IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

सिंगिंग इन द रेन!

16 mins. read

Published in the Sunday Sakal on 03 August 2025

आज हे आर्टिकल वाचत असताना पाऊस तसाच संततधार असेल की नाही कल्पना नाही पण गेले काही दिवस छान पाऊस पडतोय. मुंबई अगदी ओलीचिंब झाली आहे. या पावसामुळे नॉर्थ ईस्टमधल्या मेघालय राज्यातल्या खासी हिल्स परिसरातल्या मैसिनराम गावाची आठवण झाली. जगातला सर्वात जास्त पाऊस आपल्या देशातल्या या गावात पडतो. एकदा पाऊस सुरू झाला की तीनेक आठवडे संततधार असतो. पावसाचा आवाज आपल्याला कितीही हवाहवासा वाटला, तरी त्यांना मात्र ते नॉइज पोल्युशन वाटतं. त्यामुळे घराच्या छप्परावर ते गवताच्या गाद्या लावतात जेणेकरून पावसाचा आवाज कमी ऐकू येईल. मुंबईतही सध्या ‘पाऊस कोसळतोय’, ‘जपून जा गं बाई, पाऊस पडतोय‌’, ‘नरिमन पॉईंटला भिजायला जायचं का?’ अशा संभाषणांना घराघरात जोर आलाय. घराघरात कांदाभजीचा उपसा सुरू झाल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण होतोय. तरीही ह्या वेळचा पाऊस थोडा ऑर्गनाइज्ड असल्यासारखा वाटतोय. म्हणजे अजून तरी. आता तो पाऊस ऑर्गनाइज्ड आहे की आपली महानगरपालिका सशक्त होऊन काम करतेय की लोकं घरातून बाहेरच पडत नाहीयेत माहीत नाही, पण एवढ्या पावसातही ट्रेन्स सुरू आहेत, कधी कधी स्लो आहेत, लेट आहेत, पण बंद पडल्या नाहीत. रस्त्यावर जीवघेणा ट्रॅफिक जॅम नाहीये. रोजचं वर्तमानपत्र, दूध, भाज्या, फळं हे सगळं वेळच्यावेळी मिळतंय. आमच्या ऑफिसमध्ये एच आर चं मेल अजून तरी दिसलं नाही की, ‘पावसामुळे ऑफिस लवकर सोडतोय‌‘. पावसात शाळा लवकर सुटण्याचा जो आनंद असायचा तो कॉर्पोरेट जगतात ह्यावर्षी अजून तरी मिळाला नाहीये. एकंदरीत ह्या पावसाला व्यापक दृष्टिकोन आणि ‘सबका भला‌’ वाली मानसिकता यु ट्युबवरील कोणत्या तरी स्पिरिच्युअल गुरूने शिकवलेली दिसते. ‘पाऊस पडणं किंवा पाडणं हे दरवर्षीचं ठरलेलं काम असलं तरी त्यात सुसूत्रता आण, लोकांना कमीत कमी त्रास होईल असं बघ, रोजचा पेपर वाचायला नाही मिळाला तर अनेकांचा दिवस वाया जातो ह्याचा विचार कर‌’ असं काहीतरी ट्रेनिंग त्याला नक्की मिळालेलं दिसतंय. त्यामुळेच मुंबईच्या गतीला अजून तरी ब्रेक बसला नाही. आपली कामं थांबली नाहीत. पाऊस महाशयांचे आभार मानायला हरकत नाही. आपलं एक बरं असतं, आधी ‘येरे येरे पावसा‌’ म्हणत वरूण राजाची आळवणी करायची आणि तलाव भरले, पेरणी-रोपणीची कामं झाली की ‘अतिथी तुम कब जाओगे‌’ म्हणत, ‘रेन रेन गो अवे‌’ चा नारा लावायचा. बिच्चारा पाऊस! कडाक्याच्या उन्हाळ्यावर उतारा म्हणून तो जेव्हा येतो तेव्हा काय आगतस्वागत करतो आपण त्याचं, पण जाताना त्याला आपण नीट निरोप देतो का?

