IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

अभी तो मैं जवान हूँ!

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 30 June, 2024

गेल्या तीन महिन्यात म्हणजे समर व्हेकेशनमध्ये देशविदेशात 51 सिनियर्स स्पेशल टूर्स आयोजित केल्या गेल्या आणि गेल्या वर्षभरातली ही संख्या 187 इतकी होती. मागील वर्षाचा आढावा आणि अवलोकन सुरू असताना ह्या गोष्टी समोर आल्या. ज्येष्ठ मंडळींनी आणि त्यांच्या आप्तस्वकियांनी वीणा वर्ल्डवर त्याद्वा जो विश्‍वास दर्शविला त्याबद्दल आम्ही समस्त वीणा वर्ल्ड टीम त्या सर्वांचे आणि खास करून ज्येष्ठ मंडळींचे ऋणी आहोत. जेवढ्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ मंडळी वीणा वर्ल्डसोबत निर्धास्तपणे जगाचा प्रवास करताहेत तेवढी वीणा वर्ल्ड टीम योग्य मार्गाने काम करतेय समजायला हरकत नाही. मी ऑगनायझेशनसाठी अनेक परिमाणातलं हे एक परिमाण ठरवून टाकलंय. जेव्हा ही संख्या रोडावेल किंवा वाढणार नाही तेव्हा समजायचं. `समथिंग इज राँग समव्हेअर’. अर्थात आम्ही ती वेळ येऊ देणार नाही, कारण एकदम सोप्पं आहे, `व्यावसायिक दृष्टीने पर्यटन संस्था चालवित असताना जर समाजातील ज्येष्ठांना तुम्ही टूर्सच्या माध्यमातून मनोभावे सेवा देऊ शकत नसाल तर तुमच्या असण्याला आणि संस्थेच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही’, हे फक्त माझ्यासाठीच नाही तर आमच्या संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम मध्ये भिनलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आमची टॅगलाइन आहे, `वीणा वर्ल्ड, प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी’. त्याप्रमाणे छोट्यांसाठी, तरुणांसाठी, फॅमिलीज्‌‍साठी, फक्त महिलांसाठी, फक्त ज्येष्ठांसाठी अशा टूर्स किंवा कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍चा आमचा प्रवास सुरू आहे. पण सिनियर्स स्पेशल टूर हा आमच्या आर्गनायझेशनच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे. तशीच सिनियर्स स्पेशल टूर हे आमच्या टूर मॅनेजर्स ट्रेनिंगमधलाही महत्वाचा स्किलसेट आहे. जसं, काही देशांमध्ये मिलिटरी ट्रेनिंग हे दोन तीन वर्षांसाठी सक्तीचं असतं आणि जिथे माणसं घडतात, शिस्तीत येतात आणि आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते तसंच काहीसं. सिनियर्स स्पेशल टूर हळुवारपणे, मन:पूर्वक प्रेमाने आणि काळजीने करावी लागते. जर ह्या टूर्स यशस्वी करण्याची सवय लागली तर मग तो किंवा ती टूर मॅनेजर जगातली कोणतीही टूर यशस्वीरित्या करू शकेल हा एक आत्मविश्‍वास टूर मॅनेजरला स्वत:विषयी आणि आम्हाला टूर मॅनेजर विषयी येतो. त्यामुळे टूर मॅनेजरने तीन महिन्यातून किमान एक सिनियर्स स्पेशल टूर करण्याचा आमचा दंडक आहे. ज्येष्ठांच्या ह्या श्रेष्ठ सहलींवर सर्व्हिस देत असताना त्या टूर्स आम्हाला शिक्षणही देतात ते असं. शाळा कॉलेजातल्या थिअरी आणि प्रॅक्टिकल सारखंच हे. थिअरी ऑफिसमधल्या लर्निंग सेंटरमध्ये शिकवली जाते तर प्रॅक्टिकल किंवा जो रीझल्ट आहे तो ॲक्युअल टूरवरच मिळतो. आणि त्यासाठी ज्येष्ठांची ही सिनियर्स स्पेशल सहल हे आम्हीच आम्हाला ठिकठाक करण्याचं, `ऑन अवर टोज्‌‍’ असण्याचं, योग्य मार्गावर प्रगती करतोय हे दर्शविणारं एक मोजमाप आहे म्हणायला हरकत नाही. ह्यासाठीही ज्येष्ठांचे आभार. त्यांच्या नकळत ते आम्हाला ेनिंग देताहेत.

