Language Marathi

नातवंडं म्हणजे काय…दुधावरची साय!

Reading Time: 4 minutes

मी एक फोटो पाहिला होता, ज्यात आजीला बघायला सगळी नातवंडं आलीयत, एका सोफ्यावर आजी बसलीय आणि समोर आठ दहा नातवंडं. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या आणि एकाग्रतेने त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये गुंगून गेलेल्या नातवंडांकडे आजी हतबल होऊन बघतेय. या फोटोतलं हे चित्र बदलायची जादू ह्या सहलीमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

“कुणाला फोन करताय ताई? मघापासून बघतेय तुम्ही फोनशी झगडताय, फोन लागत नाही म्हणून कासावीस झालाय? काही प्रॉब्लेम तर नाही नं?” अमेरिका सहलीवर लॉस एंजिलिसला सीनियर स्पेशल टूरचा इव्हेंट सुरू व्हायच्या आधी एका ताईंची धावपळ बघून मी प्रश्‍न केला. ‘अगं नाही ग, अमेरिका आणि भारताचं हे दिवसरात्रीचं चक्र जरा गोंधळवतंय, नातवाशी बोलायचं होतं, आम्हा दोघांशिवाय त्याचं पान हलत नाही. आता कसं सांभाळत असतील त्याला मुलगा सून देवजाणे. दोघही नोकरीला, तरी मी सांगत होते एवढ्या मोठ्या सहलीला आम्ही नाही जात म्हणून. तसं रोज फोन करतो आम्ही नातवाला मग बरं वाटतं, पण आज लागलाच नाही फोन.’ ओहो! हा आजीआजोबा-नातवाच्या प्रेमाचा मामला होता तर. ‘नातू म्हणजे काय, दुधावरची साय’ हे कै. श्री. मोहन वाघ यांच्या ‘प्रेमाच्या गावा जावे’ ह्या नाटकातलं वाक्य. तीसेक वर्ष झाली असतील पण अजूनही ते वाक्य तसंच्या तसं आठवतंय. आता ह्या आजींची नातवाबद्दलची कासावीस किंवा काळजी त्या प्रेमाचे हळूवार पदर उलगडून दाखवित होती. मागे एकदा थायलंडला आजोबा-आजी आणि नातवंडं अशा सहलीला आलेल्या आजी आजोबांसोबत ब्रेकफास्टच्या वेळी गप्पा मारीत होते. एका ताईंना विचारलं, “काय कसं काय चाललंय? नातवंडांना आईबाबांची आठवण तर येत नाहीये न?” ताईंची प्रतिक्रिया, ‘हँ, वेळ कुठे आहे त्यांच्या आईबाबांना, आमच्याशिवाय पान हलत नाही ह्या दोघांचं. सारखी चिकटलेली आम्हाला, एवढं की आई रात्री आली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.’ नातवंडं आईकडे न बघता आम्हाला जास्त चिकटतात ह्याचा नुसता आनंदच नव्हे तर अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आजी आजोबांचं घरातलं महत्व वाढविणारी नातवंडं म्हणजे घराघरातले लिटल एंजल्स जणू. पण होतं काय की प्रत्येक तरुण आईबापाना वाटतं की आजोबा-आजी नातवंडांना उगाचच लाडावतात, नको त्या सवयी लावतात. थोडक्यात हे तरुण आईबाप लहान असताना आजीआजोबांच्या प्रेमाचे आणि लाडाचे किती भुकेले होते, त्या लाडांची आणि प्र्रेमाची किती पाठराखण करायचे हे विसरून जातात. पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरूच आहे. आताच्या जमान्यात तर घरंच वेगवेगळी झालीयेत. प्रत्येकाची प्रायव्हसी ही काळाची गरज आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नातवंडांना सांभाळणारे, दिवसभर नातवंडांना सांभाळणारे, संध्याकाळी नातवंडांना सांभाळणारे, वीकेंड्सना नातवंडांना सांभाळणारे, शाळेतून घरी घेऊन येणारे असे आजी-आजोबांचे अनेक प्रकार बघायला मिळतात. काळाचा महिमा म्हणूया, पण तरीही आपल्या भारतात बर्‍यापैकी एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. खरंतर आपल्या भारतात मुलीला करियर करायचं असेल तर तिला साथ देणारी एकत्र कुटुंबपद्धती हे वरदान आहे. मध्ये छोट्या कुटुंबांची खूप वाढ झाली पण आता थोडा बदल होताना दिसतोय आणि बरीच कुटुंबं ‘आजी आजोबा नातवंडं’ अशी सुखाने नांदताना दिसतायत. एकमेकांची अडचण होण्याऐवजी एकमेकांची एकमेकांना गरज भासू लागलीय ही चांगली गोष्ट झालीय. पण जी मुलं-सुना, लेक-जावई कामानिमित्त दुसर्‍या शहरात राहताहेत, दुसर्‍या देशात स्थायिक झालीयेत तिथे काही इलाजच नाहीये. अशा परिस्थितीत पोळले जातात आजी आजोबाच. नातवंडांची भेट सहा महिन्याने, वर्षाने किंवा दोन वर्षांनी किंवा कधी कधी त्याहूनही जास्त. तोंड उघडून सांगितलं नाही तरी आपल्याला सर्वांना ते जाणवतंय. ‘नाइलाजको क्या इलाज?’

