टाईम टू कनेक्ट!

0 comments
Reading Time: 8 minutes

एरव्ही आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि जेव्हा मुलांबरोबर असतो तेव्हा तर सारखे अभ्यास करचाच नारा लावत त्यांच्या मागे लागतो. घरी राहून आपण त्यांचा स्ट्रेस कमी करतोय की वाढवतोय हेच कळत नाही. परीक्षा संपल्यावर तरी आपल्या कामांतून थोडा वेळ काढून काही दिवस मुलांबरोबर स्ट्रेस फ्री फन टाईम घालवायचा निर्धार करीत आम्ही परतलो. मनात नकळत येऊन गेलं,नाऊ इट्स टाईम टू कनेक्ट!

आपण दोघीच हॉलिडेवर जाणार आहोत? यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या साराने मला अभ्यासाचे पुस्तक बाजूला करीत विचारले.  अग, पण शाळा तुम्हाला दहावीनंतर सिक्कीम-दार्जिलिंगच्या ट्रिपवर नेणार आहे ना. मग मित्र-मैत्रिणींबरोबर तुझा मस्त हॉलिडे होणारच आहे, ह्याची मी तिला आठवण करून दिली. हॉलिडेची स्वप्न नं बघता हातातल्या पुस्तकावर जास्त लक्ष दे असं मला त्याक्षणी तिला सांगावसं वाटलं, पण मी स्वतःला आवरलं.  मित्र-मैत्रिणींबरोबर हॉलिडे प्लॅन झाला असला तरी आपल्या परिवारासोबत हॉलिडेवर जायची तिची ओढ बघून मात्र मला गम्मत वाटली. बरं, नुसत्या हॉलिडेच्या प्लॅनिंगवर नं थांबता,बाईसाहेब मला पुढे ठासून म्हणाल्या, मला नुसतेच हॉटेलमध्ये बसायचे नाही आहे हं,त्याठिकाणी जे काही आहे ते सर्व काही बघायला व करायला मला आवडेल. आय वॉन्ट टू सी द वर्ल्ड विथ यू. नुसताच खाऊन पिऊन टाईमपास तर माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत होतोच. आता पुढे मी काय बोलावं.

आपल्या मुलांकडे आपण हवे तेवढे लक्ष देऊ शकत नाही ही गिल्ट फीलिंग प्रत्येक पालकाला कधी ना कधी नक्कीच त्रास देऊन जाते. त्यात आपली करियर्स सांभाळता सांभाळता दररोजच्या कामांमधले स्ट्रेस, ट्रॅफिक व इतर गोष्टींमुळे आपल्याला मुळातच घरी वेळ कमी मिळतो, त्यानंतर घरातली इतर कामं उरकून मग उरलेल्या वेळात आपण आपल्या परिवाराला वेळ देतोे. बोर्डाची परीक्षा सुरू होण्याआधी शाळेबाहेर जमलेल्या इतर आया भेटल्या तेव्हा आपण फक्त परीक्षेच्या वेळीच मुलांना जास्त वेळ का देतो ही चर्चा सुरू झाली. एरव्ही आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि जेव्हा मुलांबरोबर असतो तेव्हा तर सारखे अभ्यास कर चाच नारा लावत त्यांच्या मागे लागतो. घरी राहून आपण त्यांचा स्ट्रेस कमी करतोय की वाढवतोय हेच कळत नाही. हसत हसत ही चर्चा संपली आणि परीक्षा संपल्यावर तरी आपल्या कामांतून थोडा वेळ काढून काही दिवस मुलांबरोबर स्ट्रेस फ्री फन टाईम घालवायचा निर्धार करीत आम्ही परतलो. अनं मनात नकळत येऊन गेलं, नाऊ इट्स टाईम टू कनेक्ट!