ज्येष्ठांच्या सहलीची संकल्पना कशी आली हे बऱ्याचदा मी सांगितलंय पण थोडक्यात एवढ्याचसाठी की जी नवीन मंडळी आहेत किंवा ज्यांना ह्या बाबतीत माहित नाही त्यांना माहित व्हावं. 2006 मध्ये, ‘लगे रहो मुन्नाभाई‘ चित्रपट आला, ब्लॉकबस्टर हिट झाला. आम्हीही थिएटरमध्ये जाऊन पाहिला. नो डाऊट चित्रपट पैसा वसूल होता. कोपरखळ्या मारत खूप काही शिकवून गेला. त्या चित्रपटात दोन ज्येष्ठ मित्र-मैत्रिणींच्या लग्नाचा सोहळा दाखवलाय. गोव्याला ती मंडळी गेलीयत आणि दे धम्माल करताहेत. आम्ही बिझनेसवाली मंडळी नेहमी ‘व्हॉट्स फॉर मी‘ चा विचार करतो तसाच विचार माझ्याही मनात रूंजी घालू लागला. एका बाजुला मी चित्रपटाची मजा घेत होते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मनात सिनियर्स स्पेशल टूरची आखणी होत होती. ज्या तऱ्हेने ती ज्येष्ठ मित्रमंडळींची गँग गोव्याला धम्माल करीत होती त्यासारखी धम्माल सिनियर्सना करता आली तर काय बहार येईल हा विचार होता. चित्रपट संपला आणि सिनियर्स स्पेशल टूरची संकल्पना माझ्या डोक्यात पूर्णत्वाला पोहोचली. थिएटरमधून बाहेर आल्यावर त्या चित्रपटात गांधीजींची भूमिका जिवंत करणाऱ्या आपल्या आवडत्या श्री. दिलीप प्रभावळकरजींना फोन लावला आणि त्यांना म्हटलं, ‘हा चित्रपट, त्यातील तुम्ही साकारलेली व्यक्तिखा हे सगळं एवढं अफलातून आहे की त्यावर मी बापडी काय बोलणार, पण तुमच्या ह्या चित्रपटाने माझ्या मनात सिनियर्स स्पेशल टूरची संकल्पना जागृत झालीय आणि त्याच्या पहिल्यावहिल्या टूरला तुम्ही यावं ही इच्छा आहे. जमेल तुम्हाला? तुम्ही तारीख द्या तेव्हा जाऊ आपण‘. दिलिपजींनी मोठ्या मनाने लागलीच होकार दिला आणि तारीखही. पहिली सिनियर्स स्पेशल टूर जाहीर झाली आणि संपूर्ण फ्लाइट भरून आम्ही सिनियर्सना घेऊन मलेशियाला गेलो. अफलातून झाली ती सहल. आणि मग दिलिपजी जणू ब्रँड अम्बॅसेडरच बनले. रशिया, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड हजारो सिनियर्सनी ह्या संकल्पनेला उचलून धरलं आणि सिनियर्स स्पेशल टूर ज्येष्ठांसाठीची श्रेष्ठ सहल बनली. वीणा वर्ल्ड झाल्यानंतर अर्थातच ह्या संकल्पनांना आम्ही आणखी उभारी दिली आणि आतातर सिनियर्स स्पेशल टूर ही रीटायरमेंट नंतरच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली. ‘आयुष्याच्या उत्तरार्धाचा एक आनंदी प्रारंभ‘ झाली. त्यावेळी युरोपीयन वा अमेरिकन सिनियर मंडळी जगभर मोठ्या संख्येने पर्यटन करताना दिसत होती पण आपल्या भारतातून मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन करताना सिनियर्स दिसत नव्हते. त्याची काही कारणंही मला दिसत होती. एक म्हणजे रीटायर झाल्यावर आता शांत व्हावं. खूप काही साहसं नकोत ही मानसिकता. दुसरं, ‘आपल्याला झेपेल का पर्यटन? कुठे काही झालं तर, नको  बाबा‘ ह्यासारखी भीती. लॅक ऑफ कॉन्फिडन्स सारखंच थोडसं. तिसरं, कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी सारख्या छोट्या आजारांनी आपल्या मनाचा पूर्ण कब्जा घेतलेला. आजारसुद्धा येतो तेव्हा प्रथम तो आपल्याला घाबरवतो. एकदा का आपण घाबरलो की तो शरीरावर हक्क सांगायला लागतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण उठबस करायला लागतो. त्याला एकदा का खात्री झाली की आपलं शरीर त्याच्या ताब्यात गेलंय की तो आपल्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी घौडदौड सुरू करतो. शरीराला खचविल्यानंतर मनाला आडवं पाडायला त्याला खूप सोप्पं जातं. आजार विजयी होतो आणि आपण त्याचे मांडलिक बनतो. ‘आत्तापर्यंत उत्साही आनंदी तदुंरूस्त असणा तेच का आपण?‘ हा प्रश्‍न पडतो इतके आपण हताश निराश व्हायला सुरुवात होते. चौथं म्हणजे घरातली आपली माणसंही काळजीपोटी वा अतिप्रेमाने, ‘आता जरा जपून बरं‘ किंवा ‘आता तुला हे झेपणार नाही‘, ‘कशाला उगाच आता ह्या वयात?‘ अशातऱ्हेची वाक्य फेकून आपल्याला वयाची जाणीव करून देतात. आता हे बऱ्यापैकी बदललंय. मुलं म्हणतात, ‘आमची काळजी करू नका, तुमचं आयुष्य तुम्ही एन्जॉय करा, राहून गेलेल्या गोष्टी आता पूर्ण करा‘. हे एवढं वातावरण खुलं झालं नव्हतं वीसेक वर्षांपुर्वी त्यामुळे ‘आपण बरं आपलं घर बरं‘ असं एक सर्वसाधारण सामजिक वातावरण असायचं. ह्या सगळ्यात बदल होणं गरजेच होतं. आणि पर्यटन हा असा भाग होता की रीटायरमेंटनंतर आलेली मरगळ झटकण्यासाठीचा एक अस्सल इलाज. हमखास गुण येणार ही गॅरंटी. आपला देश वा आपलं जग तर बघून होतंच पण आपले कंबरदुखी गुडघेदुखी पाठदुखी सारखे आजार पण विसरायला होतात. हे मी बऱ्याच टूर्सवर सिनियर मंडळींकडून ऐकलंय. आता बघानं ज्यावेळी आपण कोणत्याही छोट्या मोठ्या टूर्सना जायचं ठरवतो त्याच्या पुर्वतयारीत आपला बऱ्यापैकी वेळ जातो. टूरला जाणं म्हणजे आपण काहीतरी असं करतो ज्याकडे आपण मोठ्या आनंदाने बघतो. धिस इज समथिंग रीअली टू लूक फॉरवर्ड टू.

