गेले जायचे राहून…

0 comments
Reading Time: 8 minutes

वर्षानुवर्षाचा प्रवास सुरू असूनही खूप पर्यटनस्थळं, ठिकाणं, राज्य किंवा देश बघायचे राहून गेलेत. माझे, आमचे आणि तुमचेही. पूर्वी पर्यटनाचं एवढं काही नव्हतंच, युरोप अमेरिका झालं की पर्यटन संपत होतं. कारणं अनेक होती जगप्रदक्षिणा का झाली नाही ह्याची, पण आता परिस्थिती बदललीय. राज्याचा, देशाचा आणि परदेशाचा प्रवास सोपा झालाय, आटोक्यात आलाय आणि त्यामुळेच आवडायला लागलाय.

जग सुंदर आहे आणि त्याला प्रदक्षिणा घालायला एक आयुष्य अपूरं आहे. हे वेळेसारखं आहे. आयुष्यात इतकं काही करायचं असतं, पण त्याला वेळ अपूरा पडतो आणि मग ताळमेळ जमविण्यासाठी वेळेचं आणि कामांचं नियोजन करावं लागतं. त्या नियोजनातून जेवढं काही जास्तीत-जास्त करता येईल तेवढं करायचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो किंवा तो असायला हवा. वुमन्स स्पेशलमध्ये एकदा कोलंबोत भावनगरची गीता पताडिया म्हणाली, ‘माझ्या शंभर कंट्रीज करून द्या, मला शंभर देशांना भेट द्यायचीय’. हे श्रीलंकेत तिने मला सांगितलं,तेव्हापासून माझ्या डोक्यात ‘शंभर देश’ ही गोष्ट चपखल बसलीय आणि सारखं ती डोकं वर काढतेय. आमच्याकडे पन्नास देश बघितलेले बरेच टूर मॅनेजर्स आहेत. ह्या टूर मॅनेजर्सचा मॅनेजर विवेक कोचरेकर यावर्षी शंभर देश पूर्ण करेल, आणि त्याच्या शंभर देशांबरोबर आमचे बरेच पर्यटकही देशांचं अर्धशतक किंवा पंचाहत्तरी पूर्ण करतील. विवेकचं कौतुक यासाठी की, तो चाळीशीच्या आत त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर ही शंभर देशांची वारी पूर्ण करणार आहे. काही देशच करायचे राहीले असल्याने आम्हीही सर्व मिळून त्याच्या शंभरीची वाट बघतोय,त्यासाठी प्रयत्न करतोय.

आता विवेक एक चांगला टूर मॅनेजर आहे. आपल्या प्रोफेशनचं महत्त्व त्याने जाणलं आणि खडा परफॉर्मन्स देऊन प्रत्येक सहलीवर पर्यटकांना शंभर टक्क्यांहून जास्त आनंद देत, मिळालेल्या संधीचं सोनं केलं किंवा करतोय.  सततचा प्रवास करूनही, दर पंधरा दिवसांनी भटकंती सुरू असूनही माझे मात्र अजूनही शंभर देश झाले नाहीत कारण मला सतत त्याच-त्याच ठिकाणी जावं लागतं. आता मलाही विवेकच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी माझे शंभर देश पूर्ण करण्याचं नियोजन करावं लागणार, नव्हे मी ते आवर्जून करणारच. हीच गोष्ट आमच्या अनेक पर्यटकांची आहे,कुणाचे साठ देश झालेयत तर कुणाचे सत्तर. आमच्या पर्यटकांचे शंभर देश पूर्ण करण्यासाठी आम्हालाही नियोजनबद्ध कार्यक्रम पर्यटकांसमोर ठेवला पाहिजे. त्याविषयी मी पुढच्या रविवारी लिहिणारच आहे. त्याचीच तयारी म्हणून आजच्या लेखाचं प्रयोजन.

वर्षानुवर्षाचा प्रवास सुरू असूनही खूप पर्यटनस्थळं, ठिकाणं, राज्य किंवा देश बघायचे राहून गेलेत. माझे, आमचे आणि तुमचेही. पूर्वी पर्यटनाचं एवढं काही नव्हतंच, युरोप अमेरिका झालं की पर्यटन संपत होतं. कनेक्टिविटी मग ती एअरलाईन्सची असो की रोडवेजची… ती व्यवस्था अपुरी होती, हॉटेल्स कमी होती, बर्‍याच देशांचे व्हिसा मिळवणं अतिशय अवघड गोष्ट होती. अनेक देशांना पर्यटनाचं महत्त्व कळलं नव्हतं. ती एक प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे हे खूप उशिरा लक्षात आलं किंवा काहींच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. कारणं अनेक होती जगप्रदक्षिणा का झाली नाही ह्याची, पण आता परिस्थिती बदललीय. राज्याचा, देशाचा आणि परदेशाचा प्रवास सोपा झालाय, आटोक्यात आलाय आणि त्यामुळेच आवडायला लागलाय.

