Our contact numbers are currently down. Please reach us at travel@veenaworld.com or 8879973807 or 9152004513. We apologize for the inconvenience

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

स्वप्नांच्या पलिकडले...

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 04 August 2024

आम्हा ऑफिसवाल्यांना दुपारची झोप तशी अश्ाक्यच. म्हणजे डोळे उघडे ठेवून ज्यांना झोपता येतं ते नशिबवान, पण वामकुक्षी ही लक्झरी आम्हाला नाही. ते बरंही आहे म्हणा. दुपारची झोप घेणाऱ्यांना रात्री झोप लागत नाही म्हणतात. एका ठिकाणी तर वाचलं होतं दुपारची झोप तुमचं वजन वाढवते. सतत जागं राहून जागृतपणे दिवसभर कामाचा उपसा काढायचा आणि रात्री गादीत पडल्या पडल्या झोपेचा अंमल आपल्यावर चढवायचा ह्यासारखी सुखाची गोष्ट नाही. हे काहीही असलं तरी रविवारी सुट्टीच्या दिवशी घरीच असू आणि दुसरा काही उद्योग नसेल तर मग यथेच्छ भोजनानंतर वामकुक्षी कशी महत्वाची आहे ह्यावरील विचारांची गर्दी मनात होते, आपण गादीशी हातमिळवणी करतो आणि देतो झोकून. त्यावेळी ना कोणतं शहाणपण हवं असतं ना उपदेश. आता वामकुक्षी सदृश विश्रांती घ्यायची, उठल्यावर एकदम रीफ्रेश मूडमध्ये एखादं आर्टिकल लिहून टाकायचं हा विचार करीत मागच्या रविवारी दुपारी दिली ताणून.

सीन 2, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होते. एकटीच फिरत होते. आणि अचानक मला जाणवलं, माझी पर्स आणि मोबाईल दोन्ही चोरीला गेलंय. आता काय करायचं, गांगरून गेले. आपल्या घरातल्यांचे किंवा जिवश्च कंठश्य मित्रपरिवारातले किमान दहा नंबर्स तरी आपल्याला पाठ असावेत हा नियम माहीत आहे तरीही त्या गडबडीत एकही नंबर आठवेना. भीतीने माझ्या मनाचा कब्जा घेतला. तिथे बाजुला असलेल्या माणसाला मी विनवणी करून दमले पण त्याला काही पाझर फुटेना. आणखी एक दोघांना विचारून पाहिलं पण कुणीही दाद देईना. सॅन फ्रान्सिस्कोच नव्हे तर अमेरिका आणि युरोपातल्या अनेक देशात होमलेसचा प्रश्न एवढा जटिल बनलाय आणि त्याच्या इतक्या वेगवेगळ्या कहाण्या रोज ऐकायला मिळतात की तिथे स्थानिकांच्या मनात वेगवेगळ्या भीत्यांनी घरं केलेलं आहे. कुणीही मदतीला येईना. पोलिसही कुठे दृष्टीस पडेना. माझी स्थिती अगदी दयनीय झाली, आता आपलं काय होणार ह्या धास्तीने माझं प्रेशर वाढू लागलं. आणि मला खाडकन जाग आली. अरेच्चा हे स्वप्न होतं तर. केवढी घाबरले होते मी. हुश्श! घरातच आहे म्हटल्यावर जो काही सुटकेचा निश्वास मी टाकला की विचारू नका. रीफ्रेश होण्यासाठी झोपलेले मी ह्या स्वप्नाने इतकी दमले की त्यातून रीकव्हर होण्यासाठी मला तासभर जागं राहून विश्रांती घ्यावी लागली. कसलं आर्टिकल आणि कसलं काय.

