IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

मायबोली

19 mins. read

Published in the Sunday Sakal on 03 March, 2024

मागच्या आठवड्यात कॅलिफोर्नियात सांताक्लाराला होते, आमच्या धाकट्या मुलाला राजला भेटायला. अर्धावेळ ऑफिसचं काम आणि अर्धावेळ त्याच्यासोबत टाईमपास एवढाच अजेंडा. मुलं दूरदेशी त्यांच्या कामात, आपण भारतात आपल्या व्यापात. बॅक ऑफ द माईंड आमच्यासारख्या सगळ्याच आईवडिलांची सतत प्रार्थना सुरू असते ह्या भारताबाहेर राहणार्‍या मुलांसाठी. आठवण आली की आवंढा गिळणे एवढंच आपल्या हातात. त्यामुळे हे असे आठ दिवस म्हणजे येणार्‍या वर्षभराची शिदोरी असते. असो, सो आम्ही राजसोबत चिल आऊट होत होतो. एक दिवस मी, सुनिला, सुधीर आणि राज हॉटेलमध्ये लिफ्टने रूमकडे चाललो होतो. दोन चायनीज तरूण मुलंही लिफ्टमध्ये होती, आम्ही शांतपणे त्यांचं संभाषण ऐकत होतो. म्हणजे फक्त ऐकत होतो कळत काहीच नव्हतं कारण ते चायनीजमध्ये बोलत होते. टोन ऑफ व्हॉइसवरून ती आयटीमध्ये काम करणारी सॅलरी पॅकेजवर खूश असणारी मुलं दिसत होती. आम्ही लिफ्टमधून बाहेर आल्यावर सुनिला म्हणाली, ‘ही मुलं बघ कशी त्यांच्या भाषेत दिलखुलास बोलत असतात. त्यांना किती अभिमान असतो त्यांच्या भाषेचा. ‘ सुनिलाने एका वाक्यात मोठ्या विषयाला हात घातला होता.

जगात प्रवास करताना एक गोष्ट बर्‍यापैकी लक्षात आलीय ती म्हणजे दोन चायनीज भेटले, दोन कोरियन भेटले, दोन इटालियन भेटले, दोन फ्रेंच वा जर्मन भेटले तर ते डायरेक्ट त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात करतात. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी किंवा जगाची वा बिझनेस ट्रान्झॅक्शनची भाषा म्हणून प्राधान्य मिळालेली इंग्लिश भाषा ते बाजूला ठेवतात आणि आपल्या मायबोलीत प्रेमाने गर्वाने आणि अभिमानाने बोलायला सुरुवात करतात. आपल्याकडे हाच अभिमान तामिळ लोकांमध्ये आढळतो. आपल्या स्वत:च्या भाषेवर त्यांचं अतोनात प्रेम. आपल्या रुढी परंपरा जपण्यात त्यांना खूप स्वारस्य. आपल्या देशात वा परदेशात उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थांमध्ये तामिळ लोकं पुढे आहेत हे स्टॅटिस्टिक्स सांगतं. आमच्या बिल्डिंगमध्येही बरीच तामिळ मंडळी आहेत आणि चारजण एकत्र आले की सगळ्या गप्पा तामिळमध्येच. स्वत:च्या मुलांबरोबरही तामिळमध्येच बोलणार. एवढं मस्त वाटतं त्यांचं ते तामिळ ऐकून. आणि मग मी स्वत:कडे बघते. मलाच का एवढी इंग्रजी भाषेची ओढ? आम्ही मराठी मिडीयम ओल्ड स्कूल वाले, शाळेत जी मुलं मराठीमध्ये बोलताना जास्तीत जास्त इंग्लिश शब्दांचा वापर करायची त्यांना स्टायलिश समजलं जायचं आणि मग आपल्या संभाषणातही इंग्लिश शब्द कसे येतील वा आपल्याला समोरच्यावर फेकता येतील ह्याची प्रॅक्टीस व्हायची मनातल्या मनात. कॉलेजमध्ये मोठमोठ्या इंग्लिश शाळांमधून मुलं आली आणि आमच्यासारखी फाडफाड इंग्लिश न बोलता येणारी मुलं आणखी बावचळली. इंग्लिश न येणं म्हणजे मोठा अपराध ही भावना मनात घर करून बसली त्यावेळी, म्हणजे मराठी बोलायला लाज वाटायची किंवा दबक्या आवाजात आम्ही बोलायचो. आता हू केअर्स’च्या जमान्यात आपापल्या भाषा कदाचित जास्त चांगल्या बोलल्या जात असतील इतर देशांसारख्या. पण त्यावेळी परिणाम असा झाला की ना धड मराठी ना धड इंग्लिश अशी माझी मराठी इंग्रजाळली. आमच्या वीणा वर्ल्डच्या जाहिराती आणि माझं लिखाण ह्या दोन्हीमध्ये इंग्लिश शब्दांचा मनसोक्त वापर होण्याचं मूळ कॉलेजच्या दिवसांमध्ये आहे. आपल्या अस्खलित मराठी बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या अयशस्वितेचं खापर कॉलेजवर फोडून मी नामानिराळी झाले पण वस्तुस्थिती हीच आहे. जाहिराती लिहिताना कधी त्या मराठीत सुचतात तर कधी इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुचलेल्या जाहिराती मराठी करताना गुगलचा आधार घ्यावा लागतो. किती ही अधोगती. पण लिहिणारे वाचणारे बोलणारे ऐकणारे अशा सर्वांचच थोड्याफार फरकाने असंच झाल्यामुळे आम्ही आणखी नाक उंच करून सांगतो, भाषा कोणतीही असो, संवाद साधला गेला पाहिजे’.

