IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

शर्यत कोणाची? कोणाशी?

20 mins. read

Published in the Sunday Sakal on 14 April, 2024

वर्षाचे बाराही महीने आमच्या टूर्स सुरू असतात. पुर्वी उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुुट्टी, नाताळची सुुट्टी ह्या तीन सुट्ट्यांमध्येच पर्यटन चालायचं. पण शेवटी पर्यटन हा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हटला म्हणजे तो असा सिझनल असून चालत नाही. त्यावर आधारित आणि अवलंबित असलेल्या माणसं आणि संस्थानी सीझन संपल्यावर काय करायचं हा प्रश्‍न मनात अस्वस्थता निर्माण करायचा. मात्र अस्वस्थता मनात कायमची वास्तव्याला ठेवायची नसते. त्याचं काहीतरी ‘इस पार या उस पार‘ करून टाकायचं असतं. मग सगळ्या आमच्या खास करून एअरलाइन्स आणि हॉटेल्स असोसिएट्‌‍सशी संवाद साधला.

‘नॉन सीझनला सीझन बनवूया‘. सीझनला तुम्ही दामटवून पैसे घेता ठीक आहे पण शोल्डर सीझन, मीड सीझन, लो सीझनमध्ये तिच सर्व्हिस कमी पैशात द्या. आम्ही सहलींच्या किमती कमी करतो. ज्यांना शक्य आहे ते पर्यटक म्हणजे सिनियर्स, महिला, यंगस्टर्स, नवविवाहीत अशी अनेक मंडळी प्रत्येक घरात असतात ज्यांचा शाळांशी संबध नसतो ना त्यांना फक्त सुट्टीतच जाऊ शकतो असं काही बंधन असतं. ती पर्यटक मंडळी येतील की नॉन सिझनला, त्यांना कमी पैशात टूर्सचा आनंद घेता येर्इल. हॉटेल्स वापरात राहतील ज्यामुळे प्रॉपटीचा ऱ्हास होणार नाही. एअरलार्इन्सच्या अदरवाइज वाया जाणाऱ्या सीट्स रेव्हेन्यु मिळवून देतील. विन-विन-विन अशी टिपल बेनिफिट संकल्पना आहे ही. चांगल्या हेतूतून आकाराला आलेली ही गोष्टी सर्वांनी उचलून धरली आणि सुरू झालं 365 दिवसांचं पर्यटन. तुम्हालाही आठवत असतील आमच्या दरवर्षी येणाऱ्या जाहिराती ज्यात आम्ही म्हणतो, ‘गर्दी कमी, पैसे कमी, सीझन मस्त, आनंद जास्त.‘ अव्याहतपणे गेली अनेक वर्षे ह्या टूर्स सुरू आहेत. एप्रिल मे जून ह्या तीन महिन्यांमध्ये वर्षभराच्या तुलनेत पंचेचाळीस ते पन्नास टक्के बिझनेस होत असतो ही वस्तुस्थिती असल्याने ह्या सीझनवर जास्त काम करावं लागतं. हा सीझन सुरू व्हायच्या आधी आमच्या जवळ जवळ चारशे टूर मॅनेजर्स सोबत संवाद साधला जातो. एका बॅचमध्ये पासष्ट सत्तर टूर मॅनेजर्स येतात. सर्वसाधारणपणे अर्ध्या दिवसात आम्ही सीझनच्या ह्या टूर मॅनेजर्ससोबत सुसंवाद साधतो. ह्या संपूर्ण मिशनचा हेतू, त्यासाठी लागणरा आत्मविश्‍वास, तब्बेतीची काळजी, पर्यटकांच्या समाधानासाठी करावी लागणारी मेहनत अशा सगळयांची उजळणी करणं आणि ह्या आनंदाच्या लढार्इवर मोठ्या हिंमतीने निघणं ही दरवर्षीची पध्दत.

