Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

रीलॅक्स रीफ्रेश रीज्युव्हीनेट-टाईम फॉर अ रीअल हॉलिडे!

8 mins. read

एरवी आपल्याला जे काही आपल्या शहरात सहजपणे करता येत नाही ते सर्व करून टोटली रीफ्रेश होणे ह्यालाच खरा हॉलिडे म्हणतात नाही का! आमचा हॉलिडे उत्कृष्ट ठरला आणि हो हॉलिडेची कुठलीच आयटिनरी किंवा तपशीलवार प्रोग्राम नव्हता बरं का! पण आयटीनरी नसली तरी तसा फावला वेळ कुठेच नव्हता कारण काहीही बघायचे नाही असे ठरविले तरी याचा अर्थ काहीही करायचे नाही असा नसतो ना?

इट वॉज द बेस्ट हॉलिडे एव्हर! काही आयटीनरीच नव्हती. हाऊ कूल इज दॅट साराचे तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवर संभाषण सुरू होते. माझ्या सोळा वर्षाच्या मुलीला शिमला कूल वाटेल असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. अर्थात शिमला खरंच कूल होते. गुलाबी थंडी काय असते हे शिमल्याला अनुभवायला मिळालं. त्यात पावसाळी ढगांची चादर ओढलेल्या पर्वतरांगा, सभोवती दिसणारी हिरवळ आणि भारतीय हॉस्पिटॅलिटी अशा संमिश्र वातावरणामुळे आमचा हॉलिडे उत्कृष्ट ठरला आणि हॉलिडेची कुठलीच आयटिनरी किंवा तपशीलवार प्रोग्राम नसला तरी काय झाले? खरंतर हेच तर आमचा हॉलिडे यशस्वी होण्याचे कारण होते.

वीणा वर्ल्डच्या चारही डायरेक्टर्सचे ट्रॅव्हल प्लॅन्स लक्षात घेऊन म्हणजेच आम्हा सर्वांच्या मोकळ्या तारखा लक्षात घेऊन एकत्र फॅमिली हॉलिडे प्लॅन करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. प्रत्येकजण तितकाच व्यस्त आणि जगभ्रमंती करण्यात एक्सपर्ट. ह्यावर्षी जेमतेम चार दिवस मिळाले जेव्हा आम्ही चौघंही मोकळे होतो आणि म्हणून आम्ही एक शॉर्ट ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आणि तोसुद्धा पावसाळ्यात. जगातील अनेक डेस्टिनेशनची चर्चा केल्यानंतर जेव्हा शिमल्यात चार दिवसांचा छोटासा हॉलिडे घेण्याचे ठरले तेव्हा आमच्या टीमला थोडं आश्‍चर्यच वाटलं. शिमला! प्रत्येकजण आश्‍चर्याने विचारत होता.

