सेल्फ ड्रायव्हिंगपासून ते स्विमिंगपर्यंत दिल खूश करणारे अनुभव, एड्रिअॅटिक समुद्राच्या काठावरची प्राचीन शहरे आणि त्यातील आधुनिक आकर्षणे, इटालियन फूड, नैसर्गिक धबधब्यांपासून ते मानवनिर्मित सी ऑर्गनपर्यंतचे नवलविशेष म्हणजे क्रोएशिया, मग हॉलिडे ऑन एड्रिअॅटिक सी एन्जॉय करूया?!
मीएका गुहेत होते जी सागरामध्ये होती आणि त्या गुहेच्या छताला एक फट होती, ज्यातून आत येणार्या सूर्यकिरणांमुळे गुहेचा आतला भाग आणि विशेषतः सागराचे पाणी हिरव्या हिरव्या रंगात चमकत होतं आणि एक स्वप्निल वातावरण तयार झालं होतं. यापेक्षा जगात सुंदर काही असू शकते का? असा विचार माझ्या मनात घोळत असतानाच, आमच्या बोटीचा कॅप्टनने आमच्या बोटीचा मोर्चा युरोपमधील सर्वात सुंदर म्हणून नावाजलेल्या बीचकडे वळवला. आणि माझ्या मनातल्या प्रश्नाला उत्तर मिळालं ते ‘स्टिनिव्हिया बीच’ च्या रुपानं. उंचच उंच लाईम स्टोनच्या कपारींनी या बीचला जणू झाकलं आहे, त्यातून एक लहानशी होडी जाईल इतकीच चिंचोळी जागा आहे. प्रदूषणाचा स्पर्शही नसलेलं ते निळं-हिरवं पाणी किनार्यावरच्या गुळगुळीत दगडगोट्यांवर आपटत, आम्हाला जणू साद घालत होतं. बीचकडे जाणार्या चिंचोळ्या फटीतून आमची बोट जाऊ शकत नसल्याने आम्ही पाण्यात उड्या मारल्या आणि पोहत पोहत बीचकडे निघालो. त्या बीचवर पहुडून भोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेताना मला समाधान वाटत होतं की अखेर माझं क्रोएशियाला यायचं स्वप्न पूर्ण झालं.
सेल्फ ड्राईव्ह व क्रोएशियाचे इटालियन कनेक्शन
काही आठवड्यांपूर्वी अचानक स्लोव्हेनिया, क्रोएशिया, मॉन्टेनेगरो या देशांचा दौरा करण्याचा योग आला. क्रोएशियात ड्राईव्ह करायचं म्हणजे एका बाजूला डोंगरकडे आणि दुसरीकडे एड्रिअॅटिकचा फेसाळता सागर किनारा यामधून केलेला प्रवास. या किनारपट्टीवर कोटोर, बुडवा, पेराश्ट, ट्रोजिर, स्प्लिट, व्हार आणि जगप्रसिध्द डुब्रोवनिक ही आकर्षक गावे विखुरलेली आहेत. इतिहासातील कम्युनिस्ट राजवटीची सावली झुगारून, संघर्षाचे दिवस मागे टाकून आपल्या ऐतिहासिक इमारतींसह हा सगळा प्रदेश आता पर्यटकांचं स्वागत करायला सज्ज झाला आहे. क्रोएशियाचे इटालियन कनेक्शन हे कॉर्चुला या बेटावर जगप्रसिद्ध एक्सप्लोरर मार्को पोलोच्या घराची सैर करताना अधिक जाणवते. या सगळ्या टूरमध्ये जरी मी पहिल्यांदाच लेफ्ट हँड ड्राईव्ह कार चालवली तरी वाटलं होतं त्यापेक्षा सगळा प्रवास फारच सोपा आणि सरळ झाला. ज्यांना गाडी चालवायचा कंटाळा आहे ते शोफर ड्रिव्हन कार किंवा कोच टूर्सचा पर्याय निवडू शकतात.
