IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

क्लीओपात्रास् बाथ

8 mins. read

त्या फाईन डाईन रेस्टॉरन्टमध्ये कदाचित चूळ भरणे योग्य वाटत नसावे म्हणून ही आपल्याला ह्या नजरेने बघत आहे का असा माझ्या मनातला प्रश् ओळखून तिने मला, ‘व्हॉट आर यू डुइंग?’ असा प्रश् केला. चूळ भरण्याला पटकन इंग्रजीत काय म्हणतात हे मला काही केल्या आठवेना. त्यामुळे तिच्या त्या प्रश्नावर मी पटकन प्रत्युत्तर केलं की, ‘‘जेे माझ्या आईने प्रत्येक जेवणानंतर करायला शिकवले आहे तेच करून आजसुद्दा माझ्या आईची आज्ञा पाळतेय मी’’.

 

एएका बिझनेस ट्रिपवर लंडनमध्ये प्रवास करीत असताना तिथल्या अगदी पॉश रेस्टॉरन्टमध्ये आमचे बिझनेस डिनर सुरू होते. डिनरनंतर तिथल्या रेस्टॉरन्टच्या बाथरूममध्ये अगदी अनावधनाने मी हात धुऊन चूळ भरत होते. जेवल्यानंतर चूळ भरणे ही आपली लहानपणापासून लागलेली सवय कशी बरं थांबणार. त्यात चायनीज जेवणानंतर तर चूळ भरल्याशिवाय चैन पडतच नाही. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की, आमची युरोपियन बिझनेस पार्टनर माझ्याकडे कुतूहलाने आणि कदाचित थोड्याशा तिरस्काराने बघत होती. त्या फाईन डाईन रेस्टॉरन्टमध्ये कदाचित चूळ भरणे योग्य वाटत नसावे म्हणून ही आपल्याला ह्या नजरेने बघत आहे का असा माझ्या मनातला प्रश्‍न ओळखून तिने मला, ‘व्हॉट आर यू डुइंग?’ असा प्रश्‍न केला. चूळ भरण्याला पटकन इंग्रजीत काय म्हणतात हे मला काही केल्या आठवेना. त्यामुळे तिच्या त्या प्रश्‍नावर मी पटकन प्रत्युत्तर केलं की, ‘‘जेे माझ्या आईने प्रत्येक जेवणानंतर करायला शिकवले आहे तेच करून आजसुद्दा माझ्या आईची आज्ञा पाळतेय मी’’. ती केवळ आमची बिझनेस पार्टनर नसून चांगली मैत्रिणही असल्याने आम्ही दोघीही माझ्या ह्या उत्तरावर खळखळून हसलो. त्यानंतरच्या तिच्या पुढच्या प्रश्‍नाने मला भारतीय असण्याचा आनंद आणि अभिमान वाटला. पण ‘तू हे हाताने कशी करू शकते? चूळ भरायला तुला ग्लासची गरज नाही का लागत?’. ह्या युरोपियन, अमेरिकन व इतर देशांच्या बहुतेक परदेशी लोकांना हातांची आेंजळ करून त्यात पाणी घेऊन साधी चूळ भरता येत नाही याचा शोध मला तेव्हा लागला. पण म्हणूनच हॉटेलच्या बाथरूममध्ये ग्लासेस ठेवलेले असतात हे तिचे स्पष्टीकरण ऐकून गम्मतही वाटली. हॉटेलच्या बाथरूममधील ग्लासेस हे आपला टूथब्रश, टूथपेस्ट व इतर सामान ठेवण्यासाठीच असतात असा माझा समज होता. त्यानंतर पुढची दहा मिनिटे नक्की आेंजळ कशी करावी व ओरल हायजीन ठेवण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर चूळ का भरावी अशी तिची शिकवणी घेण्यात माझा वेळ गेला. पण खरंच, बाथरूममधल्या त्या ग्लासचा उपयोग चूळ भरण्यासाठी केला जातो हा विचारच कधी मला सुचला नव्हता. तिथे दोन ग्लासेस ठेवलेले असतात कारण बहुतेक वेळी रूम्स ह्या ट्वीन शेअरिंगवर असतात. त्यात जर आपण इतर कोणाबरोबर रूम शेअर करीत असलो तर आपला ग्लास आपल्या वापरासाठी असणे कधीही उत्तम ठरते.  काही फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये तर ‘हिस् अ‍ॅन्ड हर्स’ असे दोन वेगळे वॉशबेसिनसुद्दा असतात. ‘मला माझ्या नवर्‍याचा वॉशबेसिन वापरायला बिलकूल आवडत नाही. तो फार पाणी उडवतो त्यामुळे हॉटेलसुद्दा दोन वॉशबेसिनवालीच आम्ही निवडतो’, असे मी काही अमेरिकन बायकांकडून ऐकले होते. ही एक वेगळ्याच प्रकारची लक्झुरी आहे. काही हॉटेल्समध्ये ह्या ग्लासेस्जवळ चूळ भरण्यासाठी मिनरल वॉटरची बाटलीसुद्दा ठेवलेली असते. तसे बहुतेक युरोपभर टॅप वॉटर हे पिण्यासाठी योग्य असल्याने अगदी बाथरूमचा नळ उघडून आपल्या वॉटरबॅगमध्ये पिण्याचे पाणी भरायला काहीच हरकत नसते.  अगदी मनाची खात्री करण्यासाठी हॉटेल रूममधल्या केटलमध्ये रात्री झोपण्याआधी टॅप वॉटर गरम करून ठेवण्याची सवय मी स्वतःला लावली आहे.

