Language Marathi

वुमन्स डे आऊट

एनडीज् फिल्म वर्ल्ड
100% यशस्वी
जुलैपासून आम्ही सुरू करतोय वीणा वर्ल्ड पर्यटकांसाठी
एनडीज् फिल्म वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या ‘एक दिवसीय’ संकल्पना
फॅमिलीज डे आऊट l सीनियर्स डे आऊट

लव्हर्स (न्यूली मॅरिड) डे आऊट l सिंगल्स डे आऊट (Age 20-35)

आणि पुन्हा एकदा वुमन्स डे आऊट आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच श्री.नितीन देसाई एनडीज् फिल्म वर्ल्ड खुलं करीत आहेत,सर्वांसाठी. संपर्क: 2192 273 354

 

‘ती आली, तिने पाहिलं, तिला आवडलं आणि ती खूश झाली’ अशी परिस्थिती झाली एक नव्हे, दोन नव्हे, तर पंधराशे महिलांची. ‘वुमन्स डे’च्या निमित्ताने आठ मार्चला ‘वुमन्स डे आऊट’ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला मन:पूर्वक साथ मिळाली ती

श्री. नितीन देसाईंच्या एनडीज् फिल्म वर्ल्डची. महिन्याभरापूर्वी तीनशे महिलांना घेऊन जाऊया असा विचार करून आम्ही वुमन्स डे आऊट सहल जाहीर केली आणि ही एक दिवसीय सहल एका दिवसात फुल्ल झाली. एका सहलीच्या तीन सहली कराव्या लागल्या. तीनशे महिलांची आम्ही ठरवलेली संख्या पंधराशे झाली आणि अक्षरश: वीणा वर्ल्ड टीम आणि एनडीज् फिल्म वर्ल्ड टीम ह्या दोघांचीही झोप उडाली. दोघांचाही पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल ह्याची खात्री असतानाही थोडी धाकधूक होती. कारण एप्रिल-मे-जूनचा सीझन डोळ्यासमोर होता, हा प्रयत्न यदाकदाचित यशस्वी झाला नसता तर त्याचे सर्वत्र नॉट सो गूड पडसाद उमटले असते जे वीणा वर्ल्ड

वा एनडीज्साठी डेंजरस होते. पण एकदाका काम अंगावर घेतलं की ते कितीही जोखमीचं असलं तरी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची अगदी शेवटपर्यंत ही संस्कृती वीणा वर्ल्डची असल्याने बाह्या सरसावून टीम कामाला लागली. सतत भव्य दिव्य आणि चांगलंच करण्याचा ध्यास घेतलेल्या एनडीज् फिल्म वर्ल्डची टीम सुद्धा तशीच असल्याने दोन्ही टीम्सची नाळ जुळली आणि शंभर नव्हे तर दोनशे टक्के यशस्वी झाली ‘वुमन्स डे आऊट’ ची संकल्पना. आता जगभरातल्या आणि भारतभरच्या सहली करताना अशा एकदिवसीय सहली करण्याचा आमचा हुरूप वाढलाय. एनडीज् फिल्म वर्ल्डसोबत अनेक संकल्पना आम्ही राबवित आहोतच पण ज्यांचं एनडीज् फिल्म वर्ल्ड बघून झालंय त्यांच्यासाठीही आम्ही वेगवेगळ्या एक दिवसीय संकल्पना आणीत आहोत. पंधराशे महिला शंभर टक्के खूश होण्यामध्ये किंवा त्यांना खूश करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता तो प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन करणार्‍या आमच्या टूर मॅनेजर्स विवेक कोचरेकर, अमोल सलगर आणि तिथे सर्व महिलांच्या दिमतीला असलेल्या आमच्या टूर मॅनेजर्सचा आणि त्यांच्या साथीला सदैव असणार्‍या वीणा वर्ल्ड ऑफिस टीमचा. आमच्या टीमने जे जे काही ह्या ‘वन डे आऊट’ सहलीच्या यशस्वीतेसाठी मागितलं ते ते सारं स्वत: नितीन देसाईंनी तिथे जातीने हजर राहून दिलं, त्यांच्या सुहास पांचाळ, गुरू पेेडणेकर, मुकुलदत्त शर्मा, हरिश पटेल, प्रवर आणि टीमने मनापासून त्याची कार्यवाही केली त्यामुळे हे अनोखं वेंचर यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही. खाली दिलेल्या काही फोटोजवरून आपल्याला महिलांनी केलेल्या धम्मालीची कल्पना येईल. अ‍ॅन्ड वुई प्रॉमिस, ‘असा एक एक दिवस वीणा वर्ल्ड निश्‍चितपणे तुमच्यासाठी घेऊन येतंय’. महिन्याभरात आम्ही हे शेड्यूल जाहीर करतोय. शेवटी धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या रुटीनमधून एक आनंदाचा हॅप्पी हॅप्पी ब्रेक तो बनता ही है ना!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*