जगात किती भाषा आहेत रे गुगलभाऊ? असा प्रश्न विचारायची खोटी, त्याबाबतीतलं सर्व ज्ञान एका क्षणात देऊन तो मोकळा. त्याच्या आणि इतर अनेक अभ्यासकांच्या मते, जगात १९५  देश आहेत, म्हणजे हा आकडा वादातित आहे कारण कधी एखादा नवीन देश स्वातंत्र्य घोषित करतो तर कुणी छोटा देश एखाद्या बलाढ्य देशाचा अंकित होतो. ह्या सगळ्या देशांमध्ये एकूण ७१३९ भाषा बोलल्या जातात. त्यातल्या आशियामध्ये २२१५, आफ्रिकेत २१४४, अमेरिकेत १०६१ पॅसिफिक रीजन मध्ये १३१३ तर युरोपमधल्या ४४ देशांमध्ये २८७ बोलीभाषा आहेत अशी सर्वसाधारण वर्गवारी. सर्वात जास्त मूळ बोलीभाषा कोणत्या देशात आहेत हे बघता पापुआ न्यु गिनीचा पहिला नंबर लागला, त्या देशात ८४० बोलीभाषा आहेत. इंडोनेशियामध्ये ७०७, भारतात ४४७ तर चायनामध्ये ३०२. सर्वात कमी म्हणजे एकच बोलीभाषा असणारा देश आहे नॉर्थ कोरिया, बघा भाषेच्या बाबतीतही डिक्टेटरशीप. आईसलँडमध्ये दोन बोलीभाषा तर न्यूझीलंडमध्ये चार. आहे की नाही हे सर्व इंटरेस्टिंग!