ह्यावेळी नीलने पध्दत बदलली. सर्वांना असं बॅचेसमध्ये बोलावून बहुतेकवेळा आपणच बोलत राहण्यापेक्षा ह्यावेळी एकेकांशी संवाद साधूया हा विचार मांडला. एच आर मॅनेजर्सचे डोळे मोठे झाले. पाच सहा हाफ डेज्‌‍ म्हणजे जास्तीत जास्त छत्तीस ते चाळीस तासांची इनव्हेस्टमेंट. पण प्रत्येकाला भेटायचं म्हणजे? जर किमान अर्धा तास एकासाठी धरला तर दोनशे तासांची गरज होती. हा वेळ वीस मिनिटांवर आणला तरी शंभर सव्वाशे तासांची गरज होतीच होती. एवढा वेळ आणायचा कुठून? पण नील के बात में दम था. करून तर बघूया. नवनवीन प्रयोग करीत रहायचं, काही यशस्वी होतात तर काही अनुभव बनतात. आपल्या टीम मेंबर्समध्ये केलेली ही इनव्हेस्टमेंट वाया जाणार नव्हती. आतापर्यंत आम्ही गेल्या दिड महिन्यात जवळजवळ दोनशे टूर मॅनेजर्सना भेटलो. जशा ह्या मिटिंग्ज पुढे सरकत होत्या, मी नीलला धन्यावाद देत होते कारण आम्हाला आमची टूर मॅनेजर्स टीम आणखी जवळून समजत होती. काही काही टूर मॅनेजर्सशी असा वन टू वन संवाद तर आम्ही पहिल्यांदाच करीत होतो. आमचे टूर मॅनेजर्स पर्सनलाइज्ड सर्व्हिससाठी पर्यटकांना आवडतात. ही वन-टू-वन मिटिंग आम्ही आमच्या टूर मॅनेजर्सना दिलेली पर्सनलाइज्ड सर्व्हिस होती, वा आहे असं म्हणेन कारण ही प्रक्रिया आताही सुरूच आहे. तर अशा ह्या वीस पंचवीस मिनिटांच्या मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन कम इन्फर्मेशन डीलिव्हरी ऑडिशन त्यांना द्यायची असते. साधारण पाच ते दहा मिनिटं बाकी गप्पांवर भर असतो. एक एक टूर मॅनेजर्स येत होते, प्रेझेंटेशन करीत होते. त्यांच्या उत्साहाने आम्हाला शक्ती मिळत होती, टीमचा अभिमानही वाटत होता.

ह्या सर्व प्रेझेंटेशन्स मध्ये एक दिवस राज पोपळकर नावाचा आमचा टूर मॅनेजर आला. असं वन-टू-वन त्याला पहिल्यांदाच भेटत होतो. हातात लॅपटॉपची बॅग, एवढं काय घेऊन आलायस तर म्हणाला माझं प्रेझेंटेशन आहे. बऱ्यापैकी गप्पा झाल्यावर एकमेकांना समजून घेतल्यावर आम्ही त्याला म्हटलं, ‘चल हो जा शुरू, काय विषय निवडलायस?‘. ‘नॉर्दन लाइटस आणि आर्क्टिक अंटार्क्टिक‘. आम्ही थोडं सावरून बसलो. आतापर्यंत फक्त भारतातील टूर्स करणारा हा डायरेक्ट जगाच्या दोन टोकांवर घेऊन निघालाय आम्हाला. त्याने निवडलेले विषय तसे कठीण होते. प्रेझेंटेशन सुरू झालं आणि आम्ही सर्वजण मी, नील, एच आर मॅनेजर ॲनी, जनरल मॅनेजर शिल्पा, टूर मॅनेजर्स मॅनेजर विनेश मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्याच्याकडे बघत ऐकत होते. अतिशय कठीण अशा विषयाला त्याने इतकं काही इंटरेस्टिंग बनवलं होतं की आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर अशी हिरे माणकं आपल्याकडे आहेत ह्याचं एक वेगळं समाधान दिसू लागलं. बरं लॅपटॉपवरचं प्रेझेंन्टेशन आणि त्याची कॉमेीं त्याने इतकी सिन्क्रोनाइज केली होती की ना तो जुनापुराणा स्लाइड शो वाटला की ना त्याला लेझर पॉर्इंटरने स्लाइड चेंज कराव्या लागल्या. पंधरा मिनिटांचं प्रेझेंटेशन असेल पण ते कुठेही कंटाळवाणं झालं नाही. पाठ करून आल्यासारख वाटलं नाही. बोलताना चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि सर्वांकडे बघत विनम्र डोळयांनी समोरच्याच्या नजरेला नजर भिडवीत हिंदीमधलं अस्खलित बोलणं... आम्ही एवढंच बोललो, ‘अरे इतके दिवस कुठे होतास तू? प्रेझेंटेशन कुणी केलं? कुठून मिळवलीस एवढी सगळी माहिती? किती दिवस लागले हे करायला?‘ ‘माझी परीक्षा आहे पण तरीही मी ह्यावर गेला एक महिना काम करतोय‘ आमचे डोळे मोठे झाले. एक महिना... जेव्हा एवढी मेहनत केली जाते तेव्हाच असं बेस्टेस्ट काही घडू शकतं. राज पोपळकरला ह्या वन टू वन मिटिंगचा खरा अर्थ कळला होता. चारशे टूर मॅनेजर्समधला एक तो होता, पण ह्या मिटिंगला सुवर्णसंधी मानून त्याने त्याच्यामध्ये असलेल्या केपेबिलिटिज आम्हा सर्वांसमोर दाखविण्याचा बहुतेक विडा उचलला असावा. परीक्षेचा अभ्यास आणि दुसरं मिटिंगमधलं त्याचं प्रेझेंटेशन ह्या दोनच गोष्टींवर त्याने लक्ष केंद्रित केलं होतं आणि अपेक्षित रिझल्ट त्याला मिळाला, जणू तो डिस्टिंक्शन मिळवून पहिला आला. टूर मॅनेजर्सच्या झूम मिटिंगमध्ये आम्ही त्याचं उदाहरण दिलं आणि नील आणि विनेशने त्याला डायरेक्ट इंटरनॅशनल टूरला प्रमोट केलं. वन-टू-वन मिटिंगची संधी आणि त्याचं महत्व जाणून केलेली प्रामाणिक मेहनत ह्यामुळे राज पोपळकरला अोळख मिळाली. जगात कुठेही फिरले तरी प्रत्येक टूर मॅनेजरला भारतातल्या सहली कराव्याच लागतात. राज पोपळकरला कदाचित अजून दोन वर्ष लागली असती इंटरनॅशनल टूर्सवर प्रमोट व्हायला पण ते अंतर त्याने एका प्रेझेंटेशनमुळे मिटवून टाकलं. थोडक्यात दोन वर्ष वाढली त्याच्या करियर वा प्रोफेशनल आयुष्यातली. पंचविशीतला तो, अशीच मेहनत करीत राहिला तर त्याने दिलेल्या प्रेझेंटेशनमधल्या आर्क्टिक अटांर्क्टिक नॉर्दन लाइटस सह तो सप्तखंड बघू शकेल आणि शंभर देशांचं ॅव्हल मिशनही पूर्ण करू शकेल.

