तुमच्याकडे युएसए व्हिसा आहे?

0 comments
Reading Time: 9 minutes

अमेरिकेचा व्हिसा मिळाला की जग जिंकल्याचा आनंद होतो, आणि का होणार नाही कारण एकदा व्हिसा आपल्या पासपोर्टवर आला की इतर देशांच्या कॉन्स्युलेट्सचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. अनेक देशांची दारं आपल्यासाठी खुली होतात. ह्या व्हिसाच्या दोन गोष्टी मला आवडतात. अर्ज केल्यानंतर मुलाखतीच्या दिवशीच आपल्याला हो की नाही ते सांगतात, ताटकळत ठेवीत नाहीत, जीव टांगणीला लागत नाही. एकदा मिळाला की जनरली दहा वर्षाचा व्हिसा मिळून जातो, मग कितीही वेळा युएसएसारख्या खंडप्राय देशाची वारी करायला आपण मोकळे.

मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला संकुलातील युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कॉन्स्युलेटचा अवाढव्य परिसर बघितला की आपण आश्‍चर्यात पडतो. रोज इथे आपल्या भारतीयांमधलं कुणी अत्युच्च आनंदाच्या शिखरावर चढतं तर कुणी निराशेच्या गर्तेत ढकललं जातं. कारण इथे तिथल्या तिथे कळतं व्हिसा मिळाला की नाही. कॉन्स्युलेटमधून बाहेर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आपल्याला बरंच काही सांगून जातो. युएसएचा व्हिसा पासपोर्टवर असणं हा स्टेटस् सिम्बॉल होता, आहे, आणि राहील. आपल्या भारतातीलच नव्हे तर जगातल्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीला युएसएमध्ये जायचं असतं. कुणाला स्थायिक व्हायचं असतं तर कुणाला आयुष्यात एकदातरी तिथे भेट द्यायची असते. आणि का असणार नाही? लँड ऑफ फ्री म्हणून ज्याला संबोधलं जातं तो हा देश जगातील वेगवेगळ्या देशांतून आलेल्या लोकांनी मिळूनच बनलेला आहे नाही का. लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज् ठरलेल्या ह्या देशात आपल्या देशातल्याही अनेकांनी जाऊन नाव काढलंय, भविष्य घडविलंय, आयुष्य बर्‍यापैकी सोप्पंही केलंय. चाळीसच्यावर काऊंटर्स आहेत बीकेसीच्या युएस कॉन्स्युलेटमध्ये, त्यावरूनच आपल्याला कल्पना येते किती डिमांड आहे या देशाच्या व्हिसाला. एकूण काय तर युएसए व्हिसा हा जगातल्या प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा भाग आहे. अमेरिकन नागरिकत्त्व ज्याच्याकडे आहे त्याला जगाच्या अनेक देशांची दारं खुली असतात, त्यांना व्हिसा करावा लागत नाही.

आपल्या भारतीयांच्या बाबतीत म्हटलं तर, एकदा का युएस व्हिसा आपल्या पासपोर्टवर आला की इतर देशाच्या कॉन्स्युलेट्सचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. साऊथ वा सेंट्रल अमेरिकेतल्या काही देशांमध्ये फ्री एन्ट्री आहे तुमच्या भारतीय पासपोर्टवर युएस व्हिसा आला की. फायदे अनेक आहेत आणि त्यामुळेच आपल्याकडच्या व इतर देशातल्या प्रत्येक मोठ्या शहरात युएस कॉन्स्युलेटचा दबदबा आहे.