रोपणीवरून आठवण झाली. लहानपण गावी गेलेलं असल्यामुळे ह्या पावसाची मजा जास्तच मिळालीय असं वाटतं. आई-वडील शेतकरी कम्‌ शिक्षक असं घर असल्याने पावसाळा, भातशेती, पेरणी, रोपणी (आवणी), कापणी, मळणी अशा क्रमाने जून ते ऑक्टोबरचा कालावधी जायचा. रेनकोट प्रकार गावी आमच्यापर्यंत पोहोचायच्या आधी इरलं असायचं डोक्यापासून पायापर्यंत पाठच्या साईडने. ते छत्रीसारखं पावसापासून सरंक्षण करायचं शेतात काम करताना कामगारांचं. कधीतरी शेतामध्ये जाऊन भाताची छोटी छोटी रोपं त्या शेतात सर्वांच्या समवेत लावायला मजा यायची. त्यावेळी पायांच्या बोटांची कातडी सारखी पाण्यात राहिल्यामुळे खराब व्हायची, त्याला बहुतेक ‘कुया‌’ असं म्हणायचे. मग त्यापासून रक्षण करण्यासाठी पायाला खोबरेल तेल लावलं जायंच. हळूहळू गमबूट आणि रेनकोट आले आणि पावसात भिजणं, शेतात काम करणं, नुस्ती मौजमस्ती करणं जास्त सुसह्य होत गेलं. त्यावेळी सर्व कामगारांना आमच्या घरून जेवण असायचं. एका टोपलीत सर्व जेवण सामावलेलं असायचं. ते आम्हालाही मिळायचं. त्या पावसात थोडंसं काम केल्यानंतर शेतावर मिळणाऱ्या त्या जेवणाची मजा इतर कुठेही मिळणं केवळ अशक्य. आत्ता शेतावर जाऊन तसं काम करता येईल का हा प्रश्न मी मलाच विचारला तेव्हा, ‘अरे तिथे साप तर नसतील? पायात कुठे काटा तर रुतणार नाही? चिखलात कुठे पडले बिडले तर?’ अशा अनेक प्रश्नांनी आधी ‘रुक जाओ‌’ चा बोर्ड लावला. लहानपणी अशी भीती कधी मनाला शिवायची पण नाही. शहरात रहायला लागल्यानंतरचे हे तोटे. पण गावच्या पावसाची गोष्टच न्यारी.

गेले काही दिवस असा मस्तपैकी पाऊस कोसळतोय. त्यातच एक दिवस लिव्हिंग रुममध्ये सुधीर पावसाची गाणी लावून बसला होता. ‘गारवा‌’ हा मिलिंद इंगळेचा अल्बम त्याचा आवडता. माझं इमेल क्लिअरिंग झाल्यावर मीही जॉइन झाले. बाहेर पाऊस पडत असताना आत आम्ही एकापाठी एक पावसावरची गाणी लावायला सुरुवात केली. पहिलंच गाणं लावलं ते ‘मंझिल‌’ चित्रपटातलं रिमझिम गिरे सावन... अमिताभ बच्चन आणि मौशुमी चॅटर्जीचं. हे गाणं चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वीचं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया, ओव्हल मैदान, नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह भागात चित्रित केलं गेलेलं. चित्रीकरण साधंसं पण कधीही बघितलं तरी हे गाणं एकदम रिफ्रेशिंग फील देऊन जातं. एक एक गाणं आठवत आम्ही यु ट्युबला हुकूम करीत होतो. मग ‘एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागिसी’ हे गाणं लावलं. किशोर कुमार आणि मधुबालाच्या ‘चलती का नाम गाडी‌’ चित्रपटाने आपल्याला अक्षरश: वेड लावलं होतं. इतक्या वर्षांनी ते गाणं बघताना जरापण कंटाळा आला नाही. तीच गोष्ट ‘श्री 420’ मधल्या राज कपूर नर्गिसवर चित्रित केलेल्या ‘प्यार हुआ इकरार हुआ है...’ ह्या पावसातल्या गाण्याची. ॲबसोल्युट इंमॉर्टल. पासष्ट-सत्तर वर्षं झाली, पण हे दोन्ही चित्रपट आणि त्यातली गाणी आजही तेवढीच फ्रेश आहेत. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यानंतर आम्ही मंगेशकरांची आणि आपल्या अनेक गायकांची गाणी ऐकत बसलो. एकूणच आमची संगीतभरी पावसाळी सायंकाळ वेगळा आनंद देऊन गेली.

