Published in the Sunday Sakal on 27 July 2025
त्रिपुरा - संस्कृती आणि सौंदर्याने परिपूर्ण राज्य
त्रिपुरा हे ईशान्य भारतातील राज्य भारतातल्या सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे. इथल्या स्थानिक आदिवासी समुदायाच्या परंपरांवर बंगाली संस्कृतीचा प्रभाव आढळतो. हे राज्य प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथले त्रिपुरा सुंदरी मंदिर, हे पुरातन मंदिरांपैकी आणि भारतातल्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. या राज्यात आपल्याला हिल्स, फॉरेस्ट्स आणि व्हॅलीज् चे सुंदर मिश्रण पहायला मिळते. यामुळे हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे. त्रिपुरा हे राज्य त्रिपुरी, रियांग, जमातिया आणि चकमा अशा स्थानिक जमातींचे घर आहे. यांच्या प्रत्येकाच्या विशिष्ट परंपरा आणि फेस्टिव्हल्स आहेत. हे राज्य खार्ची पूजा, गरिया पूजा आणि रियांग डान्स असे अनेक उत्सव साजरे करते. हे उत्सव या राज्याच्या समृद्ध कल्चरल टेपेस्ट्रीचे प्रदर्शन करतात. इथले उनाकोटी हे गूढ पुरातत्वीय स्थळ त्याच्या रॉक कट स्कल्प्चर आणि कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. हे शिल्प हिंदू पौराणिक कथा आणि स्थानिक आदिवासी कलांचे मिश्रण आहे. हे कोरीवकाम 7 व्या ते 9 व्या शतकातील मानले जाते. आगरतळा इथला उज्जयंत पॅलेस हा भव्य राजवाडा आहे जो त्रिपुराचा राजेशाही इतिहास आणि वारसा याचं प्रदर्शन करतो. हा महाल त्याच्या स्थापत्य शास्त्रासाठी ओळखला जातो. या राज्यात सेपाहिजला वाईल्डलाईफ सँक्च््युरी आणि क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क सारखी वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने आहेत. इथे दुर्मिळ अशा ऑर्किड वनस्पती आणि क्लाउडेड लेपर्डसारख्या प्राण्यांच्या झपाट्याने लुप्त होत असलेल्या प्रजाती पहायला मिळतात. त्रिष्णा वाईल्डलाईफ सँक्च््युरी ज्याला बायसन सँक्च््युरी म्हटलं जातं, ते भारतीय बायसनचे घर आहे. याशिवाय त्रिपुरा हे भारतातील रबर उत्पादनाचे एक महत्त्वाचे केंद्र असल्याने या राज्याच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देते. इतर अनेक भारतीय राज्यांच्या तुलनेत त्रिपुरामध्ये साक्षरतेचं प्रमाण उच्च आहे, याचाच अर्थ हे राज्य आपल्या नागरिकांच्या शिक्षण आणि विकासावर लक्ष केंद्रित करते. हे राज्य लोकसंगीत आणि नृत्याच्या समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध आहे, इथली रियांग जमात सादर करीत असलेलं होजागिरी नृत्य हे त्याचंच एक उदाहरण. त्रिपुरामध्ये अलीकडच्या काळात होमस्टे आणि इको-रिसॉर्ट्सची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे पर्यटकांना त्रिपुराची समृद्ध संस्कृती अनुभवता येते. आसामसारख्या नॉर्थ इस्टमधील लोकप्रिय राज्यामध्ये जवळपास 60 लाख पर्यटक येतात. मेघालयात सुमारे 20 लाख पर्यटक येतात परंतु त्रिपुरामध्ये साधारण पाच लाखाच्या आसपास पर्यटक येतात, कारण हे राज्य अजूनही पर्यटनात विकसित होत आहे. खासकरून अमेरिका, यूके, कॅनडा, हंगेरी, स्वित्झर्लंडमधील पाश्चात्य पर्यटक या राज्याला भेट देतात. मग तुम्ही कधी जाताय या छोट्याशा राज्याचं अनोखं सौंदर्य पहायला?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
