India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

ओडिशा इतिहास आणि संस्कृतीचा मिलाफ

16 mins. read
Veena Patil
Veena Patil
16 Mins Read
June 27, 2025
June 27, 2025

Quick Summary

ओडिशामध्ये भुवनेश्वर, कोणार्क आणि पुरी ही प्रमुख ठिकाणं पाहण्यासारखी आहेत, कारण इथे लिंगराज, सूर्य मंदिर आणि जगन्नाथ मंदिर आहेत.

कोणार्क सूर्यमंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळात येतं, आणि इथे कोणार्क सन फेस्टिव्हल व नृत्य महोत्सव दरवर्षी होतात.

चिल्का सरोवर नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लाखो स्थलांतरित पक्ष्यांचं घर बनतं, त्यामुळे पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम वेळ आहे.

ओडिशात महाप्रसादाचा अनुभव घ्या आणि पुरीची चंदनयात्रा तसेच जगन्नाथ रथयात्रा सारखे उत्सव चुकवू नका.

पारंपारिक कला आणि संस्कृतीसाठी पाता चित्रा आणि ओडिसी नृत्य पाहा, तसेच संभल आणि इक्कत साड्या हाताने विणलेल्या असतात.

न्यूझीलंडमध्ये वाईतोमो ग्लोवॉर्न केव्हज्‌‍मध्ये बोट राईड करा आणि ब्लॅकवॉटर राफ्टिंगसारखी साहसी मजा घ्या.

Published in the Sunday Sakal on 29 June 2025

ओडिशा म्हटलं की आपल्याला आठवतं ते कोणार्क सूर्यमंदिर आणि जगन्नाथ पुरी. पुराणांतून उत्कल म्हणून ओडिशाचा उल्ल्ोख प्राचीन काळापासून झाला आहे. ज्या भूमीत अनेक राजांनी आपली राज्ये स्थापन केली त्या भूमीने एक समृद्ध वारसा मागे ठेवला आहे. या राज्याला 485 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला मंदिरांचे शहर‌‘ असेही म्हटले जाते. भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर, कोणार्कमधील सूर्य मंदिर आणि चारधामांपैकी एक म्हणजे पुरीमधील जगन्नाथ मंदिर ही ओडिशातील प्रमुख आकर्षणे आहेत. कोणार्क सूर्यमंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत केला आहे. भगवान सूर्यनारायण ही कोणार्क सूर्यमंदिराची प्रमुख देवता. इथला कोणार्क सन फेस्टिव्हल आणि मंदिरात दरवर्षी होणारा नृत्य महोत्सव प्रसिद्ध आहे. चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर इथे आहे. नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत दहा लाखांहून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे हे सरोवर घर बनते. याशिवाय राज्याची प्राचीन राजधानी कटक, उदयगिरी-खंडगिरी लेणी, 56 किलोमीटर लांबीचे सर्वात लांब मानवनिर्मित असलेले हिराकुड धरण ही ओडिशातली प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत.

पारंपारिक पर्यटनासोबतच वैद्यकीय पर्यटन, इको-टुरिझम आणि साहसी पर्यटनासाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. हे राज्य त्याच्या सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. चिंगडी झोला आणि माच्छा झोला यांसारखे मांसाहारी पदार्थ स्थानिक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. दालमा आणि चिन्हा पोडा यासारखे शाकाहारी पदार्थ सुद्धा लोकप्रिय आहेत.

