We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

चवींच्या शोधात...

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्समध्ये दुपारच्या जेवणासाठी तुलनेने कमी खर्चात उत्तम अनुभव मिळतो, त्यामुळे बचतही होते.

दरवर्षी मैत्रिणींची टूर प्लॅन करा आणि ‘वीणा वर्ल्ड’च्या कस्टमाईज्ड हॉलिडेज् टीमकडून आखणी करून घ्या.

सँटोरिनीतील यॉटवरील सूर्यास्त, प्रागची वास्तूकला पायी पाहणे आणि लंडनमधील नाट्यप्रयोग अशा आठवणींसाठी वेळ काढा.

जिथे कुठे जाता तिथे हक्कासनचा प्रथम शोध घ्या, कारण खवय्यांसाठी प्रत्येक सहलीत काय आणि कुठे खायचं हे महत्त्वाचं असतं.

मिशेलिन स्टार्स खाद्यपदार्थ, दर्जा, सादरीकरण, रेस्टॉरंटची ठेवण आणि एकूण अनुभव यावरून दिले जातात, त्यामुळे रेटिंगला अर्थ असतो.

मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स लवकर फुल्ल होतात, त्यामुळे वेटिंग लिस्ट महिन्यांची किंवा वर्षभराची असू शकते म्हणून आधीच बुकिंग करा.

Published in Loksatta Lokrang 12th July 2026

...मिशेलिन स्टार मिळालेल्या काही रेस्टॉरंट्समध्ये रात्रीच्या जेवणापेक्षा

दुपारच्या जेवणासाठी तुलनेने कमी पैसे मोजावे लागतात. म्हणजे आपली

बचतही होते आणि उत्तमोत्तम रेस्टॉरंट्समध्ये जेवल्याचा आनंदही मिळतो...

‌जगभरातील चवींच्या प्रवासाची आमची सुरुवात झाली ती आम्ही मैत्रिणी न्यूयॉर्कमध्ये जेवायला एकत्र भेटलो तेव्हा! त्या रात्री आम्ही जेवणात काठी रोल्सचा मनसोक्त आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. शाळकरी वयापासूनच्या आम्ही मैत्रिणींनी दरवर्षी एखाद्या नवीन ठिकाणी भेट द्यायची असं ठरवलं आहे. त्या मैत्रिणी अमेरिकेत, मी मुंबईत. त्यामुळे नियमित भेटीगाठी होत नव्हत्या. त्यात सगळ्या आपापल्या कुटुंबांच्या, व्यवसायांच्या व्यापांमध्ये व्यग्र असल्याने असं काही ठरवून ते निभावणं आणि ही परंपरा सुरू ठेवणं हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कितीही गडबडीत असलो तरी आपण आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ काढतोच ना... आणि मित्रमैत्रिणी म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिलीच की. म्हणून मग फॅमिलीसोबत जातो, तशी आम्ही दरवर्षी मैत्रिणींची टूर काढू लागलो. आमच्या या टूर्स मेमोरेबल करण्याचं बहुतांश श्रेय जातं ते ‌‘वीणा वर्ल्ड‌’च्या ‌‘कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ टीम‌’ला. ते टूरची करत असलेली आखणी, त्यातील वैविध्य यामुळे आम्हा मैत्रिणींचा प्रवास संस्मरणीय होत आला आहे. सँटोरिनीमध्ये यॉटवरून न्याहाळलेला सूर्यास्त असो, प्रागच्या वास्तूकलेची पायी भटकत डोळे भरून पाहिलेली नजाकत असो किंवा लंडनच्या नाट्यगृहातील भारून टाकणारा प्रयोग असो... एकापेक्षा एक आठवणी आहेत आमच्या. त्यात आम्ही स्वयंघोषित खवय्ये. त्यामुळे प्रत्येक सहलीत काय आणि कुठे खायचं हे ठरवणंही तेवढंच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असतं. या खवय्येगिरीची सुरुवात झाली ती न्यूयॉर्कमधल्या हक्कासन रेस्टॉरंटपासून. आणि आजही आम्ही त्याच्या प्रेमात आहोत. त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे हक्कासनचा प्रथम शोध घेतो कारण तिथे मनसोक्त खाल्ल्याशिवाय ती सहल पूर्ण झाली असं आम्हाला वाटतच नाही.