जगात सर्वात जास्त वापरात असलेली भाषा अर्थातच इंग्लिश आहे पण सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे मॅन्डरिन म्हणजे चायनीज. जगातले चौर्‍याण्णव कोटी मूळ म्हणजे नेटिव्ह चायनिज लोकं ही भाषा बोलतात. त्यानंतर येते स्पॅनिश भाषा जी दोन नंबरवर आहे आणि जवळजवळ पन्नास कोटी लोकं स्पॅनिश भाषा बोलतात. त्यानंतर नंबर लागतो तो इंग्लिशचा, जवळजवळ ४० कोटी मूळ लोकं इंग्लिश भाषा बोलतात आणि वर लिहिल्याप्रमाणे नेटिव्ह आणि नॉन नेटिव्ह अशा दोन्ही लोकांमार्फत इंग्लिश भाषेचा जगात सर्वाधिक वापर होतो. इंग्लिशनंतर अरेबिक, फ्रेंच आणि आपली हिंदी ह्या तिन्हींमध्ये स्पर्धा आहे. साधारणपणे पस्तीस कोटी लोकं हिंदी भाषा बोलतात व तेवढेच अरेबिक वा फ्रेंच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहाव्या सातव्या नंबरवर आहे बंगाली भाषा. म्हणजेच आपल्या पश्चिम बंगाल आणि त्यांना लागून असलेल्या राज्यांमधले आणि बांगलादेशातले लोक त्यांच्या भाषेवर प्रेम करतात, ती भाषा बोलतात आणि पुढच्या पिढीकडे सोपवतात. बंगाली नंतर येते पोर्तुगिझ, त्यानंतर रशियन, त्यानंतर जापनिज आणि त्यानंतर पंजाबी जी पंजाबात आणि पाकिस्तानात बोलली जाते. हिंदी बोलणार्‍यांची संख्या लवकरच साठ कोटींच्या वर पोहोचतेय कारण आपली लोकसंख्या. इथे जसं बॉलिवूड चालतं तसंच हिंदीही. जगाची व्यावहारिक भाषा इंग्लिश तर भारताची हिंदी त्यामुळे आपण पहिल्या वा दुसर्‍या स्थानावर येऊ शकतो, जर भारतातले जास्तीत जास्त लोक हिंदी बोलू लागले तर. लोकसंख्या ही आपली शक्ती आहे ती अशी. पण जसा काळ जातोय तशा भाषा नामशेष होण्याची संख्या वाढू लागलीय. युरोपीयन कोलोनायझेशन, लोकांचं स्थलांतरण, नंतरचं जागतिकीकरण ही सगळी कारणं असली तरी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे होणारं भाषेचं हस्तांतरण पुर्वीसारखं दमदार पद्धतीने होत नाही हे तितकंच खरं आहे. त्याची कारणं अनेक असतील, ती पुर्णपणे रास्तही असतील पण काहीतरी नक्कीच करायला पाहिजे आणि ते इतरांनी किंवा दुसर्‍यांनी नाही तर आपण स्वत: केलं पाहिजे, आपल्या घरापासूनच सुरुवात झाली पाहिजे.

‘वसुधैव कुटुंबकम‘प्रमाणे आमचे सर्व टूर मॅनेजर्स टूरवर हिंदी भाषेत बोलतात, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या व जगातून आलेल्या एनआरआय ह्या सर्वच पर्यटकांना समजण्यासाठी सोप्पं जावं म्हणून. आम्ही टूरवर एक ‘मायबोली‘ नावाचा खेळ घेतो. पुर्वी तो फक्त वुमन्स स्पेशल आणि सिनियर्स स्पेशल टूरवरच घेतला जायचा. पण आता तो सर्वच टूर्सवर घेतला जातोय. ह्या खेळात आधी वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पण सर्वांना त्यावर बोलता येऊ शकेल अशा सोप्प्या विषयांवर चिठ्ठया तयार केल्या जातात. बसमध्ये एकदा पुढचा व एकदा मागचा असा सीट नंबर घेऊन त्यावरील व्यक्तीला एक चिठ्ठी उचलायला लावली जाते. चिठ्ठीत जो विषय असेल त्यावर त्या व्यक्तीने एक मिनिट आपल्या मातृभाषेत मायबोलीत एकही इंग्लिश शब्द न वापरता, न थांबता बोलायचं. बाकीचे सगळे पर्यटक यावेळी जज असतात, परीक्षकाचं काम करतात. इंग्लिश शब्द आला की आऊट करायचं. त्यामुळे कान एकवटून ते त्या एक मिनिटाच्या भाषणातले बोलणार्‍याचे इंग्लिश शब्द शोधत असतात. ज्यावर राज्य आलंय ते पर्यटक त्यांच्या कोणत्याही अगदी तेलुगू, तामिळ, उर्दू, पंजाबी, कन्नड भाषेतून एक मिनिट त्या विषयावर बोलत असताना इंग्लिश शब्द आला रे आला की सगळ्या पर्यटक जजेसकडून हल्लाबोल होतो आणि वक्त्याला सन्मानाने आऊट केलं जातं. काही काही वेळा वक्ता भांडायला लागतो कारण त्याच्या वा तिच्या दृष्टीने तो शब्द इंग्लिश नसतोच तो त्यांच्या भाषेतलाच शब्द असतो. इंग्लिश शब्द इतके नसानसात भिनलेत आपल्या देशातल्या सगळ्याच भाषांमध्ये की कळतही नाही तो त्या भाषेतला मूळ शब्द नाही. खूप धम्माल येते हा खेळ खेळताना. एकदा एका सिनियर्स स्पेशल टूरवर हा गेम मी घेत होते. शेवटी सर्वांनी माझ्यावरच राज्य दिलं आणि विषयही दिला. आता आली का पंचाइत. माझी भाषा पूर्ण इंग्रजाळलेली, देवाचं नाव घेतलं आणि सुरू झाले आणि देवानेच लाज राखली. एकही इंग्लिश शब्द न वापरता मी एक मिनिट बोलू शकले. किती हा पराक्रम. तुम्हीही घरात वा मित्रमंडळीत हा खेळ खेळून बघा.