पण  यावेळी मात्र आपल्या देशातच हॉलिडे घेण्यावर आम्ही सगळे ठाम होतो. जरी वेळेचा अभाव असला तरी भारतात आपल्याला केवळ दोन तासांच्या विमानप्रवासाने अनेक पर्यटनस्थळं गाठता येतात. यंदा शिमल्यामधील ऑबेरॉय ग्रुपच्या वाईल्ड फ्लॉवर हॉलमध्ये वास्तव्य करण्याचे आम्ही ठरवले. कलोनियल भारताची आठवण करून देणारे वाईल्ड फ्लॉवर हॉल हे शिमल्याच्या मशोब्रा या प्रांतातल्या छोट्याशा छराब्रा गावात उंच उभे असलेले सुंदर हॉटेल. हिमालयाच्या अनेक पर्वतरांगांनी वेढलेले हे मशोब्रामधील अतिशय सुंदर हॉटेल. स्वातंत्र्यापूर्वीच्या इंडियन आर्म्ड फोर्सेसच्या कमांडर लॉर्ड किचनरच्या पूर्वीच्या निवासस्थानी या हॉटेलचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वी दोनवेळा आगीमुळे जळून खाक झालेल्या इमारतीच्या जागेवर भारत सरकारने ऑबेरॉय हॉटेल्सबरोबर एक अतिशय सुंदर लक्झरी हॉटेल बांधून इथल्या निसर्गसौंदर्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांना जणू एक जागा गिफ्ट केली आहे.  चंदिगढ एअरपोर्टवरून वाईल्ड फ्लॉवर हॉलकडे पोहोचता पोहोचता जसजसे आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो तसतसे आपल्याल्या आपल्या भारतवर्षाच्या निसर्गसौंदर्याची कमाल वाटू लागते. इथल्या दर्‍याखोर्‍यांमध्ये तयार केलेले टेरेस फार्मस्, हिरव्या रंगाच्या असंख्य छटा व क्षणोक्षणी चालणारा उन-पावसाचा खेळ एक मंत्रमुग्ध करणारं चित्र निर्माण करतात. भारतात प्रवास करताना इनोव्हा गाडी ही सर्वात उत्तम ठरते त्यामुळे दोन इनोव्हा गाड्यांमध्ये आम्हा सहा जणांची फॅमिली आपल्या प्रवासावर निघाली. नेहमीप्रमाणे कोण कुठल्या गाडीत बसणार यावरून भांडणं झाली आणि चर्चेअंती असा निर्णय झाला की, कारण अंतर कमी आहे, आपण रोज कार सीट्स रोटेशनवर ठेवूया. असं म्हणत आमची गाडी निघाली. चौघे एका गाडीत बसलो तर हॉलिडेवरसुद्धा कामाच्याच गप्पा होतील ही छोट्यांना काळजी होती.

वाईल्ड फ्लॉवर हॉलला पोहोचायला आम्हाला तसा उशीरच झाला त्यामुळे अंधारात सभोवतीच्या परिसराचा काहीच अंदाज आला नाही. पण उतरताच फुलांच्या मंद गोड सुवासाने आमचे स्वागत केले. जरी ते हॉटेल परत बांधण्यात आले असले तरी कलोनियल भारताची आठवण करून देणारे, एखाद्या लॉर्डचे घर शोभेल असेच त्याचे इंटिरियर आहे. कुठेही कमर्शिअल टच नाही आणि एखाद्याच्या घरी स्वागत व्हावे त्याप्रमाणेच इथे अगत्यशीलपणे आमचे स्वागत झाले. इथल्या रूम्स तर अर्थातच लक्झुरियस आणि कम्फर्टेबल आहेतच पण त्याहीपेक्षा विलक्षण आहे ते म्हणजे या हॉटेलचे लोकेशन आणि त्याचा पुरेपुर उपयोग करून घेणारे इथले रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल. पाईन, ओक, देवदार, वीपिंग व्हिलोज्सारख्या उंच उंच झाडांच्या फॉरेस्टच्या मधोमध वाइल्ड फ्लॉवर हॉल बांधण्यात आले आहे. त्यामुळे इथे वास्तव्य करताना अप्रतिम निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आपल्याला आनंद मिळतो, आणि हीच इथली खरी लक्झुरी आहे. दिवसाची सुरुवात झाली ती हॉटेल्सच्या ओपन टेरेसवर अगदी शाही छत्रीखाली मांडलेल्या टेबलवर. मेनूकार्डवरचा प्रत्येक आयटम तर स्वादिष्ट होताच पण अगदी शाही थाटात आमची प्रत्येक इच्छा त्यांनी इथे पूर्ण केली. झाडांनी व ढगांनी आम्हाला तिथे घेरले होते आणि इथून कधीच उठू नये असे प्रत्येकाला वाटत होते. एरव्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी जबरदस्तीने तयार होणारी घरातली मुलंसद्धा त्या सुंदर ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी अगदी स्वतःहून, नाक न मुरडता आपोआपच यायला तयार झाली होती आणि लगेचच इंस्टाग्रामवर तिथले फोटो अपलोड होऊ लागले.