आता ही झाली एक सामाजिक समस्या. प्रत्येक व्यावसायिक त्याच्याशी या ना त्या कारणाने जोडलेला असतो. आम्ही ह्याला ‘व्हॉट्स फॉर मी’ म्हणतो. कोणतीही समस्या थोड्याफार प्रमाणात सोडविण्यासाठी व्यवसायाची मदत झाली पाहिजे. आजोबा-आजी आणि नातवंडं फक्त ह्यांचीच सहल करायची. आईबाबाना पूर्ण मज्जाव. ‘अहो हे करू नका, ते करू नका, असं कशाला करताय? त्यांना चॉकलेट का खायला दिलंत?’ ये झंझट मंगताच नही.  काय करायचं ते आजी-आजोबा आणि नातवंडं ठरवतील. सबकुछ लाड-प्यारवाला मामला. आजी-आजोबा आणि नातवंडांची भेट आम्ही घडवून आणतोय ती अशी सहलीच्या निमित्ताने.

दिवाळी हॉलिडेज्मध्ये ही सहल म्हणजे ‘ग्रँड पॅरेंट्स-ग्रँड चिल्ड्रन स्पेशल’ जाणार आहे दुबईला, ख्रिसमसमध्ये सिंगापूरला आणि ईस्टर हॉलिडेज्मध्ये स्वित्झर्लंडला. नव्वद टक्के आजी-आजोबा भारतात राहताहेत त्यामुळे आजी-आजोबा भारतातून, खासकरून मुंबईतून सहलीला निघतील आणि नातवंडं जिथे आहेत तिथून म्हणजे मग ती दिल्लीला असोत की डेन्मार्कला, सिडनीला किंवा सॅन फ्रान्सिस्कोला, जपानला किंवा जर्मनीला…ती तिथून आपल्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी सहलीला जॉईन होतील, त्याच्यासाठी स्पेशल जॉइनिंग लिव्हिंग टूर प्राइस असते. जस्ट इमॅजिन करा तो क्षण, जेव्हा एखादी नात किंवा नातू परदेशातून आजी-आजोबांसोबत सहल करायला आलेयत आणि एअरपोर्टला त्यांची भेट होतेय. पाच-सात दिवस फक्त ही मंडळी एकत्र राहणार आहेत, त्यांच्यासारख्याच अनेकांसोबत. एकमेकांना जाणून घेणार आहेत, धम्माल करणार आहेत. नातवंडं तर घरी परत गेल्यावर आपापल्या विश्‍वात रमून जातील पण आजी आजोबांना किती गोड आठवणी मिळतील, पुढचे किती महिने त्यांचे आनंदात जातील, ही आठवणींची साठवण करणं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यात रममाण होणं हेच तर आयुष्य आहे. चांगल्या आठवणी निर्माण करणं आपल्या हातात आहे, आणि आपण ते सतत करीत राहिलं पाहिजे. आणि जी आजीआजोबा आणि नातवंडं मंडळी भारतात वेगवेगळ्या शहरात राहतायत ती इथूनच एकत्र एकमेकांच्या सोबतीने निघतील. डेस्टिनेशन्सही आम्ही अशी निवडलीयत की दोन्ही वयोगटांना ती आवडतील. दुसरं म्हणजे ती इन्स्पायरिंग डेस्टिनेशन्स आहेत,