अजूनही पाऊस पडत असेल तर आत्ता तुम्हीही एक गाणं तुमच्यासमोर अवश्य लावा टीव्हीवर वा मोबाईलवर. बावन्न सालच्या हॉलिवूड क्लासिक 'सिंगिंग इन द रेन' मधलं टायटल साँग. आत्ता सध्या जी मंडळी सिनियर सिटिझन बनली आहेत त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. ‘जीन केली‌’ ह्या अमेरिकन ॲक्टर, डिरेक्टर, कोरियोग्राफर, डान्सर, सिंगर ने काढलेला हा चित्रपट, ज्यात त्यानेच मुख्य भूमिका वठवलीय. चित्रपट चांगला चालला आणि आजही तो चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड मानला जातो. त्यातलं हे गाणं तुम्हाला नक्कीच प्रफुल्लित करेल. ‘सिंगिंग इन द रेन, आय ॲम हॅप्पी अगेन, आय एम डान्सिंग अँड सिंगिंग इन द रेन, आय एम हॅप्पी अगेन’ हे गाणं ऐकताना तर मजा येतेच पण हे गाणं म्हणजे ‘देखने की चीज़ है।‌’ आयुष्यात आपला दृष्टीकोन कसा असावा हे अगदी हसतखेळत आपल्याला सांगून जातं हे गाणं.

‘अरेरे, पाऊस' की 'अरे वाह, पाऊस’ ही दोन वाक्य मला माझी पर्सनॅलिटी दर्शवून देतात. पाऊस पडणारच आहे, त्याला हवा तसा कोसळणार आहे. त्याचा कोणताही कंट्रोल आपल्याजवळ नाही मग ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या मला स्वीकारायलाच पाहिजेत. बरं, ‘मी नाही जा स्वीकारणार’ असंही म्हणता येत नाही. ‘यु लव्ह इट ऑर हेट इट, बट यु कान्ट इग्नोअर इट, यु कान्ट अव्हॉइड इट’ असा आहे हा पाऊस. त्यामुळे तो स्वीकारणं अपरिहार्य आहे, न स्वीकारून जाणार कुठे? आणि जर स्वीकारलं असेल तर ‘अरेरे पाऊस' म्हणत रडक्या चेहऱ्याने स्वीकारायचं की ‘अरे वाह पाऊस’ म्हणत हसत हसत त्या बरसणाऱ्या पावसाच्या आनंदात सामील व्हायचं हे आपण ठरवायचं. या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणाऱ्या ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकरांनी शिकवलंय नं, ‘सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत‌’. सो, लेट्स गो इन द रेन, एन्जॉय द रेन अँड बी हॅप्पी अगेन.

असा हा दरवर्षी येणारा पाऊस आपल्यासाठी निसर्गाचा एक संदेश घेऊन आलेला असतो. टेक अ ब्रेक, रिलॅक्स अँड रिज्युविनेट! तो आपल्याला सूर्यप्रकाशाचं महत्व पटवून देतो. अनेक देशांचं जीवन वर्षभर पडणाऱ्या सततच्या पावसाने आणि ढगाळलेल्या वातावरणाने किती खडतर होत असेल ह्याची जाणीव तो आपल्याला करून देतो. तो सांगतो, बघा, तुमची सूर्यप्रकाशाशिवाय पंधरा दिवसात ही अवस्था होत असेल तर नॉर्थ पोल जवळच्या देशातील माणसं कशी रहात असतील ह्या वातावरणात? तुम्ही तुमच्या भारतात किती सुखी आहात, जस्ट बी ग्रेटफुल विथ व्हॉट यू हॅव.

