India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

ती रेघ पुसायला हवी

9 mins. read
Veena Patil
Veena Patil
9 Mins Read
April 26, 2024
April 26, 2024

Quick Summary

सिंगापूरच्या अर्बन प्लॅनिंग सेंटरसारखी दीर्घकालीन व्हिजन नागरिकांना प्रत्यक्ष दाखवण्याची कल्पना प्रेरणादायी आहे.

चांगले रस्ते, खड्डेमुक्त फूटपाथ, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, अखंड वीज आणि सर्वांसाठी शिक्षण ही मूलभूत प्राधान्ये असावीत.

पंचवीस ते पन्नास वर्षांचे नियोजन सरकार बदलले तरी पूर्णत्वाकडे नेणे आवश्यक आहे.

कोविड आणि तंत्रज्ञानामुळे जग अनिश्चित झाल्याने पर्यटन आणि एअरलाइनसारख्या उद्योगांना लवचिक नियोजन करावे लागते.

आजच्या वेगवान बदलांमध्ये खंबीर पाऊल टाकताना घाई न करता दमदार निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

काही लोक आपला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानतात, पण परिस्थिती बदलल्यावरही वास्तववादी समतोल ठेवणे गरजेचे आहे.

Published in the Saturday Lokasatta on 27 April, 2024

पुर्वी कधीतरी सिंगापूरच्या अर्बन प्लॅनिंग सेंटरमध्ये गेले होते. येत्या पन्नास वर्षात सिंगापूरमध्ये काय काय होणार ते सर्व तिथे डिस्प्ले केलं होतं व्हिजिटर्ससाठी आणि स्थानिकांसाठी. तेव्हा वाटलं होतं की असं पाहिजे आपल्या देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक शहरात. येत्या एका वर्षात, येत्या पाच वर्षात, येत्या दहा वर्षात आणि येत्या पंचवीस वर्षात आपल्या शहरात ह्या ह्या गोष्टी अशा तऱ्हेने होणार आहेत हे आम्हा सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवलं, त्याप्रमाणे कामं होताना नागरिकांना दिसली, कालच्यापेक्षा आमचा आजचा दिवस चांगला होताना दिसला तर कशाला निवडणूकींसाठी मोठ्या प्रचारसभा घ्यायची वेळ येईल? फार अपेक्षा नाहीयेत आमच्या. चांगले रस्ते, चालायला खड्डे नसलेले फूटपाथ, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, अखंडीत वीज आणि शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही अशी निम्न आर्थिक स्तराला सामावून घेणारी एज्युकेशन सीस्टिम. आता पंतप्रधानांनी `इंडिया ॲट हेंड’ `2047 चा भारत’ असा एक ॲम्बिशियस प्लॅन येण्याची शक्यता दर्शवलीय. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. ते आपल्या सर्वांसाठी `समथिंग टू लूक फॉरवर्ड टू’ असेल. त्यामुळे आपल्यात उत्साह जागृत होईल आणि आपल्या कार्यक्षमतेतही निश्‍चित फरक पडेल. देशाच्या बाबतीत पंचवीस आणि पन्नास वर्षांचं प्लॅनिंग असायलाच हवं आणि ॲक्चुअली सरकार कोणतंही येवो देशाच्या विकासाची ठरलेली कामं पूर्ण झाली पाहिजेत. हे सर्वश्रृत आहेच की मोठमोठ्या कंपन्याही असं दहा, वीस, पन्नास वर्षांचं प्लॅनिंग करतात. कोविडने अर्थातच ह्या प्लॅनिंगला शह दिला. एका बाजूला कोविड होता तर दुसरीकडे टेक्नॉलॉजिकल इन्व्हेंन्शन्स. जग इतकं वेगाने बदलायला लागलं की भारतातल्या काही मोठ्या आयटी कंपन्यांनी तेव्हा जाहीरच करून टाकलं की `फर्गेट अबाऊट टेन इयर्स प्लॅनिंग. सध्या आम्ही फक्त पुढच्या एक किंवा दोन वर्षांकडेच बघतोय’. आमची टूरिझम