या आठवड्याच्या अोपन हाऊस मध्ये राज पोपळकर येऊन भेटला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता आता भारताची सरहद्द पार करणार म्हणून. त्याला म्हटलं, ‘अभिनंदन! तूझ्या कर्तृत्वाने तू हा यशाच्या शिखराकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावरचा पहिला मार्इलस्टोन पार केलायस. आता थांबायचं नाही. डोक्यात हवा भरायची नाही. तसं झालंच तर मी इथे बऱ्याच सुया ठेवल्या आहेत ती हवा काढायला. टूर मॅनेजर मी ही होते आणि आता तुम्ही. आपण सर्व्हिस इंडस्ीवाले, कायम पाय जमिनीवर आणि डोकं धडावर. नम्र आहोत पण लाचार नाही  ही आपली मानसिकता, आणि हा नम्रपणा प्रमाणिक असावा, अोढून ताणून नको‘. मी नेहमी टूर मॅनेजर्स मिटिंग्जमध्ये एक गोष्ट प्रत्येकाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करते. ह्या युनिव्हर्समध्ये अनंत ग्रह तारे आहेत. त्यातला एक ग्रह म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीवर तीन चतुर्थांश पाणी आणि फक्त एक चतुर्थांश जमीन आहे. त्या जमिनीवर सात कॉन्टिनेंटस आहेत, त्या सप्तखंडातला एक खंड आशिया, त्या आशिया खंडात अंदाजे अठ्ठेचाळीस देश, त्यातला आपला एक भारत देश, त्या भारत देशात एकोणतीस राज्य आणि आठ केंद्रशाशित प्रदेश, त्यातलं एक राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्रात साधारणपणे त्रेचाळीस शहरं, त्यातली एक मुंबर्इ, त्या मुंबर्इमधलं एक उपशहर विद्याविहार, त्यातल्या एका कॉर्पोरेट पार्कमधल्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर वसलेलं आपलं वीणा वर्ल्ड, त्यातल्या हजार माणसांमधलं आपण एक माणूस. खूप लहान आहोत आपण त्यामुळे गर्व नको. विनासायास आपल्याला आयुष्य मिळालं आहे, आता मात्र कष्टाने प्रत्येक दिवसाचं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करूया आणि हो, ‘वन फिल्म हिरो‘ बनू नकोस. सिनेसृष्टीत कसे काही हिरो एक हिट चित्रपट देतात आणि पुढे एवढे हुरळून जातात, की आधीची मेहनत विसरतात आणि काही काळाने आपणही त्यांना विसरतो. शांतपणे मार्गक्रमणा करीत रहा. कष्ट परिश्रम मेहनत कुणालाच चुकली नाही. कष्टांनी भरलेला दिवस आणि समाधानाने भरलेली रात्र असं आयुष्य असेल ह्यासाठी प्रयत्न कर, स्वकर्तृत्वावर पुढे जात रहा. तुझ्यामागून येणाऱ्या मुलांना तुझं उदाहरण दीपस्तंभासारखं समोर राहिलं पाहिजे. आपल्यातल्या कुणालाही प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे करियरची शीडी लवकर चढता येते. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत त्याची, कुणी कुणाचे पाय अोढूच शकत नाही. इथे आपल्याकडे शर्यत लागलीय ती चांगलं करण्याची, एक्सलन्सची. माझा कुणी स्पर्धक असेल तर तो मी स्वत:च. कालच्या दिवसापेक्षा माझा आजचा दिवस आणखी सार्थ झाला पाहिजे ही विचारधारा. लेट्‌‍स कीप डुअिंग अवर बेस्ट, ऑलवेज! जूनी लाइन आठवली. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.‘ ऑल द बेस्ट!


