IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Business hours

10am - 6pm

सन, सॅन्ड अ‍ॅन्ड सी...

8 mins. read

हॉटेल चेक-इन करून मी सवयीप्रमाणे सर्वप्रथम रूममधून कुठला नजारा दिसतोय हे पाहण्यासाठी रूमच्या खिडकीजवळ गेले. पाहते तर काय, त्या रूमला लागून बाल्कनी होती. त्या बाल्कनीत उभे राहून पाहिले तर माझ्यासमोर एकही इमारत न दिसता केवळ स्वच्छ आकाश आणि समुद्राचा अप्रतिम नजारा होता. ते दृश्य पाहून सर्व दैनंदिन ताणतणाव विसरायला झाले अनं लगेच त्या पाण्यात उडी मारावीशी वाटली. गम्मत म्हणजे पुढच्या दहा मिनिटांत मी हेच केले कारण माझी रूम ही थेट समुद्रातच बांधलेली होती.

आय अ‍ॅम द किंग ऑफ द वर्ल्ड अगदी शाहरूख खान सारखे हात फैलावत मी सभोवती पसरलेल्या महासागराकडे पाहिले. आरसपानी पाण्याचा एक विलोभनीय टर्कीश असा निळा रंग होता आणि पाणी उथळ असल्याने समुद्राच्या तळाला पांढरी-शुभ्र वाळूसुद्धा दिसत होती. थंडगार वारा वाहत होता आणि आकाशाच्या व समुद्राच्या अनेक निळ्या छटांची जणू निसर्गाने खुल्या दिलाने उधळण केली होती. नुकतेच हॉटेल चेक-इन करून मी सवयीप्रमाणे सर्वप्रथम रूममधून कुठला नजारा दिसतोय हे पाहण्यासाठी रूमच्या खिडकीजवळ गेले. पाहते तर काय, त्या रूमला लागून बाल्कनी होती. त्या बाल्कनीत उभे राहून पाहिले तर माझ्यासमोर एकही इमारत न दिसता केवळ स्वच्छ आकाश आणि समुद्राचा अप्रतिम नजारा होता. ते दृश्य पाहून सर्व दैनंदिन ताणतणाव विसरायला झाले अनं लगेच त्या पाण्यात उडी मारावीशी वाटली. गम्मत म्हणजे पुढच्या दहा मिनिटांत मी हेच केले कारण माझी रूम ही थेट समुद्रातच बांधलेली होती. मालदिवज्च्या प्रसिद्ध वॉटर व्हिलास्मध्ये राहण्याचे माझे स्वप्न इथे वास्तव्य करून पूर्ण झाले होते.
वॉटर व्हिला हे जगात काही खास ठिकाणीच बघायला मिळतात आणि ह्यासाठी भारताजवळ सर्वात उत्तम डेस्टिनेशन म्हणजे मालदिवज्. आता तर डायरेक्ट फ्लाईट्स सुरू झाल्यामुळे तीन तासांच्या आतच आपण धरतीवरच्या या स्वर्गात पोहोचू शकतो. मालदिवज् हे एक परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन असले तरी एखाद्या फॅमिली हॉलिडेसाठीही तितकेच उपयुक्त आहे. आपला मालदिवज्चा हॉलिडे अगदी आपल्या मनासारखा, आपल्या स्वप्नातल्या कल्पनेला साजेसा करायचा असेल तर इथल्या रीसॉर्ट हॉटेलची निवड अगदी काळजीपूर्वक करायला हवी. मालदिवज्ची खासियत अशी आहे की, इथे एका बेटावर एक रीसॉर्ट असते. आशिया खंडापासून सुमारे १००० किलोमीटरच्या अंतरावर भारताच्या दक्षिणेकडे मालदिवज् या बेटांचा समुह स्थित आहे. साधारण २९८ स्क्वेअर