हे असं स्वप्न का बरं पडलं असेल. टूरवर कधीतरी एखाद्या पर्यटकाची शोल्डर बॅग वा पर्स चोरीला जाते ते कुठेतरी बॅक ऑफ द माईंडमध्ये रेंगाळत असेल का? आमच्या प्रत्येक टूर मॅनेजर मीटमध्ये पर्यटकांना रोज पर्सेस सांभाळा, मोबाईल सांभाळा... हा घोषा आम्ही लावायला सांगतो म्हणून असं स्वप्न पडलं, की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा आमचा धाकटा मुलगा आम्हाला तिथे प्रचंड चोऱ्या होतात, गाड्या फोडल्या जातात म्हणून गाडीत काहीही म्हणजे काहीही ठेवू देत नव्हता, त्याला आम्ही म्हणायचो,‌‘राज अरे, काय हे तुझं सॅन्ा फ्रान्सिस्को, अशा ह्या भीती वा चिंतेत कसे रहाता तुम्ही? आपला भारत बरा आहे की सामानाने भरलेल्या गाड्या पार्किंग मध्ये सोडून आम्ही बिनधास्त भटकू शकतो‌’. ही गोष्ट कदाचित मनाच्या कुठच्यातरी कोपऱ्यात दडून बसली असेल म्हणून त्या स्वप्नात पर्स हरवायला मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पोहोचले असेन. किंवा कदाचित त्या स्वप्नाने मला शिकवलं की, मोबाईलमुळे पुर्वीसारखे आपल्याला फोन नंबर्स पाठ नसतात, ते चालणार नाही. फोन नंबर्स पाठ असलेच पाहिजेत, इट इज अ मस्ट. मोबाईल शक्यतोवर शोल्डर स्ट्रिंगला लटकवूनच गळ्यात अडकव, त्यात थोडेसे पैसे आणि एखादं क्रेडिट डेबिट कार्ड असू दे. पर्समध्ये वेगळे पैसे व वेगळं क्रेडिट कार्ड ठेव. प्रीकॉशन इज ऑलव्हेज्‌‍ बेटर दॅन क्युअर. किंवा माझ्या लाइफस्टाईल रेजिमने मला धाक दाखवला असेल की दुपारी झोपणं तुला अलाऊड नाहीये. जर दुपारी झोपलीस तर अशी काही दमवणारी स्वप्नं तुला पाडू की पुन्हा दुपारी वामकुक्षी घ्यायची तुझी हिंमत होणार नाही.

आपल्याला प्रत्येकाला स्वप्न पडतातच. मला हल्ली नाही पडत तेवढी, पण शाळा कॉलेजच्या दिवसात माझं स्वप्न पडण्याचं प्रमाण जारा जास्तच होत. मला आठवतंय एकदा आमचे स्नेही आणि `माईंडफुल लाईफ‌’चे डॉ. राजेंद्र बर्वे टूरला होते, त्यांना मी विचारलं  ‌‘एवढी स्वप्न का पडतात? स्वप्न पडण्याच्या वेळी आपण गाढ झोपेत असतो की अर्धवट झोपेत?' त्यावेळी त्यांनी म्हटल्याचं आठवतं, ‌‘स्वप्न ही गाढ झोपत पडतात. त्यामुळे डोंट वरी, तुझी झोप पूर्ण होतेय.‌‘ एवढी स्वप्न पडतात, हे एकदा माझ्या आजीला म्हटलं होतं तर ती म्हणाली की, ‌‘झोपताना जिथे डोकं ठेवतेस तिथे गादीखाली चामड्याची चप्पल ठेव मग स्वप्न पडणार नाहीत‌‘ आणि मी चक्कं ती चामड्याची चप्पल ठेवली होती गादीखाली. आता त्याने स्वप्न कमी झाली हेोती का माहीत नाही, पण चामड्याची चप्पल ठेवली होती ही गोष्ट मला पूर्ण आठवतेय. स्वप्नांची दुनिया एक कोडं आहे आजही. शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना, स्पिरिच्युअल गुरुंना अजूनही ते पूर्णपणे सोडवता आलेलं नाहीये. पूर्ण सत्य कळलेलं नाहीये. तेही चांगलं आहे म्हणा, आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उकल झाली तर मग आयुष्य नीरस बनून जाईल, मजाच निघून जाईल.

