कॅरी झिरो मनी ऑन टूर

0 comments
Reading Time: 8 minutes

कॅरी झिरो मनी ऑन टूरही एक

टॅगलाइन अॅडर्व्हटाइजमध्ये गेली

पंचवीस वर्ष मी वापरली. अर्थात

वीणा वर्ल्ड झाल्यावर मी ती

वापरली नाही पण आज त्या

टॅगलाइनची आठवण आली आणि

मी ती बदलली. ‘कॅरी मनी ऑन

टूर’ अशी.

आत्ता वीणा वर्ल्डची मोस्ट अवेटेड, जानेवारीत असणारी ‘समर ऑफर’ सुरू आहे. दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षीही जानेवारीमध्ये समर व्हेकेशनच्या सहलींच बुकिंग करून पर्यटक भरपूर पैसे वाचविणार आहेत. ह्याविषयी अधिक काही बोलायला नको कारण हे आता सर्वश्रृत आहे. जेवढं आधी बुकिंग तेवढा जास्त फायदा तसंच जशा सहलीतल्या सीट्स भरत जातात तसं डिस्काउंट कमी होत जातं ही गोष्ट पर्यटकांना माहीत आहे. कधी कधी पर्यटकच ह्या बाबतीत जास्त जागरुक असतात आणि ‘जानेवारी सुरू झाला तरी तुमची समर ऑफर का आली नाही?’ त्याची विचारणा करतात. तर आता ही समर ऑफर सुरू झाली आहे, मेगा आणि जंबो हे डिस्काउंटचे दोन प्रकार वीणा वर्ल्ड सुरू झाल्यावर आम्ही सुरू केले. अर्थात आता सर्व टुरिझम इंडस्ट्रीने ते अमलात आणलेयत. चांगली गोष्ट असेल तर ती एकाकडून दुसर्‍याकडे जायलाच हवी. डिस्काउंटमध्ये वीणा वर्ल्ड, पर्यटक आणि असोसिएट म्हणजे एअरलाइन, हॉटेल, ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्यांनाच फायदा होतो, ‘विन विन सिच्युएशन’ म्हणूया आपण.

वीणा वर्ल्डच्या सहलींच बुकिंग पर्यटक वीणा वर्ल्डच्या ब्रांच ऑफिसमध्ये किंवा महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक आंध्र… मध्ये असलेल्या प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सकडे करू शकतात. बुकिंग करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग,  अकाउंटपेयी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट ने पैसे भरायचे असतात. चेक वा डिमांड ड्राफ्ट हा ‘Veena Patil Hospitality Pvt. Ltd.’ या नावानेच द्यायचा हे ध्यानी घ्यावं. महत्वाची गोष्ट म्हणजे वीणा वर्ल्डच्या कोणत्याही ब्रांच ऑफिसमध्ये किंवा प्रिफर्ड सेल्स पार्टनरकडे कॅश ट्रॅन्झॅक्शन्स होत नाहीत ह्याची नोंद घ्यावी. डिजिटल क्रांतीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे तो असा. जर पर्यटक आमच्या कोणत्याही ब्रांच वा प्रिफर्ड सेल्स पार्टनर्सच्या जवळ नसतील किंवा दुसर्‍या राज्यांमध्ये वा देशांमध्ये राहात असतील तर त्यांच्यासाठी आमची 24/7 ऑनलाईन बुकिंग सर्व्हिस www.veenaworld.com वर उपलब्ध आहे आणि त्यासाठी ऑफिस टाइम, हॉलिडे ह्याचं काहीच बंधन नाही. रात्री-बेरात्री कधीही तुम्ही त्यावर बुकिंग करू शकता. इथे आमच्या विद्याविहार कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ऑनलाइन बुकिंगला सपोर्ट करणारी मोठी टीम आहे, जी दिपिक्षा शहाच्या सोबत आहे आणि ऑफिस अवर्समध्ये ते सर्वजण आपल्या दिमतीला हजर असतात. आत्तापर्यंत अडीच हजारहून अधिक पर्यटकांनी मिडल ईस्ट, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून बुकिंग केलंय आणि ‘दे आर व्हेरी हॅप्पी अबाऊट इट’. फक्त एकच प्रिकॉशन घ्यायचीय, ती म्हणजे वीणा वर्ल्डची वेबसाईट www.veenaworld.com आहे त्यावरच बुकिंग करायचं. आता तुम्ही म्हणाल, ‘ह्यात काय एवढं अगदी पेपरातून सांगण्यासारखं’. पण पुढचा इन्सिडंट तुम्ही वाचाल तर त्यापाठची तळमळ तुमच्या लक्षात येईल.

