India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
May 29, 2026
May 29, 2026

Quick Summary

सँटोरिनीच्या कड्यांवरील ओईया गावात कॅल्डेराचे अद्भुत दृश्य प्रत्यक्ष पाहा.

हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये डुंबत उन्हाचा आनंद घ्या आणि कौराबिएदेस व शॉर्टब्रेड कुकीज चाखा.

पांढऱ्याशुभ्र भिंती, निळे घुमटाकार चर्च आणि बोगनवेलींसह पोस्टकार्डसारखी दृश्ये अनुभवायला विसरू नका.

‘वीणा वर्ल्ड’च्या वुमन्स स्पेशल टूर्समधून जबाबदारीशिवाय पूर्णपणे सहलीचा आनंद घेण्यासाठी प्लॅन करा.

ग्रीसमध्ये सहा हजारांहून अधिक बेटं असल्याने एजियन आणि आयोनियन समुद्रातील वेगवेगळे अनुभव निवडा.

ऱ्होड्स, सिमी, सिरोस, मायकोनोस आणि सायक्लेड्ससारख्या बेटांवर इतिहास, निसर्ग आणि व्हायब्रंट वातावरणाचा संगम अनुभवता येतो.

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026

...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभून दिसेल असं चित्र आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो...

समोर पसरलेल्या अथांग निळ्या समुद्राकडे पाहत माझी मैत्रीण महालक्ष्मी मला म्हणाली, “आपण पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान मुली आहोत!” आम्ही आमच्या हॉटेलच्या खोलीला लागून असलेल्या स्विमिंग पूलमध्ये डुंबत, उन्हाचा आनंद घेत होतो. सोबतच बदाम आणि पिठीसाखर यांची पखरण असलेल्या स्वादिष्ट कौराबिएदेस, शॉर्टब्रेड कुकीज यांचा आस्वाद घेत होतो. खाली अथांग सागर पसरलेला होता. तिथून पूर्ण कॅल्डेरा आम्ही पाहू शकत होतो. निसर्गाच्या त्या रुपाने आम्ही एकदम निवांत, प्रसन्न झालो होतो. पारंपरिक सायक्लॅडिक शैलीत डिझाईन करण्यात आलेल्या कडेकपारीतील घरांसाठी प्रसिद्ध असलेले ते गाव अतिशय सुरेख दिसत होते. पांढऱ्याशुभ्र रंगातल्या बाहेरच्या भिंती, त्यांच्या कडा आणि निळं घुमटाकार चर्च हे सारं काही आसपासच्या देखण्या निसर्गाशी तादात्म्य पावलेलं होतं. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या कॅल्डेराचे अद्भुत दर्शन घडवत जणू काही त्या कड्यांवरील घरे एकामागोमाग एक खाली येत आहेत, असा तो एकंदर नजारा होता. आम्ही, ओईया या ग्रीसमधल्या सँटोरिनीच्या वायव्य टोकावर, कड्याच्या माथ्यावर वसलेल्या एका नयनरम्य गावातील हॉटेलमध्ये उतरलो होतो. ते हॉटेल म्हणजे स्थापत्य कलेच्या सुंदर आविष्काराचे उत्तम उदाहरण होते. स्थापत्यकलेच्या अशा आविष्कारासाठीच तर ग्रीसमधील सँटोरिनी प्रसिद्ध आहे. त्यामुळे, माझी मैत्रीण महा म्हणाली ते खरंच होतं, या विलक्षण ठिकाणी आम्ही आलो ते आम्ही भाग्यवान होतो म्हणूनच!

