Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

व्हाईट वंडरलँड

8 mins. read

Published in the Sunday Maharashtra Times on 17 August 2025

...हिवाळा सुरू झाला की इथले स्नो कव्हर्ड नॅचरल माऊंटन स्लोप्स हे स्कीईंग करणाऱ्यांसाठी नंदनवन बनतात, तर स्कीईंग नंतरच्या विरंगुळ्याचं आकर्षणही पर्यटकांना इथे खेचून आणतं....

भारतातल्या बहुसंख्य लोकांना स्वित्झर्लंड म्हटल्यावर हिरव्यागार व्हॅलीज्‌‍, स्वच्छ-निरभ्र आकाश, स्नो कव्हर्ड माऊंटन पीक्स असंच चित्र डोळ्यांसमोर दिसायला लागतं. आजपर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमधून पाहिलेलं हे आहे उन्हाळ्यातलं स्वित्झर्लंड. पण समजा मी म्हणालो की स्वित्झर्लंडचं खरं सौंदर्य हे उन्हाळ्यातल्या सूर्यप्रकाशात नाही, तर हिवाळ्यातल्या स्वच्छ हवेत खुलतं, तर?

या वर्षीच्या हिवाळ्यात एकच उद्दिष्ट समोर ठेवून मी आणि सुनिला (वीणा वर्ल्डची सह संस्थापिका आणि चीफ प्रॉडक्ट ऑफिसर) स्वित्झर्लंडला भेट देणार आहोत आणि ते म्हणजे हिवाळ्यातल्या स्वित्झर्लंडचा अनोखा अनुभव घेणं. सोबत अर्थातच आमच्या टूर्सना अधिक समृध्द करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील जरा अनोखी ठिकाणे शोधायची आहेत. बर्फाच्छादित शॅलेस्‌‍, परिकथेतील वाटावी अशी दिव्यांनी उजळलेली ख्रिसमस मार्केट्‌‍स, जिथे काळच थबकला आहे अशी डोंगराच्या कुशीतली गावं... यामुळे हिवाळ्यातलं स्वित्झर्लंड हा जणू एखाद्या फॅन्टसीतला भूभाग वाटतो.

चला तर मग आज मी तुम्हाला हिवाळ्यातील स्वित्झर्लंडबद्दल अशा काही गोष्टी सांगतो, ज्यामुळे तुमची पावलं हिवाळ्यात स्वित्झर्लंडकडेच वळतील.

उन्हाळ्यातल्या स्वित्झर्लंडचा चेहरा जर उत्साही असेल, तर हिवाळ्यात तो उत्फुल्ल असतो. हवा एकदम ताजी, स्वच्छ असते. अवतीभवतीच्या परिसराने बर्फाची दुलई ओढून घेतलेली असते. अवघ्या सृष्टीवर जणू कोणी जादूची कांडी फिरवलेली असते. नेहमी मे आणि जून महिन्यात युरोपची सहल प्लॅॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी हिवाळ्यातली सहल म्हणजे अधिक रोमांचक अनुभव असं नक्कीच म्हणता येईल.

स्वित्झर्लंडमधला डिसेंबर महिना हा काही फक्त बर्फाने गारठलेला महिना नसतो, तर त्याला सणासुदीच्या उत्साहाची उबही असते. चमचमणाऱ्या दिव्यांनी उजळलेले फरसबंदी रस्ते, ख्रिसमस मार्केटमधील गरम वाइनचे वाफाळते कप, चौकात स्केटिंगचा आनंद घेणारी मुलं, चर्चेसमधून गुंजणारे ख्रिसमस कॅरोल्सचे स्वर... या वातावरणाचं चित्र कल्पनेत डोळ्यांसमोर आणून बघा, आपोआप जुन्या काळात गेल्याचा भास होईल.