स्वच्छंद भटकंती, मुक्त भ्रमंती

प्रवासाची आवड असली, पर्यटनाचं वेड मनात भिनलेलं असलं की मग फार प्लॅनिंग वगैरे करायची गरज वाटत नाही. वेगवेगळ्या देशांतील प्रदेशातील निसर्ग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती, मानवनिर्मित आकषणं, ऐतिहासिक वास्तू तुम्हाला साद घालत राहतात आणि तुमची भटकंती अखंड सुरू राहते. आमचा तरी असाच अनुभव आहे. मी आणि माझी पत्नी गेली दहा वर्ष अशीच जग भ्रमंती करत आलो आहोत. आमच्याकडे पुर्वी वर्ल्ड टूर्सचा काही खास प्लॅन वगैरे नव्हता तरी आमचा हा सगळा प्रवास अतिशय आरामदायी, सुखकर आणि संस्मरणीय झाला तो वीणा वर्ल्डमुळे. म्हणून तर गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही वीणा वर्ल्डसोबत तब्बल 30 पेक्षाही जास्त टूर्स केल्या आहेत. त्यामुळेच आमचा बहुतेक सगळा भारत तर पाहून झाला आहेच, पण जगाच्या पाठीवरचे 52 देश आम्ही पाहिले आहेत.

आता इतकं पर्यटन केल्यावर आम्ही नवनवीन देश बघायला तर उत्सुक असतोच पण आम्ही पूर्वी पाहिलेल्या देशांना आणि राज्यांनाही आवर्जून पुन्हा भेट देतो. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातले अनेक देश आणि आपल्या भारतातली अनेक राज्यं पर्यटनाच्या बाबतीत जणू रिचार्ज झाली आहेत. पर्यटकांनी पुन्हा पुन्हा यावं म्हणून नवनवीन पर्यटक आकर्षणं तयार होत आहेत. साहजिकच आमच्या सारख्यांना या ठिकाणांना पुन्हा भेट द्यायला नवीन निमित्त मिळतं. तसंही काही डेस्टिनेशन्स अशी आहेत की एकदा जाऊन मन काही तृप्त होत नाही.

आता इतके सारे देश पाहिल्यावर यातला सर्वात आवडता कोणता? या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीणच वाटतं, कारण प्रत्येक डेस्टिनेशनचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे आणि आम्हाला तर आम्ही दोघांनी मिळून ते ठिकाण पाहिलंय याचंच समाधान मोठं आहे. तरीही सांगायचं झालंच तर पहिला नंबर आम्ही ‘कॅनडा’ला देऊ, त्यानंतर ‘न्यूझीलंड’ आणि मग ‘ऑस्ट्रेलिया’ असं म्हणता येईल. आता ही नावं वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आम्हाला जंगलं, डोंगरमाथ्यावरची ठिकाणं, फेसाळते सागर किनारे... थोडक्यात मनमोहक निसर्ग जास्त भुरळ घालतो.