किलोमीटरवर या देशाचे २२ अटॉल विखुरलेले आहेत आणि आशियातला हा सर्वात छोटा देश आहे. भारतातून मालदिवज्ला भेट द्यायला केवळ पासपोर्टची गरज आहे, व्हिसाची नाही. त्यामुळे आपला पासपोर्ट हातात असल्यावर अगदी हवे तेव्हा आपण मालदिवज्ला भेट देऊ शकतो. मालदिवज्च्या अद्भुत सौंदर्याचे रहस्य दडलंय ते त्याच्या अटॉल्समध्येे. हे अटॉल म्हणजे समुद्रातल्या कोरल रीफचा गोलाकार प्रकार. समुद्राच्या खाली एखादा ज्वालामुखी पाण्याच्या वर जेव्हा उठतो तेव्हा त्याच्याभोवती एखाद्या हातातल्या अंगठी प्रमाणे हे कोरल तयार होतात. ज्वालामुखी उसळून झाल्यावर देखील अनेक काळानंतर ती कोरलची रिंग तशीच राहते व यालाच अटॉल म्हणतात. विमानातून एअरपोर्टवर लँडिंग करतानासुद्धा अरेबियन सी मध्ये असे गोल गोल बेटांचे रिंगज् दिसू लागतात. या २२ अटॉल्स अंतर्गत जवळ- जवळ १२०० बेटं तयार झाली आहेत. पांढर्‍या-शुभ्र वाळूला लागून हिरवीगार झाडे, त्यासभोवती फिक्क्या निळ्या रंगाचे पाणी आणि भोवताली पसरलेला अथांग गडद निळ्या रंगाचा समुद्र अशा अद्वितीय सौंदर्याने मालदिवज्चं प्रत्येक बेट सजलेलं आहे. आणि या प्रत्येक बेटावर एकच हॉटेल रीसॉर्ट असल्यामुळे आपल्याला इथले हॉटेल निवडण्यात बराच वेळ द्यायला हवा. त्यातून आपण जेव्हा युरोप-अमेरिकेसारख्या ठिकाणी भेट देतो तेव्हा आपली आयटिनरी अनेक स्थलदर्शनांनी गच्च भरलेली असते. म्हणूनच हॉटेल काय केवळ रात्री झोपण्याइतकेच महत्त्वाचे आहे,असा बर्‍याच मंडळींचा समज असतो. पण तेच लॉजिक मालदिवज्ला मात्र लागू पडत नाही कारण आपले इथले सर्व स्थलदर्शन हे हॉटेलमध्येच घडते.
मालदिवज् म्हणजे एक खराखुरा रीलॅक्सिंग हॉलिडे! तेव्हा आपल्या जीवनसाथी सोबत किंवा आपल्या कुटुंबाबरोबर क्वालिटी टाईम घालवण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. मालदिवज्ची राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय हवाई आवर आपले विमान लँड होते आणि इथूनच आपल्या हॉलिडेची सुरुवात होते, आपल्या रीसॉर्टवर जाण्याआधीच. आपण कुठल्या हॉटेलची निवड केली आहे त्याप्रमाणे आपला पुढचा प्रवास हा स्पीड बोट किंवा सी-प्लेनने केला जातो. स्पीड बोट ट्रान्सफर अर्थातच सी-प्लेनपेक्षा किफायती ठरतं पण सी-प्लेन फ्लाइट घेऊन त्या सुंदर बेटंावरून उडत आपल्या हॉटेलकडे लँड करताना आपण थेट पाण्यातच उतरतो आणि हा रोमांचक अनुभव एकदातरी घ्यायला हवा. तसेच जे हॉटेल्स माले शहरापासून लांब आहेत त्या हॉटेल्सपर्यंत पोहोचायला सी-प्लेन किंवा हेलिकॉप्टरच घ्यावं लागतं. जितके आपले हॉटेल काँक्रिटच्या डेव्हलप्ड जगापासून दूर असेल तितकेच ते आपलं अप्रतिम निसर्गसौंदर्य जपून असेल असे म्हणायला हरकत नाही.