हॉटेल बाथरूममध्ये अशा बर्‍याच अनोख्या गोष्टी असतात. इंग्लंडच्या बर्‍याच हेरिटेज हॉटेल्स्मध्ये, अगदी सुपर लक्झुरियस हॉटेल्स्मध्येसुद्धा काहीवेळा माझा बाथरूममध्ये चक्क संताप होतो आणि तेसुद्दा हात धुताना. ह्या हॉटेल्स्मध्ये आजसुद्दा जुन्या परंपरा जिवंत आहेत, ह्या वॉशबेसिनच्या नळामध्ये. गरम पाण्याचा वेगळा नळ आणि थंड पाण्याचा वेगळा नळ बघितला की, आधी थंड मग गरम पाणी आपल्या हाताच्या आेंजळीत मिक्स करण्यात माझी तारांबळ उडते. अशावेळी तो वॉशबेसिनवर ठेवलेला ग्लास फार उपयोगी पडतो. सगळीकडे आज टॅप मिक्सर्स आले आहेत पण ग्रेट ब्रिटनची ही काही हॉटेल्स् आजसुद्दा परंपरेला धरून आहेत ह्याची गम्मत वाटते.

आपल्या सवयींप्रमाणे आपण अनेक गोष्टी अगदी गृहित धरलेल्या असतात आणि त्यातलीच एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जेट स्प्रे’. टॉयलेटच्या कमोड शेजारचा हा ‘जेट स्प्रे’ बहुतेक आशिया खंडात बघायला मिळतो पण अजून युरोपमध्ये मात्र ह्या ‘जेट स्प्रे’ने एन्ट्री केली नाही. पण इटली आणि  फ्रान्सच्या काही भागात अर्थात मेडिटरेनियन देशांत मात्र कमोडशेजारी दुसरे एक छोटेसे कमोड दिसते, त्याला ‘बिडेट’ म्हणतात. सतराव्या शतकापासून वापरात असलेले हे ‘बिडेट’ प्रातर्विधीनंतर आवश्यक असणार्‍या शारिरीक स्वच्छतेसाठी वापरले जाते. पूर्वी केवळ राजमहालात वापरला जाणारा हा बिडेट बदलत्या काळानुसार सर्वसामान्य जनतेच्या घरीसुद्दा दिसू लागला. साधारण इ.स १९०० च्या जवळपास बिडेटला बेडरूममधून काढून बाथरूममध्ये जागा मिळाली. पुढच्या युरोप ट्रिपवर या शाही बिडेटचा वापर नक्कीच करून पहा. युरोपमधील हे बिडेट आवडले नाही तरी जपानचे टॉयलेट मात्र प्रत्येकाला आवडतात. कारण तिथे अगदी विमातळावरील बाथरूममध्ये कमोडसीटचे टेम्परेचर थंड-गरम करण्याची सोय आणि विविध जेट स्प्रेचे अनेक पर्याय आहेत व ते दर्शवण्यासाठी वेगवेगळया चित्रांचा वापर केलेला असतो. ‘एखाद्या लहान मुलाच्या हातात नवीन खेळणे पडावे’, असा काहीसा अनुभव जपानच्या टॉयलेटमध्ये येतो.