ओडिशातले प्रमुख उत्सव म्हणजे मे आणि जून महिन्यातील पुरीची चंदनयात्रा, जून आणि जुलैमधील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा, सीतल शास्ती कार्निवल, फेब्रुवारीतील कोणार्कचा एक दिवसाचा मेळा, ऑक्टोबरमध्ये होणारी दुर्गा पूजा आणि नोव्हेंबरमधील कटकची बलीयात्रा. जगन्नाथ मंदिरातील महाप्रसादाचा अनुभव आवर्जून घ्यावा असा असतो. हे राज्य आपल्या सांस्कृतिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पाता चित्रा हा चित्रकलेचा एक प्रकार आणि ओडिसी हा नृत्याचा एक प्रकार हे पारंपरिक कलाप्रकार आपल्याला इथे पाहता येतात. ओडिशाच्या संभल आणि इक्कत प्रांतातील साड्या प्रसिद्ध आहेत. या साड्या हाताने विणल्या जातात. दरवर्षी 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणारा कोणार्क नृत्य महोत्सव हा पारंपारिक ओडिसी नृत्य, संगीत आणि पोशाखाचा मिलाफ असलेला एक सुंदर, परीकथेसारखा सोहळा असतो. वीणा वर्ल्ड सोबत तुम्ही 6 दिवसांपासून ते 15 दिवसांपर्यंतची ओडिशाची टूर करू शकता. मग तुम्ही त्यातली कोणती निवडताय ?

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

पॅसिफिक महासागरात वसलेला न्यूझीलंड हा देश म्हणजे बेटांचा एक समूह आहे. हा ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश आहे. इथलं निसर्गसौंदर्य डोळ्यात भरण्यासारखं आहे. इथल्या वाईतोमो ग्लोवॉर्न केव्हज्‌‍ या न्यूझीलंडच्या सर्वोत्तम नैसर्गिक आकर्षणांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. वाईतोमो याचा माओरी भाषेतला अर्थ होतो "छिद्रातून गळणारे पाणी". वाई म्हणजे पाणी आणि तोमो म्हणजे सिंकहोल. या केव्हज्‌‍ भूमिगत नद्यांच्या माध्यमातून लाखो वर्षांपासून झालेल्या लाईमस्टोनच्या म्हणजे चुनखडीच्या झीजेमुळे तयार झाल्या आहेत. ग्लोवॉर्म्सद्वारे उत्सर्जित होणारा प्रकाश हा बायोल्युमिनसेन्स या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम आहे.

स्टॅलॅग्माइट्स आणि स्टॅलॅक्टाइट्स या वैशिष्ट्यपूर्ण केव्हज्‌‍ रचना आहेत. हे चुनखडीच्या पृष्ठभागावर पाणी विरघळल्यावर तयार होणारे बर्फाचे साठे आहेत. स्टॅलॅग्माइट्स छतावर तयार होतात आणि खाली लटकतात. जेव्हा स्टॅलॅग्माइट्स सक्रियपणे तयार होत असतात, तेव्हा त्यातून पाणी खाली ठिबकत राहते. जिथे त्या पाण्याचे थेंब पडतात, तिथे ढिगाऱ्याच्या आकाराचे स्टॅलॅक्टाइट्स तयार होतात. हे पाण्याचे थेंब एकमेकांवर जमत वरवर जातात. आणि अशा पद्धतीने केव्हज्‌‍ च्या छतावर किंवा तिथल्या जमिनीवर कॅल्शियम कार्बोनेट पुन्हा जमा होते आणि उर्ध्वमुखी किंवा अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. जर स्टॅलॅग्माइट्स आणि स्टॅलॅक्टाइट्स असेच तयार होत राहिले तर एक वेळ अशी येते की हे दोन्ही एकमेकांना चिकटतात आणि अखेरीस एक स्तंभ तयार होतो.

वाईतोमो ग्लोवॉर्न केव्हज्‌‍ च्या प्रदेशात 300 हून अधिक केव्हज्‌‍ चा आजवर शोध लागला आहे. तरीही अनेक केव्हज्‌‍ या अद्यापही गुप्त आहेत. अशा या हजारो जादुई ग्लोवॉर्न्सखाली तुम्ही बोट राईडचा आनंद घेऊ शकता. तसंच तुम्हाला साहसी सफर करण्यात रस असेल तर तुम्ही ब्लॅकवॉटर राफ्टिंगही करू शकता. असा हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला, बर्फाच्छादित पर्वतराजीने नटलेला आणि सुंदर सागरी किनारे लाभलेला न्यूझीलंड देश, तुमच्याही ‌‘बकेट लिस्ट‌’मध्ये आहे का ? चला तर मग आमच्यासोबत ही अद्भुत दुनिया बघायला.