आज सिनियर्स स्पेशल टूरची आठवण यायचं कारण म्हणजे आता येतोय ‘इंटरनॅशनल सिनियर सिटिझन्स डे‘ 21 ऑगस्ट रोजी. आमची वीणा वर्ल्ड टीम त्यासाठीच्या टूर्सच्या बुकिंग आणि प्रिपशन्समध्ये बिझी झालीय कारण देशविदेशातल्या अनेक टूर्सना सिनियर पर्यटक बुकिंग जे करताहेत. भारतामध्ये अनेक सहली आहेत. इतर समवयीन पर्यटकांप्रमाणेच महत्वाचे असतात ते वीणा वर्ल्डचे लोकप्रिय टूर मॅनेजर्स. प्रत्येक टूरवर, अगदी मुंबईपासून मुंबईपर्यंत संपूर्ण टूरवर हे टूर मॅनेजर्स असतात. इंटरनॅशनल टूर्सवरही मुंबई ते मुंबई टूर मॅनेजर अगदी दिमतीला असतोच. तीसपेक्षा मोठा ग्रुप असेल तर दोन टूर मॅनेजर्स असतात. ज्यांना शक्य आहे ती सिंगल सिनियर पर्यटक मंडळी टूरवर स्वत:साठी सेपट रूम घेतात. पण ज्यांना रूम शेअरिंग पार्टनर हवा असतो वा असते त्यांना आम्ही महिलांना महिला पार्टनर आणि पुरुषांना पुरुष पार्टनर द्यायची गॅरंटी देतो, ह्या सिनियर्स स्पेशल टूर्सवर ज्यामुळे त्यांचे सिंगल सप्लिमेंटसाठीचे पैसे वाचतात. सिनियर मंडळींनी फक्त त्यांच्या फिजिशियनकडून स्वत:ला तंदुरूस्त असल्याची खात्री करायचीय. वीणा वर्ल्डच्या ॅव्हल कन्सल्टंटकडून तुम्हाला कोणती टूर सुटेबल आहे ते समजून घ्यायचंय आणि मग मात्र बिनधास्त निघायचंय. आमच्या इयरली डायरीच्या मागे लिहिलय, ‘हम उडना चाहते हैं, दौडना चाहते हैं, गिरना भी चाहते हैं...बस रूकना नहीं चाहते.‘ हे आपल्या सगळ्यांनाच लागू आहे असं वाटतं.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