जगभरातील अनेक ठिकाणी आमच्या गेस्ट्ससाठी आम्हाला खासमखास रेस्टॉरंट्स बुक करावी लागतात. त्यापैकी आमचे काही कॉर्पोरेट गेस्ट्स तर त्यांच्या वरिष्ठांसाठी खास मिशेलिन स्टार रेटिंग असलेल्या रेस्टॉरंट्सचा आग्रह धरतात. हे मिशेलिन स्टार्स मिळवणं फारच अवघड असतं. खाद्यपदार्थ, त्याचा दर्जा, पदार्थ सादर करण्याची पद्धत, रेस्टॉरंट्सची ठेवण आणि एकूणच गेस्ट्सना येणारा अनुभव यांचं परीक्षण करून हे स्टार्स दिले जातात.

सन 1900 मध्ये मिशेलिन या फ्रेंच टायर कंपनीने, वाहनचालकांच्या मदतीसाठी प्रवासमार्गातील खानपान आणि निवास यांची माहिती असलेली यादी, मिशेलिन गाईड तयार करण्यास सुरुवात केली. सन 1926 मध्ये त्यांनी यादीतील उत्कृष्ट रेस्टॉरंट्सना स्टार्स द्यायला सुरुवात केली. या पद्धतीने एवढी मान्यता मिळवली की मिशेलिन स्टार असणं म्हणजे उत्तम जेवण आणि व्यवस्था असं मानलं जाऊ लागलं.

मिशेलिन स्टार रेटिंग:

* वन स्टार: त्या श्रेणीतील अतिशय चांगलं रेस्टॉरंट

* टू स्टार: उत्कृष्ट पाककृती, आवर्जून भेट द्यावी असं रेस्टॉरंट.

* थ्री स्टार: अत्युकृष्ट पाककृती, खास प्रवास करून जावं असं रेस्टॉरंट.

मिशेलिन स्टार रेटिंग हे शेफसाठी असल्याचा समज असतो. पण हे रेटिंग रेस्टॉरंट किंवा हॉटेल यांना दिलेलं असतं. अर्थात, मिशेलिन स्टार रेस्टॉरंटच्या शेफला वेगळीच प्रतिष्ठा असते. मिशेलिनचा एक स्टार नशिबी येणं हीच मोठी गोष्ट असते. तीन स्टार्स मिळाले की ते रेस्टॉरंट आपसूकच जगातल्या सगळ्यात उच्चभ्रू रेस्टॉरंट्सपैकी एक मानलं जातं.

अलीकडे भारतीय पर्यटकांनाही जागतिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला आवडतो. ताजे आणि साधे-सोपे जपानी खाद्यपदार्थ भारतीय खवय्यांचे आवडते आहेत. ‌‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया‌’ यांसारख्या कार्यक्रमांनी उत्कृष्ट खाद्यसंस्कृती थेट आपल्या घरापर्यंत आणून ठेवलीये. त्यातूनही जगभरातील अस्सल प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात पर्यटकांना रस वाटू लागलाय. जगभरात मिशेलिन स्टार रेटिंग हायेस्ट मानलं जातं, पण इतर काही देशांमध्ये त्यांच्याही खास रेस्टॉरंट रेटिंग यंत्रणा आहेत.

ऑस्ट्रेलिया: शेफ हॅट सिस्टीम (गुड फूड गाईड), 1 ते 3 शेफ हॅट्स

अमेरिका: AAA डायमंड रेटिंग्स, 1 (सामान्य) ते 5 (लक्झरी)

यूके: AA रोसेट अवॉर्ड्स, 1 ते 5 रोसेट्स

जपान, हाँगकाँग,चीन: टॅबेलॉग, ब्लॅक पर्ल रेस्टॉरंट गाईड

वर्ल्ड: जगातील सर्वोत्कृष्ट 50 रेस्टॉरंट्स. या रँकिंगला जगभरात मान आहे.

मिशेलिन स्टार्स मिळालेली रेस्टॉरंट्स लगेच फुल्ल होतात. जगातील अशा काही सर्वोत्तम रेस्टॉरंट्सची वेटिंग लिस्ट लांबलचक असते. ही प्रतिक्षा कधीकधी महिन्यांची तर काही वेळा वर्षभराचीही असू शकते. त्यामुळे ट्रिप प्लॅन करीत असताना त्या ठिकाणच्या खास रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा बेत असेल तर मग ॲडव्हान्स बुकिंग केलेलं बेस्ट! शिवाय मिशेलिन स्टार मिळालेल्या काही रेस्टॉरंट्समध्ये रात्रीच्या जेवणापेक्षा दुपारच्या जेवणासाठी तुलनेने कमी पैसे मोजावे लागतात. म्हणजे आपली बचतही होते आणि उत्तमोत्तम रेस्टॉरंट्समध्ये जेवल्याचा आनंदही मिळतो. तुम्हालाही जगभरातील सर्वोत्तम खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर पुढच्या सुट्टीचं नियोजन करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

