Published in the Saturday Lokasatta on 12 July 2025
प्रत्येकाला आपापला रोल मिळाला आणि सिनर्जीस्टिकली आम्ही काम करायला लागलो. हो, तेही महत्त्वाचं नाही का, नाहीतर ‘टू मेनी कूक्स स्पॉईल द ब्रॉथ’ सारखं व्हायचं...
‘वीणा, आम्हाला तुमची टूर आवडते, तुमचा टूर मॅनेजरही हवाय, पण बघ नं टूरमध्ये जरा कमी लोकं असतील आणि हॉटेल्स फाईव्ह स्टार असतील तर आणखी मजा येईल.’ रुनवाल बिल्डर्सच्या सिनियर रुनवालनी खूप वर्षांपूर्वी मला हे सांगितलेलं, जे बॅक ऑफ द माईंड अगदी मस्तपैकी जाऊन बसलं होतं. मधून मधून आठवण करून देत होतं की ‘हे तुला करायचंय’, पण आम्ही घेतला ‘अफोर्डेबल टुरिझम’चा वसा, आणि अफोर्डेबल किंमतीमध्ये टूर्स द्यायच्या असतील तर टूरमध्ये किंवा बसमध्ये सर्व सीट्सवर पर्यटक असलेच पाहिजेत. फाईव्ह स्टार हॉटेल्स रेग्युलर टूर्समध्ये किंवा त्या किंमतीमध्ये बसणंच शक्य नाही, त्यामुळे ती लक्झुरियस टूरिझमची कल्पना बॅक आफ द माईंडच राहिली. वीणा वर्ल्डला बारा वर्षं झाली, अनेक अडथळ्यांची शर्यत आम्ही हसतहसत पार केली, त्यात अव्वल नंबर मिळवला असं म्हणता येईल. आणि आम्ही चौघजण म्हणजे सुधीर, वीणा, सुनिला, नील टुरिझममध्ये आणि वीणा वर्ल्डमध्ये स्थिरस्थावर झालो. प्रत्येकाला आपापला रोल मिळाला आणि सिनर्जीस्टिकली आम्ही काम करायला लागलो. हो, तेही महत्त्वाचं नाही का, नाहीतर ‘टू मेनी कूक्स स्पॉईल द ब्रॉथ’ सारखं व्हायचं. ऑर्गनायझेशनची घडी बसत असताना आम्ही ॲक्चुअली इव्हॉल्व्ह होत होतो. आमच्या टुरिझममधल्या आवडीनिवडी आम्हाला कळत होत्या. आपल्या आवडीप्रमाणे आपलं कार्यक्षेत्र मिळणं हे भाग्याचं लक्षण आणि आम्हा चौघांच्याही बाबतीत ते आम्हाला मिळालं. टुरिझम म्हणजे आमची सेकंड स्किन जणू. आता क्षेत्र आवडीचं होतं, पण त्यातलं कोणतं काम तुम्हाला आवडतं हा सुद्धा महत्त्वाचा भाग होता. जशी वर्षं जात होती, तसं आमच्या वेगवेगळ्या एक्सपर्टीज् आम्हाला कळत होत्या आणि तीन वर्षांपूर्वी आम्ही प्रोफाइलची वर्गवारी करून टाकली. सीईओ म्हणून ओव्हरऑल आर्गनायझेशनची जबाबदारी घेतानाच मास टुरिझम, अफोर्डेबल टुरिझमकडे माझा ओढा, त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजी, त्यानुसार वेगवेगळ्या संकल्पना आणणं हे काम माझ्याकडे आलं. फायनान्स आणि भारतातलं सप्लायर नेटवर्क सुधीरच्या आवडीप्रमाणे त्याच्या प्रोफाइलचा भाग बनलं. मी मास टुरिझमसाठी, तर सुनिला क्लास टुरिझमसाठी असं दिसून यायला लागलं आणि मग एक्सक्लुसिव्ह आयटिनरीज् बनविण्याची आवड आणि त्यासाठी लागणारं जगाचं सखोल ज्ञान तिला वीणा वर्ल्डची चीफ प्रॉडक्ट ऑफिसर बनवून गेलं. त्याचसोबत जगभरातील आमचे सप्लायर्स, असोसिएट्स, टुरिझम बोर्डस, कॉन्स्युलेट्स ह्या सगळ्यांशी असलेले तिचे अतिशय उत्कृष्ट संबंध तिच्या प्रोफाइलचा भाग बनले. सुनिला