Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

भारत जोडो!

9 mins. read

विदेशात पर्यटन करणार्‍या भारतीयांवर तेथील सुखसोयींचा आणि चकचकाटाचा प्रचंड पगडा आहे आणि त्याचवेळी भारतात फिरण्याविषयी एकप्रकारची उदासिनता, त्याचं उच्चाटन करता आलं पाहिजे. भारत माझा देश आहे आणि माझ्या भारतावर माझे प्रमे आहे ही प्रतिज्ञा आठवून जरी कितीही अडचणी असल्या तरी माझं भारतभम्रण थांबवणार नाही हे प्रत्येकाने स्वत:च स्वत:वर बिबंवून घेतलं पाहिजे.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची सुरुवात फार छान झाली. दिवाळी पहाट असावी असं वाटत होतं. झेंडावंदनाला जायचं होतं आणि त्याआधी लाल किल्ल्यावरून होणारं पंतप्रधानांचं भाषण ऐकायचं होतं. काश्मीर लेहलडाखच्या प्रश्‍नाची नीरगाठ सोडवून सरकारने सतत धुमसत असलेला एक प्रॉब्लेम वेगळ्या मार्गाने सोडविण्यासाठी आगळं पाऊल टाकलं होतं. सोल्युशन बदललं होतं त्यामुळे जनमानसात आणि वातावरणात सर्वत्रच एक आशावादी उत्साह संचारला होता. अर्थात भारताच्या मुकूटमण्यात वर्षानुवर्ष अडकून पडलेला हा प्रश्‍न सोडविण्यासाठीचं पहिलं दमदार पाऊल टाकलं असलं तरी महागाई, रोगराई, आर्थिक मंदी, अस्वच्छता, नोकर्‍या, नैसर्गिक आपत्त्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा अनेक प्रश्‍नांचं मोठ्ठं प्रश्‍चचिन्ह प्रत्येक भारतीयाच्या मनातील कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यात एका अदृश भीतीच्या स्वरुपात ठाण मांडून बसलंय ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे आपले माननीय पंतप्रधान आपल्या भाषणात आज काय जादूची कांडी फिरवतायत ह्याकडे भारतीयांचे डोळे आणि कान निश्‍चितपणे लागले होते. तयारी करून आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसलो आणि मन भूतकाळात गेलं जेव्हा रेडीओचा जमाना होता आणि राजकीय नेत्यांच्या भाषणाला - त्यांचे विचार ऐकायला ऑल इंडिया रेडिओसमोर संपूर्ण घरच्या घर किंवा गावं आसूसलेल्या कानांनी समोर बसायची. आम्ही गावी असताना अनेक नेत्यांची भाषणं अशी रेडिओवर ऐकलीयत. ते सोनेरी दिवस परत आल्यासारखं वाटलं, आणि आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या दमदार शैलीत देशाच्या बहुतेक सर्व प्रश्‍नांना हात घातला. त्यादिवशी टीव्हीसमोर बसलेल्या प्रत्येक भारतीयाला ते भाषण त्याच्यासाठीच केलंय असं वाटलं इतकं ते भाषण सर्वसमावेशक आणि समर्पक होतं. आता भाषणाला कार्याची जोड मिळायला हवी तरच प्रत्येक वर्षीच्या पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणासाठी आपण असे एकचित्त होऊन टीव्हीसमोर बसू हे आलंच. पण एक महत्त्वाची गोष्ट ह्या भाषणात होती ती म्हणजे ह्या भाषणाने मरगळलेल्या मनांना उत्साही करण्याबरोबरच कोणतीही गोष्ट किंवा प्रश्‍न धसाला लावायचा असेल तर ते एकट्या सरकारचं काम नाही, त्यात प्रत्येक भारतीयाचा सहभाग असला पाहिजे, सरकार सरकारचं काम करेल तुम्ही तुमचा वाटा उचला किंवा उचललाच पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितलं.

