सहजीवनाची सुंदर सुरुवात

0 comments
Reading Time: 10 minutes

न्यूली मॅरीड कपल्सना सुट्टीचा प्रॉब्लेम असतो. ‘हल्ली सुट्ट्याच मिळत नाहीत’ ही तक्रार सर्वत्रच ऐकू येते. अशावेळी ‘हनिमूनला जाऊ परत केव्हातरी’ असा विचार येतो आणि पुढे पुढे करीत वर्ष निघून जातात हे आपणापैकी अनेकांनी अनुभवलंय. आणखी एक कारण दिलं जातं ते बजेटचं. लग्नात भरपूर खर्च झालाय, आता हनिमूनचं नंतर बघू. मी म्हणेन लग्नातला खर्च थोडा आटोक्यात ठेवूया आणि छोटी-मोठी का होईना पण हनिमून टूर झालीच पाहिजे. हनिमून ही सहजीवनाची सुंदर सुरुवात. तिथे चाल ढकल करायची नाही, नॉट अलाऊड.

 

‘डोन्ट टेल मी, हे असूच शकत नाही, यू मीन पीपल गो ऑन देअर हनिमून इन अ ग्रुप टूर?’ क्रोएशियावरून आलेल्या आमच्या असोसिएट पार्टनरच्या चेहर्‍यावरचा अविश्‍वासी भाव बघण्यासारखा होता. त्याला म्हटलं, येस! अ‍ॅन्ड दे लिव हॅप्पीली एव्हर आफ्टर, वुई विल ब्रिंग हनिमून टूर्स टू क्रोएशिया टू, बी रेडी! कोणत्याही संभाषणात वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलचा विषय आला की सर्वसाधारणपणे ‘व्हॉट अ लव्हली कन्सेप्ट!’ हा प्रतिसाद येतो. सीनियर्स स्पेशलच्या सहली बघून ‘वॉव्व! व्हॉट अ कॉज, इट्स बीयाँड बिझनेस’ हे ऐकायला मिळतं, पण ‘हनिमून टूर्स’ ही गोष्ट आजही आमची परदेशातली अनेक पार्टनर मंडळी स्विकारायलाच तयार होत नाहीत. असं असू शकतं हे त्यांच्या पचनीच पडत नाही. आपल्या भारतातही अजून भुवया उंचावल्या जातात, लोक आश्‍चर्यात पडतात ह्या हनिमून टूर्सविषयी ऐकून. एवढंच कशाला आमच्या कोणत्याही सेल्स ऑफिसमध्ये जेव्हा सहजीवनाची नवी सुरुवात करणारी ही लव्ह बर्डस् जोडपी येतात तेव्हा संभाषण असंच काहीसं सुरू होतं. ‘तुमच्याकडे हनिमून पॅकेजेस आहेत का? आमचं लग्न ह्या तारखेला आहे, त्यानंतर तीन-चार दिवसांत आम्ही निघू शकतो’. वीणा वर्ल्ड सेल्स अ‍ॅडव्हायजर मग त्यांना, ‘तुम्ही भारतात कुठे-कुठे फिरू शकता, परदेशात काय काय ऑप्शन्स आहेत’ ह्याची माहिती देतात. हनिमून कपलला अक्षरश: हजारो हनिमून पॅकेजेसचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ‘यू नेम इट आणि वूई डू इट’ असाच प्रकार. त्यामुळे तुमचं आवडतं ठिकाण सांगा, आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखं कस्टमाईज्ड हनिमून पॅकेज बनवून देतो. रेडीमेड हनिमून पॅकेजेसही वीणा वर्ल्ड वेबसाईटवर उपलब्ध आहेत, ती डायरेक्टली जशीच्या तशी बूक करता येतात. जर वेगळं हॉलिडे पॅकेज तयार करून हवं असेल तर तेही दिलं जातं. हा झाला कस्टमाईज्ड हनिमून पॅकेजचा प्रकार. तो समोर बसलेल्या लव्ह बर्डस्ना सांगितल्यानंतर आमचा ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजर हनिमून टूर्सकडे वळतो, ‘जर तुम्हाला कस्टमाईज्ड हनिमून पॅकेज नको असेल तर आमच्याकडे हनिमून टूर्स आहेत. भारतात बारा ठिकाणी आणि परदेशात बारा ठिकाणी’. आता समोरचे लव्ह बर्डस् खुर्चीवरून खाली पडण्याच्या बेतात असतात. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलतात. पुढे लिहिल्या आहेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऑफिसेसमधून मिळालेल्या प्रतिक्रिया ज्या जशाच्या तशा इथे दिलेल्या आहेत, ‘व्हॉट? हनिमून टूर्स, आय कान्ट बीलीव्ह!’ ‘हनिमून इज सपोज टू बी अ प्रायव्हेट अफेअर, हाऊ कॅन यू गो इन अ टूर विथ अदर कपल्स?’ अविश्‍वासाने विचारलं जातं, ‘डू पीपल रीअली गो ऑन देअर हनिमून इन सच टूर्स?’ मग वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजर त्यांना वीणा वर्ल्डच्या वर्क प्लेसवर असलेले असंख्य फोटोज् दाखवतो हनिमून टूर्सचे, आणि हळूहळू असं काही असू शकतं ह्यावर त्यांचा विश्‍वास बसतो. कस्टमाईज्ड हॉलिडे किंवा हनिमून टूर ह्या दोन्हीचे फायदे-तोटे ह्यावर चर्चा केल्यानंतर समोरचे लव्ह बर्डस् त्यांच्या आवडीप्रमाणे कस्टमाईज्ड हॉलिडे किंवा हनिमून टूर ह्यापैकी एकाची निवड करतात आणि आनंदात ऑफिसमधून बाहेर पडतात. प्रत्येक हनिमून कपलला किंवा त्याच्या घरच्यांना ह्या दोन्ही प्रकारांमधला फरक इथे सांगायला मला आवडेल कारण हे दोन वेगवेगळे माईंडसेट आहेत. ज्यांची आवड किंवा जडणघडण ‘सॉलिट्यूड-शांतता-मी मायसेल्फ’ अशी असेल त्यांनी त्यांना हवं तसं कस्टमाईज्ड हनिमून पॅकेज बनवून घ्यावं. असं हनिमून कपल जर ग्रुप टूरला आलं तर राँग नंबर लागलाच म्हणून समजा. तसंच ज्या कपलला मित्रमंडळी, गप्पागोष्टी आवडतात ते हनिमून टूर्स जास्त एन्जॉय करतात. हनिमून कपल्सनी आपल्याला नक्की काय हवंय ते पक्क करणं हा बुकिंगच्या आधीचा महत्त्वाचा भाग आहे. आपला राँग नंबर लागू द्यायचा नाही. सो, आपण आधी कस्टमाईज्ड हनिमून पॅकेज हा प्रकार बघूया.