रविवार, एकतीस डिसेंबरचा दिवस. नील जपानला, सासूबाई वसईला, सुनिला-सारा सिंगापूरला त्यामुळे आम्ही दोघंच घरी म्हणून म्हटलं चला आज जरा आपल्या आवडत्या ठिकाणी हँगआऊट करूया, मग त्यात काहीही असतं, जहांगीर आर्ट गॅलरी ते फर्निचरच्या शो रुम्सपासून कोझी रेस्टॉरंटपर्यत भटकंती सुरू असते. रघुवंशी मिल मधल्या गुड अर्थमध्ये टेस्टींग रुममध्ये टेबल रीझर्व्ह केलं होतंच. तिथल्या डिशेशवर मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या स्टाईलने ताव मारून आम्ही घरी परतत होतो तर माझी मैत्रिण पद्मजा फेणाणीचा फोन दिसला. चला आता पद्मजाचा गोड आवाज कानाना सुखावेल म्हणत फोन उचलला तर, ‘अगं वीणा, तुमच्यासोबत आमची भाचरं राजस्थानला जैसलमेरच्या टूरवर गेलीयत, आणि त्यांच्यासोबत कोणीच नाहीये, ती घाबरलीयत आणि म्हणताहेत की वीणा वर्ल्डच्या माणसाने त्यांना सांगितलं अठरा लोक होते पण त्यातला सोळा जणांचा गु्रप कॅन्सल झाला म्हणून तुम्हाला दोघांनाच आम्ही पाठवतोय. असं कसं ग! ही दोघंही अमेरिकेतून आलीयेत आणि त्यांना कळत नाहीये आता काय करायचं ते’. अरे बापरे माझ्या माहितीप्रमाणे असं काही नसणार ही खात्री होती पण कधी कधी आपलाही कॉन्फिडन्स ढासळतो तसं झालं. तिला मी म्हटलं की, ‘अग आमच्या प्रत्येक सहलीसोबत टूर मॅनेजर आहेच आहे आणि अशी फक्त दोन जणांची सहल माझ्या आजच्या एमआयएस मध्ये पाहण्यात तरी नाही पण मी चेक करते’. राजस्थानमध्ये त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पंचवीस टूर्स सुरू होत्या. सर्व टूर मॅनेजर्स न्यू इयर सेलिब्रेशच्या तयारीला लागले होते आणि सर्व सहली व्यवस्थित सुरू होत्या. मी त्या अमेरिकेन मुलांची नावं आमच्या टूर मॅनेजर्सच्या वॉलवर टाकली. प्रत्येकजण म्हणाला, ‘आमच्याकडे ह्या नावाची मुलं नाहीत’. ऑफिस बंद होतं तरी आमच्या गेस्ट रीलेशन टीमला सिस्टिमवर संपूर्ण हिस्ट्रीमध्ये चेक करायला लावलं इंडिपेन्डंटली बुकिंग केलंय का ते बघायला. पण कुठेही ही नावं रीफ्लेक्ट होत नव्हती. आता आम्ही अपसेट झालो. कारण कळत नव्हतं आणि जर काही गोंधळ असेल तर ही अमेरिकेतली आपली नेक्स्ट जनरेशन भारताविषयीचं नको ते मत बनवून अमेरिकेत जातील ह्याने जास्त अस्वस्थता आली. आत्तापर्यत ह्या मुलांचे नाशिकचे नातेवाईकही कॉन्फरन्स कॉलवर आले. त्या मुलांशीही जैसलमेरमध्ये सुधीर बोलले. सगळ्यांचं म्हणणं एकच, ‘आम्ही वीणा वर्ल्डकडे बुकिंग केलंय’. त्यांना म्हटलं, ‘तुमच्याजवळ असलेली व्हाऊचर्स आणि रिसिट्स पाठवा बरं लागलीच’. आणि ते आल्यावर आमची चिंता दूर झाली कारण हे बुकिंग आमच्याकडे नव्हतंच. आणखी खोदल्यावर दिल्लीला दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेली ही सारख्या नावाची कंपनी आम्हाला इंटरनेटवर दिसली आणि तिथे ह्यांनी पैसे भरले होते. अशा तर्‍हेची पहिलीच केस आली होती, आम्ही आता उत्खनन सुरू केलंय, काय घ्यायची ती प्रिकॉशन आम्ही घेऊ पण पर्यटकराजा तुही जागरुक राहावं ही मनापासूनची इच्छा. ‘पद्मजाचे आभार’ कारण त्यांनी ही गोष्ट नजरेस आणली.