 

थेपला-द अल्टिमेट

कहीं तो जाते हैं यार!' आमच्या बिल्डिंगमधल्या मित्रमंडळींच्या गॅदरिंग मध्ये कुणीतरी सूर लावला. 'सुधीर कहाँ लेके जाते हो हमें?' सुधीर म्हणाला, ‌‘जर आपण सर्वजण जाणार असू तर मी ऑर्गनायझरच्या मोडमध्ये जाणार नाही. मलाही तुम्हा सर्वांसोबत टूर एन्जॉय करायची आहे.‌’  सुधीरचं म्हणणं बरोबर होतं, मी सुध्दा त्याची री ओढली. आयुष्यभर आम्ही ऑर्गनायझरच्या मोडमध्येच आहोत. पर्यटकांची निश्चिंतता, सुरक्षितता आणि आनंद यासाठी 'वुई आर ऑलवेज ऑन अवर टोज‌’.  आपण मित्रमंडळींसोबत जात असताना या मोडमधून बाहेर येणं महत्वाचं होतं. 'आम्हालापण कधीतरी आमच्या पर्यटकांसारखं राहायला आवडेल की.‌’ सर्वांना हे म्हणणं पटलं आणि आम्ही त्याच बैठकीत जगाचा नकाशा ढुंडाळायला सुरुवात केली. जागा किंवा देश असा हवा होता की आमच्या पाच कपल्समधलं कुणीही आधी तिथे गेलेलं नसेल. मजल दरमजल करीत आम्ही मोरोक्को या देशावर शिक्कामोर्तब केलं. कासाब्लांका, माराकेश, शेफ शॉ, सबसहारन ही सर्व नावं ऐकून माहीत होती, हॉलिवूडच्या चित्रपटांतून त्यांचं अनेकदा दर्शन झालं होतं. पण आमच्यापैकी कुणीही तिथे गेलं नव्हतं. ‌‘मोरोक्को रोड ट्रिप, स्वत: गाडी चालवूया आणि मोरोक्को पालथा घालूया' असा थोडासा ॲडव्हेंचरस विचार करून आम्ही सर्वांनी कासाब्लांका टू कासाब्लांका अशी रोड ट्रिप बूक करूनही टाकली. आपल्या टूरमध्ये नसलेलं फेज शहर कासाब्लांकावरून एका दिवसाच्या ट्रीपमध्ये कव्हर करता येईल, तेव्हा तिथेही जाऊया म्हणत आम्ही दोन दिवस आधी कासाब्लांकाला जायचं ठरवलं आणि मोठया उत्साहात आम्ही आमच्या रोड ट्रीपवर निघालो. नियोजित वेळेनुसार आम्ही मोरोक्कोमधील कासाब्लांका ह्या हॉलिवूडच्या चित्रपटाने फेमस केलेल्या आगळ्यावेगळ्या शहराच्या भूमीवर पाय ठेवला. आणखी एक देश आमच्या ट्रॅव्हल मिशनमध्ये समाविष्ट झाला. आम्ही सकाळीच पोहोचणार होतो. त्यामुळे संध्याकाळी अटलांटिक ओशन व्ह्यू वाल्या एका छानशा फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये बुकिंग केलं होतं. आता हॉटेल चेक इन पर्यंत काय करायचं ही चर्चा करीत आम्ही बॅगेज बेल्टवर उभे होतो आमच्या बॅग्जच्या प्रतिक्षेत. काही वेळानंतर आमच्या लक्षात आलं की, त्या बॅगेज बेल्टवरची गर्दी कमी झालीय आणि आमच्यापैकी एकाचीही बॅग आलेली नाहीये. जगाच्या प्रवासात काही वेळा आमच्या बॅगा अशा उशीराने येण्याचा वा हरविण्याचा प्रकार घडलेला असल्याने आम्ही मेंटली ते पटकन स्वीकारलं. मात्र आमच्या या मित्रमंडळींना ते अगदी युरोप अमेरिका इंग्लंडच्या ट्रिप्स वर्षातून अनेकदा करीत असले तरीही कधीही अशा बॅग्ज मिसप्लेस्ड व्हायच्या प्रसंगाला सामोरं जायचा योग आला नव्हता. त्यांच्यासाठी नवीन होतं ते. ‌‘अब क्या करने का?‌’ या प्रश्नाने सर्वांना ग्रासलं. सुधीर शांतपणे ऑर्गनायझरच्या भूमिकेत शिरला, आदत से मजबूर आणखी काय? सर्वांनी मिळून कम्लेंट नोंदवली. बॅगा उद्याच्या फ्लाईटने रात्री पोहोचतील कदाचित, तुम्हाला येऊन बघावं लागेल, आम्ही बॅगा हॉटेलला डीलिव्हर करीत नाही‌’ हा दुसरा धक्का पचवत हॅन्डबॅग आणि पर्स घेऊन आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो. एव्हाना एअरलाईनला लाखोली वाहून झाली होती. त्याचसोबत 'सुधीर, तुम इतने शांत कैसे रह सकते हो?‌’ हा सवालजबाबही घेऊन झाला होता.

