Language Marathi

अ डे आऊट विथ वीणा वर्ल्डफिल्मी डे-ट्रेकिंग डे-क्लाइंबिंग डे-एंटरटेन्मेंट डे

रुटीनमधून ‘ब्रेक तो बनता ही है’ म्हणत वीणा वर्ल्डसोबत देशविदेशात बिनधास्त फिरणार्‍या महिलांची खूप दिवसांची इच्छा होती ‘वन डे टूर’ ची. एनडीज फिल्म वर्ल्डची ‘वन डे’ जाहीर केल्यावर कळलं की ह्या संकल्पनेची खूप गरज आहे आणि आम्ही कामाला लागलो ‘अ डे आऊट’ फ्रीक आऊटच्या…

वीणा वर्ल्ड सुरू झालं साडेचार वर्षांपूर्वी आणि पहिलीवहिली सहल गेली ती गोव्याला वुमन्स स्पेशलच्या निमित्ताने, त्याआधी वुमन्स स्पेशल फक्त परदेशातच नेत होते. महिलांची मागणी असायची भारतातही वुमन्स स्पेशलच्या सहली सुरू करा म्हणून. ‘ही तर स्त्रींची इच्छा’ म्हणत आम्ही वुमन्स स्पेशलच्या भारतातल्या सहली सुरू केल्या, आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, नॉर्थ-ईस्टपासून गोव्यापर्यंत महिलांनी वुमन्स स्पेशलच्या निमित्ताने संपूर्ण भारत पिंजून काढला. परदेशात तर ह्यापूर्वीच अटकेपार झेंडे रोवले होते आमच्या महिलांनी, अगदी स्कॅन्डिनेव्हिया रशियापासून अमेरिकेपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून जपान चायनापर्यंत. ‘ये दिल मांगे मोऽऽर’ हा जगाचा नियम आहे. मग आमच्या महिला कशा मागे राहाणार? आधी परदेशवारी, नंतर ज्यांच्याजवळ पासपोर्ट नाही त्यांना ही मजा मिळत नाही म्हणून भारतातल्या सहली सुरू करण्याच्या ह्या मागणीची पूर्तता झाल्यावर आमच्या सख्यांनी जोर धरला तीन-चार दिवसांच्या सहलींसाठी. ‘अहो माझ्याजवळ वेळ उरला नाहीये आता तुम्हाला ह्या सहलींवर भेटायला यायला. मार्च 2019 पर्यंत माझं कॅलेंडर खचाखच भरलंय’.ही माझी सबब, पण आमची टीम उत्साही. ‘छोट्या सहलींची खूप मागणी येतेय तेव्हा त्या सहलींचा कार्यक्रम आपण वेगळा करूया, तुम्ही मोठ्या सहलींवर भेटा महिलांना’ म्हणत वुमन्स स्पेशल वीकेन्ड टूर्स त्यांनी सुरू केल्या आणि रण ऑफ कच्छ, अमृतसर वाघा बॉर्डर वैष्णोदेवी सारख्या तीन चार दिवसांच्या छोट्या सहलींची सुरुवात झाली. आता आमच्यापुढे प्रश्‍न होता ही वन डे टूरची मागणी कशी पूर्ण करायची? बॅक ऑफ द माईंड विचार सुरू होता, आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चर्चा करीत होतो पण निर्णय होत नव्हता. असंच टीव्ही चॅनल सर्फिंग करताना ‘एनडीज् फिल्म वर्ल्ड’ च्या बातमीने-व्हिडीओने लक्ष वेधलं, ‘जी लो अपनी फिल्मी ख़्वाहिशें @ एनडीज् फिल्म वर्ल्ड’ ही अफलातून टॅग लाईन ऐकून मी तिथल्या तिथे ‘यस्, धिस इज इट!’ म्हणत श्री. नितीन देसाईंशी फोनवर चर्चा केली. ‘एनडीज् फिल्म वर्ल्ड’ हे एक आगळं वेगळं अ‍ॅम्युझमेंट पार्क तयार होतंय, भारतीयांची बॉलिवूडवाली फिल्मी ख़्वाहिशें पूर्ण करण्यासाठी. संकल्पना आमच्या वुमन्स स्पेशलच्या संकल्पनेशी मिळतीजुळती होती. मनात दडून राहिलेल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर वुमन्स स्पेशलची निर्मिती झाली होती. ह्या सुप्त इच्छांमध्ये कपड्यातला, विचारातला, आत्मविश्‍वासातला मेकओव्हर आम्ही अगदी जवळून पाहिला गेल्या बारा वर्षांत, त्यामुळे त्याबद्दल मनात समाधान होतं. एक इच्छा अपूरी होती ती ही फिल्मी ख़्वाहिशोंवाली असं म्हणायला हरकत नाही किंवा एनडीज् फिल्म वर्ल्ड समोर आल्यानंतर ‘अरे ही इच्छा राहिली होती की’ असं मला वाटायला लागलं, ह्याचं मूळ शोधणं कठीण आहे. पण बॉलिवूडवरचं आम्हा महिलांचं प्रेम नाकारता येत नाही हे मात्र खरं, आणि म्हणूनच ‘चलो जी लेते हैं हमारी ये भी ख़्वाहिश’ असं बॉलिवूड स्टाइलने म्हणत आम्ही येत्या ‘वुमन्स डे’ च्या निमित्ताने ह्या वुमन्स डे स्पेशल टूरचा आरंभ करतोय. रोजच्या धकाधकीतून एक छोटासा आगळावेगळा ब्रेक द्यायची वा घ्यायची ही संकल्पना यशस्वी होईल यात शंका नाही कारण वीणा वर्ल्ड आणि एनडीज् फिल्म वर्ल्ड टीम त्यासाठी मनापासून प्रयत्न करताहेत.