आणखी एक गोष्ट याच लेखाद्वारे मला सांगाविशी वाटते ती म्हणजे, ‘कॅरी झिरो मनी ऑन टूर’ ही एक टॅगलाइन अ‍ॅडर्व्हटाइजमध्ये गेली पंचवीस वर्ष मी वापरली. अर्थात वीणा वर्ल्ड झाल्यावर मी ती वापरली नाही पण आज त्या टॅगलाइनची आठवण आली आणि मी ती बदलली. ‘कॅरी मनी ऑन टूर’ अशी. ‘तुम्ही सर्वसमाविष्ट सहली अशी जाहिरात करता आणि आम्ही अनुभवलंय की सहलीवर सर्व महत्वाच्या गोष्टी समाविष्ट असतात आणि कुठेच एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीत मग हे काय नवीन?’ असं तुम्ही लागलीच म्हणाल ह्याची मला खात्री आहे. पण त्याचं असं झालं की, आता पर्यटक खूप मोठ्या संख्येने फिरायला लागलेत. आकाशात विमानांची गर्दी झालीय. एअरपोटर्सवर पार्कींग लॉट्स उपलब्ध नाहीत. भरीस भर म्हणून ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा एकूणच निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे असेल अतिवृष्टी, धुकं, बंद, मोर्चे ह्यासारख्या गोष्टी एअरलाइन इंडस्ट्रीवर आघात करताहेत. गेला संपूर्ण आठवडा दिल्लीचं धुकं आम्हाला थकवून गेलं. आपण रेडिओ वा वृत्तपत्राद्वारे रोज ऐकतच होतो की एवढी डोमेस्टिक फ्लाइट्स कॅन्सल झाली आणि एवढी इंटरनॅशनल. आता अशावेळी पूर्वी एअरलाइन्स हॉटेल स्टे किंवा मील कुपन्स किंवा काहीतरी व्यवस्था करायच्या. पण आता प्राइस वॉरमुळे एअरफेअर कमी किमतीत दिल्याने बहुतेक सर्वच एअरलाइन्सनी अशा सर्व्हिसेस देणं बंद केलंय. फक्त जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरच्या फ्लाइटला रिझर्व्हेशन द्यायची जबाबदारी त्यांनी घेतलीय. आता ज्यावेळी एअरलाइन कोणत्याही कारणास्तव अशी फ्लाइट्स रद्द करते त्यावेळी संपूर्ण सहल यशस्वीरित्या झाल्यावर वीणा वर्ल्डचा काय दोष. पण मग पर्यटकांचं म्हणणं असतं की हे वीणा वर्ल्डने करायला पाहिजे. आम्हाला कॉम्प्लिमेंटरी हॉटेल स्टे आणि जे काही लागेल ते द्यायला पाहिजे. गेल्या आठ दिवसात पंचवीस एक फ्लाइट्स कॅन्सल झाली, यातील सर्व पर्यटकांना कॉम्प्लिमेंटरी स्टे देणं प्रॅक्टीकली पॉसिबल नाही. मग ते वीणा वर्ल्डलाच नाही तर कोणत्याच पर्यटन संस्थेला. बहुतेक सर्वच पर्यटनसंस्था खूप कमी मार्जिनने किंवा नो लॉस नो प्रॉफिटवर काम करताहेत. अशावेळी एखाद्याने कुणी कॉम्प्लिमेंटरी दिलं तरी ते फिजिबल सोल्युशन नाही. त्यामुळेच सतत पर्यटनसंस्था आणि एअरलाइन इंडस्ट्री घाट्यात काम करतेय किंवा सशक्तपणे वाढू शकत नाहीये. एक लीडर म्हणून मी ह्या गोष्टीला वाचा फोडतेय की पर्यटकांनी अशा अपरिहार्य गोष्टींसाठी थोडे पैसे सोबत ठेवावे. कारण ह्याद्वारे येणारा खर्च हा त्यांना करावा लागेल. असं फ्लाइट कॅन्सल होऊ नये ह्यासाठी आपण प्रार्थना करू पण कुणाच्याही हातात नसलेल्या ह्या गोष्टी आहेत. तेव्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करते. बाकी आहोतच आम्ही तुमच्या दिमतीला अगदी हात जोडून आणि कंबर कसून.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*