मालदिवज्च्या बहुतेक रीसॉर्टस्वर बीच बंगलोस् आणि थेट पाण्यावर बांधलेल्या वॉटर व्हिलास्ची निवड करता येते. रीसॉर्टला लागूनच बांधलेल्या हॉटेल रूम्स या बीचवर किंवा हॉटेलच्या गार्डनकडे फेसिंग रूम्स व स्वीट रूम्स स्वरूपाच्या असतात. बहुतेक लहान मुलांना बीचवर वाळूत खेळायला व पाण्यात डुंबायला आवडत असल्याने बीचवरच्या रूम्स या बर्‍याच वेळा फॅमिलीस् पसंत करतात. मोठ्या फॅमिलीसाठी दोन-तीन बेडरूम्सचा व्हिलासुद्धा मिळू शकतो. आणि लगूनच्या पाण्यात बांधलेल्या वॉटर व्हिलास् ह्या हनिमून कपल्सच्या फेव्हरेट ठरतात. अनेक फॅमिलीस्सुद्धा आपल्या आवडीनुसार वॉटर व्हिलासला पसंती दर्शवितात. त्यात पुढे काही रीसॉर्टवर सनराईस् व सनसेट वॉटरव्हिलाचा चॉईस असतो. आपल्याच रूममध्ये बसून उगवत्या अथवा मावळत्या दिनकराला वंदन करीत निसर्गाच्या सौंदर्याची झलक अनुभवताना कमाल वाटते.
मालदिवज्मधल्या अनेक रूम्सना प्रायव्हेट पूलदेखील जोडलेला असतो. समुद्राच्या खार्‍या पाण्यात पोहून पोट भरले की आपल्या प्रायव्हेट पूलमध्ये पोहण्याची मजा घेऊ शकतो. अगदी 3 स्टार पासून कल्पनेपलिकडील सोयींनी सुसज्ज 5 स्टार हॉटेल्स् आपल्याला मालदिवज्मध्ये बघायला मिळतात. असेच एक विलक्षण रीसॉर्ट म्हणजे लक्झुरियस सोनेवा जानी रीसॉर्ट. दोन मजल्यांमध्ये पसरलेले इथले एक बेडरूमचे वॉटर व्हिला म्हणजे लक्झरीचा उच्चांक म्हणायला हरकत नाही. या वॉटर व्हिलामध्ये सनबाथिंग व समुद्राच्या सौंदर्याला सामावून घेण्यासाठी प्रायव्हेट पूल व मोठे डेक्स तर आहेतच, शिवाय आपल्या मास्टर बेडरूमच्या छताला उघडून आपल्या बेडवरून तार्‍यांच्या सान्निध्यात रात्र घालवू शकता. मुलांसाठी वेगळी झोपण्याची जागा असून इथे वॉक-इन मिनीबार, बाथरूम, ड्रेसिंग रूम, आऊटडोअर शॉवर व लिव्हिंग एरिया आहे. या रीसॉर्टची खासियत म्हणजे वरच्या बाजूला रूफ डेक व डायनिंग एरिया सोबतच एक नागमोडी वॉटर स्लाईड आहे ज्यावर बसून आपण थेट पाण्यात घसरगुंडीवरून स्लाईड करत पोहू शकतो. लहान मुलांनाच काय तर मोठ्या माणसांमध्ये दडलेल्या लहान मुलालासुद्धा हा मोह कसा बरं आवरता येईल!
प्रत्येक रीसॉर्टची स्वतःची एक वेगळी ओळख इथे बघायला मिळते. कॉनरॅड या लक्झरी रीसॉर्टमध्ये इथा या रेस्टॉरंटने लक्झरी डायनिंगचे एक वेगळेच उदाहरण जगाला दाखवून दिले आहे. समुद्राच्या पाच मीटर खाली जगातील पहिल्या अंडर-सी रेस्टॉरंटमध्ये बसून सभोवती पॅनोरॅमिक कोरल व्ह्यू बघत वेगवेगळ्या फ्यूसन मेन्यूस् व वाईन्सचा आस्वाद आपल्याला घेता येतो. इथे आपण