युनायटेड किंगडम अर्थात यु. के. नावाने जो चार देशांचा समूह ओळखला जातो त्यातला आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे ‘इंग्लंड’. तीनही बाजुंनी सागराने वेढलेल्या इंग्लंडमध्ये गवताळ कुरणांपासून ते उंचच उंच डोंगरकपारींपर्यंत निसर्गाची अनेक रुपं पहायला मिळतात. त्यातील सर्वात सुंदर म्हणजे नॉर्थ वेस्ट इंग्लंडमधील ‘लेक डिस्ट्रिक्ट’. नयनमनोहर देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या या लेक डिस्ट्रीक्टमध्ये फक्त सरोवरच नाहीत तर डोंगररांगा, नद्या आणि सागरकिनाऱ्याचा समावेशही होतो. याच लेक डिस्ट्रिक्ट नॅशनल पार्कमध्ये इंग्लंडमधील ‘स्काफेल पाइक‘ हा सर्वोच्च पर्वत आहे. या परिसरात एकूण सोळा तलाव तसेच सरोवरं आहेत. मात्र टेक्निकली त्यातला एकच तलाव खरा ‘लेक’ आहे, बाकीच्यांसाठी ‘मिअर’ किंवा ‘वॉटर’ हा शब्द वापरला जातो. बटर मिअर, ग्रास मिअर किंवा हेज वॉटर, रायडल वॉटर, उल्स वॉटर अशी बाकीच्या तलावांची नावं आहेत. या सगळ्यातला लांबीने, क्षेत्रफळाने आणि आणि सर्वात मोठा पाण्याचा साठा असलेला म्हणजेच सगळ्याच बाबतीत दादा तलाव आहे ‘विंडरमिअर’. ‘विंडर मिअर’ हे नाव कसं पडलं? याबाबत अनेक तर्क केले जातात. मुळात हे नाव ‘विनान्दर मिअर’ किंवा ‘वायनेन्डमिअर’ असावं असंही सांगितलं जातं. जुन्या इंग्लिश भाषेत ‘मिअर’ हा शब्द ‘लेक’ म्हणजे ‘तलाव’ या अर्थी वापरला जात असे. हा तलाव ‘रिबन लेक’या प्रकारातला म्हणजे आकाराने चिंचोळा आणि खूप खोली असलेला तलाव आहे. सुमारे 15 ते 17 हजार वर्षांपुर्वी हा तलाव निर्माण झाला असावा असा अंदाज आहे. विंडर मिअर 18 किलोमीटर लांब पसरलेला आहे तर दीड किलोमीटर ही त्याची जास्तीत जास्त रुंदी आहे. समुद्र सपाटीपासून 128 फूट उंचीवर असलेल्या ह्या तलावाची जास्तीत जास्त खोली 210 फूट आहे. विंडर मिअरमध्ये 18 बेटं आहेत. या बेटांना स्थानिक पध्दतीनुसार ‘होम्स’ म्हटलं जातं. यातील सर्वात मोठं बेट सुमारे 40 एकरांचे आहे. या तलावाच्या काठावरच्या गावांना जोडणारी पॅसेंजर फेरी बोट सेवा इथे रेल्वे येण्याआधीपासून सुरू आहे. आता तर या सरोवरात ‘विंडर मिअर लेक क्रुझ’ची सेवाही उपलब्ध आहे. या परिसरात 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात राहणाऱ्या कवींना ‘लेक पोएट्स’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्यातला प्रसिध्द कवी म्हणजे ‘विल्यम वर्डस्वर्थ’. या निसर्गसुंदर परिसराला पहिल्यांदा भेट दिल्यानंतर ‘ऑस्कर वाइल्ड’ या लेखकालाही या परिसराच्या पार्श्वभूमीवर नाटक लिहायची स्फूर्ती मिळाली होती. या तलावाभोवती जो टेकड्यांचा घेरा पडलेला आहे, त्यामुळे इथले निसर्गदृश्‍य डोळ्यांना सुखावणारं झालं आहे. इंग्लंडच्या भेटीत लेक डिस्ट्रिक्ट मधल्या विंडर मिअरची भेट म्हणूनच अनिवार्य मानली जाते. वीणा वर्ल्डच्या इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड वेल्स लंडन या सहलीत आपण लेक डिस्क्टिला भेट देऊ शकता.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