या सगळ्यापलीकडे जाऊन पाहिलं तर अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला उन्हाळ्यात करताच येत नाहीत, त्यासाठी हिवाळाच हवा. स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्लेजिंग किंवा अगदी जोरदार बर्फवृष्टी होत असताना केलेली केबल कारची सवारी असे कायम स्मरणात राहणारे अनुभव तुम्हाला फक्त हिवाळ्यातच मिळू शकतात. शिवाय हिवाळ्याला एक उबदार बाजूही आहे. जिथे शेकोटीच्या उबेतलं जेवण, गरमागरम चीज फॉन्द्यू, बर्फाने वेढलेले लक्झुरियस थर्मल स्पा असे खास हिवाळ्यातले क्षण तुमची वाट पाहत असतात. हे वातावरण, त्यातील हा आल्हाद हे सगळं म्हणजे जणू चित्रकथेतील स्वित्झर्लंडचा वास्तव अनुभवच.

मग तुम्ही जर चित्रातल्यासारखी दिसणारी उन्हाळ्यातली दृश्य बघितली असतील किंवा तुम्हाला युरोपमधलं साहस अनुभवायचं असेल तर हिवाळ्यात स्वित्झर्लंडला अवश्य भेट द्या, कारण तेव्हा स्वित्झर्लंड अधिक निवांत, अधिक रोमँटिक आणि अधिक मोहक असतं.

अनेक भारतीयांचं स्वित्झर्लंडचं स्वप्न हे टूरिस्ट गाइडमधून नाही, तर रुपेरी पडद्यावरुन सुरू झालेलं आहे. ‌‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‌’ मधली हिरवीगार कुरणं, ‌‘चांदनी‌’ आणि ‌‘मोहब्बते‌’ मधील रम्य हिमशिखरं यातून भारतीयांना स्वित्झर्लंडची ओळख झाली. त्यामुळे जगातील सर्वात रोमँटिक जागा म्हणजे स्वित्झर्लंड अशी प्रतिमा बॉलिवूडने भारतीयांच्या मनावर जणू गोंदूनच ठेवली आहे. त्यामुळे झालं काय की पासपोर्ट मिळायच्या आधीपासूनच सिनेरसिकांच्या पिढ्यांनी मनातल्या मनात स्वित्झर्लंडच्या वाऱ्या सुरू केल्या सुध्दा.

स्वित्झर्लंडबरोबर भारतीयांचं हे प्रेमप्रकरण सुरू करुन देण्यात महत्वाची भूमिका बजावली ती यश चोप्रांनी. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन स्वित्झर्लंडच्या शासनाने यशजींचा सन्मान करण्यासाठी त्यांचा एक पुतळा इंटरलाकन येथे उभारला आहे आणि एका लेक व्ह्यू पॉइंटला त्यांचं नावही दिलं आहे. त्याच्या सिनेमांमधून आल्प्सचं फक्त दर्शनच घडलं नाही, तर ते अशा पध्दतीने समोर आलं की प्रेक्षकांना तिकडे जायची ओढ लागली. आज भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर सानेन, श्टाड, युंगफ्रॉ या ठिकाणांना भेट देतात, कारण ही ठिकाणं त्यांनी पहिल्यांदा पडद्यावर पाहिली आणि ते त्यांच्या प्रेमात पडले.

त्यामुळेच आज तुम्ही जेव्हा ल्युसर्नच्या रस्त्यावर फेरफटका मारता किंवा युंगफ्रॉ ला जाण्यासाठी रमणीय प्रदेशातून रेल्वे प्रवास करीत असता तेव्हा तिथल्या सोव्हेनियर शॉपमध्ये तुम्हाला सहज हिंदी सिनेसंगीत ऐकू येतं किंवा बॉलिवूडच्या स्टार्सची पोस्टर्स तुमचं तिथे स्वागत करतात. आपल्या भारतीय सिनेमामय हृदयात स्वित्झर्लंडचं जे खास स्थान आहे, त्याची जाणीव स्वित्झर्लंडला आहे. त्यामुळेच तिथल्या मोहक निसर्गाला, भारतीयांच्या नॉस्टॅल्जियाची जोड देऊन तो अधिक आकर्षक पध्दतीने सादर केला जातो.

