्ह आणि निलगिरीचा अर्क यांच्यापासून बनवलेला तो काळा साबण होता. त्यांचा रंग डांबराच्या रंगाशी स्पर्धा करीत होता. तो मी अंगाला लावला आणि त्यानंतर लगेचच एक महिला एक्सफोलिएटिंग हातमोजा घालून अगदी सराईतपणे माझे अंग घासायला लागली. त्वचेवरील मृत पेशींचे थर निघून गेले आणि काही वेळातच माझी त्वचा गुलाबी आणि तजेलदार झाली. मला जणू नव्याने जन्म झाल्यासारखे वाटत होते.

टॉवेलमध्ये स्वतःला गुंडाळून जेव्हा मी हमाममधून बाहेर पडलेतेव्हा अंगभर एक सुखद ताजेपणाची जाणीव पसरली होती. बाहेर पडताना त्या काळ्या साबणाची एक बरणी मी आवर्जून विकत घेतली. मोरोक्कोच्या या जादुई हमामचा एक छोटासा अंश तरी सोबत घरी घेऊन जावाएवढीच इच्छा होती. 

फेझ - काळाचा एक पांढरा भुलभुलैया 

माराकेशच्या उत्साहानेगजबजाटाने मला दिपवून टाकलं होतंपण फेझमध्ये मला शांततानिवांतपणा लाभला. फेझ एल-बाली मदिना हे जगातील सगळ्यात मोठ्या वाहनमुक्त क्षेत्रांपैकी एक आहे. सुमारे 9,000 अरूंद गल्ल््यांचं हे जाळं इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यापैकी काही बोळांमधून तर गाढवंही अंग चोरून वाट काढतात. अशा या बोळांमध्ये हरवणं स्वाभाविकच आहे. 

मला फेज हे शहर जुनं आणि गूढ वाटलं. काही घरांचा कोरीव लाकडी बाल्कनींचा दिमाख टिकून होतातर काही घरे काळाच्या ओघात जीर्ण झाली होती.

या गल्लीबोळांतून फिरताना अनेक दुकानांमध्ये कारागीर त्यांच्या त्यांच्या कामात गढलेले दिसले. कुणी पितळी वस्तू घडवत होते, कुणी कापडं रंगवत होते, तर कोणी हातमागावर सुंदर गालिचे विणत होते. हे पाहून माझं मन त्या शहराच्या प्रेमात पडलं. 

रबात - सागराची अभिजातता 

मोरोक्कोची राजधानी असलेल्या रबातमध्ये आल्यावर मी वेगळ्याच मोरोक्कोमध्ये आले आहे असं वाटलं. राजधानीचं हे शहर अधिक शांतसुव्यवस्थित आणि सुसंस्कृत होतं. रस्ते रुंद आणि पाम ट्रीजनी आच्छादलेले होते. इथल्या अटलांटिक महासागराकडे तोफ्लड करून उभ्या असलेल्या ‌‘कसबाह ऑफ उदायस‌’ मध्ये रबातचं आणखी एक कोमल रूप समोर आलं. त्याच्या निळ्या आणि पांढऱ्या भिंती उन्हात चमकत होत्या. मी तिथल्या तटबंदीवरून किनाऱ्यावर एकामागोमाग येणाऱ्या लाटांकडे एकटक पाहत होते. त्याच्या अभिजात सौफ्लदर्याने मला भुरळ घातली होती.  

 मग आम्ही पोहोचलो शेफशाऊएनमध्ये. मोरोक्कोमधील पर्वतरांगांच्या कडेकपारीत वसलेलं हे एक प्रसिद्ध आणि सुंदर शहर आहे. पूर्णपणे निळ्या रंगात न्हाऊन निघालेलं हे शहर स्वप्नवत आहे. इथली प्रत्येक भिंतप्रत्येक पायरीप्रत्येक दरवाजा निळ्या रंगाच्या विविध छटांनी सजलेला आहे. ही निळाई पाहताना मला आपल्या जोधपूर शहराची आठवण झाली.या निळाईच्याही कथा आहेत.

निळ्यारंगामुळेडासयेतनाहीतअसं काहींनी सांगितलंतर निळा रंग त्यांना आकाशाचं रूप वाटतो असं काहींनी. मी एका छतावरील कॅफेत बसून चहाचा आस्वाद घेतलाउबदार ब्लँकेट्स विकत घेतली. मग फुटबॉल खेळणारी मुले पाहत मी एके ठिकाणी शांतपणे थांबले. इथली शांततानिळाईचे रंग आणि निवांतपणा मी माझ्यात सामावून घेतला. 

मघरेबची कहाणी 

मोरोक्को हा मघरेबचा भाग आहे. मघरेब म्हणजे ‌‘मावळत्या सूर्याची भूमी‌’. तिथली प्रत्येक संध्याकाळ अवर्णनीय होती. घरांच्या छतांवरून प्रार्थनेचा आवाज आसमंतात घुमायचा. पाठोपाठ मिनारांनी तोललेलं आकाश नारिंगी रंगात उजळून निघायचं. हे पाहून मघरेबचा अर्थ मनात आणखी खोलवर रुजला. अस्ताला निघालेला सूर्य काही काळ मोरोक्कोत रेंगाळत असल्यासारखं वाटलं. या एका प्रवासात मी वाळवंटपर्वत आणि अथांग समुद्र अशा निसर्गाच्या तिन्ही रूपांचा अनुभव घेतला. 

अखेर मी परतीच्या वाटेवर निघाले. माझं विमान टँजियरवरून हवेत झेपावलं तेव्हा मला पुन्हा एकदा इब्न बतूताची आठवण झाली. तो श्रद्धा आणि जिज्ञासेच्या सोबत प्रवासाला निघाला होता. मीही मोरोक्कोत उत्सुकतेपोटी निघाले होते आणि मनावर कोरलेल्या आठवणी घेऊन परतले. 

 

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
भारताची सुरावट
9 mins, read

भारताची सुरावट

Published in Maharashtra Times 02nd August 2026 ...एकमेकांशी संभाषण करीत असल्यासारखे थोड्या थोड्या वेळाने हॉर्न्स वाजत असतात, रस्त्यावरचे विक्रेते ‌‘वडा पाव‌’ किंवा ‌‘कटिंग चाय‌’च्या आरोळ्या ठोकत अ

प्रवास स्थलांतराचा ...
9 mins, read

प्रवास स्थलांतराचा ...

Published in Maharashtra Times 26th July 2026 ...या प्रवासात हजारो फुलपाखरे विसाव्यासाठी एखाद्या झाडावर घोळका करून थांबतात आणि ते झाड फुलपाखरांनी झाकून टाकतात. स्थलांतराचा हंगाम ऐन भरात असतान

नावात काय आहे?
9 mins, read

नावात काय आहे?

Published in 26th July 2026, Loksatta Lokrang ...आइसलँड हिरव्यागार शेवाळ्याने नटलेला आहे, तर ग्रीनलँड बर्फात गोठलेला टुंड्रा प्रदेश आहे. आक्रमकांची दिशाभूल करण्यासाठी वायकिंग्जनी ही नावांची अ

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!