काही महिन्यांपूर्वी एका हनिमून कपलने न्यूझीलंडचं हनिमून पॅकेज वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड टीमकडून बनवून घेतलं. पंधरा दिवसांचा हनिमून हॉलिडे आणि ते दोघंही एवढे उत्साही होते की त्यांनी न्यूझीलंडमध्ये असणार्‍या बहुतेक सर्व म्हणजे वायतोमो ब्लॅक वॉटर राफ्टिंंग, स्काय जंप, हॉबिटन मुव्ही सेट, स्टारगेझिंग, स्कायडाईव्ह, मिल्फर्ड साऊंड क्रुझ, बंजी जंपिंग, ग्लेशियर हॉट वॉटर प्रायव्हेट पूल्स, फ्रॅन्झ जोसेफ ग्लेशियर हेली हाईक अशा सर्व अ‍ॅक्टिव्हिटीजचा समावेश त्यांच्या पॅकेजमध्ये करवून घेतला. हे त्यांचं पॅकेज म्हणजे ‘टॉक ऑफ द वीक’ होतं वीणा वर्ल्डमध्ये. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमलाही हे पॅकेज बनविताना खूप मजा आली, समथिंग डिफरंट. एक हनिमून कपल आलं आणि आल्या आल्याच त्यांनी जाहीर केलं, ‘आम्हाला स्पेनला जायचंय, जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटात जे-जे काही दाखवलंय ते सगळं बघायचंय आणि स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग सगळं सगळं करायचंय’. अशी हौशी-उत्साही हनिमून कपल्स बघितली की बरं वाटतंं, टीम पण एकदम चार्ज होते. अ‍ॅक्च्युअली कस्टमाईज्ड हॉलिडे घेणार्‍या हनिमूनर्सनी असे वेगवेगळे एक्सपीरियन्सेस त्यांच्या पॅकेजमध्ये अ‍ॅड करून घ्यावेत, त्यासाठीच खरंतर आमच्या एक्सपर्टीजचा उपयोग. नाहीतर नुसती हॉटेल्स आणि फ्लाईट्स स्वस्तात विकणार्‍या अक्षरशः शेकडो वेबसाईट्स आहेत. वीणा वर्ल्डचे कस्टमाईज्ड हॉलिडेज् आहेत ते बीयाँड हॉटेल्स आणि फ्लाइट बुकिंग. सो हनिमूनर्स, तुमच्या स्वप्नातल्या- देशविदेशातल्या कोणत्याही म्हणजे स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, सिडनी, लंडन, प्राग, क्रोएशियापैकी किंवा भारतातल्या कुठच्याही डेस्टीनेशनवर जायचं ठरवलंत तर आमची एक्सपर्ट डीझायनिंग टीम तुमचा हनिमून मस्त मस्त व्हायला सहाय्य करेल. तुम्ही टूरवर असतानाही ते तुमच्या संपर्कात राहतील जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. तुम्ही वीणा वर्ल्ड वेबसाईटवर असलेले रेडीमेड हनिमून पॅकेजेस घ्या किंवा हॉलिडे डीझाईन फी भरून तुमचा हनिमून कस्टमाईज्ड करून घ्या. ही डीझाईन फी चौकशीच्या वेळी भरावी लागते जी तुमच्या हनिमून पॅकेजच्या किमतीत अ‍ॅडजस्ट केली जाते. त्यामुळे चिंता नको. ही फी एवढ्यासाठीच आम्ही सुरू केली जेणेकरून उगाचच हॉलिडे शॉपिंग करणार्‍यांवर व्यथित होणारा आमचा वेळ वाचेल आणि खर्‍या, सीरियसली त्यांच्या हनिमून हॉलिडेकडे पाहणार्‍या हनिमूनर्सच्या पॅकेजेसना वेळ देऊन तो चांगल्या तर्‍हेने डीझाईन करून देता येईल.