स्वित्झर्लंडच्या स्थलदर्शनात काही ठिकाणं अशी आहेत की जी विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी अगदी अनिवार्य असतात, कारण ती आहेतच तशी खास की जिथून प्रत्येक भारतीय पर्यटकाचं स्वित्झर्लंड दर्शन सुरू होतं.

बहुसंख्य भारतीय पर्यटकांसाठी स्वित्झर्लंडची सुरूवात माऊंट टिटलीसपासून होते, कारण इथेच खऱ्या अर्थाने त्यांना बर्फाच्या राज्यात विहार करायला मिळतो. तो रिव्हॉल्विंग केबल कारचा प्रवास, टिटलीस क्लिफ वॉक आणि अर्थातच सिनेमात पाहिलं तसं बर्फात बागडणं हे सगळं इथंच शक्य होतं. शिवाय तिथे असलेल्या ‌‘डी डी एल जे‌’ च्या मोठ्या कट आउटबरोबर सेल्फी घेणं हे तर जणू चेरी ऑन टॉपच असतं.

युंगफ्रॉ - टॉप ऑफ द युरोप म्हणूनच प्रसिध्द असलेलं हे ठिकाण म्हणजे भारतीय पर्यटकांच्या यादीतलं आणखी एक अनिवार्य ठिकाण. समुद्र सपाटीपासून 11000 फुटांवर असलेल्या या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी जो रेल्वे प्रवास करावा लागतो, तो या जागेइतकाच रमणीय असतो. इथला आइस पॅलेस, आलेत्श ग्लेशियर्सचं विहंगम दृश्य, आणि खरोखरच जगाच्या माथ्यावर उभं असल्याची ती भावना ... हे सारं केवळ अविस्मरणीय असतं.

ल्यूसर्नमधील चॅपेल ब्रिज आणि लायन मॉन्युमेंट, बर्निज्‌‍ ओबरलँड प्रांतात फिरण्यासाठी सुयोग्य बेस कॅम्प म्हणजे दोन सुंदर तलावांच्या मध्ये वसलेलं इंटरलाकन हे शहर. या टुमदार गावांमध्ये पायी फिरताना तुम्हाला जणू स्वित्झर्लंडचं व्यक्तिमत्व गवसतं.

या सगळ्यापेक्षा झुरिक वेगळं ठरतं, कारण इथे तुम्हाला स्वित्झर्लंडचा शहरी चेहरा बघायला मिळतो. इथले तलावाकाठचे रुंद रस्ते, हिवाळ्यातील गजबजलेली ख्रिसमस मार्केट्‌‍स आणि आजपर्यंत तुम्ही कधीच खाल्ली नसतील अशी टेस्टी चॉकलेट्‌‍स, यामुळे स्वित्झर्लंडची एक वेगळीच प्रतिमा तुमच्या मनावर उमटते.

ही सगळी ठिकाणं जरा जास्त परिचित असली तरीही कितीही वेळा पाहूनही तरी त्यांची जादू ओसरत नाही. त्यात तुम्ही जर पहिल्यांदाच स्वित्झर्लंडला भेट देणार असाल, तर सुरूवात करायला यापेक्षा उत्तम ठिकाणं नाहीत.

टिटलिसच्या बर्फमय दुनियेपेक्षा आणि युंगफ्राऊच्या हिमाच्छादित शिखरांच्या पलीकडे एक वेगळं, अधिक शांत आणि जास्त मनमोहक स्वित्झर्लंड लपलेलं आहे. भव्य मॅटरहॉर्न पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं झरमॅट हे गाव कार फ्री असल्यानं अगदी परिकथेतल्या गावाची आठवण करुन देतं. हिवाळा सुरू झाला की इथले स्नो कव्हर्ड नॅचरल माऊंटन स्लोप्स स्कीईंग करणाऱ्यांसाठी नंदनवन बनतात, तर स्कीईंग नंतरच्या विरंगुळ्याचं आकर्षणही पर्यटकांना इथे खेचून आणतं. तुम्हाला स्कीईंग येत नसलं तरीही सूर्यास्ताच्या वेळी गुलाबी रंगात न्हाऊन निघालेल्या मॅटरहॉर्नचं दर्शनही इथं यायला पुरेसं ठरतं. आणि हो, इथे चित्रीत झालेल्या हिंदी सिनेमांना कसं विसरुन चालेल? त्यांनीच तर इथले बर्फाच्छादित रस्ते किती रोमँटिक वाटतात याची जाणीव करुन दिली.