सो चलो, जी लेते हैं हमारी फिल्मी ख़्वाहिशें! इथे ‘बॅग भरो निकल पडो’ असं म्हणणार नाही कारण इथे ना बॅग आहे, ना पासपोर्ट, ना एअर तिकीट. जस्ट एक आनंदी पण फिल्मी मन तुम्ही सोबत घेऊन यायचंय. आता काय काय करायचंय ते बघूया ह्या एका दिवसात. कारण ही सहल आपल्या इतर वुमन्स स्पेशल सहलींपेक्षा वेगळी आहे. देशविदेशात मोठ्या सहलींना आपण गाला इव्हिनिंग आणि फॅशन शो करीत असतो त्यात ‘वीणा वर्ल्ड क्वीन’ खिताब मिळवण्यासाठी चढाओढ असते. वुमन्स स्पेशलच्या तीन चार दिवसांच्या वीकेन्ड सहलींवर ‘गाला इव्हिनिंग विथ डीजे डान्स’ असा माहोल असतो तर ह्या एनडीज् फिल्म वर्ल्डमध्ये आपण एक दिवसाचं फिल्मी आयुष्य जगणार आहोत. सुरुवातंच होतेय आपल्या ड्रेसकोडने कारण त्या दिवशी एनडीज् फिल्म वर्ल्डमध्ये अवतरणार आहेत तुमच्यातल्याच अनारकलीपासून पद्मावतीपर्यंतच्या एक से एक तारका. कुणी पोलका डॉट रेट्रो थीम करून येईल तर कुणी ‘कभी खूशी कभी गम’ मधली अल्ट्रामॉडर्न पूऽऽऽ, कुणी मधुबाला तर कुणी माधूरी, कुणी ऐश्‍वर्या तर कुणी हेमा..हो. आपली बक्षिसं सुध्दा एकदम फिल्मी स्टाइलचीच असणार बरं का. रात्री होणारं अवॉर्ड फंक्शनसुध्दा तसंच हटके झालं पाहिजे नाही का? ह्यामध्ये बेस्ट ड्रेस, बेस्ट हेअर, बेस्ट मेकअप… ‘शोले’ मधली बसंती, ‘बाजीराव मस्तानी’ मधली काशीबाई किंवा मस्तानी, ‘डीडीएलजे’मधली सिमरन… चला व्हिडीयोज् धुंडाळायला सुरुवात करा, कारण आपण कोणता लूक घ्यायचाय ते ठरवायला नको का? या वन डे टूरची ही अफलातून थीम वाचल्यावर आमच्या काही सख्यांचा प्रश्‍न येणार ‘अरे पण आम्हाला ह्यातलं काही करायचं नसेल तर आम्ही काय यायचंच नाही का?’ तर तसं नाहीये. वुमन्स स्पेशलला मज्जाव कुणालाच नाही. आपल्याला ऑडियन्सपण हवाय नाही का? पण जास्तीत जास्त जणींनी हे अनोखं फिल्मीपण त्या दिवशी जगून घ्यायचंय ही माझी इच्छा. आयुष्यातला तोच तोचपणा घालवायचा असेल तर काहीतरी वेगळं करायलाच हवं, तरंच आयुष्याची गोडी अधिक वाढेल, उत्साह संचारेल, ह्यात शंका नाही. आम्ही वीणा वर्ल्डवाले तुम्हाला नवीन नवीन कारणं देतो आयुष्याचा उत्सव साजरा करण्यासाठी, तीच आहे आमची भूमिका तुमच्या आयुष्यातली. आणि आम्ही असे अधूनमधून काहीतरी नवीन घेऊन येतंच राहाणार तुमच्या भेटीला, अगदी हक्काने.