गेल्या महिन्यातच आमच्या माईस टीमला एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागलं. बहुतेक इन्सेंटीव्ह टूर्ससारखाच हा संपूर्ण ग्रुपसुद्दा ट्विन शेअरिंगवर होता. म्हणजे आपल्या ऑफिसच्या सहकर्मचार्‍याबरोबर आपण रूम शेअर करायची असते. त्या कॉर्पोरेट कंपनीला जे हॉटेल आवडले ते हॉटेल सुंदर होते, पण त्या हॉटेलच्या रूममधील बाथरुमच्या दरवाज्याला कुठल्याच प्रकारचे लॉक किंवा कडी नव्हती. ‘बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून आंघोळ कशी बरं करायची?’. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अपघात होऊ नये म्हणून बहुतेक क्रुझेसवर किंवा हॉटेलच्या फिजिकली चॅलेंज्ड किंवा विकलांंग लोकांच्या खास रूम्सना  लॉक नसते. पण कुठल्याच रूममधल्या बाथरूमच्या दरवाजाला लॉक नसेल तर रूम शेअर करताना बाथरूम सिंगर बनून गाणे गात राहणे हा एकच उपाय. मॉडर्न युरोपियन डिझाईनमध्ये अनेक बाथरूम्सना लॉक नसते व बर्‍याच लोकांना अशाच रूम्स पसंत आहेत असे त्या हॉटेल मॅनेजरकडून कळले. लॉक काय अनेक हॉटेल्सच्या बाथरूम्सना भिंतीऐवजी ग्लास लावलेली असते, असंही त्याने सांगितलं. पण ते ऐकून आमच्या चेहर्‍यावरचं प्रश्‍नचिन्ह पाहून हॉटेल मॅनेजरने खुलासा केला की, ‘रूममधून बाथरूममधला नजारा पाहण्यासाठी नव्हे तर बाथरूममधून रूममधला टी.व्ही किंवा बाहेरचे निसर्गसौंदर्य पाहता यावे, ही त्यामागची कल्पना’. अशा बाथरूममध्ये पडदे किंवा ब्लाइंड्स ओढून आपण आपली प्रायव्हसी सांभाळू शकतो.