सुधीर म्हणाला, ‌‘बॅगा आल्या नाहीत हे सत्य आहे, ते स्विकारूया आणि पुढे जाऊया. ह्याचे फायदे बघा. चेक इन पर्यंत काय करायचं हा प्रश्न होता आपल्या सर्वांना, आता तो मिटला, कारण सर्वप्रथम आपल्याला एखादा शॉपिंग मॉल किंवा युनिक्लो सारखं स्टोअर शोधायला लागेल. जिथे एकाच ठिकाणी सर्व काही मिळेल. दुसरं, आज रूममध्ये आपण सडाफटिंग जाऊ, त्यामुळे बॅगा उघडण्या-आवरण्याचा प्रश्न नाही. ‌‘लेस लगेज मोअर कम्फर्टस.‌’ सर्वांनी सुधीरला कोपरापासून दंडवत घातलं. एअरपोर्ट ते हॉटेल या मार्गात एका सॅन्डविचवर दुपारची भूक भागवून हॉटेलला पोहोचलो. आमच्या बॅगलेस ग्रुपला बघून फ्रंट डेस्कवरची मंडळी चक्रावली. रूमवर जाऊन फ्रेशन अप होऊन आम्ही बाहेर पडलो. एका मोठ्या मॉलचा रस्ता पकडला जिथे आम्हाला युनिक्लो असल्याचं गुगलवर दिसत होत. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. संपूर्ण मॉल ढुंडाळला, पण युनिक्लोचा आतापता नव्हता. गुगल चुकला होता. सर्वांनी तिथल्या काही स्टोअर्स मधून हव्या तेवढ्या जुजबी वस्तू घेतल्या आणि आम्ही शॉपिंगच्या बॅगा घेऊन फाईन डायनिंग रेस्टॉरंटला पोहोचलो. खास या इव्हिनिंगसाठी आणलेले आमचे कपडे मोठ्या बॅगमध्ये अडकल्याने आम्ही सर्वजण त्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये 'डोन्ट लाफ ॲट अस, वुई हॅव मर्सिडीज बॅक इन इंडिया' म्हणत आमच्या त्या सिंपल अशा पोशाखासह आमच्या अतिसुंदर सी व्ह्यू वाल्या टेबलवर विराजमान झालो. आता आपला पेहेराव विसरून जायचा आणि जेवणावर यथेच्छ ताव मारायचा म्हणत जेवण अशरश: हाणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निघून आम्ही फेजला पोहोचलो. प्रवास मोठा होता, पूर्ण दिवस होता आणि आल्यावर एअरपोर्टला जायचं होतं बॅगा आल्या आहेत का बघायला. एअरटॅगवर अर्ध्यांच्या बॅगा येताना दिसत होत्या आणि अर्ध्यांच्या नाही. ही अवस्था गंभीर होती. काल सर्वाच्याच बॅगा न आल्याने त्या चिंतेतही सर्व खूष होते, कारण सर्वजण तो ताप वा मनस्ताप सहन करीत होते. आज असं अर्धवट झालं तर  ‌‘दुसऱ्याची बॅग आली पण आपली आली नाही‌’ याचं दुःख असणार होतं. फेजमध्ये पुन्हा एकदा म्हणजे उतरल्यावर दुसऱ्यांदा जेवण घेतलं. खूपच छान होतं ते, पण आमच्या साऊथ इंडियन तामिलियन मित्रमंडळींना दही भात आठवला, अजून बारा दिवस जायचे होते ह्या मोरोक्कन जेवणाचे. मला आमच्या टूरवरच्या पर्यटकांचे किस्से आठवायला लागले. कितीही ऑथेंटिक लोकल फूड असलं तरी डाळभात आणि दह्याची आठवण ऐंशी टक्के भारतीयांना येतेच येते. आमचे लोकल फूडचे फसलेले प्रयोगही मला आठवले. ‌‘अरे मैने थेपला लाया है लेकिन वो बॅग में है नं, होप सो आज बॅग आ रही है।' आमची शेजारीण गीथा ची कमेंट. फेजवरून येता येता आम्हाला रात्रीचे दहा वाजले एअरपोर्टला पोहाचायला. डिनर स्किप करावंच लागलं, बॅगा महत्त्वाच्या होत्या. सुदैवाने सर्वांच्या बॅग्ज आल्या होत्या माझी एक बॅग वगळता. बरं झालं माझीच बॅग राहिली मी युज्ड टू होते ह्या सगळ्याला.