युएसए व्हिसा ही वीणा वर्ल्डसाठीही महत्त्वाची गोष्ट. हजारो पर्यटक दरवर्षी वीणा वर्ल्डतर्फे युएसएच्या सहलींना जातात. व्हिसा देणं किंवा न देणं हे जरी संपूर्णपणे युएस कॉन्स्युलेटच्या हातात असलं तरी त्यासाठी संलग्न असलेल्या सर्व गोष्टींची माहिती, अपॉईंटमेंट्स, डॉक्युमेंेटेशन ह्या गोष्टींसाठी आमची व्हिसा टीम पर्यटकांना मोलाचं सहकार्य करीत असते. मुख्य म्हणजे पर्यटकांच्या मनातली ह्या व्हिसासंबंधीची भिती काढून टाकली जाते. अनेकांना जेव्हा या व्हिसाचं टेंेंशन येतं तेव्हा आम्ही म्हणतो की, हा व्हिसा करणं तसं बघायला गेलं तर सोप्प आहे. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं काम चालतं. बायोमेट्रिक आणि पर्सनल इंटरव्ह्यू ह्या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. इंटरव्ह्यूची अपॉइंटमेंट घेताना आपल्याला म्हणजे जे पर्यटक म्हणून जाणार आहेत त्यांना टूरिस्ट व्हिसा मिळविण्यासाठी काही डीटेल्स भरावी लागतात. ती व्यवस्थित भरली की काम सोप्प होऊन जातं. इथे एकच लक्षात ठेवायचं ते म्हणजे आधी जाऊन आलेली किंवा न गेलेली मंडळीही आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले देतात, गोंधळवून टाकतात किंवा घाबरवतातही. साधारणपणे सल्ले असतात ते, तुमचं कुणी तिथे आहे ते सांगूच नका, ट्रॅव्हल कंपनीतर्फे जा म्हणजे व्हिसा मिळतो… ह्या सल्ल्यांपासून दूर रहायचं. खरं बोलायचं, खरं लिहायचं आणि आत्मविश्वासाने इंटरव्ह्यूूला सामोरं जायचं. ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेलं की व्हिसा मिळतो ह्या गैरसमजूतीचा फायदा घेऊन काही कंपन्यांनी पूर्वी बक्कळ संपत्ती जमा केल्याची उदाहरणंही आम्ही पाहिली आहेत. जर आपल्या मनात काही शंका असेल तर सरळ युएस कॉन्स्युलेटच्या वेबसाईटवर जायचं आणि तिथे अतिशय छान स्वरूपात, सोप्या प्रकारे माहिती दिलीय ती वाचायची. व्हिसा देण्यात किंवा न देण्यात ट्रॅव्हल कंपन्या काहीही करू शकत नाहीत, हे लक्षात घ्यायचं. अर्थात आम्हा ट्रॅव्हल कंपन्यांचं काम हे व्यवस्थित मार्गदर्शनाचं, आणि ते आम्ही चांगल्या तर्‍हेने पार पाडीत असल्याने अमेरिकेतही वीणा वर्ल्डचे पर्यटक आपल्याला मोठ्या संख्येने दिसतात हा भाग वेगळा. आणखी एक बर्‍याच पर्यटकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे युएसए व्हिसा करण्यासाठी एअर तिकीट लागत नाही तुम्ही कधीही युएसए व्हिसा करून ठेवू शकता. आमचा सल्ला आमच्या पर्यटकांना असा असतो की, किमान सहा ते आठ महिने आधी सहलीचं बुकिंग करा आणि लागलीच व्हिसा करून घ्या. कारण जशा सुट्ट्या जवळ येतात, स्टुडंट ट्रॅफिक वाढायला लागतो तशी कॉन्स्युलेटमधली गर्दी वाढायला लागते. इंटरव्ह्यूच्या डेट्स मिळणं कठीण व्हायला लागतं. कधी-कधी तीन ते चार महिन्यानंतरची डेट आपल्याला मिळते इंटरव्हयूची आणि आपलं टेंशन वाढायला लागतं. त्यामुळे नुसतं मनात आलं असेल युएसएला जायचं तरी सहलीचं बुकिंग करून व्हिसा करून घ्या. आम्ही त्यात आणखी एक सवलत दिलीय ती म्हणजे तुम्ही आत्ता बुकिंग केलंत, व्हिसा करायला गेलात आणि समजा युएसए व्हिसा तुम्हाला मिळाला नाही तर ह्या वर्षीच्या एकतीस डिसेंबरपर्यंत कोणतंही कॅन्सलेशन न लागता व्हिसा फी वगळून बाकीची रक्कम ही कोणत्याही दुसर्‍या सहलीकडे वळवता येईल. सो पर्यटकहो, युएसए व्हिसा ही निश्‍चित महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या अमेरिकेच्या सहलीसाठी, पण त्याचा ताण येऊ देऊ नका. सहल ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी लागणारी व्हिसाची प्रक्रीयाही आपण आनंदात पार पाडूया. सो, डोन्ट वरी, बी हॅप्पी! वीणा वर्ल्ड है ना।