कोणतंही अभ्यासपूर्ण भाषण हे विचारप्रवर्तक असतं आणि तसं ते होतं पण त्यासोबत पंतप्रधानांनी आपल्या सर्वांनाच कामाला लावलं होतं. थोडक्यात त्यांनी आपल्याला प्रोजेक्ट दिला जो आपल्याला पूर्ण करायचाय, अर्थातच सरकारच्या साथीने. प्रत्येक व्यक्ती वा व्यावसायिक हा ते सगळं जाऊ दे हो, माझ्यासाठी काय ते बोला, व्हॉट्स फॉर मी? च्या शोधात असतो. आम्हीही त्याला कसे अपवाद असणार? भाषण संपत आलं तरी टूरिझमवर काहीच कसं अजून येत नाही ह्याने आम्ही थोडे प्रश्‍नात पडलो होतो आणि तेवढ्यात माननीय पंतप्रधानांनी मास्टरस्ट्रोक मारलाच. मोबाईलवर स्माईली-इमोजी धडकायला लागले. दादरचे आमचे एक पर्यटक श्री. समीर भगत ह्यांनी लागलीच ईमेल पाठवला, आत्ताच पंतप्रधानांनी टूरिझमविषयी खूप चांगले विचार मांडलेत, वीणा वर्ल्डने त्यावर काम केलं पाहिजे. तुम्ही पूर्वी एक योजना आणली होती अशीच काहीशी ते आठवतंय. ऑल द बेस्ट अरे वा! एकंदरीतच बहुतेक वीणा वर्ल्ड टीम मेंबर्स पंतप्रधानांचं भाषण ऐकत होते तर, आणि आमच्या टीमप्रमाणेच आमची पर्यटक मंडळीही टूरिझमसाठी काय ह्याकडे कान लावून बसली होती. समोर कितीही अडचणी असल्या तरी त्याने उदास न होता आपल्याला जे काही करता येण्यासारखं असेल ते प्रयत्नपूर्वक-मन:पूर्वक करीत राहण्यासाठी योगदान देता आलं पाहिजे असंच काहीसं झालं. आमच्यासाठी- टूरिझम इंडस्ट्रीसाठी माननीय पंतप्रधानांनी विचार दिला होता जो त्यांच्या अभ्यासातून आणि निरिक्षणातून आला होता. काही दिवसांपूर्वी संख्याशास्त्रातली एक आकडेवारी जाहीर झाली ती सांगतेय, गतवर्षात अडीच कोटी इतक्या भारतीयांनी विदेश भ्रमण केलं आणि साधारणपणे 25 हजार कोटी युएस डॉलर्स इतके रुपये खर्च केले. म्हणजेच पावणे दोन लाख कोटी भारतीय रुपये!!! म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांपैकी फक्त अडीच कोटी भारतीय जेव्हा विदेशी पर्यटनाला निघतात तेव्हा एवढ्या प्रचंड रकमेची उलाढाल होते. सरासरी एक भारतीय पर्यटक विदेशवारीवर साधारणपणे सत्तर हजार इतके रुपये खर्च करतोय, परदेश प्रवासासाठी पासपोर्ट- व्हिसा-महागडं विमानाचं भाडं-फॉरिन एक्चेंज- कस्टम्स अशा अनेक किचकट गोष्टींची पूर्तता करावी लागते. आपल्या भारतात फिरायचं असेल तर ह्याची काहीच गरज लागत नाही. अक्षरश: चलो बॅग भरो निकल पडोची परिस्थिती. मग जो परदेशी जाणारा पर्यटक आहे त्याने परदेशी जरूर जावं पण आपल्या भारताचीही पूर्ण ओळख करून घ्यावी हा पंतप्रधानांचा आग्रह आणि त्यांनी खरोखर तो इतक्या सरळपणे मांडला आणि आपल्याला काम दिलं की भाषणाचा तो चार मिनिटांचा भाग मी लिटरली 6W+2H ह्या आम्ही वापरणार्‍या प्रोजेक्ट प्रणालीमध्ये टाकला. म्हणजे व्हॉट? व्हाय? व्हेन? व्हेअर? हू? हूम? हाऊ? आणि हर्डल्स? कोणताही प्रोजेक्ट करताना ह्या प्रंश्‍नांची उत्तरं मिळवली की प्रोजेक्ट नीट मार्गी लागतो. थोडक्यात, काय? का? कधी? कुठे? कोण? कोणासाठी? कसं? मागार्र्तील अडथळे? हे ते प्रश्‍न. आता आपण पंतप्रधानांच्या भाषणातील टूरिझमवरील विचार ह्या प्रणालीमध्ये मांडूया. 1) काय? भारतीय पर्यटकांनी भारतात पर्यटन करायचं. 2) का? आपला भारत देश आपण बघितला पाहिजे, जाणला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला भारताच्या विविधतेविषयी वैशिष्ट्यांविषयी आणि वस्तूस्थितीविषयी आदर प्रेम आणि आस्था असली पाहिजे. अशी वेळ आपल्यावर कधीही येऊ नये जेव्हा एखादा परदेशी पर्यटक आपल्या भारताविषयी आपल्याला काही सांगतोय जे आपल्याला माहीत नाही. भारतीय लोकसंख्येच्या काही टक्के भारतीयांनी जर आपल्या भारतातच पर्यटन केलं तर मोठी टूरिझम इंडस्ट्री तयार होईल, माणसांना काम मिळेल, पर्यटनस्थळांचा विकास होईल आणि राज्याराज्यात- माणसामाणसांत सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. 