गेली चाळीस वर्ष जगभर फिरतेय. कधी एकटी तर कधी सुधीरसोबत वा कुटुंबासमवेत. जेव्हा सगळे बरोबर असतात तेव्हा आपल्याला एक मॉरल सपोर्ट असतो आणि आपण बिनधास्त असतो. पण जेव्हा एकटे असतो तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि ती मी नेहमीच घेत आलेय त्यामुळे कधीही कुठेही भीती वाटली नाही किंवा कोणत्याही वाईट प्रसंगाला सामोर जावं लागलं नाही. सोलो फिरणाऱ्या महिलाही तशाच स्वतःला सांभाळून असतात म्हणूनच बिनधास्त असतात. कधी वुमन्स स्पेशलला गेले तर हाच सल्ला असतो माझ्या टूरवरच्या मैत्रिणींना. लेट्स मेक लाइफ मोअर इंटरेस्टिंग, अजिबात घाबरायचं नाही, ‌‘डर के आगे जीत है।‌‘ हे काहीही असलं तरी एकदा माझी घाबरगुंडी उडाली होती. मी एकटीच होते. दिवसभराच्या कामाने दमून हॉटेलच्या रूममध्ये नेहमीप्रमाणे निर्धास्तपणे येऊन आडवी झाले. पटकन झोपही आली. मध्यरात्री कधीतरी जाग आली आणि मला जाणवलं की माझ्या बेडवर चार-पाच माणसं बसलीयत आणि ती माझं पांघरूण खेचायचा प्रयत्न करताहेत. मी जीवाच्या आकांताने ते पांघरूण त्यांना खेचू देत नव्हते. पांघरूण माझ्याकडे ओढायचा प्रयत्न करीत होते. अशी खेचाखेच काही काळ चालू असताना मला सुचलं की लाइट लावावा. आणि निकराच्या प्रयत्नाने एका हाताने पांघरूण खेचत दुसरा हात लांब करून साइड लॅम्प लावला. आणि बघते तर काय रूममध्ये कुणीही नव्हतं. आत्ता धडधडीत दिसणारी ती माणसं कुठेही नव्हती. मला मात्र दरदरून घाम सुटला होता. तातडीने मी रीसेप्शनला फोन लावला आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मला मग एकटीला रूममध्ये रहायचं धाडस होईना. मी सरळ आमच्या टूरबरोबर आलेल्या उल्का पटवर्धन आणि लेडी टूर मॅनेजर्सना म्हटलं कुणीतरी या बाबांनो माझ्याबरोबर रूम शेअर करायला. त्यानंतर अनेक दिवस मी एकटी कुठेही गेले जगाच्या पाठीवर तरी रूममध्ये लाइट सुरू ठेवून झोपत होते. जसे दिवस गेले तशी भीती कमी झाली आणि तो प्रसंगही आठवणींमधून मागे फेकला गेला. आजपर्यंत मला कळलं नाही नेमकं काय होतं ते. स्वप्न की हॉन्टेड रूम म्हणतात तसं काही होतं. अर्थात अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात किंवा त्यावर खूप विचार करायचा नसतो. मनात काही काळ भीती घर करून रहाते पण त्यावर उपाय शोधायचे.