आमचा धाकटा मुलगा राज लहान असताना डिस्नीच्या ‘वीनी द पू‌’ चा वेडा फॅन होता. त्यामुळे त्यावेळी पू, पिग्लेट, ख्रिस्तोफर रॉबिनच्या व्हिडियो कॅसेट्स तासन्‌तास बघणं आमचा छंद होता. ‘विनी द पू‌’ मधूनच एखादा जीवनमंत्र देऊन जायचा, त्यातला एक विचार इथे चपखल बसतोय, ‘व्हेन लाइफ थ्रोज्‌ यु अ रेनी डे, प्ले इन द पडल!’

सो, लेट्स सिंग इन द रेन, डान्स इन द रेन अँड बी हॅप्पी अगेन!


देखो अपना देश!

चारधाम –

यात्रा नव्हे, आत्मशुद्धीची वाटचाल.

हिमालयाच्या कुशीत वसलेली चारधाम यात्रा म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, ती आहे भारताच्या आध्यात्मिक शिरपेचातली एक तेजस्वी कलाकृती! यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार ठिकाणं म्हणजे निसर्ग, श्रद्धा आणि आत्मिक शांती यांचा दिव्य संगम. या ठिकाणची तीर्थयात्रा आपली सगळी पाप धुवून आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देते असे मानले जाते. चारधाम यात्रेची उत्पत्ती सुमारे ३००० वर्षांपूर्वीची आहे. यातील प्रत्येक धाम वेगवेगळ्या देवतेला समर्पित आहे. यमुनोत्री हे तीर्थस्थळ देवी यमुनेला, गंगोत्री हे देवी गंगेला, केदारनाथ हे भगवान शिवाला आणि बद्रीनाथ हे भगवान विष्णूला समर्पित आहे. ही यात्रा सुरू होते ती यमुना नदीचे उगमस्थान आणि यमुना देवीचे मंदिर असलेल्या यमुनोत्रीपासून. यमुनोत्रीहून यात्रेकरू गंगोत्रीला जातात, जे गंगा नदीचे उगमस्थान आहे. इथे गंगा देवीची पूजा केली जाते. तिसरे धाम केदारनाथ आहे. हे भगवान शिवाचे एक आदरणीय ज्योतिर्लिंग आहे, जे ३,५०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. हा साधारणपणे १८ किलोमीटरचा ट्रेक आहे. इथे पायी जाण्यासाठी सुमारे ८ तास लागतात. त्यामुळे यात्रेकरू हेलिकॉप्टर राईड, ६ तासांची पोनी राईड किंवा डोलीचा पर्याय घेऊ शकतात. यानंतर या यात्रेतील पुढचं आणि अंतिम गंतव्यस्थान बद्रीनाथ हे आहे, जे भगवान

विष्णूला समर्पित मंदिर आहे. या यात्रेत भक्तीच्या ऑजळीतून निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं. तीव्र थंडी, उंच शिखरे, हिमवर्षा याने आपलं मन थकतं, पण आत्मा उजळून निघतो. हजारो वर्षांची परंपरा असलेली, पांडवांपासून आदि शंकराचार्यापर्यंत पोहोचलेली ही यात्रा आजही भारतीय भावविश्वाची आधारशिला आहे. ही यात्रा सुरू करण्यापूर्वी, भाविक मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हरिद्वार येथे गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. अक्षय्य तृतीया, गंगा दशहरा आणि

एकादशीच्या दिवसांमध्ये चारधाम यात्रा विशेष शुभ मानली जाते. आजकाल ही यात्रा केवळ वृद्धांचाच नव्हे, तर तरुण पिढीचाही आकर्षणबिंदू झाली आहे. कारण ती एक 'सोल ट्रिप' आहे जी केवळ शरीर नव्हे, तर आपले मन, विचार आणि कर्म यांची शुद्धी करते. ट्रेकिंगचा अनुभव असो किंवा हेलिकॉप्टरने उंचावरून दर्शन घेण्याची संधी, आजच्या युगात ही यात्रा सर्वांसाठी सुलभ झालेली आहे. २०२३ मध्ये, चारधाम यात्रेच्या हंगामात ५ दशलक्षाहून अधिक पर्यटक आले. वीणा वर्ल्ड बरोबर ही यात्रा म्हणजे केवळ दर्शन नव्हे, तर आत्मिक भरभराट. अशी ही उगमापासून शांतीकडे आणि प्रवासापासून मोक्षाकडे नेणारी ही भारतभ्रमंती प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य अनुभवलीच पाहिजे. तर मग तुम्ही कधी जाताय या यात्रेला ?


वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल

माय ट्रॅव्हल मिशन

मी सलमा शेख. माझं आणि वीणा वर्ल्डचं नातं २०१५ साली जुळलं. माझी पहिली दूर होतीच. हिरवागार निसर्ग, शांत बॅकवॉटर, आणि मनाला सुखावणारी माणसं. त्या प्रवासाने काहीतरी वेगळं दिलं आणि तेव्हापासून मी मागं वळून बघितलंच नाही. आजवर मी आणि माझे मिस्टर मिळून आसाम, कुलू मनाली, दार्जिलिंग, नैनिताल, काश्मीर फिरलोय. भारताबाहेरही नेपाळ, दुबई- अबुधाबीसारखी ठिकाणं अनुभवलीत. सगळ्या टूर्स मी नांदेडच्या 'माय हॉलिडेज्' या वीणा वर्ल्डच्या सेल्स पार्टनरकडूनच बुक करते. आता माझं वय आहे ६८. पण मन मात्र अजून फिरण्याच्या ओढीने तरुणच आहे. आम्ही पेपरमध्ये जाहिराती बघतो आणि ठरवतो, 'चला, या वेळेस इथं जाऊ!' निसर्ग बघणं, वेगवेगळी ठिकाणं अनुभवणं याने मन इतकं समृद्ध होतं की सांगता येत नाही. आणि वीणा वर्ल्ड सोबतच का तर ते निवडत असलेली हॉटेल्स, चविष्ट जेवण, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या टूर मॅनेजर्सची आपुलकी. त्यामुळे आम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा विचारच करत

नाही. एकदा आसामच्या दूरमध्ये एका स्पर्धेत मला बक्षीस मिळालं आणि एकदा ऑन-टूर माझा वाढदिवस साजरा झाला. सगळ्यांसमोर केक कापला, शुभेच्छा घेतल्या. मला अगदी गहिवरून आलं. टूर संपवून घरी आलो की महिनोंमहिने फक्त त्या दूरच्या गोष्टी चालू असतात आणि मग काही काळाने पुन्हा एकदा टूरवर जावंसं वाटायला लागतं. प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बघणं नव्हे. प्रवासात नवी माणसं भेटतात, नवीन मैत्री होते, आणि आपण नव्यानं स्वतःला समजून घेतो. आमच्या टूर्सपैकी दुबई मला खूप भावलं. तिथली स्वच्छता, भव्य इमारती, आर्टिफिशियल स्नो वर्ल्ड एकदम स्वप्नातल्या शहरासारखं. नैनिताल मध्ये गेलो असताना बर्फवृष्टी बघितली. आजही डोळ्यांसमोर त्या संध्याकाळचं चित्र जसंच्या तसं उभं आहे. आता येत्या सप्टेंबरमध्ये आम्ही फ्रान्सला जातोय. आणि त्यानंतर आमच्या बकेट लिस्टमध्ये अंदमान-निकोबार आणि भूतान आहेत. फिरणं अजून बाकी आहे. चालता फिरता येतंय तोवर फिरत रहायचं. कारण प्रवास म्हणजे आयुष्य जगण्याची एक वेगळी, सुंदर पद्धत आहे.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