शिराकावा-गो हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे जे त्याच्या पारंपारिक गशो-झुकुरी फार्म हाऊसेस साठी प्रसिद्ध आहे. ‘गशो-झुकुरी’ या नावाचा अर्थ ‘प्रार्थनेतल्या हातांसारखे बांधलेले’ असा होतो. या फार्महाऊसचं उंच गवताचं छप्पर प्रार्थनेसाठी एकत्र बांधलेल्या बौद्ध भिक्षूंच्या हातांसारखं दिसतं. ही वास्तुशैली हिवाळ्यात या प्रदेशात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या बर्फवृष्टीला तोंड देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे . शिराकावा गो हे ठिकाण गिफू प्रांताच्या दुर्गम, पर्वतीय अशा हिडा प्रदेशात स्थित आहे. हे गाव शो नदीने वेढलेले आहे. ही घरे 1600 च्या दशकातील आहेत आणि ती रेशीम किड्यांची लागवड आणि साठवणुकीसाठी वापरली जात होती. ही घरं कोणत्याही प्रकारच्या खिळ्यांचा वापर न करता बांधली गेली होती. शिराकावा-गो मध्ये हिवाळ्यात सुमारे 30 फुटापेक्षा जास्त बर्फवृष्टी होते, जिचा प्रभाव कमी होण्यास उंच छतांमुळे मदत होते. ट्रॅडिशनल आर्किटेक्चर आणि रिमोट लोकेशन यामुळे शिराकावा-गो याला कधीकधी "जपान'स स्नो कंट्री" असं म्हटलं जातं. इथे 1,700 पेक्षा कमी रहिवासी आहेत. या गावात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एका विशेष रोषणाईच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रात्रीच्या वेळी बर्फाच्छादित घरे प्रकाशित केली जातात, ज्यामुळे बरेच पर्यटक आकर्षित होतात. विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या गावाचा पॅनोरमिक व्ह्यू आपल्याला पाहता येतो. इथली अनेक पारंपारिक घरे, संग्रहालये, हस्तकला, दुकाने आणि कॅफेमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत, ज्यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
इथले स्थानिक कारागीर मातीकाम आणि विणलेल्या वस्तूंसारख्या पारंपारिक हस्तकलेचा व्यवसाय करतात. हे गाव अल्पाइन मार्गाने व्यापलेले आहे. कोविडनंतर पर्यटनात वाढ झाल्यामुळे शिराकावा येथे 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक पर्यटक आले. आमच्या ट्रेझर्स ऑफ जपान आणि ऑल ऑफ जपान टूरमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण घरे असलेल्या या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. मग वाट कसली बघताय ? चलो जपान!
किचन आणि टॉयलेट