एखादी सुंदर गोष्ट दिसली की ती जगाबरोबर शेअर करणे योग्यच नाही का? हॉलिडेसाठी ओळखीच्या प्रांताची निवड केल्यामुळे इथे स्थलदर्शन करायलाच हवे असे अजिबात प्रेशर नव्हते. मग काय, पुढचे दोन-तीन दिवस जिवाचं शिमला करण्यात आम्ही घालवले. मॉल रोडवर संध्याकाळी चालताना तिथल्या प्रसिद्ध चर्चसमोर उभे राहिलो तेव्हा जणू एखाद्या हिंदी चित्रपटात प्रवेश केल्याचा भास आम्हाला झाला. ढगांमध्ये चालत तिथल्या ट्रेडिशनल स्ट्रीट लॅम्प्सच्या मंद प्रकाशात शिमल्याचं चर्च व इतर प्राचीन दगडाच्या इमारती फारच सुंदर दिसत होत्या. घोडेवाले गिर्‍हईक शोधत होते आणि प्रत्येक वळणावर ती जागा ओळखीची वाटण्याचे कारण तिथे कुठलातरी चित्रपट चित्रित केला गेला आहे ह्या आठवणींमध्ये आमचा वेळ अगदी छान गेला. इथल्या अनेक कॅफेज् आणि रेस्टॉरंट्समध्ये लाईव्ह म्युझिकसोबत इंडियन व इंटरनॅशनल खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही हॉटेलला परतलो. त्याचवेळी इथल्या स्विमिंग पूलला जोडून असलेल्या ओपन एअर जकुझीचा शोध आम्हाला लागला. तार्‍यांच्या खाली थंडगार हवेत या गरम पाण्यात बसून जणू आमचा सर्व ताणतणाव नाहिसा झाला. पूर्वी हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असले तर ती लक्झरी समजली जायची. हल्ली पूल असणे ही नेसेसिटी झाली आहे व तो पूल हीटेड असला तर क्या बात!  दिवसा जेव्हा परत त्या जकुझीमध्ये बसलो तेव्हा तिथल्या हिरव्यागार फाँरेस्टचा नजारा बघू शकलो. त्यानंतर मात्र परत परत आम्ही त्या जकुझीमध्ये बसण्यासाठी बहाणे शोधत होतो. पुढच्या तीन दिवसांत आम्ही तिथल्या फाँरेस्टमध्ये हाइकिंग करत नेचर वॉकचा आनंद घेतला. कधीही खेळलो नव्हतो अशा लॉन टेनिस खेळण्याचा प्रयत्न केला, व तिथल्या डायनिंगचा देखील पाहुणचार घेतला. शिमल्याच्या मॉल रोड बरोबरच आम्ही राष्ट्रपती निवास किंवा वाईस रिगल लॉज म्हणजेच आजचे इंडियन इनस्टिट्युट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीमध्ये गाईडेड टूर घेतली. अनेक मौलव्यान फोटोज् व फर्निचरने ही सुंदर बिल्डिंग सजलेली आहे. मॉल रोडवर फिरताना तिथल्या गाडीवरच्या मोमोज आणि कॉफीचा आस्वाद सुद्धा घेतला. आयटीनरी नसली तरी तसा फावला वेळ कुठेच नव्हता कारण काहीही बघायचे नाही असे ठरविले तरी याचा अर्थ काहीही करायचे नाही असा नसतो ना?