खास सेलिब्रेशन व लग्नासाठीसुद्धा हे रेस्टॉरंट खाजगी जेवणासाठी बूक करू शकता. मालदिवज्च्या या सर्व रीसॉर्टस्मध्ये सकाळ ते संध्याकाळ अनेक वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा प्लॅन आपल्याला मिळतो व आपल्या आवडीनुसार आपण त्यात सहभागी होऊ शकतो. अनेक मोटराईज्ड व नॉन मोटराईज्ड वॉटर स्पोर्टस्चा आनंद इथे घेता येतो. कयाकिंग, जेट-स्की, वॉटर स्कीइंग, पॅडल बोर्डिंग, वेकबोर्डिंग, विंड सर्फिंग, सी-स्कूटर राईडस् बरोबर डायविंग, स्नॉर्केलिंग, ग्लास बॉटम बोट आणि कॅटामराम सेलिंग सारख्या अनेक वॉटर स्पोर्टस्चा चॉईस आपल्याला इथे आहे. आम्ही बोटीतून सैर करत असताना स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने मी सहज उघड्या डोळ्याने पाण्यात डोकावले तर इतके सुंदर कोरल्स व मासे दिसत होते की चक्क पाण्यात उतरण्याचीही गरज नव्हती. त्याचबरोबर स्पा ट्रीटमेन्ट, फिटनेस सेंटर, योगा, स्विमिंग पूल्स, खास मुलांसाठी किड्स क्लब, वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स या सर्वांनी आपला हॉलिडे परिपूर्ण होतो. रोमँटिक हॉलिडेसाठी तर मालदिवज्च्या रीसॉर्टस्मध्ये अनेक प्रायव्हेट एक्सपीरियन्सेस आहेत. यातला एक खास अनुभव म्हणजे आपल्या स्वतःच्या एका ट्रॉपिकल आयलंडवर प्रायव्हेट आयलंडची मजा घ्या. त्या बेटावर दुसरे कुणीही नसेल. केवळ आपल्यासाठी हॉटेलची टीम पिकनिक बनवून देते, तेव्हा हवं असेल तर फक्त तुमच्या मनासारखा आराम करा किंवा स्नॉर्केलिंगची मजा घ्या. तसेच अनेक रीसॉर्टवर आपण प्रायव्हेट डायनिंगचा आनंद घेऊ शकता. इथे तुमच्या स्वतःच्या प्रायव्हेट शेफ बरोबर उत्कृष्ट जेवणाचा स्वाद घ्या किंवा इथल्या ट्रेडिशनल धोनी बोटीवर दोघांची प्रायव्हेट डिनर क्रुझ एन्जॉय करा.
फॅमिली हॉलिडे असो वा हनिमून आपल्या मनासारखा परफेक्ट हॉलिडे हा भारताच्या जवळच आपली वाट पाहतोय. काही मंडळी बरेच वेळा हॉटेल रूमसाठी एक बजेट ठरवून टाकतात की शंभर-दोनशे डॉलरच्यावर हॉटेलसाठी खर्च नाही करायचा. हे गणित इतर जगासाठी योग्य ठरेलसुद्धा पण मालदिवज्साठी नाही. मालदिवज्चा हॉलिडे प्लॅन करताना आपली आवड, तिथल्या सोयी व खास अ‍ॅक्टिव्हिटीस् आणि बजेट ह्या सर्वांचाच विचार केलात तर एक उत्तम हॉलिडे घेता येईल. त्यात भारतातून आता आकर्षक किमतीत थेट फ्लाइट्स उपलब्ध असल्याने फ्लाइटवर पैसे वाचवून ते हॉलिडेमध्ये गुंतवा. आणि चला, भारताजवळच्या सन, सी अ‍ॅन्ड सॅन्डने नटलेल्या नंदनवनाला, अर्थात ममालदिवज्ला भेट द्यायला.

December 01, 2019

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top