Language Marathi

स्मार्ट आजी आजोबा

आयुष्याच्या धकाधकीत दिवस महिने वर्ष कशी भराभर निघून जातात कळत नाही आणि मुलं नातवंडं ह्यातून थोडी उसंत मिळते तेव्हा जाणवतं की बरंच काही राहून गेलंय, त्या बरंच काही राहण्यात हा देश बघायचा राहीला, तो देश राहीला हे जाणवतं आणि त्याचवेळीहम है ना!’ असं म्हणत आम्ही आजी आजोबांच्या पर्यटनाची पूर्ण जबाबदारी वीणा वर्ल्डच्या खांद्यावर घेतो. पण

दीड लाखात ऑस्ट्रेलिया आणि पावणे दोन लाखात ऑस्ट्रेलिया अशा वीणा वर्ल्डच्या दोन सहलींचा सध्या खूप बोलबाला आहे. सिडनी कॅनबेरा मेलबर्न अशी सात दिवसांची किंवा सिडनी ब्रिसबेन गोल्डकोस्ट मेलबर्न केन्स ग्रेट बॅरियर रीफ अशी नऊ दिवसांची सहल सुट्ट्यांमध्ये मुलांवाल्या फॅमिलीजमध्ये आणि सुट्ट्या नसतील तेव्हा मध्यमवयीन पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय झालीय, नो डाऊट, पण मला जास्त समाधान वाटतं ते ऑस्ट्रेलिया ह्या जगाच्या टोकावरच्या दूरच्या खंडात सीनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशलद्वारे आमच्या एकट्या दुकट्या महिला आणि ज्येष्ठ मंडळी-आजी आजोबा ऑस्ट्रेलिया वारी करू शकले ह्याचं. सीनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशल सहलींना माझी भेट ठरलेली असते मग ती सहल अमेरिकेला असो किंवा स्कॅन्डिनेव्हियाला, अंदमानला किंवा आसामला, माझी वारी होतेच. सध्या सीनियर्स स्पेशल ऑस्ट्रेलियामुळे माझ्या सिडनीच्या फेर्‍या वाढल्यात. परवा तर मज्जाच झाली. मी फ्लाइटमध्ये एन्ट्री केल्या केल्या तीनही एअरहोस्टेस एकदम आश्‍चर्याने चित्कारल्या, ‘ओ नो! यू केम जस्ट यस्टरडे अ‍ॅन्ड ट्रॅव्हलिंग टूडे लाइक अस अ‍ॅन्ड द क्रू?’, म्हटलं बायांनो काय करणार? व्यवसायासाठी करावं लागतं. तरीपण त्यांना राहवलं नाही. सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर माझ्याजवळ आल्या आणि नक्की मी काय करते ते विचारायला लागल्या. त्यांना वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशलच्या संकल्पना सांगितल्या, तिथे फॅशन शो कसा असतो आणि का असतो? माझ्या येण्यामागचा, पर्यटकांना भेटण्यामागचा हेतू सांगितला, त्यांना हे जरा नवीनच प्रकरण होतं त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरचं आश्‍चर्य मला दिसत होतं. त्यातली एक म्हणाली, ‘’वेलकम टू द फ्लायर्स क्लब, यू आर जस्ट लाईक अस!’’ खरंही  होतं ते, दर आठवड्याला हा असा देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपर्‍यात प्रवास सुरू आहे. वेगवेगळे टाइमझोन्स, अडनिड्या वेळा, जेवणाची आबाळ ह्या सगळ्या गोष्टींना हसतहसत झेलता येतं जेव्हा मी ज्येष्ठ मंडळींना किंवा आमच्या महिला मंडळाला सख्यांना भेटते, त्यांच्या चेहर्‍यावरची खुशी बघते तेव्हा माझा थकवा कुठच्याकुठे पळून जातो. ज्येष्ठ मंडळींकडून तर आशिर्वादांची एवढी खैरात होते की वाटतं ह्यापेक्षा अधिक आयुष्यात काय पाहिजे? ब्लेस्ड वाटतं एकदम. आता पुढच्या पंंधरा दिवसात मी सीनियर्स स्पेशलच्या आजी आजोबांना भेटणार भुतान, जयपूर, मंडावा आणि थायलंडमध्ये एकूण चार सहलींच्या चारशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना. लुकिंग फॉरवर्ड टू इट!