आपण ह्या वन डे स्पेशलला आणखी काय काय करणार आहोत ते सगळंच इथे लिहीत नाही पण ही सगळी धम्माल करताना आपण एनडीज् फिल्म वर्ल्डची गाईडेड टूरही करणार आहोत बरं का. पॅशन आणि कमिटमेंटमधून एक व्यक्ती काय निर्माण करू शकते ही गोष्ट इन्सपायरिंग नक्कीच आहे म्हणजे ह्या फन टूरमधून धम्माल आनंदासोबत आपण हे इन्स्पिरेशनही घेऊन घरी परत येणार आहोत. पावणे दोनशेहून अधिक चित्रपटांचे शूटिंग लोकेशन्स ज्यामध्ये जोधा अकबर, बालगंधर्व, स्लमडॉग मिलिओनेर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधली ओळखीची ठिकाणं म्हणजे आपले दे दणादण सेल्फी पॉइन्टस्. एक हजाराहून अधिक असे सेल्फी पॉइन्टस् आणि शूटींग स्पॉटस् आपली वाट बघताहेत एनडीज् फिल्म वर्ल्डमध्ये. यू ट्यूब वरच्या व्हिडीयोजमध्ये तुम्हाला त्याची कल्पना येईल. आम्ही गेल्या महिन्यात एनडीज्मध्ये जाऊन आलो तर स्टुडियोची धावती भेट पूर्ण करायला आम्हाला चार तास लागले. त्यामुळे संपूर्ण एनडीज् फिल्म वर्ल्डची गाईडेड टूर, पडद्यामागचं जग, वेगवेगळ्या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या शूटींगच्या वेळी घडलेले प्रसंग ह्या सगळ्या गोष्टींनी आपला दिवस खचाखच भरलेला असणार आहे. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे थंडी सरून, थोडीशी सुरुवात झाली असेल उन्हाळ्याची, त्यामुळे एखादी स्टाईलिश हॅट, मोठ्ठा गॉगल अशी इश्टाईल मारण्याचीही संधी सोडायची नाही बरं का. फिल्मी ख़्वाहिशें पूर्ण करायची तर ती पूर्णच असायला हवीत नाही का? सो लेट्स एन्जॉय धिस मच नीडेड ब्रेक!

‘वुमन्स डे’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ह्या ‘डे आऊट’चा प्रतिसाद पाहिल्यावर अशा तर्‍हेची संकल्पना खूप आधी आणायला हवी होती असं वाटायला लागलं. अर्थात इट्स नेव्हर टू लेट… वुमन्ससाठी, सीनियर्ससाठी आणि फॅमिलीजसाठी आम्ही ह्या वन डे एनडीजमध्ये सुरू करीत आहोत, ज्याचं शेड्यूल येत्या महिन्याभरात आम्ही जाहीर करू. जशी ही फिल्मी ख्वाहिशोंवाली इच्छा अपूरी राहिली होती तशीच ट्रेकिंग, गडावर स्वारी-क्लाइंबिंग, जस्ट अ फ्रीक आऊट अशा अनेक सुप्त इच्छा पूर्ण कशा करता येतील ह्यासाठी वीणा वर्ल्ड टीम कामाला लागलीय आणि लवकरच जाहीर करू जुलै ते मार्च दरम्यानचा हा ‘डे आऊट’चा रंगारंग कार्यक्रम. दिल थामके बैठीये, हम आ रहे हैं ‘अ डे फ्रीक आऊट’ का खजाना लेके आपके लिए!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*