आम्ही वीणा वर्ल्डबरोबर नेहमी जातो कारण देश कोणताही असो वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स तुम्हाला नेहमीच अगदी आपुलकीची आणि तत्पर सेवा देतात. एखाद्या घरच्या व्यक्तीबरोबरच आपण आलो आहोत असंच त्यांच वागणं असतं. 2020 मध्ये आम्ही व्हिएतनाम कम्बोडिया सहल केली होती तेव्हा सहलीवर असताना परतीच्या दोन दिवस आधी माझा पाय मुरगळला तेव्हा आमच्या बरोबरच्या मेहूल घोसाळकर ह्या टूर मॅनेजरने अगदी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसारखी माझी काळजी घेतली. या वर्षी आम्ही ‘वायझॅग दिंडी अराकु व्हॅली बोरा केव्हज’ ही सहल जानेवारीत केली तर आत्ताच मार्चमध्ये आम्ही ‘नैनिताल मसूरी हरिद्वार ऋषिकेश कॉर्बेट’ही टूर केली आणि मे एन्डला आम्ही ‘बँकॉक पट्टाया फुकेत क्राबी’ही सहल करणार आहोत. केल्याने देशाटन...हे आम्ही अगदी मनावर घेतलं आहे.

श्री. प्रवीण शहा आणि सौ. नीला शहा, पुणे


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

जगाच्या पाठीवर काही देश असे असतात जे तुम्हाला इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयांच्या पुस्तकात भेटतात, कारण त्यांच्या भौगोलिक स्थानामुळेच इतिहास घडलेला असतो. असा एक देश म्हणजे ‘साउथ आफ्रिका‘. हे नाव उच्चारल्यावर आपल्याला महात्मा गांधीजींपासून ते नेल्सन मंडेलांपर्यंत अनेक थोरांची नावं आठवतात. त्याचबरोबर इथल्या हिऱ्यांच्या खाणी, इथल्या लांबलचक वायनरीज, इथलं वैविध्यपूर्ण वन्यजीवन देखिल आठवतं. जगातली पहिली वहिली हार्ट ट्रान्सप्लान्ट सर्जरी याच देशात झाली होती. या देशाला तीन तीन राजधान्या लाभल्या आहेत-प्रिटोरिया ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल, ब्लूमफाँतिन ही ज्युडिशियल कॅपिटल आणि केप टाऊन ही लेजिस्लेटिव्ह कॅपिटल. यातल्या केप टाउन या शहराभोवती अनेक ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भांचे वलय आहे. हे या देशातलं सर्वात प्राचीन शहर आणि इथेच साउथ आफ्रिकेची पार्लमेंट आहे. टेबल माउंटन आणि केप पॉइंट ही या शहराची भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. 15 व्या शतकात याच शहराजवळ पोर्तुगिज दर्यावर्दी बार्टोलोम्यु डायस पोहोचला आणि जगाच्या इतिहासाला नवं वळण मिळालं. युरोपमधून आशियाकडे येणारा खुष्कीचा (रस्त्याचा)मार्ग ऑटोमन साम्राज्याने अडवल्यानं युरोपमधील देश आफ्रिका खंडाला वळसा घालून भारत आणि इतर आशियायी देशांकडे येण्याचा सागरी मार्ग शोधत होते. या शोध यात्रेत बार्टोलोम्यु दक्षिण आफ्रिकेतील ‘केप ऑफ गुड होप’ पाशी पोहोचला आणि पूर्वेचा मार्ग पश्चिमेला खुला झाला. या ठिकाणचा खवळलेला समुद्र बघून आधी बार्टोलोम्युने या जागेला ‘केप ऑफ स्टॉर्म्स’ असंच नाव दिलं होतं, पुढे आशियाकडे जाण्याची आशा बळकट करणारं ठिकाण म्हणून ‘केप ऑफ गुड होप’असं नाव देण्यात आलं.