तलाव आणि धबधब्यांचा पार्क
क्रोएशियाच्या राजधानीत, झाग्रेबमध्ये माझ्यासाठी सर्वात स्मरणिय क्षण कोणता होता तर तिथल्या ‘विन्चेक’ या आईसक्रीम पार्लरमध्ये आईसक्रीमवर मारलेला ताव. सुमारे ४० वर्षांपूर्वी विन्याल कुटुंबाने सुरू केलेल्या या आईसक्रीमच्या दुकानात नेहमीच्या लोकप्रिय फ्लेवर्सबरोबर पम्पकिन सीड्स सारखे हटके फ्लेवर्सही मिळतात. आम्ही फुनिक्युलरमध्ये बसून जशी सीटी व्ह्यू पॉइंटला भेट दिली त्याचप्रमाणे इथल्या कॅप्टाल हिलवरील सेंट स्टीव्हन्स कॅथेड्रल आणि ग्राडेक हिलवरील सेंट मार्कस् कॅथेड्रल या मुख्य स्थळांना भेट देण्यासाठी शहरातून पायी फेरफटकाही मारला. मात्र ह्या प्राचीन झाग्रेबच्या लगतंच नवं, मॉर्डन झाग्रेब पहायला मिळालं, जिथे चक्क म्युझियम ऑफ ब्रोकेन रिलेशनशिप्स आहे. एका ‘एक्स कपल’ ने हे काहिसं ऑड विषयावरचं गमतीदार म्युझियम उभारलं आहे. झाग्रेबहून आम्ही गेलो क्रोएशियातील सर्वात लोकप्रिय पर्यटक आकर्षण ठरलेल्या प्लिटव्हीस लेक्स नॅशनल पार्ककडे. सेंट्रल क्रोएशियात २९५ चौ.कि.मी.च्या परिसरातील रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये पसरलेला हा पार्क प्रसिध्द आहे तो धबधब्यांनी जोडलेल्या १६ तलावांच्या श्रुंखलेसाठी, ज्याचे रुपांतर लाईम स्टोनच्या कॅन्यनमध्ये होतं.
सी ऑर्गन आणि ग्रीटिंग टू द सन
या प्रवासात झडार येथे भोवतालच्या निसर्गाचा आणि पाण्याचा वापर करून निर्माण केलेलं एक अनोखं पर्यटक आकर्षण पाहायला मिळालं. एड्रिअॅटिक समुद्राच्या काठावर आमचं स्वागत एका नैसर्गिक वाद्यानं केलं. हे वाद्य म्हणजे झडारचा सुप्रसिध्द सी ऑर्गन ,जो झडारच्या सागरकिनार्यावर आहे आणि समुद्राच्या लाटांनी वाजवला जाणारा जगातला पहिला पाईप ऑर्गन आहे. ज्यातून नैसर्गिक सुरावटी उमटत असतात. झडारच्या ह्याच किनार्यावरून दिसणारा सूर्यास्त हा जगातला सर्वात सुंदर सूर्यास्त आहे अशी प्रशंसा हॉररपटांचा सुप्रसिध्द दिग्दर्शक हिचकॉकने केली होती.
ह्याच परिसरात झडारचं आणखी एक अनोखं आकर्षण आहे, ते म्हणजे द ग्रीटिंग टू द सन. हे आगळं स्मारक सूर्याला समर्पित केलेलं आहे. यामध्ये तीनशे मल्टी लेयर्ड काचेचे तुकडे वापरून त्यांची २२ मीटर व्यासाच्या वर्तुळात रचना केलेली आहे. यातील वर्तुळाकार प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळी एक अनोखा आविष्कार बघायला मिळतो. ‘एकाच परिसरात समुद्र आणि सूर्य यांच्याशी संवाद साधणार्या रचना उभारून झडारमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधला आहे’, असं मी जे वाचलं होतं ते किती खरं होतं ह्याचा अनुभव झडारच्या पायर्यांवर बसल्या बसल्या घेतला आणि पुन्हा एकदा क्रोएशियाच्या प्रेमात पडले.