बॅगा घेऊन आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलो. खूप भूक लागली होती. गीथा ने आमची गाडी येईपर्यंतही वाट बघितली नाही, ‌‘मेरी बॅग- मेरा थेपला' अशा आविर्भावात थेपल्याची पॅकेट्स बाहेर काढली. गाडीत बसल्याबसल्या आम्ही सर्वांनी त्या थेपल्यावर आणि चटणी लोणच्यावर असा काही यथेच्छ ताव मारला की विचारू नका. आपलं स्टेटस आपली पोझिशन सर्व काही त्या थेपल्यांसमोर विसरलं गेलं होतं. बॅगा मिळाल्यापेक्षा थेपले मिळण्याचा आणि ते खाण्याचा आनंद जास्त होता.

मला आठवतंय ते दोन वर्षांपूर्वी आम्ही समधी-समधन मंडळी जपानला गेलो होतो नील हेता सोबत. हेताचे सिंगापूरचे मामा मामीही सोबत होते. हे सर्वजण गुजराती, जपानमध्ये जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून त्या दोन्ही कपल्सनी ठेपले आणि इतर पदार्थाच्या दोन मोठ्या बॅगा सोबत आणल्या होत्या. मधूनच ‌‘आज आम्हाला डिनर नको‌‘ म्हणत ते कलटी मारून रूममध्ये थेपले आणि इतरही बऱ्याच गुजराथी पदार्थांवर ताव मारीत होते. आम्हीही मधूनच त्या जपानी जेवणाचा कंटाळा आला की थेपले मागून घेत होतो. मागच्याच आठवड्यात नील, हेता, राया आणि तिला सांभाळणारी सिस्टर शायनी स्पेनला दहा दिवस जाऊन आले. केरलाइट असलेल्या सिस्टरने पन्नासहून जास्त ठेपले सोबत नेले होते, ‌‘मुझे नही जमता है रोजरोज वो पिझ्झा पास्ता' असं म्हणत.