जगणे म्हणजे प्रवास करणे

म्हाला पर्यटनाची मनापासून आवड, त्यामुळेच आज वयाच्या सत्तरीमध्येही आम्ही दोघं जगभरातल्या देशात वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचा आनंद घेत असतो. ‘जगणे म्हणजे प्रवास करणे’ हे सूत्रच बनलं आहे आमच्यासाठी. वीणा वर्ल्डसारखा उत्तम, कुशल, जाणकार पर्यटन मार्गदर्शक लाभल्याने  मी गिरीश दोशी आणि माझी पत्नी कल्पना आमची पृथ्वी प्रदक्षिणा अगदी झकास सुरू आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठांना आपुलकीनं काळजीनं आणि प्रेमानं सोबत नेऊन प्रवासाचा आनंद लुटायला लावणारे सहल संयोजक हवे असतात. सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये आमचा हा शोध वीणा वर्ल्डपाशी संपला आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर पर्यटन करू लागलो. आजपर्यंत जगभरातले सुमारे 58 देश आम्ही बघितले आहेत. आम्हाला पॉप्युलर ठिकाणांसोबत ऑफबीट, जरा हटके ठिकाणं बघायची ओढ आहे. त्यामुळे मी नेहमी वीणा वर्ल्डची वेबसाइट चेक करीत असतो. त्यांनी एखाद्या नवीन ठिकाणाची टूर लॉन्च केली की लगेच आम्ही ती बूक करतो. आतासुध्दा ज्या इंटरनॅशनल टूरवर वीणा पाटील आणि सुधीर पाटील येणार आहेत अशा काही टूर्स आम्ही बूक केल्या आहेत, त्यामुळे या टूर्सनंतर आम्ही भेट दिलेल्या देशांची संख्या 62 होईल. मला स्वतःला ऑटम म्हणजेच ‘फॉल’ हा सिझन सर्वात जास्त आवडतो. या काळात झाडांची पाने पिवळ्या, लाल, गुलाबी रंगाची झालेली असतात आणि सगळा परिसर रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघालेला असतो. विशेषतः जपानमधील फॉलमधला निसर्ग मी कधीच विसरणार नाही, त्यामुळेच या वर्षीच्या फॉल सीझनमधली साउथ कोरीया तैवानची टूर आम्ही बूक केली आहे. आम्हाला वीणा वर्ल्डच्या टूर्समधील सर्वात जास्त काय आवडतं तर त्यांचे टूर प्रोग्रॅम्स एकदम भरगच्च असतात. त्यात आपण जाणार त्या शहरातली महत्वाची ठिकाणं समाविष्ट असतात, त्यामुळे काही राहून जात नाही. आम्ही दोघं जरी नॉन महाराष्ट्रीयन असलो तरी  टूरवर आम्हाला वेगळं पडल्यासारखं अजिबात वाटत नाही, त्यांचे टूर मॅनेजर्स नेहमी सगळा ग्रुप एकत्र राहील याची काळजी घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये सहलींवर अन्य भाषिक पर्यटकांची संख्या वाढताना जाणवतेय जी चांगली बाब आहे. मला स्वतःला टूरवर शॉपिंग करायला आवडतं. प्रत्येक ठिकाणचं एक सोवेनिअर माझ्या नातीसाठी मी हमखास घेऊन येतो. माझ्या मित्र मंडळींनाही मी वीणा वर्ल्डच्या टूर्स नेहमी रेकमेंड करीत असतो.