अनेक नवख्या प्रवाशांकडून हमखास सुटणारी जागा म्हणजे श्टाड जवळची ग्लेशियर 3000. या जागेला विंटर वंडरलँड नक्की म्हणता येईल. कारण इथेच आणि फक्त इथेच तुम्ही दोन पर्वत शिखरांमधल्या सस्पेन्शन ब्रिजवरुन चालण्याचा आणि वळणदार बर्फमय रस्त्यांवर टोबोगन चालवण्याचा थरारक अनुभव घेऊ शकता. अवतीभवती पसरलेल्या आल्प्सच्या हिमाच्छादित रांगांमधलं हे साहस जितकं रोमांचक असतं, तितकंच मनाला शांतवणारंही असतं.

श्टाडला एक भेट तर द्यायलाच हवी. लक्झुरियस सुविधांनी सज्ज असूनही श्टाडनं आपलं गावपण अजूनही जपलं आहे आणि म्हणूनच ते सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय आहे. इथले पारंपरिक लाकडी शॅलेट्‌‍स, चविष्ट भोजन, बर्फाने झाकले गेलेले रस्ते यामुळे ते हिवाळ्यातील एक सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखलं जातं. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी इथे हमखास सुट्टी घालवायला येतात यात काही नवल नाही.

गेली अनेक दशकं भारतीय पर्यटकांच्या सिनेमॅटिक नॉस्टेल्जियाशी स्वित्झर्लंड अगदी घट्ट जोडलेलं आहे. आपल्या शिफॉनच्या साड्या फलकारत बागडणाऱ्या यशराजजींच्या हिरॉइन्सपासून ते हिरव्यागार कुरणात दंगामस्ती करणाऱ्या शाहरुख खानपर्यंत, बॉलिवूडमुळेच स्वित्झर्लंड म्हणजे जगातील रोमान्सचं एकमेव नंदनवन अशी प्रतिमा भारतीयांच्या मनावर बिंबलेली आहे. या प्रतिमेला हिवाळ्यात एक नवंच परिमाण मिळतं.

मात्र स्वित्झर्लंड फक्त आठवणीतल्या जुन्या सिनेमांचाच हिस्सा नाही, तर आजचे दिग्दर्शकही स्वित्झर्लंडमध्ये परत परत येतात. कारण इथल्या सौंदर्याला जोड मिळते ती विविधतेची आणि इथं ते सहज शूटिंग करु शकतात. इथेच वास्तव आयुष्य आणि सिनेमा याचा संगम होतो, ज्याचा तुम्हीदेखील हिस्सा बनता.

तर मग आता जेव्हा तुम्ही स्वित्झर्लंडमधल्या हॉलिडेचा विचार कराल, तेव्हा फक्त उन्हाळ्यातल्या हिरव्यागार कुरणांवर थांबू नका, तर बर्फवृष्टी, झगमगती ख्रिसमस मार्केट्‌‍स, गोठलेले तलाव आणि शेकोटीच्या साथीनं घेतलेला फोंद्यूचा स्वाद याचाही अवश्य विचार करा. हे खरं स्वित्झर्लंड आहे. म्हणूनच या डिसेंबरमध्ये मी आणि सुनिला निघालोय स्वित्झर्लंडला, जे आम्हाला मुळातच आवडतं त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला, नवं काहीतरी शोधायला. कुणी सांगावं, आम्हाला बॉलिवूडसाठी नवीन काहीतरी मिळेलही. भेटूया पुढच्या आठवड्यात.

August 14, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top