IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

अहो, तुमची हवाईला टूर जाते का? अलास्का तुम्ही कसं करता, क्रुझने की डोम ट्रेनने? बाल्टिक कंट्रीज म्हणजे कोणते देश हो? ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधल्या त्या भन्नाट जागा तुम्ही दाखवता का हो? अमेरिकेत ब्लॅक हिल्सवर ते प्रेसिडेन्टस्चे कार्व्हड फेसेस तुमच्या सहलीत बघायला मिळतात का? ब्राझिलची रिओ कार्निव्हल भन्नाट असते म्हणे तुम्ही गेलाय कधी तिथे? आईसलँडची हल्ली सर्वत्र चर्चा आहे कधी असतात ह्या सहली?... अशा असंख्य प्रश्‍नांमधूनच आम्ही घडत असतो, वीणा वर्ल्ड वाढत असतं. ह्या प्रश्‍नांसाठी आमच्या पर्यटकांना मन:पूर्वक धन्यवाद.

युरोप अमेरिका लाँच हा वीणा वर्ल्डमध्ये एक सोहळा असतो. पहिल्यांदा चर्चा असते, ती कधी लाँच करणार आपण पुढच्या वर्षीचं युरोप अमेरिका ह्याविषयी. नंतर आता काय नवीन आणणार ह्या वर्षी म्हणून टूर मॅनेजर्सची प्रॉडक्ट डिझायनिंग टीमच्या मागे भूणभूण असते आणि तेही जगाचा नकाशा घेऊन व्हर्च्युअल जगप्रदक्षिणा करीत बसलेले दिसतात. प्रॉडक्ट टीममध्ये प्राईसिंग-कॉन्ट्रॅक्टिंग-इन्व्हेन्टरी-आयटिनरी प्लॅनिंग असे वेगवेगळे विभाग त्यांची त्यांची कामं करण्यात मग्न असताना फायनान्स टीम ‘ह्या वर्षीतरी सहलीच्या किमती वाढवा’ म्हणून तगादा लावतात आणि दुसर्‍या बाजूने सेल्स टीमवाले त्यांचे नंबर्स वाढविण्यासाठी ‘किमती वाढवू नका बरं’ अशी सुप्त दटावणी करीत ‘वीणा वर्ल्ड इज मेकिंग द वर्ल्ड रीअली अफोर्डेबल’ ह्या प्रॉमिसची आठवण करून देतात. एकंदरीतच बिच्चारी प्रॉडक्ट-प्राईसिंग टीम कात्रीत सापडलेली असते. वरून माझा उपदेश असतोच, ‘नफासुद्धा एवढाच घ्यावा जेवढा न्याय्य आहे.’ सगळ्यांमधून सुवर्णमध्य काढत लाँचची तयारी सुरू असते. यावर्षी जवळजवळ दीड महिना प्रॉडक्ट टीम मेहनत घेत होती की जे काय करायचंय ते व्यवस्थित झालं पाहिजे ह्यासाठी. लाँचच्या एक महिना आधीपासून आणखी दोन टीम्स ह्यात सामील होतात, त्या म्हणजे मार्केटिंग, वेब डिझायनिंग अ‍ॅन्ड आय. टी टीम. ‘लाँचची जाहिरात कशी करायची? वेबसाईटवर ती कशी दिसली पाहिजे? आमच्या इंटिग्रेटेड ट्रॅव्हल मॅनेजमेंट सिस्टिममधून इन्फॉर्मेशन कधी कुठे कशी फ्लो झाली पाहिजे? डिजिटल मार्केटिंग कसं करायचं?’ ह्यावर चर्चासत्र सुरू होतात. कामाने अ‍ॅक्चुअली सगळे दमतात-थकतात पण नित्यनवं काही करण्याची उर्मी आम्हा कुणालाच स्वस्थ बसू देत नाही. लाँचच्या आधी चार दिवस अश्‍विनी सामंत, प्राजक्ता देवासकर, शीतल बानावळी आणि मानसी थिटे माझ्याकडे येऊन म्हणाल्या, ‘आम्हाला अजून एक टूर नव्याने लाँच करायचीय ग्रुप टूर्समध्ये, आपण माईस ग्रुप्स करतोय तिथे ग्रुप टूर्स नाहीत. व्हिसा टीम आणि एअर टीमकडून आम्ही ऑलरेडी अप्रुव्हल मिळवलंय.’ मला त्यांची शारिरीक थकान दिसत होती पण मानसिक उत्साह बघून मी ही होकार दिला आणि बाल्टिक युरोपची एक उत्तम सहल वीणा वर्ल्ड गु्रप टूर्स परिवारात दाखल झाली. हे घडत असतानाच अ‍ॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग टीमचा लाँच अ‍ॅडचा ले आऊट काही केल्या फायनल होत नव्हता. अ‍ॅडव्हर्टाइज छान दिसली पाहिजे, त्यात सर्व काही पारदर्शीपणे समोर दिसलं पाहिजे, कुठचीही गिमिक्स नकोत आणि मुख्य म्हणजे आपल्या पर्यटकांना किंवा वाचणार्‍यांना ती कळली पाहिजे. ‘बहुगुणी वधू’ शोधण्याचा हा प्रकार. शेवटी योगिता हरमळकरने केलेलं क्रीएटिव्ह आम्ही शॉर्टलिस्ट केलं आणि गायत्री नायकने त्यात जेवढ्या गोष्टी समाविष्ट करायच्या होत्या तेवढ्या फिट्ट बसवल्या आणि बावीस ऑगस्टला आम्ही युरोप अमेरिका 2019 लाँच केलं. बरं मी ही कधी कधी एकदम नवीन स्ट्रॅटेजी अगदी इलेवन्थ अवरला आमच्या वेब आणि आय.टी टीमच्या माथी मारते. पण उत्साहाने आमची मधुरा पाटील, वैभवी सोमण आणि मधू नायर व त्यांची टीम, ‘काय आणि कसं हवंय ते सांगा, बाकी आम्ही बघतो’ असं म्हणत सपोर्ट करते. लाँचच्या आदल्या दिवशी प्रॉडक्ट टीमने ऑर्गनायझेशनमधले सर्व मॅनेजर्स, असिस्टंट मॅनेजर्स, सेल्स टीम, इनचार्ज अशा पंच्याऐंशी टीम मेंबर्सना लाँचविषयी इत्थंभूत माहिती दिली आणि एकंदरीत प्रोसेस पूर्ण केली. पूर्वी लाँच प्रोसेस म्हणजे आम्ही पाच-सहा जणं इनव्हॉल्व्ह असायचो पण हल्ली ह्या लाँचच्या मेन प्रोसेसमध्ये साधारणपणे शंभरजण इनव्हॉल्व्ह असतात आणि या-ना त्या कारणाने हजार जणांची संपूर्ण ऑर्गनायझेशनच त्यात सहभागी असते. ‘मॅनेजमेंट बाय इनव्हॉलमेंटचा’ एक उत्कृष्ट नमुना म्हणता