भाषा वाचवणं म्हणजे आपली भाषा बोलणं, आपल्या भाषेत लिहिणं, आपल्या भाषेत वाचणं, आपल्या भाषेत ऐकणं, आपल्या भाषेतली गाणी गुणगूणणं, आपल्या भाषेवर गेम्स तयार करून ते खेळणं. आमच्या नीलची सौ ही गुजराती आहे, हेता. ती जेवढं प्रेम गुजराती भाषेवर करते तेवढंच मराठी शिकायचा प्रयत्नही करतेय. माझे आणि इतर मराठी पॉडकास्ट ऐकते, आजीशी बोलताना मराठीतच बोलायचा प्रयत्न करते. हे सगळं बघून बरं वाटतं. थोडक्यात आमच्या घरात मराठी बोलणारं एक माणूस वाढतंय. हे भाषा वाचविण्यासाठीचं छोटंसं योगदानच म्हणता येईल.

त्यावरून सुचलं की आपण प्रत्येकाने एक आपली मातृभाषा, भारतातली कोणतीही एक दुसरी भाषा आणि एक जगातली भाषा अशा तीन भाषा शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला तर एक माणूस तीन भाषा वाचविण्यासाठी अंशत: योगदान देईल. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला इंग्लिशसह चार भाषा अवगत असतील. मी हे आत्तापर्यंत केलं नाही पण इट्स नेव्हर टू लेट. माझ्यासाठी मी माझ्या तीन भाषा आजच ठरवल्या. माझी माय मराठी, दुसरी गुजराती आणि तिसरी स्पॅनिश. लेट्स स्टार्ट फ्रॉम टूडे! ठरवलं की होतं... करूयाच सुरुवात.