आजी आजोबांच्या ह्या सीनियर्स स्पेशल सहलींची, त्यांना आपला सुजलाम सुफलाम भारत देश दाखविण्याची, त्यांना काय हवं-नको ते बघण्याची, त्यांना आनंदी करण्याची, त्यांच्यात उत्साह जागविण्याची सर्व जबाबदारी वीणा वर्ल्डची म्हणजे आमची आहे हे आम्हाला मान्य आहे, पूर्णपणे आणि आम्ही एकापाठोपाठ एका सहलीवर ती पार पाडतोच आहोत. त्याची अजिबात चिंता करू नका. ‘हम है ना!’ पण सहलीपूर्वी काही जबाबदारी ही तुमचीही आहे खास करून नातवंडांची. कशी काय असा प्रश्‍न आता हे वाचता वाचता तुमच्या मनात आला असेल, तर सांगते कसं ते. आजी आजोबांनी पर्यटनाला निघायचं ही प्रत्येक घरात आनंदाची गोष्ट असते. आता काही घरांमध्ये फक्त आजी असेल किंवा काही घरांमध्ये फक्त आजोबा, काही घरांमध्ये मावशी किंवा आत्या किंवा काही घरांमध्ये एकटे काका अशा सर्वांना सामावून घेते ही सीनियर्स स्पेशल. मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे, मला सिंगल रुमचे जादा पैसे भरावे लागतील का? ही काळजी नसते कारण तुम्हाला रुम शेअरिंग पार्टनर शंभर टक्के देण्याची आम्ही गॅरंटी देतो त्यामुळे पैसेही वाचतात आणि सोबतही मिळते. अर्थात कुणाला सिंगल रुम हवी असेल, बिझनेस क्लासने जायचं असेल तर तेही शक्य आहे. असो, तर अशी कुणीही ज्येष्ठ मंडळी तुमच्याकडून सहलीला निघाली तर तुम्ही त्यांना सहलीसाठी तयार करायचंय. त्यांचा मेकओव्हर करायचाय. त्यांच्यात सहलीपूर्वीच थोडा उत्साह जागवायचाय. आपले आजी आजोबा आत्या मावशी काका मामा कुणीही असोत त्यांना स्मार्ट बनवायचं, कारण आता ह्यापुढे स्मार्ट आजी आजोबांची सहल असणार आहे. सो सहलीपूर्वी एक महिना आधी ह्या तयारीला सुरुवात करायची.

पहिली गोष्ट आहे सहलीसाठी अतीमहत्वाचे कम्फर्टेबल शूज किंवा चप्पल. आणि त्यांना त्याची प्रॅक्टीस करायला लावायाची. सहलीपूर्वी दोन दिवस आधी कधीही शूजची खरेदी करायला जावू नका. जर हे शूज नीट बसले नाहीत तर संपूर्ण सहलीत आजी आजोबांना त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट त्यांची बॅग आणि पर्स. आकाराने छोटी असलेली फोर व्हील स्ट्रोलर बॅग त्यांना द्यायची जेणेकरून त्यांना उचलायला त्रास होणार नाही. शोल्डर बॅग आणि पासपोर्ट पाऊच आम्ही विमानतळावर देतोच त्याला एकदम परफेक्ट असे खण आहेत जे सहलीवर दररोज स्थलदर्शनाला निघताना तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या व्यवस्थित मावतील अशा तर्‍हेने, अगदी पाण्याच्या छोट्या बाटलीसाठीही त्यात जागा आहे. तसंच रेन पाँच्यो, युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर, गर्दीतही ओळखता यावं म्हणून वीणा वर्ल्डची कॅप ह्या गोष्टी सहलीनुसार दिल्या जातात. पण पर्समध्ये जेवढ्या वस्तू सहलीवर लागणार आहेत तेवढ्याच तुम्ही त्यांना घेऊन द्यायच्यात. नथिंग लेस-नथिंग मोर. कपडे हा यक्षप्रश्‍न प्रत्येक ट्रॅव्हलरचा. काय घ्यायचं आणि काय नाही ठरवायला तुम्ही आजी आजोबांना मदत करायचीय. आणि हो, आजी-आजोबा नातवंडांचं ऐकतात त्यामुळे जर आजीने आयुष्यभर सतत सहावारी साडीच नेसली असेल तर तिला कम्फर्टेबल कुर्ता किंवा टॉप आणि जीन्स आणि त्यावर स्टाईलीश स्वेटरचा आग्रह तुम्ही करायचा आणि त्याची रिहर्सलही करून घ्यायची. साडी परकर ब्लाऊज किंवा पंजाबी ड्रेस ओढणी हे सगळं जंजाळ सहलीसाठी थोडं त्रासाचं त्यामुळे सहलीसाठी त्याला तशी सोडचिठ्ठीच द्यायची. आजी आजोबांना पटवायचं. एकदा का जीन्स टॉपची सवय झाली की सहलीचं सामान एकदम कमी होऊन जातं आणि त्यांचा त्रास वाचतो. नुसते कपडेच नव्हे तर बाकीच्या अ‍ॅक्सेसरीजकडेही लक्ष द्यायचंय. जीन्स टी-शर्ट आणि गळ्यात स्टाईलिश स्कार्फ किंवा आजोबांसाठी मफलर असे आजी आजोबा बघायला मजा येईल नाही. थोडक्यात ‘कोण काय म्हणेल?’ ही भीती घालवून टाकण्याचं काम तुम्ही करायचंय. जेव्हा घराघरात आजी आजोबांचा असा मेकओव्हर त्यांची नातवंडं करतील तेव्हा ते आजीआजोबा किती खूश होतील सांगा बरं? आणि एकूणच ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ असा मामला होऊन जाईल. तुमचा एवढा वेळ आजी आजोबा डीझर्व करतात बरं आणि तुमची ती जबाबदारी आहे. सो चला मोहीमेवर, आजी आजोबांना स्मार्ट बनविण्याच्या…. लेट्स रीस्पेक्ट रीलेशन्स अ‍ॅन्ड सेलिब्रेट लाइफ!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*