'चलो एक दिनके लिये कहीं चलते है।' आमच्या मराठी-अमराठी ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली. कुणाचाही वाढदिवस असणं हा बहाणा त्यासाठी पुरेसा असतो. आणि त्यात आमचा ग्रुप पन्नाशी आणि साठी मधला, त्यामुळे माईलस्टोन बर्थडे सेलिब्रेशन हा नुसतं बहाणा न राहता खरंखुरं कारण बनून जातं. आमच्यात असाच एक साठावा बर्थडे आला आणि आम्ही मुंबईजवळच अडीच तीन तासांच्या अंतरावर एका सिक्स बेडरूम बंगलोमध्ये येऊन पोहोचलो. अतिशय सुंदर व्ह्यू. पावसाळा असल्याने सर्व काही हिरवंगार. तनामनाला उल्हसित करणारं वातावरण. अहाहा! काय तो नजारा! ग्रुप फोटो, इन्डिविज्युअल फोटो, केककटिंग, पत्ते, स्नूकर, गाणी, गप्पा यात मध्यरात्र कधी झाली कळलंच नाही. एकंदरीतच रिज्युव्हिनेटिंग संध्याकाळ होती. आमच्या पर्यटकांना टेक-अ-ब्रेक म्हणताना आम्हालाच त्याची किती गरज होती हे जाणवलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता जाग आली. एकदा शरीराला सवय झाली की रात्री झोपायला उशीर झाला तरी सकाळची जाग त्या ठरलेल्या वेळीच येते हा सवयीचा फायदा. त्याबाबतीत मी देवाचे आभार मानते. कारण सकाळच्या त्या शांत प्रसन्न वेळेत बरीच कामं होऊन जातात. कधी एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम होतं, तर कधी हे वर्तमानपत्रातले लेख लिहून होतात. सोमवारी दोन लेख द्यायची टाईमलाईन असते त्यामुळे सकाळचा वेळ हे ब्लेसिंग. हो, नाहीतर एकदा दिवसाची ती मॅडरश सुरू झाली की आपल्या हातात काही रहात नाही. दिवस आपण कितीही प्लॅन केला असला तरी इतक्या अनपेक्षित गोष्टी आपल्यावर येऊन आदळत असतात की आपल्या शेड्युलची ऐशी की तैशी होऊन जाते. त्यामुळेच माझा भरवसा ह्या पहाटेच्या-सकाळच्या तीन तासांवर असतो. रविवार असल्याने आज दोन आर्टिकल लिहायची होती. त्यात चालढकल करून चालणार नव्हती. त्यामुळे रात्री झोपताना देवाची प्रार्थना करून झोपले की मला चार वाजता जाग येऊ दे. देव कधीच दगा देत नाही ह्यावर पूर्ण विश्वास. आणि मला जाग आली. संडे मेंटॅलिटीला थोडंसं लोळावंसं वाटत होतं, पण दुसरं मन बजावत होतं, हे तीन तास घालवलेस तर ते गेलेच, मग तू कसे दोन दोन लेख पूर्ण करणार? ही वेळ परत येणार नाही तेव्हा वीणा उठ आणि लाग लिहायला. एकदा का लेख पूर्ण केलेस की बघ कसं तुला एकदम मस्त वाटेल. नो टेन्शन ॲट ऑल. माझ्या प्रोक्रॅस्टिनेटिंग किंवा चालढकल करणाऱ्या मनाला मी बाजूला सारलं आणि माझ्या दुसऱ्या मनाचा सल्ला मानून उठले. आमची सर्व मित्रमंडळी गाढ झोपेत असल्याने आवाज करून वा लाइट्स लावून चालणार नव्हतं. हलक्या पावलाने मी किचनमध्ये गेले. मला ग्लास आणि पाणी हवं होतं. चहा सोडलेला असल्याने एकदा का गरम पाणी मिळालं की मी लिहायला मोकळी. कप कुठे ठेवलेत ते कळेना, म्हणून मी एकापाठी एक किचनमधले खण उघडायला सुरुवात केली आणि ‘अजि मी ब्रह्म पाहिले’ असं काहीसं झालं. इतक्या अस्ताव्यस्त आणि अस्वच्छ पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या की ‘अरे देवा याच सगळ्या वस्तूंमधून जे जेवण वा स्नॅक्स बनले तेच आपण खाल्ले का?' हा प्रश्न मनात उपस्थित झाला. थोड्या वेळाने सुधीर उठला आणि तो किचनमध्ये जाऊन आला, आणि त्याचा चेहरा बघूनच मी म्हटलं, कोणतीही मॅनेजमेंट कशी आहे हे जाणायचं असेल तर त्यांच्या किचनमध्ये जावं. आमच्यातला प्रत्येक जण उठल्यावर