Language Marathi

विश्वदौरा

आमच्या टूर मॅनेजर्सचे किंवा आमचे आत्तापर्यत सप्तखंडांसह सत्तरपंच्याहत्तर देश बघून झालेयत, पण बाबा भातंब्रेकरांचे ऐंशीहून जास्त देश बघून झालेयत, हे ऐकल्यावर आमच्या टीमच्या चेहर्यावरचे भाव टिपण्यासारखे होते. इझ इट? डोन्ट टेल मी! कान्ट बिलिव्हअसे अनेक रिस्पॉन्सेस ऐकू आले. मी म्हटलं, फक्त देशच नाही तर त्यांचे सातही खंड बघून झालेत

परवा लातूरचे बाबा भातंब्रेकर आले होते, वय वर्ष एक्याऐंशी. वेळ जेवणाची होती, म्हटलं चला आज एकत्र जेवूया. गप्पाही होतील आणि काहीतरी गवसेल आपल्याला. बाबांना भेटले तेव्हा त्यांनी त्याच प्रसन्न चित्ताने हसून आमच्याच कार्यालयात माझं स्वागत केलं. सीनियर्स स्पेशल सहलीला हे असते तर ‘स्माईल किंग’चं बक्षिस ह्यांनीच घेतलं असतं हमखास. आज ह्या वयात इतकं छान स्माईल टिकून रहायचं त्यांचं गुपित काय? असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, चालणं, साधी राहणी आणि पर्यटन. साधी राहणी म्हणजे किती साधी. दुपारची वेळ असली तर येणार्‍या देश-विदेशातील सुटाबुटातल्या व्हिजिटर्ससोबत एकत्र जेवण करण्याची आमची प्रथा, आज एका अतिशय साध्या व्यक्तीबरोबर जेवण करतोय तर नेमकी ती व्यक्ती कोण असा प्रश्‍न ऑफिसमधल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. मग सगळ्या कार्यालयालाच त्यांची ओळख करून दिली. कारण पायात साध्या चपला घातलेली, पॅन्टशर्टचा साध्यातला साधा पोशाख ल्यालेली, गळ्यात शबनम झोळी लटकवलेली ही व्यक्ती पर्यटनाच्या बाबतीत आमच्या सर्वांच्या पुढे होती. आमच्या टूर मॅनेजर्सचे किंवा आमचे आत्तापर्यत सप्तखंडांसह सत्तर-पंच्याहत्तर देश बघून झालेयत, पण बाबा भातंब्रेकरांचे ऐंशीहून जास्त देश बघून झालेयत, हे ऐकल्यावर आमच्या टीमच्या चेहर्‍यावरचे भाव टिपण्यासारखे होते. इझ इट? डोन्ट टेल मी! कान्ट बिलिव्ह… असे अनेक रिस्पॉन्सेस ऐकू आले. मी म्हटलं, फक्त देशच नाही तर सातही खंड बघून झालेत आणि तुम्हाला विश्‍वास ठेवावाच लागेल कारण ह्या त्यांच्या विश्‍वदौर्‍यात अंटार्क्टिका सहलीत मी सुधीर आणि नील त्यांच्यासोबत होतो तर साउथ अमेरिकेत सुनीला. ही व्यक्ती म्हणजे चालतंबोलतं पुस्तक आहे. आणखी तुम्हाला आश्‍चर्य वाटेल ऐकून की हे लातूरच्या एका शाळेतले शिक्षक आहेत म्हणजे होते. एक शिक्षक सप्तखंडाचा विश्‍चदौरा करू शकतो ही सत्यकथा आहे. आजकाल आपण ‘आज अभी इसी वक्त’ असं आयुष्य जगण्याकडे झुकतोय. सेविंग्जचे महत्व कमी झालंय पण आपल्याला ह्यांनी दाखवून दिलंय की जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही काहीही शक्य करू शकता. अर्थात त्याला व्यवस्थापनाची आणि ‘ऑर्गनाइज्ड वे ऑफ लाइफ’ जीवनशैलीची गरज आहे. कशी? तर बाबा भातंब्रेकरांना जगाचं पर्यटन करायची, सप्तखंड पादाक्रांत करायची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. शाळेचा पहिला पगार घ्यायच्या आधी त्यांनी ठरवलं की सेव्हिंग करायचं. साठ टक्के पगार घरासाठी, तीस टक्के पर्यटनासाठी आणि दहा टक्के औषधोपचारासाठी म्हणजे मेडिकल इमर्जन्सीसाठी. ठरवलं आणि त्यांनी ते आयुष्यभर पाळलं. ह्या साध्या वाटणार्‍या व्यवस्थापनावर त्यांनी त्यांची जगभ्रमंतीची, विश्‍चदौर्‍याची, सप्तखंड पादाक्रांत करायची इच्छा पुर्णत्वाला नेली. नुकतेच ते व्हिएतनाम कंबोडियाला जाऊन आले. त्यांना म्हटलं अजून काय बघायचं राहीलंय तर म्हणतात, ‘ही होती माझी शेवटची सहल’, मी म्हटलं, ‘असं कधी होणार आहे का? कोणतेतरी देश तुमचे बघायचे राहीले असतीलच नं, आणि तेच तर आमचं वीणा वर्ल्डचं इन्स्पिरेशन आहे.’ तर म्हणाले, ‘मला फिलिपिन्स बघायचंय, कोलंबियातला ‘एंजल फॉल बघायचाय,’ म्हटलं, ‘बघा बरं आत्ता बसल्या बसल्या तुम्ही आम्हाला काम दिलंत.’ असंच होत राहतं, जेव्हा जेव्हा सीनियर्स किंवा वुमन्स स्पेशलच्या सहलींवर पर्यटकांना मी भेटते तेव्हा अशाच वेगवेगळ्या सुचना ते करतात आणि आम्हाला क्लू मिळत जातो, आमच्या सहलींची संख्या वाढत राहते आणि विश्‍वदौरा करणार्‍या पर्यटकांना नवनवीन देश पादाक्रांत करायची इच्छा पूर्ण करता येते.