‘केप ऑफ गुड होप’ हा अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरचा खडकाळ भाग आहे. मात्र हा भाग अटलँटिक आणि हिंद महासागराची विभागणी करणारा नाही. केप टाउन शहरापासून केप ऑफ गुड होप फक्त 50 किलोमीटर्सवर आहे. केपच्या किनारी भागात मेडिटेरेनियन पध्दतीचे सुखद हवामान अनुभवता येते. इथं उन्हाळ्यात वाहणारे वारे ‘द केप डॉक्टर ’ म्हणून प्रसिध्द आहेत, कारण या वाऱ्यांमुळे इथली हवा शुध्द होते आणि पाण्यातल्या जीवांना भरपूर ऑक्सिजन मिळतो. या भागाचा समावेश टेबल माउंटन नॅशनल पार्कमध्ये केला आहे, त्यामुळे इथल्या जैव विविधतेला संरक्षण मिळालं आहे. केप ऑफ गुड होपच्या परिसरातला समुद्र अनेकदा खवळलेला असतो, त्यामुळे इथे शेकडो जहाजे बुडली आहेत. त्यातल्याच एका जहाजाची ‘फ्लाइंग डचमन’ ची भूतकथा या भागात प्रसिध्द आहे. हे बुडालेलं जहाज म्हणे केपच्या सागरी मार्गावर कायम भटकताना दिसतं. इथलं 1850 साली उभारलेले लाइट हाउस पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलं आहे. तर मग इतिहास आणि भूगोलात महत्वाचं स्थान असलेल्या ‘केप ऑफ गुड होप‘ला भेट द्यायची असेल तर वीणा वर्ल्ड सोबत चला साउथ आफ्रिकेच्या टूरला.


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

जगाच्या नकाशात ठिपक्या इतकीच जागा व्यापलेले काही छोटे देश त्यांच्या एखाद्या शोधामुळे जगभरात मोठा ठसा उमटवताना पाहायला मिळतात. यातलाच एक देश म्हणजे साउथ ईस्ट युरोपमधला क्रोएशिया. हा देश जगभरात ओळखला जातो तो ‘नेकटाय’ आणि ‘पेन’ची जन्मभूमी म्हणून. निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या क्रोएशियाची खाद्यसंस्कृती तितकीच चटकदार आहे. या खाद्यपरंपरेवर इटली, टर्की तसंच ऑस्ट्रियाच्या पाककलेचा प्रभाव आहे. मात्र खास क्रोएशियाचे असे पदार्थ आहेतच, त्यातलाच एक म्हणजे फ्रितुले. तुम्ही फ्रितुले बघाल तर म्हणाल की ‘अरेच्चा हे तर मिनी डोनट्स!‘ कारण फ्रितुले तसेच दिसतात. पण क्रोएशियातली ही ख्रिसमस स्पेशल पेस्ट्री चवीला मात्र एकदम वेगळी आणि सॉलिड यम्मी लागते.

तसं बघितलं तर फ्रितुले म्हणजे एकप्रकारचे ‘फ्रिटर्स’ अर्थात तळलेल्या भज्यांसारखेच असतात, मात्र यातले इन्ग्रेडिएंटस आणि त्यावर लावलेली साखर यामुळे हे ‘पेस्ट्री’  बनतात. ट्रॅडिशनल फ्रितुले बनवताना मैद्यात थोडं यीस्ट, सिट्रस झेस्ट म्हणजे लिंबाच्या किंवा संत्र्याच्या सालीचा किस, मनुका आणि अक्रोडाचे बारीक तुकडे घालून ते मिश्रण तासभर भिजवत ठेवतात. नंतर यीस्टमुळे मिश्रण फुगलं की त्याचे छोटे छोटे गोळे करून ते खरपूस तळले जातात. गरम असतानाच त्यावर पिठी साखर किंवा मेपल सिरप किंवा चॉकलेट सिरप टाकलं जातं. पारंपरिक रेसिपीनुसार फ्रितुलेच्या पिठात थोडी रम किंवा ब्रँडी फ्लेवरसाठी मिसळली जाते, त्यामुळे चव तर बदलतेच पण तळताना फ्रितुले फार तेल पीत नाहीत. क्रोएशियाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये फ्रितुले बनवताना त्यात वेगवेगळी लोकल फळं व ड्रायफ्रुटस वापरली जातात त्यामुळे वेगवेगळ्य़ा चवीचे फ्रितुले तिकडे खायला मिळतात. पूर्वी फक्त ख्रिसमसला बनवले जाणारे फ्रितुले आता नेहमी बनवतात, त्यामुळे ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी कॉफीबरोबर फ्रितुले असा बेत असतो. वीणा वर्ल्डबरोबर जर तुम्ही क्रोएशियाची सहल करीत असाल तर फ्रितुलेंचा आस्वाद नक्की घ्या. देश विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका. www.veenaworld.com/podcast


आम्हीही चाललोय तुम्हीही चला!