फिनलंड ग्लास इग्लू स्टे

विथ वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

डोळे बंद करा आणि कल्पनेत हरवून जा.... सर्वत्र शुभ, शांत बर्फाच्छादित प्रदेश... सौम्य थंड वारा, संथ पडणारे बर्फाचे कण ... झाडांवर जणू एखाद्या परीने पांढरं झाकण पसरवलं आहे. अशा नीरव, नितळ क्षणी, तुम्ही एका पारदर्शक काचेच्या इग्लूमध्ये, उबदार ब्लॅकेटमध्ये, निवांत विसावलात. डोक्यावरून दिसतोय एक अद्भुत खेळ, नॉदन लाइट्सचा निळसर जांभळा-हिरव्या रंगांचा अवर्णनीय नृत्याविष्कार. त्या प्रकाशाच्या नृत्यात, क्षणभर तुम्ही स्वतःलाच नव्याने भेटता, जणू अंतरात्म्याशी झालेली एक शांत, निर्मळ भेट. क्षणभर सगळं थांबतं, वेळ, विचार, जग... हा क्षण म्हणजे फक्त एक फोटो नाही, एक आठवण नाही, हा अनुभव आहे हृदयात घर करून राहणारा!

भारतीय पर्यटकांसाठी अजूनही नवा वाटणारा फिनलंड आणि त्यातील ग्लास इग्लू स्टे, जे काही वर्षांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या हनिमूनमुळे प्रकाशझोतात आलं तेच स्वप्न आता वीणा वर्ल्ड साकार करतंय, अगदी खास तुमच्यासाठी चार दिवसांचं खास कस्टमाईज्ड पॅकेज फिनलंड विथ इग्लू स्टे.

इवालो एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर खास प्रायव्हेट ट्रान्सफरने तुम्ही एका लाकडी लॉग केबिनमध्ये पोहोचता. दोन दिवस बर्फाच्या सान्निध्यात, फायरप्लेसजवळ, गरम कॉफीच्या कपात निवांत क्षण टिपण्याचं समाधान अनुभवता.

पुढचा दिवस घेऊन येतो अविस्मरणीय क्षण काकस्लाउटानेन आर्क्टिक रिसॉर्टमधील ग्लास इग्लू स्टे ! हस्की डॉग स्लेज, रेनडिअर सफारी, आणि ऑरोरा हंटिंग हे सगळं स्वप्नवत नाही, तर प्रत्यक्षात घडणारं आहे. ह्या अफलातून, जगावेगळ्या हॉलिडेची सुरुवात फक्त १२,३०,००० पासून. पण लक्षात ठेवा नॉर्दर्न लाइट्सचा उत्तम सीझन म्हणजे नोव्हेंबर ते मार्च, आणि त्यामुळे ग्लास इग्लू स्टेची बुकिंग्स झपाट्याने भरतात. हवं असेल तर हाच हॉलिडे तुम्ही पुढे वाढवू शकता सांताक्लॉज व्हिलेज, आइसब्रेकर तूम, पारंपरिक फिनिश सॉना ... तुम्ही कल्पना करा, बाकी सगळं आमचं काम. तुम्ही फक्त 'हो' म्हणा आणि मग ही परीकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सर्व जबाबदारी आमची !


अराऊंड वर्ल्ड

लँड ऑफ वुल्व्हस्

युरोप आणि आशियाच्या सीमेवर वसलेला जॉर्जिया देश 'लँड ऑफ वुल्व्हस' म्हणून ओळखला जातो. इथे तुम्हाला काकेशस पर्वतरांगा आणि ब्लॅक सी च्या किनाऱ्यावरचं सौंदर्य पहायला मिळतं. इथल्या त्बिलिसी या राजधानीच्या शहरात प्राचीन संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली हातात हात घालून चालतात. याशिवाय जॉर्जियातील प्रमुख पर्यटन आकर्षणे म्हणजे गेलाटी मॉनेस्ट्री आणि मत्स्खेताची हिस्टॉरिक मॉन्यूमेंट्स ही युनेस्कोची जागतिक वारसास्थळे. प्राचीन केव्ह सिटी उपलिस्टसिखे, बतुमीचे बीच रिसॉर्ट्स, गुडौरीचं स्कीइंग अ‍ॅडव्हेंचर असे अनेक अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. खाचापुरी (चीज ब्रेड) आणि खिंकली (डंपलिंग्ज) सारखे स्वादिष्ट पदार्थ, जगप्रसिद्ध पारंपरिक वाइन, आणि काखेतीमधली वाईन टूर अशी इथे घेतलेली प्रत्येक चव मनात घर करते. २०२४ मध्ये तब्बल १,२४,३०० भारतीय पर्यटकांनी जॉर्जियात पर्यटन केलं. आता तुमची वेळ आहे. चला अशा एका सफरीवर जिथे प्रत्येक क्षण, एक नवा गंध घेऊन येतो आणि प्रत्येक अनुभव हृदयात घर करतो!