एकदा का अमेरिकन व्हिसाचं टेंशन घ्यायचं नाही हे ठरलं की पुढचा महत्त्वाचा प्रश्‍न असतो तो म्हणजे, कोणती सहल निवडायची? कारण आमच्याकडे सहलीचे पर्यायही जास्त आहेत. त्यामुळेच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं जरूरीचं आहे. युएसएमध्ये जाणार्‍या पर्यटकांचे सात प्रकार आहेत. पहिला प्रकार फक्त पर्यटनासाठी म्हणजे युएसए सहल करण्यासाठी जाणारे पर्यटक जे त्या सहलीला टूर मॅनेजरसोबत युएसएला जातात आणि टूर मॅनेजरसोबतच भारतात परत येतात, अमेरिका बघणं हा त्यांचा हेतू असतो. दुसरे पर्यटक असतात ते इथून टूर मॅनेजरसोबत सहलीला निघतात आणि सहल संपल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्या अमेरिकेतील (युएसएला ढोबळमानाने आपण अमेरिका असंच संबोधतो.) मुलामुलींकडे किंवा नातेवाईकांकडे जाऊन राहतात, आणि काही दिवसांनी भारतात परत येतात. ह्यामध्ये ज्यांना प्रवासाचा खूप अनुभव नाही अशी मंडळी परतीच्या प्रवासाची तारीख वीणा वर्ल्डच्या एखाद्या पुढच्या सहलीच्या परतीची घेतात आणि ते जर शक्य झालं म्हणजे त्या सहलीच्या तारखेत काही अपरिहार्य बदल झाला नाही तर परतीच्या प्रवासातही सोबत मिळते टूर मॅनेजरची. तिसर्‍या प्रकारातले पर्यटक असतात ते त्यांना हव्या असलेल्या सहलीच्या आधी इथून निघतात, प्रथम आपल्या आप्तांकडे जातात आणि नियोजित सहलीच्या पहिल्या दिवशी सहल जिथून सुरू होणार असते तिथे टूर मॅनेजरच्या संपर्कात राहून जॉईन होतात आणि सहल संपल्यानंतर टूर मॅनेजरसोबत भारतात परत येतात. चौथ्या प्रकारातली पर्यटक मंडळी ही युएसए मध्येच असतात जी तिथे पाच-सहा महिन्यांसाठी गेलेली असतात किंवा एनआरआय असतात, ते तिथे आपल्या सहलीत पहिल्या दिवशी सहभागी होतात आणि शेवटच्या दिवशी सहल सोडतात. ह्या पर्यटकांना आम्ही जॉइनिंग लिव्हिंग गेस्ट म्हणतो. त्यांच्या सहलीची किंमतही वेगळी असते.

जे पहिल्या प्रकारचे पर्यटक आहेत त्यांचा काही प्रश्‍न नसतो कारण ते टूर मॅनेजरसोबत जातात आणि टूर मॅनेजरसोबत परत येतात पण जे एकदा किंवा दोन्ही वेळी जॉईन होतात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचीय आणि ती म्हणजे, सहलीत सहभागी होताना किंवा सहल संपल्यावर जो काही युएसएमधला इंटरनल एअर ट्रॅव्हल तुम्ही करणार आहात त्यासाठीचं एअर तिकीट तुम्हाला करावं लागतं, ते तुम्ही कधीही नॉन रीफंडेबल प्रकारचं तिकीट करू नका. आजकाल अनेक घडामोडी आपण बघतो, सहसा होत नाही पण काही अपरिहार्य कारणासाठी जर मुख्य सहलीची तारीख बदलावी लागली तर ते तिकीट बदलून घेता येतं. नॉन रीफंडेबल तिकीट असलं तर तुमचे पैसे वाया जातील. प्रीकॉशन इज बेटर दॅन क्युअर.