एकंदरीतच स्वप्न थकवतात, मग ती दिवसाढवळ्या आपल्यासमोर पिंगा घालणारी असोत किंवा रात्री झोपल्यानंतर आपल्याला पडलेली असोत. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ह्यांनी सांगून ठेवलंय, ‌‘स्वप्न पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आधी स्वप्न बघायला शिका. एकदा स्वप्न बघितलं की त्या स्वप्नरंजनात मात्र मश्गूल राहू नका. जागे व्हा. उठा. स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने पेटून उठा. मनापासून केलेली मेहनत वाया जाणार नाही. त्या मार्गावर कदाचित अपयश येईल त्याने निराश होऊ नका. स्वप्न सोडून देऊ नका‌‘. आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये डॉक्टर कलामांचा हाच विचार आम्ही भिंतीवर कोरलाय. लर्निंग सेंटरमधून येता जाता त्याचं दर्शन होतं आणि मनाला खूप उभारी मिळते. जास्त उत्साहाने कामाला सुरुवात होते. अर्थात स्वप्न बघताना ते असं बघावं की ते आपल्या क्षमतेला धरून असेल. त्यासाठी रीसोर्सेस असल्याचा वा ते येण्याचा अंदाज व आत्मविश्वास असला पाहिजे. अन्यथा स्वप्नपूर्ती न झाल्याने आलेल्या नैराश्याचा सामना करावा लागेल. एका पॉडकास्टमध्ये किमयागार मुसाफिर श्री. अच्युत गोडबोलेंनी चांगलं सांगितल्याचं आठवतं, ‌‘कुठेतरी कुणीतरी सतत, एव्हरीथिंग इज पॉसिबल, ड्रीम अँड अचिव्ह चा नारा लावलेला आपण बघतो, क्षमतेपेक्षा मोठी स्वप्न बघतो, अपयश घेतो आणि नैराश्याच्या गर्तेत अडकतो‌‘. तसंही व्हायला नको. म्हणजेच आपल्याला जागेपणी जागरूकपणे स्वप्न आणि स्वप्नांच्या पलीकडे बघता आलं पाहिजे.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

यरोप आणि नॉर्थ अमेरिका खंडाच्या मधोमध असलेला, नॉर्थ अटलांटिक महासागराने वेढलेला ‌‘आईसलँड‌’ हा देश सुमारे तीस लहान लहान बेटांनी मिळून बनलेला आहे. नावाप्रमाणे हा देश काही कायम बर्फाने आच्छादलेला नसतो तर या देशातला फक्त 10% भूभाग ग्लेशियर्सनी आच्छादलेला आहे. हा देश प्रसिध्द आहे तो जिओ थर्मल जागा आणि गरम पाण्याच्या फवाऱ्यांसाठी. भूगर्भशास्त्रानुसार आईसलँड ही अगदी तरुण भूमी आहे. त्यामुळे या जमिनीच्या पोटात अनेक ज्वालामुखी खदखदत असतात. त्यामुळेच या देशात ‌‘गिझर्स‌’ अर्थात गरम पाण्याचे फवारे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्याचाच फायदा घेऊन इथले नागरिक अगदी कमी खर्चात गरम पाणी आणि विद्युतशक्ती मिळवतात. पर्यटन आकर्षण म्हणूनही या भूवैशिष्ट्याचा वापर केला जातो.