आता आपण वळूया वीणा वर्ल्डच्या हनिमून टूर्सकडे. अनेकांना आश्‍चर्यात टाकणार्‍या ह्या टूर्सवर गेल्या पाच वर्षांत तीस हजारहून अधिक हनिमूनर्स जाऊन आलेत बरं का. मनाली, थायलंड, बाली, मुन्नार, मॉरिशस, कूर्ग, उदयपूर हे हॉटस्पॉट आहेत हनिमून टूर्सचे. पूर्वी फक्त शिमला मनालीच्या हनिमून टूर्स असायच्या. नव्या डेस्टिनेशन्सची डीमांड वाढायला लागली आणि आम्ही नवनव्या हनिमून टूर्स त्यात वाढवीत गेलो. आता एकूण चोवीस हनिमून टूर्सचा चॉईस हनिमूनर्सना आहे. अर्थात हे एका रात्रीत झालं नाही. जेव्हा आम्ही बाली वा स्वित्झर्लंड ह्या हनिमून टूर्स आणल्या तेव्हा कदाचित बजेटमुळे किंवा एका पार्टनरकडे पासपोर्ट नसल्याने त्या सहलींना डीमांड कमी असायची. काही वेळा मग त्या सहलींना हनिमूनर्सना आम्ही पॉप्युलर फॅमिली टूर्सचा पर्याय दिला त्यांचे प्लॅन्स वाया जाऊ नयेत म्हणून, पण कितीही केलं तरी हनिमून टूरची मजा वेगळीच. त्यामुळे ज्या टूर्स हाय बजेट आहेत, व्हिसाचा प्रश्‍न आहे, जास्त दिवसांच्या आहेत त्यांना आम्ही काट मारली आणि जिथे फक्त सोलो हनिमून टूर्स जाऊ शकतील तेथेच त्या आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ह्यापुढे हनिमून टूर ही नेहमीप्रमाणे पूर्णपणे न्यूली मॅरीड कपल्सचीच असणार. अगदी टोकाचं अपरिहार्य काही घडलं तरच, अन्यथा त्या सहलीची तारीख बदलली जाणार नाही. ह्या बहुतेक फॉरिन टूर्सना ऑन अरायव्हल व्हिसा होत असल्यामुळे तुम्ही फक्त पासपोर्ट घ्यायचा आणि वीणा वर्ल्डचं ऑफिस गाठायचं.