आम्ही तिघी, म्हणजे मी आणि माझ्या दोन शाळकरी वयापासूनच्या मैत्रिणी, महालक्ष्मी म्हणजेच महा आणि रुची दरवर्षी एक झकास वार्षिक सुट्टी घेतो. भटकंती करतो. ही आमची अनेक वर्षांची प्रथा आहे. ही सुटी म्हणजे आमचा खास वेळ असतो. धकाधकीच्या जीवनातले हे आमचे  विश्रांतीचे क्षण असतात. यावेळी आम्ही तिघीही आई किंवा कोणत्याही व्यावसायिक पदांवरच्या अधिकारी अशा काहीही नसतो, तर नवनवीन साहसांच्या शोधात भटकंतीसाठी निघालेल्या तीन खास मैत्रिणी असतो. खरंतर आमच्याप्रमाणेच बऱ्याच महिलांना असा मुक्त प्रवास करण्याची इच्छा असते. पण त्यांना स्वत:हून जगभ्रमंती करण्यासाठी योग्य ती व्यवस्था असतेच असे नाही. म्हणूनच आम्ही ‌‘वीणा वर्ल्ड‌’मध्ये केवळ महिलांसाठी असे विश्व तयार केले आहे. तिथे सगळ्या महिला त्यांच्या मनाप्रमाणे, कोणतीही जबाबदारी खांद्यावर न घेता पूर्णपणे सहलीचा आनंद घेऊ शकतात. ‌‘वीणा वर्ल्ड‌’च्या वुमन्स स्पेशल टूर्समध्ये जगभरातील पर्यटनस्थळांचे मुबलक पर्याय उपलब्ध आहेत.

असंच एकदा कुठे जायचं याची आम्ही तिघी चर्चा करीत होतो. आमच्या ‌‘विशलिस्ट‌’मध्ये अनेक ठिकाणं होती. त्यात सांस्कृतिक सफर, इतिहासाचा वेध, देखण्या निसर्गाची साथ, स्फटिकासारख्या नितळ समुद्रात डुंबण्याची संधी, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद... यापैकी नेमकं काय असावं यावर आम्हा मैत्रिणींमध्ये चांगलंच विचारमंथन झालं. अखेर मी आमच्या ‌‘वीणा वर्ल्ड‌’च्या कस्टमाईज्ड हॉलिडेज डिव्हिजनकडेच आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारं ठिकाण शोधण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी आमच्या अपेक्षांचा सारासार विचार करून, अखेर आम्हाला ग्रीसची निवड करून दिली. अथेन्ससोबत ग्रीक बेटांची सैर करण्याचा इरादा आमच्या यादीत वरच्या स्थानीच होता, पण सगळ्यात कठीण होतं ते ठिकाणाची निवड करणं आणि ते काम आमच्या टीमने सोप्पं केलं. ग्रीसमध्ये सुमारे सहा हजारापेक्षा जास्त बेटं आहेत. त्या प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे. ही बेटं एजियन आणि आयोनियन समुद्राच्या निळ्याशार पाण्यात रत्नांप्रमाणे विखुरलेली आहेत. एकदम वेगळ्या धाटणीच्या सँटोरिनीमधील मन मोहवून टाकणाऱ्या सूर्यास्तापासून ते कॉर्फूच्या हिरव्यागार निसर्गरचनेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दिलखेचक अनुभव या बेटांवर घेता येतात. डोडेकेनीज आयलंड्सपैकी सर्वात मोठं आहे ते ऱ्होड्स आयलंड. या ऐतिहासिक वारशाच्या आणि नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या बेटावर भव्यता आणि इतिहास यांची अद्भुत सांगड घातली गेलेली पाहता येते. इथेच युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असलेले ओल्ड टाऊन आणि समुद्रकिनारे आहेत. त्या जवळच सिमी आयलंडवर रंगीत घरे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर एजियन समुद्र आहे. फारसं माहिती नसलेलं सिरोस आयलंड हेही तिथल्या निओक्लासिकल आर्किटेक्चर आणि अस्सल निसर्ग यांच्यामुळे आपल्याला मोहित करतं. त्याशिवाय  मायकोनोस आणि एकदम व्हायब्रंट असलेल्या सायक्लेड्स या बेटांवर नाईटलाईफ, ख्यातनाम शुभ्र रंगाची वास्तुकला आणि सूर्याच्या प्रकाशात न्हाहून निघालेले सागरकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.