आईसलँडची राजधानी असलेल्या ‌‘रेकयाविक‌’ या शहराजवळ या देशातलं सर्वात मोठ्ठं पर्यटन आकर्षण ‌‘ब्लू लगून‌’ आहे. इथल्या जिओथर्मल पॉवरस्टेशनच्या पाण्यातून हा स्पा तयार करण्यात आला आहे. या स्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात नावाप्रमाणेच आभाळासारखं निळंशार पाणी आहे. या पाण्यात सिलिकाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ते असं गडद निळं दिसतं. इथे जवळच‌‘स्वार्तसेंगी थर्मल पॉवर प्लँट‌’ आहे. या केंद्रात जमिनीखालच्या लाव्हारसामुळे गरम झालेलं पाणी टर्बाइन्स फिरवायला वापरलं जातं. त्यातून विद्युतनिर्मिती केली जाते, त्यानंतर हे पाणी आणि गरम वाफ म्युन्सिपल वॉटर हीटिंग सिस्टिमसाठी वापरलं जातं. मग हे पाणी ब्लू लगूनमध्ये सोडलं जातं. दर दोन दिवसांनी या पूलमधलं पाणी बदललं जातं. ऐंशीच्या दशकात एका सोरायसिस झालेल्या व्यक्तीने या पाण्याने आंघोळ केली तेव्हा त्यातील औषधी गुणधर्म लक्षात आले आणि 87 साली इथे आंघोळीसाठी सुविधा तयार करण्यात आल्या. या पाण्यात सल्फर आणि सिलिकाचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचा विकरांवर औषध म्हणून याचा उपयोग होतो. या पूलचे तपमान साधारण 37-39 अंश सेल्सियस इतकं असल्याने त्यात डुंबणं त्रासदायक नसतं. या ठिकाणी स्पा, रेस्टॉरंट, कॅफे आहेत, त्यामुळे तुम्ही एखादी रात्र निवास करून सॉना, मसाज याचाही अनुभव घेऊ शकता. ब्लू लगून स्पा केफ्लाविक विमानतळाच्या वाटेवर आहे, त्यामुळे आईललँडमध्ये आल्या आल्याच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता किंवा परत जाताना कायमची आठवण म्हणून ब्लू लगूनला भेट देऊ शकता. अशा ह्या 'लँड ऑफ फायर अँड आईस' आईसलँडला भेट देण्यासाठी आणि तिथल्या ब्लू लागून चा अनुभव घेण्यासाठी, वीणा वर्ल्डच्या आईसलँड टूरवर जायलाच हवं. येत्या ऑक्टोबरमध्ये आईसलँड सोबत अफलातून नॉर्दर्न लाईट्‌ पाहण्याची संधी देखील आहे, जी अजिबात दवडू नका.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

केल्यानं देशाटन...

केल्यानं देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार... या जुन्या म्हणीवर माझा विश्वास आहे, नव्हे गेली अनेक वर्षे जगभ्रमंती करताना मी वेगवेगळ्या देशांमध्ये याचा अनुभव घेतला आहे. किंबहुना मी वेगवेगळ्या लोकांना भेटता यावं, त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळावी, त्यांच्या परंपरा जाणून घ्याव्यात म्हणूनच पर्यटन करते. मी भरुचला राहते आणि वीणा वर्ल्डच्या सुरतमधील सेल्स पार्टनर कडून म्हणजे ‌‘प्रिटी प्लॅनेट‌’ कडून आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या टूर्स बूक केल्या आहेत. वीणा वर्ल्डची मॅनेजमेंट आणि सर्व्हिस इतकी प्रोफेशनल आहे की आजपर्यंत मी एकदाही प्रिटी प्लॅनेटच्या ऑफिसला स्वतः गेले नाहीये. फोन कॉल्स आणि व्हॉट्‌‍सॲपवर सगळी कामं अगदी व्यवस्थित होतात. आजपर्यंत मी 27 देशांना भेट दिली आहे, त्यामुळे देशांचा रौप्यमहोत्सव झाला आहेच, आता मला वेध लागले आहेत सुवर्ण महोत्सवी टप्पा पार करण्याचे. त्यासाठी मी सप्टेंबरमध्ये वीणा वर्ल्डची ‌‘ट्युनिशिया, माल्टा, सिसिली‌’ ही टूर बूक केली आहे तर नोव्हेंबरमध्ये मी 21 दिवसांच्या ‌‘बेस्ट ऑफ साउथ अमेरिका‌’ टूरवर जाणार आहे. या टूर्समुळे मी पाहिलेल्या देशांची संख्या 35 होईल. मी आजपर्यंत पाहिलेल्या देशांमधील ‌‘इजिप्त‌’ हा देश मला तिथल्या ऐतिहासिक वास्तू आणि प्राचिन परंपरेच्या खुणांसाठी खूप आवडला आहे. तसंच स्कँडिनेव्हियाच्या टूरमध्ये तिथल्या अलौकिक निसर्गाचं जे दर्शन झालं ते मी कधी विसरूच शकत नाही. माझ्या कायम लक्षात राहिली आहे ती ‌‘अंटार्क्टिका‌’ सहल. एकतर जगाच्या तळाशी असलेला हा बर्फमय खंड, जिथे मनुष्यवस्तीच नाही, आहे तो आगळा वेगळा निसर्ग. अंटार्क्टिकाची सहल संस्मरणीय झाली कारण आमच्या क्रुझवर अंटार्क्टिका एक्सपर्टसनी लेक्चर्स देऊन आम्हाला या खंडाबद्दल भरपूर माहिती दिली. माझा पर्यटनाचा मुख्य उद्देश ज्ञान आणि माहिती मिळवणं हाच तर असतो. मला प्रवासात माझ्या रूम पार्टनरपासून ते कोचमध्ये शेजारी बसलेल्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांशी बोलायला आवडतं. प्रत्येकाचा फिरण्याचा उद्देश वेगळा असतो, त्यामुळे चार लोकांशी बोलल्यानंतर तुमच्याही ज्ञानात भर पडते. त्यामुळे मी जिथे जाते तिथल्या लोकल मार्केटला भेट द्यायला विसरत नाही. एकतर मला माझ्या नातवंडांसाठी, सुनेसाठी सोव्हिनियर्स घ्यायची असतात आणि मार्केटमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं स्थानिकांच्या जगण्याचं दर्शन घडतं.