एक आयुष्य अपुरं आहे आपल्या भारतासह संपूर्ण जग बघायला, म्हणूनच आमचंही बरंच जग अजून बघायचं राहिलंय, आणि अधुनमधुन आम्ही ते बघत असतो. गेल्या महिन्यात आमचे हितचिंतक आणि माझ्यासोबत म्हणजे मी टूर मॅनेजर असताना टूरवर आलेले श्री संतोष लोढा ह्यांचा फोन आला की ‘चला पुन्हा सगळे मिळून टूरला जाऊया‘. त्यांचा फोन आला तेव्हा मी आणि सुधीर कारमध्ये होतो. सुधीरला म्हटलं आपण दोघंच एकटं फिरण्यापेक्षा का नाही आपल्यासोबत आपल्या पर्यटकांनाही घेऊन जायचं. आपल्याच टूरवर आपण पर्यटक म्हणून जाऊया आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनातून वीणा वर्ल्डची टूर आणि सर्व्हिस कशी आहे ते बघूया. नेहमीप्रमाणेच टूर मॅनेजर असेलच पर्यटकांच्या दिमतीला. आयडिया मिळायचा अवकाश, आमचं व्हर्च्युअल पर्यटन सुरू झालं त्या क्षणीच. भारताच्या माथ्यापासून सुरुवात केली. लडाखमधलं तुर्तुक, हॅनले, आर्यन व्हॅली राहिलंय. काश्‍मीरमधले ग्रेट लेक्स बघायचे राहिलेत. नव्याने विकसित झालेले बोटपत्री, दूधपत्री, द्रांग किंवा अहरबल, दचिगम बरंच काही आहे. मनाली ते लेह प्रवास करायचाय. चंद्रताल बघायचाय. रामलल्लाचं दर्शन घ्यायचंय, गंगा नदीत क्रूझ सफारी करायचीय, सेव्हन सिस्टर्समधल्या आसाम अरूणाचल मेघालय थोडंफार झालंय पण उरलेल्या फोर सीस्टर्सना अजून भेट द्यायचीय. अंदमानमध्ये नव्याने विकसित होणारं मायाबंदर दिगलीपूर बघायचंय, नेपाळ भूतान सिक्किम दार्जिलिंगची महत्वाची शहरं किंवा ठिकाणं बघितलीयत पण ॲक्चुअल एक्सस्प्लोरेशन अजून बाकी आहेच. आपल्या महाराष्ट्रातलं लोणार किंवा ताडोबाही अजून पाहिलं नाही. प्रत्येक राज्यातलं असं काहीना काही सुटलंय. पझलमधल्या सुट्ट्या भागासारखं झालंय. आता हे सगळे तुकडे एकत्र करण्याची वेळ आलीय. वर्षातून साधारपणे आठ टूर्स आपल्याला करायला जमतील. थोडी ऑफबीट अनकॉमन ठिकाणं निवडायची आणि जुलै ते मार्च असा आठ महिन्यांचा कालावधी घ्यायचा. आणि दरवर्षी जाहीर करायचा हा आठ टूर्सचा कार्यक्रम. रुपरेषा पक्की झाली. सुनिला आणि प्रॉडक्ट टीम ने पहिल्या आठ टूर्स डिझाइन केल्या आणि गेल्या आठवड्यात गुढीपाडव्यानंतर त्या जाहीरही झाल्या. वीणा वर्ल्डच्या वेबसार्इटवर ह्या टूर्स आपल्याला दिसतील. सो चलो, धम्माल करूया, हसूया, गाऊया, नाचूया... लेट्स लूक फॉरवर्ड टू समथिंग डिफरंट! समथिंग ऑफ द बीटन ॅक!