काही ना काही कारणासाठी किचनमध्ये गेला आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया तीच. खरंतर चार ते पाच माणसं तिथे होती त्या बंगल्याची देखभाल करायला. त्यांनी त्या बंगल्याचा दर्शनीय भाग एकदम मस्त चकचकीत स्वरूपात ठेवला होता, पण जिथून पाहुण्यांना जेवण जातं त्याची अवस्था, नव्हे दुरावस्था बघून हडबडून जायला झालं. आमच्यातला एकजण म्हणाला, 'किचन में किधर भी जानेका ही नहीं, अदरवाईज कुछ खा नहीं पाओगे आप’ एक-दोघांनी त्याची री ओढली. प्रत्येक गोष्टीत 'व्हॉट्स फॉर मी' हे बघणाऱ्या माझ्या मनाने आमच्या काँट्रॅक्टिंग टीमला मेसेज केला, ‘जिथे जिथे आपण आपल्या पर्यटकांना जेवण देतो, तिथे तिथे आपल्या टूर मॅनेजर्सना वा ऑफिशियली आपल्या टीमला अधनमधनं इन्स्पेक्शन करायला सांगितलं पाहिजे. लेट्स बी शुअर, कधी कधी आपण ते करतो, पण आता हे सिस्टिममध्येच घालूया म्हणजे विसरलं जाणार नाही. मध्ये एक बातमी आली होती, लोणावळ्याच्या काही छोट्यामोठ्या हॉटेल्सच्या किचनमध्ये छापे घातले तेव्हा अशाच अनेक इर्रेग्यूलॅरिटीज मिळाल्या. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असं म्हटलं जातं तसंच काहीसं. आपल्या आजूबाजूला अनेक चुका होताना दिसतात. त्यावर गॉसिप करीत बसण्यापेक्षा आपल्याकडून तशी चूक कशी होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे. खरंतर इतरांच्या वा आपल्या आधीच्या चुका हे आपल्यासाठी 'वेक अप कॉल' असतात. त्या मार्गदर्शनाचं किंवा एखाद्या गुरुचं काम करतात. त्यातून आपण शिकलं पाहिजे, आपल्यात सुधारणा करीत राहिलं पाहिजे.
पर्यटन क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा बाबांसोबत एक एक करीत आपला भारत देश पिंजून काढला होता. त्यावेळी आम्हाला ना नाव होतं ना प्रतिष्ठा, त्यामुळे आम्ही स्वतःच प्रत्येक हॉटेलच्या दाराशी जाऊन 'कृपया आम्हाला आपलं म्हणा, तुमचं हॉटेल आम्हाला वापरायला द्या' अशी कळकळीची विनंती करायचो. प्रत्येक हॉटेलचे किचन, डायनिंग हॉल, रुम्स, रिसेप्शन हे बघण्याचा आमचा रोजचा उपक्रम असायचा. दिवसाला कधी दहा तर कधी वीस हॉटेल्स आम्ही पालथी घालायचो. बाबा प्रचंड पायपीट करायचे आणि मलाही ती सवय लागली. त्यावेळीची बाबांची एक शिकवण माझ्या कायम स्मरणात राहिली ती म्हणजे, 'वीणा हॉटेलची मॅनेजमेंट कशी आहे ते बघायचं असेल वा समजून घ्यायचं असेल तर त्या हॉटेल रुमचं बाथरूम बघायचं, तिथे जर कोपऱ्यात जळमटं दिसली किंवा अस्वच्छता नजरेस पडली, तर समजायचं मॅनेजमेंटचं लक्ष नाहीये. अशा वेळी त्यांच्याशी नातं न जोडलेलंच बरं, पण जर समजा दुसरा ऑप्शन नसेल तर ह्या गोष्टींवर तोडगा काढूनच पुढे जावं.’ आजही कधीकधी आम्हाला जर हॉटेल इन्स्पेक्शनला जावं लागलं तर त्यांच्या बाथरूमवर माझी कड़ी नजर असते. आता आमची टीमसुध्दा ह्या गोष्टींना सरावलीय. हॉटेल इन्स्पेक्शन करायचं म्हणजे नेमक काय करायचं, काय बघायचं हे त्यांना माहीत आहे. प्रत्येक मागच्या पिढीने पुढच्या पिढीला शिकविण्याचं काम सतत सुरू आहे.