इंडस्ी तर एवढी होरपळली की ती अजूनही सावरतेय त्यातून. आम्हीसुद्धा पुर्वी किमान पुढची तीन वर्ष नजरेसमोर ठेवायचो. त्याचं इन डीटेल प्लॅनिंग करण्यावर भर असायचा पण आता जेमतेम एका वर्षाच्या प्लॅनिंगवर समाधान मानतोय. त्या एका वर्षाच्या प्लॅनिंगमध्येही सर्व गोष्टी फूलप्रूफ नाही करता येत कारण सभोवताल एवढं बदलतंय, जगात एवढ्या गोष्टी घडताहेत की टूरिझम आणि एअरलाइन इंडस्ी बहुत दूर की नहीं सोच सकते। आयटी रीव्हॉल्युशनच्या आधी बरं असायचं, ठरविलेल्या गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायच्या कारण आत्तासारखे आमुलाग्र बदल अचानकपणे आपल्यावर येऊन आदळत नव्हते. हल्ली आपण एखादी गोष्ट ठरवली की उद्या एनव्हायर्मेंट इतकी बदलून जाते की पुन्हा नव्याने विचार करायला लागतो. चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने म्हणता येईल अशा अनप्रेडिक्टेबल जगात आपण राहतोय की खंबीरपणे दमदार पाऊल टाकायला थोफ्लडं हडबडायला होतं. अर्थात परिस्थिती चांगल्या अर्थाने बदलतये हेही नसे थोडके.पुर्वी माणसंपण अशी एकदम खंबीर असायची किंवा खंबीर राहू शकायची. `मोडेन पण वाकणार नाही’ अशी किंवा `हम करे सो कायदा’वाली. आपल्या गत आयुष्याकडे नजर टाकली तर अशी कितीतरी करारी माणसं आपल्याला दिसतील. मला माझे काका आठवतात किंवा माझ्या मामाकडचे आईचे काका, तसंच हायस्कूलमधले एक शिक्षक पटकन डोळ्यापुढे उभे राहिले. त्यांचा दरारा असा काही असायचा की आपण आपले कायम भीतीच्या सावटाखाली. आवाज करायचा नाही. मोठ्या आवाजात बोलायचं नाही. खळखळून हसायचं नाही. शाळेत त्या सरांपुढे तर मुलं थरथर कापायची. शिस्त लावण्यासाठी, चुकीचं वागणाऱ्याला सरळ करण्यासाठी त्यांचं ते रूप चांगलं असायचं. पण कधीतरी वाटून जायचंच की अरे एवढं काय मोठं त्यात. जरा सबुरीने घ्या की. पण शेवटी `व्यक्ती तितुक्या प्रकृती.‘ पण पुर्वी होती आणि आजही आहेत अशी माणसं जी `हम करे सो कायदा’ ह्यावर इतकी ठाम असतात की वातावरण बदललंय, संदर्भ बदललेयत हे लक्षातच घेत नाहीत. इथे बॉलिवूडच्या `कभी खुशी कभी गम‘ चित्रपटातला डायलॉग आठवला, `एक बार कह दिया, तो बस कह दिया’ किंवा सलमान खानचा फेमस डॉयलॉग, `एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता’. ह्या माणसांचं असं असतं की, माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. काही झालं तरी ती बदलणार नाही. कधी कधी माणसं स्वत: ही रेघ आखून घेतात किंवा तसं सर्वांवर बिंबवतात तर कधी परिस्थिती वा पोझिशन त्यांचं व्यक्तिमत्व तसं बनवते. आमचा तसा `मॉम पॉप शॉप’ सारखा फॅमिली बिझनेस. सर्वजण सगळं करायचे किंवा कुणलाही काहीही काम करायला लागायचं असा. वेळेला सर्वजण बाह्या सरसावून काम करायला तयार. बिझनेस आकाराला आला, थोडा थोडा मोठा व्हायला लागला तेव्हा पुर्वीचं ते स्टार्टअप स्वरूप सोडून प्रोफेशनलिझम आणण्याची, छोट्या कॉर्पोरेट स्क्चरमध्ये त्याचं रूपांतर करण्याची गरज भासली आणि जेव्हा मी तो कॉर्पोरेट हेडचा पदभार स्वीकारला तेव्हा जाणीव झाली की, अरे आता पुर्वीसारखं वागून नाही चालणार. आपण जे बोलू, आपण जे डीसिजन्स देऊ ते प्रमाण मानले जाताहेत. आपला शब्द परवलीचा शब्द बनतोय. बहुतेक