ब्रँड ॲम्बॅसिडर होती ऑस्ट्रेलिया टुरिझमची आपल्या संपूर्ण भारतासाठी अगदी अलीकडेपर्यंत. नीलने वीणा वर्ल्डच्या सुरूवातीपासून एक फाऊंडर मेंबर म्हणून पर्यटनक्षेत्रात पाऊल टाकलं आणि हळूहळू त्याच्या ऑपरेशनल आणि टेक्नॉलॉजिकल एक्स्पर्टीज्ची जाणीव सर्वांना व्हायला लागली आणि तो बनला चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. ट्रॅडिशनली बिझनेस पुढे जात असताना आज टेक्नॉलॉजीशिवाय तो सर्वाइव्ह होऊ शकत नाही, ती बाजू नील त्याच्या पस्तीस जणांच्या टेक्नॉलॉजी टीमसह अतिशय छान तऱ्हेने सांभाळतोय. त्याच्या पुढची पायरी होती मॅनेजर्स आणि त्यांच्या टीम्सना व्यवस्थित त्यांच्या आवडी आणि प्रावीण्यानुसार रोल देण्याची. ती ही पार पाडली आणि अकराशे जणांचीटीम आपापल्या जागी स्थानापन्न झाली. ज्यावेळी असं स्थैर्य येतं, तेव्हा मग आपण आणखी नवीन काय ह्याविषयी विचार करायला लागतो. हो, स्थैर्य फार महत्वाचं, घरात आणि कार्यालयात. उज्ज्वल भविष्याची ती गुरूकिल्ली आहे. गेल्या वर्षी ट्युनिसिया माल्टा सिसिलीच्या टूरला आमच्या पर्यटकांसोबत गेलो होतो. त्या टूरमध्ये मुंबईत रेस्टॉरंट चेन चालवणारे शीबा आणि रमेशन मुथथ्यन भेटले. आमच्या कॉर्पोरेट ऑफिसजवळही त्यांचं ‘लार्क’ नावाचं छान रेस्टॉरंट आहे. त्यांनी वीणा वर्ल्डसोबत वीसहून अधिक टूर्स केल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की ‘सगळं छान आहे, आणि म्हणून तर आम्ही एवढ्या टूर्स करतो. पण जरा छोटे ग्रुप्स करायचं बघा नं, आम्हाला माहितीय पैसे वाढतील पण अनेकांची ती गरज आहे.’ पर्यटकांसोबत टूर्सला जाण्याचा फायदा असा होतो. आणि पुन्हा एकदा या लक्झुरियस टूर्सच्या विचाराने ‘बॅक ऑफ द माईंड’वरून अगदी समोर उडी घेतली. सुनिलाला म्हटलं, ‘कस्टमाईज्ड हॉलिडे’ आणि ‘माइस’ म्हणजे कॉर्पोरेट टूर्ससोबत तुला लक्झरी टूर्सच्या या स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिटला तुझ्या प्रोफाईलमध्ये सामावून घेता येईल का? कारण या लक्झरी टूर्समध्ये नेमकं काय द्यायचं हे तुला जास्त चांगलं कळेल. ते नॉलेज तुझ्याकडे भरभरून आहे. आणि कस्टमाईज्ड हॉलिडे करणाऱ्या टीमलाही ते माहीत आहे. आपल्या रेग्युलर ग्रुप टूर्स आणि कस्टमाईज्ड हॉलिडेज ह्याच्या मधलं हे प्रॉडक्ट आहे. ग्रुप टूर्स प्रमाणे ही ठरलेली टूर आहे, त्यासोबत टूर मॅनेजर आहे. पण कस्टमाईज्ड हॉलिडेप्रमाणे त्यात थोडं रिलॅक्सेशनही आहे. एक्स्पिरियन्सेस आहेत. त्यामुळे तुला आणि तुझ्या टीमला, तुमच्या एक्स्पर्टीज् ना हे नवीन चॅलेंज मिळेल जे तुम्ही अगदी लीलया पेलू शकाल.’ एवढं अमूल बटर लावल्यावर सुनिला आणि तिच्या टीममधल्या जान्हवी राणे, फातेमा कारू, नविना भदे आणि गेस्ट कनेक्टच्या रोशनी बागवे ह्यांना हो म्हणावंच लागलं. आणि सुरू झाली ‘लक्झरी ग्रुप टूर्स’ ची डिव्हिजन. ह्या समर व्हेकेशनमध्ये काश्मीर, नेपाळ, भूतान, बाली इ. ठिकाणी ह्या लक्झरी टूर्स जाऊनही आल्या आणि सर्व पर्यटकांनी ‘हो आम्हाला हेच हवं होतं’ म्हणत या संकल्पनेला दुजोरा दिला, आमचा उत्साह वाढवला. एप्रिल-मे मध्ये जे काही घडत होतं भारतात आणि आखातात, त्यामुळे बुकिंग कोसळलं, पण जेवढ्या पर्यटकांनी बुकिंग केलं होतं, त्यांना लक्झरी ग्रुप टूर्सद्वारे आम्ही त्यांच्या ड्रीम डेस्टिनेशनला नेऊन आणलं. काही ग्रुप्स छोटे होते, पण या पहिल्यावहिल्या सर्वच टूर्स छान तऱ्हेने पार पडल्या. आम्हाला पर्यटकांकडून फीडबॅकही घेता आला आणि जिथे शक्य आहे तिथे टूर्समध्ये आणखी अपग्रेडेशन्सही करता आली. ‘लक्झरी ग्रुप टूर्स’ मध्ये नेमकं काय आहे ते थोडक्यात इथे देते, म्हणजे आमच्या ज्या पर्यटकांना अनुभव घ्यायचा आहे त्यांना हा कन्सेप्ट एकदम क्लियर होईल. लक्झरी ग्रुप टूर्स म्हणजे नावाप्रमाणे ह्यामध्ये फाईव्ह स्टार आणि फोर स्टार सुपीरिअर हॉटेल्स आहेत. शक्यतोवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा सिटी सेंटरला ही हॉटेल्स असतात किंवा जर रिसॉर्ट प्रॉपर्टी असेल तर मग ती शहरात किंवा शहराबाहेर असू शकते. अमेरिकन हॉट ब्रेकफास्ट, इंडियन किंवा लोकल लंच ज्या ठिकाणी आपण साईटसीइंगला जातो त्या ठिकाणी आणि आपल्या हॉटेलमध्ये इंडियन वा इंटरनॅशनल बुफेमध्ये वा अलाकार्ट पद्धतीने डिनरची व्यवस्था केलेली असते. कधी एखादं जेवण बीचवर तर कधी फार्ममध्ये किंवा एखाद्या ट्रेनमध्ये किंवा विनीयार्डमध्ये सुद्धा आयोजित केलं जातं डेस्टिनेशन्सप्रमाणे. लोकल कॅफे किंवा स्ट्रीट फूड डेलिकसीचाही अनुभव यात दिला जातो. लोकल रेग्युलर ग्रुप टूर्समध्ये आम्ही भरपूर स्थलदर्शन घडवतो. आणि तेच तर पर्यटकांना हवं असतं. या लक्झरी टूर्समध्ये आम्ही महत्वाचं सगळं स्थलदर्शन करतो, पण ह्या टूर्समध्ये दिवस थोडे वाढवले असल्याने रिलॅक्सेशनसाठी किंवा हॉटेल प्रॉपर्टीज् एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळतो. स्थलदर्शनातही बघण्यासोबत एक्सपीरियन्सेसची भर घातलेली असते, त्यामुळे ‘लेट्स डू इट’ ही जी पर्यटकांची सुप्त इच्छा असते त्याला आम्ही न्याय देतो असं म्हणता येईल. आणि या टूर्ससोबत, वीणा वर्ल्डचा पर्यटकांना आवडणारा टूर मॅनेजर सतत दिमतीला असतोच, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नसतं. शिवाय ह्या टूर मॅनेजरच्या पाठी असते वीणा वर्ल्डची अकराशे जणांची टीम. त्यामुळेच तर या अनप्रेडिक्टेबल जगात कुठेही आमचे पर्यटक एकटे नसतात. गेल्या अनेक वर्षांत पर्यटकांनी त्याचा अनुभव घेतलाय. सो या लक्झरी ग्रुप टूर्समध्ये एखादी संध्याकाळ आराम करण्यासाठी किंवा शॉपिंगसाठी किंवा जस्ट त्या शहरात पायी फिरण्यासाठी राखून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. अर्थात