येईल ह्याला. कोणतेही सेमिनार्स न करता टीम बिल्डिंगची उत्त्मोत्तम उदाहरणं ही टीम आपल्या रोजच्या कामामधून दाखवून देतेय, स्वत: घडत राहतेय आणि इतरांना घडवित राहते. इट्स टली अ ब्लेसिंग!

आता युरोप अमेरिका लाँच झालंच आहे, तेव्हा त्यात कोणत्या सहली नव्याने दाखल झाल्यात ते आधी बघू या. अमेरिकेमध्ये ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, शिकागो ह्यासोबत येलोस्टोन नॅशनल पार्क आणि माऊंट रशमोर ही सोळा दिवसांची अमेरिकन ज्वेल्स सहल आणलीय, तर ओरलँडो डिस्नी वर्ल्ड-मॅजिक किंगडम आणि नासासोबत ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्टसहची पंधरा दिवसांची अमेरिकन वंडर्स ही सहल आहे. ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट शिकागोला कव्हर करणारी ‘शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट’ तेरा दिवसांची अमेरिकन मॅजिक सहल लोकप्रिय आहे.ज्यांच्याकडे जास्त दिवस आहेत त्यांच्यासाठी बहामाज क्रुझसह एकोणीस दिवसांची अमेरिकन ड्रीम ही अगदी ऐसपैस सहल आहे. आणि हो, ह्या सर्व सहलींमध्ये नायगरा फॉल्सला हेलिकॉप्टर राईड समाविष्ट आहे आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणजे जे आता बुकिंग करतील त्यांच्यासाठी ‘फ्री एक्स्पीरियन्स’मध्ये कॅनडा साईडने नायगरा फॉल्स बघण्याची संधी आहे. ह्यामध्ये कॅनडा व्हिसा फी वीणा वर्ल्डतर्फे भरली जाणार आहे. अर्थात ह्यासाठी लागलीच बुकिंग आवश्यक आहे कारण सहलीतल्या मर्यादित सदस्यांसाठीच आणि ज्यांना कॅनडा व्हिसा ग्रँट होणार आहे त्यांच्यासाठीच ही ऑफर असणार आहे. ज्यांना कमी पैशात कमी दिवसात अमेरिका दर्शन करायचंय त्यांच्यासाठी AMEP ही ईस्ट कोस्टची सुंदर सहल गेली दोन वर्ष अनेक पर्यटकांसाठी पर्वणी ठरलीय. अमेरिकेला म्हणजे युएसए ला जाणारे जवळजवळ पन्नास टक्के पर्यटक हे तिथे आपल्या नातेवाईकांकडे राहतात आणि नंतर परत येतात त्यांच्यासाठी सध्या डिव्हिएशन चार्ज फ्री केलाय, अनेकांनी त्याचा फायदा घ्यावा. अमेरिका व्हिसा जनरली दहा वर्षाचा मिळतो त्यामुळे दुसर्‍यांदा अमेरिकेला जाणार्‍यांसाठी आम्ही हवाई आयलंड्ससह मेक्सिकोची सहल आणलीय आणि ‘अलास्का बाय क्रुझ-बाय रोड-बाय डोम ट्रेन’अशी एकदम हटके एक्स्पीरियन्सेस देणारी आगळी सहल आणलीय. राम जाधव, रिया फाटक आणि प्रियांका पाटीलने ह्या नवीन सहली आणण्यात बरीच मेहनत घेतली. कॅनडाची ‘ईस्ट-वेस्ट’ अशा दोन्ही कोस्टना कव्हर करणारी चौदा दिवसांची कॅनडा एक्सप्लोरर सहलही सध्या खूप डिमांडमध्ये आहे. साउथ अमेरिका विथ रिओ कार्निव्हल ही एक अप्रतिम सहल म्हणता येईल. साउथ अमेरिकेत कुबेराचं भांडारच आहे म्हणावं लागेल. नजरेत न मावणारा ‘इग्वाझू धबधबा’, आधुनिक जगातील सात आश्‍चर्यांमधील दोन - ‘माचू पिचू’ आणि ‘ख्राइस्ट द रिडीमर’, अ‍ॅमेझॉनचं घनदाट जंगल, अटाकामाचं डेझर्ट, पेरुचं उरोस आयलंड, जगातले सर्वात उंचावरचे टिटिकाका सरोवर,  चिलीमधील ‘पेरितो मोरेनो ग्लेशियर’, साउथ अमेरिकेच्या एकसेएक स्थलदर्शनाची यादी न संपणारी ही सहल फेब्रुवारीत आहे आणि बुकिंगला ऑलरेडी सुरुवात झालीय. अंटार्क्टिका सहल नोव्हेंबर 2019 मध्ये आहे. नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ह्या तीन खंडांमध्ये मिळून मस्त चौदा सहली आहेत आणि त्याव्यतिरिक्त वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल आहेतच. आणि हो, अमेरिका व्हिसा आत्ताही करून ठेवता येईल त्यासाठी एअर तिकिटची गरज लागत नाही त्यामुळे बुकिंग करून व्हिसाच्या तयारीला लागा.