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍
डर के आगे....थ्रिल है

हॉलिडे म्हणजे फक्त रिलॅक्सेशन नाही तर हॉलिडे म्हणजे एक्साइटमेंट असं जर तुम्हाला वाटत असेल तर ‘हॉलिडे विथ ॲडव्हेंचर‘ अनुभवण्यासाठी तुम्ही स्काय डायव्हिंग, बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलूनिंग असे अनेक प्रकार करू शकता. स्काय डायव्हिंग करताना जेव्हा तुम्ही हजारो फूटांवर उडत असलेल्या विमानातून स्वतःला बाहेर झोकून देता आणि अतिउंचावरचा हवेचा ताण सहन करत तुम्ही एखाद्या पक्ष्यासारखे मोकळ्या अवकाशात भिरभिरायला लागता तेव्हा आपोआप तुमच्या शरीरातील ॲड्रेनलाइनची पातळी वाढायला लागते. खाली दूरवर दिसणारी जमीन ज्यावेळी जवळ यायला लागते त्यावेळी तुमचं पॅराशुट उघडतं आणि तुम्ही त्याच्या मदतीने आकाशात संथपणे तरंगू लागता... हे वर्णन वाचल्यावर तुम्हाला ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ सिनेमातला स्काय डायव्हिंगचा प्रसंग आठवला असेल. तो सारा भाग स्पेनमधल्या बार्सेलोना जवळच्या कोस्टा ब्रावा इथे शूट केला होता. पण अमेरिकेतही मायामि या सागर किनाऱ्यावरच्या पर्यटन स्थळी तुम्ही ‘मायामि टॅन्डम स्काय डाइव्ह’ एन्जॉय करू शकता किंवा लास वेगास मधली रोषणाईने उजळलेली ‘लास व्हेगास स्ट्रीप’ आकाशातून न्याहाळायची असेल तर तिथेही ‘लास व्हेगास टॅन्डम स्काय डाइव्ह’ करता येते. ऑस्ट्रेलियामधील केर्न्स मध्ये कोरल रीफपासून ते रेनफॉरेस्टपर्यंत अनेक गोष्टी तुम्ही आकाशातून तरंगत तरंगत पाहू शकता. ऑस्ट्रेलियाचा शेजारी न्यझीलंड हा देश तर ॲडव्हेंचर कंट्री म्हणूनच ओळखला जातो. या देशातल्या ‘रोटोरुआ’ किंवा ‘क्विन्सटाऊन’ या शहरात टॅन्डम स्काय डायव्हिंग करायला जगभरातून हजारोफ्लच्या संखेने हौशी पर्यटक येतात.

तुम्ही थायलंडाला किंवा भारतात हिमाचलला पॅराग्लायडिंग केलं असेल पण त्यापेक्षा जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स हवा असेल तर मायक्रोलाइट सफारी करायलाच हवी. मायक्रोलाइट म्हणजे एक अतिशय लहान टू सीटर विमान असतं आणि ते बऱ्यापैकी अोपन असतं, अशा विमानात बसून केलेली हवाई सफर म्हणजे मायक्रोलाइट सफारी. आफ्रिकेतील झिम्बाब्वे मधील व्हिक्टोरिया फॉल्स या प्रचंड धबधब्यावरुनही अशी मायक्रोलाइट सफारी करता येते.

आणखी एक ॲडव्हेंचर स्पोर्ट सध्या लोकप्रिय झाला आहे आणि तो म्हणजे ‘ब्रिज क्लाइंबिंग’. ऑस्ट्रेलियातील अनेक मोठमोठ्या ब्रिजेसवर हा खेळ खेळता येतो. माउंटेनियरिंग रॉक क्लायबिंगचा हा शहरी अवतार तुम्ही ऑस्ट्रेलियातल्या तुमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेमध्ये नक्की अनुभवा. या बरोबरच बंजी जंम्पिंग जे तुम्ही साउथ आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथे करू शकता तसेच कोस्टा रिकामध्ये तुम्ही केबल कारमधून बंजी जम्पिंग करू शकता. झिपलाईन हा आणखी एक लोकप्रिय प्रकार तुम्ही जंगल कॅनोपीवर, सागर किनाऱ्यांवर किंवा डोंगररांगांमध्ये करू शकता. युनायटेड अरब एमिरॅट्समधील ‘जैस फ्लाइट’ ही जगातली सर्वात लांब अंतराची झिप लाइन आहे, तिचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. भारतातील जोधपूरमधल्या मेहरानगड फोर्टवरही तुम्ही झिप लाइनचा थरार अनुभवू शकता. टर्की मधल्या हॉट एअर बलूनपासून ते बुसान  कोरिया मधील हेऊनदे येथल्या स्काय कॅप्सुलपर्यंत जगभरात तुमचा हॉलिडे थ्रिलिंग करायला अनेक पर्याय आहेत, वीणा वर्ल्डच्या मदतीने तुमचा पर्याय निवडा आणि करा तुमचा हॉलिडे एक्सायटिंग कारण डर के आगे ... थ्रिल है !

April 13, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top