या सगळ्या अशा लक्झुरियस आणि ॲट ईज गोष्टींमुळे या लक्झरी ग्रुप टूर्सचा खर्च जास्त असतो रेग्युलर टूर्सपेक्षा, पण ‘वर्थ इट’ असं आमच्या जाऊन आलेल्या ‘लक्झरी ग्रुप टूर्स’ वाल्या पर्यटकांचं म्हणणं आहे. सो, या नवीन सुरू झालेल्या सीझनमध्येही वेगवेगळ्या लक्झरी ग्रुप टूर्स आमच्या टीमने डिझाईन केल्या आहेत. नवीन कॅटॅगरी असल्याने एका डेस्टिनेशनसाठी किंवा एका देशासाठी आम्ही एकच टूर आयोजित केली आहे. जसजशी पर्यटकांना ही संकल्पना आवडत जाईल, त्यांचा प्रतिसाद वाढत जाईल तसतशी ह्या टूर्ससाठीची डिपार्चर्सही वाढतील, पण सध्या टूर्स कमी असल्याने किंवा ‘वन अँड ओन्ली’ असल्याने ‘दिल मांगे मोअर’ किंवा ‘एक्स्पेक्टस् मोअर’ असं वाटत असणाऱ्या पर्यटकांनी शक्य तेवढ्या लवकर या लक्झरी ग्रुप टूर्सचं बुकिंग करावं.वीणा वर्ल्ड कडे आहेत प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी टूर्स ज्यामध्ये आहेत मोस्ट पॉप्युलर अशा रेग्युलर फॅमिली टूर्स ‘यू नेम इट वुई हॅव इट’, जग अफोर्डेबल करण्यासाठीच्या ‘पैसा वसूल टूर्स’, वर दिलेल्या लक्झरी ग्रुप टूर्स, नवविवाहितांसाठी हनिमून स्पेशल टूर्स, जगात एकमेवाद्वितीय ठरलेल्या-सातत्याने मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या वुमन्स स्पेशल टूर्स, आयुष्याच्या उत्तरार्धाचा आनंदी प्रारंभ करणाऱ्या जेष्ठांसाठीच्या श्रेष्ठ सिनियर्स स्पेशल टूर्स, ‘उस मोडसे शुरू करे फिर ये जिन्दगी, हर शय जहाँ हसीन थी, हम तुम थे अजनबी’ या उक्तीनुसार मिडल एज कपल्समधलं प्रेम नव्याने जागवणाऱ्या ‘कपल्स ओन्ली टूर्स’, ‘एकच आयुष्य आहे जगून घेऊया’ ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ म्हणणाऱ्या - निसर्गाशी नातं जोडणाऱ्या ‘योलो आऊटडोअर टूर्स’, ज्यांना ग्रुप टूर्सला जायचं नसतं त्यांच्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे-बजेटप्रमाणे-वेळेप्रमाणे त्यांना हव्या तशा प्राइव्हेट टूर्स प्लॅन करून देणारी कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची डिव्हिजन आणि कॉर्पोरेट हाऊसेसकरिता किंवा इंडस्ट्रीजसाठी- त्यांच्या डीलर्स, इन्सेन्टिव्हज् वा टीम बिल्डिंग वा ॲवॉर्ड फंक्शन्ससाठी वीणा वर्ल्डचा मोठा विभाग अगदी अगदी पंधरा पासून पंधराशे - तीन हजार पर्यंतच्या ऑफिशियल्स किंवा डीलर्ससाठीच्या कॉर्पोरेट टूर्स अशा आगळ्यावेगळ्या टूर्स वीणा वर्ल्ड गेली अनेक वर्षे आयोजित करीत आहे.काश्मीर केदारनाथपासून किर्गिझस्तान कझाकस्तानपर्यंत, हिमाचलपासून हवाईपर्यंत, अंदमानपासून अलास्कापर्यंत आणि मध्य प्रदेशपासून मेक्सिकोपर्यंत, भारतभ्रमण आणि जगभ्रमंतीसाठी आम्ही तुमच्या स्वागताला उत्सुक आहोत. तुम्हाला फक्त ठरवायचंय. सो चलो, बॅग भरो, निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.