आता सध्या आमच्या किंवा ज्येष्ठ मंडळींच्या पिढीचं असं झालंय की, पूर्वी एवढा नियोजनबद्ध प्रवास करता न आल्यामुळे छोटं-छोटं, मधलं-मधलं असं बरंच काही बघायचं राहून गेलंय. म्हणजे बघानं, कुणाचं श्रीलंका झालंय तर मालदीव बघायचं राहीलंय. शिमला मनाली झालंय तर डलहौसी धरमशाला राहून गेलंय. कुणी लंडन बघितलंय पण स्कॉटलंड बघायची इच्छा मनात घर करुन राहीलीय. कुणाचं अमृतसर राहीलंय तर कुणाचं जगन्नाथ पुरी, कुणी अजून गुजरात बघितलं नाही तर कुणी जपान. इच्छा प्रचंड आहेत, त्यांना अंत नाही, पण त्या इच्छापूर्तीसाठी एक पर्यटनसंस्था म्हणून पर्याय निर्माण करणं हे आमचं कर्तव्य आहे.

एखादी गोष्ट मनापासून करायची म्हटली तर मार्ग मिळतो तसं काहीसं मागच्या महिन्यात झालं. ‘गो एअरवेज’ मालदीव आणि फुकेतसाठी डायरेक्ट फ्लाइट्स घेऊन आली. आत्तापर्यंत ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला व्हाया फ्लाइटने जावं लागायचं. ही दोन्ही ठिकाणं आमच्या बर्‍याच पर्यटकांची बघायची राहीलीयेत. गो एअरवेजचं फ्लाइट ही चांगलीच संधी साधून आलीय त्यासाठी. त्यामुळे आम्ही फुकेतची तीन रात्री-चार दिवसांची आणि मालदीवची दोन रात्रींची अशी ग्रुप टूर जानेवारीनंतर जाहीर केलीय. तसंच, कस्टमाईज्ड हॉलिडे पॅकेजेस किंवा आमच्या माईस टीमद्वारे कॉर्पोरेट टूर्सही प्लॅन करता येतील. तुम्हाला जसं हवं तसं, म्हणजे मग ती टूर मॅनेजरच्या दिमतीतली ग्रुप टूर असो,किंवा मग कुणाला वाटत असेल ‘आम्हाला आमच्या हॉलिडेवर कोणतही बंधन नको-दुसर्‍या कोणाची साथसंगत नको’ अशांसाठी कस्टमाईज्ड हॉलिडे पॅकेज असो किंवा ‘स्वत:च्या संस्थेसाठी- तेथील सहकार्‍यांसाठी प्लॅन केलेली इन्सेंटिव्ह टूर’ असो,ती त्या तर्‍हेने प्लॅन करून देणं आम्हाला भाग आहे आणि ते आम्ही अगदी आनंदाने करतोय. मालदीव देशाची वारी ह्या गो एअरवेजच्या डायरेक्ट फ्लाइटमुळे पूर्ण होणार आहे आणि तीच गोष्ट फुकेतचीही. तिथलं ‘जेम्स बाँड आयलंड आता आलं आपल्या आवाक्यात’, असं म्हणायला हरकत नाही.

लंडनला पूर्वी एअर इंडियाचं एक फ्लाइट असायचं दिवसातून एकदा. आज मुंबईहून लंडनला जाण्यासाठी डायरेक्ट ६ तर व्हाया जवळ-जवळ ५५ पर्याय आहेत तर भारतातून लंडनला जाण्यासाठी दररोज १००हून अधिक पर्याय आहेत. प्रवास आणि पर्यटन किती वाढलंय त्याचं हे जितंजागतं उदाहरण. अशातर्‍हेची कनेक्टिविटी, तंत्रज्ञानामुळे आलेल्या सोयी-सुविधा आणि इंटरनेटमुळे उपलब्ध झालेलं ज्ञान ह्या सर्वांचा विचार केला तर आपण एखाद्या सुवर्णयुगात राहतोय म्हणायला हरकत नाही. म्हणजे ह्यापेक्षा ‘सौभाग्य किंवा सुलभता’ काय असू शकते? आणि आपण ह्या सर्वांचा उपयोग जर विधायक गोष्टींसाठी केला आपापल्या क्षेत्रात, तर आयुष्य आणखी सुखकर आणि आनंदी निश्‍चितच बनू शकतं. असो. माझा विषय आहे कनेक्टिविटीचा आणि त्यामुळे आमच्या पर्यटकांच्या इच्छा लवकरात लवकर कशा पूर्ण करता येतील त्याचा.