कितीही प्रयत्न केला तरी आपल्या घरी राहून हा स्ट्रेस फ्री आनंद थोडा दुर्लभच असतो कारण नाही म्हटले तरी आपण घरात थोडेसे गुंतलेलेच असतो. मग त्यासाठी निदान वर्षातून एकदा तरी फॅमिली हॉलिडे घेणे योग्य नाही का? त्यात मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन हॉलिडे प्लॅन करताना त्यांच्या आवडीच्या अनेक गोष्टी असल्या की झालं. मुलांना शाबासकी देताना, छान वागलात तर चॉकलेट देईन हे वाक्य मोठ्यांकडून नेहमीच ऐकायला मिळते. ह्या चॉकलेटवरून एक आठवलं,ते म्हणजे  माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलीचे चॉकलेटचे वेड लक्षात घेत त्यांच्या स्वित्झर्लंड ट्रिपवर चॉकलेट मेकिंग क्लाससुद्दा बूक करण्याची आमच्याकडे मागणी केली होती. अगदी प्रोफेशनल शेफसाऱखी हॅट व अ‍ॅपरन घालून आपल्या आवडत्या चॉकलेटची रेसिपी घेऊन ते चॉकलेट बनविण्याचा आनंद हा तिच्या हॉलिडेचा उच्चांक होता. हॉलिडे संपला तरी त्याची गोड चव अनेक महिने तिच्या आठवणीत होती. स्वित्झर्लंडमध्ये एरव्ही केवळ बर्फावर खेळण्याचे आकर्षण असायचे व पर्यटक जास्तीत-जास्त रात्रींचे वास्तव्य इंटरलाकेन, लुसर्नसारख्या ठिकाणी करत असत. पण हल्ली झ्युरिकमध्ये राहण्याची मागणी जेव्हा घरातल्या पंधरा वर्षाच्या मुलांकडून आली तेव्हा आई-वडील बघत राहिले. झ्युरिकमध्ये इंटरनॅशनल फूटबॉल असोसिएशन FIFAचे वर्ल्ड फूटबॉल म्युझियम आहे.  हे इंटरनेटसॅवी व आपली आवड जोपासणार्‍या युवा पिढीला माहिती असल्याने आता झ्युरिकसुद्धा अनेक स्विस हॉलिडेज्चा अविभाज्य भाग बनला आहे, झ्युरिकजवळच अल्पामारे हे वॉटरपार्क देखील आहे आणि कुठल्या मुलांना वॉटरपार्क आवडत नाही. स्वित्झर्लंडमध्ये तर प्रत्येक कानाकोपर्‍यात सर्व वयोगटातल्या मुलांसाठी काही ना काही दडलेले आहेच पण शेजारच्या इटली देशातही इतिहासाबरोबरच अ‍ॅडव्हेंचरदेखील खचाखच भरलेले आहे. इटलीच्या डोंगरावर व्हिया  फेराटा म्हणजेच लोखंडाचा रस्ता, हा मोठ्या मुलांना व त्यांच्या साहसी पालकांना नक्कीच आकर्षित करेल. डोंगरावरून स्टीलच्या केबल्स सोडलेल्या असतात ज्याला आपण आपले सेफ्टी हारनेस लावून डोंगरावर बांधलेल्या लोखंडी पायर्‍यांवर चढत डोंगर चढण्याचा साहसी आनंद घेऊ शकतो. त्यावेळी आपल्याबरोबर गाईड असल्याने अगदी सुरक्षितपणे डोंगर चढण्याचा अनुभव घेता येतो.

लहान-मोठ्या सर्व वयातल्या मुलांचे आवडते ठिकाण म्हणजे अ‍ॅडव्हेंचर पार्क किंवा थीम पाक्सर्. शक्य असेल तेव्हा एका तरी थीम पाक्सर्ला आपल्या हॉलिडेमध्ये नक्की भेट द्या. थीम पाक्सर्मध्ये मुलांकडून बरेच काही शिकायला मिळते. एरव्ही अभ्यासाला वेळ मिळाला नाही ह्याची कारणं पुढे करणारी मुलं थीम पाक्सर्मध्ये मात्र उत्तम टाईम मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी प्लॅनिंगचे प्रदर्शन करतात. त्या थीम पार्क्स्ला जाण्याआधीच इंटरनेटवरून त्याचा मॅप डाऊनलोड करून आपल्या आवडीच्या अ‍ॅडव्हेंचर राईड्सना कुठल्या ऑर्डरमध्ये भेट द्यायची इथपासून कुठल्या रेस्टॉरंट्समध्ये कधी आणि काय खायचे इथपर्यंत,तसेच तिथे पोहोचल्यावर कमी गर्दीच्या राईड्स पटकन संपवून कशा घ्यायच्या हे सर्व ज्ञान मला आमच्या घरातल्या मुलांकडूनच प्राप्त झाले आहे. मग ते पॅरिसचे डिसनीलँड असो किंवा अमेरिकेतल्या ओरलँडोमधले डिसनी मॅजिक किंगडम असो किंवा सिंगापूरचे युनिव्हर्सल स्टुडिओज्&सर्व रस्ते मुलांना पाठ असतात.