पण काही ठिकाणी तर बाथरूम्स हे आपल्या रूमच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात दिसतात. अगदी आपल्या केरळातसुद्दा अनेक लक्झरी हॉटेल्समध्ये बाथरूम हे ‘ओपन-एअर’ असते. तर केनियामधल्या ‘एलसा कोपये’ ह्या लक्झरी कॅम्पमधले कॉटेज हे दगडात कोरलेले असून इथल्या आऊटडोअर बाथटबमधून आपण जंगलात फिरणारे प्राणी पाहू शकता. ‘आंघोळ करताना निसर्गाचा आनंद पुरेपूर लुटता यावा’, ही ह्यांची कल्पना. असेच  एक ‘ओपन टू स्काय’ बाथरूम दिसते ते मालदिवच्या कान्दोल्हू रीसॉर्टच्या ओशन पूल व्हिलास्मध्ये. हे बाथरूम्स या रूमच्या आऊटडोअर डेकवर बांधलेले असल्याने अगदी एक मिनिटसुद्दा आपला पॅनोरॅमिक ओशन व्ह्यु आपल्या नजरेआड होणार नाही.  तसंच आंघोळ करताना समुद्र बघायची हौस असेल तर सेलिब्रिटी रीफ्लेक्शन या लक्झुरी क्रुझ शिपवरच्या रिफ्लेक्शन स्वीटमध्ये वास्तव्य करा. दोन बेडरूमच्या ह्या स्वीटचे बाथरूम शिपच्याबाहेर तरंगतेय असे वाटते. संपूर्ण ‘फ्लोर टू सीलींग’ ग्लास असल्याने आपल्याला इथून अतिशय सुंदर नजारा दिसत राहतो. खरंच, अशा बाथरूममधून बाहेर पडणे कठीणच ठरते. अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये राहिलो तर बहुधा स्थलदर्शनासाठी आपण कधीच वेळेवर तयार होणार नाही. पण बाथरूममधूनच स्थलदर्शन होत असेल तर बाहेर पडायची गरज तरी काय आहे. दुबईच्या ‘अटलँटिस द पाम’ रीसॉर्टच्या अंडरवॉटर स्वीटमधल्या बाथटबमध्ये आराम करताना सभोवतीच्या अ‍ॅम्बासेडर लगूनमधील ६५,०००हून अधिक मरीन अ‍ॅनिमल्स आपण बघू शकतो. दिवसभर स्थलदर्शन करून दमून-भागून थकलेलो जेव्हा आपण रूमवर परततो तेव्हा रीलॅक्सिंग टबबाथ घेऊन आपण ताजेतवाने होतो ह्यात वाद नाही आणि आपल्या बाथरूममध्ये जर मानसून रेन शॉवर व एक भला मोठा मेटलचा टब, त्यावर छतावर चमचम करणारा शँडेलीयर आणि आरसा लागलेला असेल तर केवळ आंघोळ करूनच आपण दमून जाऊ. सिंगापूरच्या ‘ W ’ रीसॉर्टमधल्या एक्सट्रीम वॉव स्वीटच्या बाथरूममध्ये सोफासुद्दा ठेवलेला आहे, त्यामुळे इथे दमलो तरी बाथरूममध्येच आपण निवांत झोप घेऊ शकतो तर बर्मिंगहमच्या मालमेसन हॉटेलच्या निर्वाणा स्वीटमधील बाथरुममध्ये जॅकुझी बाथटबमुळे आपण डिस्कोची मजा घेऊ शकतो.

आपल्या सौंदर्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी ओळखली जाणारी राणी म्हणजे ‘इजिप्तची राणी क्लीओपात्रा’. असे म्हणतात की, क्लीओपात्रास्चे अनेक बाथ विधीवत होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विधी ती आंघोळ करताना वापरायची. त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गाढवाचे दूधसुद्दा वापरले जायचे. हिमालयातल्या ‘आनंदा स्पा’मध्ये माझ्या बाथटबवरचा बाथ मेन्यू व त्यातल्या अनेक प्रकारच्या बाथ्स्ची लिस्ट बघून मला माझा ‘क्लीओपात्रास् बाथ’ मिळाल्याचा आनंद झाला. आपल्या हॉलिडेवर आपण कुठल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेल रूमच्या सुविधा काय आहेत, तिथले बाथरूम कसे आहेत ह्याकडे आज आपले लक्ष ओढले जाते, मग ते हनिमून असो किंवा बिझनेस टॅ्रव्हल.  दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण बाथरुमचे दार बंद करून जगापासून जेव्हा दूर होतो आणि अशाप्रकारचा आल्हाददायी अनुभव देणारा बाथ घेतो, तेव्हा तो आपल्याला हॉलिडेमध्ये हॉलिडे घेतल्याचा आनंद देऊन जातो.

 

September 03, 2018

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top