काय बाई खाऊ कसं  गं खाऊ!

टर्किश आइस्क्रीम म्हटल्यावर पारंपारिक पोशाख करून लांब स्टिकवरचं आइस्क्रीम तुमच्या कोनमध्ये टाकल्यासारखं करून न टाकता तुम्हाला हैराण करणारा आइस्क्रीमवाला आठवतो ना? तो अशी हातचलाखी करू शकतो कारण टर्कीमधलं जगप्रसिध्द आइस्क्रीम थोडं वेगळं आहे. म्हणजे नेहमी आइस्क्रीम खायला आपल्याला लहानसा अगदी पातळ चमचाही चालतो पण टर्कीमधलं पारंपारिक ‌‘दोन्दुर्मा‌’ खायला मात्र नाइफ आणि फोर्कचीच मदत घ्यावी लागते. याला कारण म्हणजे ‌‘दोन्दुर्मा‌’ मध्ये ‌‘सालेप‌’ म्हणजे एका ऑर्किडच्या कंदाची पावडर वापरलेली असते. त्यामुळे हे आइस्क्रीम अतिशय घट्ट, दाट आणि जरासं स्ट्रेची असतं. या आइस्क्रीममध्ये मॅस्टिक या झाडापासून मिळणारं रेसिन वापरलेलं असतं, त्यामुळेही या आइस्क्रीमचं टेक्स्चर इतर आइस्क्रीमसारखं सॉफ्ट नसतं. ‌‘दोन्दुर्मा‌’ म्हणजे टर्किश भाषेत आइस्क्रीम. या आइस्क्रीमला टर्कीच्या बाहेर मॅस्टिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखलं जातं. टर्कीमधल्या खरमनमराश किंवा मराश या शहरामध्ये या आइस्क्रीमचा उगम मानला जातो. याच शहरातली ‌‘बॅटल ऑफ मराश‌’ टर्कीच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्वाची लढाई मानली जाते. दोन्दुर्मामध्ये ज्या ऑर्किड कंदांची पावडर वापरली जाते, ते ऑर्किड खरमनमराश मध्येच उगवतं, त्यामुळेच या शहरातील दोन्दुर्मा ऑथेन्टिक मानला जातो. टर्कीमधल्या सगळ्या बकलावा शॉप्समध्ये, मिठाईच्या दुकानात आणि रस्त्यावरच्या स्टॉल्समध्ये दोन्दुर्मा मिळतं. या आइस्क्रीममध्ये वापरण्यात येणारं ऑर्किड रानात उगवतं, त्याची लागवड होत नाही. त्यामुळे आइस्क्रीमसाठी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागल्यावर त्याच्या संरक्षणासाठी सरकारने काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे टर्कीबाहेर मिळणाऱ्या दोन्दुर्मामध्ये सालेप नसते. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‌‘ट्रॅव्हल एक्सफ्लोअर सेलिब्रेट लाईफ‌’हा पॉडकास्ट नक्की ऐका.