Know the Unknown

अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

पृथ्वीवरचे खंड हे माणसाने त्याच्या राजकीय सोयीसाठी भौगोलिक सिमारेषांचा वापर करून  केलेली विभागणी आहे. मात्र अनेकदा निसर्गाची विभागणी अगदी काटेकोर नसते आणि त्यामुळेच मग दोन खंडात पसरलेले देश पृथ्वीवर पाहायला मिळतात. असाच एक देश म्हणजे अझरबैजान. पूर्व युरोप आणि पश्चिम आशियाच्या सिमेवर हा देश वसलेला आहे, त्यामुळे हा दोन्ही खंडात थोडा थोडा विभागला गेलाय. एकीकडे कास्पियन समुद्र आणि दुसरीकडे कॉकेशस पर्वत यांच्यामध्ये हा चिमुकला म्हणजे आपल्या वेस्ट बेंगॉलपेक्षाही आकाराने लहान असलेला देश वसलेला आहे. या देशाची राजधानी बाकू ही जगातली समुद्रसपाटीखालची सर्वात लोएस्ट स्थानावरची राजधानी आहे. बाकू हे शहर समुद्रसपाटीखाली ९२ मीटर इतक्या कमी उंचीवर आहे. अतिशय वेगाने वाहाणार्‍या वार्‍यांमुळे बाकू शहराला ‘सिटी ऑफ विडंस’ असेही म्हणतात. या राजधानीच्या शहरातले ‘फ्लेम टॉवर्स’ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पर्यटकांचं आकर्षण ठरले आहेत. ओल्ड सिटी सेंटरमध्ये एका टेकडीवर उभारलेल्या या टॉवर्समधून कास्पियन सागराचा सुरेख नजारा दिसतो. या तीन टॉवर्सना फ्लेम टॉवर्स हे नाव देण्यामागे या देशाच्या नावाचा ‘अझरबैजान’ या शब्दाचा संदर्भ आहे. इसवी सनपूर्व ४ थ्या शतकात या भूमीवर ‘अ‍ॅट्रोपॅट्स’ हा शासक होता. ‘अ‍ॅट्रोपॅट्स’या शब्दाचा अर्थ ‘लॅन्ड ऑफ होली फायर’ असा होतो. या देशाच्या ‘यानार दाघ’या भागात नैसर्गिक वायूमुळे प्रज्वलीत झालेला आणि कायम जळत असलेला अग्नी बघायला मिळतो, त्यावरुन अग्निची भूमी असे नाव आले असू शकते. या अ‍ॅट्रोपसवरुनच या देशाचे नाव अझरबैजान पडल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘फ्लेम टॉवर्स’ हे नाव या देशाच्या इतिहासाशी नातं सांगतं. या तीन टॉवर्समधील सर्वात उंच ३९ मजली टॉवर हा दक्षिणेला आहे. या निवासी टॉवर मध्ये १३० लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. उत्तरेच्या कोपर्‍यातील ३६ मजली टॉवरमध्ये ३१८ रुम्सचं ‘फेअरमॉन्ट हॉटेल’ आहे. तर पश्चिमेकडचा मनोर्‍यात कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. या टॉवर्सच्या उभारणीला २००७ साली सुरवात झाली आणि २०१२ मध्ये त्यांचं बांधकाम पूर्ण झालं. या टॉवर्सचं मूल्य अंदाजे ३५० मिलीयन अमेरिकेन डॉलर्स इतके आहे. नावाप्रमाणेच या मनोर्‍यांना अग्निच्या ज्वाळांचा आकार तर दिला आहेच पण त्यांचा पृष्ठभाग एल इ डी स्क्रिन्सनी बनलेला आहे आणि या स्क्रिन्सवर अग्निच्या ज्वाळांचे दृश्य दिसते जे शहरातून कुठूनही नजरेस पडते. त्याबरोबरच या स्क्रिन्सवर अझरबैजानच्या राष्ट्रध्वजाचे रंग, राष्ट्रध्वज फडकवणारी एक व्यक्ती आणि पाण्याचे जलाशय ही दृश्येही पाहायला मिळतात. दर दोन मिनिटांनी दृश्य बदलत असल्याने हा नजारा पाहायला पर्यटक गर्दी करतात. मार्च आणि एप्रिलमध्ये वीणा वर्ल्डच्या खास अझरबैजान टूर्स आहेत, त्यात सहभागी व्हा आणि या फ्लेम टॉवर्सच्या बॅकग्राउंडवर इन्स्टाग्रामेबल फोटो घ्या.


आम्ही निघालो अंटार्क्टिकाला!

जगाच्या तळाशी असलेला, कायम बर्फाने आच्छादलेला अनोखा खंड अंटार्क्टिकाची सफर हे प्रत्येक अस्सल भटक्याचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण होतंय कारण आता आम्ही अंटार्क्टिकामध्येच क्रुझवर आहोत. आम्हाला पर्यटनाची मनापासून आवड आहे. आम्ही आजपर्यंत भारतातील ३० राज्यांना आणि जगभरातील ५७ देशांना भेट दिली आहे. आम्ही आमची पर्यटनाची आवड अगदी शिस्तबध्दपणे पूर्ण करतो. म्हणजे आम्ही दरवर्षी किमान ३ तरी सहलींना जातोच. वीणा वर्ल्डच्या नवीन सहलींकडे आम्ही दोघे जणू डोळे लावूनच बसलेलो असतो. त्यामुळेच आम्ही आत्ताच वीणा वर्ल्डच्या सप्टेंबरमधल्या न्यूझीलंड सहलींचे बुकिंग सुध्दा करून टाकले आहे. त्याच बरोबर जेंव्हा डिसेंबर मधील नॉर्दन लाइट्सची ‘स्कँडिनेव्हिया’ टूर लॉन्च होईल तेंव्हा ती सुध्दा बूक करायचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे आता तरी आमचा २०२४ चा ट्रॅव्हल प्लॅन एकदम तय्यार आहे. आणि या ट्रॅव्हल प्लॅनमधला हायलाईट आहे आता सुरू असलेली आमची ‘अंटार्क्टिका टूर ’.