श्री. गिरिश दोशी आणि सौ. कल्पना दोशी, अंधेरी  मुंबई


काय बाई खाऊ कसं गं खाऊ

देशातली 26% जमीन समुद्र सपाटीखाली आहे आणि ज्या देशातल्या लोकांची सरासरी उंची जगात सर्वात जास्त आहे असा देश म्हणजे नेदरलँड्स अर्थात हॉलंड. आज जगभरात जे चॉकलेट मिटक्या मारत खाल्ले जाते ते सॉलिड फॉर्ममध्ये आणण्याची कामगिरी सर्वात आधी या देशानेच बजावली. त्यामुळे डच स्विट डिशेसमध्ये चॉकलेटचे अनेक प्रकार पहायला आणि खायला मिळतात. जगभरातल्या गोड खाऊंच्या पसंतीला उतरलेले ‘स्ट्रूप वॉफल’ हे नेदरलँडचीच देणगी आहे. वरचं कुरकुरीत सोनेरी तांबूस आवरण आणि त्यात भरलेलं कॅरमलचं स्टफिंग यामुळे स्ट्रूप वॉफल्सची चव भन्नाट लागते. डच स्विट्‌‍समधला एक झकास प्रकार म्हणजे ‘स्पेकुलास कुकिज’. कुरकुरीत आणि गोडसर बिस्किटांना जर हलका मसाल्याचा स्वाद मिळाला तर काय मजा येते हे स्पेकुलास खाल्ल्यावर कळतं. पुर्वी स्पेकुलास फक्त लग्नसमारंभासाठी किंवा सुट्टीत बनवलं जायचं, आता वर्षभर केलं जातं. त्यात वापरल्या जाणाऱ्या दालचिनी, लवंग, वेलची, जायफळ अशा मसाल्यांमुळे त्यांची चव एकदम बहारदार लागते. कोणत्याही डच कुटुंबात ख्रिसमस इव्हला हमखास केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे ‘ओलिबोलन’. कणिक, अंडी, दूध याचे यीस्ट आणि बेकिंग पावडर मिक्स करून गोळे तयार करतात, त्यात मनुका किंवा सफरचंदाचे तुकडे भरून ते तळतात. तळलेल्या गोळ्यांवर पिठी साखर पेरतात. तुम्हाला स्वीट आणि सॉल्टी टेस्टचं कॉम्बिनेशन आवडत असेल तर नेदरलँडमधील ‘क्रॅकलिंगन’ खायलाच हवं. ही बेक्ड पेस्ट्री तुम्हाला हॉलंडमध्ये सगळ्या कॅफेजमध्ये व स्ट्रीट व्हेंडर्सकडेही मिळेल. तुम्हाला एकाचवेळी जिभेला आणि डोळ्यांना सुखावणारी पेस्ट्री खायची असेल तर ‘तोम्पुश’ला पर्याय नाही. या पफ्ड पेस्ट्रीवरचे बटरचे लेयर्स आणि आतलं स्विट वॅनिला क्रिम तुमची रसना तृप्त करतं तर वरचे रंगिबेरंगी आइसिंगचे लेयर्स तुमच्या डोळ्यांना खुश करतात. अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हल्सचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.