इजिप्त: लँड ऑफ फॅरोज

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत

जगातल्या सर्वात पुरातन संस्कृतीमधल्या लोकांनी उभारलेल्या अद्भुत वास्तूंनी जगाचे आकर्षण ठरलेला देश म्हणजे ‌‘इजिप्त‌’. एकाचवेळी आफ्रिका आणि आशिया या दोन्ही खंडांवर विसावलेला हा देश म्हणजे एक भलमोठं वाळवंटच आहे. या वाळवंटातील सुमारे 6,600 किलोमीटर्स वाहणाऱ्या नाईल नदीच्या आधाराने तर या देशातील लोकजीवन बहरले आहे. इजिप्तमधील भव्य पिरॅमिड्‌‍स, आश्चर्यचकित करणारा स्फिंक्स, `व्हॅली ऑफ किंग्ज‌’ आणि `व्हॅली ऑफ क्विन्स‌’ मधील भव्य प्राचीन अवशेष या सगळ्या अनोख्या जागांचा आनंद तुम्ही वेगवेगळ्या पध्दतीने घेऊ शकता. जणू टाइम मशिनमधे बसून आधुनिक सुखसुविधांसह प्राचीन काळात मारलेला फेरफटका म्हणजे इजिप्तचा हॉलिडे.इजिप्तच्या हॉलिडेचं मुख्य आकर्षण म्हणजे ‌‘गिझा पिरॅमिड्स‌‘. इजिप्तची राजधानी कैरोजवळच्या गिझा येथे हे इसवी सन पूर्व अडीच हजार या काळात उभारलेले प्रचंड पिरॅमिड्‌‍स पाहायला मिळतात. तुम्ही या पिरॅमिड्‌‍सची प्रायव्हेट टूर बूक करू शकता. जाणकार इजिप्तॉलॉजिस्ट बरोबर या रहस्यमय मॉन्युमेंट्‌‍सची माहितीपूर्ण सहल तुमच्या इजिप्शियन हॉलिडेची रंगत वाढवते. इजिप्तमधल्या तुमच्या हॉलिडेत निवासासाठी मॅरियटचं ‌‘मेना हाउस हॉटेल‌’ या 1886 साली स्थापन झालेल्या ऐतिहासिक जागेची निवड अवश्य करावी. चाळीस एकरांच्या गार्डनने वेढलेल्या या हॉटेलमधून पिरॅमिड्‌‍सचं विलोभनीय दर्शन घडतं. जगप्रसिध्द लेखक सर आर्थर कॉनन डॉयल, ब्रिटनचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, जेम्स बॉन्ड फेम रॉजर मूर असे शाही पाहुणे राहिलेल्या या हॉटेलमधील निवास तुमच्या इजिप्त भेटीला एकदम रॉयल बनवून टाकेल.लक्झर येथे रहाण्यासाठी तुम्ही सोफिटेल विन्टर पॅलेसची निवड करू शकता. व्हॅली ऑफ किंग्ज्‌‍मध्ये तुम्ही हॉट एअर बलून राइड घेऊन सुर्योदय पाहू शकता तर नाईल रिव्हर क्रुझमध्ये तुम्ही जगातल्या सर्वात लांब नदीच्या प्रवाहात जलविहाराचा आनंद घेऊ शकता. ‌‘दहाबिया‌’ या दोन शिडांच्या पारंपरिक नौकेतून जलविहार करताना तुम्ही काठावरच्या जुन्या मंदिरांना, खेडेगावांना भेट देऊ शकता. बोटीवरच्या आरामदायी सुविधा, स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे ही सफर संस्मरणीय ठरते.इजिप्तला `रेड सी‌’ चा किनाराही लाभलेला आहे, या सागरात प्रायव्हेट यॉट घेऊन तुम्ही डायव्हिंग किंवा स्नॉर्केलिंगचा थरार अनुभवत सागर सफारीची मजा लुटू शकता. इथल्या सागरतळाशी बुडलेल्या बोटींचे अवशेष आणि नैसर्गिक कोरल्स यांचे दर्शन घेण्यासाठी हा अनुभव घ्यायलाच हवा. या रेड सीच्या काठावरचं ‌‘हुरगाडा‌’ हे शहर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. इथे तुम्ही विंडसर्फिंग, काइटसर्फिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग याचा आनंद घेऊ शकता.इजिप्तचा जो भाग आशिया खंडात आहे, त्या सिनाइ पेनिन्सुलाच्या दक्षिण टोकावर एक अप्रतिम ‌‘शर्म अल शेख‌’ हे पर्यटन आकर्षण वसलेलं आहे. सागरकिनाऱ्यावरच्या या गावात पर्यटक गर्दी करतात ती इथल्या सागरतळीची अद्भुत दुनिया बघायला. या ठिकाणच्या समुद्रात 250 वेगवेगळ्या कोरल रिफ्स आहेत, ज्यात सुमारे एक हजार प्रकारचे मासे बघायला मिळतात. येथील डायव्हींगचा अनुभव केवळ अद्वितीय.तर मग ठरवूनच टाका इजिप्तचा हॉलिडे एका रोमांचक अनुभवासाठी. मार्गदर्शनासाठी वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ची टीम सज्ज आहेच.