एकदा मी बाबांसोबत काठमांडूला गेले होते. त्यावेळी श्रेष्ठा नावाच्या आमच्या तेथील असोसिएटला आम्ही भेटलो. हवापाण्याच्या आणि नंतर व्यवसायाच्या गप्पा झाल्यावर आम्ही त्यांना बाय बाय करून निघालो. बाबा पुढे, मी मागे आणि आमच्यामागे श्रेष्ठा. तो मला म्हणाला, ‘आपके पिताजी बहुत मेहनत कर रहे है, भगवान उन्हे सलामत रखे’ त्याला म्हटलं, ‘आपको कैसे समझा? आप तो ज्यादा उनसे मिले नहीं हो।' श्रेष्ठा म्हणाला, त्यांच्या बुटाचा झिजलेला सोल सांगतोय. ‘बुटाचा झिजलेला सोल माणसाचं व्यक्तिमत्व सांगू शकतो’ हे मी नव्याने शिकले. तेव्हा आपल्याकडे एकच बुटाचा किंवा चपलेचा जोड असायचा. तो खराब झाला, अंगठा तुटला, तर तो सांधून, पुन्हा वापरायची सवय, त्यामुळे जोडे झिजणे किंवा झिजवणे याला अर्थ होता. आता आपल्याकडे चपलांचे, शूजचे, स्लीपर्सचे, स्निकर्सचे, सँडल्सचे, ट्रेनर्सचे, वेजेसचे, स्टीलेटोचे, लोफर्मचे (अबब... केवढे हे प्रकार) असे अनेक जोड असल्याने ते खराब व्हायचा प्रश्नच नाही किंवा श्रेष्ठाला जसं झिजलेल्या बुटांच्या सोलवरून त्याच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा अंदाज आला तसं आता कठीणच आहे. कारण आम्ही आता ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी'चे शिकार बनत चाललोय. आणि त्यामुळेच बुटाचा झिजलेला सोल आणि त्यावरून व्यक्तिमत्त्व शोधण्याची पद्धत नामषेश होत चालली आहे.
'त' वरून ताकभात ओळखता यायला पाहिजे हे मात्र खरं. एखाद्याच्या घरात गेल्यावर आपल्याला जाणवतं की ते घर आनंदी आहे, काळजीत आहे, सकारात्मक आहे, उत्साहाने भरलेलं आहे की नकारात्मकतेचा वास तिथे भरून राहिलाय. हेच कार्यालयाच्या, ऑफिसच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट हाऊसच्या बाबतीत आपल्याला जाणवतं. त्या घरातली किंवा कार्यालयातली टॉयलेट किंवा तिथलं किचन आपल्याला बरंच काही सांगून जातं. एकदा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नव्याने उभारलेल्या इस्रोच्या साईटवर भेट देण्यासाठी गेले. सर्वांना वाटलं ते सरळ संशोधन केंद्रात म्हणजेच प्रयोगशाळेत जातील. पण तसं झालं नाही. ते थेट गेले ते वैज्ञानिक किवा शास्त्रज्ञ जिथे राहणार होते त्या वसतिगृहात आणि कँटीनच्या किचनमध्ये. तिथे गेल्यावर त्यांनी खूप बारकाईने सगळ्या गोष्टींची पाहणी केली. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, ‘संशोधन यश प्रक्षेपण ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, त्यासाठीच आपण हे निर्माण केलंय, पण हे सगळं करणारा माणूस महत्वाचा आहे, त्याचं प्रथम स्थान. तो जर सुखात, शांततेत आणि स्वच्छतेत राहत असेल तरच आपल्याला उंच भरारी शक्य आहे’. रतन टाटा यांच्या बाबतीतही एक असाच किस्सा सांगितला जातो. ते एकदा एका टाटा कंपनीच्या वर्कशॉपमध्ये भेट देण्यासाठी गेले. तेथील सर्व मंडळी संबंधित प्रेसेंटेशनसह तयार होती. पण रतन टाटा आल्यावर बोर्डरूमकडे न जाता डायरेक्ट कर्मचारी वापरत असलेल्या टॉयलेटमध्ये आणि तिथून कँटीनमध्ये गेले. सगळं बघून ते एकच वाक्य बोलले, ‘तुमच्या कर्मचाऱ्यांना जर नीट जेवण मिळत नसेल आणि त्यांना लाज वाटावी अशा परिस्थितीतलं शौचालय वापरावं लागत असेल तर कोणतीही स्ट्रॅटेजी कधीच यशस्वी होणार नाही.’ या दोन गोष्टींवरून मला शाळेतली मुलामुलींची टॉयलेट्स आठवली. देशाचं भविष्य घडविणाऱ्या मुलामुलींना स्वच्छ टॉयलेट्स देणं हे प्रत्येक शाळेचं आद्य कर्तव्य आहे. या गोष्टी शाळेच्या व्यवस्थेचा आरसा आहेत.
वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल - प्रवास म्हणजे नावीन्याचा शोध!
मी मकरंद जोशी. डोंबिवलीत राहतो. डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या ऑफिसमधून माझ्या टूर्स बूक करतो. मी वीणा वर्ल्ड सोबत फिरायला सुरुवात केली ती 2022 साली. त्या वर्षीच्या नोव्हेंबरमधली नेपाळची टूर ही माझी वीणा वर्ल्ड सोबतची पहिली टूर. तेव्हापासून गेल्या अडीच-तीन वर्षांत मी त्यांच्यासोबत देश-विदेशातल्या 7 टूर्स केल्या. गुजरात वडोदरा, आसाम अरुणाचल मेघालय, डलहौसी धरमशाला अमृतसर, 13 दिवसांची युरोप टूर, साऊथ आफ्रिका आणि अंदमान. वीणा वर्ल्ड सोबत आजवर मी उत्तम व्यवस्था अनुभवली आहे. त्यांची हॉटेल्स चांगली असतात. प्रवासाची साधनं आरामदायी असतात. यांची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे इथले टूर मॅनेजर्स. आजही ते माझ्या लक्षात आहेत कारण सगळेच उत्तम होते. सगळ्यांची घरच्यांसारखी काळजी घेणारे होते. को ऑपरेटिव्ह होते. त्यामुळे प्रत्येक प्रवास अगदी संस्मरणीय झाला. आज माझं वय साठीच्या वर आहे. मी एकटाच प्रवास करतो कारण माझ्या मिसेसची नोकरी अजून चालू आहे. त्यामुळे तिला इतकी सलग सुट्टी मिळत नाही. म्हणून मी यांच्या सिनियर्स स्पेशल टूर्ससोबत जातो. कारण रूम शेअरिंगची गॅरंटी असते. टूरवर वेगवेगळी ठिकाणं पहायला मिळतात. नवनवीन पदार्थ चाखायला मिळतात. नवीन ओळखी होतात. त्यातून आम्ही सोशल मीडिया, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातो. टूरहून आल्यानंतर सुद्धा एकमेकांशी असलेला संपर्क कायम राहतो. या टूरवरचा प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगता येतो. येत्या सप्टेंबरमध्ये मी वीणा वर्ल्ड सोबत श्रीलंकेला जाणार आहे. त्याची तयारी लवकरच सुरू होईल. माझ्यासाठी प्रवास म्हणजे नवीन ओळखी, प्रवास म्हणजे रोजच्या त्याच त्या रुटीनमधला बदल. थोडक्यात सांगायचं तर प्रवास म्हणजे नावीन्याचा शोध!
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
कतार ग्राँ प्री 2025 विथ वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्
काही हॉलिडेज् असे असतात जे आयुष्यभर लक्षात राहतात. जिथला प्रत्येक क्षण इतका भन्नाट असतो की तो आठवण बनून मनात घर करून राहतो. स्पीडचा आवाज, नाईट रेसिंगचा ग्लिटर, आणि निरभ्र आकाशाखाली जगातली सगळ्यात ग्लॅमरस रेस... हाच तो क्षण! ह्यावर्षी चला असाच एक थरारक हॉलिडे अनुभवायला वीणा वर्ल्ड सोबत, कतार ग्राँ प्री 2025 मध्ये! वीणा वर्ल्ड खास तुमच्यासाठी घेऊन आलंय हे स्पेशल पॅकेज!
28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 - चार दिवस आणि तीन मजेदार रात्री. या खास पॅकेजमध्ये मिळणार आहेत T16 ग्रॅण्डस्टॅण्ड ची तीन दिवसांची टिकिट्स, आरामदायक 3 नाइट्सचा हॉटेल स्टे, आणि सर्किटपर्यंतचे ट्रान्सफर्स. हे सगळं फक्त ₹77,000 पासून सुरू होतं - म्हणजे बेस्ट प्राइसमध्ये टोटल धम्माल!