आम्ही या बेटांपैकी कमीत कमी माहिती असलेल्या पण वैशिष्टयपूर्ण अशा पॅरोसची निवड केली. पॅरोसहून आम्ही एक दिवसासाठी अँटी-पॅरोस आयलंडवर चक्कर मारली. नेमकी कोणती आयलंड्स पाहायची हे ठरवून त्याच्या जोड्या ठरवल्या की मग आयलंड हॉपिंग करत ग्रीसचं सौंदर्य अनुभवण्यासारखी मजा नाही. सिरोस-मायकोनोस, ऱ्होड्स-सिमी किंवा अशा इतर आयलंड्सच्या जोड्या आपल्या आपण निवडायच्या आणि मग प्रवासाला सुरुवात करायची. दगडी पायवाटांवरून चालत बोगनवेलींच्या रंगांच्या खेळांनी मस्त सजलेल्या गल्ल््यांमधून चालणं हा आमच्यासाठी स्वप्नवत अनुभव होता. पांढऱ्याशुभ्र घरांच्या पार्श्वभूमीवर गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं एकदम पोस्टकार्डमध्ये शोभून दिसेल असं चित्र आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. आम्ही मग एका छोटेखानी टॅव्हर्नामध्ये पेटपूजेसाठी विसावा घेतला. आम्हाला मनसोक्त भावलेला पारंपरिक ग्रीक पदार्थ मोसाका ऑर्डर केला. औबर्गिन, मीट आणि सॉस यांचे एकावर एक लेयर्स ठेवून केलेला मोसाका कितीही खाल्ला तरी मन काही भरत नव्हतं. ताजेपणा, त्याचा धुंद करणारा गंध आणि स्वादिष्ट चव ही ग्रीक खाद्यपदार्यांची खासियतच आहे. शिवाय ते आरोग्यदायीही असतात! आमच्या खानपानाची सांगता आम्ही बरेचदा पारंपरिक पद्धतीने तयार कलेल्या ग्रीक कॉफीच्या कडक स्वादानेच करत होतो. छोट्या कपात, न गाळता ही कॉफी दिली जाते. तिचा स्वाद एकदम अप्रतिम असतो.

ग्रीसमधला प्रत्येक दिवस एखाद्या स्वप्नासारखा होता. ओईया आणि सँटोरिनीमध्ये आम्ही अनुभवलेल्या सूर्यास्ताची जगातील कोणत्याही सूर्यास्ताशी तुलनाच होऊ शकत नाही. सँटोरिनीमध्ये सगळ्यात खास ठरली ती कॅल्डेराच्या आसपास केलेली क्रूझ सफर. या क्रूझ सफरीत आम्ही समुद्रातील गुहा, ज्वालामुखीमुळे तयार झालेले हॉट वॉटर गीझर्स पाहिले. इथल्या स्फटिकासारख्या नितळ स्वच्छ पाण्यात डुबकी मारण्यास आम्ही सज्ज होतो. माझ्या आईने मला लहानपणीच पोहायला शिकवलं याबद्दल मी मनोमन तिचे आभार मानले. माझी मैत्रीण रुची, थोडी चिंतेत असली तरी धाडसाने बोटीच्या काठावर येऊन प्रथमच समुद्रात उडी मारायला सज्ज झाली होती. तिलासुद्धा आपल्याला जमेल पोहायला असा विश्वास वाटत होता. त्यामुळे ही सफर म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरला.

सँटोरिनीमध्ये आम्ही स्थानिक चवींच्या वाईनचाही आस्वाद घेतला. या बेटाचं सुंदर निसर्गचित्र रेखाटणाऱ्या स्थानिक कलाकारांचं कौतुक केलं. हाताने बनवलेल्या दागिन्यांची, कापडाची दुकानं पाहात पुढे निघालो. ही सगळी दुकानं आणि हा परिसर मध्यरात्रीपर्यंत खुला असतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर सहज फेरफटका मारत आपण इथे खरेदी करू शकतो. सँटोरिनीचा निरोप घेणं आम्हाला खूपच अवघड वाटत होतं, इतके आम्ही त्या बेटाच्या प्रेमात पडलो होतो.

यानंतरचं ठिकाण होतं इतिहास आणि पौराणिक कथांनी नटलेलं अथेन्स. इथे आम्हाला अँजेला ही आमची गाईड भेटली. ती अतिशय उत्साही होती. तिच्याकडे इतिहास जिवंत करून सांगण्याची हातोटी होती. अथेन्सच्या आकाशरेषेवर ॲक्रोपोलिस या प्राचीन बालेकिल्ल््याचे वर्चस्व सर्वत्र जाणवते. इथे पार्थेनॉन हे ग्रीसमधील अथेना देवतेचे प्राचीन मंदिर आहे. अँजेलाने या सर्व परिसराचे महत्त्व सांगितले. याला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा आहे. अथेना ही बुद्धी आणि युद्ध यांची देवता. मूळ मंदिर चकचकीत, गुळगुळीत संगमरवरी दगडांचं असून डोरिक शैलीत बांधलेलं आहे. हे केवळ धार्मिक स्थान नसून अथेन्सच्या लोकशाही आदर्शांचं प्रतीक असल्याचं अँजेलाने आम्हाला आवर्जून सांगितलं. या भव्य मंदिराचं बांधकाम शहराच्या सुवर्णयुगाशी सुसंगत असंच होतं.