लडाख! हिमालयातील एक सर्वोच्च तीर्थक्षेत्र

Leh Ladakh

आम्ही वीडा उचललाय जास्तीत जास्त पर्यटकांना लडाखला घेऊन जायचा. कोविड आणि एका विमान कंपनीच्या कोसळण्यामुळे लडाखला गेली तीन चार वर्ष पर्यटकांचा ओघ न गेल्याने अनेक अडचणींना स्थानिकांना तोफ्लड द्यावं लागलं. त्यामुळे ह्यावर्षी आपण प्रत्येकाने ट्रॅव्हल मिशनमध्ये लडाखचं नाव घातलंच पाहिजे. सरकारने लेह लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर खूपच सुधारणा झाल्या आहेत. रस्ते मस्त झाले आहेत. त्यामुळे पुर्वी जो रस्त्यांचा त्रास व्हायचा तो प्रकार आता नाही. आता फक्त गरज आहे ती पर्यटकांनी लडाखला जायची. टूरिझमवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तेही फक्त पाच सहा महिनेच चालणाऱ्या लडाखच्या टूरिझम अर्थव्यवस्थेला, लडाखी छोट्या मोठ्या व्यावसायिकांना काम मिळवून दिलं पाहिजे. त्यांच्या मनाला उभारी आणली पाहिजे. एकटे जा, ग्रुपने जा, कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर जा पण लडाख तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये टॉपवर असू द्या. आणि हो, आपण काही उपकार करीत नाही बरं का लडाखवर. लडाखी लोक नम्र आहेत पण लाचार नाहीत. लडाखला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात आपल्याला जो काही आनंद मिळतो, जे निसर्गसौंदर्य आपण डोळे भरून बघतो, ज्या आठवणी आपण सोबत आणतो ते सगळं अनमोल आहे. लडाखची वारी म्हणजे मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी. चला, पर्यटनावरच अवलंबून असलेल्या  लेह लडाखच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याची आपली जबाबदारी पूर्ण करूया आणि अभिमानाने सांगूया, ‌‘आम्हीही जाऊन आलोय लेह लडाखला!‌’ लडाखमध्ये काय बघायचंय ते लिहीलं नाही कारण ते तिथे जाऊन बघण्यात मज्जा आहे. सो चलो, बॅग भरो, निकल पडो! लडाख इज कॉलिंग...

August 03, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top