दुबई – मिडल ईस्टमधील हॉट स्पॉट ठरलेल्या दुबईमध्ये १०५३ फूट उंचीच्या, जहाजाच्या शिडाचा आकार असलेल्या ‘बुर्ज अल अरब’ ह्या अनोख्या हॉटेलसमोर उभं राहून काढलेला सेल्फी, प्रसिद्ध शेख झायेद रोडवरून घेतलेली ड्राइव्ह आणि जुमेराह बीचवरचा फेरफटका, दुबईतील सर्वात जुनी वास्तु असलेल्या दुबई म्युझियमची भेट, ‘द पाम’ह्या मानवनिर्मित बेटावरील पहिले रिसॉर्ट ‘द अ‍ॅटलांटिस’ ह्या आलिशान रिसॉर्टसमोर उभे राहून मिळालेली फोटो अपॉर्च्युनिटी, दुबईच्या डेझर्टमध्ये लँड क्रुझर्समधून रोमांचक डेझर्ट सफारी, विशाल दुबई मॉलला भेट देऊन जगप्रसिध्द ब्रँडची शॉपिंग, ३३००० हून अधिक सागरी प्राणी पाहायला मिळणारं भलं मोठं अ‍ॅक्वेरियम, २७२२ फूट उंचीच्या बुर्ज खलिफा टॉवरच्या १२४ व्या मजल्यावरून दिसणारा दुबईचा हवाई नजारा…अद्भुत आश्‍चर्यांच्या दुबईची सहल म्हणजे फुल्ल टू धम्मालच.

सिंगापूर- स्ट्रेस बस्टर ब्लॉक बस्टर सिंगापूरमध्ये आपण थक्कं होतो जगातल्या पहिल्या नॉक्टर्नल झू मधली नाइट सफारी आणि गार्डन्स बाय द बे मध्ये फुलवलेल्या फुलांचा आविष्कार पाहून,मरिना बे ऑब्झर्व्हेटरी डेकवरून दिसणारं सिंगापूरचं विहंगम दृश्य पाहून आपल्या  डोळ्यांचं  पारणं फिटलं नाही तर नवलंच.याच सहलीत मडॅम तुस्सॉड्ज वॅक्स म्युझियममध्ये सेलब्रिटींच्या स्टॅच्यूसोबत काढलेले सेल्फी तुमच्या मोबाईलची मेमरी फुल्ल करेल यात शंकाच नाही तर युनिव्हर्सल स्टुडिओजमधील अ‍ॅडव्हेंचर्रस राइड तुमच्या  सिंगापूर सहलीत थ्रील आणेल ह्याची गॅरंटी. सिंगापूर सिटी टूर आणि ज्युराँग बर्ड पार्कमधील बर्ड शोजही पाहताना आपण सहलीची वेगळीच रंगत अनुभवतो.

स्वित्झर्लंड – बर्फाच्छादित पर्वतांचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्वित्झर्लंडमध्ये पहिल्या वहिल्या रिव्हॉल्विंग गोंडोलामधून ‘रोटेअर टिटलीस’ मधून आपण चढाई करतो १०,६२३ फूट उंचीच्या माउंट टिटलीसवर. या बर्फाच्या राज्यात मज्जा केल्यानंतर आपण ल्युसर्न शहरातील लायन मॉन्युमेंट आणि काप्पेलब्रुक ब्रिज पहातो. लेक ल्युसर्न डिनर क्रुझमध्ये आपल्याला स्विस लोकसंगीताचा आस्वाद घेता येतो. चीजसाठी प्रसिद्ध असणार्‍या स्वीसमध्ये एंगेलबर्गमधल्या चीज फॅक्ट्रीची भेटही स्मरणात राहण्यासारखी. ह्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आश्‍चर्यांनी खचाखच भरलेली ही डेस्टिनेशन्स जाणार्‍या प्रत्येकाला आवडतातच. पण ह्या सहलीत त्याची गोडी अधिक वाढणार आहे कारण आजोबांच्या सोबतीला नातू असेल किंवा आजीच्या सोबतीला नात. माहोलच वेगळा होऊन जाणार आहे.

अच्छा आणि एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे आता ३१ जुलै आणि ११ ऑगस्टपर्यंत भरपूर डिस्काउंट सुरू आहे ह्या सहलीवर, त्याचा फायदा घ्या आणि पैसे वाचवा. सो चलो, बॅग भरो, निकल पडो!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*