एरवी आपल्याला जे काही आपल्या शहरात सहजपणे करता येत नाही ते सर्व करून टोटली रीफ्रेश होणे ह्यालाच खरा हॉलिडे म्हणतात नाही का! त्यात मुलांबरोबर त्यांच्या आवडीचे खेळ खेळत भारताबद्दल त्यांच्या मनात आदर व प्रेम बघून बरे वाटले. त वरून ताकभात ओळखणे हे केवळ आपल्या भारतातल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रित प्रकर्षाने जाणवते व अनेकवेळा बाहेरच्या देशातल्या फाईव्हस्टार हॉटेल्समध्ये सुद्धा याचा अभाव जाणवतो. आपण हॉटेलमध्ये जिथे वावरतो तिथे आपल्या मदतीला पटकन हजर राहणारे हॉटेलचे कर्मचारी, आग्रहाने वाढणारे वेटर्स व इंटरेस्टने तिथल्या अ‍ॅक्टिव्हिटीज् समजवणारे हॉटेलचे टीम मेंबर्स आपल्याला अनेक अविस्मरणीय आठवणी देऊन जातात.

शिमल्यावरून निघून परतीच्या मार्गावर आम्ही परवानू इथल्या मोक्ष रीसॉर्ट आणि स्पामध्ये एका रात्रीचे वास्तव्य केले. इथल्या चेक-इन पाँईटला पोहोचलो तेव्हा इथे एक सरप्राईज आमची वाट बघत होते. चेक-इन काऊंटरवर आमचे सामान घेतल्यावर आम्ही पुढे गेलो तर पर्वतरांगांवरून आमच्याकडे एक केबलकार खाली येताना दिसली. आपण नक्की भारतातल्या परवानूमध्ये आहोत का स्वित्झर्लंडला पोहोचलो असा प्रश्‍न आम्हाला पडला. पण मोक्ष रिसॉर्टची स्थापना करण्याचे स्वप्न पाहिलेल्या श्री. गर्ग साहेबांनी कुठलीही कसर न सोडता चक्कं मेड इन स्वित्झर्लंड केबलकार इथे उभी केली आहे व डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या त्या मोक्ष स्पामध्ये चेक-इन करण्यासाठी आपण केबलकार राईड घेऊन हॉटेलकडे पोहोचतो. इथल्या स्पामधल्या मसाज थेरेपीने आमच्या ह्या छोट्याशा पण पूर्णपणे तरतरी आणाणार्‍या हॉलिडेचा समारोप झाला.

हॉटेलकडून एअरपोर्टकडे निघालो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्‍न होता, आता पुढचा हॉलिडे कुठे घ्यायचा? असा शॉर्ट ब्रेक असेल तर वर्षातून एकदाच का आपण अनेकदा हॉलिडे घेऊ शकतो हा निर्धार देखील झाला. मग ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या जंगल लॉजेस किंवा टेन्टसमध्ये राहूया का? ह्यावर चर्चा सुरू झाली. त्यात काही जंगल लॉजेसमध्ये ओपन एअर स्टार बेडवर सुद्धा आपण एखादी रात्र आकाशातले तारे मोजत घालवू शकतो. शिवाय भारताच्या नॅशनल प्राण्याचे म्हणजेच टायगरचे दर्शन होण्याचीही शक्यता आहे आणि आजकाल तर अनेक लक्झरी टेन्टस् सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच भारतातले अनेक पॅलेसेस, हवेल्या, होमस्टेज, वेलनेस रीसॉर्टस्, बीच रीसॉर्टस्, मॉर्डन हॉटेल्स असे सर्व ऑपशन्स आपल्यासाठी तयार आहेत. आपल्या देशातल्या ट्रेडिशन्स, परंपरा, जेवण प्राचीन मॉन्युमेन्टस्, वैविध्यपूर्ण एक्सीपीरीयन्सेस या सर्वांचीच ओळख करून घ्यायला हवी नाही का? आपल्या स्वातंत्र्यदिनी आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्याला 2022पर्यंत भारतातल्या किमान पंधरा पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आव्हान केलेले आहेच, तर आता त्याच्या तयारीला लागायला हवे नाही का!

 

August 25, 2019

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top