परफेक्ट कॉम्बिनेशन

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

पर्यटनामधलं भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस आणि नॅचरल वंडर्स एकाच हॉलिडेमध्ये अनुभवायला मिळणं. असा हॉलिडे घ्यायचा असेल तर युरोपमधील ग्रीस आणि टर्की या दोन देशांचा पर्याय मस्त ठरतो. पाश्चिमात्य संस्कृतीचा पाळणा जिथे हलला त्या ग्रीसमध्ये जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आर्किओलॉजिकल म्युझियम्स आहेत आणि युनेस्कोच्या 18 साइट्स आहेत, म्हणून तर दरवर्षी ग्रीसच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पर्यटक ग्रीसला भेट देतात.

ग्रीसच्या हॉलिडेचा अविभाज्य भाग म्हणजे ‘आयलंड्स’. सॅन्तोरिनी, हायड्रा, कॉस, लेसव्हॉस अशा बेटांची इथे रांगच आहे. सॅन्तोरिनीवरच्या इया, फिरा अशा चित्रातल्या वाटणाऱ्या गावांमध्ये निसर्गाच्या कुशीत आराम करा, तिथल्या सुप्रसिध्द ‘व्होल्कॅनिक वाइन्स’चा भरभरून आस्वाद घ्या, तुमच्या हॉटेलच्या प्रायव्हेट इन्फिनिटी पूलमध्ये डुंबताना कॅलडेरा आणि एजियन सीचा नजारा डोळे भरून पहा. ग्रीसच्या निसर्गसौंदर्यातील सर्वात उल्लेखनिय बाब म्हणजे इथले सूर्यास्त, त्याची शोभा बघायला असलेल्या खास सनसेट क्रुझचा अनुभव घ्यायलाच हवा. ग्रीसमधल्या हायड्रा बेटावर वाहनांना परवानगी नाही, पण तिथल्या पारंपरिक ‘डॉन्की राइड’चा अनुभव तुम्ही घेऊ शकता किंवा सायकलवरून फेरफटका मारू शकता. ग्रीसमधला अंडर वॉटर म्युझियम बघायचा असेल तर अलोनिस्सोस नॅशनल मरीन पार्कमध्ये स्नॉर्केलिंग, डायव्हिंग करून या पाण्याखालच्या संग्रहालयाला अवश्‍य भेट द्या. ग्रीसचा एजियन समुद्रापलिकडचा शेजारी म्हणजे टर्की. इतिहासात टर्कीमधल्या ओटोमन एम्पायरने ग्रीसवर आपलं निशाणं रोवलं होतंच. टर्की हा देश युरोप आणि एशिया या दोन खंडांचवर वसलेला देश. इथला बकलावा आणि स्ट्राँग कॉफी जगप्रसिध्द आहे. टर्की मधला ‘कॅप्पाडोशा’ हा भाग ‘फेअरी चिमनीज’चा भाग म्हणून ओळखला जातो. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामधून इथे चित्रविचित्र आकाराचे सुळके, डोंगर, खडक तयार झाले आहेत. या सॉफ्ट रॉक्समध्ये जुन्या काळात लोकांनी शहरं वसवली होती. आजही इथल्या केव्ह हॉटेल स्टे चा आगळा अनुभव तुम्ही घेऊ शकता. खडकात कोरलेल्या रूम्स  आधुनिक सुविधांनी युक्त आहेत आणि तिथे टेरेसवरून भोवतालच्या फेअरी चिमनीजचा अद्भूत नजारा पहायला मिळतो. तसेच या अद्भुत परिसराचे हवाई दर्शन घडवणारी हॉट एअर बलून राइड तुमच्या हॉलिडेला नक्कीच मेमोरेबल बनवते. टर्कीमधील ‘पामुक्कले’ हे निसर्गशिल्प आवर्जून पहाण्यासारखं. इथे भूगर्भातले गरम पाणी उफाळून बाहेर आलं आहे आणि डोंगरावरून वाहताना त्यातील कार्बोनेट मिनरल्समुळे शिंपल्यासारखे मोठे आकार तयार झाले आहेत. ‘कॉटन कॅसल’ हे अगदी सार्थ नाव मिरवणाऱ्या पामुक्कले जवळच्या लक्झरी स्पामध्ये राहून  इथल्या औषधी पाण्याचे गुणधर्मही आजमावता येतात. टर्कीमध्ये प्राचीन काळापासून प्रचलीत असलेल्या ‘हमाम’ अर्थात सार्वजनिक स्नानगृहांमधला शाही स्नानाचा अनुभव जसा घेता येतो त्याचप्रमाणे इस्तंबूलच्या ऐतिहासिक गल्ल्यांमधील ‘मिशेलिन स्टार’प्राप्त रेस्टॉरंट्‌‍समधल्या एकापेक्षा एक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायची संधीही मिळते. जोडीला बॉस्फोरस क्रुझ आणि हॉट एअर बलून ॲट सनराइज सारखे एक्सायटिंग अनुभव आहेतच. तर मग हेरिटेज आणि नेचर असं झकास कॉम्बिनेशन अनुभवायचं असेल तर ग्रीस आणि टर्कीला. वीणा वर्ल्ड  कस्टमाईज्ड हॉलिडे टीम आहेच तुमच्या दिमतीला.