ग्रीक पौराणिक कथा मला आवडतात. अथेन्सचं नाव कसं पडलं ही त्यातलीच एक गोष्ट आहे. त्यानुसार, अथेन्सला एका संरक्षक देवतेची गरज होती. त्यासाठी, अथेना आणि पोसायडन या दोन ऑलिम्पियन देवतांमध्ये स्पर्धा झाली. समुद्रदेवता पोसायडनने शक्तिशाली त्रिशूळाने जमिनीवर प्रहार केला आणि तिथून पाण्याचा झरा वाहू लागला, तर बुद्धी आणि युद्धदेवता असलेल्या अथेनाने शक्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी ॲक्रोपोलिसवर समृद्धी आणि शांततेचे प्रतीक म्हणून ऑलिव्हचे झाड लावले. नागरिकांना अथेना देवतेची कृती भावली. ऑलिव्ह झाडाच्या प्रतीकात्मकतेने आणि उपयुक्ततेने ते प्रभावित झाले आणि त्यांनी अथेनालाच अथेन्सची संरक्षक देवता म्हणून मान्यता दिली आणि शहराचं नावही तिच्या सन्मानार्थ ठेवलं. आता ते ऑलिव्हचे झाड, अथेना आणि अथेन्सशी संबंधित एक पवित्र प्रतीक बनले आहे.

अथेन्सच्या मध्यभागी प्लाका म्हणजेच चिंचोळ्या गल्ल््या आणि निओक्लासिकल घरं यांचा समावेश असलेला एक मोहक परिसर आहे. आम्ही अँजेलासोबत तिथे भटकलो. दुकानं, रस्त्यावरील बाजारपेठा आणि पारंपरिक टॅव्हर्ना... सगळीकडे एकदम प्रसन्न, उत्साही वातावरण होतं. रात्री आम्ही एका कॅफेमध्ये बसलो होतो. समोरच ॲक्रोपोलिस दिसत होता. त्याची ती प्रकाशमान नजाकत नजर हटू देत नव्हती. अँजेला म्हणाली, “आपण अथेन्समध्ये कधीही हरवत नाही. कारण ॲक्रोपोलिस संपूर्ण शहरातून कुठूनही दिसतो. अक्रोपोलिसकडे एक नजर टाकून आपण नेहमी स्वत:चा नेमका मार्ग शोधू शकतो!” ग्रीसने बुद्धिमत्ता, शौर्य, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान या क्षेत्रात जगाला कायमच मार्ग दाखवलाय. लोकशाहीचा आदर्श घालून दिलाय. म्हणूनच ॲक्रोपोलिसप्रमाणेच अथेन्सही सगळ्यांना मार्गदर्शन करणारं होकायंत्र आहे.

अखेर आम्ही शेवटची ग्रीक कॉफी घेण्यासाठी पोहोचलो. मनात आमच्या मैत्रीच्या आठवणी रुंजी घालत होत्या. शेवटी मैत्री ही वर्षांमध्ये मोजली जात नाही, तर आपण एकमेकांसोबत किती मौल्यवान क्षण साजरे केलेत त्यावर त्या मैत्रीचा घट्टपणा ठरतो. कॉफीचे घोट घेतल्यावर जड अंतःकरणाने आम्ही अथेन्सचा निरोप घेतला खरा, पण त्याचवेळी परत येण्याचंही मनोमन ठरवलं. कारण ग्रीसचं सौंदर्य टिपण्यासाठी केवळ एक ट्रिप पुरेशी नाही हे आम्हाला मनापासून पटलं होतं!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
8 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

प्रवासाला निमित्त कशाला?
8 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

नमस्ते लंडन!
8 mins, read

नमस्ते लंडन!

Published in Loksatta Lokrang. Date 24th May, 2026 ...लंडनच्या राणीला भेटायला उत्सुक असलेल्या पुसी कॅटपासून ते कायम स्मरणात राहणाऱ्या ‌‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन‌’पर्यंत अनेक नर्सरी ऱ्हाइम्स अनेकां

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top