जगभरातले बरेच देश पाहून झालेत पण आम्हाला ‘टर्की’ देशाने विशेष मोहविलं आहे. तिथला सुंदर निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आणि प्रेमळ स्थानिक यामुळे जगातले इतर देश पाहून झाले नं की पुन्हा एकदा टर्कीवारी करायची आम्ही ठरवलं आहे. वीणा वर्ल्डच्या सोबत पर्यटन करण्याला आम्ही प्राधान्य देतो कारण वीणा वर्ल्डचे सहल कार्यक्रम अगदी परिपूर्ण असतात. कमी दिवसांमध्ये महत्वाची पर्यटन आकर्षणं समाविष्ट असल्याने वीणा वर्ल्डची टूर नेहमीच समाधानकारक असते. शिवाय वीणा वर्ल्डचे प्रशिक्षित आणि तत्पर टूर मॅनेजर्स त्यांच्या आपुलकीयुक्त वागण्याने मनं जिंकतात असा आमचा अनुभव आहे. काश्मीरच्या सहलीत पहलगामला जेंव्हा माझा पाय मुरगळला तेंव्हा टूर मॅनेजर कुणाल गोरेकर याने ज्या आपलेपणाने मदत केली त्यामुळेच ती सहल आमच्या कायमची स्मरणात राहिली असे मी आवर्जून सांगू शकतो. तर मग आमच्याप्रमाणे तुम्हीही तुमचं ट्रॅव्हल मिशन ठरवून टाका आणि चलो, बॅग भरो निकल पडो !!

श्री. अरविंद जोशी व सौ. गीता जोशी, अहमदाबाद


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

साउथ ईस्ट एशियाच्या अगदी हृदयस्थानी असलेला देश म्हणजे ‘थायलंड’. इतिहासकाळात सयाम नावाने ओळखल्या जाणार्‍या या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे या देशावर कधीच कोणतीही युरोपिय राजवट नव्हती आणि त्यामुळेच या देशाला आपली संस्कृती तिच्या सगळ्या पैलूंसह अगदी ‘प्युअर’ रुपात जपता आली. आज जगभरात ‘थाई फुड’ खवैय्यांच्या पसंतीला उतरलेलं पाहायला मिळतं. थाई पाककलेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पाकशास्त्रात नेहमी आंबट, तिखट, गोड, खारट आणि कडू या पाचही चवींचा संगम एकाच पदार्थात निदान एकाच जेवणात साधलेला असतो. याच परंपरेतील थायलंडमधील एक लोकप्रिय डिश म्हणजे ‘पॅड क्रापाओ गाय ’ किंवा ‘फाट काप्राओ गाय ’. थाई भाषेत ‘पॅड’ म्हणजे ‘स्टर फ्राइड’, क्रापाओ म्हणजे ‘होली बेसिल’(आपली तुळस!) आणि ‘गाय’ म्हणजे चिकन. म्हणजे या डिशचे नाव बेसिलमध्ये स्टरफ्राय केलेले चिकन असे होते. थाई पाककृतींमध्ये जेंव्हा ‘पॅड क्रापाओ’ म्हटलेलं असतं तेंव्हा त्यात चिकन, पोर्क, बिफ किंवा सी फूड यातील एक काहीतरी वापरलेलं असतं आणि ते तुळशीची पानं, लसूण, मिरच्यांवर स्टर फ्राय करायचं. तयार झाल्यावर भात आणि अंड्याबरोबर ते सर्व्ह केलं जातं. हा पदार्थ थायलंडचे सम्राट रामा ७ वे यांच्या कारकिर्दीत म्हणजे १९ वे शतक संपता संपता थाई जेवणात सामावला गेला असा तज्ञांचा अंदाज आहे. या काळात चायनामधून आलेल्या स्थलांतरीतांनी ‘बेसिल’ म्हणजे तुळस ही मसाल्याचा पदार्थ म्हणून विकायला सुरवात केली आणि थाई जेवणात तुळशीचा प्रवेश झाला. पॅड क्रापाओ गाय रेसिपी ७० च्या दशकातील पाककलेच्या पुस्तकांमधून पाहायला मिळते. झटपट आणि कमी खर्चात तयार होणारा हा पदार्थ थायलंडमध्ये लोकप्रिय आहेच पण जपान तैवान मध्येही तितकाच लोकप्रिय आहे. हा पदार्थ रेस्टॉरंट वा रस्त्यावरच्या गाड्यांवरही मिळतो. मग वीणा वर्ल्डच्या साउथ ईस्ट एशिया टूरमध्ये सहभागी होऊन ‘पॅड क्रापाओ गाय’ चा स्वाद अवश्य घ्या. देश-विदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenawold.com/podcast