'थेपले' हा प्रकार अल्टिमेट आहे, युनिव्हर्सल असंच म्हणता येईल. पर्यटकांच्या प्रवासातला तो एक अनिवार्य घटक ठरलाय. युरोप अमेरिकेला आपल्या मुलांना वा नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्यांच्या बॅगेत ‌‘थेपले‌’ नसतील असं होणारच नाही. विमानातल्या बॅगांच्या वजनामध्ये थेपल्यांचं वजन दुर्लक्षित करण्यासारखं नाही. गुजराती व्यावसायिक पूर्वी कामानिमित्त बाहेर जायचे त्यांच्यासोबत थेपले दिले जायचे त्यांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून. शेकडो वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली असेल, पण आजही थेपल्यांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. उलट थेपले ही मोठी इंडस्ट्री झालीय. अतिशय सुंदर पॅकेट्समध्ये थेपले मिळतात आणि आपल्या ट्रॅव्हल बॅगचा महत्वाचा भाग बनतात. महाराष्ट्रीयन बंगाली तामिळी केरळीयन या सर्वांना थेपला एकत्र आणतो असं मी म्हणेन. पूर्वी आम्हीही पर्यटकांच्या स्नॅक पॅकेट्समध्ये थेपले द्यायचो, पण कोविडनंतर आम्ही ते बंद केलं आणि लोकली मिळणाऱ्या स्नॅक्सवर भर दिला कारण जिथे जावं तिथे तिथलं काही टेस्ट करावं हा विचार. देशातून जगातून कुठूनही जॉईन होणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या आणि विमानांची वजनाची मर्यादा यामुळे पूर्वीसारखं आता टूर मॅनेजर बरोबरही ते देता येत नाही. पर्यटकही हेल्दी फूडच्या मागे लागलेत. तेलात तळलेल्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं. भारतभरातील आणि जगभरातील बऱ्याचशा पर्यटकांना आम्ही पूर्वी द्यायचो ते स्नॅक्स आऊटडेटेड वाटायला लागले. म्हणजे पर्यटक ते छानसं स्नॅक्सचं पॅकेट एअरपोर्टवर आपल्या ड्रायव्हरच्या हातात घरी घेऊन जा म्हणून परत द्यायला लागले तेव्हा कोविडमध्ये सेफ्टी म्हणून बंद झालेली स्नॅक पॅकेट्सची संकल्पना आम्ही बंदच ठेवली. पण पर्यटकांना मात्र आम्ही सांगतो की, तुम्हाला हवे ते स्नॅक्स जरूर बरोबर ठेवा. त्यात इतर पदार्थांबरोबर थेपला पण असू द्या. कारण ‌‘थेपला इज द अल्टिमेट फूड!‌’

प्रवास म्हणजे निसर्गाचा खुल्या मनाने आस्वाद!

चंद्रकांत बाबरेकर गोरेगाव, मुंबई

मी चंद्रकांत बाबरेकर. मी 2017 पासून वीणा वर्ल्ड सोबत टूर्स करायला सुरुवात केली. आजवर माझ्या त्यांच्यासोबत 15 टूर्स झाल्या आहेत. मी गोरेगाव पूर्वेला राहतो. वीणा वर्ल्डच्या अलिबागच्या ज्या प्रेफर्ड पार्टनर आहेत ती माझी पुतणी. तिच्याकडूनच मी माझ्या टूर्स बूक करतो. मला खरं तर फिरायला पूर्वीपासूनच आवडायचं, पण वयाची पंचाहत्तरी गाठल्यानंतर मी खऱ्या अर्थाने फिरायला सुरुवात केली. आता मी चौऱ्याऐंशी वर्षांचा आहे. सगळ्यात आधी मी आपलं हिंदुस्तान पहायचं ठरवलं आणि केरळपासून फिरायला सुरुवात केली. मग राजस्थान, अंदमान, नॉर्थ ईस्ट मधलं मेघालय आसाम, लेह लडाख, सिक्कीम दार्जिलिंग, डलहौसी धरमशाला अमृतसर, जोधपुर जैसलमर बिकानेर, शिमला मनाली, नैनिताल मसूरी हरिद्वार कॉर्बेट पार्क, वाराणसी अयोध्या लखनौ या टूर्स केल्या. परदेशात मी भूटान, सिंगापूर आणि नेपाळला जाऊन आलो. अंदमान निकोबारच्या टूरवर गेलो असताना हॅवलॉक आयलंड बघितलं. सिक्कीम मधला झिरो पॉइंट, नथु ला पास, उत्तरेकडचं लडाख, भूतान मध्ये टायगर नेस्ट ची चढाई, या सगळ्या गोष्टी, आजही लक्षात आहेत. अंदमानच्या टूरवर असताना आम्ही जेव्हा सेल्युलर जेलला भेट दिली तेव्हा तिथला लाईट अँड साऊंड शो भारावून टाकणारा होता.