आम्ही जनरली एक किंवा दीड वर्षाचा कार्यक्रम आमच्या पर्यटकांपुढे मांडतो. इच्छा एकच असते की,पर्यटकांना त्यांच्या सप्तखंडातील जगप्रदक्षिणेचं प्लॅनिंग करता यावं. हे प्लॅनिंग किंवा नियोजन फक्त सहलीचं नसतं तर त्यासाठी पैशाचं आणि वेळेचंही नियोजन करावं लागतं. आणि ते करावं. अगदी आज सप्तखंडांच्या भ्रमंतीचं स्वप्न हे दुरापास्त वा अशक्यप्राय वाटलं तरी ते करावं. कारण पहिल्यांदा इच्छा उत्पन्न व्हावी लागते, मग प्रयत्न सुरू होतात. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनूजा चातुर्य येतसे फार’ हे शतश: खरं आहे, हे आम्ही आणि आमच्यासारख्या असंख्य पर्यटकांनी अनुभवलंय. लातूरच्या एका शिक्षकांचा श्री. बाबा भातंब्रेकरांचा उल्लेख मी अनेकदा केलाय, कारण एक शिक्षक असून नियोजनाने त्यांनी जगप्रदक्षिणा-सप्तखंडांची वारी पूर्ण केलीय. एव्हरीथिंग डीपेंन्डस् ऑन व्हॉट यू विश फॉर! चला आपल्यात इच्छा तर निर्माण करूया.

युरोपचं स्वप्न पूर्ण करण्याची बिशाद पूर्वी फक्त काही जणांचीच असायची. कारण आमच्याकडेही युरोपसाठी पंधरा- वीस दिवसांचे एक दोनच सहल कार्यक्रम असायचे, नॅचरली त्यांची किंमतही जास्त असायची. पण युरोप अद्वितीय आहे, ते आपल्या जास्तीत जास्त पर्यटकांनी बघितलं पाहिजे, म्हणून आम्ही युरोपसाठी ‘पाच दिवसात पाच देश’ पासून ते तब्बल एकोणतीस दिवसांपर्यतचे, तर अगदी ‘एक लाखापासून पाच लाखांपर्यंत’ असे पंचाहत्तर वेगवेगळे पर्याय आमच्या पर्यटकांसाठी निर्माण केले. त्यातही आम्ही शक्यतोवर रीपीटेशन होणार नाही ह्याचीही काळजी घेतली. तसंच, आमच्या ज्या पर्यटकांना पंचवीस देश, पन्नास देश, शंभर देश करायचेत त्यांना व्यवस्थित नियोजन करून एकापाठोपाठ एक युरोपमधले अप्रतिम असे बरेचसे देश बघता येतील अशी सोयही केली आहे. युरोप मी वर म्हटलं तसं आता एकदाच जायचा खंड नव्हे, तर पर्यटक सध्या किमान पाच ते सहा वेळा युरोपला जातात. छोटा खंड, पण टूरिझमने क्रांती घडवली ह्या छोट्या खंडातल्या प्रत्येक देशात. आता बघानं, युरोपला जाणारा पर्यटक पहिल्यांदा इंग्लंड फ्रान्स इटली स्वित्झर्लंड अशा वेस्टर्न युरोपमधल्या सर्वांच्या आवडत्या देशांची मल्टिकंट्री युरोप टूर करतात. त्यानंतर दुसरी युरोपवारी स्कॅन्डिनेव्हियाकडे होते. त्यानंतर सध्या ईस्टर्न युरोपमधल्या क्रोएशिया स्लोव्हेनिया स्लोव्हाकिया पोलंड ह्या देशांनी बाजी मारलीय. चौथा क्रमांक लागतो तो स्पेन पोर्तुगाल मोरोक्कोचा. त्यानंतर पर्यटक कूच करतात ते साहेबी थाटातल्या इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड टूरवर. त्यानंतर नंबर लागतो ग्रीस इजिप्त टर्की ह्या देशांचा. त्यातही काही पर्यटक असे असतात की त्यांना एकावेळी एक देश किंवा एकावेळी फक्त दोन किंवा तीन देशांची कॉम्बिनेशन्सच आवडतात. जी गोष्ट युरोपची तीच अमेरिकेची, आशिया खंडाची वा सप्तखंडांची. अमृतसरसाठी जशी चार दिवसांची सहल आणून आम्ही अमृतसर अजूनपर्यंत न पाहिलेल्या पर्यटकांची सोय केली, तशीच सहा दिवसांची जपानची टूर आणून जपान बघण्याची फार दिवसांची पर्यटकांची इच्छा पूर्ण करून टाकली. ‘जपान म्हणजे वीणा वर्ल्ड’ हे भारतीय पर्यटनक्षेत्रात समीकरण बनून गेलं. ‘काहीही बघायचं राहून गेलं’ ही सल आमच्या पर्यटकांच्या मनात राहू नये, ह्यासाठी आम्ही चंग बांधलाय. पर्यटकांकडून आम्हाला त्यांच्या पर्यटन नियोजनाची इच्छा आहे. लेट्स लूक फॉरवर्ड टू टेकिंग ऑन द वर्ल्ड!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*