न मावळत्या सूर्याचा प्रदेश

शाळेत असताना आपण सर्वांनीच एका काल्पनिक विषयावर निबंध लिहिलेला आठवत असेल, ’आज सूर्य उगवला नाही तर’. आठवतायत काय भन्नाट कल्पना सुचल्या होत्या? पण कधी काळी नुसती कल्पनेतली ही गोष्ट जगाच्या कोणत्यातरी कोपर्‍यात खरोखरंच घडत असते हे पर्यटनाने आपल्याला शिकवलं. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ वर्षाचे सहा महिने फक्त रात्र आणि बाकीचे सहा महिने फक्त दिवस असं काहीसं आश्चर्यकारक वातावरण असतं. उन्हाळ्याच्या महिन्यांत जेव्हा मध्यरात्रीदेखील सूर्य आकाशात लख्ख चकाकत असतो त्यालाच म्हटलं जातं मिडनाईट सन किंवा न मावळत्या सूर्याचा प्रदेश. आता जगाच्या दक्षिणेला म्हणजे अंटार्क्टिक सर्कलच्या पलीकडे काही रिसर्च स्टेशन्स व्यतिरिक्त इतर मानववस्ती नसल्यामुळे पर्यटक तिथे जाऊ शकत नाहीत. उत्तरेकडील आर्क्टिक सर्कलच्या पुढच्या प्रदेशात राहणारी माणसं आणि तिथे जाणारे पर्यटक निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार अनुभवतात. ह्या प्रदेशात येणारी काही ठिकाणं म्हणजे अलास्का, नॉर्थ कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि रशिया. आता ह्या मिडनाईट सन ला वैज्ञानिक आणि भौगोलिक कारणं आहेतच पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पृथ्वी सूर्याभोवती काही अंश झुकून फिरते. जेव्हा हा झुकाव सर्वात जास्त असतो त्याचवेळी आपण पृथ्वीवर उन्हाळा अनुभवतो. हे होत असताना पृथ्वीचा उत्तर ध्रुव सर्वात जास्त अंश आणि जास्त काळापर्यंत सूर्यासमोर झुकलेला असतो ज्यामुळे ह्या भागात दिवसाचे चोवीस तास  सूर्यप्रकाश असतो आणि रात्र कधी होतंच नाही. आपल्याला हा फिनॉमिना आर्क्टिक रिजनमध्ये २१ जूनच्या जवळपास म्हणजेच समर सॉल्स्टिस दरम्यान वर्षातल्या मोठया दिवसांमध्ये स्पष्टपणे अनुभवता येतो. नॉर्वेमधलं स्वालबार्ड हा यूरोपमधला सर्वात उत्तरेकडचा मानववस्ती असलेला प्रदेश आहे. इथे जवळपास १९ एप्रिल पासून २३ ऑगस्ट पर्यंत सूर्य मावळतच नाही. जूनमध्ये चाललेल्या वीणा वर्ल्डच्या आर्क्टिक क्रूझ पोलर बेअर एक्सप्रेस ह्या टूरमध्ये आपण स्वालबार्डला भेट देणार आहोत आणि मिडनाईट सन पाहणार आहोत. त्याचसोबत जून मध्येच निघताहेत स्कँडिनेव्हिया मिडनाईट सन आणि आइसलँड स्कँडिनेव्हिया मिडनाईट सन ह्या टूर्स. स्कँडिनेव्हिया म्हणजे जगातल्या सर्वात हॅप्पीएस्ट कंट्रीजनी बनलेला प्रदेश, ज्यात येतात नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क हे देश. आजच veenaworld.com वर ह्या सहलींच्या अफलातून आयटिनरीज पहा आणि त्वरित बुकिंग करा कारण ह्या एक्सक्लुसिव्ह टूर्स असल्यामुळे जागा मर्यादित आहेत आणि आता फक्त काहीच सीट्स शिल्लक आहेत. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो!