माझ्या टूर्स मी स्वतः ठरवतो. शक्यतो एकटा स्वतंत्र खोली घेऊन राहतो. होताहोईतो टूरमध्ये कव्हर होणाऱ्या सगळ्या गोष्टी, अगदी ट्रेकिंग वगैरे पण त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतो. टूरवर माझी खरेदी अगदी जुजबी असते. माझ्या मुलीकरता किंवा नातवाकरिता मला जर काही छान गोष्ट घ्यावीशी वाटली तर मात्र ती मी आवर्जून घेतो. आता मला युरोप बघायचा आहे. भारतातली सेव्हन सिस्टर्स मधली माणिपूर, नागालँड ही राज्यं बघायची आहेत. 21 जुलैला मी बँकॉक पट्टाया फुकेत क्राबी या टूरवर जाणार आहे. माझ्यासाठी फिरणं म्हणजे निसर्गाचा उघड्या डोळ्यांनी आणि खुल्या मनाने आस्वाद घेणं. आणि मला ते फार आवडतं.

 

प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

बाली, ऑल-इन्क्लुसिव्ह फक्त ₹99000

विथ वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

सध्या सगळ्यात ट्रेंडिंग असलेल्या डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणजे बाली. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा मित्रमैत्रिणींच्या बाली हॉलिडेच्या अनेक स्टोरीज सोशल मीडियावर लाईक केल्या असतीलच. बाली ट्रेंडिंग असण्यामागे अनेक रास्त कारणं आहेत. इथे नुसते बीचेस नाहीत तर इथे राईस टेरेसेस पासून वोलकॅनिक माउंटेन्सपर्यंत आणि तन-मन प्रसन्न करणाऱ्या  प्राचीन मंदिरापासून  सांस्कृतिक समृद्धीपर्यंत सर्वकाही आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण बालीत चक्क वीस हजार मंदिरं आहेत. असं म्हटलं जातं की आजच्या काळात देखील जर का तुम्हाला प्राचीन भारत अनुभवायचा असेल तर तो भारतापासून चक्क 6000 किलोमीटर दूर बालीत अनुभवायला मिळतो. आहे की नाही आश्चर्य?  तुम्ही जर का एका एग्झॉटिक, गेटअवेच्या शोधात असाल तर बालीला पर्याय नाही. आणि आता हा पर्याय अधिक टेम्पटिंग झालाय तो वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेजच्या एअर इन्कलुसिव्ह पॅकेजमुळे, जे तुम्हाला मिळतंय फक्त 99 हजारात! ह्यात समाविष्ट आहे मुंबई ते मुंबई एअरफेअर, चार रात्रीचा कुटामध्ये स्टे आणि दोन रात्रीचा उबूदमध्ये स्टे. तुमचा उबूदमधला स्टे हॉटेल रूम मध्ये नाही बरं का, तर तो आहे चक्क प्रायव्हेट पूल व्हिलामध्ये! कपल्ससाठी तर सोने पे सुहागा, नाही का? ह्यासोबत तुमच्या ह्या हॉलिडेमध्ये आहेत आणखी बरेचसे इन्कलुझन्स जसं कल्पिका स्पा, थ्रिल्ल्ािंग रिव्हर राफ्टिंग, नुसा पेनिदा, तानाह लोट टेम्पल, बाली सफारी, आणि किंतामणी वोलकॅनो देखील. वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेजमध्ये तुमच्या कम्फर्टला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आणि त्यामुळे तुमच्या ह्या हॉलिडेमध्ये आम्ही समाविष्ट केले आहेत तुमचे प्रायव्हेट ट्रान्सफर्स, इंडियन डिनर्स, आणि काही अफलातून एक्सपीरियन्सस जसे - बाली स्विंग, उलुवातु टेम्पल, आणि तानजुंग बेनोआ वॉटरस्पोर्टसही. तर मंडळी, तुमचा ड्रीम बाली प्रायव्हेट हॉलिडे अगदी अफफोर्डेबल प्राईसमध्ये घेण्याची ही नामी संधी दवडू नका. लक्षात असू द्या, ही नेव्हर बिफोर प्राईस फक्त जुलै आणि ऑगस्ट मध्येच लागू आहे. नंतर मात्र ही प्राईस बरीच वाढेल. तर चला, आजच आमच्या टीमशी संपर्क साधा अँड मेक द मोस्ट ऑफ धिस हॉटेस्ट डील!