3) कधी? येत्या तीन वर्षात म्हणजे दोन हजार बावीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताहेत तेव्हा. 4) कुठे? आपल्या देशातल्या किमान पंधरा विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायची. 5) कोणी? प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने आपला देश बघितला पाहिजे. संलग्न पर्यटन उद्योगांनी तो भारतीयांना व्यवस्थित दाखविला पाहिजे. सरकारने पायाभूत सुविधा, हॉटेल्स, विविध पर्यटन आकर्षणं ह्यांची निर्मिती केली पाहिजे. 6) कोणासाठी? आपल्या भारतासाठी. भारताच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावण्यासाठी. सुजलाम-सुफलाम भारत पर्यटन सदृढ करण्यासाठी. टूरिझम इंडस्ट्री मोठी होण्यासाठी. तरूणांना काम मिळण्यासाठी. परदेशी पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी. परदेशी पर्यटकांद्वारे भारताला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देण्यासाठी. जगाच्या पर्यटन नकाशावर भारताचं नाव उज्ज्वल करण्यासाठी. प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या भारताविषयीचा जाज्वल्य अभिमान जागृत करण्यासाठी. 7) कसं? आपण भारत बघितलाच पाहिजे हा विचार आधी प्रत्येक भारतीयाने अंगी बाणवला पाहिजे. भारतभम्रण करणं ही आपल्या भारतमातेची सेवा आहे असं समजून त्याप्रती आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. केल्याने देशाटन, पंडीत मैत्री सभेत संचार, मनूजा चातुर्य येतसे फार ह्या उक्तीप्रमाणे वायफळ खर्चावर नियंत्रण आणून पर्यटनासाठी आणि त्याद्वारे होणार्‍या व्यक्तीमत्व विकासासाठी पैशांची बचत करून पुढील तीन वर्षांचं भारतभम्रणाचं पर्यटन कॅलेंजर बनवलं पाहिजे. आपल्या देशातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांच्या आगळ्या वैशिष्ट्यांविषयी अभिमानाने फेसबूक-ट्वीटर-इंस्टाग्राम- व्हाट्स अ‍ॅप-ट्रॅव्हल ब्लॉग्जद्वारे फोटो आणि लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून दिली पाहिजे. ठरवून हे सगळं पार पाडलं पाहीजे. 8) अडचणी? प्रथमत: विदेशात पर्यटन करणार्‍या भारतीयांवर तेथील सुखसोयींचा आणि चकचकाटाचा प्रचंड पगडा आहे आणि त्याचवेळी भारतात फिरण्याविषयी एकप्रकारची उदासिनता, त्याचं उच्चाटन करता आलं पाहिजे. भारत माझा देश आहे आणि माझ्या भारतावर माझे प्रमे आहे ही प्रतिज्ञा आठवून जरी कितीही अडचणी असल्या तरी माझं भारतभम्रण थांबवणार नाही हे प्रत्येकाने स्वत:च स्वत:वर बिबंवून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी रस्ते खराब असतील, काही ठिकाणी हॉटेल्स नीट नसतील अशीही अवस्था असेल पण तरीही थोडी अ‍ॅडजस्टमेंट करून आपण भारतातलं पर्यटन सुरू ठेवलं पाहिजे. पर्यटक वाढू लागले की सुखसोयीही येतील आणि त्या पर्यटनस्थळाचा विकास जलदगतीने व्हायला हातभार लागेल. आणखी एक अडचण आहे ती म्हणजे परदेशातील काही पर्यटनस्थळं भारतीय पर्यटनस्थळांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळेही पर्यटक परदेश प्रवासाकडे जास्त आकर्षित होतो तेव्हा सरकारने हॉटेल, इंडस्ट्रीचं, टॅक्स स्ट्रक्चर, विमान कंपन्यांचं फी स्ट्रक्चर, पर्यटन संस्थावरील करप्रणालीमध्ये स्तूत्य बदल करून पर्यटन आणखी किफायतशीर बनायला मदत केली पाहिजे. महत्वाचं म्हणजे प्रत्येक पर्यटनस्थळी पर्यटकाला मिळणारी वागणूक ही पारदर्शी, सचोटीची आणि आपलेपणाची असली पाहिजेे. पर्यटकाला लुबाडण्याची एक सुप्त प्रवृत्ती नामषेश झाली पाहिजे. माननीय पंतप्रधानांचं चार मिनिटांचं भाषण म्हणजे वन पेज प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक उत्तम नमुना आहे की नाही.

वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा दोन हजार तेरामध्ये आम्ही एक योजना आणली होती ज्यामध्ये पाच वर्षात, पाच लाखात, भारतातील पंचवीस राज्य फिरण्याची सोय केली होती. त्यावेळी सर्वांनीच त्या योजनेचं कौतुक केलं होतं आणि त्याबरहुकूम आमचे एक पर्यटक श्री. दिगंबर अमृसकर हे ह्या वर्षी त्या योजनेद्वारे आणलेली पंचवीस राज्य पूर्ण करताहेत. आता पाच वर्षांचा कालावधी तीन वर्षाचा झालाय, तसा जी.आर. च आलाय. आणि पंचवीस ऐवजी पंधरा ठिकाणी भेट द्यायचं त्या आदेशात म्हटलंय त्यामुळे आम्ही नवीन वेगळी योजना तयार करतोय ज्यांनी अजून पर्यटनाला सुरूवातच केली नाही त्यांच्यासाठी. जे नेहमी पर्यटन करतात आपल्या भारतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सहली आहेतच ज्या काश्मीर लेहलडाखपासून केरळ कन्याकुमारी अंदमानपर्यंत. गुजरात राजस्थानपासून अरुणाचल आसामपर्यंत... यु नेम इट अ‍ॅन्ड वुई हॅव इट. ह्यामध्ये सहा-आठ दिवसांपासून वीस दिवसांपर्यंतच्या मोठ्या टूर्स आहेतच पण ज्यांना मोठ्या सहलींना जाता येत नाही अशा पर्यटकांसाठी वीकेंड टूर्स आहेत तीन ते पाच दिवसांच्या. आमच्याकडे काही टूर्स अशा आहेत की ज्यामध्ये एका फटक्यात आपण पंधरा स्थळांना भेट देतोय. आम्ही अशी योजनाही आणतोय की ज्यात तीन वर्षात भारतातली पंधरा राज्य पूर्ण करता येतील. सगळे विचारप्रवाह जणू ठरल्याप्रमाणे एका दिशेने वाहताहेत त्याचा आणखी एक योगायोग म्हणजे आमच्या मार्केटिंग टीमने पंधरा ऑगस्टपूर्वी दोन दिवस आधी एक व्हिडियो बनवला होता आणि तो आमच्या पर्यटकांना हितचिंतकांना आणि सोशल मिडीयावर पाठवला होता. त्याचा आशय होता आपण आपल्या भारतात का फिरायचं? सोळा ऑगस्टला त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव, तुम्ही मन की बात जाणलीत म्हणून. सूधीरने जितेश, क्षमा, प्रशांत, वेनेंसिया आणि स्वरूपाला विचारलं की हे कोणाचं क्रिएशन म्हणून. एवढं तंतोतंत जमून कसं आलं? वेल डन टीम!

एक देश, एक झेंडा, एक निवडणूक, एक नाव, एक टॅक्स, एक कायदा, ह्यासोबत आता आम्हाला पर्यटनक्षेत्राला मिळालंय भारतासाठी एक ध्येय्य. आमची वाटचाल अधिक भक्कम करणारं. थँक्यू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर! वुई विल डू अवर बीट इन द बेस्ट वे!

August 25, 2019

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top