T16 ग्रॅण्डस्टॅण्ड हे ठिकाण म्हणजे ॲक्शनचा परमोच्च बिंदू. इथेच कार्स शेवटचं वळण घेतात, जोरात ब्रेक्स मारतात, आणि रेसचं भविष्य ठरतं. थरार इतका जबरदस्त की डोळ्यांसमोरून कधी हटणारच नाही. तो क्षण, जेव्हा आवाज थांबतो आणि उत्साह सुरू होतो त्या क्षणाचे तुम्ही साक्षीदार होणं, हीच खरी मजा आहे!
पण एक्साईटमेन्ट इथेच संपत नाही. ह्या हॉलिडे पॅकेजमध्ये तुमच्यासाठी आहे फॅन व्हिलेज ॲक्सेस. लाईव्ह म्युझिक, धम्माल गेम्स, चविष्ट फूड स्टॉल्स, भरपूर F1 ॲक्टिव्हिटीज््ा, रियल टाइम मर्चंडाइझिंग, आणि संपूर्ण फॅमिलीसाठी सुपरफन एन्टरटेनमेंट. एकूणच काय तर आठवणींसोबत आनंदही भरपूर! लहानांपासून मोठ्यांपर्यंत, प्रत्येकासाठी काहीतरी विशेष!
ही एक साधी रेस नसून, एक आयुष्यभर लक्षात राहणारा एक्सपीरियन्स आहे - स्पीड, स्टाईल आणि पॅशनने भरलेला. आणि हो, ग्राँ प्री केवळ मोटर स्पोर्टच्या चाहत्यांसाठीच नाही, तर प्रत्येकासाठी आहे ज्याला जगण्यातलं थ्रिल अनुभवायचंय.
तर मग वाट कसली बघताय? वीणा वर्ल्डसोबत आपला कतार ग्राँ प्री हॉलिडे आत्ताच बुक करा! कारण सीट्स लिमिटेड आहेत... आणि ही बेस्ट प्राइस आणि नेव्हर-बिफोर संधी चुकवायचीच कशाला, नाही का? आपल्याला एक एक्साईटिंग आणि मेमोरेबल हॉलिडे डिलिव्हर करायला आमची टीम सज्ज आहे.
अराऊंड द वर्ल्ड - ऑक्टोबरफेस्ट
ऑक्टोबरफेस्ट जगातील सर्वात मोठा बिअर फेस्टिव्हल आहे, जो दरवर्षी म्युनिकमध्ये सप्टेंबरच्या उत्तरार्धात चालू होतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी संपतो. स्थानिक लोक याला 'वाएझन' म्हणतात. यात म्युनिकच्या हिस्टॉरिक ब्रुअरीजद्वारे आयोजित केलेले मोठे बिअर टेन्ट्स असतात. ऑक्टोबरफेस्टचा ऑफिशियल मॅस्कॉट म्हणजे रंगीबेरंगी आइसिंगने सजवलेला एक जायंट जिंजरब्रेड हार्ट. यावर बव्हेरियन बोलीभाषेत ओ'झॅप्फ्ट इज! असा संदेश लिहिलेला असतो. ज्याचा अर्थ होतो इट्स टॅप्ड. उद्घाटनाच्या दिवशी म्युनिकच्या मेयरद्वारे पहिल्या बिअर केगचं ऑफिशियल टॅपिंग असतं, जी या फेस्टिव्हलची सुरुवात मानतात. याव्यतिरिक्त ऑक्टोबरफेस्ट मध्ये आपण कार्निव्हल राइड्स, गेम्स, म्युझिक, बव्हेरियन फोक साँग्स आणि पारंपारिक लोकनृत्यांचा आनंद घेऊ शकता. इथे पर्यटक जर्मन वाईन, श्नॅप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा आस्वाद घेऊ शकतात. ऑक्टोबरफेस्ट दरवर्षी सुमारे 60 लाख पर्यटकांना आकर्षित करतो. ऑक्टोबरफेस्टच्या शेवटच्या दिवशी, एका भव्य आतिषबाजीने महोत्सवाचा शेवट होतो. तुम्ही कधी जाताय या अनोख्या फेस्टला?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.