 

हेमिस फेस्टिव्हल

हा लडाखमधील प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रम आहे. हा हेमिस मॉनेस्ट्रीमध्ये साजरा केला जातो. ही मॉनेस्ट्री असलेले हेमिस गाव  राजधानी लेहपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे. हा फेस्टिव्हल जून-जुलैमध्ये असतो. यावर्षी फेस्टिव्हल 5-6 जुलै दरम्यान आहे. हा महान बौद्ध संत पद्मसंभव (गुरु रिनपोछे) यांच्या जन्माचा उत्सव आहे. यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्म आणल्याचे मानतात. ‌‘द चाम डान्स‌’ किंवा ‌‘द मास्क डान्स‌’ हे या फेस्टिव्हलचे आकर्षण असून हेमिस मॉनेस्ट्रीच्या कोर्टयार्डमध्ये रंगीबेरंगी पोशाख आणि मुखवटे घातलेले बौद्ध भिख्खू धार्मिक नृत्य सादर करतात. हे नृत्य वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यावेळी स्थानिक लोक पारंपारिक लडाखी पोशाख घालतात. यात चुबास म्हणजे पारंपारिक लांब अंगरखा आणि फोक्स म्हणजे इथल्या पारंपरिक टोप्या घातल्या जातात. यावेळी पारंपारिक गाणी आणि लोककलांचे सादरीकरण होते. या फेस्टिव्हलचे आकर्षण असते पद्मसंभव यांचे भव्य थांगका म्हणजे कापूस किंवा रेशमावर कोरलेले तिबेटी बौद्ध चित्र. हा थांगका उत्सवादरम्यान फडकवला जातो. अशा या फेस्टिव्हलमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायला आवडेल ना? तर मग चला!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
अनुभवावं ते नवलच!
16 mins, read

अनुभवावं ते नवलच!

Published in Sakal Saptrang. 17th May, 2026 काही प्रवास हे केवळ सुट्ट्या नसतात, तर खऱ्या अर्थाने एक एक्सपेडिशन असतात. दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका एकत्र अनुभवणं म्हणजे विरोधाभासांनी भरलेला, भव्य

व्यवहारी
16 mins, read

व्यवहारी

Published in Maharashtra Times. 17th May, 2024 ...पोटात भूक असते म्हणून डेझर्ट नाही मागवले जात, तर ती सुंदर संध्याकाळ संपू नये, जरा आणखी लांबली जावी म्हणून डेझर्टचं निमित्त केलं जातं. मात्र जेव्हा.

बाल्कन्स की बाल्टिक्स?
16 mins, read

बाल्कन्स की बाल्टिक्स?

Published in Loksatta Lokrang, 17th May, 2026 ..इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि अविस्मरणीय अनुभवांनीभरलेली ही ठिकाणं मनात कायमची घर करून राहतात. काही प्रवास संपतात, तर काही मनात कायमचे सुरू राहतात...

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top