जागतिक दर्जाच्या खाद्यसंस्कृतीची प्रतीकं मानली जाणारी मोजकीच शहरं आहेत. त्यातही सॅन सेबॅस्टियन, पॅरिस आणि टोकियो यांचा सुप्रतिष्ठित खाद्यस्थळांच्या यादीत वरचा नंबर लागतो. स्पेनच्या बास्क काऊंटीमधील सॅन सेबॅस्टियन येथे मिशेलिन स्टार्स लाभलेली अर्झाक, अकेलारे, मार्टिन बेरासातेगुई आणि मुगारित्झ अशी ख्यातनाम रेस्टॉरंट्स आहेत. सर्जनशीलता आणि स्थानिक परंपरा यांचा प्रभाव तिथल्या रेस्टॉरंट्सवर दिसतो. तिथे येणाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‌‘फाईन-डायनिंग‌’ म्हणजे काय असते याचा अनुभव मिळतो. मिशेलिन स्टार्सशिवाय पिंचोस बारही प्रसिद्ध आहे.

टोकियो शहराला मिशेलिन स्टार रेटिंग असलेली जगातील सर्वाधिक रेस्टॉरंट्स असल्याचा बहुमान मिळालेला आहे. इथे सुकियाबाशी जिरोसारख्या छोटेखानी सुशी काउंटर्सपासून कांडा येथील रिफाईन काईसेकी डायनिंगपर्यंतचे पर्याय आहेत. नावीन्यपूर्ण मेन्यू, उत्तम ग्रील्ड सी फूड किंवा साध्या रामेनचा आस्वाद घ्यायचा असला तरी ते इथे शक्य आहे. म्हणूनच टोकियोसारखी शहरं, खाद्यसंस्कृती हे सुद्धा पर्यटनाचं कारण असू शकतं, हे पुराव्यानिशी सिद्ध करतात.

परंपरा, आधुनिकता, तंत्रज्ञान, कलात्मकता, नजाकत आणि नवकल्पना यांचा देखणा मिलाफ अनुभवायचा असेल तर पॅरिससारखी दुसरी जागा नाही. इथली खाद्यसंस्कृतीही अव्वल दर्जाची आहे. वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या चवींमुळे ॲलेन डुकास ओ प्लाझा एथीनी, ले सिंक, आणि ल‌’ आर्पेज यासारखी मिशेलिन स्टार रेटेड रेस्टॉरंट्स आपल्याला थक्क करतात. आपल्याला अधिक जिव्हाळ्याचं आणि स्थानिक खासियत असलेलं रेस्टॉरंट हवं असेल तर मग फ्रान्समधील ‌‘रिले अँड शॅतो‌’ यांना तोड नाही. यांची स्थापना सन 1954 मध्ये झाली. फ्रान्समधील फोर्टस्‌‍, ग्रामीण भागातील प्रशस्त इस्टेट्स, ग्रेप विनयार्डस्‌‍ अशा एकापेक्षा एक खास ठिकाणी ही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. इथल्या पाककृतींना नामवंत शेफचा परीसस्पर्श असतो. स्थानिक पातळीवर मिळणारे आणि त्या त्या मौसमात उपलब्ध होणारे इनग्रेडियन्सेस वापरून पाककृती करण्यावर त्यांचा भर असतो. प्रोव्हान्सपासून लोअर व्हॅलीपर्यंत आढळणारी बुटिक हॉटेल्स, तिथली मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स यांच्यामुळे पर्यटकांना निवांतपणे वेळ घालवता येतो. ज्यांना शांतपणे निसर्गाचा, स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असतो त्यांच्यासाठी बुटिक हॉटेल्स हा उत्तम पर्याय आहे. ‌‘रिले अँड शॅतो‌’ यांच्याकडील बुटिक हॉटेल्समधील वास्तव्य म्हणजे फक्त ऐषोआराम नसून ती एक अभिजात अनुभूती असते. त्याला साथ असते ती फ्रेंचांच्या मनमोहकतेची. खाद्यसंस्कृतीच्या पर्यटनाच्या जगात प्रभाव पाडणारी आणखीही ठिकाणं आहेत. बोलोग्ना हे इटलीच्या खाद्यसंस्कृतीचे मध्यवर्ती केंद्र आहे. सुप्रसिद्ध रागुआला बोलोग्नीज, मॉर्टाडेला आणि हँडमेड एग पास्ता पर्यटकांना भुरळ घालतो. शतकानुशतके खवय्यांच्या जिभेला आणि मनालाही समाधान देणारे हे खाद्यपदार्थ आणि त्यांची ही खास ठिकाणे म्हणजे खवय्यांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा आनंदच असतो.