लोकं आपल्या शब्दाला प्रमाण मानताहेत. आपलं वक्तव्य हे काळ्या दगडावरची रेघ ठरतंय. आणि जेव्हा ही जाणीव झाली तेव्हा ॲक्चुअली दचकायला झालं. आता मला प्रत्येकवेळी बोलताना खूप खबरदारी घ्यावी लागेल. निर्णय अगदी विचारपूर्वक आणि सर्व बाजूंचा, शक्यतांचा विचार करून घ्यावे लागतील. आपण जे काही करू, जी दिशा दाखवू त्यावर पुढे कंपनीची प्रगती ठरणार आहे, तेव्हा आपण आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे. आपले विचार समृद्ध केले पाहिजेत. संस्थेच्या आत आणि संस्थेच्या बाहेर काय चालू आहे त्याचा म्हणजे पास्ट-प्रेझेंट- फ्युचरचा ताळमेळ मला घालता आला पाहिजे. आपली डीसिजन पॉवर सुद्धा वाढवली पाहिजे. शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानामधला एक संदर्भ आठवला, लीडर कसा असावा ह्या बाबतीत. `लीडरचा एक पाय नेहमी संस्थेमध्ये असावा आणि दुसरा पाय संस्थेबाहेर असावा. दोन्ही पाय संस्थेच्या आत असले तर बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळत नाही आणि दोन्ही पाय बाहेर असले तर संस्थेतली माणसं सोबत येत नाहीत‘.  हे सगळं होत असताना मला आणखी एक गोष्ट जाणवायला लागली की माझं `हम करे सो कायदा’ होतंय. आपण एखादा विचार मांडायचा आणि त्यावर सर्वजण चर्चा करून निर्णयाप्रति पोहोचायचो, ही पद्धत आजतागायत होती. आता चर्चा कमी झाल्या होत्या आणि आपण जे सांगू तो डीसिजन मानून टीम गोष्टी पुढे न्यायला लागली.`अरे हे असं का केलंत?’ असं विचारताक्षणीच `तुम्हीच तर सांगितलं होतं’ हे उत्तर मिळायला लागलं आणि माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. मी काय ब्रह्मदेव थोडी आहे की सगळं ज्ञान माझ्याजवळ एकवटलंय? फार फार तर `वासरात लंगडी गाय शहाणी’ एवढंच. `तुम्हीच तर सांगितलं होतं’ ही गोष्ट अति व्हायला लागली होती. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट `काळ्या दगडावरची रेघ’ असं प्रत्येकजण घेत होता. आणि ते घातक होतं आम्हा सर्वांसाठी आणि ऑर्गनायझेशनसाठीही. `तुम्हीच तर सांगितलं होतं’ ही मानसिकता तयार व्हायला काही दिवस, महिने, वर्ष लागली होती पण आता पटकन `त्याच्या विरूद्ध वागा, प्रश्‍न विचारा‘ हे सांगणं सोप्पं आहे पण अंगिकारायला वेळ लागणार होता.`तुम्हीच तर सांगितलंत’ हे उत्तर आलं की मी विचारायला सुरुवात केली, `कधी मी सांगितलं? का सांगितलं? काय कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं? संदर्भ काय होता ज्यावेळी मी हे सांगितलं?‘. परवाचीच गोष्ट, आमच्या सीनियर मार्केटिंग मॅनेजरला, प्रणोती जोशीला मी विचारलं, `जरा ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्स पाठव’. तिने कॉमन ग्रुपवर न पाठवता मला एकटीला पाठवला. फेअर इनफ. कारण विचारल्यावर तिने हेच उत्तर दिलं `तुम्हीच सांगितलं होतं’. एक दिवस सीनियर सेल्स मॅनेजर प्रियाका पत्कीने असाच कोणतातरी डेटा फक्त मलाच पाठवला. म्हटलं `ग्रुपवर का नाही टाकलास?