आता तर झी टि.व्हीच्या सहकार्याने वीणा वर्ल्डने घराघरात हास्याची कारंजी उडविणार्‍या, लाखो घरांना हसरं करणार्‍या ‘चला हवा येवू द्या’ टीमसोबत विश्‍वदौरा आखलाय. त्यातली पहिली दुबईवारी मस्त मजेत यशस्वी झाली. तेथे आलेल्या पंधराशे दुबई वासियांना हास्याच्या डोहात डुंबवतानाच वीणा वर्ल्डसोबत गेलेल्या पर्यटकांनाही डाँ. निलेश साबळे आणि टीमने स्पेशल मेजवानी दिली हास्याची आणि सुसंवादाची. आता ह्या विश्‍वदौर्‍यातला दुसरा दौरा पार पडतोय लंडन पॅरीसला. लंडनवासीय वाट बघताहेत चला हवा येऊ द्या टीमची, त्यांच्या लाइव्ह परफॉरमन्सची तिथल्या रॉक्सी थिएटरमध्ये. आणि वीणा वर्ल्डच्या पर्यटकांनाही ते भेटणार आहेत पॅरीसच्या थिएटरमध्ये. पुन्हा एकदा हास्याची, मनोरंजनाची आणि सुसंवादाची कारंजी उडणार आहेत पॅरीसमध्ये, एका उत्कृष्ट अशा पॅरिशियन थिएटरमध्ये.

तुमच्याकडे फ्रान्सचा किंवा शेंजेन व्हिसा असेल तर चलो, बॅग भरो, निकल पडो! पॅरीसला वीणा वर्ल्डसोबत. सहलीचा आनंद तर लुटाच पण आवडत्या कलाकारांना, डॉ. निलेश साबळेंच्या टीमलाही भेटा. धम्माल करा. आम्ही आहोतच तुमच्या दिमतीला युरोपमध्ये.

वीणा वर्ल्ड आणि ‘चला हवा येऊ द्या’ विश्‍वदौरा आता गती घेतोय. डिसेंबरमध्ये तो निघालाय जपानला. ऑटम कलर्ससोबत आगळावेगळा जपान बघण्याची संधी फक्त सव्वा लाखात चालून आलीय तेव्हा वेळ दवडू नका. शुभस्य शीघ्रम! ‘चला हवा येऊ द्या’ विश्‍वदौर्‍यातले पुढचे देश आहेत सिंगापूर, बाली, मॉरिशस, साउथ अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि मार्चमध्ये अमेरिका. सर्व सहलींच बुकिंग सुरू झालंय आणि व्हिसाची तयारीही. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी आजच संपर्क साधा तुमच्या वीणा वर्ल्ड ब्रांच ऑफिसशी, वीणा वर्ल्ड प्रिफर्ड सेल्स पार्टनरशी किंवा हे दोन्ही तुमच्या जवळपास नसतील तर डायरेक्ट वेबसाईटवर जा आणि ऑनलाइन बुकिंग करा. वीणा वर्ल्ड आता तुमच्यापासून अगदी एका क्लिकच्या अंतरावर आहे.

आणि हो तुम्ही मोजताय नं, ‘तुमचे किती देश झालेयत ते?’ आम्ही एक मॅप तयार केलाय ह्या देशांची संख्या मोजण्यासाठी तो तुमच्या मागच्या सहलीत तुम्हाला मिळाला असेलच, नसेल तर कळवा आम्हाला, आम्ही पाठवून देऊ. हा मॅप समोर लावून ठेवायचा आणि आपलं प्लॅनिंग करायचं विश्‍वदौर्‍याचं. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आयुष्याचं,

कुटुंबाचं, प्रगतीचं… अशी ध्येय ठरवावी लागतात आणि त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. तसंच हे पर्यटनाचं ध्येय,

जे माणसाला घडवतं, तेही आपल्या यादीत समाविष्ट करायचं. ‘वुई वाँट समथिंग टू लूक फॉरवर्ड टू!’ऑलवेज!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*