युरोप एक अद्वितीय खंड. जगातल्या प्रत्येकाला आयुष्यात एकादातरी युरोपला जायची ओढ असते, ते त्याचं स्वप्न असतं. युरोपमध्ये वर्षाला पन्नास कोटींच्या घरात पर्यटक येतात त्याचं कारणंच त्याच्या सौंदर्यात आहे. छोटा खंड पण त्यात एकूण पन्नास देश सामावलेले त्यामुळे आत्ताच्या वीणा वर्ल्डच्या युरोपच्या सहलीही वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांची संख्याही जास्त. यावर्षी चौदा हजार पर्यटक वीणा वर्ल्डसोबत युरोपला जाऊन आले, समाधानात आणि आनंदात. शंभर टूर मॅनेजर्स युरोपमध्ये एकावेळी मे महिन्यात वेगवेगळ्या युरोपच्या टूर्स करीत होते. पर्यटकांचा विश्‍वास आणि आमच्या टीमची मेहनत युरोपच्या प्रत्येक शहरात दिसत होती. त्यामुळे आत्मविश्‍वासाने आम्ही युरोप  2019च्या सहली पर्यटकांसमोर आणल्या आहेत. युरोप सहल म्हटली की जनरली एकावेळी दहा देश एका झटक्यात बघण्याची प्रत्येक पर्यटकाची इच्छा असायची. म्हणजे ती एक सहल झाली की युरोप झालं, मग दुसरे खंड हे साधं-सोप्पं गणित असायचं. आजही अनेकांचं तसं आहे पण जमाना बदललाय हे आम्हाला पदोपदी जाणवतं ते ह्या युरोपच्या उदाहरणावरून. आत्ता ट्रेंड असा आहे की पर्यटक पाच ते सहा वेळा युरोपला जायची इच्छा ठेवतात. पहिल्यांदा वेस्टर्न युरोपची आठ-दहा देशांची टूर केली जाते. नंतर स्कॅन्डिनेव्हिया खुणावतो. ते झाल्यावर स्पेन पोर्तुगालकडे मोर्चा वळतो. त्यानंतर ग्रीस टर्कीचा वेगळा प्रदेश आकर्षून घेतो. लेटेस्ट ट्रेंड आहे तो ईस्टर्न युरोपचा. डुब्रॉवनिक, मॉन्टेनेग्रो, स्लोव्हेनिया, क्रोएशिया ही नावं सतत कानावर आदळायला लागलीयत त्यामुळे यावर्षीही ईस्टर्न युरोपच्या सहली आम्हाला वाढवायला लागल्या. इंग्लंड आयर्लंड स्कॉटलंडचा साहेबी थाट तर कायमच आपल्या मनात घर करून बसलेला, त्यामुळे तिथे जाणं आलंच. आईसलँड, रशिया, बाल्टिक देश, बाल्कन देश, युरेशिया हे सगळे बर्‍याच पर्यटकांच्या अजून लिस्टमध्ये अ‍ॅड करायचेत. युरोप म्हटलं की, ‘किती बघू आणि काय काय बघू’ असं होऊन जातं. युरोप आमच्यासाठी आणि आमच्या पर्यटकांसाठी इन्स्पिरिशन आहे. समथिंग टू रीअली लूक फॉरवर्ड टू! अशा ह्या युरोपच्या वेगवेगळ्या साठ प्रकारच्या सहलींविषयी इथे लिहायला जागा अपूरी आहे. जशी बाल्टिक युरोप म्हणजे एस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया, बेलारुस, युक्रेन अशा पाच देशांची सहल आम्ही इथे नव्याने आणलीय तशीच युरोप बाय क्रुझ ही इटली, ग्रीस, क्रोएशिया, मॉन्टेनेग्रो असलेली चौदा दिवसांची वेगळी सहल युरोप परिवारात दाखल केलीय, जी एक आगळा एक्सपीरियन्स आमच्या पर्यटकांना देणार आहे. तर पर्यटकमंडळी, पाच दिवसांत पाच देश किंवा सात दिवसांत सात देश दाखविणार्‍या अफलातून सहलींचा, तसेच एक लाखापासून पाच लाखांपर्यंत, एका देशापासून पंधरा देशांपर्यंत, पाच दिवसांपासून एकोणतीस दिवसांपर्यंत विविध सहलींचा नजराणा 2019 मध्ये घेऊन आम्ही तयार आहोत आपल्या स्वागताला. वेगवेगळ्या तर्‍हेचे बेनीफिट्स तुम्ही मिळवू शकताय लागलीच बुकिंग केल्यास. तेव्हा शुभस्य शीघ्रम!

प्रॉडक्ट लाँच झालंय, त्यामुळे आता आमच्याकडे काम सुरू होतंय ते बुकिंग, आफ्टर बुकिंग अशा पद्धतीचं. प्रियाका पत्की, संदीप जोशी, उज्वला भंडारी, रोशनी बागवे, दीपक जाधव, अशोक पेडणेकर, सुषमा कदम ही मंडळी म्हणजे सेल्स टीमचे सूत्रधार. ही सर्व मंडळी आता बिझी होणारेत किंवा झालीच आहेत कारण प्रत्येक पयर्र्टकाची बुकिंग प्रोसेस व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं. सो मंडळी, तुम्हाला ‘हॅप्पी जर्नी’ म्हणताना आमच्यासाठी ‘बेस्ट लक’ हक्काने मागून घेतेय. हॅव अ ब्लिसफुल संडे!

August 26, 2018

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Comments (2)

Siddheshwar Shirshetti
Sep 13, 2018

Europe Tour 15 Aiwaji 20 diwas kara karan evadya lamb jayache jast desh hotil & Paise hi vachel. Mi ya agodar veena world sobat Bankok & Pattaya tour keli ahe Group fimily sobat. Ok thank u.

महेश नाईक
Sep 04, 2018

वीणा वर्ल्ड च्या कार्यपद्धतीचा आढावा घेणारा सुंदर लेख. खरंच खूप मेहनत असते यामागे तुम्हा सर्वांची व म्हणूनच आम्हा पर्यटकांचं मकं खूप सोपं होतं. तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Scroll to Top