‘ तर म्हणाली, `तिथे सगळेच आहेत म्हणून तुम्हाला एकटीलाच पाठवला’. तिच्या जागी ती बरोबर होती. वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा आम्हीही गोफ्लधळलेलो होतो. कॉन्फिडेन्शियालिटी महत्वाची वाटत होती. सवय तेव्हापासून लागली होती. आज अकरा वर्ष झाली. कोविडने मध्ये दोन अडीच वर्ष खाल्ली. त्यात तर सगळंच जग अपसाइड डाऊन झालं. पण आम्हाला एकदा वीणा वर्ल्डच्या सुरुवातीला आणि कोविडनंतर अशी दोनदा नव्याने सुरुवात करायला मिळाली. आता नव्वद मॅनेजर्स, सीनियर मॅनेजर्स आणि इन्चार्जेस आहेत, त्यांना सर्वांना रोल, रीस्पॉन्सिबिलीटी, ऑथॉरिटी, अकांऊटेबिलिटी, सर्व काही डेलिगेट करून टाकलं. टोटल डीसेंलायझेशन आणि त्यामुळे कंपनी वाढायला लागली चांगल्या प्रकारे. आम्ही आता रोज टीमला ॲक्सेसीबल असतो ते कुठे त्यांना अडकायला झालं, एखाद्या समस्येचं उत्तर मिळालं नाही किंवा इमर्जन्सीच्यावेळी. बाकी आम्ही आहोत, आणि `आम्ही नाहीही आहोत‘ ही सवयसुद्धा आता टीमला लागलीय. पण तरीही जुनी सवय जात नाही त्याप्रमाणे `तुम्हीच तर सांगितलं होतं’ हे कधीतरी डोकं वर काढतंच. `चेक द कॉन्टेक्स्ट’ हे मी टीममध्ये रूजवलंय आहे. कारण कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी, काय परिस्थितीत निर्णय घेतला हे लक्षात घ्या. तोच निर्णय दुसऱ्या ठिकाणी जसाचा तसा लागू पडत नाही. हे मी इतक्यावेळी घोकून घेतलंय की आमची जनरल मॅनेजर शिल्पा मेोरे मला चिडवते. पण बघा नं, आमची मुंबईची जाहिरात कोलकात्याला चालत नाही आणि अहमदाबादची जाहिरात बेंगळुरूला चालत नाही. एवढंच कशाला, पुण्यासाठी कधीतरी आम्हाला वेगळं कम्युनिकेशन करावं लागतं मुंबईपेक्षा. दोनशे किलोमीटर्स मधला हा फरक. म्हणजेच कॉन्टेक्स्ट बदलला तर निर्णय वा कम्युनिकेशन बदलावं लागतं ते असं. आता ऑर्गनायझेशनची घडी नीट बसल्यावर, वेगवेगळ्या रीस्पॉन्सिबल टीम्स झाल्यावर त्या त्या रीस्पेक्टिव्ह टीमला `पिन टू एलिफंट‘ सगळं माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आता ऑर्गनायझेशनमध्ये फक्त माझ्याकडे फक्त तुझ्याकडे असं नाही, `सर्वांना इन्व्हॉल्व्ह करा अगदी 100% विश्‍वास टाका’ ह्या विचाराने मार्गक्रमणा सुरू आहे.`काल काय केलं?‘ ह्यापेक्षा `ह्या रॅपिडली चेंजिग जगात आज काय करायला पाहिजे?’ हे महत्वाचं झालंय. `काळ्या दगडावरची रेघ’ आता नव्या कोऱ्या बदललेल्या जगात चालणार नाहीये. स्टँडर्डायझेशन, स्ॅटेजिक प्लॅन्स मागे पडायला लागलेयत. नाक, कान, डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावे लागणार आहेत. काल घेतलेला निर्णय कदाचित आज बदलावा लागला तर तो बदल करण्यासाठीचा फ्लेक्झिबल मार्इंडसेट आपल्याला तयार केला पाहिजे. थोडक्यात बदलत्या जगाबरोबर आपल्याला बदलायला हवं. आई वडिलांनी बदलायला हवं, मुलांनी बदलायला हवं. मुलांना कदाचित ह्या वयात जमणार नाही, पण आजची मुलं स्मार्ट आहेत, वेळ आल्यावर ती बदलतील. शिक्षकांनी बदलायला हवं, शाळांनी बदलायला हवं. आता `जो थांबला तो संपला’ ह्याऐवजी `जो बदलला नाही तो संपला’ असं म्हणणं जास्त रास्त ठरेल. `काळया दगडावरची रेघ’ आता इतिहासजमा करायला हवी. ती रेघ पुसायला हवी.

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
9 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
9 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
9 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top