जेवढे थीम पाक्सर्चे मुलांना आकर्षण आहे बहुधा तेवढेच पाण्याच्या सर्व रूपांमध्ये खेळायला त्यांना आवडते. यासाठीच हॉटेलमध्ये स्विमिंगपूल आहे ना ह्याची खात्री नेहमी करुन घ्या. मुलांबरोबर फिरताना अनेक वेळा हॉलिडेची निवडही स्विमिंग पूलवरुनच होते. ओमानमधल्या शांग्रिला रीसॉर्टमध्ये तीन हॉटेल्स आहेत. इथे केवळ मोठ्यांसाठी अल हुस्न हॉटेल आहे,मध्ये आहे अल बंदर आणि त्याच्या बाजूला मुलांसाठी खास बांधलेले अल वाहा हॉटेल. अल वाहामधल्या रूमसुद्धा लहान मुलांना आवडतील अशा रंगबिरंगी इंटिरियर डिझाईनच्या दिसतात तर मुख्य पूलासोबत इथे एक लेझी रिव्हर बांधलेली आहे. रबर ट्युबवर छोटे-मोठे सारेच नदीमध्ये तरंगत वाहत असल्यासारखे दिवसभर पूलजवळ सापडतात. ओमान हे टर्टल वॉचिंगसाठी प्रसिद्ध आहे व अल वाहाच्या बीचेसवर अंडयातून बाहेर पडणार्‍या छोट्या सी टर्टल्स्ना बघण्याचा अनोखा आनंद  इथे लहान मुलांना घेता यतो. जवळच स्कुबा डायव्हिंग स्कूल असल्याने मुलं स्कुबा डायव्हिंग करायलासुद्धा शिकू शकतात. स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, स्पीड बोड राईड्स, जेट बोटिंग हे सर्व काही आज भारतात आणि भारताजवळच्या अनेक आशियातल्या बेटांवर शक्य आहे. पांढरी शुभ्र वाळू, निळाशार समुद्र, पाण्यावरची आणि पाण्याखालच्या विश्वाची सुंदर झलक घेणे आपल्या फॅमिली हॉलिडेवर सहज शक्य आहे.

मुलांमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरणारा अजून एक हॉलिडे पर्याय म्हणजे क्रुझेस. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध कार्यक्रमांनी ह्या क्रझेस मुलांना गुंतवून ठेवतात. अगदी सर्फिंग, स्विमिंग आणि काही क्रुझेसवर झिपलायनिंग सुद्धा शक्य आहे. डिस्को व एंटरटेन्मेंटनी भरलेले हे फ्लोटिंग हॉटेल प्रत्येक वयोगटातल्या मुलांसाठी काही न काही आकर्षण उपलब्ध करते त्यामुळे एकत्र कुटुंब असेल तर क्रुझ हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो. त्यात हॉटेल बदलण्याची गरज नसल्याने एकदा चेक-इन केले की अगदी शेवटच्या दिवशी चेक-आऊट केल्याने वेळ वाया न घालवता आपण अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतो.

भारतात फॅमिली हॉलिडे घेणे तर सर्वात उत्तम व सोपे असते. विमान प्रवासाचा लांबचा प्रवास नसल्याने जास्त थकवा जाणवत नाही आणि आपण विमानातून उतरल्या उतरल्याच हॉलिडेचा आनंद घेऊ शकता. त्यात भारतात फिरताना आपल्यासाठी प्रायव्हेट गाडीची सोय केलेली असल्याने प्रवास देखील सोयीचा व आरामदायक होतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र प्रवास करताना एक प्रश्‍न नेहमीच सतावतो, तो म्हणजे कोण कुठल्या गाडीत बसणार. मग एकदा तर आम्ही चिल्ल्या-पिल्ल्यांसह एका छोट्या गाडीत चक्क अकराजण कोंबून बसलो. आता यापुढे आपण हॉलिडेवर लागली तर स्वतःची प्रायव्हेट बससुद्धा घेऊन फिरू, पण एकाच गाडीतून फिरू असा निश्‍चय आम्ही केला. कारण हॉलिडेची खरी मजा आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र प्रवास करण्यातच आहे ना? उदयपुरला साराबरोबर मी भेट दिली तेव्हा आपण चित्त्तोडगडला भेट देऊया या साराच्या विनंतीने मला आश्‍चर्य वाटले. इतिहासात मी हे शिकले होते आणि सिनेमातसुद्धा पाहिले आहे तर प्रत्यक्षात बघूयानं असा विचार करून आम्ही दोघीही तिथे गेलो. गम्मत म्हणजे जरी इतिहासातल्या पुस्तकातले धडे विसरायला झाले तरी तिथल्या गाईडने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मात्र लक्षात राहिली. असे मौजमस्तीत झालेलेे स्ट्रेस फ्री शिक्षण पुस्तकांपेक्षा केव्हाही चांगले नाही का?

 

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*