क्रोएशियामध्ये...
ग्रुप टूर्स
क्रोएशिया स्लोवेनिया हंगेरी
युरोपचा एक आगळा वेगळा आणि तितकाच अनोखा चेहरा दाखवणारी वीणा वर्ल्डची सेंट्रल अॅन्ड इस्टर्न युरोप ही सहल नुकतीच यशस्वीरीत्या जाऊन आली. या सहलीमध्ये मंडळींनी घेतलेला निसर्गाचा आणि मानवनिर्मित सौंदर्याचा जो परमानंद अनुभवला तो आम्हालाही खूप समाधान देऊन गेला. आता मात्र आपल्यालाही जर का युरोपच्या या ऑफबीट सेक्टरचा आनंद घ्यायचा असेल तर पुढची तारीख लाँच होईपर्यंत जरा सबुरी ठेवावी लागेल. पण खास आपल्यासाठी देअर इज स्टिल समथिंग वेरी इक्सायटिंग इन स्टोअर-शोर्ट, स्वीट अॅन्ड रिझनेबल अशी सहा दिवसांची क्रोएशिया स्लोव्हेनिया हंगेरी ही ग्रुप टूर. ही सहल निघतेय २४ सप्टेंबरला. फॅमिली टूरसोबत वीणा वर्ल्डची लोकप्रिय कपल्स स्पेशल देखील याच तारखेला निघतेय. नोव्हेंबरपासून हिवाळा सुरू होत असल्याने सप्टेंबर इज द बेस्ट टाइम टु व्हिजीट हिअर
क्रोएशियाची राजधानी झागरेब येथे प्राचीन आणि मॉर्डन झागरेबच्या कलाविष्काराची विविधांगी झलक दिसते
क्रोएशियात सर्वात लोकप्रिय आकर्षण ठरलंय ते म्हणजे प्लिटव्हीस लेक्स नॅशनल पार्क. हा पार्क प्रसिद्ध आहे तो धबधब्यांनी जोडलेल्या १६ तलावांच्या श्रृंखलेसाठी. वॉक वेज आणि हाईकिंग ट्रेल्सरमुळे या सगळ्या तलावांभोवती फेरफटका मारता येतो बरं का!
स्लोव्हेनियात ल्युबल्याना आणि ब्लेड या दोन शहरांमध्ये तसंच हंगेरीतील बुढापेस्ट या ठिकाणी फिरताना तिथले चर्चेस, म्युझियमस, पार्लमेंट हाऊस, रॉयल पॅलेस, रिव्हर क्रुझ या सार्य्ा गोष्टींनी तिथल्या परंपरा आणि संस्कृतीशी निसर्गाने घातलेली सांगड पदोपदी जाणवते
Signature Holiday
इंडिपेंडंट ट्रॅव्हल
टेस्ट द अॅक्वा अॅडव्हेंचर
क्रोएशियाच्या सुरेख सागरकिनार्यावरून प्रवास करताना मन चाहेल तिथे थांबून, हवं तिथे समुद्रात डुंबण्याचा आनंद बिनधास्तपणे घ्या. ११०० मैल पसरलेल्या नितळ, स्वच्छ, सुंदर सागरकिनार्यावर स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग, सेलिंग किंवा फक्त स्विमिंगचा आनंद मनमुराद लुटा
ड्राईव्ह इन क्रोएशिया
क्रोएशियाच्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर रोड जर्नीला पर्याय नाही. देअर इस नथिंग लाइक अ सेल्फ ड्राईव्ह, पण अगदी स्वतः गाडी चालवणं शक्य नसेल तरी शोफर ड्रिव्हन कार किंवा मग कोच ट्रॅव्हलचा पर्याय आहेच
एक्सपीरियन्स लक्झरी