न्यूली मॅरीड कपल्सना सुट्टीचा प्रॉब्लेम असतो. ‘हल्ली सुट्ट्याच मिळत नाहीत’ ही तक्रार सर्वत्रच ऐकू येते. अशावेळी ‘हनिमूनला जाऊ परत केव्हातरी’ असा विचार येतो आणि पुढे पुढे करीत वर्ष निघून जातात हे आपणापैकी अनेकांनी अनुभवलंय. आम्ही म्हणतो लग्न ही आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट, आणि त्यामुळेच हनिमून ही सहजीवनाची सुंदर सुरुवात. तिथे चाल ढकल करायची नाही, नॉट अलाऊड. आम्ही कशाला आहोत मग? आम्ही घेऊन आलोय कमी सुट्टी मिळणार्‍या हनिमून कपल्ससाठी पाच दिवसांच्या हनिमून टूर्स. आता नो बहाणेबाजी. हनिमून झालाच पाहिजे. आणखी एक कारण दिलं जातं ते बजेटचं. ‘लग्नात भरपूर खर्च झालाय, आता हनिमूनचं नंतर बघू’. मी म्हणेन लग्नातला खर्च थोडा आटोक्यात ठेवूया आणि छोटी-मोठी का होईना पण हनिमून टूर झालीच पाहिजे. आता आम्ही पंचवीस हजार, तीस हजार, पस्तीस हजार, पन्नास हजारात हनिमून टूर्स आणल्या आहेत. ऑल इन्क्लुसिव्ह. भारतातल्या सहलीत विमानप्रवास, हॉटेल वास्तव्य, स्थलदर्शन, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, टीप्स आदी सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. परदेश सहलीतसुद्धा ह्या गोष्टी आहेतच, फक्त काही सहलींमध्ये आम्ही हनिमूनर्सना लंचच्या वेळी मोकळा वेळ दिलाय जेणेकरून ते त्यांना हवं तसं तिथलं लोकल फूड एन्जॉय करतील. हनिमूनर्स म्हणजे सगळा तरूणाईचा मामला त्यामुळे ‘लेट देम सॅटिस्फाय देअर टेस्टबड्स’. सो, बजेटचा प्रश्‍न आम्ही मिटवलाय महाबळेश्‍वरपेक्षा कमी किमतीत मनालीची सहा दिवसांची ऑल इन्क्लुसिव्ह टूर देऊन आणि गोव्यापेक्षा कमी किमतीत थायलंडची पाच दिवसांची फॉरिन टूर देऊन. मग आता बजेट नाही हे बोलायला परमिशन नाही.

ह्या हनिमून टूर्स लोकप्रिय व्हायचं कारण म्हणजे सोबतीला असतात आयुष्याकडे नव्या नवलाईने बघणारी हनिमून कपल्स. हवी तेव्हा प्रायव्हसी आणि हवा तेव्हा दे धम्माल माहोल हनिमूनर्सच्या कंपनीसोबत. आणि तुम्हाला कसलीच चिंता करायची वेळ येत नाही. कार वेळेवर येणार का? जेवण कुठे घ्यायचं? साइटसींईंग नीट होईल नं? ह्या सर्व गोष्टींसाठी तुमच्या दिमतीला असणार आहे ‘मै हूँ ना!’ म्हणणारा वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर आणि त्याच्या सपोर्टसाठी वीणा वर्ल्डची मोठ्ठी बॅक ऑफिस टीम. म्हणजेच तुम्हाला डोक्याला ताप नाही, तुम्ही फक्त एन्जॉय करायचं. आणि हो दुसरा महत्त्वाचा भाग असतो तो घरच्यांचा. दोन्हीकडची आई वडील मंडळी थोडी टेंशनमध्ये असतातच. त्यांनीही काळजी करायची नाही.

सो चलो, ऑलरेडी हजारो हनिमूनर्सनी अनुभवलंय, आता तुम्ही चला आणि सहजीवनाची सुंदर सुरुवात करा.

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*