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् -अनुभवसंपन्न आफ्रिका

जगातल्या सात खंडांपैकी एशिया, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड बहुतेक पर्यटकांचे सहजरित्या होतात. उरलेले तीन खंड म्हणजे आफ्रिका, साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका. त्यातला आफ्रिका खंड आपल्याला जवळ आहे आणि तसं बघायला गेलं तर तिथे जाणंही तेवढं अवघड नाही. युरोप अमेरिकेहून प्रत्येक वर्षी लाखो टूरिस्ट आफ्रिकेला भेट देतात, पण अजूनही भारतीयांकडून तसा थोडा दुर्लक्षित म्हणता येईल असाच हा खंड. आपल्याला आफ्रिकेचे एका पेक्षा एक अफलातून अनुभव घ्यायचे असतील तर वीणा वर्ल्ड कॅस्टमाईज्ड हॉलिडेज्ला पर्याय नाही. आफ्रिकेत रेग्युलर कॅन्टर व्हॅन सफारिज व्यतिरिक्त आपण बोट सफारिज, हॉर्स सफारिज, हॉट एअर बलून सफारिज, वॉकिंग सफारिज अशा अनेक गोष्टींसोबत इथलं समृद्ध वन्यजीवन पाहू शकतो. प्रत्येक वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान जवळपास वीस लाखांहून अधिक विल्डबीस्ट, झेब्रा, आणि इतर प्राणी हिरव्या गवताळ प्रदेशाच्या शोधात टांझानियाच्या सेरेंगेटीहून केनियाच्या मसाई माराकडे प्रवास करतात. ह्यालाच ‘द ग्रेट मायग्रेशन’ म्हटलं जातं आणि ते हॉट एअर बलून मधून पाहण्याचा अनुभव अजिबात चुकवता कामा नये. आता ग्रेट मायग्रेशनचा पीरियड येतोय त्यामुळे चला वीणा वर्ल्ड कॅस्टमाईज्ड हॉलिडे घेऊन आफ्रिकेला आणि निसर्गाचा-वन्यजीवांचा हा एक अफलातून   चमत्कार  बघा. आपण कदाचित ह्याआधी हेलिकॉप्टर राईड घेतली असेल पण हेलिकॉप्टर पेक्षाही एक पाऊल पुढे असते ती मायक्रोलाइट फ्लाईट. संपूर्ण ओपन एअर असलेल्या ह्या मायक्रोलाइट फ्लाईटने आपण आफ्रिकेतील व्हिक्टोरिया फॉल्सवरून फ्लाय करण्याचा चित्तथरारक अनुभव घेऊ शकतो. थ्रिलिंग अ‍ॅडव्हेंचर लँड असल्याने आफ्रिका पर्यटकातल्या साहसाला उद्युक्त करतं. ब्लॉऊक्रांस ब्रिजवरून करता येणार्‍या बंजी जम्पिंगला तोड नाही. आपण डिस्कवरी चॅनेलवर पाहिलेल्या अनेक एक्सॉटिक प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याची संधी आपल्याला फक्त आफ्रिकेतच मिळू शकते. साऊथ आफ्रिकेतील हरमानस येथे आपण जून ते ऑक्टोबरदरम्यान वेल वॉचिंगचा अनुभव घेऊ शकतो तर रवांडा मध्ये आपण जगप्रसिद्ध गोरिला ट्रेकिंगद्वारे गोरिलाजच्या अगदी जवळ जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण जर का ‘जॉज‘ ह्या मुव्ही सीरिजचे फॅन्स असू तर साऊथ आफ़्रिकेच्याच ‘गान्जबाइ‘मध्ये आपण शार्क केज डायविंग द्वारे शार्क्सच्या अगदी जवळ जाऊ शकतो. आफ्रिकेत ह्या सगळ्यासोबत आपल्याला वास्तव्याचे देखील काही माईंडब्लोईंग एक्स्पीरियन्सेस घेता येतात. मसाई मारामध्ये तब्बल एक हजार फूट उंचीवर असणार्‍या लक्झरी लॉजमध्ये किंवा टांझानियामध्ये गोरोंगोरो क्रेटरच्या रिमवर ‘अ‍ॅण्ड बियॉन्ड‘ ह्या वर्ल्ड फेमस लॉजमध्ये आपण राहू शकतो किंवा संपूर्ण आयलंडदेखील हायर करू शकतो. केनियाच्या नैरोबीजवळील जिराफ मॅनरमध्ये जिराफ्सच्या सान्निध्यात राहण्याची मजा आपण अनुभवू शकतो. असंख्य गोष्टी आहेत त्यासाठी आजच वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमशी संपर्क साधा.

March 02, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top