लियॉनला फ्रान्सच्या खाद्यसंस्कृतीची पहिली राजधानी मानतात. पारंपरिक ‌‘बुशाँ‌’ तसेच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौटुंबिक ब्रेझरीज मध्ये मूळ फ्रेंच खाद्यसंस्कृती अलगद सापडते. तर ओक्साका या मेक्सिकोमधील शहरास युनेस्को-मान्यताप्राप्त फूड कॅपिटलचा मान आहे. येथील स्मोकी ‌‘मोल‌’, कुरकुरीत ‌‘त्लायुडास‌’ आणि झणझणीत ‌‘मेझकाल‌’ लोकप्रिय आहेत.

बँकॉक ही आग्नेय आशियातील स्ट्रीट फूडची कॅपिटल आहे. नाईट मार्केट्समध्ये मसालेदार ग्रीन करी आणि पॅड थाईपासून ते मँगो स्टिकी राईसपर्यंत तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ मिळतात. अमेरिकेच्या दक्षिणेस न्यू ऑर्लिन्समध्ये क्रेओल, केजन आणि फ्रेंच खाद्यपदार्थांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. गंबो, जांबलाया आणि पिठीसाखरेने सजवलेल्या, मऊ, तोफ्लडात विरघळणाऱ्या बेन्ये यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. जॅझ संगीताच्या सुरांनी हा प्रवास आणखीनच संस्मरणीय बनतो.

आपला भारत म्हणजे खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती आपल्याकडे आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात फिरताना अस्सल खाद्यपदार्थांचा मी मनापासून आनंद घेतला. लखनौमध्ये नाजूक गलोटी कबाब आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अवधी करीचा मी आस्वाद घेतला. अमृतसरमध्ये आम्ही सुवर्ण मंदिरातील लंगरमध्येही जेवलो. तिथे तंदूरमधून नुकतेच काढलेले, मऊसूत, मख्खन मारके असलेले कुल्चे भरपूर खाल्ले. दिल्लीतील खव्वयेगिरीमध्ये असलेली ऊर्जा पाहिली. तिथल्या चाटमध्ये मसाल्यांची खमंग जादू अनुभवता आली. तर केरळमध्ये आम्ही केळीच्या पानावरील साद्या मीलचा, त्यातही मुबलक नारळ घातलेल्या आमटी आणि ताज्या माशांचा खरपूस समाचार घेतला. कोलकाता म्हणजे रोल्स, मिष्टी दोई आणि सुंदर सजवलेली बंगाली थाळी. माझे शहर असलेल्या मुंबईत मी पावभाजी आणि वडापाव खातच मोठी झाले. सोबत अप्रतिम मांसाहाराची नवनवीन ठिकाणे शोधून मी तिथेही जाते. मिशेलिन स्टार असला म्हणजेच अविस्मरणीय खाणे मिळते हा प्रवाद भारताने पार धुडकावून लावला आहे. लोकप्रिय असलेल्या, चवींसाठी ओळखल्या जाणाऱ्या जगभरातील खाद्यसंस्कृतींनी एक गोष्ट कायमच अधोरेखित केली आहे, ती म्हणजे उत्तम दर्जाचे खाणे आणि पांढरा शुभ्र टेबलक्लॉथ, जामानिमा यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. दिल्लीतील रस्त्याच्या कडेला मिळणारे काठी रोल्स किंवा पॅरिसमधील थ्री कोर्स डिनर... या प्रत्येकाची कथा वेगवेगळी असते. महत्त्वाचं काय? तर अन्न म्हणजे सहवास, उत्सव आणि आठवण हे सारं एकाच ताटात सामावलेलं असतं, हे ओळखणं!

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
व्हिएतनाम
8 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

बियॉन्ड द स्टार्स...
8 mins, read

बियॉन्ड द स्टार्स...

Published in Maharashtra Times 11th October 2026 ...आणि जितका जास्त प्रवास करतील, तितके त्यांना जास्त टायर्स लागतील. त्यामुळे एका टायर कंपनीने मुळात आपल्या टायर्सची विक्री वाढावी म्हणून हे गाइड तया

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं
8 mins, read

नवरंगांमध्ये रंगलेली ठिकाणं

Published in Loksatta Lokrang 11th October 2026  ...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!