क्रोएशियाच्या अगदी जवळ असलेल्या माँटेनेग्रोमधील अमान रिसॉर्टस्च्या लक्झुरियस प्रॉपर्टीज् पैकी एक, ‘स्वेती स्टेफान’ या आयलंड रीसॉर्ट येथील १५ व्या शतकातील, झकास चौकांनी तसंच फरसबंदीच्या गल्ल्यांनी बनलेल्या आणि तटबंदीने संरक्षित असलेल्या गावातून दिसणारे समुद्राचे मोहक दृश्य पाहायची संधी चुकवू नका. इथल्या पाहुणचाराचा अवश्य अनुभव घ्या
माईस टूर अॅट क्रोएशिया
तुमच्या कंपनीच्या माईस (MICE) अर्थातच कॉपोर्रेट ट्रॅव्हलकरीता क्रोएशिया हे डेस्टिनेशन आवर्जुन ट्राय करायला हवं
क्रोएशियात जगप्रसिद्ध एड्रिअॅटिक किनारपट्टीवर डुब्रोवनिक हे आकर्षक गाव आहे. इथले म्युझियमस, जुने भव्य-दिव्य पॅलेसेस, मॉनेस्ट्रीज अशा ठिकाणी आपण माईसचा इव्हेंट करू शकतो. इथे आहेत कलरफूल लाइट शोज्, म्युझिक शोज् आणि खूप सारे सरप्राइजेस्. हा झाला इनडोअर इव्हेंट्चा पर्याय पण आउटडोअर इव्हेंट्स साठीही इथे पार्क्स आहेत. जिथं आपण आपले इव्हेंटचे वेगवेगळे कार्यक्रम करू शकतो. मस्त धम्माल करा आणि स्वप्नवत लाईफचा आनंद घ्या
तसंच इथं झालेल्या अनेक सिनेमांच्या शूटींग लोकेशन्सवर जाऊन स्वतःचा एक व्हिडीओ शूट करून तुमची स्वतःची फिल्मही बनवू शकता. तर लक्झुरिअस कार्समधनं फिरताना पर्यटनाचा मस्तीभरा आनंद तुमच्या या टूरला चार चाँद लावेल हेही तितकंच खरंय. तुमच्या कंपनीत काम करणार्या मंडळींकरिता कंपनीतर्फे क्रोएशियामध्ये इनसेंटिव्ह टूर अरेंज करण्यासाठी आमच्या माईस टीमशी संपर्क साधा. teammice@veenaworld.com
क्रोएशियाची खाद्यसंस्कृती
ताजं सी फूड - ग्रिल्ड फिश आणि ब्लॅक रिसोटा हे ट्राय केलंच पाहिजे
क्रोएशियाचं इटालियन कनेक्शन पिझ्झा, पास्ता, उत्कृष्ट वाईन्स तसंच ऑलिव्ह ऑइलच्या प्रेमातून सतत जाणवत राहातं
हॉलिवूड-बॉलिवूड
सुप्रसिद्ध गेम ऑफ थ्रोन्स ही सीरिअल आपल्या सगळ्यांना ऐकून माहित असेलच. या सुप्रसिद्ध गेम ऑफ थ्रोन्सचं शूटिंग क्रोएशियात डुब्रोवनिकमध्ये झालंय. तर इथे गेल्यावर नकळत का होईना त्या सीरिअलचा एक भाग तुम्ही होवून जाता आणि क्रोएशियाच्या टूरची मजा खर्या अर्थानं अनुभवता
बॉलिवूडचा सर्वात पहिला आणि एकमेव चित्रपट ज्याचं शूटींग क्रोएशियामध्ये झालयं तो म्हणजे आपल्या शाहरुखचा ‘फॅन’. फॅनमध्ये पाहिलेल्या लोकेशन्सना भेट देऊन आपण क्रोएशियाचे फॅन व्हाल यात शंका नाही
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.