जास्तीत जास्त पर्यटक हे वरच्या चार प्रकारात येतात पण आता आणखी एका पाचव्या प्रकारच्या पर्यटकांची संख्या वाढायला लागलीय ती म्हणजे युएसला दुसर्‍यांदा किंवा तिसर्‍यांदा जाणारे पर्यटक. युएसएचा व्हिसा ही सोपी चांगली गोष्ट आहे हे मी नेहमी म्हणते, त्याला आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे युएसए व्हिसा हा सर्वसाधारणपणे दहा वर्षाचा मिळतो, मोस्ट जनरस कंट्री असंच म्हणता येईल. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा युएसएला जाऊ शकता. अर्थात नियमानुसार इमीग्रेशन स्टॅम्पवर जी तारीख असते, त्या तारखेपर्यंतच रहायचं, कधीही ओव्हर स्टे करायचा नाही. तर ज्यांच्याकडे असा दहा वर्षांचा व्हिसा आहे ती मंडळी ह्या अवाढव्य खंडप्राय अमेरिकेच्या (USA) वेगवेगळ्या सहली वेगवेगळ्या वेळी करतात. अ‍ॅक्च्युअली त्यांच्यासाठी आम्ही नवनवीन सहलीही आणल्या. काहींना एकाच वेळी मोठी सहल करणं झेपत नाही किंवा आवडत नाही त्यांना आम्ही फक्त ईस्ट कोस्ट युएसएची, फक्त वेस्ट कोस्ट युएसएची, वेस्ट कोस्ट येलोस्टोन माऊंट रश्मोरची, कॅलिफोर्निया कार्निव्हलची किंवा अटलांटा फ्लोरिडा कीजची सहल घ्यायला सांगतो. आणखी सहाव्या प्रकारचे पर्यटकही आहेत युएसएला जाणारे ते म्हणजे कॉम्बिनेशन सहल करणारे. युरोप-अमेरिका, अमेरिका- अलास्का, अमेरिका-कॅनडा, अमेरिका- हवाई मेक्सिको इ. दोन सहलींच्यामध्ये किंवा सहली संपल्यानंतर ते आपल्या आप्तांकडेही राहतात. काहीवेळा आणखी एक गोष्ट पर्यटक करतात ती म्हणजे इथून भारतातून आई-वडील एखाद्या युएसए सहलीला निघतात आणि त्याच सहलीला अमेरिकेत राहणारी मुलं जॉईन होतात. फॅमिली गेट टुगेदर ऑन टूर.

युएसएमध्ये वर्षभर काहीना काही सुरू असतं त्यामुळे आपण कधीही जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो. दरवर्षी न्यू ईयरसाठीही वीणा वर्ल्डची युएस सहल असते. नासा, ओरलँडो, ऑटम कलर्स, चेरी ब्लॉसम, यलोस्टोन- युसूमिटी-ब्राईस नॅशनल पार्क, नायगारा फॉल्स, बहामाज क्रुझ… बहुतेक सहलीत नायगारा फॉल्स हेलिकॉप्टर राईडही समाविष्ट आहे. सध्या युरोप युएसए 2020 ऑफर सुरू आहे त्याचा फायदा अनेक पर्यटकांनी ऑलरेडी घेतलाय. आपण मागे राहू नका.

एकदा का युएसए व्हिसा हातात आला की अनेक प्रकारची कॉम्बिनेशन्स शक्य आहेत. सो, जर अजून युएसए व्हिसा तुम्ही काढला नसेल तर लागूया आता त्या तयारीला. चलो, बॅग भरो, निकल पडो! ह्यावेळी मिशन युएसए!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*