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

तुम्ही अनेक जंगलं पाहिली असतील पण असं काही अनुभवलंय का, जिथे सकाळ जंगलाच्या श्वासासारखी वाटते, आणि सायंकाळ एखाद्या लयबद्ध मंत्रासारखी ? अफ्रिकेच्या कडेला वसलेलं मॅडागास्कर हे बेट म्हणजे निसर्गाची गुपितं सांभाळणारा एक अनमोल खजिना. त्यातलंच एक हिडन जेम म्हणजे – आंदासिबे नॅशनल पार्क. भारतातून तिथं पोहोचणं आज अवघड नाही, पण जरा वेगळं आहे. कारण ही जागा तुमचं ठरलेलं "टिक मार्क टूरिझम' मोडते आणि मनात खोलवर जागा करते. इथे चालतो तो फक्त निसर्गाचा ताल, पानांवरून ओघळणाऱ्या थेंबांचा सूर, जमिनीवर चालणाऱ्या हळव्या पावलांचा नाद तुम्ही इथे ऐकू शकता. आंदासिने नॅशनल पार्क म्हणजे जणू पृथ्वीच्या अंतःशक्तीचं प्रकटीकरण अंदासीने हे राजधानी आंतनानारिवोपासून फक्त १५० किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी तिथे कोवळं धुकं गवतावर अलगद उतरलेलं असतं आणि वातावरणात इंद्रि लेमूरचा प्रार्थनेसारखा सूर घुमत असतो. त्याचा पवित्र आणि अंतर्मनाला भिडणारा आवाज ऐकताना वाटतं की जणू जंगलाचा आत्मा बोलतोय. स्थानिक लोक त्याला देवदूत मानतात. म्हणून त्याची शिकार करणं निषिद्ध मानलं जातं. इथं प्रत्येक पावलागणिक तुम्हाला निसर्गाचा स्पर्श होतो. ओलसर मातीचा सुगंध, पायाखाली येणारे इतर कुठेही न आढळणारे ऑर्किड्स, शिवाय इथलं फर्न्सचं अस्तित्व या सगळ्यांमुळे ही केवळ सफर न राहता एक आध्यात्मिक अनुभूती बनून जाते. इथे इंटरनेटपेक्षा मौन अधिक जुळतं, आणि सेल्फी काढण्यापेक्षा तो क्षण जगणं महत्त्वाचं वाटतं. जीपीएस पेक्षा अंतःकरणाची दिशा महत्त्वाची वाटते आणि ट्रॅव्हल आयटिनरीज् पेक्षा शांततेची वेळ अधिक मौल्यवान वाटते. एप्रिल ते नोव्हेंबर हा इथे येण्याचा उत्तम काळ मानला जातो कारण हवामान थोडं सुसह्य असतं. आजच्या धावपळीच्या जीवनात भारतीय पर्यटकांनी ह्या बेटाकडे केवळ एक ऑफबीट डेस्टिनेशन म्हणून न पाहता निसर्गातील 'ध्यानधारणा स्थान म्हणून बघायला हवं. भारतातील धावपळीच्या आयुष्यातून बाहेर पडून या जादूई रेनफॉरेस्टमध्ये पाऊल ठेवायला हवं. तुमचं हरवलेलं "मी" पण पुन्हा शोधायचं असेल तर आमच्यासोबत आमच्या केनिया मॅडागास्कर टूरवर चला.

August 01, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top