काय बघावं? कसं बघावं?

 गुजरात आणि राजस्थान

गुजरात म्हणजे व्यावसायिकांचं राज्य आणि राजस्थान म्हणजे फायनान्स आणि अकाउंट्सवाल्यांचं. अर्थात आपल्या भारतात राजस्थानने सर्वात आधी अक्कलहुशारीचं काम जर कोणतं केलं असेल तर ते म्हणजे त्यांनी इतिहास-वर्तमान-भविष्य ह्याची अतिशय चांगली सांगड घातली. इतिहासाने दिलेले राजवाडे, शिल्पकला, लोककला, परंपरा संस्कृती इ. वैभवाचं महत्व अोळखलं आणि वर्तमानात त्यावर काम करून देशविदेशातील पर्यटकांना आपल्याकडे खेचलं. भविष्यकाळासाठी भारतालाच नव्हे तर जगाला आपल्या पायाशी आणण्याचं काम आधी अनेक वर्ष तर राजस्थानने केलच पण येणाऱ्या शेकडो वर्षांसाठी ही तजवीज करून ठेवली. आपणसुद्धा राजस्थानला अनेकदा जातो कारण ‘ये दिल मांगे मोर ऑफ राजस्थान‘ अशीच धारणा होते. राजस्थानच्या बरोबर विरूद्ध गुजरात. व्यावसायिकांचा जोर इतका की टूरिझम आपल्या महाराष्ट्रासारखं एकदम साईडिंगला पडलेलं. आम्ही भारतात अनेक ठिकाणी टूर्स करायचो पण गुजरातच्या टूर्स नसायच्याच. कधीतरी द्वारका सोमनाथवाली सौराष्ट्र वारी व्हायची. पण गेल्या पाच-सात वर्षात आमच्याकडे गुजरात एक ‘मस्ट व्हिझिट डेस्टिनेशन‘ बनून गेलंय. आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यात टूरीझम महत्वाचा रोल बजावू शकतं हे तिथल्या तात्कालिन सरकारने जाणलं आणि मग रण ऑफ कच्छ, साबरमती, पाटण मोधेरा ह्या ऐतिहासिक तसंच नैसर्गिक गोष्टींना टूरिझम मार्केटिंगचं कोफ्लदण चढवलं आणि गुजरातच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीची निर्मिती करून एक अव्वल दर्जाचं टूरिझम डेस्टिनेशन बनवलं. आता प्रत्येक भारतीयाला गुजरातला भेट द्यायचीय. आमच्याकडेही आता गुजरातच्या सहा प्रकारच्या टूर्स आहेत. आता सीझन सुरू होतोय राजस्थान आणि गुजरातचा. त्यासाठी खाली वेगवगेळ्या टूर्स दिल्या आहेत. आवडीनुसार, सवडीप्रमाणे आणि बजेटमधली टूर निवडा. चला गुजरातला किंवा राजस्थानला. भारतातल्या दोन राज्यांवर तुमची पर्यटन मोहोर उठवा.

June 29, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top